राम्राम मंडळी.
खरडफळ्यावर गेले दोन दिवस अनेक जण आपापल्या आवडीच्या कविता देत आहेत.. त्यावरून या धाग्याची कल्पना सुचली.
चला.. आपल्याला आवडलेल्या कविता, ओळी, छोटेखानी लेख, वन लाईनर्स, टॅन्जंट्स, सुभाषिते.. अगदी जे जे आवडले आहे ते येथे एकत्र करूया.
लेखक आणि पुस्तकाचे नाव द्याच परंतु आवडलेला मजकूर 'का आवडला?' हे ही शक्य असेल तर द्या.
मी सुरूवात करतो..
********************************************************
गोनिदांच्या दुर्गभ्रमणगाथेतून, रायगडावरील आषाढाचे चित्रदर्शी वर्णन...
ज्येष्ठ संपतो. आकाश मेघांनी भरभरून येवू लागतं. रायगड ऐन कोकणांत. आकाश आपल्यावर प्रसन्न असलं, कीं तिथून समुद्ररेखा दिसू शकते. सूर्य अस्ताला जात असावा, उतरता उतरता तो क्षितिजाशी टेकावा, त्या क्षणी थेट पश्चिम क्षितिजाशी सूर्यप्रकाशानं चकाकणारं सागरजळ दिसतं. अनेकदां ते पाहिलंही आहे. अर्थ असा, की थेट समुद्रापासून रायगडावेरी कशाचीही अटक नाही. समुद्रावर गर्दी करून जमलेला मेघांचा समूह पूर्वेच्या दिशेनं चालून येवू लागला, की त्याला आढळतो रायगड. एखाद्या प्रचण्ड चौरंगासारखा. अन् मग तो असा बरसू लागतो की सांगता पुरवत नाही. लोटावर लोट चालून येतात. ते थांबतच नाहीत. येतात आणि गडाच्या माथ्यावर कोसळतात. त्यांच्याबरोबरच येते धुई. ती सगळा डोंगर आपल्या कवेत घेते. हातावरचं कांही दिसत नाही. अगदीं आपल्या नाकाचा शेंडादेखील.
त्या दिवसात धनगरं आपापल्या झापांमधून रानशेण्यांची शेकोटी करून तासन् तास तापत बसतात. इकडे पाऊस धुवांधार कोसळत असतो, तों तों धनगरं मात्र प्रसन्न होत असतात. कारण असा मोप पाऊस बरसला, की गड हिरवागार होणार असतो. त्याची म्हसरं अन् गावल्या भरपूर जोगावणार असतात. कासंड्या भरभरून दूध देणार असतात.
तर त्या धनगरांशेजारी बसून एकीकडे शेकत, दुसरीकडे त्याच्या चौकश्या करीत बसणं इतकं सुखाचं असतं, म्हणून सांगू! त्यांच्यापास हवा तेवढा वेळ असतो. ती मोकळी झालेली असतात. भरंवसा निपजलेला असतो, कीं हा परदेशी पाहुणा आपला मित्र आहे. सखा सुहृद आहे. असं अंतर हरपलेलं असतं. मग ती नाना परींचं बोलत असतात. सुखाचं. दु:खाचं. प्रापंचिक चिंतांचं. गाईम्हशींचं. त्यांच्या वेतांचं. दुधाचं. तें सगळं ऐकून वाटू लागतं, की आपण आपल्या भोंतीचा प्रपंच म्हणजेच सगळं विश्व असं गृहीत धरतो, ते किती चूक आहे! मात्र हे ध्यानी येण्यासाठींही असं त्यांच्या पोटात शिरावं लागतं. त्यांच्या मनी भरंवसा निपजूं द्यावा लागतो.
किंवा धर्मशाळेतल्या खोलींत चिप्प बसून असावं. नगारखान्याच्या ओवर्यात हात पाय पोटाशी घेवून बसावं. जगदीश्वराच्या देवळांत आसरा घेऊन पावसाचं चण्डनृत्य आनभवीत असावं. ध्यानी येवू लागतं, की पावसाच्या या धारानृत्यालाही एक ताल आहे. कधी तो धुमाळीचं बोट धरून बरसतो. कधी एकतालाच्या ठोक्यांत खाली उतरतो. कधी त्या धारांच्या त्रितालाचा ठेका सुरू असतो. चहुंकडून घेरून येणारं धुकट कुंद असतं. स्वत:वेगंळं काहीही दिसत नाही. कशाचंही भान नसतं. त्यात हा ताल असा कांही अंगी भरतो, की सांगता पुरवत नाही.
हळूं हळूं पाऊसधारा उणावू लागतात. धुकट विरूं लागतं. कमींत कमी दिवसांतले कांही तास तरी मग बाहेर पडावं. पायांतळी वाहाणारे इवलाले वहाळ वलांडीत चहूं दिशा भटकावं. टकमकावर जावं. दिसली, तर तळातली शोभा पाहावी. काळ दुथडी भरून वाहात असते. पुन: धुकटं झाकोळून येतात. मग माघारे वळून, पायांतळी सांचलेल्या डबक्यांतलं पाणी उडवत गंगासागरावरून बालेकिल्ल्यात शिरावं. नगारखान्याबाहेर पडावं, बाजारपेठेत शिरावं. पावसधारांनी काय कवतिक केलं आहे, ते ध्यानी येवू लागतं. तें पाणी भुईचं कवच भेदून आत शिरलं. कड्यांची आवरणं भेदून आत घुसलं. त्या कवचा-आवरणाखाली गतवर्षी उन्हाळ्यांत वाळून कोळ झालेली तृणबीजं सुरक्षित असतात. तें पाणी त्यांच्या भंवताली गोळा होतं. त्यांना गुदगुल्या होतात. ती फुगतांत. टरारतात. अंग ठसठसू लागतं. मग तें वरील बाजूनं फुटतं. एक नाजूक लवलवता कोंब बाहेर येतो. पोपटी रंगाचा. तो भुई-कडा भेदून वर उठतो. मोठ्या नवलानं भंवताल न्यांहाळू लागतों. एक. दुसरा. तिसरा. सहावा. दहावा. शंभरावा. हजारावा. अन् पाहतां पाहतां अवघं धरतीमंडळ हिरव्या सौंदर्यानं बहरून येतं. सगळे डोंगर, दरे, कडे, दरकुटं, ओघळी, घळी, लवणं असं सगळं चिरतरूण होऊन जातं.
महिन्या दीडमहिन्यात तृणपुष्पं आपले डोळे विस्मयानं उघडीत आकाश न्याहाळूं लागतात. सोनावळी धुमारते. तेरडा उंच उंच उठूं लागतो. त्याला कळे फुटतात. ती अनाम तृणपुष्पं, ती सोनावळी, ती तेरड्याची फुलं, असा काही विलक्षण रूपगौरव डोंगरभर दाटतो म्हणून सांगू! पायातळी असा वनपुष्पांचा गालिचा अंथरलेला असतो, आणि आपण विराण्या देशींच्या राजपुत्रासारखे त्या रूजाम्यावरून अवशेष धुंडाळीत हिंडत असतो...
********************************************************
वाचने
88748
प्रतिक्रिया
172
मिसळपाव
प्रतिक्रिया
दुर्गा भागवत
'पैस' हे फार थोर पुस्तक आहे.
In reply to दुर्गा भागवत by पांथस्थ
खामोशी की नदी - अमृता प्रीतम
धागा प्रचंड श्रीमंत होत चाललाय
वाह त्या कोवळ्या फुलांचा बाजार..
लेखक आणि पुस्तकाचे नाव द्याच
वेळ आणि परवानगी असल्यास अजुन
In reply to लेखक आणि पुस्तकाचे नाव द्याच by सुहास..
वेळ आणि परवानगी असल्यास अजुन टाकतोचेष्टा करतो काय..?? बिन्धास्त टाक!!! :-)सुहास उतार्यांबरोबर दुवे पण
In reply to वेळ आणि परवानगी असल्यास अजुन by मोदक
मिपाकर चित्रा मॅडमनी एके
In reply to लेखक आणि पुस्तकाचे नाव द्याच by सुहास..
अनेकदा आपल्या प्रिय व्यक्तीवर लोकांनी चुकीने, न समजता आरोप केलेले असतात असे आपल्याला वाटत असते. असे आरोप कधी खरे असतात, तर कधी नसतात, तर कधी गैरसमज असतात. कधी अशा व्यक्तींना शूर, किंवा उत्तम किंवा खुजे किंवा दुष्ट किंवा लबाड म्हणून सिद्ध करण्यासाठी म्हणून काहींनी त्यांच्याविषयी लंब्याचौड्या बाता मारलेल्या असतात. अशा आपल्याशी जोडलेल्या लोकांवरचे आरोप दूर करण्याची कधीकधी इच्छा होऊ शकते. जेव्हा ही व्यक्ती या काळात, जितीजागती, रक्ताच्या नात्याने जोडलेली अशी आपल्यासमोर असते किंवा आरोप दूर होण्याशी काहीतरी स्वार्थ जोडलेला असतो, तेव्हा असे आरोप दूर करणे एखाद्याच्या दृष्टीने निकडीचे असू शकते. मात्र जेव्हा अशी व्यक्ती ही अनेक पिढ्यांमागची, लांबची नातेवाईक असण्याची शक्यता असते, तेव्हा अशा काळाने, आहाराविचाराने दूरस्थ अशा व्यक्तीवरचे असे आरोप दूर झाले काय किंवा नाही झाले काय, आपल्या "खुद्द" स्वत:च्या सध्याच्या स्थितीत काहीही ढिम्म फरक पडणार नाही असे बहुदा दिसून येते. उगाच वेळ वाया का घालवा? भारतातल्या ऐतिहासिक गोष्टींत इतकी भेसळ झाली आहे की कशाचा कशाला पत्ता लागत नाही. या अशा कथांमधील भेसळीला दूर करून अशा कथेतील ऐतिहासिक सत्य काय असू शकते याचे थोडेफार अंदाज लावण्याचा प्रयत्न करता येऊ शकतो, पण तसा करण्याची गरज आहे का असा प्रश्न स्वतःलाच विचारावा.अमोल (जातीवंत भटका) चे एके काळचे गूगल स्टेटस.गड कसा पाहावा याचं एक तंत्र आहे. तो धावता पळता पहाता उपयोगाचा नाही. त्याची भौगोलीक पार्श्वभूमी, त्याचं नकाशातील स्थान, संरक्षणदृष्ट्या त्याचं महत्वं, त्याच्या जवळ असलेले घाट, मैदान, खिंडी, पठार, नद्या, ओढे, रणक्षेत्र, त्यावर चढायचे मार्ग, त्यावरून दिसणारा प्रदेश, त्या प्रदेशातील किल्ले, शिखरं, त्यांची मजबूती, त्यावरील पाण्याची ठिकाणं-हौद, तलाव, त्याचे तट, त्याचे बुरूज, त्याची प्रवेशद्वारं.... हे सगळं कसं नीट तपासलं पाहिजे, तरचं त्याचं महत्व ध्यानी येतं. धावता पळता किल्ला बघायला तो काही भोज्जा नव्हे !आजच व्यनीमधून मिळालेले डोस.. ;-)Effort is very important. But, knowing 'when', 'where', and 'how' to apply it, gets the results 'you want'आणखी पेस्टवतो आहे..रामदास काकांचा एक अशक्य
In reply to मिपाकर चित्रा मॅडमनी एके by मोदक
सीटला, टाकीला ओरखडे पडले /पडतात. याचा अर्थ बोका एकटा झोपत नाही.टाकीवर पुरेशी पकड (ग्रीप)न मिळाल्याने ओरखळे उठतात. काही दिवसानी ओरखळ्यांची नवलाई संपली की तो गपगुमान झोपून राहील. या बाबतीत दुय्यम स्वरुपाचे असे काही प्रश्न मनात येतात. तो झोपण्यापूर्वी वेगवेगळे आवाज काढतो का ? तसे असेल तर प्रकरण नविन आहे. आवाज नसेल तर भाटी जुनीच आहे असे समजा. सिटवर सकाळी केस मिळतात का ते बघा. कदाचीत भाटी येत नसेल पण बोका दाढी करत असेल .केस आढळले नाहीत तर तो बोका नसून भाटी आहे असे समजा .भाटी बोक्यापेक्षा वस्ताद असते आणि तिची नखे तिक्ष्ण असतात. नखांवरून भाटी आहे की बोका ते समजते. अंगपरीक्षा करावयाचा प्रयत्न करू नये.काहीवेळा गळ्यापर्यंत उडी मारून जुगुलर का काहीशा नावाची नस पकडते.जुगुलरचा आणि जुगण्याचा काही संबंध नाही.त्या नसा वेगळ्या . त्यांची नावे एखाद्या हुशार विद्यार्थ्याला विचारावी. पराचा अभ्यास बरा आहे असे म्हणतात बॉ. पूर्वी धम्याला पण मांजरी पाळण्याचा षौक होता म्हणे. पण त्याला नोकरी लागली .त्याखेरीज मिपावर एक कृष्णमार्जार प्रेमी नावाचा मुलग्या आहे. त्याला विचारा. तूर्तास त्या मार्जारावर लक्ष ठेवा . ते आत झोपले की वरून मच्छरदाणी घाला. नंतर सिटवर (गाडीच्या ) पाणी ओता. हे पाणी ओतण्यापूर्वी कोसला नावाची एक कादंबरी वाचा. त्यात मांजर हाकलण्या/पकडण्यासाठी एक आख्खा धडा आहे. ह्या धड्यामुळे ते लेखक अजूनही बोक्यासारखी मिशी ठेवतात. हां तर मी सांगत होतो ते पाणी ओतण्यासाठी .पाणी ओतले की कुत्र्याचा पण मूड जातो.पूर्वी असं काही आमच्या घराच्या समोर असं काही आलं की आमचा गडी पाणी ओतायचा ते आठवलं. हां तर मच्छरदाणी. काळ्या रंगाची नको. फार पूर्वी गिरणगावात एकाच रुम मध्ये दोन कुटुंब राहयची तेव्हा काळ्या मच्छरदाणीचा वापर केला जायचा. मांजराला संकोच नसतो. त्यामुळे पांढरी वापरली तरी चालेल. पाणे ओतल्यावर मार्जार बाहेर येईल .त्याची नखे मच्चारदाणीत अडकतील .मग मच्छरदाणीमें मांजर. त्यानंतर पुण्यात असाल तर लकडीपुलावर जा. लकडीपूल माहीती नसेल तर मिपावर एक लेख आला होता लकडीपूलाचा तो वाचा. तो वाचल्यावर तुमच्या लक्षात येईल की दुचाकी वाहनाला प्रवेश नाही. नो प्रॉब्लेम तुम्ही सरकारी नोकर आहात. तुम्हाला कोणीच प्रश्न विचारणार नाही. तुम्हाला प्रश्न पडला तर तर ....मिपावर पुढचा धागा टाका.:-)) :-)) :-))संपलो संपलो!!
In reply to रामदास काकांचा एक अशक्य by मोदक
खपलो
In reply to संपलो संपलो!! by आदूबाळ
ह पु वा
In reply to संपलो संपलो!! by आदूबाळ
इस्पीकचा एक्का
In reply to संपलो संपलो!! by आदूबाळ
भटक्याराव..
In reply to मिपाकर चित्रा मॅडमनी एके by मोदक
धन्यवाद मित्रा..
In reply to लेखक आणि पुस्तकाचे नाव द्याच by सुहास..
मैनें इक मां को, बिखरते हुए, टूंटते हुए देखा है...क्या बात है!
In reply to धन्यवाद मित्रा.. by चिगो
पाठपुरावा केला म्हणून कळलं...
In reply to मैनें इक मां को, बिखरते हुए, टूंटते हुए देखा है...क्या बात है! by बहुगुणी
चिगो हे कवीही आहेत तर म्हणजे!
In reply to धन्यवाद मित्रा.. by चिगो
ओतुरचं जग ('दीपावली' दिवाळी २००६)
अग्नी आणि पृथ्वी यांच्या धुंद
तुझ्या स्वाक्षरीतल्या
In reply to अग्नी आणि पृथ्वी यांच्या धुंद by किसन शिंदे
नदीच्या किनारी नदीला म्हणावे
In reply to तुझ्या स्वाक्षरीतल्या by इनिगोय
वा.. खासच हे कडवं पण..
In reply to नदीच्या किनारी नदीला म्हणावे by किसन शिंदे
व्वा, मोदकराव....
"शेवटी संस्कृती म्हणजे
पोपट - पाडगावकर
गीतकार- सुरेश भट, गायक - महेन्द्र कपूर--पूर्तता माझ्या व्यथेची..
इथले अनेक शब्दप्रभू अफाट लिहून जातात...
माझे अति आवडते...गुलजार -- यार जुलाहे
धन्यवाद हो, मैत्र!
In reply to माझे अति आवडते...गुलजार -- यार जुलाहे by मैत्र
कभी कभी बाज़ार में यूं भी हो
In reply to धन्यवाद हो, मैत्र! by बहुगुणी
सारा दिन बैठा मैं हाथ में
In reply to धन्यवाद हो, मैत्र! by बहुगुणी
सलाम
बा मोदका, फार्फार भारी आयडिया
रामप्रसाद बिस्मिल
__/\__
In reply to रामप्रसाद बिस्मिल by लॉरी टांगटूंगकर
आमीरच्या रंग दे बसंती मध्ये
In reply to रामप्रसाद बिस्मिल by लॉरी टांगटूंगकर
मस्त
In reply to रामप्रसाद बिस्मिल by लॉरी टांगटूंगकर
__/\__
In reply to रामप्रसाद बिस्मिल by लॉरी टांगटूंगकर
जबरदस्त रे..
In reply to रामप्रसाद बिस्मिल by लॉरी टांगटूंगकर
दुःखाच्या वाटेवर गाव तुझे
अरे वा! ही आली का इथे!
In reply to दुःखाच्या वाटेवर गाव तुझे by यशोधरा
+१.... उत्तम धागा!!
१. Specialization is knowing
टर्निंग पॉईंट प्रा. यशपाल
In reply to १. Specialization is knowing by बाळ सप्रे
हो.. त्यात वेगवेगळे
In reply to टर्निंग पॉईंट प्रा. यशपाल by आदूबाळ
उनकी याद करें…
मौनाची भाषांतरे
सुखांची यादी :-)
निव्वळ अप्रतीम!!!!!!!!!
In reply to सुखांची यादी :-) by दिपक
+१
In reply to निव्वळ अप्रतीम!!!!!!!!! by मोदक
क ड क!!
In reply to सुखांची यादी :-) by दिपक
कडक!!!!!!! लैच जब्री अणभव _/\
In reply to सुखांची यादी :-) by दिपक
टूटे हुए चूड़ियों से जोड़ूं ये
वाहवा..
In reply to टूटे हुए चूड़ियों से जोड़ूं ये by आदूबाळ
एकदा शांत वेळी हे गाणं लागलं,
In reply to वाहवा.. by इनिगोय
वाहवा..
In reply to वाहवा.. by इनिगोय
ही मूळ धून हिंदुकुशाच्या
In reply to वाहवा.. by किसन शिंदे
स्मरणे- शांता शेळके
मस्त धागा
शब्दक्रम
आमच्या आवडीचं येक...
आमचे मित्र, तत्ववेत्ते नि
क्या बात है !!!!!!!!
In reply to आमचे मित्र, तत्ववेत्ते नि by प्यारे१
+१
In reply to क्या बात है !!!!!!!! by लॉरी टांगटूंगकर
अध्ये मध्ये मोदकाने ही हे
In reply to क्या बात है !!!!!!!! by लॉरी टांगटूंगकर
अजून नाही..
In reply to अध्ये मध्ये मोदकाने ही हे by पिलीयन रायडर
पुरे झाले चंद्रसूर्य
.
.
In reply to . by मूकवाचक
विचार करायला लावणारे.
In reply to . by मूकवाचक
चुकली दिशा तरीही - विंदा
केवळ अप्रतिम; अविश्वसनीय
माझ्या काही अटी होत्या...
नदी सागरा मिळ्ता, पुन्हा
To Be or not to be That is
अंतुबर्वा
आताशा बुडणार्या सूर्याला
स्पॅमासुरांच्या हल्ल्यातही
ही कविता ऐकता, वाचताना दर
सन १८१८ नंतर मराठी