✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

कार्या लयात असताना.... ;)

अ — अत्रुप्त आत्मा, Sat, 05/25/2013 - 00:37
कोणत्याही मंगल कार्यालयात,भटजी म्हणून 'लग्न' लावायला जाणे ही एक आनंद दायक प्रक्रीया असते......पण केंव्हा??? तर भटजी त्याच्या स्वतःच्या यजमानातर्फे जातो तेंव्हा!!! हा एकमेव अपवाद सोडला,....तर .... कार्या लयाचा ''गुरुजी'' म्हणून रहाणे, केटरिंगवाल्याकडून लग्न लावायला जाणे, क्वचितवेळी व्हिडिओ शूटींग वाल्यांकडच्याही(लग्नाच्या ;) ) ''सुपार्‍या'' वाजविणे... असले जे काही ''जॉब-कार्ड'' संस्कृतितले प्रकार आहेत... ते मानवी मनाची कसोटी पाहाणारे असतात. अनेक ठिकाणी काहि कार्यालयं ही १ फॉरमॅट आखून काम करवून घेतात...तिथे त्रास नसतो..परंतू जी कार्यालय कस्टमर-पूजक प्रवृत्तीची असतात,तिथे मात्र गुरुजी हा प्राणी कार्यालयातल्या खुर्ची सारखाच यजमानांना त्या दिवसापुरता विकत अथवा भाड्यानी मिळालेला १ वस्तु विशेष असतो... ''कस्टमर-पूजक---मंगल-कार्यालयाचे गुरुजी'' हा टिळा आपण एकदा लाऊन घेतला की त्यापुढचे सर्व-काही सहन करण्याची शक्ति (आणी भक्ति) अंगात बाणवावीच लागते... आणी अश्या कार्यालयात गेल्यावर मग सुरु होते... .............................................

द ग्रेट गुरुजी-जोकर सर्कस

.......................................................... "कार्यालयाचा गुरुजी"म्हणजे कार्यालयाचा असतो नोकर त्याहुन खरं सांगायच तर सर्कशीतला अस्सल जोकर कधी घोड्यावर कधी रिंगणात यावा लागतो प्रत्येक खेळ जोकर नेहेमी तयार असता... यजमान चुकवतात त्याची "वेळ" ट्रॅफिकच्या त्या कारणांनिही त्यांची बाजू लाऊन धरतात पण उशिरा येऊन कार्या-लयात नुस्तेच खुर्चीत' येऊन बसतात तेव्हढ्यात त्यांना अठवण होते. आपल्या मुलीचं लग्न आहे. मुलगि खोलित जाऊन पहाता.. मेक-अप मध्ये मग्न आहे. मग...हा ही येतो, तो हि येतो जो येतो..गुरुजिंना धरतो जोकर वेळेवर "तयार"असुन उशीर का?...म्हणुन रागे भरतो. तेव्हढ्यात मुलगी कावरी बावरी धावत/पळत--स्टेजवर येते आवरा..उरका घाई करत यजमानस्वारी गुरुजिंना पिडते मग सर्कस सुरु होते एकेक कार्यक्रम पुढे जात एका हतात माइक धरून एस्कॉर्टिंग करताना दुखतो हात इकडून टोला तिकडून टोला चिडलात तरी हरि-नाम बोला तेव्हढ्यात गर्दी शांत झाली का???..तर म्हणे...नवरदेव आला सगळा खेळ संपता येतो जिवघेणा झोक्यांचा खेळ गुरुजी खालच्या 'जाळ्यात' पडून झुलवा/झुलवीचा साधतो मेळ असल्या सगळ्या सर्कशीत गुरुजिंचा खरच जोकर होतो. मला(ही) अठवतं एके-काळी मी कार्या-लयाचा नोकर होतो. ============================================================

प्रतिक्रिया द्या
4636 वाचन

💬 प्रतिसाद (20)

आता काय...

चौकटराजा
Sat, 05/25/2013 - 06:45 नवीन
आता गुर्जी तुम्ही जेके, डॉन यांच्या पदाला पोहोचले काय ? डायरेक्ट यजमानाचा डेटाबेस वाढलेला दिसतोय ! व्वा ! बाकी ते एस्कॉर्टच प्रशिक्षण वाया जाणार नाही. समानतेचं युग आहे. पुलंचे गुर्जी असते तर म्हणाले असते " पीड्या अरे शुद्धलेखन केलंयस की हगलायस... ?
  • Log in or register to post comments

@यजमानाचा डेटाबेस 'वाढलेला'

अत्रुप्त आत्मा
Sat, 05/25/2013 - 07:41 नवीन
@यजमानाचा डेटाबेस 'वाढलेला' दिसतोय ! व्वा ! --- अरे शुद्धलेखन केलंयस की हगलायस...?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौकटराजा

पुलंचे गुर्जी असते तर म्हणाले

प्रचेतस
Sat, 05/25/2013 - 09:05 नवीन
पुलंचे गुर्जी असते तर म्हणाले असते " पीड्या अरे शुद्धलेखन केलंयस की हगलायस... ?
काय हे काका, हे असं लिहून आपण एका कवीच्या कोमल मनाला किती डागण्या देत आहोत असं तुम्हांस अजिबातच वाटलं नाही का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौकटराजा

चतुर उत्तरे देतो अगोबा

अत्रुप्त आत्मा
Sat, 05/25/2013 - 09:30 नवीन
चतुर उत्तरे देतो अगोबा हळुच आग लावतो अगोबा दिसत्या छोट्या ठिणगी मध्ये फू फू फूंकर घालतो अगोबा :D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

अगगगग्गगगगगगा.

प्रचेतस
Sat, 05/25/2013 - 08:56 नवीन
Image removed.Image removed.Image removed. अगगगग्गगगगगगा. एका भटजीच्या मनाची व्यथा फारच प्रभावी शब्दांत तुम्ही मांडलीत.
  • Log in or register to post comments

राहिला काय एखादा

५० फक्त
Sat, 05/25/2013 - 23:57 नवीन
एका भटजीच्या - या दोन शब्दांमध्ये एखादा शब्द राहिला काय टंकायचा का संपादित केलाय ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

तुम्हाला 'खौट' हा शब्द

प्रचेतस
Sun, 05/26/2013 - 11:31 नवीन
तुम्हाला 'खौट' हा शब्द अभिप्रेत आहे काय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ५० फक्त

नाही एक पाच अक्षरी प्रचंड

५० फक्त
Mon, 05/27/2013 - 11:20 नवीन
नाही एक पाच अक्षरी प्रचंड ताकदवान शब्द आहे....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

व्यावसायिकी करण.

प्रभाकर पेठकर
Sat, 05/25/2013 - 09:37 नवीन
हम्म्म्म्म..! गुरूजी नांवाच्या जीवाचं व्यावसायिकीकरण झालेलं आहे.
  • Log in or register to post comments

अरारारारा!

पैसा
Sat, 05/25/2013 - 11:24 नवीन
म्हणूनच कोणीतरी म्हणतात ना, नोकरी करण्यापेक्षा स्वतःचा व्यवसाय करणं चांगलं! तस्मात, तुम्ही पण स्वतंत्र उद्योजक व्हा बघू!
  • Log in or register to post comments

मग 'हे' काय आहे?

अत्रुप्त आत्मा
Sat, 05/25/2013 - 11:47 नवीन
मग 'हे' काय आहे? हा हि उद्योगच झालाय "यजमानसमाधान दायक पुरोहित रोज-गार ;) योजना" =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

अआ,

संजय क्षीरसागर
Sun, 05/26/2013 - 15:29 नवीन
सगळा खेळ संपता येतो जिवघेणा झोक्यांचा खेळ गुरुजी खालच्या 'जाळ्यात' पडून झुलवा/झुलवीचा साधतो मेळ
म्हणजे नक्की काय?
  • Log in or register to post comments

त्याचा गद्यविस्तार करावा

अत्रुप्त आत्मा
Sun, 05/26/2013 - 19:17 नवीन
त्याचा गद्यविस्तार करावा लागेल... :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

वा ! झकास...

Bhagwanta Wayal
Sun, 05/26/2013 - 19:54 नवीन
वा ! झकास...
  • Log in or register to post comments

गुरुजी कार्यालयांच्या

प्रकाश घाटपांडे
Mon, 05/27/2013 - 08:21 नवीन
गुरुजी कार्यालयांच्या अनुभवांवर एकदा लिहा.आमचे एक नातेवाईक कार्यालयाचे मॅनेजर आहेत. ते म्हणतात कि लोकांना कार्यालयाची गरज आहे कार्यालयाला लोकांची गरज नाही अशी परिस्थिती आहे.
  • Log in or register to post comments

@लोकांना कार्यालयाची गरज आहे

अत्रुप्त आत्मा
Mon, 05/27/2013 - 09:58 नवीन
@लोकांना कार्यालयाची गरज आहे कार्यालयाला लोकांची गरज नाही अशी परिस्थिती आहे.>>> २०० टक्के खरं आहे... :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रकाश घाटपांडे

छान

सौंदाळा
Mon, 05/27/2013 - 10:03 नवीन
छान (मार्मिक) कविता लग्न, पुजा आदि समारंभातले किस्से पण तुमच्याकडुन स्वतंत्र लेखात वाचायला आवडतील. उदा. आम्ही एकदा लघुरुद्र करत असताना गुरुजींनी न्यास करायला सांगितले. (माझ्याकडे बघुन मी करतो तसे सर्व पुरुषांनी करा) त्यात अंगाभोवती चुटक्या वाजवुन नंतर टाळी वाजवुन प्राणायाम करायचा होता. गुरुजींकडे बघत बघत हे करताना मध्येच घामेघुम झालेल्या गुरुजींनी कमरेवर खाजवले आणि अजाणतेपणी एका माणसाने देखील त्याची पुनराव्रुत्ती केली आणि काही क्षणातच आपण काय केले हे समजल्यावर तो खजील झाला. तुमच्याकडे भरपुर स्टॉक असेल अश्या विवीध किश्श्यांचा तो येउ द्या.
  • Log in or register to post comments

@करताना मध्येच घामेघुम

अत्रुप्त आत्मा
Mon, 05/27/2013 - 10:10 नवीन
@करताना मध्येच घामेघुम झालेल्या गुरुजींनी कमरेवर खाजवले आणि अजाणतेपणी एका माणसाने देखील त्याची पुनराव्रुत्ती केली >>> =)) नशीब..............! =))
  • Log in or register to post comments

खरंच नशीब.

प्रभाकर पेठकर
Mon, 05/27/2013 - 18:37 नवीन
नशीब..............!
हे, 'नशीब गुरुजींनी कमरेवर खाजवले' असे वाचावे काय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

आपली इच्छा.......!

अत्रुप्त आत्मा
Mon, 05/27/2013 - 22:18 नवीन
आपली इच्छा.......! ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा