१] कार्यालयात कामात गुंतवून घेतो.
२] घरकामात व्यस्त असतो.
३] फेसबूकवर असतो. मित्रांच्या पोष्टी लाईक/अनलाईक करुन मतं व्यक्त करतो.
४] अन्य मराठी संस्थळावर चक्कर टाकतो.
५] मिपाच्या पानावर रिफ्रेश मारतो.
६] मिपा कधी सुरु होईल याची चौकशी करतो.
७] मिपाचा राग येतो.
८] चित्रपट पाहिले, दूरदर्शनच्या मालिका पाहिल्या.
९] भटकंती केली.
१०] काही बोलायचे आहे, पण बोलणार नाही.
११] अन्य. [प्रतिसादात मत लिहिले आहे]
प्रतिक्रिया
माझे सर्वात जास्त हाल झाले. सुटी चालू असल्यामुळे काही मौजमजा करावी म्हटलं तर मिपावर भला मोठा येरर. कितीही रिफ्रेश मार तो उदास येरर माझ्या स्वागतासाठी दात वेंगाडून हजर. कोणत्या जन्माचा बदला घेत होता माहिती नै पण माझ्या मनात त्या येररचा लैच द्वेष निर्माण झाला. बाकी, माझा एक कलमी कार्यक्रम सकाळ, दुपार, संध्याकाळ मिपाच्या पानावर रिफ्रेश मारणे. आणि जमलंच तर मिपा मालकांना, मालक करा ना राव मिपा चालू असा एसेमेस करणे.
आता तुम्हाला म्हणून सांगतो मायबोलीवर काही कविता आणि गझला चाळल्या पण तिकडेही साचेबद्ध, सुबक, गझलांवर काफिया,रदीफ, आणि मतलात रमणा-या आणि आशयाचा पत्ता नसणा-या गझलांशी सालं आपलं काही जमलं नाही.
फ़ेसबूकवर एका थोर जाल साहित्यिकाराने महानुभाव संप्रदायात चारोळी प्रकार लिहिल्या जात होता असा विचार मांडून मला बेशुद्ध पाडण्याचा प्रयत्न केला. बाकी, फेसबूकवर काही मित्रांच्या पोष्टी लाईक केल्या. फेसबूकवर माझ्या भिंतीवर आजतागायत एकही पोष्ट मी टाकली नाही. पण, अन्य मित्रांच्या भिंती रंगवल्या पण काही खास नाही.
एक चरित्रवजा 'जगी ऐसा बाप व्हावा' चाळून काढले. बाकी, एककलमी कार्यक्रम मिपाच्या पानावर रिफ्रेश मारणे.
-दिलीप बिरुटे
'जगी ऐसा बाप व्हावा' मीपण मध्ये वाचलं अर्धं. :)
@बिरुटे सर...
सर्वात प्रथम तुम्हालाच व्होट्सअप मधुन विचारणा केली,मग निलकांत शेठला मेल पाठवले. हापिसात कामात जराशी सवड मिळाली तर उगाच पेज रिफ्रेश मारुन पहायचे असे उद्योग या काळात केले.
झी क्लासिक वर नवरंग पाहिला. त्याच्यातला कवी मला भावला. आवडला. गाणी तर मस्तच. ट्रीपल एक्स पाहिला. आणि एकदा आमच्या कुटुंबाच्या नादाला लागून एक दोन दिवस 'पवित्र रिश्ता' मालिकाही पाहिली. लै भारी आहे म्हणे, या मालिकेत अर्चना का कोण तरी ती म्हातारीचा रोल करणार नाही म्हणून कोमात गेली की मेली त्या दिवशी आमचं सर्व घर चकचक करत होतं. मला काही ते समजलं नाही. तुम्हाला नै माहिती, तिच्यामुळेच ही मालिका चालू होती वगैरे बरचं ऐकलं. मग, मीही त्यांच्यासोबत त्या दिवशी सिरियस राहीलो.
एक दिवस शिर्डीला गेलो. वाटर पार्कात दिवसभर डुबत राहीलो.... अजून काय काय केलं ते आठवणीनं लिहितो.
-दिलीप बिरुटे
> अन्य मराठी संस्थळावर चक्कर टाकतो.
हे केलं. त्यात नावे आठवेनात. एक संस्थळ उघडलं तर कुठल्यातरी दुकानाच्या साइटला पोचलो.
मिसळ का आवडते याचा विचार केला. एक कारण इंटरफेस. साधा सोपा सरळ समजण्यास खूप सोपा.
इतर कारणे स्वातंत्र्य, खरी लोकशाही अनुभवायला मिळते इथे.
ते स्वातंत्र्य मिस करत होतो आम्ही. मिसळ बंद पडल्यावर हा सगळा विचार करत होतो.
१)
==============================================
२)
==============================================
३)
==============================================
४)
==============================================
५)
==============================================
६)
==============================================
७)
==============================================
८)
==============================================
.
.
.
.
.
.
.
.
.
.
९)अश्या स्मायल्या शोधण्याचे काम करतो... =))
४] अन्य मराठी संस्थळावर चक्कर टाकतो.
लय संस्थळांवर लय चकरा टाकल्या, पण "प्रकृती" जुळेना. बरेच लेखक इतर स्थळांवरही असल्यामुळे त्यांचं लेखन वाचायला मिळालं, अन मिपावर कोणाच्या काय प्रतिक्रिया असल्या असत्या याचा कल्पनाविलास करून खुदूखुदू हसत होतो.
५] मिपाच्या पानावर रिफ्रेश मारतो.
आगीनकोल्ह्यावर मिपा घरगुती पान असल्याने आपोआप रिफ्रेश होत होतंच.
७] मिपाचा राग येतो.
काऊंटर बघून बघून लय डोकं सराकलं होतं.
---
अजून एक म्हणजे "टेलिपोर्टेशन अॅक्सिडेंट" नावाचं एक भन्नाट पुस्तक वाचलं. "जॉनर बेंडर" प्रकारच्या या पुस्तकात साय फाय, इतिहास, कॉमेडी वगैरे बर्याच प्रकारांची सरमिसळ आहे.
पुस्तकाच्या मलपृष्ठावरचा ही ओळखः
...a historical novel that doesn't know what year it is; a noir novel that turns all the lights on; a romance novel that arrives drunk to dinner; a science fiction novel that can't remember what 'isotope' means; a stunningly inventive, exceptionally funny, dangerously unsteady and (largely) coherent novel about sex, violence, space, time, and how the best way to deal with history is to ignore it.
परीक्षण्/रसग्रहण येऊ द्या!
> आगीनकोल्ह्यावर मिपा घरगुती पान
२ मिनिटे समजेनाच....
ही ही ही ही! परत वाचल्यावर थोडं चमत्कारिक वाटलं मलाही.
बर्याच वर्षांपूर्वी कुठल्यातरी मराठी संस्थळावर (मिपा नसावं) एक कथा वाचली होती. त्यातला नायक "उन्मुक्त बर्छीगिरी" करत होता. मला बराच वेळ कळेना याचा नक्की व्यवसाय काय असावा. खाली कोणीतरी प्रतिक्रियेत free lancing असा खुलासा केल्यावर एकदम "युरेका युरेका" झालं!
मी काही संबंध नसताना सुद्धा संगणक देवाला पाया पडते, कुलदेवतेच्या नावाचा जाप करते, मिपाचे वेब पेज ओपन करते,एरर येतो,त्याला परत ताज तवाने करते, पण काही उपयोग नाही, मग हाफिसातली खोळंबलेली कामे ना इलाजाने उरकून घेते, परत वर लिहिल्या प्रमाणे प्रयत्न करते, मग सरते शेवटी चेपु वर जाऊन अनाहिताच्या विभागात टाहो फोडत सुटते, आणि पैसाताई ला पिडत बसते.
चेंज म्हणुन ऑफीस मधे काम करते..;)
बघुन भोवळ यायची बाकि होती. आता हि प्रतिक्रिया सुद्धा दिसेल कि नाहि शंका वाटतेय. बाकि नाईलाजानं ऑफिसची कामं उरकली. बाकि ह्या निमित्ताने फेसबुकवर नविन अकाउंट ओपन झाले.
मिपा बंद असतं? ;)
हं म्हणजे केवळ हे संस्थळ आणि त्याच्या मागे लागलेले स्पॅमर्स म्हणजेच मिपा म्हणायचे असले तर गोष्ट वेगळी आहे. पण फेसबुकावर आणि इतरत्रही संवाद साधताना मिपा म्हणूनच होत असतो. मग एखादा धागा टाकला नाही अथवा प्रतिसादाची पिंक पाडता आली नाही म्हणून मिपा बंद आहे असे समजायचे का?
विकिभैय्यांशी सहमत बरं का!
विकासभौंना विकि म्हणणे म्हणजे अतीच होतंय हां ! :)
अगदी सहमत!
तुम्हाला उतरप्रदेशी म्हणण्याचे काही मनात नव्हते पण तसे वाटत असेल तर उडवा की माझा प्रतिसाद! त्यात काय यवढं! मला बरेच दिवसांपासून विकीभैय्या म्हणून बघायचं होतं ते काम केलं. बाकी काही नाही. माझा प्रतिसाद हा काही महत्वाचा दस्तैवज नाही. खुश्शाल उडवा.
नितिनरावांनी म्हणले आहे, "विकासभौंना विकि म्हणणे.." त्यावरून कॉम्रेड विकी हे मित्र आठवले इतकेच. :)
तेच विकि म्हणायचे होते. तुम्हाला शोधण्याची खास फॅसिलिटी उपलब्ध आहे का?
तुम्हाला शोधण्याची खास फॅसिलिटी उपलब्ध आहे का?
अर्थातच ;) त्याला गुगल म्हणतात!
मुद्द्याशी सहमत.
मिपा एक तांत्रिक गोष्ट असेल पण त्याच्याभोवतीचा पाफटपसार्यालाही मिपाच म्हटलं पाहिजे, त्याला ना स्पॅमर्स अडवू शकतात ना, अन्य कोणी. आणि अशा मिपा गणगोतात तांत्रिकदृष्ट्या येरर येऊ शकत नाही, याची प्रचिती अनेकांना अशा काळात येते. मिपाकरांशी तसा संवाद सुरुच असतो.
-दिलीप बिरुटे
मी डॉ. कलामांचे अग्निपंख हे पुस्तक पुन्हा एकदा वाचले, बहुतेक आठव्यांदा असेल! अक्कल्दाढ काढून घेतली, नाहीतरी मिपावर काम नव्हते, आता एक गाल सुजवून बसलीये. त्यामुळे माझी बडबड बंद असल्याने घरी आनंदाचे वातावरण होते. मिपा बंद असताना कपाटे, ड्रॉवर्स आवरणे, कागदपत्रे नीट लावून ठेवणे अशी कामे होतात व मनाला आनंद मिळतो. वाणसामानाची यादी केली, घरकामे असतातच, ती यात धरलेली नाहीत. ;) मुलाबरोबर क्रिकेट खेळले. चक्क एक कॅच घेतला, बाकीचा वेळ ग्राऊंडशेजारी उभ्या असलेल्या कारच्या खाली अडकलेला बॉल काढण्यात गेला. आता काय करणार? नाही जमत नीट फिल्डींग करायला!
:)) :)) :)) :))
अजूनही मिपा म्हणावे तसे पळत नाहीये. अन जुने लेखही दिसत आहे काय? मला तर नाही.
नक्की काय प्रॉब्लेम असावा?
मी मुलाचा दहावीचा अभ्यास जातीने घेतला अन त्याला फेस आणला...! 
अग्गग! बिच्चारा!
लंबर एक आवडले. :)
-दिलीप बिरुटे
त्याच्याच प्रार्थनेला यश येवून मिपा पुन्हा सुरु झालेले दिसते आहे.
कपाशीची पेरणी केली.
मिपाच काय आख्खे इंटरनेट बंद पडले असते तर पेरणीवर जास्त लक्ष केंद्रीत करता आले असते. (असा एक विचार डोक्यात डोकावून गेला. :) )
२.एक खोली रंगवायला घेतलीय .५.मिपाच्या बुकमाकवर काम थांबल्यावर टिचकी मारतो .आणि ७.##??
मी खुप काही केलं.
म्हणजे मिपा चालु असताना करत नाही ते सगळे उद्योग केले अन नवर्याकडुन "कुणी हे उद्योग सांगीतले होते?" अस रागावुन घेतल.
सध्या हापिसात भयानक काम असल्याने मिपा चालू असले तरीही येता आले नसतेच त्यामुळे दिवसा कुठे वेळ घालवावा हा फारसा प्रश्न पडला नाही. रात्री घरी आल्यावर मात्र मिपा पेजवर सतत रिफ्रेश मारणे आणि नंतर वैतागून झोपणे हाच क्रम चालू होता. मध्येच स्टार वॉर्सची सिरीज पण पाहून झाली.
नित्य नियमाप्रमाणे रोज मिपार येउन जाने . तसे बरेचशे ब्लॉग वाचुन काढले , मिपा व्यतिरिक्त जे काही मराठी संस्थळे आहेत ती पालथी घातली . बाकी काय खरेच सांगायचे तर ऑफिस मधले काम मन लाऊन करण्याचा प्रयत्न केला .:)
फेरी मारून मिपाकर मिपा चालू झाल्याची बातमी कधी देतायत याची वाट पाहत होते. आज चालू झालेय हे कळल्यावर आधी मिपावर सगळीकडे फेरी मारून आले. हायसे वाटले. आज काम बंद, मिपा सुरू!!
अपुर्ण होम वर्क पूर्ण केले.
अपुर्ण होम वर्क पूर्ण केले. >>>>
तुमच्य होमवर्क चा पब्लीक ने काय अर्थ घ्यायचा ;) ( व्यनी करा हवे तर :) )
www.misalpav.com व www.misalpav.in ही दोन्ही संकेतस्थळे वेगवेगळी आहेत की एकच आहेत?
३] फेसबूकवर असतो. मित्रांच्या पोष्टी लाईक/अनलाईक करुन मतं व्यक्त करतो.
४] अन्य मराठी संस्थळावर चक्कर टाकतो.
५] मिपाच्या पानावर रिफ्रेश मारतो.
ऑफिसात भयाण काम आहे
ऑफिसात मिपा बंद झालं आहे
घरी पोराची शाळा सुरु झाली
त्यामुळं फार फरक पडला नाही पण कसंतरी वाटतं हे खरं
असो. वल्ली पोहायला शिकतो असा नवस बोलला आहे म्हणे मिपा बंड पडु नये म्हणुन..
वल्ली पोहायला शिकतो असा नवस बोलला आहे म्हणे मिपा बंड पडु नये म्हणुन..आइंग. जी गोष्ट पहिल्यापासून येतेय तिच्याबद्दल नवस कशाला बोलायला पायजे म्हणे.
लै कामे होतेत मिपा बंद असले की किंवा यायचे बंद केले की,
बोलायची भाषा सुधारली, प्रत्युत्तरे देण्याची सवय आटोक्यात आली.
चार पैसे जास्त मिळाले. खर्च करायचे चार मार्ग अजून सापडले.
एकूणच लै मस्त टैम्पास झाला.
ते प्रत्युत्तर देण्याचं आटोक्यात मात्र नाही आलं बुवा !!
आपल्या देशात एवढे कवि, साहित्यक, बुवा, महाराज, मंत्री, मॅडम, युवराज, प्रा, डॉ, सिंग , सिंगर ई असताना यातला एकही माणूस गव्हर्नन्स चा आग्रह धरून आपले जीवन पणाला का लावीत नाही? हजारो नागरिकांचे प्रलयात बळी जात असताना हे पदमविभूषण पदमश्री गप्प कसे ? याचा विचार करायला मिपा बंद पडल्याने संधी मिळाली. पण विचार कर करून डोक्याचा भुगा झाला.
अनेक दिवसांची तुंबलेली कामे मार्गी लागली.
बाकी वेळ मिळाला की मिपाच्या दरवाजा बाहेर लोचटासारखा आशाळभूत नजरेने वाट पाहण्याचे काम करीत राहिलो.
Suites, Ancient Aliens, आणि उंच माझा झोका आशा serials पाहिल्या ...
सध्या तर "मिपा" सुरु कधी असते असा प्रश्न पडाया लागलाय। Error फार येताहेत.
काय सांगू आणि किती सांगू... मिपा असं वागतं पाहून माझी तर तब्येतच बिघडली आहे सध्या. :(
देवा पांडुरंगा, लोकायला सुखात ठेव, पाऊसपाणी जोरदार होऊ दे, आणि एवढं मिपा नियमित व्यवस्थित चालु दे, लै मागणं नै बाबा तुझ्याकडे आमचं.
-दिलीप बिरुटे
पापं लै झालेत तुमची म्हणून पांडुरंग ऐकत नै तुमचं.
हाहाहा!