रुणझुणू रुणझुणू रे भ्रमरा (दोन)
कृष्ण आणि अर्जुनाकडे महाभारतातल्या व्यक्तिरेखा म्हणून पाहू नका. त्या प्रत्येक व्यक्तीच्या, सदैव उपस्थित असलेल्या दोन चित्तदशा आहेत. अर्जुन ही संभ्रमित चित्तदशा आहे आणि कृष्ण ही शांत आणि स्थिर स्थिती आहे. जीवनाच्या रथाचं सारथ्य अर्जुनाकडे आहे, मनाकडे आहे त्यामुळे अस्वास्थ्य आहे.
रथाचं सारथ्य कृष्णाकडे, स्वत:कडे घेण्याचं साहस करण्याचा फक्त अवकाश , तुम्ही स्वच्छंद व्हाल.
__________________________
बिफोर वी गो,
पहिल्या लेखात म्हटलंय विषय कसा पुढे न्यावा याची कोणतीही योजना मनात नाही. तुमचे प्रतिसाद आणि प्रश्न लेखनाची दिशा ठरवतील. प्रथम तुमच्या सर्व प्रतिसादांची एकसंध मांडणी करून लेखमालेच्या संदर्भात त्याची उत्तरं देतो म्हणजे पुढे जाता येईल.
अनेकांचा प्रश्न असायं की मनापलीकडे जाऊन काय साधतं?
खरं तर याचं उत्तर लेखातच आहे : जेव्हा तुम्हाला मनाची समग्र प्रक्रिया समजेल तेव्हा तुमच्या वैचारिक आवर्तनांचा कालावधी कमीकमी होऊ लागेल. तुम्ही पुन्हापुन्हा वर्तमानात येऊ लागाल. मनाच्या एका महत्त्वाच्या दालनावर तुमची हुकुमत चालायला लागेल. मनाच्या अनेक प्रभागांपैकी एका व्यापक प्रभागापासनं तुम्ही मुक्त व्हाल. निरंतर चालू असलेल्या वैचारिक कोलाहलातून बाहेर आल्यानं तुमच्या जीवनात शांतता येईल.
आणखी थोडं विस्तारानं सांगतो (सुरुवातीचा भाग लेखात आहे) :
संवेदना ही मनाची कारक आहे म्हणजे कोणतीही संवेदना मन सक्रिय करते. जेव्हा आपण मनाची प्रक्रिया जाणण्याचा प्रयत्न करतो तेव्हा 'पहिली संवेदना' हा अत्यंत बेसिक फॅक्टर आहे हे लक्षात घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. मन सक्रिय झाल्याबरोबर आपण स्मृती चक्रात अडकून अनेकानेक गतकालीन प्रसंगातून आणि अनुभवातून फिरायला लागतो. हे इतक्या वेगानं घडतं की सुरुवात नक्की कुठून झाली हे लाखातला एखादाच जाणू शकतो.
आपलं मन (किंवा मेंदू) प्रत्येक संवेदनेचं डिकोडींग करत असतो आणि त्यामुळेच आपल्याला संवेदनेचा अर्थ कळतो. हे डिकोडींग स्मृतीच्या आधारे चालू असतं. तुम्ही कधीही शांत डोळे मिटून बसलात तर तुम्हाला हा अनुभव येईल. समजा कुत्र्याच्या भुंकण्याचा आवाज आला तर प्रथम तो उलगडा होतो (श्रवणसंस्था सक्रिय होऊन स्मृतीन्वये तो आवाज कुणाचा ते कळतं ). मग स्मृतीचा दृक भाग सक्रिय होतो आणि डोळ्यासमोर आपल्याला ज्ञात असलेल्या कुत्र्याची प्रतिमा येते. त्यानंतर कुत्र्याविषयीच्या सर्व स्मृती सक्रिय होतात. समजा लहानपणी कुत्रा पाळला असेल (किंवा कधी चावला असेल) तर त्याच्या स्मृती. कुणाला कुत्र्याच्या मालकिणीविषयी काही अनुभव असेल तर त्या स्मृती. कुणाला कुत्री आवडत नसतील तर कॉर्पोरेशनच्या डॉगस्कॉडमध्ये तक्रार करून भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त कसा करावा याचा प्लॅन. आणि असं करत करत कुत्र्याचं जिणं चांगलं का वाईट? आणि सरते शेवटी, आपलं जिणं कसं आहे? अश्या प्रकारे विचारचक्रात पूर्णपणे अडकून आपण स्मृतींच्या अनंत विस्तारात फिरत राहतो. काही वेळानंतर लक्षात येतं की अरे! आपण घरात शांत बसलेलो आहोत.
