✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

वॅलेंटाईन डे ! ___ शतशब्दकथा

त
तुमचा अभिषेक यांनी
Fri, 08/09/2013 - 21:43  ·  लेख
लेख
सालाबादाप्रमाणे येणारा प्रेमदिवस.. उधळायला संस्कृतीरक्षकांची जय्यत तयारी होतीच.. निषेधाचे बॅनर शहरभर लागले होते.. कट्ट्यावरच्या राहुल’चीही तयारी झाली होती.. चॉकलेट परफ्यूम ग्रीटींग अन फुले... आणखी काय लागते..! गेल्या तीन वर्षांचा त्याचा रेकॉर्ड होता, एकही वॅलेंटाईन डे फेल गेला नव्हता.. यावेळी मात्र अंदाज फसला.. त्याला हसूनच नकार देत ती पुढच्याकडे वळली.. टाय विस्कटतच त्याने पुष्पगुच्छ जमिनीवर आदळला.. अर्थातच, अपमान अन पराभवाची निशाणी कोणाला आवडते ! ते निघून गेले अन एवढा वेळ जवळच उभी.. नुसतेच बघत असलेली ‘ती’ ... लगबगीने पुढे आली.. पडलेली फुले उचलून हृदयाशी कवटाळली.. डोळ्यात काहीतरी तरळले आणि तिच्याही नकळत दोन अश्रू कोसळले.. तिची अन तिच्या पोरांच्या, आजच्या जेवणाची सोय झाली होती ! - तुमचा अभिषेक
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
कथा
लेखनप्रकार (Writing Type)
लेख

प्रतिक्रिया द्या
5654 वाचन

💬 प्रतिसाद (27)

प्रतिक्रिया

पहिल्या शतशब्दकथेला मिळालेला

तुमचा अभिषेक
Fri, 08/09/2013 - 21:43 नवीन
पहिल्या शतशब्दकथेला मिळालेला प्रतिसाद दुसरी लिहिण्याचा हुरुप देण्यास पुरेसा होता.. आता हिच्यावर मिळणारे प्रामाणिक प्रतिसाद सल्ले अन सूचना तिसरीच्या वेळी नक्कीच कामाला येतील.. :)
  • Log in or register to post comments

सॉलीड

विटेकर
Fri, 08/09/2013 - 22:40 नवीन
टर्न आहे शेवटल्या १० शब्दात ! झक्कास ! असे लिहित राहीलात तर या तंत्राचे गुरु व्हाल. उत्तम आणि पुलेशु..
  • Log in or register to post comments

मस्तच!

आदूबाळ
Fri, 08/09/2013 - 23:04 नवीन
मस्तच!
  • Log in or register to post comments

शेवट मस्त जमलाय...

डॉ सुहास म्हात्रे
Sat, 08/10/2013 - 01:03 नवीन
शेवट मस्त जमलाय... शतशब्दकथेची भट्टी नीट जमू लागलीय !
  • Log in or register to post comments

असेच म्हणतो. शेवट विशेष आवडला

बॅटमॅन
Sat, 08/10/2013 - 01:14 नवीन
असेच म्हणतो. शेवट विशेष आवडला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे

वा

प्रसाद गोडबोले
Sat, 08/10/2013 - 01:16 नवीन
बरेच दिवसांनी कही नवीन फॉर्मॅट वाचाअयला मिळाला . छान आहे कथा.
  • Log in or register to post comments

आतिवास

पहाटवारा
Sat, 08/10/2013 - 02:36 नवीन
तुम्हि आतिवास यांच्या चिमुरडिच्या शतशब्द्कथा वाचल्या नाहि का इथे मिपा वर ? बटाटा भाजी, फुस्स..., वाट ( हि मला वाटते पहिली होती )..
  • Log in or register to post comments

तुम्ही शेन वॉर्न चे चेले काय??

अर्धवटराव
Sat, 08/10/2013 - 04:31 नवीन
शेवटच्या वाक्यात काय टर्न घेते कथा राव. जबरी. अर्धवटराव
  • Log in or register to post comments

छान कलाटणी

पैसा
Sat, 08/10/2013 - 09:41 नवीन
मस्त लिहिलंस!
  • Log in or register to post comments

छान

तिमा
Sat, 08/10/2013 - 11:04 नवीन
पहिल्या प्रयत्नापेक्षा ही कथा भिडली. लवकरच आतिवास यांना हेल्दी काँपिटिशन! - तिमा
  • Log in or register to post comments

लवकरच आतिवास यांना हेल्दी

आतिवास
Sat, 08/10/2013 - 12:39 नवीन
लवकरच आतिवास यांना हेल्दी काँपिटिशन! !! "काँपिटिशन" कशाला? अजून लोकांनी लिहावं.. त्यातून शतशब्दकथा अधिक भक्कम होईल - ते महत्त्वाचं :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तिमा

बरं बुवा!

तिमा
Sat, 08/10/2013 - 14:21 नवीन
काँपिटिशन नाही. मिपा समृद्ध होण्याची वाटचाल सुरु, असं म्हणतो. - तिरशिंगराव माणुसघाणे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आतिवास

सहमत तिमा .. आपण जे म्हणालात

तुमचा अभिषेक
Sat, 08/10/2013 - 19:24 नवीन
सहमत तिमा .. आपण जे म्हणालात त्यातील हेल्दी शब्द महत्वाचा.. मग ती स्पर्धा ईतरांशी नाही तर स्वताशी असते, आणि ईंतरांच्या पुढे जाण्यासाठी नाही तर ईतरांना पुढे नेण्यासाठी असते :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तिमा

लक्षात राहण्याजोगी.

प्रभाकर पेठकर
Sat, 08/10/2013 - 11:16 नवीन
सुंदर आशयगर्भ शतशब्दकथा. दोन भिन्न दिशांचे लेखनप्रकार मिपावरच वाचावयास मिळतात. एकीकडे अशी आशयगर्भ शतशब्दकथा तर दूसरीकडे आशयविहीन लक्षशब्द लेख.
  • Log in or register to post comments

काका, तुमचा प्रतिसाद वाचून

किणकिनाट
Sat, 08/10/2013 - 12:09 नवीन
काका, तुमचा प्रतिसाद वाचून एकदम धडधडून हसायला आलं. आणि अर्थातच १००% सहमत. सुंदर आशयगर्भ शतशब्दकथा. लगे रहो, तु.अभि. किणकिनाट.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर

****

जेपी
Sat, 08/10/2013 - 14:19 नवीन
****
  • Log in or register to post comments

धन्यवाद सर्वांचे

तुमचा अभिषेक
Sat, 08/10/2013 - 19:20 नवीन
तिसरीसाठी हुरुप वाढावा इतपत अपेक्षा होती, इथे अगदी दडपण यावे ईतके चांगले प्रतिसाद आलेत.. मनापासून धन्यवाद सर्वांचे :)
  • Log in or register to post comments

तिसर्‍याची वाट पाहतो.

सुधीर
Sat, 08/10/2013 - 19:59 नवीन
तिसर्‍याची, चौथ्याची... पण वाट पाहतो. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तुमचा अभिषेक

तुम्ही नका हो दडपण घेउ.

अभ्या..
Sun, 08/11/2013 - 14:40 नवीन
तुम्ही नका हो दडपण घेउ. आणि प्रतिसाद पण किती सुरेख देता तुम्ही. आम्ही असं काही लिहील गोग्गोड की, लोकांना मानभावी वाटतं. ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तुमचा अभिषेक

"पण" या शब्दासाठी विशेष

तुमचा अभिषेक
Mon, 08/12/2013 - 12:10 नवीन
"पण" या शब्दासाठी विशेष धन्यवाद :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

आवडली.

सस्नेह
Sun, 08/11/2013 - 13:48 नवीन
आवडली.
  • Log in or register to post comments

झक्कास...! शेवट तर अप्रतिम...

अत्रुप्त आत्मा
Sun, 08/11/2013 - 18:55 नवीन
झक्कास...! शेवट तर अप्रतिम...!
  • Log in or register to post comments

सुंदर....

झुळूक
Mon, 08/12/2013 - 10:17 नवीन
सुंदर....:)
  • Log in or register to post comments

आवडली..

चिगो
Fri, 08/16/2013 - 18:02 नवीन
आतिवास ह्यांच्या कथा जरा मिष्कील, निरागसपणाकडे झुकणार्‍या.. तर तुमचारावांच्या कथा धक्कातंत्र, कलाटणीबाज.. झक्कास ! मिपा आणि शतशब्दकथाप्रकार समृद्ध होत आहे.. :-)
  • Log in or register to post comments

मस्तच

अनिल तापकीर
Fri, 08/16/2013 - 18:16 नवीन
मस्तच
  • Log in or register to post comments

छानच.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Fri, 08/16/2013 - 18:42 नवीन
लेखनाचा फॉर्मेट आवडलाच आहे. अजून येऊ दे....!!! -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

धन्यवाद

तुमचा अभिषेक
Sat, 08/17/2013 - 19:07 नवीन
सर्वच प्रतिसादांचे :)
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा