Skip to main content

आम्हा घरी धन..

लेखक मोदक यांनी रविवार, 26/05/2013 12:53 या दिवशी प्रकाशित केले.
राम्राम मंडळी. खरडफळ्यावर गेले दोन दिवस अनेक जण आपापल्या आवडीच्या कविता देत आहेत.. त्यावरून या धाग्याची कल्पना सुचली. चला.. आपल्याला आवडलेल्या कविता, ओळी, छोटेखानी लेख, वन लाईनर्स, टॅन्जंट्स, सुभाषिते.. अगदी जे जे आवडले आहे ते येथे एकत्र करूया. लेखक आणि पुस्तकाचे नाव द्याच परंतु आवडलेला मजकूर 'का आवडला?' हे ही शक्य असेल तर द्या. मी सुरूवात करतो.. ******************************************************** गोनिदांच्या दुर्गभ्रमणगाथेतून, रायगडावरील आषाढाचे चित्रदर्शी वर्णन... ज्येष्ठ संपतो. आकाश मेघांनी भरभरून येवू लागतं. रायगड ऐन कोकणांत. आकाश आपल्यावर प्रसन्न असलं, कीं तिथून समुद्ररेखा दिसू शकते. सूर्य अस्ताला जात असावा, उतरता उतरता तो क्षितिजाशी टेकावा, त्या क्षणी थेट पश्चिम क्षितिजाशी सूर्यप्रकाशानं चकाकणारं सागरजळ दिसतं. अनेकदां ते पाहिलंही आहे. अर्थ असा, की थेट समुद्रापासून रायगडावेरी कशाचीही अटक नाही. समुद्रावर गर्दी करून जमलेला मेघांचा समूह पूर्वेच्या दिशेनं चालून येवू लागला, की त्याला आढळतो रायगड. एखाद्या प्रचण्ड चौरंगासारखा. अन् मग तो असा बरसू लागतो की सांगता पुरवत नाही. लोटावर लोट चालून येतात. ते थांबतच नाहीत. येतात आणि गडाच्या माथ्यावर कोसळतात. त्यांच्याबरोबरच येते धुई. ती सगळा डोंगर आपल्या कवेत घेते. हातावरचं कांही दिसत नाही. अगदीं आपल्या नाकाचा शेंडादेखील. त्या दिवसात धनगरं आपापल्या झापांमधून रानशेण्यांची शेकोटी करून तासन् तास तापत बसतात. इकडे पाऊस धुवांधार कोसळत असतो, तों तों धनगरं मात्र प्रसन्न होत असतात. कारण असा मोप पाऊस बरसला, की गड हिरवागार होणार असतो. त्याची म्हसरं अन् गावल्या भरपूर जोगावणार असतात. कासंड्या भरभरून दूध देणार असतात. तर त्या धनगरांशेजारी बसून एकीकडे शेकत, दुसरीकडे त्याच्या चौकश्या करीत बसणं इतकं सुखाचं असतं, म्हणून सांगू! त्यांच्यापास हवा तेवढा वेळ असतो. ती मोकळी झालेली असतात. भरंवसा निपजलेला असतो, कीं हा परदेशी पाहुणा आपला मित्र आहे. सखा सुहृद आहे. असं अंतर हरपलेलं असतं. मग ती नाना परींचं बोलत असतात. सुखाचं. दु:खाचं. प्रापंचिक चिंतांचं. गाईम्हशींचं. त्यांच्या वेतांचं. दुधाचं. तें सगळं ऐकून वाटू लागतं, की आपण आपल्या भोंतीचा प्रपंच म्हणजेच सगळं विश्व असं गृहीत धरतो, ते किती चूक आहे! मात्र हे ध्यानी येण्यासाठींही असं त्यांच्या पोटात शिरावं लागतं. त्यांच्या मनी भरंवसा निपजूं द्यावा लागतो. किंवा धर्मशाळेतल्या खोलींत चिप्प बसून असावं. नगारखान्याच्या ओवर्‍यात हात पाय पोटाशी घेवून बसावं. जगदीश्वराच्या देवळांत आसरा घेऊन पावसाचं चण्डनृत्य आनभवीत असावं. ध्यानी येवू लागतं, की पावसाच्या या धारानृत्यालाही एक ताल आहे. कधी तो धुमाळीचं बोट धरून बरसतो. कधी एकतालाच्या ठोक्यांत खाली उतरतो. कधी त्या धारांच्या त्रितालाचा ठेका सुरू असतो. चहुंकडून घेरून येणारं धुकट कुंद असतं. स्वत:वेगंळं काहीही दिसत नाही. कशाचंही भान नसतं. त्यात हा ताल असा कांही अंगी भरतो, की सांगता पुरवत नाही. हळूं हळूं पाऊसधारा उणावू लागतात. धुकट विरूं लागतं. कमींत कमी दिवसांतले कांही तास तरी मग बाहेर पडावं. पायांतळी वाहाणारे इवलाले वहाळ वलांडीत चहूं दिशा भटकावं. टकमकावर जावं. दिसली, तर तळातली शोभा पाहावी. काळ दुथडी भरून वाहात असते. पुन: धुकटं झाकोळून येतात. मग माघारे वळून, पायांतळी सांचलेल्या डबक्यांतलं पाणी उडवत गंगासागरावरून बालेकिल्ल्यात शिरावं. नगारखान्याबाहेर पडावं, बाजारपेठेत शिरावं. पावसधारांनी काय कवतिक केलं आहे, ते ध्यानी येवू लागतं. तें पाणी भुईचं कवच भेदून आत शिरलं. कड्यांची आवरणं भेदून आत घुसलं. त्या कवचा-आवरणाखाली गतवर्षी उन्हाळ्यांत वाळून कोळ झालेली तृणबीजं सुरक्षित असतात. तें पाणी त्यांच्या भंवताली गोळा होतं. त्यांना गुदगुल्या होतात. ती फुगतांत. टरारतात. अंग ठसठसू लागतं. मग तें वरील बाजूनं फुटतं. एक नाजूक लवलवता कोंब बाहेर येतो. पोपटी रंगाचा. तो भुई-कडा भेदून वर उठतो. मोठ्या नवलानं भंवताल न्यांहाळू लागतों. एक. दुसरा. तिसरा. सहावा. दहावा. शंभरावा. हजारावा. अन् पाहतां पाहतां अवघं धरतीमंडळ हिरव्या सौंदर्यानं बहरून येतं. सगळे डोंगर, दरे, कडे, दरकुटं, ओघळी, घळी, लवणं असं सगळं चिरतरूण होऊन जातं. महिन्या दीडमहिन्यात तृणपुष्पं आपले डोळे विस्मयानं उघडीत आकाश न्याहाळूं लागतात. सोनावळी धुमारते. तेरडा उंच उंच उठूं लागतो. त्याला कळे फुटतात. ती अनाम तृणपुष्पं, ती सोनावळी, ती तेरड्याची फुलं, असा काही विलक्षण रूपगौरव डोंगरभर दाटतो म्हणून सांगू! पायातळी असा वनपुष्पांचा गालिचा अंथरलेला असतो, आणि आपण विराण्या देशींच्या राजपुत्रासारखे त्या रूजाम्यावरून अवशेष धुंडाळीत हिंडत असतो... ********************************************************

वाचने 88478
प्रतिक्रिया 172

प्रतिक्रिया

माझी एक अत्यंत आवडती चित्रदर्शी कविता. कितव्या इयत्तेत ते आठवत नाही, पण हि कविता मराठीच्या पुस्तकात होती. कोणाला कवी/कवयित्री माहित असतील तर कृपया सांगावेत. माथ्यावरती उन्हे चढावी, पावलात सावल्या विराव्या घाटावरती शुभ्र धुण्यांच्या, पाकोळ्या अन् मंद झुलाव्या डोंगर व्हावे पेंगुळलेले, पोफळबागा सुस्त निजाव्या अंगणातल्या हौदावरती, तहानलेल्या मैना याव्या लुकलुकणारे गोल कवडसे, निंबाच्या छायेत वसावे खारीचे बावरे जोडपे, बकुळीखाली क्षणिक दिसावे कुरणाच्या हिरवळीत ओल्या, ऊन हिरवे होऊन जावे कुठे कधीचे नांगरलेले, शेत पावसासाठी झुरावे

In reply to by मराठीप्रेमी

येथील ज्याना ज्याना कविता करायची जाग. आग, आस खाज जे काही असेल त्यानी या कवितेचा फार लक्षपूर्वक अभ्यास करावा. म्हणजे कवीने वर्णन करताना कविकल्पना वापरायचे झाल्यास वास्तवाचे, परिसराचे, भान कसे व किती असले पाहिजे याचा धडाच इथे दिलेला आहे. क्या बात है !

मस्त वाचनीय धागा. धन्स. -दिलीप बिरुटे

भंगु दे काठिण्य माझे आम्ल जाउ दे मनीचे येऊ दे वाणीत माझ्या सूर तुझ्या आवडीचे धैर्य दे अन नम्रता दे पाहण्या जे जे पहाणे वाकू दे बुध्दीस माझ्या तप्त पोलादाप्रमाणे जाऊ दे ‘कार्पण्य’ ‘मी’ चे दे धरु सर्वांस पोटी भावनेला येऊ देगा शास्त्र काट्याची कसोटी कवी – बा.सी.मर्ढेकर

गाई पाण्यावर काय म्हणुनी आल्या का गं गंगा यमुनाही ह्या मिळाल्या उभय पितरांच्या चित्तचोरटीला कोण माझ्या बोलले गोरटीला विभा विमला आपटे प्रधानांच्या अन्य कन्या श्रीमान कुलीनांच्या गौरचैत्रीची कशास जुनी येती रेशमाची पोलकी छीटे लेती तुला लंकेच्या पार्वतीसमान पाहुनीया होवोनी साभिमान काय त्यातील बोलली एक कोण "अहा, आली ही पहां भिकारीण" पंकसंपर्के का कमळ भिकारी? धुलीसंसर्गे रत्न का भिकारी? सूत्रसंगे सुमहार का भिकारी? कशी तुही मग मज मुळी भिकारी? लाट उसळोनी जळी खळे व्हावे त्यात चंद्राचे चांदणे पडावे तसे गाली हासता तुझ्या व्हावे उचंबळूनी लावण्य बर वहावे नारीमायेचे रुप हे प्रसिद्ध सोस लेण्यांचा त्यास जन्मसिद्ध तोच बीजांकुर धरी तुझा हेतू विलासाची होशील मोगरी तू तुला घेईन पोलके मखमलीचे कूडी मोत्याची फूल सुवर्णाचे हौस बाई पुरवीन तुझी सारी परी यांवरी हा प्रलय महाभारी प्राण ज्यांचे वर गुंतले सदाचे कोड किंचीत पुरवीता नये त्यांचे तदा बापाचे ह्र्दय कसे होते? न ये वदता अनुभवी जाणती ते देव देतो सद्गुणी बालकांना काय म्हणुनी आम्हांस करंट्यांना? लांब त्याच्या गावास जाऊनीया गूढ घेतो हे त्यांस पुसूनीया "गावी जातो" ऐकता त्याच गाली पार बदलूनी ती बालसृष्टी गेली गळा घालूनी करपाश रेशमाचा वदे, "येते मी, पोर अज्ञ वाचा" कवी - बी

फुलराणी- हिरवे हिरवेगार गालिचे – हरित तृणाच्या मखमालीचे; त्या सुंदर मखमालीवरती – फुलराणी ही खेळत होती. गोड निळ्या वातावरणात – अव्याज-मने होती डोलत; प्रणयचंचला त्या भ्रूलीला – अवगत नव्हत्या कुमारिकेला, आईच्या मांडीवर बसुनी – झोके घ्यावे, गावी गाणी; याहुनि ठावे काय तियेला – साध्या भोळ्या फुलराणीला ? पुरा विनोदी संध्यावात – डोलडोलवी हिरवे शेत; तोच एकदा हासत आला – चुंबून म्हणे फुलराणीला- “छानी माझी सोनुकली ती – कुणाकडे ग पाहत होती ? कोण बरे त्या संध्येतून – हळुच पाहते डोकावून ? तो रविकर का गोजिरवाणा – आवडला अमुच्या राणींना ?” लाजलाजली या वचनांनी – साधी भोळी ती फुलराणी ! आन्दोली संध्येच्या बसुनी – झोके झोके घेते रजनी; त्या रजनीचे नेत्र विलोल – नभी चमकती ते ग्रहगोल ! जादूटोणा त्यांनी केला – चैन पडेना फुलराणीला; निजली शेते, निजले रान, – निजले प्राणी थोर लहान. अजून जागी फुलराणि ही – आज कशी ताळ्यावर नाही ? लागेना डोळ्याशी डोळा – काय जाहले फुलराणीला ? या कुंजातुन त्या कुंजातुन – इवल्याश्या या दिवट्या लावुन, मध्यरात्रिच्या निवान्त समयी – खेळ खेळते वनदेवी ही. त्या देवीला ओव्या सुंदर – निर्झर गातो; त्या तालावर - झुलुनि राहिले सगळे रान – स्वप्नसंगमी दंग होउन! प्रणयचिंतनी विलीनवृत्ति – कुमारिका ही डोलत होती; डुलता डुलता गुंग होउनी – स्वप्ने पाही मग फुलराणी - “कुणी कुणाला आकाशात – प्रणयगायने होते गात; हळुच मागुनी आले कोण – कुणी कुणा दे चुंबनदान !” प्रणयखेळ हे पाहुनि चित्ति – विरहार्ता फुलराणी होती; तो व्योमीच्या प्रेमदेवता – वाऱ्यावरती फिरता फिरता - हळूच आल्या उतरुन खाली – फुलराणीसह करण्या केली. परस्परांना खुणवुनि नयनी – त्या वदल्या ही अमुची राणी ! स्वर्गभूमीचा जुळ्वित हात – नाचनाचतो प्रभातवात; खेळुनि दमल्या त्या ग्रहमाला – हळुहळु लागति लपावयाला आकाशीची गंभीर शान्ती – मंदमंद ये अवनीवरती; विरू लागले संशयजाल, – संपत ये विरहाचा काल. शुभ्र धुक्याचे वस्त्र लेवुनि – हर्षनिर्भरा नटली अवनी; स्वप्नसंगमी रंगत होती – तरीहि अजुनी फुलराणी ती! तेजोमय नव मंडप केला, – लख्ख पांढरा दहा दिशाला, जिकडे तिकडे उधळित मोती – दिव्य वर्हाडी गगनी येती; लाल सुवर्णी झगे घालुनी – हासत हासत आले कोणी; कुणी बांधिला गुलाबि फेटा – झकमणारा सुंदर मोठा! आकाशी चंडोल चालला – हा वाङनिश्चय करावयाला; हे थाटाचे लग्न कुणाचे – साध्या भोळ्या फुलराणीचे ! गाउ लागले मंगलपाठ – सृष्टीचे गाणारे भाट, वाजवि सनई मारुतराणा – कोकिळ घे तानावर ताना! नाचु लागले भारद्वाज, – वाजविती निर्झर पखवाज, नवरदेव सोनेरी रविकर – नवरी ही फुलराणी सुंदर ! लग्न लागते! सावध सारे! सावध पक्षी ! सावध वारे ! दवमय हा अंतपट फिटला – भेटे रविकर फुलराणीला ! वधूवरांना दिव्य रवांनी, – कुणी गाइली मंगल गाणी; त्यात कुणीसे गुंफित होते – परस्परांचे प्रेम ! अहा ते ! आणिक तेथिल वनदेवीही – दिव्य आपुल्या उच्छवासाही लिहीत होत्या वातावरणी – फुलराणीची गोड कहाणी ! गुंतत गुंतत कवि त्या ठायी – स्फुर्तीसह विहराया जाई; त्याने तर अभिषेकच केला – नवगीतांनी फुलराणीला ! श्रावण मासि श्रावण मासि हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहिकडे, क्षंणात येते सर सर शिरवे क्षंणात फिरुनि ऊन पडे वरति बघता इंद्र धनुचा गोफ दुहेरी विणलासे मंगल तोरण काय बांधले नभोमंडपी कुणी भासे झालासा सुर्यास्त वाटतो,सांज अहाहा तो उघडे तरु शिखरावर उंच घरावर पिवळे पिवळे उन पडे उठती वरती जलदांवरती अनंत संध्याराग पहा सर्व नभावर होय रोखिले सुंदरतेचे रुप महा बलाकमाला उडता भासे कल्पसुमांची माळचि ते उतरुनि येती अवनीवरती ग्रहगोलचि की एकमते फडफड करुनि भिजले अपुले पंख पाखरे सावरती सुंदर हरिणी हिरव्या कुरणी निजबाळांसह बागडती खिल्लारे ही चरती रानी गोपही गाणी गात फिरे मंजूळ पावा गा‌ई तयांचा श्रावण महिमा एकसुरे सुवर्ण चंपक फुलला विपिनी रम्य केवडा दरवळला पारिजातही बघता भामा रोष मनीचा मावळला सुंदर परडी घे‌ऊनि हाती पुरोपकंठी शुध्दमती सुंदर बाला या फुलमाला रम्य फुले पत्री खुडती देवदर्शना निघती ललना हर्ष मावे ना हृदयात वदनी त्यांच्या वाचून घ्यावे श्रावण महिन्याचे गीत आनंदी आनंद गडे आनंदी आनंद गडे, इकडे तिकडे चोहिकडे वरती खाली मोद भरे, वायूसंगे मोद फिरे नभांत भरला, दिशांत फिरला, जगांत उरला मोद विहरतो चोहिकडे सूर्यकिरण सोनेरी हे, कौमुदि ही हसते आहे खुलली संध्या प्रेमाने, आनंदे गाते गाणे मेघ रंगले, चित्त दंगले, गान स्फुरले इकडे, तिकडे, चोहिकडे नीलनभी नक्षत्र कसे, डोकावुनि हे पाहतसे कुणास बघते ? मोदाला; मोद भेटला का त्याला ? तयामधे तो, सदैव वसतो, सुखे विहरतो इकडे, तिकडे, चोहिकडे वाहति निर्झर मंदगती, डोलति लतिका वृक्षतती पक्षी मनोहर कूजित रे, कोणाला गातात बरे ? कमल विकसले, भ्रमर गुंगले, डोलत वदले इकडे, तिकडे, चोहिकडे स्वार्थाच्या बाजारात, किती पामरे रडतात त्यांना मोद कसा मिळतो, सोडुनि स्वार्था तो जातो द्वेष संपला, मत्सर गेला, आता उरला इकडे, तिकडे, चोहिकडे

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

मी "श्रावणमासी"चीच वाट पाहात होते.
बलाकमाला उडता भासे कल्पसुमांची माळचि ते उतरुनि येती अवनीवरती ग्रहगोलचि की एकमते
अप्रतिम...

In reply to by मोदक

'ओळखलत का सर मला' पावसात आला कोणी कपडे होते कर्दमलेले केसावरती पाणी. क्षणभर बसला नंतर हसला बोलला वरती पाहून: 'गंगा माई पाहुणी आली, गेली घरट्यात राहून माहेरवाशीण पोरीसारखी चार भिंतीत नाचली मोकळ्या हाती जाईल कशी बायको मात्र वाचली भिंत खचली चुल विझली होते नव्हते नेले प्रसाद म्हणुन पापण्यांमधे पाणी थोडे ठेवले कारभारणीला घेवुन संगे सर, आता लढतो आहे पडकी भिंत बांधतो आहे. चिखल गाळ काढतो आहे' खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला पैसे नकोत सर, जरा एकटेपणा वाटला मोडून पडला संसार तरी मोडला नही कणा पाठीवर हात ठेउन नुसते लढ म्हणा.

In reply to by मोदक

बागेतुनी वा बाजारातुनी कुठून तरी त्याने गुलाबपुष्पे आणूनी द्यावीत तिजला नियमाने कशास सांगू प्रेम तयाचे तिजवरती होते? तुम्हीच उकला बिंग यातले काय असावे ते! गुलाब कसले प्रेमपत्रिका लाल गुलाबी त्या! लाल अक्षरे जणू लिहिलेल्या पाठपोट नुसत्या! प्रेमदेवता प्रसन्न हो या नैवेद्याने प्रेमाचे हे मार्ग गुलाबी जाणती नवतराणे! कधी न त्याचा ती अवमानी फुलता नजराणा परी न सोडीला तिने आपुला कधीही मुग्धपणा या मौनातच त्यास वाटले अर्थ असे खोल तोही कशाला प्रगट करी मग मनातले बोल! अशा तर्‍हेने मास लोटले पुरेपूर सात खंडन पडला कधी तयाच्या नाजुक रतिबात! अखेर थकला ढळली त्याची प्रेमतपश्र्चर्या रंग दिसे ना खुलावयाचा तिची शांत चर्या धडा मनाचा करुन शेवटी म्हणे तिला देवी दुजी आणखी विशेषणे तो गोंडस तिज लावी बांधीत आलो पुजा तुज मी आजवरी रोज! तरी न उमगशी अजून कसे तू भक्ताचे काज? गेंद गुलाबी मुसमुसणारे तुला अर्पिलेले सांग सुंदरी फुकट का ते सगळे गेले? तोच ओरडुनि त्यास म्हणे ती, 'आळ वॄथा हा की! एकही न पाकळी दवडली तुम्ही दिल्या पैकी' असे बोलूनी त्याच पावली आत जाय रमणी क्षणात घेउनी ये बाहेर कसलीशी बरणी! म्हणे, 'पहा मी यात टाकले ते तुमचे गेंद, आणि बनविला तुमच्यासाठी इतुका गुलकंद! का डोळे असे फिरवता का आली भोंड बोट यातले जरा चाखुनी गोड करा तोंड क्षणीक दिसले तारांगण त्या, परी शांत झाला तसाच बरणी आणि घेउन खांद्यावरी आला! प्रेमापायी भरला बोले भुर्दंड न थोडा! प्रेमलाभ नच,गुलकंद तरी कशास हा दवडा? याच औषधावरी पुढे तो कसा तरी जगला, ह्रदय थांबूनी कधीच ना तरी असता तो खपला! तोंड आंबले असेल ज्यांचे प्रेम निराशेने प्रेमाचा गुलकंद तयानी चाखूनी हा बघणे!

माणसाला माणूस दिसत नाही अशी गडद संध्याकाळ जवळपास रात्रच पण बोळांतून गल्ल्यांतून घराकडे वळत गेलेली पायाखालची वाट दिसत जाते रस्त्यावर दिवे नसतानाही पायांना सापडत जाते जुन्या घराचे सारवलेले अंगण वर्षानुवर्षे तेल पिऊन गुळगुळीत झालेल्या दरवाजाचा काळा मखमली स्पर्श वेचीत माझे हात दार ढकलतात साखळी वाजते आतून हळू आवाज येतो आलीस बाई, ये! - प्रभा गणोरकर

शेवटच्या आजारात चिं. त्र्य. खानोलकर के. ई. एम. रुग्णालयात भरती झाले होते. भेटायला जयंत धर्माधिकारी नियमित येत. नवीन कवितेबद्दल त्यांनी खानोलकरांना पृच्छा केली तेव्हा त्यांनी खालील काव्य म्हटले, शेवटच्या वळणावर यावा मंद सुगंधी असा फुलोरा थकले पाऊल सहज उठावे आणि सरावा प्रवास सारा एवढे म्हटल्यावर त्यांना धाप लागली. त्यांचे डॉ. देवल यांनी त्यांना विश्रांती घ्यायला सांगून उरलेली उद्या म्हणायला सांगितली. परंतु उद्या काही उजाडलाच नाही. तत्पूर्वी त्यांची प्राणज्योत मालवली.

धाग्याचा उद्देश पाहून 'आयुष्य समृद्ध करणार्‍या ओळी उधृत करणं' हा निकष पूर्ण करणार्‍या गुलजार यांच्या काही काव्यपंक्ति देतो आहे: किताबे झांकती है बंद अलमारी के शीशों से बड़ी हसरत से तकती है महीनों अब मुलाकाते नही होती जो शामें इनकी सोहबत में कटा करती थी अब अक्सर गुजर जाती है कंप्युटर के परदों पर बड़ी बेचैन रहती है किताबे .... इन्हे अब नींद में चलने की आदत हो गई है बड़ी हसरत से तकती है .. जो कदरें वो सुनाती थी की जिन के सैल कभी मरते थे वो कदरें अब नज़र आती नही घर में जो रिश्ते वो सुनाती थी वह सारे उधडे उधडे हैं कोई सफहा पलटता हूँ तो एक सिसकी निकलती है कई लफ्जों के माने गिर पड़े हैं बिना पत्तों के सूखे टुंडे लगते हैं वो सब अल्फाज़ जिन पर अब कोई माने नही उगते बहुत सी इसतलाहें हैं जो मिटटी के सिकूरों की तरह बिखरी पड़ी है गिलासों ने उन्हें मतरुक कर डाला जुबान पर जायका आता था जो सफहे पलटने का अब उंगली क्लिक करने से बस इक झपकी गुजरती है बहुत कुछ तह बा तह खुलता चला जाता है परदे पर किताबों से जो जाती राब्ता था ,कट गया है कभी सीने पर रख कर लेट जाते थे कभी गोदी में लेते थे कभी घुटनों को अपने रिहल की सूरत बना कर नीम सजदे में पढ़ा करते थे ,छुते थे जबीं से वो सारा इल्म तो मिलता रहेगा बाद में भी मगर वो जो किताबों में मिला करते थे सूखे फूल और महके हुए रुक्के किताबें मँगाने, गिरने उठाने के बहाने रिश्ते बनते थे उनका क्या होगा वो शायद अब नही होंगे !! ******************** आणि या अटलजी वाजपेयींच्या ओळी: अटलजींची 'उंचाई ही कविता: ऊँचे पहाड़ पर, पेड़ नहीं लगते, पौधे नहीं उगते, न घास ही जमती है। जमती है सिर्फ बर्फ, जो, कफ़न की तरह सफ़ेद और, मौत की तरह ठंडी होती है। खेलती, खिलखिलाती नदी, जिसका रूप धारण कर, अपने भाग्य पर बूंद-बूंद रोती है। ऐसी ऊँचाई, जिसका परस पानी को पत्थर कर दे, ऐसी ऊँचाई जिसका दरस हीन भाव भर दे, अभिनंदन की अधिकारी है, आरोहियों के लिये आमंत्रण है, उस पर झंडे गाड़े जा सकते हैं, किन्तु कोई गौरैया, वहाँ नीड़ नहीं बना सकती, ना कोई थका-मांदा बटोही, उसकी छाँव में पलभर पलक ही झपका सकता है। सच्चाई यह है कि केवल ऊँचाई ही काफ़ी नहीं होती, सबसे अलग-थलग, परिवेश से पृथक, अपनों से कटा-बँटा, शून्य में अकेला खड़ा होना, पहाड़ की महानता नहीं, मजबूरी है। ऊँचाई और गहराई में आकाश-पाताल की दूरी है। जो जितना ऊँचा, उतना एकाकी होता है, हर भार को स्वयं ढोता है, चेहरे पर मुस्कानें चिपका, मन ही मन रोता है। ज़रूरी यह है कि ऊँचाई के साथ विस्तार भी हो, जिससे मनुष्य, ठूँठ सा खड़ा न रहे, औरों से घुले-मिले, किसी को साथ ले, किसी के संग चले। भीड़ में खो जाना, यादों में डूब जाना, स्वयं को भूल जाना, अस्तित्व को अर्थ, जीवन को सुगंध देता है। धरती को बौनों की नहीं, ऊँचे कद के इंसानों की जरूरत है। इतने ऊँचे कि आसमान छू लें, नये नक्षत्रों में प्रतिभा की बीज बो लें, किन्तु इतने ऊँचे भी नहीं, कि पाँव तले दूब ही न जमे, कोई काँटा न चुभे, कोई कली न खिले। न वसंत हो, न पतझड़, हो सिर्फ ऊँचाई का अंधड़, मात्र अकेलेपन का सन्नाटा। मेरे प्रभु! मुझे इतनी ऊँचाई कभी मत देना, ग़ैरों को गले न लगा सकूँ, इतनी रुखाई कभी मत देना।

विश्रब्ध मनाच्या कातरवेळी, एखाद्या प्राणाची दिवेलागण सरल्या नभाची सूर्यास्तछाया, एखाद्या प्राणांत बुडून पूर्ण एखाद्या प्राणाच्या दर्पणी खोल, विलग पंखांचे मिटते मन एखाद्या प्राणाचे विजनपण, एखाद्या फुलाचे फेडीत ऋण गीतांत न्हालेल्या निर्मळ ओठां, प्राजक्तचुंबन एखादा प्राण तुडुंब जन्मांचे सावळेपण, एखाद्या प्राणाची मल्हार धून एखाद्या प्राणाचे सनईसूर, एखाद्या मनाचे कोवळे ऊन निर्जन प्राणाचा व्रतस्थ दिवा एखाद्या सरणा अहेवपण. -आरती प्रभू

अन्योक्ती - कृष्णशास्त्री चिपळूणकर सूर्यान्योक्ति (शार्दूलविक्रीडित) देखूनी उदया तुझ्या द्विजकुळे गाती अती हर्षुनी, शार्दूलादिक सर्व दुष्ट दडती गिर्यंतरीं जाउनी, देशी ताप परी जसा वरिवरी येशी नभीं, भास्करा, अत्त्युच्चीं पदिं थोरही बिधडतो हा बोल आहे खरा. ----------------------------------------------------------------- गजान्योक्ति (स्त्रग्धरा) ज्याची स्पर्धा कराया इतर गज कधीं शक्त नाहीच झाले सांगावे काय? ज्याच्या मृगपतिहि भयें रान सोडून गेले, तो पंकामाजिं आजी गजवर फसला, युक्ति नाहीं निघाया. अव्हेरिती, पहा, हे कलकल करुनी क्षुद्र कोल्हे तयाला. ----------------------------------------------------------------- हरिणान्योक्ति (शार्दूलविक्रीडित) जाळे तोडुनियां बळें हरिण तो टाळोनि दावाग्निला, व्याधाचे चुकवूनि बाणहि महावेगें पुढें चालिला, तों घाईंत उडी फसूनि पडला आडामधें बापडा; होती सर्वहि यत्न निष्फळ, जरी होई विधी वांकडा. ----------------------------------------------------------------- आंब्याविषयी (शार्दूलविक्रीडित) ज्याचे पल्लव मंगलप्रद, शिणा छाया जयाची हरी गंधें युक्ते फुलें, फळेंही असती ज्याचीं सुधेच्या परी, वाटे जो रमणीय भूषण वनश्रीचे मुखींचें, भला आम्रा त्या पिक सेवितां समसमां संयोग कीं जाहला! ----------------------------------------------------------------- बगळ्याविषयी (शिखरिणी) उभा राहे एके चरणिं धरणीतें धरुनियां तपश्चर्या वाटे करित जणुं डोळे मिटुनियां, बका ऐशा ढोंगे तव अमति मासेच ठकती, परि ज्ञाते तूझें कपट लवलाहीं उमजती. ----------------------------------------------------------------- चंदनाविषयी (पृथ्वी) वनीं विलसती बहू विविध वृक्ष चोंहींकडे, तयांत मज चंदनासम न एकही सांपडे, जयास न दिली फळें न कुसुमेंहि दैवें जरी, शरीर झिजवूनि जो तरि परोपकारा करी. ----------------------------------------------------------------- कोकिलान्योक्ती येथे समस्त बहिरे बसतात लोक का मधुर भाषणे तू करिशी अनेक हे मूर्ख, यांस नसे किमपी विवेक रंगावरुन तुजला गमतील काक

मोदकराव धाग्याची संकल्पना मस्तच! आवडणार्‍या कविता/ललित लेख तस बरच आहे, जस आठवेल तसे इथे देतो!
"...एक म्हातारी आणि तिची छोटी नात - लच्छी - गांवाबाहेर दूर रानापाशीं राहत होतीं. एकदां म्हातारीच्या झोपडीपाशीं एक मोर आला. मोराला पाहून लच्छी नाचूं लागली. मोरही नाचूं लागला. लच्छीने हट्ट घेतला कीं मोराला अंगणांतच बांधून ठेवावं. म्हातारी म्हणाली, तें कसं होणार? आपल्यापाशीं त्याला खायला द्यायला दाणागोटा कुठं आहे? दोघींचा निर्णय होईना. तेव्हां मोरच म्हणाला, मी इथंच जवळपास राहीन. मला दाणागोटा कांही नको. रान तर सारं भोवतालींच आहे. मात्र एका अटीवर. मी येईन तेव्हां लच्छीनं आधी नाचलं पाहीजे. ती जेव्हां नाचायची थांबेल तेव्हांपासून मीही येणार नाहीं. अट साधी होती. लच्छी कबूल झाली. म्हातारीचं काम झालं. पण नाचायचं म्हणजे काही साधी गोष्ट नव्हती. हुकमी नाचायचं, तर मनही तसंच हवं. लच्छी तेव्हांपासून आनंदीच राहूं लागली. मोर कधीं, केव्हां येईल याचा नेम नसे. पुढं पुढं मोर येऊन गेला कीं काय याचही तिला भान राहत नसे..." "सावित्री" - पु.शि. रेगे

दुर्गा भागवत ह्यांनी त्यांच्या 'पैस' ह्या पुस्तकामधे दुःखावर खालील विचार व्यक्त केले आहेत. वाचुन धन्य झालो. दुःखाकडे बघायचा काय पर्स्पेक्टीव्ह आहे. कितीही वेळा वाचले तरी मन भरत नाही. 'पैस' हे फार थोर पुस्तक आहे. जरूर वाचा.
"...आलेल्या सुखाकडे, प्रेमाच्या पूर्तीकडे, जन्मोजन्मीच्या मोहाकडे विठोबा पाठ फिरवतो तो देवमाणुस म्हणून. देवमाणूस म्हणूनच तो चिरंतन दुःखाचे आवाहन करतो. ते आटू देत नाही. सुखाच्या वरदानाहून, कर्तव्याचा व सत्याच रंग असलेले दुःख अधिक सुफळ असते..." -- पंढरीचा विठोबा : पैस : दुर्गा भागवत
"...मी माझ्या भक्तांना सुख देत नाही. दुःख देतो. दारिद्र्य देतो. मुद्दामच करतो मी ते. पराभक्तीचे सुख मानवमात्राला मिळावे, मला भक्ताशी एकरूप होण्याचे भाग्य मिळावे, म्हणून मी तसे करतो. तिळभर आशा जरी माझ्या भक्ताला राहिली तरी मी ती मोडतो. त्याला निराश करणे मला आवडते. कारण, निराशेची शीग गाठल्याशिवाय, ऐहिक वासना मेल्याशिवाय परमसुखाचा कोंबही कुठे रुजत नाही. ऐहिक सुख हा मी आणि माझे भक्त यांच्यामधला अंतराय आहे; तो मी दूर करतो. माझ्या भक्तांना निर्वाणीच्या घडीला, आर्त झाल्यावर, माझ्याशिवाय अन्य सहारा राहू नये म्हणून मी फार जागरूक असतो. म्हणूनच दुःखांची पेरणी करून मी त्याला दुखवतो नि टोचून, तापवून माझ्याकडे वळवतो. एकदा माझ्याकडे आल्यावर नि माझ्याशी तद्रूप झाल्यावर ही दुःखे, ही दैन्ये, हे क्लेश मिटतात. कायमचे मिटतात. तिथून सुख फुटते..." -- व्दारकेचा राणा : पैस : दुर्गा भागवत
ता.क.: हे लेखन माझ्या ब्लॉग वर पुर्वप्रकाशीत आहे.

खामोशी की एक नदी बहती थी... उंचे पर्वतोंके साये उस नदी में खेलते और पेडोंकी छाती से जब फूल खिलते तो सारी सुगंधी वो हवाऑ को अरप देतें.. जब हवाएं नदी मे नहाने के लिए आती सूरज को अर्घ्य देतीं तो एक घडी नदी के किनारें वो पत्थरोंपर बैठ जातीं.. उस समय नदी की छाती से सूरज की रौशनी कुछ कहती थीं खामोशी की एक नदी बहती थीं... धरती आसमान की लीला उस नदी में खेलती बादल भी नदींमें तैरते सितारें भी नदीमें उतरते पंछी भी पानी परसने आतें और चांद का योगी .. कमंडल भरने के लिये आता था दो घूंट पानी लेकर वो अपनी चिलम धोता था और फिर एक घूंट पानी मुझपर छिडक देता था.. और मुझे लगता .. वो मेरी आग को भी चिलम की तरह पीता था.. वो मेरी एक कोयला आग थी मेरे माथेंमें रहती थीं और आँखोके सामने खामोशी की नदी बहती थीं... साईं! वो कौनसे पर्वत की घाटी और कौनसे काल की गाथा मैं नहीं जानती पर इतना जानती.. की इस किनारे की छातीमें उस दुसरे किनारे का इश्क धडकता तो हिज्र की गाथा मेरे होठोंपर सिसकतीं उस नदी की तरह लगती थी और मैं - कुछ उसी तरह सुनती और कहतीं थीं जिस तरह खामोशी की नदी बहती थीं... ओ मेरे शाह मुराद सांई! वो कौनसा काल था और कौनसी तिथी तू स्वयं नदीपर आया था और तूने हंसकर नदीपर अक्षरोंका सेतू बनाया था और मुझे सेतूपर ले जाकर दुसरा किनारा दिखाया था.. उस दिन नदी गुनगुनाईं थीं.. और मेरे कानोंमें उसने राज़की एक बात कहीं थीं... और सांई! यह हिज्र और वस्ल की गाथा तभी से चली आती हैं ना खुलकर होंठोंसे निकलती ना रगोंमें खामोश होती हैं... वो खामोशी की नदी मेरी यादमें बहती हैं और इस किनारे की छातींमें जब दुसरे किनारे का इश्क धडकता और बिरहा रगोंमें चलता मैं उठकर नदीपर जाती हूं अक्षरोंका सेतू बनाती हूं पर सेतूपर खडी होती हूं तो न कोई आर दिखता है न कोई पार दिखता हैं सिर्फ एक चिंगारी हैं जो एक लीला खेलती और अंधेरेकी छातीमें वो कभी बुझती, कभी जलती .. जाने खुदा वो क्या कहतीं हैं और खामोशी की वो नदी मेरी याद में बहती हैं...

धागा प्रचंड श्रीमंत होत चाललाय आता माझेपण थोडसे, मी जुन्या स्मृती चाळवू लागलो. त्या जुन्या आठवणींच्या विश्वात मी आश्रय घेतला. माझ्या मनाला त्या मध्ये स्वैर सोडून दिले. परंतु मला ज्या स्मृतींचा दर्शन होत होते, ती एक भूत काळाची तात्पुरती आणि वरवरची झलक होती काय ? भूतकाळात आकाशात विहार करताना कुठूनही कसेही स्मृतींचे अखंड तुकडे पुन्हा पुन्हा उगवत होते आणि मावळत होते. त्या अथांग अवकाशाच्या विस्ताराची कल्पना करता येत नव्हती तिथे जीवनाच्या प्रवाहाची सतत भर पडत होती. पण शेवटी तो जीवन प्रवाह आतून शुष्क बनून जातो म्हणजेच माणसाचा मृत्यू होतो. मृत्यू हे एक अंतिम सत्य आहे. भूतकाळाच्या अवकाशातील एक कृष्णविवर आहे. एक शून्य आहे. मर्यादेची कसलीही सीमारेषा नसलेल्या त्या पोकळीमध्ये जिवंत अस्तित्वाचा पूर्ण आभाव असतो. त्यातल्या कृष्ण विवरात आपण एकदा शिरलो, कि तिथून परतीचे मार्ग कायमचे बंद होतात का ? जर आपण स्मृतींच्या अवकाशात भूतकाळात मनाने जाऊन प्रवास करतो तसा वर्तमान काळात पुढे जाऊन नाही का करता येणार ? लहान पाणी मी आईशेजार उघड्यावर झोपायचो. अवकाशात पसरलेले तारे तारकाविश्व पाहायचो. त्यावेळी माझ्या मनात माणसाचा जन्म, मृत्यू आणि हे अथांग अंतराळातले विश्व याबद्दल विचार उमटायचे. हे विचार मी नेमक्या कोणत्या शब्दात करायचो हे आता आठवत नाही. पण माझ्या सारखी लहान बालके हे विचार करतात हे नक्की. भाषेच्या आधी विचार निर्माण झालेले असतात. विचार हा भाषेला शब्दांचे रूप देतो. भाषा हि नेहमी विचारांची गुलाम असते. स्वच्छ चांदण्यारात्री वर पाहत पहुडलो असताना हळूहळू वरचे ते तारकाविश्व खाली येई. शेवटी ते इतके खाली येई, की हात लांब केला तर त्या चांदण्याला सहज स्पर्श करता यावा. त्यावेळी मला आढळे, की या कोट्यावधी चांदण्या, तारे किती जवळ जवळ ठासून भरलेले आहेत. असे यापूर्वी आपल्याला कधी दिसले नव्हते कि जाणवले नव्हते. त्यावेळी माझ्या मनात येई, ‘या आकाशाच्या घुमटामध्ये मी म्हणजे केवळ एक ठिपका तर नाही ना ?’ डोळे उघडे ठेवून आकाशाकडे पाहताना मी आश्चर्याने भारावून जायचो. शेजारी माझी आई झोपलेली असायची तिचा मंद श्वास मला ऐकू यायचा. वरचे आकाश अत्यंत सावकाश फिरत राहायचे. क्षितिजावर नवीन तारे उदयास येत. पण सप्तर्षी मात्रे नेहमी दिसत राहत. ते कधी अदृश्य व्हायचे नाहीत. त्यांचा आकार मला लांब दांड्याच्या फावड्यासारखा वाटायचा. हे फावडे रात्रभर आकाश नांगरत असे. कशासाठी ? पेरणी करण्यासाठी ? पण तो ध्रुव तारा मात्र अविचल असे. आपली जागा सोडायचा नाही असे का ? बाकीच्या चांदण्याप्रमाणे तो का हलत नाही ? असे त्यावेल माझ्या मनात असे प्रश्न निर्माण होत असत. हे प्रश्न कालच्या स्मृतीमध्ये राहिले आहेत, का माझ्या आजच्या विचारणा त्यावेळच्या प्रश्नांची एक नक्षीदार झालर लाभलेली आहे ? कदाचित दोन्हीही असेल. आजची भाषा हि नक्कीच कालची स्मृती असते. अन या कवितेबद्दल मी काय लिहिणार त्या कोवळ्या फुलांचा बाजार पाहिला मी पैशात भावनेचा व्यापार पाहिला मी अंधार वेदनांनी आक्रंदतो तरीही नजरेत वासनेचा श्रृंगार पाहिला मी रस्ते उन्हात न्हाले, सगळीकडे परंतु वस्तीतुनी दिव्यांच्या अंधार पाहिला मी थोडा उजेड ज्याला मागावयास गेलो तो सूर्य ही जरासा लाचार पाहिला मी -अनिल कांबळे

लेखक आणि पुस्तकाचे नाव द्याच परंतु आवडलेला मजकूर 'का आवडला?' हे ही शक्य असेल तर द्या. >>> अर्थातच ...काही मिपावरच्या लेखकांचे आवडलेले ऊतारे आणि ओळी चालतील का ? ..तुर्तास मला आवडलेले हे तीन मिपाकरांचे ... १) नान्या ने केलेले निरूपण... संत जनाबाई. महाराष्ट्राच्या भूमीत समाजसुधारणा, भक्तीमार्गदर्शन या हेतुन प्रेरीत होऊन जे अनेक संत होऊन गेले त्यातले एक अग्रणी नाव. नामयाची दासी, दासी जनी, जनी नामयाची यासारख्या अनेक नावांनी स्वतःला संबोधुन विठ्ठल भक्तीत अखंड रममाण झालेली एक स्त्री संत. कधी आवडीने विठ्ठलाचे नाम घेत तल्लीन होऊन भजणारी तर कधी त्याच्यावर संतापणारी जनी. एक ना अनेक अशी तिची रुपे आपल्याला तिच्या अभंगातुन पहायला मिळतात. कधी विठ्ठलाचे गुणगान करतांना जनी त्याला लेकुरवाळा म्हणते आणि सारे तिचे सखे सोबती हे जणू काही विठ्ठलाची लेकरे आहेत असे समजुन तल्लीनतेने म्हणते - विठु माझा लेकुरवाळा । संगे लेकुरांचा मेळा निवृत्ती हा खांद्यावरी । सोपानाचा हात धरी पुढे चाले ज्ञानेश्वर । मागे मुक्ताई सुंदर गोरा कुंभार मांडिवरी । चोखा जीवा बरोबरी बंका कडियेवरी । नामा करांगुळी धरी जनी म्हणे गोपाळा । करी भक्तांचा सोहळा अहाहा ! काय ही एकेक लेकरे ! प्रत्यक्ष परमेश्वर सुद्धा कौतुकाने यांना खेळवत असेल हे नि:संशयच. ती वयाने लहान असली तरी समज आणि जाणिवेने महान अशी चौघे दैवी लेकरे आणि त्यांचे सोबती विठ्ठलाच्या अंगाखांद्यावर एखाद्या अल्लड नातवाने आपल्या आजोबाच्या अंगावर बागडावे अशाच प्रेमाने आणि आपुलकीने बागडत आहेत आणि जगाच्या दृष्टीने तो सर्वेसर्वा, परमेश्वर असला तरी या नातवांसाठी तो पोराहुन पोर झाला आहे. नातवांना खेळवणे हा खरोखर आजोबांच्या आयुष्यातील आनंदाचाच क्षण असतो. पण ही मंडळी जरी विठ्ठलाच्या अंगाखांद्यावर खेळत असली तरी जनी त्यांना विठ्ठलापासुन वेगळे समजत नाही. जनीच्या दृष्टीने विठ्ठलच विविध मानवी रुपांमधे आला असुन त्याची लीला दाखवत आहे. जनीला हे उमगले आहे की संत हेच देव आणि दगडाचा देव हा केवळ प्रतिकात्मक आहे. पण हे सांगतांना जनी एकापेक्षा एक सुंदर दाखले देते. पाणी, ढग समान आहेत, माती धुळ समान आहेत इत्यादी दा़खले देत जनी म्हणते असेच संत आणि देव समान आहेत. इतक्या सरळसोपेपणाने जनीने सांगितले आहे की अडाण्याहुन अडाण्याला सुद्धा ते चटकन कळावे. पाणी तेंचि मेघ मेघ तेंचि पाणी । काय या दोन्हीपणीं वेगळीक माती तेचि धूळ धूळ तेचि माती । भेंडा आणि भिंती काय दोन साखरीं गोडी गोडी साखरेसी । थिजलें तुपासी काय दोन्ही डोळा तें बुबुळ बुबुळ तो डोळा । शांति ज्ञानकळा काय भिन्न वदन ते ओंठ ओंठ तें वदन । क्षेमआलिंगन काय दोन जीभ ते पडजीभ पडजीभ ते जीभ । आशा आणि लोभ काय दोन संत तेचि देव देव तेचि संत । म्हणे जनी मात गोष्‍टी भिन्न असे साक्षात देवस्वरुप असलेले संत जेव्हा एकत्र येतात तेव्हा विठ्ठल सुद्धा सर्व काम सोडुन त्यांच्यात येउन रहातो. नाम संकिर्तन चालले असतांना विठ्ठल स्वतः त्यात रंगुन जातो तर मानवाची काय कथा ! आणी मग जनी सांगते अशा विठ्ठलाला सुद्धा रंगात रंगवुन टाकणार्‍या संतानाच शरण जावे. अर्था ज्या संताला शरण जायचे त्याची परिक्षा करुनच मग शरण जावे केवळ भगवी वस्त्रे ल्यायलेल्या मनुष्याला नव्हे. २ ) चिगो ऊर्फ आमचे मित्रवर्य सुशीभक्तींत रमले होते तेव्हा .... स्साल्याने शेवटच्या वाक्याला फुल्ल सेन्टी केले होते. स्साला एवढी वर्सॅटॅलिटी जर कुण्या विंग्रजी लिवणार्‍याकडे असती ना तर लोकं डोक्यावर घेऊन नागडी नाचली अस्ती त्याला.. पण आम्ही साले कर्मदरीद्री.. अरे, नुस्त्या खटल्यांच्या भरवशावर पानं खरडणारे तुम्हाला संमेलनाध्यक्ष म्हणुन चालतात आनी आमच्या सुशिंना "नुस्ते लोकप्रिय" म्हणून अनुल्लेखानी मारणार तुम्ही, भडव्यो !? सुशिंना मी बर्‍याच आधी वाचलं. कॉलेजमध्ये असतांना पारयणं केली. नंतरच्या धबगड्यात हे वेड जरा मागे पडलं, पण कॉलेजात असतांना मी एका वहीत एकीकडे सुशिंची पुस्तकं (इश्यु केलेली) लिहित असे आणि बाकी सगळ्यांची दुसरीकडे, पण सुशिंचं परड्म नेहमीच जड होतं. एकदा मी लायब्ररीतून सुशिंच्या तीन कादंबर्‍या संध्याकाळी इश्यु करून नेल्या आणि रात्रभरात वाचून पुन्हा आणखी घ्यायला सक्काळी लायब्ररीत गेलो. तिथली बाई बोलली, "तू ह्या सगळ्या पुर्ण वाचल्या !?" मी बोललो," हो, पुर्ण वाचल्या." ती बोलली ,"झोपला नाहीस का?" मी बोललो ," झोपलो की थोडा." तिला विश्वासच बसेना. म्हणे "नक्की"?? मी पुन्हा हो म्हणालो.. शेवटी ती बोलली, "कमाल आहे !!" ........... त्या वेडीला काय ठाऊक, कुणाची आणि किती कमाल आहे ते?.. जाने दो, दिवाना ही जाने दिवाने की हालत....! ३ ) अरूंधती ताई दंगली चा अनुभव कथन करतात तेव्हा .... पुढचा अर्धा तास आम्ही कोणीही एकमेकांशी बोललो नाही. कधी नव्हे ते इतके जीव खाऊन पळाल्यामुळे पोटात प्रचंड दुखत होते..... छातीची धडधड अजून थांबली नव्हती.... पळताना उशीर झाला असता तर त्या संतप्त जमावाच्या हाती आपले काय झाले असते ही कल्पनाच करवत नव्हती..... त्या संकटाच्या तुलनेत त्यानंतर उभ्याने करायला लागलेला बसचा प्रवास कस्पटासमान होता. बसच्या खिडकीतून आत येणारी अस्पष्ट वाऱ्याची झुळूक घामट हवेतही शरीराला आणि मनाला आल्हाद देत होती. आपण सुरक्षित आहोत, हातीपायी धड आहोत आणि एका जीवघेण्या परिस्थितीतून सुटून आपल्या घरी परत चाललो आहोत ह्याचेच मनाला हायसे वाटत होते! दंगल, दंगल म्हणजे काय असते ह्याचा माझ्या आयुष्यातील तो एक अविस्मरणीय अनुभव होता! संतप्त, चिडलेला, आक्रमक जमाव इतक्या जवळून बघायला मिळेल, दगडफेकीचा -लाठीमारीचा असा अनुभव मिळेल असे आयुष्यात वाटले नव्हते! आणि हे सगळे अनुभवूनही आम्ही सर्वजण हातीपायी धड, सुरक्षित होतो हेच एक नवल होते! त्या विस्मयाला उराशी बाळगत आणि दंगलीच्या त्या जीवघेण्या आठवणीला मनातून दूर झटकतच आम्ही पुण्याला घरी परतलो गैर लागु असल्यास माफी, पण काही मिपाकर्स खरचं टची लिहुन जातात ...वेळ आणि परवानगी असल्यास अजुन टाकतो ..

In reply to by सुहास..

मिपाकर चित्रा मॅडमनी एके ठिकाणी लिहून ठेवले होते.. अनेकदा आपल्या प्रिय व्यक्तीवर लोकांनी चुकीने, न समजता आरोप केलेले असतात असे आपल्याला वाटत असते. असे आरोप कधी खरे असतात, तर कधी नसतात, तर कधी गैरसमज असतात. कधी अशा व्यक्तींना शूर, किंवा उत्तम किंवा खुजे किंवा दुष्ट किंवा लबाड म्हणून सिद्ध करण्यासाठी म्हणून काहींनी त्यांच्याविषयी लंब्याचौड्या बाता मारलेल्या असतात. अशा आपल्याशी जोडलेल्या लोकांवरचे आरोप दूर करण्याची कधीकधी इच्छा होऊ शकते. जेव्हा ही व्यक्ती या काळात, जितीजागती, रक्ताच्या नात्याने जोडलेली अशी आपल्यासमोर असते किंवा आरोप दूर होण्याशी काहीतरी स्वार्थ जोडलेला असतो, तेव्हा असे आरोप दूर करणे एखाद्याच्या दृष्टीने निकडीचे असू शकते. मात्र जेव्हा अशी व्यक्ती ही अनेक पिढ्यांमागची, लांबची नातेवाईक असण्याची शक्यता असते, तेव्हा अशा काळाने, आहाराविचाराने दूरस्थ अशा व्यक्तीवरचे असे आरोप दूर झाले काय किंवा नाही झाले काय, आपल्या "खुद्द" स्वत:च्या सध्याच्या स्थितीत काहीही ढिम्म फरक पडणार नाही असे बहुदा दिसून येते. उगाच वेळ वाया का घालवा? भारतातल्या ऐतिहासिक गोष्टींत इतकी भेसळ झाली आहे की कशाचा कशाला पत्ता लागत नाही. या अशा कथांमधील भेसळीला दूर करून अशा कथेतील ऐतिहासिक सत्य काय असू शकते याचे थोडेफार अंदाज लावण्याचा प्रयत्न करता येऊ शकतो, पण तसा करण्याची गरज आहे का असा प्रश्न स्वतःलाच विचारावा. अमोल (जातीवंत भटका) चे एके काळचे गूगल स्टेटस. गड कसा पाहावा याचं एक तंत्र आहे. तो धावता पळता पहाता उपयोगाचा नाही. त्याची भौगोलीक पार्श्वभूमी, त्याचं नकाशातील स्थान, संरक्षणदृष्ट्या त्याचं महत्वं, त्याच्या जवळ असलेले घाट, मैदान, खिंडी, पठार, नद्या, ओढे, रणक्षेत्र, त्यावर चढायचे मार्ग, त्यावरून दिसणारा प्रदेश, त्या प्रदेशातील किल्ले, शिखरं, त्यांची मजबूती, त्यावरील पाण्याची ठिकाणं-हौद, तलाव, त्याचे तट, त्याचे बुरूज, त्याची प्रवेशद्वारं.... हे सगळं कसं नीट तपासलं पाहिजे, तरचं त्याचं महत्व ध्यानी येतं. धावता पळता किल्ला बघायला तो काही भोज्जा नव्हे ! आजच व्यनीमधून मिळालेले डोस.. ;-) Effort is very important. But, knowing 'when', 'where', and 'how' to apply it, gets the results 'you want' आणखी पेस्टवतो आहे..

In reply to by मोदक

रामदास काकांचा एक अशक्य प्रतिसाद :-)) सीटला, टाकीला ओरखडे पडले /पडतात. याचा अर्थ बोका एकटा झोपत नाही.टाकीवर पुरेशी पकड (ग्रीप)न मिळाल्याने ओरखळे उठतात. काही दिवसानी ओरखळ्यांची नवलाई संपली की तो गपगुमान झोपून राहील. या बाबतीत दुय्यम स्वरुपाचे असे काही प्रश्न मनात येतात. तो झोपण्यापूर्वी वेगवेगळे आवाज काढतो का ? तसे असेल तर प्रकरण नविन आहे. आवाज नसेल तर भाटी जुनीच आहे असे समजा. सिटवर सकाळी केस मिळतात का ते बघा. कदाचीत भाटी येत नसेल पण बोका दाढी करत असेल .केस आढळले नाहीत तर तो बोका नसून भाटी आहे असे समजा .भाटी बोक्यापेक्षा वस्ताद असते आणि तिची नखे तिक्ष्ण असतात. नखांवरून भाटी आहे की बोका ते समजते. अंगपरीक्षा करावयाचा प्रयत्न करू नये.काहीवेळा गळ्यापर्यंत उडी मारून जुगुलर का काहीशा नावाची नस पकडते.जुगुलरचा आणि जुगण्याचा काही संबंध नाही.त्या नसा वेगळ्या . त्यांची नावे एखाद्या हुशार विद्यार्थ्याला विचारावी. पराचा अभ्यास बरा आहे असे म्हणतात बॉ. पूर्वी धम्याला पण मांजरी पाळण्याचा षौक होता म्हणे. पण त्याला नोकरी लागली .त्याखेरीज मिपावर एक कृष्णमार्जार प्रेमी नावाचा मुलग्या आहे. त्याला विचारा. तूर्तास त्या मार्जारावर लक्ष ठेवा . ते आत झोपले की वरून मच्छरदाणी घाला. नंतर सिटवर (गाडीच्या ) पाणी ओता. हे पाणी ओतण्यापूर्वी कोसला नावाची एक कादंबरी वाचा. त्यात मांजर हाकलण्या/पकडण्यासाठी एक आख्खा धडा आहे. ह्या धड्यामुळे ते लेखक अजूनही बोक्यासारखी मिशी ठेवतात. हां तर मी सांगत होतो ते पाणी ओतण्यासाठी .पाणी ओतले की कुत्र्याचा पण मूड जातो.पूर्वी असं काही आमच्या घराच्या समोर असं काही आलं की आमचा गडी पाणी ओतायचा ते आठवलं. हां तर मच्छरदाणी. काळ्या रंगाची नको. फार पूर्वी गिरणगावात एकाच रुम मध्ये दोन कुटुंब राहयची तेव्हा काळ्या मच्छरदाणीचा वापर केला जायचा. मांजराला संकोच नसतो. त्यामुळे पांढरी वापरली तरी चालेल. पाणे ओतल्यावर मार्जार बाहेर येईल .त्याची नखे मच्चारदाणीत अडकतील .मग मच्छरदाणीमें मांजर. त्यानंतर पुण्यात असाल तर लकडीपुलावर जा. लकडीपूल माहीती नसेल तर मिपावर एक लेख आला होता लकडीपूलाचा तो वाचा. तो वाचल्यावर तुमच्या लक्षात येईल की दुचाकी वाहनाला प्रवेश नाही. नो प्रॉब्लेम तुम्ही सरकारी नोकर आहात. तुम्हाला कोणीच प्रश्न विचारणार नाही. तुम्हाला प्रश्न पडला तर तर ....मिपावर पुढचा धागा टाका. :-)) :-)) :-))

In reply to by मोदक

संपलो संपलो!! :)) :)) दुवा... दुवा... असाच एक श्री श्री टारझनभौ यांचा प्रतिसादः
परवाच मी पुण्याला चाललो होतो .. बाईकवर .. तोच रस्त्यात मला एक गाय दिसली , तिने मला हाय केले .. पण मला घाई असल्याने मी तिला बाय म्हंटले , म्हणतात ना "जिसका टोपी उसका डिजे " . पण झाले काय ते माहित नाय , तिला आला राग .. तिने उगारली शिंगं माझ्यावर पण मी ही तयारीतंच होतो , तिला समोरुन चाल करुन येताना पाहुन मी माझं जॅकेट काढलं , आणि जरा वॉर्म अप केलं , शेवटी म्हंटलं च आहे "आंधळा दळतो आणि गणपा चिकन तंदुरी बनवतो " . तो गाय अजुंनंच चेकाळली आणि जोरात माझ्या रोखाने येऊ लागली .. मग मी सुमारे २०१ जोर आणि बैठका आलटुन पलटुन मारल्या , आता माझी बॉडी दबंग मधल्या सलमान खान सारखी फुगत होती नव्हे फुगलीच .. माझं टिशर्ट अगदी फाटलाच जसे "भित्र्या पाठी ब्रम्हराक्षस आणि नाना पाठी संपादक " तसेच अगदी . एक हवेचा झोका आला तोच मला चौकट राजा ह्या अप्रतिम सिनेमातले "एक झोका ... एक झोका .. चुके ... काळजाचा ठोका एक झोका " हे बालगीत आठवले त्यावरुन मला कोणीतरी नुकताच बालगितांचे आवाहन करणारा धागा काढल्याचे आठवले , हे सगळं मला एका सेकंदाच्या एक हजार दोनशे चाळीस (अंकी १२४१) वेळा आठवलं पण अक्षरात माझा एक लिहायचा राहिल्या , त्यामुळे बँकेने मला ५० रुपये चार्ज केले आणि माझी घोर अशी फसवणुक केली . त्याबद्दल मी बँका कशी फसवणुक करतात या धाग्यावरचा एक प्रतिसाद आठवुन हसत सुटलो तशी ती गाय मला वेडा समजली आणि ह्याच्या शी पंगा घेण्यात आपलंच नुसकान हाय हे तिला उमगले .... पण तोवर उशीर झाला होता ... म्हणतात ना " काळ आला होता पण नळाला पाणी नव्हतं ! " तसंच काहीसं . गायी चे अँटिलॉक डिस्क ब्रेकिंग फेल झाले आणि ती माझ्या अंगावर येउन आदळनार तोच मी पटकन मागे जाऊन तिचं शेपुट धरलं आणि अशी हॅलिकॉप्टर सारखी फिरवली .. अशी फिरवली ... की तिला चश्मा च लागला , म्हणतात ना "काखेत कळसा आणि गाई ला चश्मा " . तसं तोच गाई चा मोबाईल वाजला .. मोबाईल वर आलं "दुबैचा शेख कॉलींग .. दुबैचा शेख कॉलींग .. " गाई ने मला माझ्या आयडी चा वास्ता दिला तेंव्हा माझा राग मी आवरता घेतला , पण तरीही तिला मी असं सोडणार नव्हतो .. " डोक्यात शिंग असणारी ... " ह्या नव्या लेखमालेत तिच्यावर लेख पाडणारंच होतो .. शेवटी तिने ही मान्य केले संत कोदाराम आपल्या अभंगांत म्हणतात तेच सत्य . "दुबैचा मित्र बोले तास भर .. बोले भारंभर ... कोदा म्हणे " असा अनुभव कोणाला आला असेल तर बोला , त्याच्या खरडवहीत " तुम्ही जोहार आहात " असं मोठ्या अक्षरात लिहील्या जाईल . smiley - विडीफुकु
या एका प्रतिसादातच मी टारझनभौंचा "फॅण" झालो :))

In reply to by आदूबाळ

काय भारी कल्पनाशक्ती आहे. हहपूवा :)

In reply to by आदूबाळ

इस्पीकचा एक्का
एकदा एक गुरू शिष्याबरोबर दुसर्‍या गावी चालला होता. रस्त्यात एक नदी लागली आणि गुरु-शिष्य पाणी प्यायला पाण्यात उतरले. त्या पाण्यातून एक विंचू वाहताना गुरूने पाहिला. त्याने भूतदयेने त्याला ओंजळित उचलून काठावर न्यायला सुरुवात केली. अर्थातच विंचवाने गुरुच्या हाताला दंश केला आणि तो परत पाण्यात पडला. गुरूने त्याला परत उचलले, परत विचवाने दंश केला आणि तो पाण्यात पडला. असे तीन चारदा झाल्यावर गुरू त्या विंचवाला काठावर आणण्यात यशस्वी झाला. शिष्य हे सगळे विस्मयाने पाहात होता. तो गुरूला म्हणाला, "गुरुजी, एका क्षुद्र जीवाकरिता तुम्ही हे काय करत होता? हा वेडेपणा नाही का?" गुरु म्हणाला, "एक क्षुद्र जीव जर त्याचा नांगी मारण्याचा वाईट गुणधर्म सोडत नाही तर सर्वोत्तम जीव समजल्या जाण्यार्‍या माझ्यासारख्या माणसाने माझा मदत करण्याचा चांगला गुणधर्म का सोडावा?"

In reply to by मोदक

भटक्यारावांनी जो लिहीलाय तो
गड कसा पाहावा याचं एक तंत्र आहे. तो धावता पळता पहाता उपयोगाचा नाही. त्याची भौगोलीक पार्श्वभूमी, त्याचं नकाशातील स्थान, संरक्षणदृष्ट्या त्याचं महत्वं, त्याच्या जवळ असलेले घाट, मैदान, खिंडी, पठार, नद्या, ओढे, रणक्षेत्र, त्यावर चढायचे मार्ग, त्यावरून दिसणारा प्रदेश, त्या प्रदेशातील किल्ले, शिखरं, त्यांची मजबूती, त्यावरील पाण्याची ठिकाणं-हौद, तलाव, त्याचे तट, त्याचे बुरूज, त्याची प्रवेशद्वारं.... हे सगळं कसं नीट तपासलं पाहिजे, तरचं त्याचं महत्व ध्यानी येतं. धावता पळता किल्ला बघायला तो काही भोज्जा नव्हे !
माझ्या माहितीप्रमाणे गोनिदांच्या "दुर्गभ्रमणगाथा" मधला उतारा आहे..

In reply to by सुहास..

धन्यवाद, मित्रा.. तुझ्यासारख्या जुण्या-जाणत्या मिपाकरानं माझं काहीतरी चोप्य-पस्ते करावं, ह्यातच सारंकाही आलं.. सुशिभक्ती अजूनही सुरु आहे.. फक्त आता बोलत नाही, वाचतोय.. मेघालयात ये, भटकंतीसोबतच ४-५ दिवसतरी बाहेर पडणार नाहीस एवढी "सुशिंभक्ती" मांडतो.. ;-) सध्याचा काऊंट ३४-३५ असेल.. आता मुळ धाग्याबद्दल.. धागा श्रीमंत होतं चाललाय. मलाही "कणा" ही कविता खुप आवडते.. सुरेश भटही आवडीचे. त्यांच्या काही ओळी माझ्या खवत पर्मानन्ट विराजल्या आहेत.. धाग्यावर हिंदी कविताही चालताहेत, हे बघून केलेली ही गुस्ताखी.. "मैनें उसके हाथोंसे सबकुछ छुटतें हुए देखा है लोगोंको उसके वजूद को, नोंचतें खसोंटते हुए देखा हैं.. कहतें हैं, वो देवताओंसेभी बढकर होती हैं मैंने तो उसको अपनोंकेही पैरोंमें घसीटते हुए देखा हैं दिल में जमानेभर क प्यार लिए उसें आलिशान बंगलोंके कोनों में, सिमटते हुए देखा हैं देखा हैं उसे, अपने ही बेटों के बीच युं बटते हुए मैनें इक मां को, बिखरते हुए, टूंटते हुए देखा है.."

In reply to by बहुगुणी

पाठपुरावा केला म्हणून कळलं की या ओळी चिगो यांच्याच आहेत! बहोत खूब!

ओतुरचं जग ('दीपावली' दिवाळी २००६) - अनिल अवचट ओतूरला दुष्काळ पडतो का? त्या काळात मला कधीही नदी आटलेली आठवत नाही. बारा महिने वाहणारी नदी होती. आमच्या आडाचं पाणी आटल्याचं आठवत नाही. पण तरीही दुष्काळाची एक आठवतेय घटना, आमच्याच घरात पाहिलेली. सकाळी उठून आम्ही खाली आलो, तर आजी, वडील, आई बोलत उभे. काय झालं? चोरी झाली. चोर मागच्या भिंतीवरून उडी मारून आले. आणि काय चोरलं? तर रात्रीचं उरलेलं जेवण जेवून गेले! ते इतके सभ्य की जाताना ते ताट-वाटी घासून गेले होते. भिंतीच्या कडेला उभी दोन पितळेची कल्हईची ताटं मला आजही आठवतात. आजी म्हणत होती, उपाशी होती गं माणसं. मला माहीत असतं तर आणखी ठेवलं असतं अन्न. असा जमाना, जिथे चोर होते सभ्य.

अग्नी आणि पृथ्वी यांच्या धुंद प्रणयांतून सह्याद्री जन्मास आला. अग्नीच्या धगधगीत उग्र वीर्याचा हा अविष्कारही तितकाच उग्र आहे. पौरूषाचा मुर्तिमंत साक्षात्कार म्हणजे सह्याद्री. त्याच्या आवडीनिवडी आणि खोडी पुरूषी आहेत. त्याचे खेळणे-खिंदळणेही पुरूषी आहे. त्यांत बायकी नाजूकपणाला जागाच नाही. कारण सह्याद्री हा ज्वालामूखीचा उद्रेक आहे. अति प्रचंड, अति राकट, अति दणकट अन काळाकभिन्न. रामोश्यासारखा!! पण मनाने मात्र दिलदार राजा आहे तो. आडदांड सामर्थ्य हेच त्याचें सौंदर्य. तरी पण कधी काळी कुणा शिल्पसोनारांनी सह्याद्रीच्या कानात सुंदर आणि नाजुक लेणी घातली. त्याच्या आटीव अन पिळदार देहाला कुणाची दृष्ट लागू नये, म्हणून मराठी मुलखाने त्याच्या दंडावर जेजुरीच्या खंडोबाच्या आणि कोल्हापूरच्या ज्योतिबाच्या घडीव पेट्या बांधल्या. त्याच्या गळ्यात कुणी सप्तशृंग भवानीचा टाक घातला. मनगटांत किल्ले-कोटांचे कडीतोडे घातले. सह्याद्रीला इतके नटवले सजवले तरी तो दिसायचा तसाच दिसतो! रामोश्यासारखा! तालमीच्या मातीत अंग घुसळून बाहेर आलेल्या रामोशासारखा!! सह्याद्रीचा खांदाबांधा विशाल आहे, तितकाच तो आवळ आणि रेखीव आहे. त्याच्या घट्ट खांद्यावरून असे कापीव कडे सुटलेले आहेत की, तेथून खाली डोकावत नाही. डोळेच फिरतात! मुसळधार पावसांत तो न्हाहू लागला की, त्याच्या खांद्यांवरून धो धो धारा कालच्या काळदरीत कोसळू लागतात आणि मग जो आवाज घुमतो तो ऐकावा. सह्याद्रीचे हसणें, खिदळणें ते! बेहोष खिदळत असतो. ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ राजाशिवछत्रपती या बाबासाहेब पुरंदरेंच्या पुस्तकात अजिंक्य सह्याद्री या प्रकरणात सह्याद्री जे अप्रतिम वर्णन केलंय त्यातलाच हा थोडासा भाग! माझा अतिशय आवडता!! बाबासाहेबांनी सह्याद्रीला दिलेली तालमीच्या मातीतून अंग घुसळून आलेल्या रामोश्याची उपमा एकदम चपखल. पौष माघाची थंडी सरली कि फाल्गुनातल्या होळीनंतर सह्याद्री आपला राकटपणा धारण करायला सुरूवात करतो ते वैशाख वणवा संपेपर्यंत. जेष्ठात काळ्यासावळ्या मेघांनी भरून आलेलं आभाळ त्याच्या कडेकपार्‍यांत धो धो कोसळलं की सह्याद्री आपला राकटपणा विसरून हिरव्या पोपटी रंगाची झुल पाघंरायला सज्ज होतो. या सह्याद्रीवर कितीही आणि कोणीही लिहलं तरी ते कमीच! 'गोनीदां' नंतर बाबासाहेबांच हे शब्दसामर्थ्य मला प्रचंड आवडतं. या राकट दणकट सह्यकड्यांची साक्षात हिमालयासोबत वसंत बापटांनी केलेली तुलना सह्याद्रीचं वेगळेपण दाखवून जाते.

In reply to by इनिगोय

नदीच्या किनारी नदीला म्हणावे तुझे पूर माझ्या नसातून यावे अभंगात गोडी तुझ्या भाकरीची तहानेत माझ्या तुला ओळखावे माझा मराठीचा बोल वाजे काळजात खोल ओवीमधून पाझरे निळ्या अमृताची ओल माझी मराठी माऊली तिची विठोबा साऊली ज्ञाना, नामा, तुका, एका उभे कैवल्य राऊळी माझा मराठी गुलाल त्याला अबीराचा वास माझ्यासाठी चंद्रभागा उरी कालवते घास माझ्या मराठी मातीची खोलवर रुजे नाळ सळसळती आतून माझ्या रक्तात पिंपळ कवी – अशोक बागवे संपुर्ण कविताच सुंदर असली तरी हे कडवं खुप खास!
माझा मराठीचा बोल वाजे काळजात खोल ओवीमधून पाझरे निळ्या अमृताची ओल

व्वा, मोदकराव.... हा आता धागा नाहीये..... सुंदर गोफ विणल्यासारखा होतोय....... पुनश्च धन्यवाद.....

"शेवटी संस्कृती म्हणजे बाजरीची भाकरी, वांग्याचे भरीत, गणपतीबाप्पा मोरया ची मुक्त आरोळी, केळीच्या पानातली भाताची मूद आणि त्यावरचे वरण, उघड्या पायांनी तुडवलेला पंचगंगेचा काठ, मारुतीच्या देवळात एका दमात फोडलेल्या नारळाचे पाणी, दुसर्‍याचा पाय चुकून लागल्यावरदेखील आपण केलेला प्रथम नमस्कार, दिव्या दिव्या दीपत्कार, आज्जीने सांगितलेल्या भुताच्या गोष्टी, मारुतीची न जळणारी आणि वाटेल तेव्हा लहानमोठी होणारी शेपटी, दसर्‍याला वाटायची आपट्याची पाने, पंढरपूरचे धूळ आणि अबीर यांच्या समप्रमाणात मिसळून खाल्लेले डाळे आणि साखरफुटाणे, सिंहगडावर भरून आलेली छाती आणि दिवंगत आप्तांच्या मूठभर अस्थिंचा गंगार्पणाच्यावेळी झालेला स्पर्श, कुंभाराच्या चाकावर फिरणार्‍या गोळ्याला त्याचे पाण्याने भिजलेले नाजूल हात लागून घाटदार मडके घडावे तसा ह्या अदृष्य पण भावनेने भिजलेल्या हातांनी हा पिंड घडत असतो. कुणाला देशी मडक्याचा आकार येतो, कुणाला विदेशी कपबशीचा! -- पु ल देशपांडे. ************************************************************* "स्वतः भुकेला असताना इतर भुकेल्याकडे लक्ष न देता खाणे ही प्रकृती, स्वतःचे पोट भरलेले असताना देखील इतर भुकेल्याकडे लक्ष न देता अजून खाणे ही विकृती, आणि स्वतः खाण्याआधी इतरांच्या भुकेकडे बघणे ही संस्कृती" ************************************************************* "जो आपल्या कृतीतून संस्कृती निर्माण करतो तो देव, प्रकृती करतो तो मानव आणि विकृती करतो तो दानव". ************************************************************* नक्की कुठे थांबावे (प्रतिसादामध्ये / अवांतरामध्ये / वादामध्ये) अशा आयडींसाठी.. ;-) एक तरुण संन्यासी जंगलात तप करीत असताना त्याने सोबत म्हणून एक मांजर पाळले. त्याला नियमित दूध मिळेना म्हणून त्याच्यासाठी एक गाय पाळली. तिच्या शेणाचा दुर्गंध त्याच्या कुटीपासून दूर रहावा म्हणून - आणि वन्य प्राण्यांपासून तिचे संरक्षण व्हावे म्हणून - थोड्या अंतरावर त्या गायीसाठी त्याला एक गोठा बांधावा लागला. गायीला चरायला नेणे, गोठ्याची सफाई वगैरे करण्यात त्याचा फार वेळ जाऊ लागला नि त्याच्या साधनेत व्यत्यय येऊ लागला म्हणून हे सगळे काम करण्यासाठी त्याने एक बाई ठेवली. यथावकाश त्याने तिच्याशी लग्न केले.

प्रवासात आगगाडीतून येताना शेताच्या लाल लाल बांधावर दिसला एक हिरवाहिरवागार पोपट. मग पोपट हिरवेगार उडाला. पोपट माझ्या मनात शिरला. पोपट माझ्या मनात फिरला मन हिरवेगार करीत, विचार हिरवेगार करीत, स्वप्ने हिरवीगार करीत. पोपट बसला खांद्यावर आणि क्षणभर मी झालो एक हिरवेगार झाड... मी म्हटले, "मिस्टर पोपट, कसे काय?" तो म्हणाला, "मिस्टर कवी, कसे काय?" भलताच मिस्कील होता पोपट. हिरवाहिरवागार पोपट. प्रवासभर पोपट बोलत होता खूप. प्रवासभर मीही बोलत होतो खूप. पोपट म्हणाला, "मिस्टर कवी, करता काय?" मी म्हटले, "नोकरी करतो." पोपट म्हणाला, "नोकरीमध्ये करता काय?" मी म्हणालो, " नोकरीमध्ये खोटे हसतो. खोटे बोलतो. बंद गळ्याच्या मठठांना शहाणे म्हणतो. लाचारांना शूर म्हणतो. हलकटांना सज्जन म्हणतो. समर्थाच्या श्वानांना सलाम करतो. झकास करतो मूल्यांची पोपटपंची. पहिलीला पगार घेतो : रहाणीची मान जरा उंच करतो. " पोपटाने माझ्या डोळ्यांत पाहिले : मला भलतीच भीती वाटली. वाटले, हा भूल घालून नेईल मला हिरव्या हिरव्या पंखांवरून लाल लाल बांधावर. माझे एक प्रमोशन ड्यू होते : पोपटाची मला खूप भीती वाटली. पोपटाने पुन्हा एकदा माझ्या डोळ्यांत पाहिले : डोळे भरून माझ्या डोळ्यांत पाहिले आणि तो उडून गेला. हिरव्या हिरव्या पंखांवर निळे निळे आभाळ झेलीत लाल लाल बांधाकडे पोपट एकटा उडून गेला. -- मंगेश पाडगावकर ९-१०-१९६६ (साहित्य अकादमी विजेता काव्यसंग्रह -- सलाम) बोरकरांच्या काव्याबद्दल लिहिताना जे कालातीतपणाची भावना येते त्याचाच प्रत्यय पाडगावकर अनेकदा देतात. गुरू शिष्य शोभतात आपापल्या वेगळ्या शैलीतही.. परंपरागत आणि झूल पांघरलेली सफेद कॉलर कामे करताना अचानक हापिसातल्याच प्रदर्शनात हा काव्यसंग्रह आणि हे रत्न हाती लागले. ६६ सालची अतिशय जुन्या वातावरणातली मुंबई आणि आज जवळजवळ ५० वर्षांनंतर कुठल्याही इतर ठिकाणी तीच जाणीव टचकन करून देणार्‍या अतिशय साध्या शब्दातल्या ओळी...

पूर्तता माझ्या व्यथेची माझिया मृत्यूत व्हावी जीवनापासून माझ्या ह्या मला मुक्‍ती मिळावी. वेदनेला अंत नाही अन्‌ कुणाला खंत नाही गांजणार्‍या वासनांची बंधने सारी तुटावी. संपली माझी प्रतीक्षा, गोठली माझी अपेक्षा कापलेले पंख माझे, लोचने आता मिटावी. सोबती काही जिवाचे मात्र यावे न्यावयाला तारकांच्या मांडवाखाली चिता माझी जळावी. काय सांगावे तुला मी ? काय मी बोलू तुझ्याशी ? राख मी झाल्यावरी गीते तुला माझी स्मरावी !

इथले अनेक शब्दप्रभू अफाट लिहून जातात...रामदास, सहजराव, बिका, भानस...यादी मोठी आहे... 'बामनाचं पोर' या नावाने पूर्वी लिहिणार्‍या सदस्याने (आता त्यांनी आय डी बदलला आहे की काय हे माहीत नाही, त्यांचं नवीन लिखाण वाचल्याचं आठवत नाही) एका प्रतिसादात खालील ओळी लिहिल्या होत्या: .. आयुष्य म्हणजे आजवरच्या श्वासांची बेरीज नव्हे तर श्वास विसरायला लावणार्‍या, रोखून धरलेल्या क्षणांची बेरीज....

#बहुगुणी... थोडे हिंदी.. खास तुमच्यासाठी.. मुझको भी तरकीब सिखा कोई यार जुलाहे अक्सर तुझको देखा है कि ताना बुनते जब कोइ तागा टुट गया या खत्म हुआ फिर से बांध के और सिरा कोई जोड़ के उसमे आगे बुनने लगते हो तेरे इस ताने में लेकिन इक भी गांठ गिराह बुन्तर की देख नहीं सकता है कोई मैनें तो ईक बार बुना था एक ही रिश्ता लेकिन उसकी सारी गिरहें साफ नजर आती हैं.. मेरे यार जुलाहे मुझको भी तरकीब सिखा दो यार जुलाहे...

In reply to by मैत्र

या गुलझारच्या काही त्रिवेण्या: ************ तमाम सफहे किताबोंके फ़डफ़डाने लगे हवा धकेल के दरवाजा आ गयी घर में कभी हवा की तरह तुम भी आया जाया करो! ************ सारा दिन बैठा मैं हाथ में लेकर खाली कास रात जो गुज़री, चांद की कौडी डाल गयी उसमें सूदखोर सूरज कल मुझसे ये भी ले जायेगा! *********************** सामने आये मेरे, देखा मुझे, बात भी की मुस्कराए भी, पुरानी किसी पहचान की खातिर पुराना अखबार था, बस, देख लिया, रख भी दिया! ************* ज़मीं भी उसकी, ज़मीं की नेमतें उसकी ये सब उसी का है, घर भी, ये घर के बंदे भी खुदा से कहिये, कभी वो भी अपने घर आये! *************** कभी कभी बाज़ार में यूं भी हो जाता है कीमत ठीक थी, जेब में इतनें दाम नही थे ऐसे ही इक बार मैं तुम को हार आया था! ************ वह जिस सांस का रिश्ता बंधा हुआ था मेरा दबा के दांत तले, सांस काट दी उसने कटी पतंग का मांझा मुहल्ले भर मे लुटा! ************ चुडी के टुकड़े थे, पैर में चूभते ही खूं बह निकला नंगे पांव खेल रहा था, लड़का अपने आंगन में बाप ने कल दारू पी के मां की बाह मरोडी थी! ************ बुड बुड करते लफ्जों को चिमटी से पकड़ो फेंको और मसल दो पैर की ऐडी से अफवाहोंको खूं पीने की आदत है! ****************

In reply to by बहुगुणी

कभी कभी बाज़ार में यूं भी हो जाता है कीमत ठीक थी, जेब में इतनें दाम नही थे ऐसे ही इक बार मैं तुम को हार आया था!
मनाला चरा पाडून गेली ही त्रिवेणी...

In reply to by बहुगुणी

सारा दिन बैठा मैं हाथ में लेकर खाली कास रात जो गुज़री, चांद की कौडी डाल गयी उसमें सूदखोर सूरज कल मुझसे ये भी ले जायेगा!
ही एक अतिशय आवडती रचना आहे! आभार..

सलाम सबको सलाम ज्याच्या हातात दंडा त्याला सलाम, लाथेच्या भयाने डावा हात गांडीवर ठेवून उजव्या हाताने सलाम, बघणार्‍याला सलाम, न बघणार्‍याला सलाम, विकत घेणार्‍याला सलाम, विकत घेण्याचा इशारा करणार्‍याला सलाम, सलाम,भाई,सबको सलाम. वटारलेल्या प्रतेक डोळ्याला सलाम, शेंदूर फासलेल्या दगडाला सलाम, लाखो खर्चून बांधलेल्या देवळांना सलाम, देवळातल्या देवांच्या धाकाला सलाम, देवांचे आणि धर्माचे कंत्राट घेणार्यांना सलाम, रिकाम्या हातातून ऊद कढणार्‍या बडेबुवाला सलाम, शनीला सलाम, मंगळाला सलाम, भितीच्या प्रत्येक ठेकेदाराला सलाम, आईवर आयुष्यभर गुरगुरणार्‍या बापाला सलाम, बापावर गुरगुरणार्‍या साहेबाला सलाम, साहेबाची टरकवणार्‍या त्याच्या साहेबाला सलाम, सलाम,प्यारे भाईयों और बहनों, सबको सलाम. ज्याच्या हातात वृत्तपत्र त्याला सलाम, भाषणांचे,सभांचे फोटो सकट रिपोर्ट छापतो त्याला सलाम, वृत्तपत्रांच्या मालकांना सलाम, त्यांची वेसण धरणार्‍या राज्यकर्त्यांना सलाम, ज्याच्या समोर माइक्रोफोन त्याला सलाम, त्यातून न थांबता बोलतो त्याला सलाम, लाखोंच्या गर्दीला सलाम, गर्दी झुलवणार्‍या जादुगारांना सलाम, भाईयों और बहनों सबको सलाम. नाक्यावरच्या दादाला सलाम, हातभट्टीवाल्याला सलाम, स्मगलरला सलाम, मट्‍केवाल्याला सलाम, त्यांनी पेरलेल्या हफ्त्यांना सलाम, लोकशाहीला बी सलाम, ठोकरशाहीला बी सलाम, सत्तेचा ट्रक चालाविण्यार्‍यांना सलाम, ट्रकखाली चिरडलेल्या, गांडुळांना,कुत्र्यांना सलाम, ज्याच्या हातात चाकू त्याला सलाम, विमानातून बाँब फेकणार्‍याना सलाम, शस्त्रास्त्रांच्या प्रचंड व्यापार्‍यांना सलाम, काळाबाजारवाल्यांना सलाम, त्यांना फाशी देण्याची घोषणा करणार्‍यांना सलाम, गटारातल्या पाण्याने इंजेक्शन भरणार्‍यांना सलाम, तिरडीचे सामान विकणार्‍यांना सलाम, तिरडी उचलणार्‍या खांद्यांना सलाम, मौत सस्ती करणार्‍या सर्वांना सलाम, सलाम, प्यारे दोस्तों,सबको सलाम. बिळांना सलाम, बिळातल्या उंदरांना सलाम, घरातल्या झुरळांना सलाम, खाटेतल्या ढेकणांना सलाम, पिचलेल्या बायकोला सलाम, दीड खोलीतल्या पोरडयाला सलाम, गाडीत चेंगरणार्‍या गर्दीला सलाम, किडक्या धान्याला सलाम, भोके पडलेल्या पिवळ्या गन्जिफ्रॉकला सलाम, धंद्यांच्या मालकाला सलाम, युनीयनच्या लीडरला सलाम, संपाला सलाम, उपासमारीला सलाम, सर्व रंगांच्या सर्व झेंड्यांना सलाम, चाळीचाळीतून तुंबलेल्या संडासातल्या लेंड्यांना सलाम, मानगूट पकडणार्‍या प्रत्येक हाताला सलाम, सलाम,भाईयों और बहनों,सबको सलाम. या माझ्या परमपवित्र इत्यादी देशाला सलाम, या देशाच्या सुउदात्त सुमंगल सुपरंपरेला सलाम, सर्व बिलंदर घोषणांना सलाम, जातिभेदाच्या उकिरड्यांना सलाम, या उकिरड्यातून सत्तेच पीक कढणार्‍यांना सलाम, उपनिषदे आणि वेदांना सलाम, साखरकारखान्यांच्या दादांना सलाम, त्यांच्या शेकडो लोर्‍यांना सलाम, निवडणुकींना सलाम, निवडणुकफंडाला सलाम, अद्रूष्य बुक्यांना सलाम, मतांच्या आंधळ्या शिक्यांना सलाम, ससा हाती असलेल्या पारध्यांना सलाम, त्यांच्या तैनतीतल्या गारद्यांना सलाम, दलितांवर अत्याचार करणार्‍यांना सलाम, या बातम्या वाचाणार्‍या सर्व षंढांना सलाम, सलाम,भाईयों और बहनों,सबको सलाम. सत्ता संपत्तीच्या भडव्यांचा देश म्हटले तर डोके फोडतील, हलकट लाचारांचा देश म्ह्टले तर रस्त्यावर झोडतील, खरीदले जाणार्‍यांचा देश म्हटले तर वाटा रोखतील, देवधर्माविषयी,नेत्यांविषयी वाईट बोललो तर नाक्यावर गाठून ठोकतील, शोषण करणार्‍यांचा देश म्हटले तर नोकरीवरुन काढतील म्हणून आधी माझ्या नपुंसकत्वाला सलाम, आणि त्यानंतर अर्थातच या माझ्या परमपवित्र सुउदात्त सुमंगल देशाला सलाम, या महान देशाच्या महान परंपरेला सलाम. सलाम प्यारे भाईयों और बहनों,सबको सलाम. अनेक हात असते तर अनेक हातांनी केला असता सलाम, लेकिंन माफ करना भाईयों, हात तर दोनच आणि त्यातला डावा लाथेच्या भयाने ठेवलेला गांडीवर म्हणून फक्त उजव्या हाताने सलाम, सलाम,सबको सलाम, भाईयों और बहनों,सबको सलाम. ------------------मंगेश पाडगांवकर

रामप्रसाद बिस्मिल आणि अश्फाक उल्लाह खान यांच्यातली ही जुगलबंदी आणि त्यातून तयार झालेल्या या अमर काव्याचा जन्म, एका सभेमध्ये बिस्मिलच्या शायरीच उत्तर अश्फाकने आपले उस्ताद जिगर मोरादाबादीच्या गझलेच्या कडव्यातून दिलेलं, बिस्मिल म्हणाले होते, बहे बहरे-फना में जल्द या रब! लाश 'बिस्मिल' की। कि भूखी मछलियाँ हैं जौहरे-शमशीर कातिल की।।" ( या बहरून उठलेल्या अंतकाळात माझे शव वाहून जाउदे; की भुक्या मासोळ्या शत्रूच्या तलवारी प्रमाणे आहेत) आमेन असं म्हणून अश्फाक म्हणतात "कौन जाने ये तमन्ना इश्क की मंजिल में है। जो तमन्ना दिल से निकली फिर जो देखा दिल में है।।" अश्फाक आर्य समाज मंदिरात बिस्मिलकडे काही कामानिमित्त गेलं असताना एक गझल गुणगुणत होते. "कौन जाने ये तमन्ना इश्क की मंजिल में है। जो तमन्ना दिल से निकली फिर जो देखा दिल में है।।" शेर ऐकून बिस्मिलने स्मितहास्य केलं असतं अश्फाक ने विचारले की मी काही चुकीचं बोललो काय, तर बिस्मिल म्हणतात की असा भाग नाही मिर्जा गालिबच्या जुन्या जमिनीवर एखादा शेर सांगितला म्हणजे फार मोठी गोष्ट नाही. अजून काही रंगवलं असतं तर आम्ही पण इर्शाद म्हणलो असतो. अश्फाक काहीशा आव्हान देणाऱ्या स्वरात म्हणले की "तो राम भाई! अब आप ही इसमें गिरह लगाइये, मैं मान जाऊँगा आपकी सोच जिगर और मिर्ज़ा गालिब से भी परले दर्जे की है" त्यावेळेस बिस्मिल साहेब म्हणतात "सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिल में है। देखना है जोर कितना बाजु-कातिल में है?" सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिल में है देखना है जोर कितना बांजुए कातिल में है l करता नहीं क्यूं दूसरा कुछ बातचीत, देखता हूं मैं जिसे वो चुप तेरी महफिल में है ए शहीद-ए-मुल्क-ओ-मिल्लत मैं तेरे ऊपर निसार, अब तेरी हिम्मत का चरचा गैर की महफिल में है सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिल में है l वक्त आने दे बता देंगे तुझे ए आसमान, हम अभी से क्या बतायें क्या हमारे दिल में है खैंच कर लायी है सब को कत्ल होने की उम्मीद, आशिकों का आज जमघट कूच-ए-कातिल में है सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिल में है l है लिये हथियार दुशमन ताक में बैठा उधर, और हम तैय्यार हैं सीना लिये अपना इधर. खून से खेलेंगे होली गर वतन मुश्किल में है, सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिल में है l हाथ जिन में हो जुनून कटते नही तलवार से, सर जो उठ जाते हैं वो झुकते नहीं ललकार से. और भडकेगा जो शोला-सा हमारे दिल में है, सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिल में है l हम तो घर से निकले ही थे बांधकर सर पे कफ़न, जान हथेली पर लिये लो बढ चले हैं ये कदम. जिन्दगी तो अपनी मेहमान मौत की महफिल में है, सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिल में है l यूं खडा मौकतल में कातिल कह रहा है बार-बार, क्या तमन्ना-ए-शहादत भी किसि के दिल में है. दिल में तूफानों कि टोली और नसों में इन्कलाब, होश दुश्मन के उडा देंगे हमें रोको ना आज. दूर रह पाये जो हमसे दम कहां मंज़िल में है l वो जिस्म भी क्या जिस्म है जिसमें ना हो खून-ए-जुनून तूफानों से क्या लडे जो कश्ती-ए-साहिल में है, सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिल में है देखना है जोर कितना बांजुए कातिल में है l (बिसमिल अजीमाबादी)

In reply to by लॉरी टांगटूंगकर

आमीरच्या रंग दे बसंती मध्ये अतुल कुलकर्णी आणि कुणाल कपूर यांनी अनुक्रमे रामप्रसाद बिस्मिल आणि अश्फाक उल्लाह खान छान रंगवले होते. सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिल में है देखना है जोर कितना बांजुए कातिल में है अतुल कुलकर्णीने रामप्रसादच्या भुमिकेसाठी आपली निवड व्हावी म्हणून या ओळी गोर्‍या मड्ड्मला म्हणून दाखवलेल्या आठवल्या.

In reply to by लॉरी टांगटूंगकर

मस्त! याचीच एक व्हर्जन - कदाचित विडंबन- 'गुलाल' चित्रपटात तो पीयुष मिश्रा गाताना दाखवला आहे. त्याचे शब्दही इंटरेस्टिंग होते.

In reply to by लॉरी टांगटूंगकर

__/\__ स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स! किमान ह्या शब्दांसाठी तरी देशातल्या प्रत्येकानं थोडं प्रामाणिक व्हावं.

दुःखाच्या वाटेवर गाव तुझे लागले थबकले न पाय तरी, ह्र्दय मात्र थांबले वेशीपाशी उदास हाक तुझी भेटली अन माझि पायपीट डोळ्यातून सांडली मग माझा जीव तुझ्या वाटेवर वणवणेल अन माझी हाक तुझ्या अंतरात हुरहुरेल मी फिरेन दूर दूर तुझिया स्वप्नात चूर तिकडे पाउल तुझे उंबर्यात अडखळेल विसरशील सर्व सर्व आपुले रोमांच पर्व पण माझे नाव तुझ्या ओठांवर हुळ्हुळेल सहज कधी तू घरात लावशील सांजवात माझेही मन तिथेच ज्योती सह थरथरेल जेंव्हा तू नाहशील दर्पणात पाहशील माझे अस्तित्व तुझ्या आसपास दरवळेल जेंव्हा रात्री कुशीत माझे घेशील गीत माझे तारुण्य तुझ्या गात्रातून गुणगुणेल मग सुटेल मंद मंद वासंतिक पवन धुंद माझे आयुष्य तुझ्या अंगणात टपटपेल - सुरेश भट

कविता महाजन ह्यांच्या भिन्न कादंबरीतूनः मी हमसत धूमसत जितूचे हात गच्च पकडून अस्मिताच्या मांडीवर कोसळले. रडत रडतच म्हणाले, मला एड्स झालाय!.... " भला मोठा लांबरुंद रस्ता. डांबरी. काळा-करडा. बाजूनं फूटपाथ काळ्या घडीव दगडांचे. प्राण्यांची प्रचंड मोठी झुंड... एक झुंड नव्हे, अनेक झुंडी धावत येताहेत. रस्ता पूर्ण भरून गेलाय. एनलार्ज केलेल्या आकृत्यांसारखी घसघशीत मोठ्या आकारांची जनावरं. भली मोठी वळणदार शिंग. म्हशींसारख्या रुंद पाठी, पण भरपूर उंच मजबूत दणकट काळेभोर प्राणी. रानडुकरांसारखी त्वचा... चांगलीच जाड, केसाळ. वेगानं ताठलेले दिसताहेत त्यांचे अंगभरचे केस. घोड्यांसरखा तुफान वेग आहे त्यांच्या धावण्याला. त्यांच्या आकारमानाला न शोभेसा. आणी त्यांच्या काळ्या गोंडेदार शेपट्या जाडजूड विणलेल्या दोरखंडासारख्या टणक लहरताहेत हवेत सणसणीत गोफणीसारख्या. मी फूटपाथवर अंग चोरून उभी. मागे खूपच खूप उंच घरं आहेत. इंग्लिश धाटणीची वाटतात. एकसारखी. सगळं दगडी बांधकाम आहे. चिरेबंदी. कातीव. दारंखिडक्या दिसतच नाहीत. मी शोधतेय. कुठून आत शिरता येईल का बचाव करण्यासाठी. पण नुसती नजर फिरतेय सगळीकडे आणी मावळत जाताहेत सार्‍या शक्यता. काही हालचाल करण्याची हिंमत होतच नाही. कुठल्याही क्षणी हे झुंड फूटपाथवर येईल. किंवा झुंडीतला एखादा चुकार प्राणी मला शिंगावर उचलून घेईल. त्या जाड शेपटीनं मान आवळून टाकील. किंवा आपल्याच धुंदीत ते तुडवत जातील मला त्यांच्या टपोर कडक दगडी टाचांखाली. खाली वर आजूबाजूला सगळीकडे दगड. आणी मी मृदू मांसल स्पंजी नरम गरम लालबुंद रक्तानं थबथबलेली. चेंदामेंदा."

१. Specialization is knowing more and more about less and less until one knows everything about nothing. :-) (Vice versa for generalization) २. दूरदर्शनवर विज्ञानावर आधारीत एक माहीतीपूर्ण कार्यक्रम होता "Turning Point". त्यात शेवटी प्रश्नोत्तरे असत. हा प्रश्न आणि त्याला दिलेलं उत्तर एकदम लक्षात राहील असं होतं. उत्तर बहुतेक जयंत नारळीकर यांनी दिलं होतं. प्रश्न होता जसं Kidney, heart transplant करतात तसं भविष्यात Brain transplant करता येईल का? उत्तर होतं - You can get new heart, kidney but not brain, because YOU are the brain. Brain transplant will mean somebody else getting your body.

In reply to by आदूबाळ

हो.. त्यात वेगवेगळे शास्त्रज्ञ, प्राध्यापक पाहुणे म्हणून येत आपआपल्या विषयावर बोलायला आणि प्रश्नोत्तरांसाठी..

उनकी याद करें… जो बरसों तक लड़े जेल में, उनकी याद करें। जो फाँसी पर चढ़े खेल में, उनकी याद करें। याद करें काला पानी को, अंग्रेज़ों की मनमानी को, कोल्हू में जुट तेल पेरते, सावरकर से बलिदानी को। याद करें बहरे शासन को, बम से थर्राते आसन को, भगतसिंह, सुखदेव, राजगुरु, के आत्मोत्सर्ग पावन को। अन्यायी से लड़ें, दया की मत फरियाद करें। उनकी याद करें। याद करें हम पुर्तगाल को, ज़ुल्म सितम के तीस साल को, फौजी बूटों तले क्रांति को, सुलगी चिनगारी विशाल को। याद करें सालाज़ारों को, ज़ारों के अत्याचारों को, साइबेरिया के निर्वासित, शिविरों के हाहाकारों को। स्वतंत्रता के नए समर का शंख निनाद करें। उनकी याद करें। बलिदानों की बेला आई, लोकतन्त्र दे रहा दुहाई। स्वाभिमान से वही जियेगा, जिससे कीमत गई चुकाई। मुक्ति माँगती शक्ति संगठित, युक्ति सुसंगत, भक्ति अकम्पित, कृति तेजस्वी, धृति हिमगिरि-सी, मुक्ति माँगती गति अप्रतिहत। अंतिम विजय सुनिश्चित, पथ में क्यों अवसाद करें? उनकी याद करें। -श्री अटलबिहारी वाजपेयी

आता वाटतं की नऊ नऊ महिने घेणार एक एक शब्द यायला आता वाटतं भरभरून द्यावसं वाटावं, असं नाहीच काही द्यायला एका भाबड्या प्रामाणिकपणे सारंच मांडत आलो इतके दिवस आता वाटतं – नको होतं सारं इतक्या लग्बगीने सांगायला आता वाटतं की आपल्या हयातीत उणावणार नाही हा दुष्काळ, कसे सचैल भिजायचो इतके दिवस – मजा वाटते आहे ! काही देणार नाही असा शब्दच वाटत नाही लिहावासा अस्वस्थ वाटते आहे, लेखणीची भीती वाटते आहे … आता वाटते इतका अधाशीपणा नको होता करायला थोड्या धीराने घेतलं असतं, तर उरलीही असती श्रीशिल्लक काही आता परत काही नवे वाटून घेण्यासाठी नवा प्रवास प्राणात खोल शोधतोय त्राण; गवसत नाही ! भरून आला होतात काठोकाठ त्या मेघांनो – क्षमा ! बहरून आला होतात त्या उद्यानांनो – क्षमा ! झाली असेल कुचराई एखादा थेंब झेलण्यात, फूल खुडण्यात पण त्यासाठी इतकी शिक्षा फार होते आहे ! पक्षी कुठेही उडत असो, क्षितिजाकडेच उडत असतो यावर आता विश्वास ठेवायचा फक्त … हाताची घडी घालून, शांतपणे मिटायचे डोळे थंड झालं तर पाणीच होतं म्हणायचं, आणि उसळलंच तर म्हणायचं रक्त ! - मौनाची भाषांतरे, संदिप खरे

He is the Richest whose pleasures come cheapest. -Unknown Chin Shengt’an नावाचे एक चीनी विद्वान अतिवृष्टीमुळे त्यांच्या मित्राबरोबर एका देवळात दहा दिवस अडकून पडले होते. नुसतंच बसलोय तर करायचं काय ? लेखक महाशयांनी त्यांच्या 'सुखांची' एक यादी बनवली. Chin's 33 Happy Moments या नावाने ती प्रसिध्द आहे. सुखांची ती यादी नुकतीच वाचनात आली. विचार केला, आपण पावसामुळे अडकून पडण्याची वाट कशाला पहायची ? चीनच्या 'चीन' साहेबांकडून प्रेरणा घेऊन स्वतःची यादी बनवायची ठरवली. प्रामाणिकपणे सांगायचं तर, बराच वेळ काहीच सुचेना. मग ठरवलं, जसं आठवेल तसं लिहून ठेवायचं. चार पाच दिवसांच्या या प्रोसेसमध्ये एक गोष्ट लक्षात आली. तिखट-गोड भेळ खाताना मधेच कैरीची फोड दातात यावी आणि जिभेवरचा सगळा 'समा' बदलून जावा तसंच सुखाचं असावं. सुख 'शोधत' बसलो तर हाताला लागत नाही. खिशात एक छोटा कागद ठेवू लागलो. जगता जगता जिथे 'कैरी' लागली ते प्रसंग टिपून ठेवले, काही अनुभवलेले प्रसंग आठवून लिहिले. त्यातील काही निवडक शेअर करतोय... • घरात वीज नसते. मेणबत्तीच्या अंधुक प्रकाशात, पंखे-टीव्ही चालू नसलेल्या घरात सगळे व्यवहार चालू असतात. नीजानीज होते. मला थंडीतही डोक्यावर (आवाज करणारा) पंखा लागतो. आता तर उन्हाळ्याचे दिवस. झोप कशी लागणार? घामट अंगाने आडवा होतो. एकदा डावा, एकदा उजवा असे हात बदलत वर्तमानपत्राने वारा घालण्याचा केविलवाणा प्रयत्न चालू असतो. हात दुखायला लागतो. मी डोळे बंद करतो. माझ्या ओळखीतली माणसं मोजू लागतो, कळपातल्या मेंढ्या मोजतो...पण झोपेचं चिन्ह नाही. वीज कंपनी, सरकार, उन्हाळा, डास यांच्या नावाने चडफडत असताना कधी डोळा लागतो ते कळत नाही.... आणि... खुsssप वेळाने घामट अंगावर एक गार झुळूक येते. मी डोळे उघडून छताकडे पाहतो. वीज आली या आनंदात पंखा (आवाज करत) गोल गोल नाचत असतो. त्या अंधाऱ्या खोलीतही ‘चैतन्याचा प्रकाश’ पडल्याचा भास होतो. • डावीकडे....थोडं वर...इतकं वर नाही गं...थोsssडं खाली...हा, बरोबर. तिथेच...! माझा हात पोचू न शकणारी, माझ्या पाठीवरची 'खाज सुटणारी' जागा बायकोला बरोब्बर सापडते. समाधी लागल्यासारखे माझे डोळे आपसूक बंद होतात. • मी आणि माझा शाळेतला वर्गमित्र खूप वर्षांनी शाळेजवळ भेटतो. मित्राला सिगरेट ओढायची लहर येते. आम्ही शाळेजवळच्या एका दुकानात जातो. आमच्या वेळचा दुकानदार आता नसतो. मी सहज विचारतो, 'अजूनही तो पिशवीतला पेप्सी-कोला मिळतो का?.... मिळतो ? मग एक ऑरेंज, एक कालाखट्टा द्या...दुकानदार फ्रीज उघडतो. फ्रीजमध्ये पेप्सी कोलाचे जितके नग असतात ते सगळे विकत घेण्याइतके पैसे पाकिटात असतात. मला शाळेचे दिवस आठवतात. पेप्सी कोलासाठी खिशात जपून ठेवलेलं पन्नास पैशाचं नाणं आठवतं. मी खिशातल्या पाकिटातून एक नोट काढतो. दुकानदार म्हणतो, सुट्टे पैसे द्या. मी पाकिटाची चेन उघडतो आणि सुट्टे पैसे देतो. मी दाताने पेप्सी-कोलाची पिशवी फोडतो तशी ऑरेंज सरबताची एक चिळकांडी मित्राच्या शर्ट वर उडते. मी सॉरी म्हणतो. मित्र म्हणतो, सुधारणार नाहीस साल्या ! तिशी पार केलेले आम्ही दोन टोणगे पेप्सी-कोला खात खात दुकानातून बाहेर पडतो. • रस्त्यात एक माणूस दिसतो. कुठे तरी पाहिलंय याला...पण जाम आठवत नाही..दातात पेरूची बी अडकावी, ती बराच वेळ निघू नये आणि त्याहून कहर म्हणजे आपली जीभ सारखी-सारखी दाढेच्या त्याच फटीकडे जात रहावी तसा या माणसाचा चेहरा दिवसभर छळत राहतो. चार दिवसांनी, काहीही संदर्भ नसताना, त्या चेहऱ्याचा धनी अचानक आठवतो. ऑफिसातला एक कलीग विचारतो, 'काय रे आज खूष दिसतोयस.' मी म्हणतो, 'नाही, काही विशेष नाही.' मी चक्क खोटं बोलतो. • दोन दिवसांची ऑफिस टूर आटपून मी संध्याकाळी घरी येतो. घरी शुकशुकाट. वॉचमन सांगतो की सगळे शेजारच्या बागेत गेलेत. मी बागेशी जातो. माझा अडीच वर्षांचा मुलगा घसरगुंडीवर खेळताना दिसतो. मी त्या दिशेने चालत जातो. माझ्या मुलाचं माझ्याकडे लक्ष जातं. बाबाssssssssss ! असं तिथूनच ओरडून तो माझ्या दिशेने धावत सुटतो आणि माझ्या पायाला घट्ट मिठी मारतो. बागेतले सगळे माझ्याकडे बघायला लागतात. मी त्यांच्याकडे पाहिलं न पाहिल्यासारखं करतो. मुलाचं बोट धरून घसरगुंडीशी जातो. 'डॅडी' सिनेमासाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यावर अनुपम खेरला जितका आनंद झाला असेल त्याच्या दहा पट आनंद मला आत्ता होत असतो. • बायकोच्या साडीला मॅचिंग ब्लाउज घेण्यासाठी मी बायको बरोबर 'मॅचिंग सेंटर' मध्ये जातो. आज नशीब माझ्या बाजूने असतं. बायकोला हवी असलेली हिरव्या रंगाची शेड ‘फक्त’ चौतीस मिनिटात सापडते. • एक पावसाळी रविवार सकाळ. आई म्हणते, 'जेवण झाल्यावर ठाण्याला जायचंय. अमुक तमुकच्या पहिल्या वाढदिवसाची पार्टी आहे.' बाहेर टोम पाऊस पडत असतो. आमची जेवणं होतात. जड अंगाने (आणि जड अंतःकरणाने) मी पार्टीला घालायचे कपडे बाहेर काढतो. तेवढ्यात कोणाचा तरी फोन वाजतो. ठाण्याहून फोन असतो. पावसामुळे कार्यक्रम पुढे ढकलण्यात आलेला असतो. मनात नाचणाऱ्या आनंदाच्या कारंजाचे पाणी बाहेर जराही न सांडता मी इस्त्री केलेले कपडे निमुटपणे कपाटात ठेवतो. खिडक्यांचे पडदे लावून घेतो. खोलीत अंधार होतो. पंखा मध्यम गतीने चालेल असा ठेवतो. अंगावर पांघरूण घेतो. बाहेर पडणाऱ्या पावसाचा आवाज कानात साठवून घेतो. भीमसेनजींचा 'रामकली' लावतो. पंडितजी पहिला 'सा' लावतात आणि अंगावर काटा येतो. रविवार दुपार, पावसाळी काळोख, डोक्याखाली उशी, डोक्यावर पंखा, अंगावर पांघरूण, झाडाच्या पानांवर पडणाऱ्या पावसाचा आवाज, पंडितजींचा रामकली, आणि जडावून मिटत जाणारे डोळे हे सगळं एक तरफ और बाकी दुनिया एक तरफ..! • मी काहीतरी लिहायला बसतो. सुचत नाही तेव्हा बराच वेळ खिडकी बाहेर बघत बसतो. काहीतरी सुचतं, पण ते लिहिल्यावर इतकं ग्रेट नाही असं वाटतं. मी लिहिलेलं खोडून टाकतो. बायको बाहेर येण्याबद्दल विचारते. मी नाही सांगतो. ती मुलाला घेऊन बाहेर जाते. वाटतं, आता एकटाच आहे - मस्त लिहित बसेन. काहीतरी खर्डेघाशी करतो पण मजा येत नसते. कोऱ्या कागदांकडे मी बराच वेळ नुसताच पाहत राहतो. बेल वाजते. 'खूप बोलणारे' बिल्डींग मधले एक काका दरवाजात उभे. मी उगाचच काहीतरी बोलायचं म्हणून 'या' म्हणतो. ते खरोखरीच आत येतात. ते बोलू लागतात. आणि अचानक कुठल्यातरी संदर्भावरून मला लिखाणाला विषय मिळतो. काका रंगात येऊन भ्रष्टाचार, वर्ल्ड कप वगैरे वर बोलत असतात, पण माझं त्याकडे लक्षच नसतं. माझ्या डोक्यात लेखाची मांडणी सुरु होते. सुरुवात अशी करूया.. नको अशी करूया... म्हणता म्हणता सगळा लेख डोक्यात तयार होतो. आता फक्त जाऊन कागदावर उतरवायचा बाकी असतो. तासभर बोलून झाल्यावर काका उठतात आणि जाऊ लागतात. चपला घालता घालता मी काहीतरी बोलेन या अपेक्षेने माझ्याकडे बघतात. माझ्या नकळत मी patkanबोलून जातो - 'बरं झालं काका, आलात ते !’ • मंगळवार. सकाळचे दहा वाजलेले. चर्चगेटचा गजबजलेला अंडरग्राउंड सबवे. भोवताली माणसांचा समुद्र. फेरीवाले-भिकारी यांच्या मधून वाट काढत मी चालत असतो. अंगातून घामाच्या धारा. एका दुकानात लावलेल्या रेडियो मधून काहीतरी कानावर पडतं - वक़्त ने किया, क्या हसीं सितम | तुम रहे न तुम, हम रहे न हम.... कैफ़ी आज़मीचे शब्द, सचिनदेव बर्मनची चाल आणि गीता दत्तचा स्वर मला कैद करतात. मी जागच्या जागीच थिजून जातो. एका जागी स्वस्थ उभा राहून मी ते अख्खं गाणं ऐकतो. स्वतःला या 'क्षुद्र' जगात परत आणतो आणि माझ्या कामाला निघतो. ‘जायेंगे कहाँ, सुझता नहीं | चल पडे मगर, रास्ता नहीं | क्या तलाश है, कुछ पता नहीं !’...... ...या ओळींसाठी चर्चगेट स्टेशनपेक्षा अधिक योग्य जागा आणखी कुठली असू शकेल ? मी माझ्या 'सुखांच्या यादीवरून' पुन्हा एकदा नजर फिरवतो. सुखाचे हे सगळे अनुभव त्या त्या वेळी उपभोगुन एकही अनुभव आत्ता, या क्षणी माझ्या मुठीत नसतो. मग नक्की खरं काय? सुखाचा 'तो' अनुभव ? की त्या सुखाची नुसती 'आठवण' ?... मी विचार करत असतानाच माझा मुलगा अमृत माझ्याजवळ येतो. 'बाबा, चल, घोडा-घोडा खेळूया.' मी कागद पेन बाजूला ठेवून निमूटपणे अमृत बरोबर चालू लागतो. मी घोडयासारखा ओणवा बसतो. अमृत माझ्या ओणव्या पाठीवर बसतो. मी जरा हललो की अमृत खिदळत राहतो. मी मागे वळून अमृतचा खिदळणारा चेहरा बघतो. अमृतच्या हास्यात मला माझं ‘आणखी एक’ सुख गवसतं आणि मला पडलेल्या प्रश्नाचं उत्तरही !
दुवा - http://kahitarinavinahe.blogspot.in/2011/03/blog-post_24.html