हे इतकं सविस्तर लिहिण्याचं कारण की कोणताही निर्णय घेताना, कुणाशीही वागताना किंवा एखादी कृती करताना आपण स्मृतीच्याच अधीन होऊन जगत असतो. स्मृतीचा वापर करणं ही अत्यंत वेगळी गोष्ट आहे आणि तिच्या अधीन होऊन जगणं बंधन आहे. पण स्मृतीची प्रक्रिया इतकी वेगवान आहे आणि आपण इतके बेसावध असतो की 'स्मृती (किंवा मन) निर्णय घेतं आहे' याची शेवटच्या क्षणापर्यंत कल्पनाच येत नाही!
तुम्हाला वाटेल की असं काही नाहीये पण मानवी अस्वास्थ्याचं मूळ कारण तेच आहे. आयुष्यात प्रथम आपण सेटल होण्याचा प्रयत्न करतो ( ते अपरिहार्य आहे) पण एकदा सेटल झाल्यावर आपण तोच दिवस (अगदी किरकोळ फरकानं ) पुन्हापुन्हा जगतो. अस्तित्वात प्रत्येक क्षण नवा आहे पण वी लीव द सेम रूटीन. आपला दिवस आठवड्याच्या माळेत गुंफल्यानं त्यात थोडाफार पॅटर्न वाटतो इतकंच. मग असं जगतजगत एक दिवस आपण संपून जातो. ज्यांना याची वेळीच कल्पना येते ते चौकट लंघायचा प्रयत्न करतात, पण बहुसंख्यांना वाटतं लाईफ असंच आहे. ते 'एक उनाड दिवस' सारखा पिक्चर पाहतात (फार तर अधेमधे ट्रेक करतात किंवा सहलीला जातात) आणि ‘कल्पना उत्तम आहे’ अशी स्वतःची समजूत घालून विसरून जातात.
नाऊ कमिंग टू द पॉइंट, जर तुमचं आयुष्य यापेक्षा वेगळं असेल किंवा तुम्हाला तसं वाटत नसेल तर तुम्हाला या लेखांचा काही उपयोग नाही. तुम्ही लेख वाचण्याच्या, प्रश्न विचारण्याच्या आणि वाद घालण्याच्या फंदात पडू नका.
इथे असा गैरसमज आहे की पब्लिक फोरमवर कुणीही काहीही विचारू शकतो. हे म्हणजे रस्त्यावरच्या सगळ्या पाट्या वाचत आणि प्रत्येक दुकानदाराशी बोलत सुटण्यासारखं आहे. ज्यांना माझं म्हणणं पटलं असेल आणि हरक्षणी उत्स्फूर्ततेनं जगायचं असेल त्यांना लेखमालेचा उपयोग आहे.
_________________________
दुसरी गोष्ट, मनावर नियंत्रण मिळवायला तुम्ही इतर कोणताही मार्ग अवलंबत असाल तर तो तुमचा प्रश्न आहे. तुम्हाला नामसाधना योग्य वाटत असेल तर चालू ठेवा. मनाच्या अवलोकनानं रिझल्ट मिळत असेल तर उत्तम आहे. मी स्वतःचं आकलन मांडतोय, आणि जे लिहितोय ते जगतोय त्यामुळे मला कोणत्याही साधनेची गरज नाही. तस्मात, तुम्ही तुमच्या मार्गानं जाणं उत्तम. ते मार्ग रिझल्ट देत नाहीत असं मी का म्हटलं याचा सविस्तर उहापोह पहिल्या लेखात आणि इतर अनेक प्रतिसादात झाला आहे त्यामुळे त्यावर आता पुन्हा चर्चा होणे नाही.
_____________________
सर्वात महत्त्वाचं म्हणजे लेखनाचा उद्देश इंटरेस्टेड लोकांचं आयुष्य आनंदाचं व्हावं असा आहे आणि तो निव्वळ वाचन किंवा चर्चेचा विषय नाही; जगण्याचा आहे. त्यामुळे जोपर्यंत बॅकट्रॅक या पहिल्या लेखात सांगितलेल्या प्रक्रियेचा तुम्ही स्वतः प्रयोग करून अनुभव घेत नाही (किंवा शंका निस्तरत नाही) तोपर्यंत पुढचे लेख लिहिण्यात अर्थ नाही. कारण स्मृती हा मनाचा व्यापक प्रभाग आहे. त्याची प्रक्रिया उलगडल्याशिवाय पुढे तादात्म्य, धारणा, अंतःप्रेरणा, भय, कल (अॅप्टीट्यूड) , माइंड-बॉडी को-ऑर्डिनेशन, नाती आणि सरते शेवटी संगृहित मनाचा परिपाक म्हणजे व्यक्तिमत्त्व या गहन पैलूंचा उलगडा होणं अशक्य आहे.
तुमच्या प्रतिसादातून आणि प्रश्नातून तुम्ही प्रक्रिया करून पाहिली की नाही हे लक्षात येतं आणि इथे एक सोडता कुणीही प्रक्रियेविषयी काही प्रतिसाद दिलेला नाही. आधी जे दोन प्रतिसाद आले होते त्यांनी प्रक्रिया करून पाहिलेली नाही हे त्यांच्या नंतरच्या प्रतिसादांवरून कळलं.
____________________
शेवटची गोष्ट, प्रत्येक वॅलीड प्रश्नाला मी उत्तर दिलं आहे. काही प्रश्न खरोखरी विषयाशी संबंधित होते :
उदाहरणार्थ 'हे तरी आम्हाला कसे कळावं की आम्ही तुमची साधना विश्वासानं करून पाहवी?'
आणि उत्तर आहे : मला किती कळलंय ते तुम्हाला साधना यशस्वी झाल्या क्षणी कळेल!. आणि, अर्थात साधना सोपी आणि निर्धोक आहे. तुम्हाला त्यासाठी कुठेही जायची गरज नाही की त्यात फारसा कालापव्यय नाही.
किंवा : तुम्ही सततच्या चिंतनानं मन भ्रम निर्माण करतं आणि व्यक्ती भ्रमिष्ट होते.> असे लिहिलं आहे. हे कसं काय? आईन्स्टाईनबद्दल किंवा तश्याच अनेक शास्त्रज्ञांबद्दल देखिल तुमचे हेच मत आहे का?
आणि उत्तर आहे : शास्त्रज्ञ अस्तित्वागत प्रश्नांवर (उदा, गुरुत्वाकर्षण) चिंतन करतात, रामावर नाही. आणि त्यांच्या चिंतनातून ते प्रश्नांची उकल साधतात. राम भेटावा हा त्यांच्या चिंतनाचा हेतू नसतो त्यामुळे ते भ्रमिष्ट होत नाहीत.
मला वाटतं हा प्रश्न स्वतः विचार केला तरी सुटण्यासारखा आहे. आणि प्रश्न विचारताना किमान तेवढा विचार करावा अशी अपेक्षा आहे म्हणजे चर्चा विस्तारणार नाहीत.
काही ठिकाणी उपहास करण्याचा अटोकाट प्रयत्न झालयं, उदा. हा प्रश्न : जाणीवेची स्थिर अवस्था म्हणजे कोमा का?
अश्या प्रकारे उपहास करताना आपलं हसूं होतं इतकं लक्षात आलं तर बरं. कारण ‘कोमा’चा अर्थ ‘हँग झालेला कंप्युटर’. व्यक्तीची जाणीव स्थिर झालीये पण मेंदू निकामी झालयं, तो आता संवेदना डिकोड करू शकत नाही. सिद्धाची जाणीव स्थिर आहे आणि मेंदू फुल्ली फंक्शनल आहे.
थोड्याफार प्रमाणात अशीच परिस्थिती धाग्याचा खरडफळा करणार्यांची आहे पण ती जवाबदारी सं.मं.ची आहे. त्यामुळे कुणाचे प्रतिसाद वाचायचे आणि कुणाचे नांव पाहून स्क्रोल करायचे इतकंच माझ्या हातात आहे.
पण काही ठिकाणी सदस्य इतके असंबद्ध प्रतिसाद देतात की आश्चर्य वाटतं उदा. 'अवांतर: तुम्ही कायम हे असे पराभूत, हल्ले, हुकुमत अश्या प्रकारचे शब्द का वापरता'? त्यामुळे मला फार हसू येतं'.
साधारण मराठी पाचवी-सहावीपर्यंत कुणालाही हे शब्द गेलेले असावेत अशी (निदान मराठी संकेतस्थळावर तरी) अपेक्षा आहे.
अनाहत नाद या अत्यंत गहन विषयावर मी म्हटलंय :
"मन शांत झालं की देह, मन आणि विश्वशांती यांची एकरूपता साधते कारण शांतता एकसंध आहे. तिचं विभाजन होऊ शकत नाही. या स्थितीत आपण अखिल विश्वाशी एकरूप होतो (म्हणजे मुळात आहोतच पण त्याची प्रचिती येते). त्याला सत-चित-आनंद (अॅबसल्यूट-काँशसनेस-इक्सटसी) म्हटलंय".
त्यावर असा प्रतिसाद देणं : "कसेही असलं तरी जर मूळ्स्वरुप कायम तसेच राहणार आहे तर त्यापर्यंत जायचे कशाला?
जिथे काहितरी बिघडतय तिथे जौन दुरुस्त करायला नको का?"
म्हणजे एखाद्या शास्त्रीय संगीताच्या रंगलेल्या आणि क्लायमॅक्सला आलेल्या मैफिलीत अचानक कुणाचा सेलफोन यावा आणि 'हाताला धरलं या' हा रिंगटोन वाजावा तसं आहे. अशामुळे आपला शास्त्रीय संगीतातला रस तर दिसतोच पुन्हा चारचौघात अभिरुची उघड होते. एखाद्याला त्याची फिकीर नसणं शक्य आहे पण इतरांचा रसभंग होतो हे नक्की. अश्या वेळी सेल स्वीच ऑफ असणं उत्तम.
या लेखावरील प्रतिसादांमुळे सदस्यांचा वैचारिक कल, त्यांचं आध्यात्मिक आकलन याची पूर्ण कल्पना आलेली आहे. त्यावरनं एक सांगावंस वाटतं, मनापलीकडे जाणं म्हणजे वैचारिक उहापोहातनं बाहेर पडून जाणिवेनं जगणं. अर्थात, जोपर्यंत स्मृती सक्रिय होण्यापूर्वी कोणती संवेदना होती ते लक्षात येत नाही तोपर्यंत जाणीव म्हणजे नक्की काय याचा उलगडा होत नाही. आणि जाणीव हा आपला अस्तित्वाशी संपर्क बिंदू आहे. तो अंतःप्रेरणेचा स्रोत आहे. थोडक्यात अस्तित्वाशी समरूप होऊन जगायला (किंवा अस्तित्वाची इच्छा समजायला) स्मृतीऐवजी संवेदना उपयोगी आहे. स्मृती (किंवा मनाच्या) अधीन असणं म्हणजे व्यक्तिमत्त्वात बंदिस्त होऊन जगणं आणि जाणिवेनं जगणं म्हणजे स्वच्छंद जगणं असा अर्थ आहे. स्वच्छंद जगताना आपण स्मृतीचा उपयोग करतो, पण अनुसरण करत नाही. ते आयुष्य एका नव्या डायमेन्शननं जगायचं साहस आहे. सर्व लेखन हा माझा वैयक्तिक अनुभव आहे तस्मात, निष्फळ चर्चा आणि वादविवाद करण्यापेक्षा तुम्हाला काही काळ तरी प्रामाणिकपणे माझ्या बरोबर वाटचाल करावी. एकदा आपल्या अनुभवात समन्वय आला की मैफिल रंगत जाईल. नंतर जीवनाच्या रथाचं सारथ्य कृष्णाकडे म्हणजे स्वत:कडे घेण्याचं साहस केल्याचा आनंद, तुमचा अनुभव होईल .
रथाचं सारथ्य कृष्णाकडे, स्वत:कडे घेण्याचं साहस करण्याचा फक्त अवकाश , तुम्ही स्वच्छंद व्हाल.
__________________________
बिफोर वी गो,
पहिल्या लेखात म्हटलंय विषय कसा पुढे न्यावा याची कोणतीही योजना मनात नाही. तुमचे प्रतिसाद आणि प्रश्न लेखनाची दिशा ठरवतील. प्रथम तुमच्या सर्व प्रतिसादांची एकसंध मांडणी करून लेखमालेच्या संदर्भात त्याची उत्तरं देतो म्हणजे पुढे जाता येईल.
अनेकांचा प्रश्न असायं की मनापलीकडे जाऊन काय साधतं?
खरं तर याचं उत्तर लेखातच आहे : जेव्हा तुम्हाला मनाची समग्र प्रक्रिया समजेल तेव्हा तुमच्या वैचारिक आवर्तनांचा कालावधी कमीकमी होऊ लागेल. तुम्ही पुन्हापुन्हा वर्तमानात येऊ लागाल. मनाच्या एका महत्त्वाच्या दालनावर तुमची हुकुमत चालायला लागेल. मनाच्या अनेक प्रभागांपैकी एका व्यापक प्रभागापासनं तुम्ही मुक्त व्हाल. निरंतर चालू असलेल्या वैचारिक कोलाहलातून बाहेर आल्यानं तुमच्या जीवनात शांतता येईल.
आणखी थोडं विस्तारानं सांगतो (सुरुवातीचा भाग लेखात आहे) :
संवेदना ही मनाची कारक आहे म्हणजे कोणतीही संवेदना मन सक्रिय करते. जेव्हा आपण मनाची प्रक्रिया जाणण्याचा प्रयत्न करतो तेव्हा 'पहिली संवेदना' हा अत्यंत बेसिक फॅक्टर आहे हे लक्षात घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. मन सक्रिय झाल्याबरोबर आपण स्मृती चक्रात अडकून अनेकानेक गतकालीन प्रसंगातून आणि अनुभवातून फिरायला लागतो. हे इतक्या वेगानं घडतं की सुरुवात नक्की कुठून झाली हे लाखातला एखादाच जाणू शकतो.
आपलं मन (किंवा मेंदू) प्रत्येक संवेदनेचं डिकोडींग करत असतो आणि त्यामुळेच आपल्याला संवेदनेचा अर्थ कळतो. हे डिकोडींग स्मृतीच्या आधारे चालू असतं. तुम्ही कधीही शांत डोळे मिटून बसलात तर तुम्हाला हा अनुभव येईल. समजा कुत्र्याच्या भुंकण्याचा आवाज आला तर प्रथम तो उलगडा होतो (श्रवणसंस्था सक्रिय होऊन स्मृतीन्वये तो आवाज कुणाचा ते कळतं ). मग स्मृतीचा दृक भाग सक्रिय होतो आणि डोळ्यासमोर आपल्याला ज्ञात असलेल्या कुत्र्याची प्रतिमा येते. त्यानंतर कुत्र्याविषयीच्या सर्व स्मृती सक्रिय होतात. समजा लहानपणी कुत्रा पाळला असेल (किंवा कधी चावला असेल) तर त्याच्या स्मृती. कुणाला कुत्र्याच्या मालकिणीविषयी काही अनुभव असेल तर त्या स्मृती. कुणाला कुत्री आवडत नसतील तर कॉर्पोरेशनच्या डॉगस्कॉडमध्ये तक्रार करून भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त कसा करावा याचा प्लॅन. आणि असं करत करत कुत्र्याचं जिणं चांगलं का वाईट? आणि सरते शेवटी, आपलं जिणं कसं आहे? अश्या प्रकारे विचारचक्रात पूर्णपणे अडकून आपण स्मृतींच्या अनंत विस्तारात फिरत राहतो. काही वेळानंतर लक्षात येतं की अरे! आपण घरात शांत बसलेलो आहोत.
हे इतकं सविस्तर लिहिण्याचं कारण की कोणताही निर्णय घेताना, कुणाशीही वागताना किंवा एखादी कृती करताना आपण स्मृतीच्याच अधीन होऊन जगत असतो. स्मृतीचा वापर करणं ही अत्यंत वेगळी गोष्ट आहे आणि तिच्या अधीन होऊन जगणं बंधन आहे. पण स्मृतीची प्रक्रिया इतकी वेगवान आहे आणि आपण इतके बेसावध असतो की 'स्मृती (किंवा मन) निर्णय घेतं आहे' याची शेवटच्या क्षणापर्यंत कल्पनाच येत नाही!
तुम्हाला वाटेल की असं काही नाहीये पण मानवी अस्वास्थ्याचं मूळ कारण तेच आहे. आयुष्यात प्रथम आपण सेटल होण्याचा प्रयत्न करतो ( ते अपरिहार्य आहे) पण एकदा सेटल झाल्यावर आपण तोच दिवस (अगदी किरकोळ फरकानं ) पुन्हापुन्हा जगतो. अस्तित्वात प्रत्येक क्षण नवा आहे पण वी लीव द सेम रूटीन. आपला दिवस आठवड्याच्या माळेत गुंफल्यानं त्यात थोडाफार पॅटर्न वाटतो इतकंच. मग असं जगतजगत एक दिवस आपण संपून जातो. ज्यांना याची वेळीच कल्पना येते ते चौकट लंघायचा प्रयत्न करतात, पण बहुसंख्यांना वाटतं लाईफ असंच आहे. ते 'एक उनाड दिवस' सारखा पिक्चर पाहतात (फार तर अधेमधे ट्रेक करतात किंवा सहलीला जातात) आणि ‘कल्पना उत्तम आहे’ अशी स्वतःची समजूत घालून विसरून जातात.
नाऊ कमिंग टू द पॉइंट, जर तुमचं आयुष्य यापेक्षा वेगळं असेल किंवा तुम्हाला तसं वाटत नसेल तर तुम्हाला या लेखांचा काही उपयोग नाही. तुम्ही लेख वाचण्याच्या, प्रश्न विचारण्याच्या आणि वाद घालण्याच्या फंदात पडू नका.
इथे असा गैरसमज आहे की पब्लिक फोरमवर कुणीही काहीही विचारू शकतो. हे म्हणजे रस्त्यावरच्या सगळ्या पाट्या वाचत आणि प्रत्येक दुकानदाराशी बोलत सुटण्यासारखं आहे. ज्यांना माझं म्हणणं पटलं असेल आणि हरक्षणी उत्स्फूर्ततेनं जगायचं असेल त्यांना लेखमालेचा उपयोग आहे.
_________________________
दुसरी गोष्ट, मनावर नियंत्रण मिळवायला तुम्ही इतर कोणताही मार्ग अवलंबत असाल तर तो तुमचा प्रश्न आहे. तुम्हाला नामसाधना योग्य वाटत असेल तर चालू ठेवा. मनाच्या अवलोकनानं रिझल्ट मिळत असेल तर उत्तम आहे. मी स्वतःचं आकलन मांडतोय, आणि जे लिहितोय ते जगतोय त्यामुळे मला कोणत्याही साधनेची गरज नाही. तस्मात, तुम्ही तुमच्या मार्गानं जाणं उत्तम. ते मार्ग रिझल्ट देत नाहीत असं मी का म्हटलं याचा सविस्तर उहापोह पहिल्या लेखात आणि इतर अनेक प्रतिसादात झाला आहे त्यामुळे त्यावर आता पुन्हा चर्चा होणे नाही.
_____________________
सर्वात महत्त्वाचं म्हणजे लेखनाचा उद्देश इंटरेस्टेड लोकांचं आयुष्य आनंदाचं व्हावं असा आहे आणि तो निव्वळ वाचन किंवा चर्चेचा विषय नाही; जगण्याचा आहे. त्यामुळे जोपर्यंत बॅकट्रॅक या पहिल्या लेखात सांगितलेल्या प्रक्रियेचा तुम्ही स्वतः प्रयोग करून अनुभव घेत नाही (किंवा शंका निस्तरत नाही) तोपर्यंत पुढचे लेख लिहिण्यात अर्थ नाही. कारण स्मृती हा मनाचा व्यापक प्रभाग आहे. त्याची प्रक्रिया उलगडल्याशिवाय पुढे तादात्म्य, धारणा, अंतःप्रेरणा, भय, कल (अॅप्टीट्यूड) , माइंड-बॉडी को-ऑर्डिनेशन, नाती आणि सरते शेवटी संगृहित मनाचा परिपाक म्हणजे व्यक्तिमत्त्व या गहन पैलूंचा उलगडा होणं अशक्य आहे.
तुमच्या प्रतिसादातून आणि प्रश्नातून तुम्ही प्रक्रिया करून पाहिली की नाही हे लक्षात येतं आणि इथे एक सोडता कुणीही प्रक्रियेविषयी काही प्रतिसाद दिलेला नाही. आधी जे दोन प्रतिसाद आले होते त्यांनी प्रक्रिया करून पाहिलेली नाही हे त्यांच्या नंतरच्या प्रतिसादांवरून कळलं.
____________________
शेवटची गोष्ट, प्रत्येक वॅलीड प्रश्नाला मी उत्तर दिलं आहे. काही प्रश्न खरोखरी विषयाशी संबंधित होते :
उदाहरणार्थ 'हे तरी आम्हाला कसे कळावं की आम्ही तुमची साधना विश्वासानं करून पाहवी?'
आणि उत्तर आहे : मला किती कळलंय ते तुम्हाला साधना यशस्वी झाल्या क्षणी कळेल!. आणि, अर्थात साधना सोपी आणि निर्धोक आहे. तुम्हाला त्यासाठी कुठेही जायची गरज नाही की त्यात फारसा कालापव्यय नाही.
किंवा : तुम्ही सततच्या चिंतनानं मन भ्रम निर्माण करतं आणि व्यक्ती भ्रमिष्ट होते.> असे लिहिलं आहे. हे कसं काय? आईन्स्टाईनबद्दल किंवा तश्याच अनेक शास्त्रज्ञांबद्दल देखिल तुमचे हेच मत आहे का?
आणि उत्तर आहे : शास्त्रज्ञ अस्तित्वागत प्रश्नांवर (उदा, गुरुत्वाकर्षण) चिंतन करतात, रामावर नाही. आणि त्यांच्या चिंतनातून ते प्रश्नांची उकल साधतात. राम भेटावा हा त्यांच्या चिंतनाचा हेतू नसतो त्यामुळे ते भ्रमिष्ट होत नाहीत.
मला वाटतं हा प्रश्न स्वतः विचार केला तरी सुटण्यासारखा आहे. आणि प्रश्न विचारताना किमान तेवढा विचार करावा अशी अपेक्षा आहे म्हणजे चर्चा विस्तारणार नाहीत.
काही ठिकाणी उपहास करण्याचा अटोकाट प्रयत्न झालयं, उदा. हा प्रश्न : जाणीवेची स्थिर अवस्था म्हणजे कोमा का?
अश्या प्रकारे उपहास करताना आपलं हसूं होतं इतकं लक्षात आलं तर बरं. कारण ‘कोमा’चा अर्थ ‘हँग झालेला कंप्युटर’. व्यक्तीची जाणीव स्थिर झालीये पण मेंदू निकामी झालयं, तो आता संवेदना डिकोड करू शकत नाही. सिद्धाची जाणीव स्थिर आहे आणि मेंदू फुल्ली फंक्शनल आहे.
थोड्याफार प्रमाणात अशीच परिस्थिती धाग्याचा खरडफळा करणार्यांची आहे पण ती जवाबदारी सं.मं.ची आहे. त्यामुळे कुणाचे प्रतिसाद वाचायचे आणि कुणाचे नांव पाहून स्क्रोल करायचे इतकंच माझ्या हातात आहे.
पण काही ठिकाणी सदस्य इतके असंबद्ध प्रतिसाद देतात की आश्चर्य वाटतं उदा. 'अवांतर: तुम्ही कायम हे असे पराभूत, हल्ले, हुकुमत अश्या प्रकारचे शब्द का वापरता'? त्यामुळे मला फार हसू येतं'.
साधारण मराठी पाचवी-सहावीपर्यंत कुणालाही हे शब्द गेलेले असावेत अशी (निदान मराठी संकेतस्थळावर तरी) अपेक्षा आहे.
अनाहत नाद या अत्यंत गहन विषयावर मी म्हटलंय :
"मन शांत झालं की देह, मन आणि विश्वशांती यांची एकरूपता साधते कारण शांतता एकसंध आहे. तिचं विभाजन होऊ शकत नाही. या स्थितीत आपण अखिल विश्वाशी एकरूप होतो (म्हणजे मुळात आहोतच पण त्याची प्रचिती येते). त्याला सत-चित-आनंद (अॅबसल्यूट-काँशसनेस-इक्सटसी) म्हटलंय".
त्यावर असा प्रतिसाद देणं : "कसेही असलं तरी जर मूळ्स्वरुप कायम तसेच राहणार आहे तर त्यापर्यंत जायचे कशाला?
जिथे काहितरी बिघडतय तिथे जौन दुरुस्त करायला नको का?"
म्हणजे एखाद्या शास्त्रीय संगीताच्या रंगलेल्या आणि क्लायमॅक्सला आलेल्या मैफिलीत अचानक कुणाचा सेलफोन यावा आणि 'हाताला धरलं या' हा रिंगटोन वाजावा तसं आहे. अशामुळे आपला शास्त्रीय संगीतातला रस तर दिसतोच पुन्हा चारचौघात अभिरुची उघड होते. एखाद्याला त्याची फिकीर नसणं शक्य आहे पण इतरांचा रसभंग होतो हे नक्की. अश्या वेळी सेल स्वीच ऑफ असणं उत्तम.
या लेखावरील प्रतिसादांमुळे सदस्यांचा वैचारिक कल, त्यांचं आध्यात्मिक आकलन याची पूर्ण कल्पना आलेली आहे. त्यावरनं एक सांगावंस वाटतं, मनापलीकडे जाणं म्हणजे वैचारिक उहापोहातनं बाहेर पडून जाणिवेनं जगणं. अर्थात, जोपर्यंत स्मृती सक्रिय होण्यापूर्वी कोणती संवेदना होती ते लक्षात येत नाही तोपर्यंत जाणीव म्हणजे नक्की काय याचा उलगडा होत नाही. आणि जाणीव हा आपला अस्तित्वाशी संपर्क बिंदू आहे. तो अंतःप्रेरणेचा स्रोत आहे. थोडक्यात अस्तित्वाशी समरूप होऊन जगायला (किंवा अस्तित्वाची इच्छा समजायला) स्मृतीऐवजी संवेदना उपयोगी आहे. स्मृती (किंवा मनाच्या) अधीन असणं म्हणजे व्यक्तिमत्त्वात बंदिस्त होऊन जगणं आणि जाणिवेनं जगणं म्हणजे स्वच्छंद जगणं असा अर्थ आहे. स्वच्छंद जगताना आपण स्मृतीचा उपयोग करतो, पण अनुसरण करत नाही. ते आयुष्य एका नव्या डायमेन्शननं जगायचं साहस आहे. सर्व लेखन हा माझा वैयक्तिक अनुभव आहे तस्मात, निष्फळ चर्चा आणि वादविवाद करण्यापेक्षा तुम्हाला काही काळ तरी प्रामाणिकपणे माझ्या बरोबर वाटचाल करावी. एकदा आपल्या अनुभवात समन्वय आला की मैफिल रंगत जाईल. नंतर जीवनाच्या रथाचं सारथ्य कृष्णाकडे म्हणजे स्वत:कडे घेण्याचं साहस केल्याचा आनंद, तुमचा अनुभव होईल .Book traversal links for रुणझुणू रुणझुणू रे भ्रमरा (दोन)
वर्गीकरण
प्रतिक्रिया
जाणीव हा आपला अस्तित्वाशी
प्रथम, आपण विचारानं जगतो आणि अखिल सजीवसृष्टी संवेदननं!
चालू द्या!
संवेदना ही मनाची कारक आहे
उत्तम ! या पुर्ण उतार्याला मानसशास्त्रीय बैठक आहे,
प्रोब्लेम स्मृतिचा नाहिये!
तो आपल्या मनाच्या इमॅजिनेशच्या अनियंत्रित अॅबिलिटी व
तेच तर सांगतोय.
कारण पैशाने बुध्दि निर्माण करता येत नाही?
तुमचा नेहमी पुन्हा पुन्हा याच ठिकाणी गोंधळ उडतो. एक लक्षात घ्या
>> "मनापासुन मुक्त" होउन आयुष्य आनंदि बनायला आधि बँकबॅलन्स दणकट
हम्म
पोचपावती
येऊ द्या येऊ द्या
नक्कीच! लिहिणार संक्षी अन
चे चे, म्या बापडा काय लिहिणार
संक्षी सारखे जेष्ठ इतके
प्रसन्न! मन:पूर्वक दिलेल्या प्रतिसादाबद्दल आभार
प्रश्न माझा अभ्यास किती आहे
घ्या अजून एक नवीन शब्द फिरवायला
अरे ये सब केमीकल लोचे है भाई...
सहमत.
@मी फक्त रसास्वाद घेणार>>> मा
संक्षी अजून एक
खर आहे आपण सगळे अर्जुनच आहोत
ओके
मुळात बेसिकमध्येच गल्लत होतेय
ऑ?
प्रसन्न, तुझ्या प्रामाणिक
प्रसन्न, तुझ्या प्रामाणिक
इतरांशी संवाद करता करता तुमचा
इतरांशी संवाद करता करता तुमचा स्वतःशीही संवाद चालतो
जगायचं तर पैसा लागतोच, निदान २ वेळच्या जेवणाचा तरी
अरे बाप रे!
चौकट लंघन म्हणजे मनस्वितेनं जगणं, उत्सफूर्ततेनं जगणं.कसं काय ब्वॉ? मनस्वितेनं जगण्यासाठी चौकट लंघन करण्याची काय गरज आहे?मन (किंवा विचार) आपल्याला सतत
सो व्हाट डु वि क्नोव ? अँड... व्हॉट हॅव वि लर्न्ट ?
=))
ठ्ठो!
=)) =))
असते एकेकाची मजबुरी!
एकदा कामात मजा आली की आपण
संपूर्ण प्रतिसाद 'कोट'
काही सार्थ आणि काही व्यर्थ प्रतिसाद आले आहेत!
जियो
तुम्ही कार्यनिपुण होताच होता,
तुम्ही कधी अत्यंत सखोल विचार करून पाहा
संक्षी - वर व्यक्त केलेल्या
तर काय...
मी तुमच्याशी फुल्ल सहमत आहे.
वाचतो आहे. अतिशय सखोल उहापोह चालु आहे. जियो .