✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

मिपा बंद असतं तेव्हा तुम्ही काय करता ? :)

प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे यांनी
Sun, 06/16/2013 - 23:03  ·  लेख
लेख
१] कार्यालयात कामात गुंतवून घेतो. २] घरकामात व्यस्त असतो. ३] फेसबूकवर असतो. मित्रांच्या पोष्टी लाईक/अनलाईक करुन मतं व्यक्त करतो. ४] अन्य मराठी संस्थळावर चक्कर टाकतो. ५] मिपाच्या पानावर रिफ्रेश मारतो. ६] मिपा कधी सुरु होईल याची चौकशी करतो. ७] मिपाचा राग येतो. ८] चित्रपट पाहिले, दूरदर्शनच्या मालिका पाहिल्या. ९] भटकंती केली. १०] काही बोलायचे आहे, पण बोलणार नाही. ११] अन्य. [प्रतिसादात मत लिहिले आहे]
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
46658 वाचन

💬 प्रतिसाद (122)

प्रतिक्रिया

हाहाहा!

पैसा
Sun, 06/16/2013 - 23:22 नवीन
तुमचा आवडत्या विषयाचा धागा आलाच शेवट! २ ते ९ सगळे प्रकार आलटून पालटून करते. मात्र यावेळी जरा वेगळे प्रकार केले. थोडेफार शिवणकाम केले. घर आवरले. एबीसीडी, बोलबच्चन, नवा चष्मेबद्दूर, बर्फी, हॅरी पॉटरचा शेवटचा भाग वगैरे सिनेमे पाहिले. आणि भरपूर झोपा काढल्या!
  • Log in or register to post comments

माझे लै हाल झाले......

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Sun, 06/16/2013 - 23:43 नवीन
माझे सर्वात जास्त हाल झाले. सुटी चालू असल्यामुळे काही मौजमजा करावी म्हटलं तर मिपावर भला मोठा येरर. कितीही रिफ्रेश मार तो उदास येरर माझ्या स्वागतासाठी दात वेंगाडून हजर. कोणत्या जन्माचा बदला घेत होता माहिती नै पण माझ्या मनात त्या येररचा लैच द्वेष निर्माण झाला. बाकी, माझा एक कलमी कार्यक्रम सकाळ, दुपार, संध्याकाळ मिपाच्या पानावर रिफ्रेश मारणे. आणि जमलंच तर मिपा मालकांना, मालक करा ना राव मिपा चालू असा एसेमेस करणे. आता तुम्हाला म्हणून सांगतो मायबोलीवर काही कविता आणि गझला चाळल्या पण तिकडेही साचेबद्ध, सुबक, गझलांवर काफिया,रदीफ, आणि मतलात रमणा-या आणि आशयाचा पत्ता नसणा-या गझलांशी सालं आपलं काही जमलं नाही. फ़ेसबूकवर एका थोर जाल साहित्यिकाराने महानुभाव संप्रदायात चारोळी प्रकार लिहिल्या जात होता असा विचार मांडून मला बेशुद्ध पाडण्याचा प्रयत्न केला. बाकी, फेसबूकवर काही मित्रांच्या पोष्टी लाईक केल्या. फेसबूकवर माझ्या भिंतीवर आजतागायत एकही पोष्ट मी टाकली नाही. पण, अन्य मित्रांच्या भिंती रंगवल्या पण काही खास नाही. एक चरित्रवजा 'जगी ऐसा बाप व्हावा' चाळून काढले. बाकी, एककलमी कार्यक्रम मिपाच्या पानावर रिफ्रेश मारणे. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

'जगी ऐसा बाप व्हावा' मीपण

कवितानागेश
Tue, 06/18/2013 - 15:56 नवीन
'जगी ऐसा बाप व्हावा' मीपण मध्ये वाचलं अर्धं. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

@बिरुटे सर...

मदनबाण
गुरुवार, 06/20/2013 - 09:42 नवीन
@बिरुटे सर... सर्वात प्रथम तुम्हालाच व्होट्सअप मधुन विचारणा केली,मग निलकांत शेठला मेल पाठवले. हापिसात कामात जराशी सवड मिळाली तर उगाच पेज रिफ्रेश मारुन पहायचे असे उद्योग या काळात केले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

अरे हो... एक सांगायचं राहीलं.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Sun, 06/16/2013 - 23:59 नवीन
झी क्लासिक वर नवरंग पाहिला. त्याच्यातला कवी मला भावला. आवडला. गाणी तर मस्तच. ट्रीपल एक्स पाहिला. आणि एकदा आमच्या कुटुंबाच्या नादाला लागून एक दोन दिवस 'पवित्र रिश्ता' मालिकाही पाहिली. लै भारी आहे म्हणे, या मालिकेत अर्चना का कोण तरी ती म्हातारीचा रोल करणार नाही म्हणून कोमात गेली की मेली त्या दिवशी आमचं सर्व घर चकचक करत होतं. मला काही ते समजलं नाही. तुम्हाला नै माहिती, तिच्यामुळेच ही मालिका चालू होती वगैरे बरचं ऐकलं. मग, मीही त्यांच्यासोबत त्या दिवशी सिरियस राहीलो. एक दिवस शिर्डीला गेलो. वाटर पार्कात दिवसभर डुबत राहीलो.... अजून काय काय केलं ते आठवणीनं लिहितो. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

.

आशु जोग
Sun, 06/16/2013 - 23:34 नवीन
> अन्य मराठी संस्थळावर चक्कर टाकतो. हे केलं. त्यात नावे आठवेनात. एक संस्थळ उघडलं तर कुठल्यातरी दुकानाच्या साइटला पोचलो. मिसळ का आवडते याचा विचार केला. एक कारण इंटरफेस. साधा सोपा सरळ समजण्यास खूप सोपा. इतर कारणे स्वातंत्र्य, खरी लोकशाही अनुभवायला मिळते इथे. ते स्वातंत्र्य मिस करत होतो आम्ही. मिसळ बंद पडल्यावर हा सगळा विचार करत होतो.
  • Log in or register to post comments

१)

अत्रुप्त आत्मा
Sun, 06/16/2013 - 23:44 नवीन
१) Image removed. ============================================== २)Image removed. ============================================== ३)Image removed. ============================================== ४)Image removed. ============================================== ५)Image removed. ============================================== ६)Image removed. ============================================== ७)Image removed. ============================================== ८)Image removed. ============================================== . . . . . . . . . . ९)अश्या स्मायल्या शोधण्याचे काम करतो... =))
  • Log in or register to post comments

४] अन्य मराठी संस्थळावर चक्कर

आदूबाळ
Mon, 06/17/2013 - 00:15 नवीन
४] अन्य मराठी संस्थळावर चक्कर टाकतो. लय संस्थळांवर लय चकरा टाकल्या, पण "प्रकृती" जुळेना. बरेच लेखक इतर स्थळांवरही असल्यामुळे त्यांचं लेखन वाचायला मिळालं, अन मिपावर कोणाच्या काय प्रतिक्रिया असल्या असत्या याचा कल्पनाविलास करून खुदूखुदू हसत होतो. ५] मिपाच्या पानावर रिफ्रेश मारतो. आगीनकोल्ह्यावर मिपा घरगुती पान असल्याने आपोआप रिफ्रेश होत होतंच. ७] मिपाचा राग येतो. काऊंटर बघून बघून लय डोकं सराकलं होतं. --- अजून एक म्हणजे "टेलिपोर्टेशन अ‍ॅक्सिडेंट" नावाचं एक भन्नाट पुस्तक वाचलं. "जॉनर बेंडर" प्रकारच्या या पुस्तकात साय फाय, इतिहास, कॉमेडी वगैरे बर्‍याच प्रकारांची सरमिसळ आहे. पुस्तकाच्या मलपृष्ठावरचा ही ओळखः
...a historical novel that doesn't know what year it is; a noir novel that turns all the lights on; a romance novel that arrives drunk to dinner; a science fiction novel that can't remember what 'isotope' means; a stunningly inventive, exceptionally funny, dangerously unsteady and (largely) coherent novel about sex, violence, space, time, and how the best way to deal with history is to ignore it.
  • Log in or register to post comments

अरे वा!

पैसा
Tue, 06/18/2013 - 16:36 नवीन
परीक्षण्/रसग्रहण येऊ द्या!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदूबाळ

> आगीनकोल्ह्यावर मिपा घरगुती

आशु जोग
Mon, 06/17/2013 - 00:26 नवीन
> आगीनकोल्ह्यावर मिपा घरगुती पान २ मिनिटे समजेनाच....
  • Log in or register to post comments

ही ही ही ही! परत वाचल्यावर

आदूबाळ
Tue, 06/18/2013 - 18:03 नवीन
ही ही ही ही! परत वाचल्यावर थोडं चमत्कारिक वाटलं मलाही. बर्‍याच वर्षांपूर्वी कुठल्यातरी मराठी संस्थळावर (मिपा नसावं) एक कथा वाचली होती. त्यातला नायक "उन्मुक्त बर्छीगिरी" करत होता. मला बराच वेळ कळेना याचा नक्की व्यवसाय काय असावा. खाली कोणीतरी प्रतिक्रियेत free lancing असा खुलासा केल्यावर एकदम "युरेका युरेका" झालं!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आशु जोग

मी काही संबंध नसताना सुद्धा

भावना कल्लोळ
Tue, 06/18/2013 - 15:56 नवीन
मी काही संबंध नसताना सुद्धा संगणक देवाला पाया पडते, कुलदेवतेच्या नावाचा जाप करते, मिपाचे वेब पेज ओपन करते,एरर येतो,त्याला परत ताज तवाने करते, पण काही उपयोग नाही, मग हाफिसातली खोळंबलेली कामे ना इलाजाने उरकून घेते, परत वर लिहिल्या प्रमाणे प्रयत्न करते, मग सरते शेवटी चेपु वर जाऊन अनाहिताच्या विभागात टाहो फोडत सुटते, आणि पैसाताई ला पिडत बसते.
  • Log in or register to post comments

मिपा बंद पडते तेंव्हा..

अक्षया
Tue, 06/18/2013 - 16:38 नवीन
चेंज म्हणुन ऑफीस मधे काम करते..;)
  • Log in or register to post comments

मिपाचा तो काळा एररचा पडदा...

दिपक.कुवेत
Tue, 06/18/2013 - 16:45 नवीन
बघुन भोवळ यायची बाकि होती. आता हि प्रतिक्रिया सुद्धा दिसेल कि नाहि शंका वाटतेय. बाकि नाईलाजानं ऑफिसची कामं उरकली. बाकि ह्या निमित्ताने फेसबुकवर नविन अकाउंट ओपन झाले.
  • Log in or register to post comments

काय सांगता?

विकास
Wed, 06/19/2013 - 19:35 नवीन
मिपा बंद असतं? ;) हं म्हणजे केवळ हे संस्थळ आणि त्याच्या मागे लागलेले स्पॅमर्स म्हणजेच मिपा म्हणायचे असले तर गोष्ट वेगळी आहे. पण फेसबुकावर आणि इतरत्रही संवाद साधताना मिपा म्हणूनच होत असतो. मग एखादा धागा टाकला नाही अथवा प्रतिसादाची पिंक पाडता आली नाही म्हणून मिपा बंद आहे असे समजायचे का?
  • Log in or register to post comments

विकिभैय्यांशी सहमत बरं का!

रेवती
Wed, 06/19/2013 - 19:49 नवीन
विकिभैय्यांशी सहमत बरं का!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास

विकासभौंना विकि म्हणणे म्हणजे

नितिन थत्ते
Wed, 06/19/2013 - 20:26 नवीन
विकासभौंना विकि म्हणणे म्हणजे अतीच होतंय हां ! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती

=))

विकास
Wed, 06/19/2013 - 21:47 नवीन
अगदी सहमत!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते

तुम्हाला उतरप्रदेशी

रेवती
Wed, 06/19/2013 - 21:55 नवीन
तुम्हाला उतरप्रदेशी म्हणण्याचे काही मनात नव्हते पण तसे वाटत असेल तर उडवा की माझा प्रतिसाद! त्यात काय यवढं! मला बरेच दिवसांपासून विकीभैय्या म्हणून बघायचं होतं ते काम केलं. बाकी काही नाही. माझा प्रतिसाद हा काही महत्वाचा दस्तैवज नाही. खुश्शाल उडवा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास

भैय्या म्हणून नाही हो!

विकास
Wed, 06/19/2013 - 22:27 नवीन
नितिनरावांनी म्हणले आहे, "विकासभौंना विकि म्हणणे.." त्यावरून कॉम्रेड विकी हे मित्र आठवले इतकेच. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती

तेच विकि म्हणायचे होते.

नितिन थत्ते
गुरुवार, 06/20/2013 - 08:29 नवीन
तेच विकि म्हणायचे होते. तुम्हाला शोधण्याची खास फॅसिलिटी उपलब्ध आहे का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास

अर्थातच ;)

विकास
गुरुवार, 06/20/2013 - 09:43 नवीन
तुम्हाला शोधण्याची खास फॅसिलिटी उपलब्ध आहे का? अर्थातच ;) त्याला गुगल म्हणतात!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते

+१

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Wed, 06/19/2013 - 20:00 नवीन
मुद्द्याशी सहमत. मिपा एक तांत्रिक गोष्ट असेल पण त्याच्याभोवतीचा पाफटपसार्‍यालाही मिपाच म्हटलं पाहिजे, त्याला ना स्पॅमर्स अडवू शकतात ना, अन्य कोणी. आणि अशा मिपा गणगोतात तांत्रिकदृष्ट्या येरर येऊ शकत नाही, याची प्रचिती अनेकांना अशा काळात येते. मिपाकरांशी तसा संवाद सुरुच असतो. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास

मी डॉ. कलामांचे अग्निपंख हे

रेवती
Wed, 06/19/2013 - 19:47 नवीन
मी डॉ. कलामांचे अग्निपंख हे पुस्तक पुन्हा एकदा वाचले, बहुतेक आठव्यांदा असेल! अक्कल्दाढ काढून घेतली, नाहीतरी मिपावर काम नव्हते, आता एक गाल सुजवून बसलीये. त्यामुळे माझी बडबड बंद असल्याने घरी आनंदाचे वातावरण होते. मिपा बंद असताना कपाटे, ड्रॉवर्स आवरणे, कागदपत्रे नीट लावून ठेवणे अशी कामे होतात व मनाला आनंद मिळतो. वाणसामानाची यादी केली, घरकामे असतातच, ती यात धरलेली नाहीत. ;) मुलाबरोबर क्रिकेट खेळले. चक्क एक कॅच घेतला, बाकीचा वेळ ग्राऊंडशेजारी उभ्या असलेल्या कारच्या खाली अडकलेला बॉल काढण्यात गेला. आता काय करणार? नाही जमत नीट फिल्डींग करायला!
  • Log in or register to post comments

(No subject)

स्पंदना
गुरुवार, 06/20/2013 - 06:26 नवीन
:)) :)) :)) :))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती

अजूनही मिपा म्हणावे तसे पळत

पाषाणभेद
Wed, 06/19/2013 - 21:30 नवीन
अजूनही मिपा म्हणावे तसे पळत नाहीये. अन जुने लेखही दिसत आहे काय? मला तर नाही. नक्की काय प्रॉब्लेम असावा?
  • Log in or register to post comments

मी मुलाचा दहावीचा अभ्यास

सस्नेह
Wed, 06/19/2013 - 21:55 नवीन
मी मुलाचा दहावीचा अभ्यास जातीने घेतला अन त्याला फेस आणला...! Image removed.
  • Log in or register to post comments

अग्गग! बिच्चारा!

यशोधरा
Wed, 06/19/2013 - 22:18 नवीन
अग्गग! बिच्चारा!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सस्नेह

लैच आवडले. :)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
गुरुवार, 06/20/2013 - 07:39 नवीन
लंबर एक आवडले. :) -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सस्नेह

देवाचा धावा....

प्रभाकर पेठकर
Tue, 06/25/2013 - 12:30 नवीन
त्याच्याच प्रार्थनेला यश येवून मिपा पुन्हा सुरु झालेले दिसते आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सस्नेह

कपाशीची पेरणी केली.

गंगाधर मुटे
गुरुवार, 06/20/2013 - 01:45 नवीन
कपाशीची पेरणी केली. मिपाच काय आख्खे इंटरनेट बंद पडले असते तर पेरणीवर जास्त लक्ष केंद्रीत करता आले असते. (असा एक विचार डोक्यात डोकावून गेला. :) )
  • Log in or register to post comments

२.एक खोली रंगवायला घेतलीय .५

कंजूस
गुरुवार, 06/20/2013 - 03:18 नवीन
२.एक खोली रंगवायला घेतलीय .५.मिपाच्या बुकमाकवर काम थांबल्यावर टिचकी मारतो .आणि ७.##??
  • Log in or register to post comments

मी खुप काही केलं.

स्पंदना
गुरुवार, 06/20/2013 - 06:30 नवीन
मी खुप काही केलं. म्हणजे मिपा चालु असताना करत नाही ते सगळे उद्योग केले अन नवर्‍याकडुन "कुणी हे उद्योग सांगीतले होते?" अस रागावुन घेतल.
  • Log in or register to post comments

सध्या हापिसात भयानक काम

प्रचेतस
गुरुवार, 06/20/2013 - 08:18 नवीन
सध्या हापिसात भयानक काम असल्याने मिपा चालू असले तरीही येता आले नसतेच त्यामुळे दिवसा कुठे वेळ घालवावा हा फारसा प्रश्न पडला नाही. रात्री घरी आल्यावर मात्र मिपा पेजवर सतत रिफ्रेश मारणे आणि नंतर वैतागून झोपणे हाच क्रम चालू होता. मध्येच स्टार वॉर्सची सिरीज पण पाहून झाली.
  • Log in or register to post comments

नित्य नियमाप्रमाणे रोज मिपार

रुमानी
गुरुवार, 06/20/2013 - 09:33 नवीन
नित्य नियमाप्रमाणे रोज मिपार येउन जाने . तसे बरेचशे ब्लॉग वाचुन काढले , मिपा व्यतिरिक्त जे काही मराठी संस्थळे आहेत ती पालथी घातली . बाकी काय खरेच सांगायचे तर ऑफिस मधले काम मन लाऊन करण्याचा प्रयत्न केला .:)
  • Log in or register to post comments

चेपूवर रोज ...

अनन्न्या
गुरुवार, 06/20/2013 - 18:59 नवीन
फेरी मारून मिपाकर मिपा चालू झाल्याची बातमी कधी देतायत याची वाट पाहत होते. आज चालू झालेय हे कळल्यावर आधी मिपावर सगळीकडे फेरी मारून आले. हायसे वाटले. आज काम बंद, मिपा सुरू!!
  • Log in or register to post comments

११

विनायक प्रभू
Fri, 06/21/2013 - 10:28 नवीन
अपुर्ण होम वर्क पूर्ण केले.
  • Log in or register to post comments

मास्तर

सुहास..
Fri, 06/21/2013 - 14:51 नवीन
अपुर्ण होम वर्क पूर्ण केले. >>>> तुमच्य होमवर्क चा पब्लीक ने काय अर्थ घ्यायचा ;) ( व्यनी करा हवे तर :) )
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विनायक प्रभू

www.misalpav.com व www

श्रीगुरुजी
Fri, 06/21/2013 - 12:24 नवीन
www.misalpav.com व www.misalpav.in ही दोन्ही संकेतस्थळे वेगवेगळी आहेत की एकच आहेत?
  • Log in or register to post comments

३] फेसबूकवर असतो. मित्रांच्या

मंदार कात्रे
Fri, 06/21/2013 - 21:48 नवीन
३] फेसबूकवर असतो. मित्रांच्या पोष्टी लाईक/अनलाईक करुन मतं व्यक्त करतो. ४] अन्य मराठी संस्थळावर चक्कर टाकतो. ५] मिपाच्या पानावर रिफ्रेश मारतो.
  • Log in or register to post comments

ऑफिसात भयाण काम आहे

५० फक्त
Sat, 06/22/2013 - 10:35 नवीन
ऑफिसात भयाण काम आहे ऑफिसात मिपा बंद झालं आहे घरी पोराची शाळा सुरु झाली त्यामुळं फार फरक पडला नाही पण कसंतरी वाटतं हे खरं असो. वल्ली पोहायला शिकतो असा नवस बोलला आहे म्हणे मिपा बंड पडु नये म्हणुन..
  • Log in or register to post comments

वल्ली पोहायला शिकतो असा नवस

प्रचेतस
Sat, 06/22/2013 - 11:09 नवीन
वल्ली पोहायला शिकतो असा नवस बोलला आहे म्हणे मिपा बंड पडु नये म्हणुन..
आइंग. जी गोष्ट पहिल्यापासून येतेय तिच्याबद्दल नवस कशाला बोलायला पायजे म्हणे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ५० फक्त

लै कामे होतेत मिपा बंद असले

अभ्या..
Sat, 06/22/2013 - 11:26 नवीन
लै कामे होतेत मिपा बंद असले की किंवा यायचे बंद केले की, बोलायची भाषा सुधारली, प्रत्युत्तरे देण्याची सवय आटोक्यात आली. चार पैसे जास्त मिळाले. खर्च करायचे चार मार्ग अजून सापडले. एकूणच लै मस्त टैम्पास झाला.
  • Log in or register to post comments

सहमत!!

सूड
Sun, 06/23/2013 - 14:55 नवीन
ते प्रत्युत्तर देण्याचं आटोक्यात मात्र नाही आलं बुवा !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

मी काय करतो ब्वॉ ...... ?

चौकटराजा
Sun, 06/23/2013 - 15:12 नवीन
आपल्या देशात एवढे कवि, साहित्यक, बुवा, महाराज, मंत्री, मॅडम, युवराज, प्रा, डॉ, सिंग , सिंगर ई असताना यातला एकही माणूस गव्हर्नन्स चा आग्रह धरून आपले जीवन पणाला का लावीत नाही? हजारो नागरिकांचे प्रलयात बळी जात असताना हे पदमविभूषण पदमश्री गप्प कसे ? याचा विचार करायला मिपा बंद पडल्याने संधी मिळाली. पण विचार कर करून डोक्याचा भुगा झाला.
  • Log in or register to post comments

वाईट्ट होता तो काळ.....

प्रभाकर पेठकर
Tue, 06/25/2013 - 12:36 नवीन
अनेक दिवसांची तुंबलेली कामे मार्गी लागली. बाकी वेळ मिळाला की मिपाच्या दरवाजा बाहेर लोचटासारखा आशाळभूत नजरेने वाट पाहण्याचे काम करीत राहिलो.
  • Log in or register to post comments

Suites, Ancient Aliens, आणि

पुष्कर जोशी
Tue, 06/25/2013 - 16:25 नवीन
Suites, Ancient Aliens, आणि उंच माझा झोका आशा serials पाहिल्या ...
  • Log in or register to post comments

बेक्कार !

ब़जरबट्टू
Mon, 07/01/2013 - 10:23 नवीन
सध्या तर "मिपा" सुरु कधी असते असा प्रश्न पडाया लागलाय। Error फार येताहेत.
  • Log in or register to post comments

भर...

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Sat, 07/06/2013 - 06:54 नवीन
काय सांगू आणि किती सांगू... मिपा असं वागतं पाहून माझी तर तब्येतच बिघडली आहे सध्या. :( देवा पांडुरंगा, लोकायला सुखात ठेव, पाऊसपाणी जोरदार होऊ दे, आणि एवढं मिपा नियमित व्यवस्थित चालु दे, लै मागणं नै बाबा तुझ्याकडे आमचं. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

पापं लै झालेत तुमची म्हणून

यशोधरा
Sun, 07/07/2013 - 08:58 नवीन
पापं लै झालेत तुमची म्हणून पांडुरंग ऐकत नै तुमचं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा