✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

नौस

आ
आतिवास यांनी
Tue, 07/23/2013 - 15:06  ·  लेख
लेख
म्या सक्काळी उटायच्या आदीच आण्णा कुटतरी जातेत. आज सांजच्याला आले तवा हासत व्हते. म्हन्ले, “आन्जाक्का, उद्यापासून आम्ही पण तुमच्या शाळेत येणार बरं का!” ह्ये काय ल्हान नाईत. उगा कायबी बोल्तेत. “तुमास्नी गुर्जी घ्येणार नायती,” म्या बोल्ली. आण्णा हस्ले. म्हन्ले, “हेडमास्तर आहे मी...”. बाबौ! आता कायबी कराया येतंय. कुणाची टाप नाय भांडायची. गुर्जीबी वरडायचे न्हाईत. मज्जा. पन आण्णांचं कायतरी येगळंचं सुरु. अब्यास कर, सुद्द बोल, भांडू नको, श्या दिऊ नको, पाडे म्हन. अकशर चांगलं कहाड. गंपतीचं भजन म्हन. घरात आय, साळंत हे. हैतच. पोरपोरी हस्त्येत. रडू रडू होतंय मला. येशीतल्या मारोतीरायाला दोन रुपैचा नौस बोलून आलेय. “द्येवा, माजीबी बदली कर” म्हनूनशान! *शतशब्दकथा

Book traversal links for नौस

  • ‹ बटाटा भाजी
  • Up
  • यष्टी ›
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
कथा
लेखनप्रकार (Writing Type)
आस्वाद

प्रतिक्रिया द्या
13569 वाचन

💬 प्रतिसाद (29)

प्रतिक्रिया

हेहेहे! ही चिमणी भारीये हां..

बिपिन कार्यकर्ते
Tue, 07/23/2013 - 15:13 नवीन
हेहेहे! ही चिमणी भारीये हां... आय टेल यु!
  • Log in or register to post comments

आवडलं !

कपिलमुनी
Tue, 07/23/2013 - 15:31 नवीन
भारी लिहिता .. 'ओ हेन्री' च्या कथांची आठवण होते ..
  • Log in or register to post comments

हा हा !

सस्नेह
Tue, 07/23/2013 - 15:45 नवीन
मारुतीराया पाव रे बाबा हिच्या नवसाला !
  • Log in or register to post comments

असेच म्हणतो. नवसाला पाव नै तर

बॅटमॅन
Tue, 07/23/2013 - 15:47 नवीन
असेच म्हणतो. नवसाला पाव नै तर पूर्णपणे पूर्ण कर ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सस्नेह

ही चिमणी नेहमी...

अग्निकोल्हा
Tue, 07/23/2013 - 16:06 नवीन
अंतर्मुख बनवते.
  • Log in or register to post comments

(No subject)

यशोधरा
Tue, 07/23/2013 - 16:17 नवीन
:)
  • Log in or register to post comments

:)

सुधीर
Tue, 07/23/2013 - 16:29 नवीन
ह्या छोटीची लेखमाला खूप छान आहे.
  • Log in or register to post comments

आवडले.

नि३सोलपुरकर
Tue, 07/23/2013 - 16:54 नवीन
आवडले. खूप छान आहे.
  • Log in or register to post comments

‘आंजी’चं दुखणं मला कळलं..

निवांत पोपट
Tue, 07/23/2013 - 17:37 नवीन
‘आंजी’चं दुखणं मला कळलं.. :) पहिली,दुसरीत असताना पिताश्रीच एन्स्पेक्शनला आले होते,त्यावेळेचं छातीतलं थाड,थाड,आणि कानकोंडं होणं अजून लक्षात आहे.
  • Log in or register to post comments

हाहा, अंदाज आवडला ...

आतिवास
Tue, 07/23/2013 - 18:12 नवीन
पण ते पाहुणे वायले :-) नाहीतर आण्णा "गुर्जी" आहेत हे आन्जीला माहिती असलं असतं की आधीच! पण एकूण गुर्जीच - ते पाहुणे आणि आण्णाही :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निवांत पोपट

अजून एक शब्दशतक ! अभिनंदन !!

डॉ सुहास म्हात्रे
Tue, 07/23/2013 - 21:14 नवीन
अजून एक शब्दशतक ! अभिनंदन !!
  • Log in or register to post comments

मस्त....

मन१
Wed, 07/24/2013 - 11:53 नवीन
उत्तम
  • Log in or register to post comments

लैच ग्वाड हाय ही आन्जी..

कोमल
Wed, 07/24/2013 - 12:05 नवीन
लैच ग्वाड हाय ही आन्जी.. :)
  • Log in or register to post comments

एवढी भिडली नाही आधीच्या

किसन शिंदे
Wed, 07/24/2013 - 12:59 नवीन
एवढी भिडली नाही आधीच्या शतशब्दकथांपेक्षा.
  • Log in or register to post comments

गमतीदार.

कवितानागेश
Wed, 07/24/2013 - 19:50 नवीन
गमतीदार. :)
  • Log in or register to post comments

उत्तम

स्फिंक्स५
Wed, 07/24/2013 - 23:30 नवीन
उत्तम
  • Log in or register to post comments

द्वाड कुठली!

स्पंदना
गुरुवार, 07/25/2013 - 08:56 नवीन
द्वाड कुठली! पोरगी म्हणावी का काय?
  • Log in or register to post comments

आभार

आतिवास
गुरुवार, 07/25/2013 - 13:52 नवीन
सर्व वाचकांचे आणि प्रतिसादकांचे आभार.
  • Log in or register to post comments

ओकीटोकी...

मदनबाण
गुरुवार, 07/25/2013 - 14:14 नवीन
ओकीटोकी... :)
  • Log in or register to post comments

मस्त एकदम

अभ्या..
गुरुवार, 07/25/2013 - 16:37 नवीन
मस्त एकदम
  • Log in or register to post comments

हिहीहाहाहा

अद्द्या
गुरुवार, 07/25/2013 - 17:28 नवीन
हिहीहाहाहा मस्त मस्त . मागे पण आपल्या काही शतशब्दकथा वाचल्या होत्या . आवडेश :D
  • Log in or register to post comments

छान.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
गुरुवार, 07/25/2013 - 17:36 नवीन
आवडेश. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

ह्ही ह्ही..ह्हा..ह्हा..

अत्रुप्त आत्मा
Sat, 07/27/2013 - 08:58 नवीन
ह्ही ह्ही..ह्हा..ह्हा.. :-D लै..लै.. भारी वाटलया वाचतांना! :)
  • Log in or register to post comments

हाहाहा!

पैसा
Tue, 08/06/2013 - 18:01 नवीन
मस्त! माझे आईवडील आणि काका काकू पण माझ्या शाळेत होते. ६ वर्षं!!
  • Log in or register to post comments

सहा वर्ष!

आतिवास
Tue, 08/06/2013 - 19:35 नवीन
सहा वर्ष! आणि एक नाही, दोन नाही तर चारजण!! तुम्ही शुद्ध लिहिता यात काय नवल मग? :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

हेहेहे!

पैसा
Tue, 08/06/2013 - 21:31 नवीन
म्हणून तर मिपावर डु आयडी घेणं अजिबात शक्य नाही! ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आतिवास

खरं आहे...

मनीषा
Wed, 08/07/2013 - 08:38 नवीन
घरचेच लोक, बाहेर सुद्धा आपल्यावर लक्ष ठेवणार म्हणजे छ्ळच आहे. आणि तिला आशा आहे, मारूतीरायाला नवस केला तर तो काहीतरी करेल म्हणून... तिचा नवस पूर्ण होऊ दे हीच सदिच्छा !
  • Log in or register to post comments

धा रुपयाचा नवस

चित्रगुप्त
Wed, 08/07/2013 - 08:57 नवीन
मस्त. पन येक पराब्लिम हाये: आण्णा आदिच मारुतीला धा रुपयाचा नवस बोलून आल्यातः द्येवा, ह्ये धा रुपे घे, अन माजी आन्जाक्का अब्यास करु दे, सुद्द बोलू दे. पाडे म्हनू दे, अकशर चांगलं कहाडू दे, गंपतीचं भजन म्हनू दे. आनि तिले भांडन तंटा नको करु द्येउ, श्या त अज्याबात नको दिऊ दिऊ रे मारुतिराया. आता आन्जाक्काला म्हनाव, पंदरा रुपेचा नौस बोलावा लागीन, मंगच ऐकते मारुती.
  • Log in or register to post comments

:-)

आतिवास
गुरुवार, 08/08/2013 - 19:26 नवीन
काही खरं नाही हो आमच्या आन्जाक्काचं :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चित्रगुप्त

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा