✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

वेदातील विज्ञान..........

म
मंदार कात्रे यांनी
Sun, 05/19/2013 - 20:06  ·  लेख
लेख
वेदातील विज्ञान समजून घेणे आणि आचरणात आणणे अगत्याचे आहे. अजूनही शोध न लागलेल्या कित्येक गोष्टींचे सांकेतिक उल्लेख वेदात असू शकतात . उदा. नुकतेच हाती आलेल्या वृत्तनुसार आता ,माऊस , voice यासोबत नुसत्या विचारानेही वेब सर्चिंग करता येईल ,असे संशोधन विकसित होत आहे. म्हणजे एक helmet डोक्यात घालायचे ज्यात electrodes बसवलेले असतील ,जे तुमच्या मेंदूतील विचारांचे electrical pulse किंवा brainwaves चे पृथक्करण /विश्लेषण करून तुम्हाला काय सर्च करायचे आहे,याचे प्रारूप बनवून त्यानुसार सर्च इंजिनला ते शोधायला सांगतील . हे तंत्र यापूर्वी computer games मध्ये वापरले गेलेले आहे . मला वाटते आपण आता कुठेतरी अध्यात्मातील telepathy किंवा तत्सम सिदधींच्या जवळपास पोहोचत आहोत . ज्यामध्ये फक्त विचारशक्तींचा वापर करून विविध कार्ये साध्य केली जातात. म्हणजे आध्यात्मने कित्येक हजारो वर्षापूर्वी जे सिद्ध केलेले आहे,तेच विज्ञान आता साध्य करू पहात आहे. प्रश्न हा आहे की आपण आध्यात्मिक ज्ञांनाची हेटाळणी थोतांड म्हणून करत राहणार की त्यातून काही बोध घेवून काही शोध लावणार ? http://en.wikipedia.org/wiki/Brain%E2%80%93computer_interface
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
31315 वाचन

💬 प्रतिसाद (126)

प्रतिक्रिया

+१

अनिरुद्ध प
Tue, 05/21/2013 - 19:24 नवीन
बॅटमॅन महाराज की जय!जय
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास

झकास आहे

मैत्र
Tue, 05/21/2013 - 21:55 नवीन
हेच वर संस्कृत बरोबर किंवा कोणी विचारायच्या आधी दिले असते तर अधिक आवडले असते..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

छान. किमान शब्दात कमाल आशय.

मराठीप्रेमी
Tue, 05/21/2013 - 23:47 नवीन
छान. किमान शब्दात कमाल आशय. पण या गोष्टी ज्यांना समजायला पाहिजेत त्यांना समजत नाहीत. ते तेच तेच दळण दळत बसतात. तिकडे बायबलवाले पण हेच करतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

सारांश दिलास ते फार बरं केलंस

महाबळ
Wed, 05/22/2013 - 01:55 नवीन
ते वाचल्यावर कळालं, आधि सगळं डोक्यावरुन गेलं होतं. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

@"वाल्गुदेयाच्या मुखाने

अत्रुप्त आत्मा
Wed, 05/22/2013 - 23:47 नवीन
@"वाल्गुदेयाच्या मुखाने पूर्वीचे ऋषी/कवीच जणू बोलत आहेत, की खोट्यानाट्या गोष्टींचा प्रचार करणारे लोक पापाचे धनी होतात. अर्धवट सत्य गोष्टी पूर्ण खर्‍या म्हणून दडपणारे लोक असत्य भाषणाच्या योगे नरकास जातात.">>> __/\__/\__/\__ या वाल्गुदेयाची वाणी,भासे जणू वेद वाणी आज सारे 'सत्य' जणू,प्र 'कटले' आपुल्या चरणी ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

साधु: साधु:

पैसा
Tue, 05/21/2013 - 18:38 नवीन
साधु: साधु: !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

जबरी रे बॅट्या.

प्रचेतस
Wed, 05/22/2013 - 08:32 नवीन
जबरी रे बॅट्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

वेद = ज्ञान

मदनबाण
Tue, 05/21/2013 - 16:35 नवीन
ह्म्म्म... चालु ध्या. ज्यांना या विषयात रस असेल त्यांच्यासाठी काही दुवे देवुन ठेवतो... Origin of Environmental Science From Vedas Science in Ancient India Vedanta and Quantum Physics Particles, Consciousness, Volition: A Vedantic Vision Vedic Knowledge and Quantum Mechanics Part - 1 जाता जाता :- बाकी गोमुत्रावरुन हंबरडा फोडणार्‍यासांठी एक वेगळी जुनी बातमी देतो... Cow urine drug developed by RSS body gets US patent
  • Log in or register to post comments

एक उपयुक्त दुवा

मूकवाचक
Tue, 05/21/2013 - 18:38 नवीन
Vedic Friends Association
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण

पण विज्ञान म्हणजे काय?

कवितानागेश
Tue, 05/21/2013 - 16:39 नवीन
पण विज्ञान म्हणजे काय? आणि प्रगती म्हणजे काय?
  • Log in or register to post comments

व्याख्या कशीही करा, त्याने

बॅटमॅन
Tue, 05/21/2013 - 16:42 नवीन
व्याख्या कशीही करा, त्याने काही फरक पडत नाही. एकदा व्याख्या हातात आली की वेदाच्या फूटपट्टीने हे सगळे आधीच मोजले होते असे सांगणे औघड नाही. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कवितानागेश

माउ हे वाच :-From Newton to

मदनबाण
Tue, 05/21/2013 - 17:21 नवीन
माउ हे वाच :- From Newton to Nirvana:Science, Vigyan and Gyan प्रगती म्हणजे काय? अधोगतीच्या उलट जे असते ते ! ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कवितानागेश

वेदाच्या फूटपट्टीने

अनिरुद्ध प
Tue, 05/21/2013 - 17:29 नवीन
वेदाच्या फूटपट्टीने ही कोणती नवी मापन पद्धत ? बट्ट मण्ण यान्चा नवा शोध.
  • Log in or register to post comments

कृपया येथे थोडा वेळ काढून पूर्ण विदिओ बघावा

खबो जाप
Tue, 05/21/2013 - 19:08 नवीन
http://www.youtube.com/watch?v=YrtANPtnhyg ह्याचा वेदांशी काही संबंध नाही आहे पण खूप इंत्रेस्तिंग गोष्ट आहे आणि महत्वाचे कि एका भारतीय माणसाने हे सध्या केले आहे पूर्ण विदेओ जरूर बघा प्रनव मिस्त्रि ज्यने हे सध्य केले आहे तो एका मुलाखतीत म्हणाला होता कि भारतीय पुराणे हि सायन्स फ़िच्कशन पेक्षा ज्यादा समृद्ध आहेत आणि त्याने त्यापासूनच प्रेरणा घेतली आहे ( http://www.youtube.com/watch?v=vaXTeEMi9PA)
  • Log in or register to post comments

भारतीय पुराणे हि सायन्स

मराठीप्रेमी
Wed, 05/22/2013 - 00:08 नवीन
भारतीय पुराणे हि सायन्स फिक्शन पेक्शा जास्त समृद्ध आहेत यात तर कोणालाच आक्षेप नसावा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खबो जाप

युनिट ?

प्रसाद गोडबोले
Wed, 05/22/2013 - 18:24 नवीन
ही समृध्दी कोणत्या युनिटमध्ये मोजतात ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठीप्रेमी

शोध सुरु आहे

अनिरुद्ध प
Wed, 05/22/2013 - 18:38 नवीन
शोध सुरु आहे,पुर्ण झाल्यावर जाहिर करण्यात येईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले

मग

प्रसाद गोडबोले
Wed, 05/22/2013 - 18:47 नवीन
मग जोवर संशोधन पुरण होत नाही तोवर हे विधान
भारतीय पुराणे हि सायन्स फिक्शन पेक्शा जास्त समृद्ध आहेत
कंजक्चर आहे असे मानुयात अन त्याच्या विषयी स्केप्टिकलच राहुयात !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनिरुद्ध प

नै म्हंजे कल्पनाशक्ती हा निकष

बॅटमॅन
Wed, 05/22/2013 - 18:48 नवीन
नै म्हंजे कल्पनाशक्ती हा निकष लावला तर काळाच्या मानाने पुराणे खतरनाक कल्पक मानावयास काहीच हरकत नसावी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले

अंहं

प्रसाद गोडबोले
Wed, 05/22/2013 - 19:00 नवीन
नॉट कन्व्हिन्सड .
काळाच्या मानने कल्पकता
अशी कशी तुलना करता येईल ? करायचीच असेल तर दोन्ही , पुराणे आणि सायन्सफिक्शन एकाच प्लॅटफॉर्मवर असले पाहिजेत . आता उदाहरणार्थ : मॅट्रीक्क्ष पिच्कर सत्यत उतरायला कदाचित १०००-२००० वर्ष अजुन लागु शकतील (कदाचित जास्तही ) आत्ताच ही सायन्स फिक्शन आपल्या पुराणाम्पेक्षा कमी संमृध्द आहे असे कसे म्हणता येईल ? We cannot compare two different things in two different & space time frame . मला म्हणायचे इतकेच होते की जे ते आपापल्या जागी संमृध्दच आहे ! पुराणे पुराणांच्या जागी अन सायन्सफिक्शन सायन्सफिक्शनच्या जागी !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

आत्ताच ही सायन्स फिक्शन

बॅटमॅन
Wed, 05/22/2013 - 21:31 नवीन
आत्ताच ही सायन्स फिक्शन आपल्या पुराणाम्पेक्षा कमी संमृध्द आहे असे कसे म्हणता येईल ?
अर्थातच, असा दावा करणे चूकच आहे.
We cannot compare two different things in two different & space time frame .
अशा गोष्टींची परस्परांशी केलेली तुलना पूर्णपणे वॉटरटाईट नसते हे मान्य. पण अशी तुलना करणे चूकच आहे असेही नाही. एंड रिझल्ट पाहिला तर इमॅजिनेशन तुल्यबळ आहे किंवा नाही हे पाहणे रोचक ठरावे. आणि ज्या काळात पुराणे लिहिली गेली त्या काळच्या प्रत्यक्ष भौतिक प्रगतीच्या तुलनेत ते इमॅजिनेशन नक्कीच डोळ्यात भरण्याजोगे आहे. जसे आत्ता आसपास तांत्रिक प्रगती पाहिली तर त्या तुलनेत साय-फाय खत्रा वाटते, तसे तेव्हा पुराणांतील गोष्टींबद्दलही वाटले असणारच. काही भाग हा आजही फ्यूचरिस्टिक वाटतो हे रोचक आहे असे माझे म्हण्णे.
मला म्हणायचे इतकेच होते की जे ते आपापल्या जागी संमृध्दच आहे ! पुराणे पुराणांच्या जागी अन सायन्सफिक्शन सायन्सफिक्शनच्या जागी !!
अर्थातच!! साय-फायमधल्या रिगरची तुलना पुराणांशी होऊ शकत नाही. पण काही भाग तरी स्टँड्स आऊट असं आपलं मला वाटतं, असो. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले

वैदिक विज्ञान दिन

श्रीनिवास टिळक
Fri, 05/24/2013 - 18:12 नवीन
२ ० ० ९ पासून श्री सतीश कुलकर्णी (satish.kulkarni@kpmi.biz) यांच्या मार्गदर्शनाखाली वैदिक विज्ञान दिन पुण्यात साजरा होत आहे. २ ० १ ० मी अनायासे पुण्यात होतो तेव्हा मुक्तांगण (सेनापती बापट मार्ग) येथे त्याला उपस्थित होतो. गेल्या तीन वर्षांपासून तो Ferguson College मध्ये होत आहे. मागील पाच वर्षात झालेल्या काही कार्यक्रमांची माहिती खाली देत आहे त्यावरून वेद आणि विज्ञान यांच्यामधील संबंधाबद्दल काही कल्पना यावी. Keynote addresses Dr. Shrinathan Chakravarthi, Dr. Vijay Bhatkar. Seminars: (1) Consciousness: scientific & Vedic perspectives with Dr. S. Gowarikar as chairman and Dr. Deepak Ranade (Neurosurgeon), Dr. S. R. Talghatti (Red. Prof. of Philosophy U.O.P.), and Dr. B.D. Kulkarni (Distinguished Scientist) as participants. (2) Relevance and acceptability of oriental sciences and technologies in present era.Participants included: Dr.Medha Dhurandhar, Dr.Ulrich Berk, Dr. A. S. Nene, Dr. S. Madavgane, Dr. Mangla Mirasdar, Dr. Vijay Didolkar, Dr. D.M. More (Ex Director General – Jal Sampada, Govt Of Maharashtra). (3) Policy on inducting Vedic science subjects in university curriculums. Participants included Dr. Vijay Didolkar, Dr. Chandragupta Varnekar, Dr Madangopal Varshne, Mr. Prafulbhai Pandya, Dr. Madan Gopal Varshney, Mr. Satish Kulkarni. Presentations: (1) Vedic science and modern technology: the relation between the two by Manuscriptologist Dr Shankar Nene. (2) Neuroscience & Yoga, an Indo-German project presentation By Dr. Sanjay Phadake & his research team; (3) Agnihotra: an Effective Remedy to Counter Nuclear Radiations by Dr Ulrich Burk Papers: Dr. Sudhakar Shasti: Vedic Technology to Produce Nano-Particles Dr. Anirudhha Joshi: Demonstration of Different Types of Pulse (Nadi) on Computer Screen Dr. Manohar Kotwal: Successful & Stress free management techniques as prescribed by ancient sages. Release of books by Prof Narayan Gopal Dongre of Benares Hindu University (1) Translation of Amshubodhini, which is a cosmological text dealing with the evolution of the universe, which began, it states, with a bindu visphuta or mahavisphuta (big bang). (2) Physics in Ancient India (New Age International Publishers, 1994) presenting the Hindu understanding of physics based mainly on the Vaisisika Darsana. It describes the methodology of science and elaborates the concepts of mechanisms, physics and chemistry in 17 Chapters and two Appendices.
  • Log in or register to post comments

रोचक माहीती

विकास
Fri, 05/24/2013 - 18:49 नवीन
माहिती खूपच रोचक आहे. आपल्याकडे यातील एखादे पुस्तक असेल तर त्यावरील माहिती-परीक्षण एक स्वतंत्र लेख म्हणून येथे द्यावेत ही विनंती.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीनिवास टिळक

विकास

अनिरुद्ध प
Mon, 05/27/2013 - 16:07 नवीन
आपण श्री श्रीनिवास टिळक यान्च्याशी सम्पर्क करुन वरिल विषयावर एक अभ्यासपूर्ण धागा निर्माण करावा हि विनन्ति.
  • Log in or register to post comments

वेद आणि विज्ञान परस्पर संबंध काही संदर्भ

श्रीनिवास टिळक
Tue, 05/28/2013 - 18:29 नवीन
(1) प्रा डोंगरे यांची पुस्तके डॉ शंकर नेने (चांदणी चौक, पुणे) यांच्याकडे उपलब्ध आहेत. मी त्यांना सुचविले आहे की त्यांनी मिपावर येउन त्याबद्दल अधिक माहिती द्यावी. (2) प्रा सुभाष काक (Head, Dept of Computer Science, Oklahoma State University, Stillwater, OK) आणि श्री सुबोध कुमार (Director Gosamvardhan Kendra, New Delhi ) यांच्या अनुमतीने वेद आणि विज्ञान या विषयावर त्यांनी लिहिलेल्या साहित्याचे दुवे खाली देत आहे. (3) गोसंवर्धन वरून एक आठवण झाली. वेदात प्रजापतीची शिकवण आहे की मानवाने पशु आणि पक्षी यांच्या सान्निध्यात निसर्गात एकोप्याने राहून उत्कर्ष साधावा (परस्परं भावयन्तः). तदनुसार श्रीमती शुभा राउळ या मुंबईच्या महापौर असताना (2007-2009) त्यांनी त्यांच्या दादरच्या राहत्या परिसरात एक गाय ठेवली होती. तसेच सध्या प्रचलित सहकारी गृहरचनांमध्ये गो सदनेही राखावी असं मत त्यांनी व्यक्त केलं होतं. (1) Writings of Prof Subhash Kak http://www.cs.okstate.edu/~subhashk/MindSelf.pdf http://www.ece.lsu.edu/kak/sutra.pdf http://www.cs.okstate.edu/~subhashk/THE%20NATURE%20OF%20PHYSICAL%20REALITY.pdf http://www.cs.okstate.edu/~subhashk/AstronomicalCodeRgveda.pdf Chapter 12 of this book discusses origins of Indian astronomy. (2) Writings of Shri Subodh Kumar (subodh1934@gmail.com )( संगणक तंत्रात फारशी गती नसल्यामुळे हा दुवा बरोबर आला नाही तर श्री सुबोध कुमार यांच्याशी परस्पर संपर्क साधावा) About GOSHALMilk for DelhiAS.doc 57K View Download big goshalas food courts.doc 37K View Download
  • Log in or register to post comments

धन्यवाद,

अनिरुद्ध प
Tue, 05/28/2013 - 19:48 नवीन
वाचन करत आहे,महिती बद्दल आभार
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीनिवास टिळक
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा