✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

वेदातील विज्ञान..........

म
मंदार कात्रे यांनी
Sun, 05/19/2013 - 20:06  ·  लेख
लेख
वेदातील विज्ञान समजून घेणे आणि आचरणात आणणे अगत्याचे आहे. अजूनही शोध न लागलेल्या कित्येक गोष्टींचे सांकेतिक उल्लेख वेदात असू शकतात . उदा. नुकतेच हाती आलेल्या वृत्तनुसार आता ,माऊस , voice यासोबत नुसत्या विचारानेही वेब सर्चिंग करता येईल ,असे संशोधन विकसित होत आहे. म्हणजे एक helmet डोक्यात घालायचे ज्यात electrodes बसवलेले असतील ,जे तुमच्या मेंदूतील विचारांचे electrical pulse किंवा brainwaves चे पृथक्करण /विश्लेषण करून तुम्हाला काय सर्च करायचे आहे,याचे प्रारूप बनवून त्यानुसार सर्च इंजिनला ते शोधायला सांगतील . हे तंत्र यापूर्वी computer games मध्ये वापरले गेलेले आहे . मला वाटते आपण आता कुठेतरी अध्यात्मातील telepathy किंवा तत्सम सिदधींच्या जवळपास पोहोचत आहोत . ज्यामध्ये फक्त विचारशक्तींचा वापर करून विविध कार्ये साध्य केली जातात. म्हणजे आध्यात्मने कित्येक हजारो वर्षापूर्वी जे सिद्ध केलेले आहे,तेच विज्ञान आता साध्य करू पहात आहे. प्रश्न हा आहे की आपण आध्यात्मिक ज्ञांनाची हेटाळणी थोतांड म्हणून करत राहणार की त्यातून काही बोध घेवून काही शोध लावणार ? http://en.wikipedia.org/wiki/Brain%E2%80%93computer_interface
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
31315 वाचन

💬 प्रतिसाद (126)

प्रतिक्रिया

(एकाच बॅटरीपॅकवर वेगवेगळा

३_१४ विक्षिप्त अदिती
Wed, 05/22/2013 - 19:40 नवीन
(एकाच बॅटरीपॅकवर वेगवेगळा अवरोध असणारी/वेगळं वॉटेज आवश्यक असणारी उपकरणं वापरायची असतील तर) mAh पेक्षा W-h हे एकक अधिक माहिती देणारं, पर्यायाने अधिक उपयुक्त आहे. व्यवहारात याची फार आवश्यकता नसते हे मान्य. (इलेक्ट्रिकल सर्कीट्सशी खेळून बरीच वर्ष झाली आहेत. चूभूदेघे)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनिरुद्ध प

ठराविक बॅटरी पॅकमधून किती

३_१४ विक्षिप्त अदिती
Wed, 05/22/2013 - 19:17 नवीन
ठराविक बॅटरी पॅकमधून किती पावर तासाला मिळेल ते kW·h (किंवा W·h) मधे रूपांतरीत करतात ...
यातून चुकीचा अर्थ निघतो आहे. ठराविक बॅटरी पॅकमधून ठराविक लोडचं उपकरण किती तास/काळ चालेल हे ठरवताना नॉमिनल काही अवरोध (resistance) किंवा उपकरणाला लागणारं व्होल्टेज पकडून गणितं केली जातात. चूक लक्षात आणून देण्याबद्दल नितिनचे आभार.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

चूक लक्षात आणून देण्याबद्दल नितिनचे आभार.

अनिरुद्ध प
Wed, 05/22/2013 - 19:35 नवीन
येथे नितिन यान्चे स्पष्टिकरण दिसत नाही आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

चूक लक्षात आणून 'तिकडे'* झालं

३_१४ विक्षिप्त अदिती
Wed, 05/22/2013 - 19:43 नवीन
चूक लक्षात आणून 'तिकडे'* झालं. स्पष्टीकरण मीच दिलंय की इथे. * जुन्याजाणत्यांना 'तिकडे' याचा अर्थ समजला असेलच. अर्थ लक्षात नाही आला तर वेदात आहे असं समजून टाकू! हाय काय नाय काय!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनिरुद्ध प

mAh चे kWh मध्ये रुपांतर

सुबोध खरे
Wed, 05/22/2013 - 19:29 नवीन
http://www.ehow.com/how_6147644_convert-amp-hours-kilowatt-hours.html
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठीप्रेमी

आउटकम...

विकास
Wed, 05/22/2013 - 20:59 नवीन
नुसतेच फिदीफिदी हसण्यापेक्षा विज्ञानाच्या पातळीवर चर्चा होत आहे, हे तुमच्याशी चालू असलेल्या उपचर्चेचे एक चांगले आउटकम आहे असे वाटते. :) अजून काही उत्तरे. (पण त्याआधी परत एकदा डिसक्लेमरः हे गोमूत्र ग्रेट आहे का, गोमाता की जय, वेदांमधे लिहीले आहे का वगैरे कशाशीही संबंधीत नाही. केवळ आपल्याला जे पटत नाही अथवा पटते त्या संदर्भात अर्थ लावताना कसा अर्थहीन विचार करत असतो याचे उदाहरण आहे - नाण्याची दुसरी बाजू. जशी वेदांची झिंग असू शकते तशीच विज्ञानाची देखील असू शकते. दोन्हीमुळे त्यांच्यातील जे काही चांगले असते त्याची विश्वासार्हता जात असते, इतकाच काय तो निष्कर्ष!) पण ४०० gram electrolyte असणारी बॅटरी असुन असुन किती मोठी असेल? ही बाजारात उपलब्ध असणारी ~११०० W.Hr ची बॅटरी, तुम्ही दाखवत असलेला ११०० W.Hr चा खोका (बॅटरी) आणि १२०० W.Hr गोमूत्र बॅटरीचा खोका ह्यांची चित्रे खाली डकवत आहे. त्यात काही फरक दिसतो आहे का? आधीच्या प्रतिसादात दिलेल्या सरकारी प्रेझेंटेशनमधील बॅटरीच्या खोक्याचा आकार ((पृ. ४)देखील बघू शकता... (दोन्ही पिक्चर्सच्या साईझ मधे फरक असला तरी तुलना करता येऊ शकेल.) Image removed. Image removed. बातमीत अथवा सरकारी प्रेझेंटेशनमधे कुठेही गोमूत्राची बॅटरी ही काही हँडहेल्ड डिव्हाईस आहे अथवा हलकी-फुलकी आहे असे लिहीलेले नाही. त्यामुळे नक्की तुम्हाला गोमूत्राची बॅटरी म्हणजे काय वाटले म्हणून पुढे १० किलो वजन, भविष्यातले ५०० ग्रॅम वजन वगैरे लिहीले आहे? त्याचा काही संबंधच कळला नाही. तरी देखील वादापुरते गृहीत धरूया की तुम्ही म्हणता ते खरे आहे. त्यावरून तुम्ही ते होक्स आहे असा निष्कर्ष कसा काय काढलात? त्यात त्याची किंमत दाखवली असली तरी काही विकण्यासाठी प्रयत्न केलेला दिसला नाही अथवा गोमाता / आमचे पूर्वज वगैरे म्हणले गेलेले दिसले नाही.... रामर पिल्लईच्या बाबतीत ज्याचे तुम्ही उदाहरण दिले आहे, त्याने फसवले होते म्हणून सीबायने त्याला अटक देखील केली होती. म्हणूनच मी गो-ज्योतीच्या संदर्भात सरकारी प्रेझेंटेशन देखील दाखवले. (नाहीतर "असले" संदर्भ देखील देता आले असते. ;) ) येथे, जर तुमचे म्हणणे बरोबर आहे असे गृहीत धरले तर फार फार तर "तांत्रिक माहितीच्या अभावे चूका किंवा अवास्तव दावे" असे म्हणू शकता.
तुमचा उरलेला मुद्दा हा त्या प्रेझेंटेशन मधे आणि बातमीतील माहिती आणि शब्दांवर आहे... त्या संदर्भात
ते प्रेझेंटेशन हे केवळ पब्लीक आउटरीच वाटली. टाईम्स ऑफ इंडीयातील बातमी तर काय वृत्तपत्रातील बातमी आहे. त्याला तुम्ही वैज्ञानिक शोधनिबंधांचे निकष कसे लावता? (तरी देखील आपल्याकडे कशा बातम्या देतात या बद्दल आपल्या दोघांमध्ये असहमती आहे असे वाटत नाही.) एकतर अगदी सामाजीक आणि राजकीय बातम्या पण धड दिल्या जात नाहीत तेथे पत्रकाराने जर तुम्हाला वाटणार्‍या योग्य भाषेत बातमी दिली नाही तर त्यातून ज्यांनी कोणी प्रकल्प केला आहे त्यांची विश्वासार्हता कशी काय ठरवता? त्याही पुढे तुमचा आक्षेप हा "... volts of electricity ने काहीच उपयुक्त माहिती मिळत नाही" असा आहे... तो मान्य असला तरी सर्वसामान्यांना बातमी देत असताना टाईम्सच काय अगदी सायंटीफिक अमेरीकन पण " It's packing a deadly 5,000 volts of electricity." असली वाक्यरचना करताना आढळतात. तेच बीबीसी, न्यूयॉर्क टाईम्स, टाईम मॅगझीन वगैरे मधे पण दिसते. पण त्यावरून, ज्यासंदर्भात लेख लिहीला आहे त्यासंदर्भालाच रदबादल करणे काही पटत नाही. "डेंजर हाय व्होल्टेज" अथवा "डेंजर २२० व्होल्ट्स" वगैरे मधून जे समजले जाते तसेच (तितके नसले तरी) जेव्हढे सामान्य वाचकांना समजायला हवे तितक्या सोप्या पद्धतीने लिहायचा तो प्रकार आहे. त्या दृष्टीने मिसळपाववर आदी संस्थळांवर लिहीणे आणि वृत्तपत्रात लिहीणे यात फरक नाही आहे कारण ते सर्वसामान्यांसाठीच असते. म्हणूनच अगदी शास्त्रीय संशोधनावरील वृत्तपत्रीय बातमीत देखील सायंटीफिक व्हर्बोज नसते... "10 volts of electricity" किंवा "five wall clocks and a zero watts bulb can be operated simultaneously" यासारखी lousy वाक्ये scientific community मध्ये विश्वासार्हता घालवतात आणी वर म्हटल्याप्रमाणे लांडगा आला रे आला होतं. बातमी ही केवळ घटनेबद्दल असते, माहिती ही त्यातील डिटेल्स असतात. जर सायंटीफिक कम्युनिटी ही सायन्सवरील माहिती टाईम्स ऑफ इंडियावरील बातमी अथवा निव्वळ फेसबुकावरून वरून ठरवत असेल तर सर्वप्रथम सायंटीफिक कम्युनिटीचीच विश्वासार्हता किती असा प्रश्न विचारण्याची वेळ येईल. जर खरेच कोणी सायंटीफिक विचारांचे असले आणि त्यांना यात खरेच रस असेल तर निव्वळ लांडगा आला रे म्हणल्यावर, "थापच असणार" असे म्हणणार नाही तर त्यातील व्यावहारीकता पडताळून पाहून बाजूने अथवा विरुद्ध लिहीतील (जे तुम्ही करत आहात), जे योग्य आहे. नुसतेच करमणूकीचे साधन समजणार नाहीत. पण दुर्दैवाने तसे होते आणि जे काही लोकशिक्षण झाले पाहीजे ते होत नाही शिवाय सायन्सची पण विश्वासार्हता कमी होते ते वेगळेच.. असो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठीप्रेमी

तुमच्या डिसक्लेमर विषयी :

मराठीप्रेमी
गुरुवार, 05/23/2013 - 11:20 नवीन
तुमच्या डिसक्लेमर विषयी : याची खरतर गरज नाही. तुमच्या एकंदरीत प्रतिक्रिया वाचून ते बर्‍यापैकी स्पष्ट आहे. पुढे जाण्याआधी एक मुद्दा हातावेगळा करतो. टाईम्स मधील बातम्यांची एकंदरीत विश्वासार्हता वगैरे बाबतीतली आपली मते मान्य आहेत. बातमीला शोधनिबंधांचे निकष लावू नयेत हे मान्य. "जर सायंटीफिक कम्युनिटी ही सायन्सवरील माहिती टाईम्स ऑफ इंडियावरील बातमी अथवा निव्वळ फेसबुकावरून वरून ठरवत असेल तर सर्वप्रथम सायंटीफिक कम्युनिटीचीच विश्वासार्हता किती असा प्रश्न विचारण्याची वेळ येईल." हे सुद्धा मान्य, परंतू या स्वरूपाच्या बातम्या वाचून हे काम करणारे नक्की किती पाण्यात आहेत याचा एक अंदाज नक्की बांधता येतो. आता जर त्या व्यक्ती माहितगार नसतील असे वाटले तर त्या अज्ञानातून तसे वागत आहेत का काही सुप्त malicious intent ने तसे वागत आहेत याचा अंदाज बांधणे / शोधणे हा नंतरचा भाग झाला. यात कुठे किती rigor योग्य हा थोडा वैयक्तिक मताचा भाग आहे. माझी तुमच्यापेक्षा जास्त rigor ची अपेक्षा आहे असे एकंदरीत चर्चेवरून दिसत आहे. Lets agree to disagree here (unless you want to continue). आता मी मुळ मुद्द्याकडे येतो, FB post मधले दावे मला hoax का वाटतात या कडे. मला बहुतेक बर्‍याच गाळलेल्या जागा भरण्याची गरज आहे. मी माझी एकंदरीत विचारप्रक्रिया स्पष्ट करण्याचा प्रयत्न करतो. गोमुत्रापासून वीज हे मी या धाग्यावर पहिल्यांदा वाचले. या धाग्यावर त्याचा पहिला उल्लेख आला तो आदिती ने fb post दिली तेव्हा, त्याआधी असे काही आहे याची मला कल्पना नव्हती. तुमचा प्रतिसादही तोपर्यंत आला नव्हता. मला ती post प्रचारकी थाटाची वाटली. त्यात जर त्यांनी गोमुत्रापासून वीज बनवण्यात यश मिळाले आहे इतकाच उल्लेख केला असता तर मी फार जास्त लक्ष दिले नसते, फारफारतर they are reinventing the wheel असे म्हणून दुर्लक्ष केले असते. पण खालील दोन वाक्यांनी माझ्या डोक्यात alarm वाजले. "400 ग्राम गोमूत्र की बैटरी से 3 वाट का बल्ब 400 घंटे तक जलाया जा सकता है" आणी "तोषनीवाल ने दावा किया है की बिजली से चार्ज होने वाली बैटरियां 5-6 घंटे तक ही काम करती हैं, जबकि गौ- ज्योति बैटरी 400 ग्राम गो-मूत्र से 400 घंटे तक चलती है" ही दोन वाक्ये मला अतिरंजित वाटली. या स्वरुपाच्या बर्‍याच गोष्टी (free energy, perpetual motion etc) मी याआधी बघितल्या आहेत, म्हणुन मी काही order of magnitude calculations केली आणी मला खात्री पटली की हे दावे चूकीचे आहेत. आणी ज्या fb page वर ती post होती ते बघून त्यांना संशयाचा फायदा द्यावासा वाटला नाही. ती fb post मुद्दाम खोडसाळ हेतूने लिहीलेली आहे असा मी माझ्यापुरता निष्कर्ष काढला. माझी order of magnitude calculations मी खाली थोडे अजुन खोलात जाऊन देतोय जेणेकरुन मला हा निष्कर्ष का काढावासा वाटला ते तुम्हाला समजेल. दावा असा आहे की त्या बॅटरीचे व्होल्टेज १२V असून बॅटरी ३W power ४०० तास पुरवू शकते, थोडक्यात, ०.७५ A current (3W/12V). मला जी काहि माहिती आहे त्यानुसार मी खालील गणित केले. १) zinc आणी copper वापरुन जो cell बनतो त्याचे voltage ~ 1V असते, थोडेसे कमीच, पण आपण 1V पकडून चालू. 12 V साठी असे किमान 12 cells parallel configuration मध्ये लागतील. २) प्रत्येक cell 400 तासांसाठी 0.75A current पुरवेल. थोडक्यात, total charge = 0.75A*(400*3600)seconds = 1080000 Coulomb. ३) आता, एक Coulomb म्हणजे ~6.24*10^18 electrons, म्हणून 1080000 Coulomb = 6.74*10^24 electrons. zinc चा एक अणु २ electrons देतो, म्हणजे 6.74*10^24 electrons साठी 3.37*10^24 zinc चे अणु लागतील. ४) Avogadro's number वापरुन zinc चे वस्तुमान सहज काढता येइल. ते येते जवळपास ३६० grams. आणी हे 1V च्या cell साठी. 12V साठी जवळपास 4.5 Kg zinc electrolyte मध्ये dissociate व्हावे लागेल. ५) आता यात अजुन एक मजा आहे, electrolyte मध्ये Zn च concentration वाढले तर ते voltge कमी करतात कारण solid zinc मधून ions dissociate होणे कठिण होत जाते. म्हणजेच 4.5 Kg zinc solution मध्ये आल्यानंतर देखील त्या solution चे concentration moderate राहीले पाहीजे. यासाठी कदाचीत १०० ते १००० liters electrolyte लागेल (मला नक्की माहीत नाही पण या range बद्धल खात्री आहे). infact, या प्रक्रियेत जवळपास २.५ liter पाण्याचे विघटन होउन एक छानसा स्फोट होइल इतका hydrogen तयार होइल. ४०० gram गोमुत्राने काही होणार नाही. आता "गोमुत्रापासून वीज" या मथळ्याखाली जर मी असा अवास्तव दावा सगळ्यात पहिल्यांदा वाचत असीन तर परत कधी "गोमुत्रापासून वीज" असे वाचले तर पुर्ण analysis न करता मी तो दुसरा दावा टाकाउ ठरवला तर दोष माझा कि अवास्तव दावा करणार्‍यांचा? तुम्ही दिलेले बाकी दुवे वाचून अस वाटतय की एखादा छोटा दिवा लावण्याइतपत गोष्टी लोकांनी केल्या आहेत. आणी ते मान्य आहे. पण त्यापेक्षा फार जास्त दावे कोणी करत असेल तर ते hoaxच आहेत. मी बाकी बॅटरीचे जे काही details दिले होते त्यात पण वर दिल्याप्रमाणे काही order of magnitude comparison शक्य होत म्हणून दिले होते, आता details देत नाही, प्रतिसाद फारच लांबलाय. पण याची पार्श्वभूमी नसताना हे करणे शक्य नाही, त्यामुळे ती माहिती का दिली आहे हा प्रश्न पडणे वाजवी आहे. मला बर्‍याचदा काही गोष्टी माहीत असताना ज्याला माहीत नाही त्याच्या दृष्टिकोनातून विचार करायला त्रास होतो आणी नंतर गाळलेल्या जागा भरायला लागतात. यात गोमुत्र फक्त electrolyte चे काम करते, त्याजागी इतर कोणतेही electrolyte वापरता येइल हे तर या चर्चेत सहभागी झालेल्या सर्वांना मान्य आहे. मग दुसरे कोणते electrolyte वापरून zinc-copper cells बाजारात का मिळत नाहीत? कारण ते feasible नाहिये. zinc-copper cells वापरून एक 3W चा दिवा १५ दिवस चालू ठेवण्याची किंमत जवळपास ४५० रुपये होइल आणी प्रचंड प्रदूषण होइल (dissolved zinc मुळे). प्रामाणिक हेतूने काम करणार्‍या लोकांना ते एकदा proof of concept च्या पायरीपुढे गेले की हे स्वतःहून समजेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास

_/\_ _/\_

बॅटमॅन
गुरुवार, 05/23/2013 - 14:52 नवीन
_/\_ _/\_ तुस्सी ग्रेट हो निव्वळ. मराठीप्रेमी आणि वस्तुनिष्ठ असा आयडी करा बघू तुमचा!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठीप्रेमी

०.७५ A current (3W/12V).

अनिरुद्ध प
Fri, 05/24/2013 - 19:17 नवीन
आपले गणीत कळले नाही. P=V*I हे सुत्र वापरले तर I=P/V म्हणजेच 3/12=1/4=.0.25A ईतका current consume होइल,आपण 0.75A हे कसे calculate केले हे कळ्ले नाही म्हणुन हा प्रश्न प्रपन्च.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठीप्रेमी

धन्यवाद. घाईगडबडीत चूक झाली.

मराठीप्रेमी
Fri, 05/24/2013 - 19:56 नवीन
धन्यवाद. घाईगडबडीत चूक झाली. ०.२५ बरोबर आहे. त्यामुळे पुढे पण सर्व ठिकाणी ३ ने भागावे लागेल, आणी १.५ Kg zinc लागेल असे उत्तर येइल. त्यामुळे फारसा फरक पडत नाही कारण हा आकडा पण दाव्याच्या कित्येक पटीने जास्त आहे. अवांतर : तुम्ही चूक शोधल्यामुळे बरे वाटले. निदान कोणीतरी रस घेउन माझा प्रतिसाद वाचला याचे समाधान.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनिरुद्ध प

असं नै हां...मी पण लक्ष देउन

शिल्पा ब
Fri, 05/24/2013 - 22:03 नवीन
असं नै हां...मी पण लक्ष देउन वाचला तुमचा प्रतिसाद. टेक्नीकल गोष्टी माहीत नाहीत ही वेगळी गोष्ट !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठीप्रेमी

तुम्हालाही धन्यवाद हं.

मराठीप्रेमी
Sat, 05/25/2013 - 03:09 नवीन
तुम्हालाही धन्यवाद हं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शिल्पा ब

+/-

विकास
Fri, 05/24/2013 - 20:43 नवीन
Lets agree to disagree here (unless you want to continue). सहमत परंतू या स्वरूपाच्या बातम्या वाचून हे काम करणारे नक्की किती पाण्यात आहेत याचा एक अंदाज नक्की बांधता येतो. अंदाज मी सुद्धा तुमच्यासारखाच काढला होता. किंबहूना आधी मी फेसबुकावरील ते हिंदी वाचायचा प्रयत्न देखील केला नाही, असल्या बातम्या दुर्लक्ष करण्यासाठीच असतात आणि मी दुर्लक्षच करतो. पण नंतर जेंव्हा त्यावर अधिक चर्चा दिसली तेंव्हा उत्सुकतेपोटी जास्त पाहू लागलो. पण त्यावर आधारीत मी अंदाज बांधला, निष्कर्ष काढला नाही. आणि अजूनही मी निष्कर्ष काढलेला आहे असे म्हणणार नाही. केवळ हे असू शकते, इतकेच म्हणत राहीलो आहे. (माझा सर्वात प्रतिसाद देखील पाहीलात तरी त्यातील पहील्याच वाक्यात मी ते स्पष्ट केले आहे. "होक्सेस नसावे असे टाईम्स मधील बातमी वाचल्यावर वाटले... ") त्यानंतर देखील मी जे काही लिहीले आहे ते फेसबूक पोस्ट विषयी लिहीण्याऐवजी असा प्रकल्प होत असेल का या संदर्भात लिहीले आहे आणि ते होक्स नाही हे देखील दाखवले आहे. खाली श्री. नितिन थत्ते यांना दिलेल्या प्रतिसादातील एक भाग जर वाचला नसेल तर येथे चिकटवतो: हे अजून एक गोमूत्रावरील उदाहरण... (अवांतरः हा प्रकल्प देशपांडे फाउंडेशन ने फंड केला आहे. (माझ्याशी संबंध नाही). हे स्वत: देशपांडे सध्या बॅटरीच्या संदर्भातील बॉस्टनमधील एका कंपनीचे अध्यक्ष आहेत आणि गुंतवणूकदार ही आहेत.) यात अथवा इतरत्र कुठेही गोमूत्र म्हणजे गो माता वगैरे कसलाही संदर्भ मी पाहीलेला नाही. त्या मधे सरकारी संस्था आणि स्थानिक महाविद्यालये पण संशोधन/प्रयत्न करताना दिसतात. त्यातही अजून एक गंमत म्हणजे, सरकारी प्रेझेंटेशनमधे लिहील्याप्रमाणे, ही बॅटरी वापरून वीज वापरल्यास कार्बन क्रेडीट्स पण मिळतात! त्यात बरोबर-चूक असू शकते या बद्दल कदाचीत संशोधन करणारे देखील वाद घालणार नाहीत... पण त्यातील हेतू केवळ गोमाताप्रचार आहे, असे कुठेही आढळलेले नसताना निष्कर्ष काढणे हे समाजशास्त्रीय दृष्टीकोनातून अयोग्य वाटते आणि सुरवातीपासून माझा इतकाच मुद्दा आहे. असो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठीप्रेमी

पण त्यातील हेतू केवळ

मराठीप्रेमी
Sat, 05/25/2013 - 03:08 नवीन
पण त्यातील हेतू केवळ गोमाताप्रचार आहे, असे कुठेही आढळलेले नसताना निष्कर्ष काढणे हे समाजशास्त्रीय दृष्टीकोनातून अयोग्य वाटते आणि सुरवातीपासून माझा इतकाच मुद्दा आहे.
याच्याशी सहमत आहे. काय झाल की यासंदर्भातील पहिला प्रतिसाद आपण दोघांनीही वाचला आणी त्यावर दोघांचीही प्रतिक्रिया वेगळी होती. मी काही मिनीटांतच त्याला hoax चे label लावून मोकळा झालो, तुम्ही बाकी काही संदर्भ शोधलेत आणी तुम्हाला ते थोडेफार तरी विश्वासार्ह वाटले. मला मात्र तुमच्या प्रतिसादातले संदर्भ तपासण्याची गरज वाटली नाही, मी तेसुद्धा तसेच झिडकारून टाकले. थोडक्यात माझे लांडगा आला रे आला सारखे झाले. वरील प्रतिसाद हे केवळ आपल्या दोघांची विचारप्रक्रिया नक्की कशी वेगळी होती आणी माझे नक्की कोणत्या कारणामुळे आणी कोणत्या वेळी लांडगा आला रे आला सारखे झाले ते स्पष्ट व्हावे केवळ यासाठीच होते. ते जर स्पष्ट केले नसते तर कदाचित मलासुद्धा "वेद किंवा गोमुत्र इत्यादी शब्दांची allergy असणारा" या साच्यात बसवले गेले असते. देशपांडे फाउंडेशन विषयी : मी तो प्रतिसाद वाचला होता. देशपांडे फाउंडेशन विषयी मला फार माहिती नाही पण माझ्या मते त्यांची उद्दिष्टे थोडी वेगळी असावीत. अशा प्रकारचे प्रयोग, किंवा अशी विज्ञानप्रदर्शने यांची उद्दिष्टे थोडी वेगळी असतात असे वाटते (mostly human capacity development). या प्रतिसादात यावर अधिक भाष्य करत नाही, जर अजुन काही संदर्भ मिळाले ( फक्त देशपांडे फाउंडेशन नाही, तर इतरही असे उपक्रम) तर पुढील आठवडयात एक लेख अथवा चर्चाप्रस्ताव टाकीन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास

लोक का (फिदीफिदी) हसतात?

नितिन थत्ते
Wed, 05/22/2013 - 08:39 नवीन
याचे उत्तर बहुधा "गो"मूत्राचे फाजील स्तोम हे असावे. गोमूत्रातून वीजनिर्मिती होईल की नाही यात कोणालाच शंका नाही. असे जरी असले तरी तशी वीज निर्मिती कुणाच्याही मूत्रातून (कुठल्याही न्यूट्रल नसलेल्या द्रावातून) होईल हे ही उघड आहे. किंबहुना (पाण्याचा इनटेक कमी > जास्त ष्ट्राँग मूत्र असल्याने ) उंटाच्या मूत्रातून अधिक वीजनिर्मिती होऊ शकेल. या गोष्टींकडे डोळेझाक करून सदर पोस्ट/ढकलपत्रे तयार करणार्‍यांचा (आणि मूळ संशोधन करणार्‍यांचाही) उद्देश गोमूत्रात(च) हा विशेष गुण असल्याचे भासवणे हा असतो. त्यातले पुढचे अध्याहृत विधान म्हणूनच-आपल्या-पूर्वजांनी-गोमूत्राला-पर्यायाने-गायीला-महत्त्व वगैरे-वगैरे असते. म्हणून असल्या संशोधनांकडे स्केप्टिकली पाहिले जाते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास

उंटावरचे... ;)

विकास
Wed, 05/22/2013 - 21:08 नवीन
उंटाच्या मूत्रातून अधिक वीजनिर्मिती होऊ शकेल. भारतात खेडोपाडी गायी आहेत पण वीज नाही, म्हणून गोमूत्राचा उपयोग करून वीजउत्पादनाचे व्हाएबल सोल्यूशन निघू शकते का यावर अनेक जण संशोधन करत आहेत. पण घरचे गोमूत्र सोडून अधिक निर्मिती म्हणून परत काय अरबांकडून उंटांचे मूत्र देखील आयात करायचे का? हे अजून एक गोमूत्रावरील उदाहरण... (अवांतरः हा प्रकल्प देशपांडे फाउंडेशन ने फंड केला आहे. (माझ्याशी संबंध नाही). हे स्वत: देशपांडे सध्या बॅटरीच्या संदर्भातील बॉस्टनमधील एका कंपनीचे अध्यक्ष आहेत आणि गुंतवणूकदार ही आहेत.) म्हणून असल्या संशोधनांकडे स्केप्टिकली पाहिले जाते. मी स्केप्टिकली पहात होतो म्हणूनच आधी जरा शोधून माहिती काढली. आधीच निष्कर्ष काढून करमणूक करून घेतली नाही. त्याला वैज्ञानिक दृष्टी म्हणता येईल असे वाटत नाही. असो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते

ह्म्म्म

अर्धवटराव
Wed, 05/22/2013 - 21:48 नवीन
अहो तो कुंभकर्ण होता... म्हणुन तो सहा महिन्यातुन एकदा तरी जागा व्हायचा. अर्धवटराव
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास

थोडक्यात युरीनमधुन छोट्या

शिल्पा ब
Wed, 05/22/2013 - 22:13 नवीन
थोडक्यात युरीनमधुन छोट्या स्केलवर विजनिर्मीती शक्य आहे..खरं ना? इतक्या लिंका वाचुन अन बघुन एवढंच समजलं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास

पुर्णपणे सहमत

अनिरुद्ध प
Fri, 05/24/2013 - 19:27 नवीन
पुर्णपणे सहमत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास

वेगळे उत्तर अपेक्शीत आहे???

टवाळ कार्टा
Tue, 05/21/2013 - 19:22 नवीन
वेगळे उत्तर अपेक्शीत आहे???
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनिरुद्ध प

चालतंय की!

प्यारे१
Mon, 05/20/2013 - 23:44 नवीन
चालतंय की! पाच सात आमी पन घिऊ... गाई! ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

उगाच थट्टा

मंदार कात्रे
Tue, 05/21/2013 - 00:17 नवीन
  • Log in or register to post comments

नुकतेच हाती आलेल्या

मंदार कात्रे
Tue, 05/21/2013 - 00:24 नवीन
नुकतेच हाती आलेल्या वृत्तनुसार आता ,माऊस , voice यासोबत नुसत्या विचारानेही वेब सर्चिंग करता येईल ,असे संशोधन विकसित होत आहे. म्हणजे एक helmet डोक्यात घालायचे ज्यात electrodes बसवलेले असतील ,जे तुमच्या मेंदूतील विचारांचे electrical pulse किंवा brainwaves चे पृथक्करण /विश्लेषण करून तुम्हाला काय सर्च करायचे आहे,याचे प्रारूप बनवून त्यानुसार सर्च इंजिनला ते शोधायला सांगतील . हे तंत्र यापूर्वी computer games मध्ये वापरले गेलेले आहे .
याचा अर्थ thoughts transfer from brain to other medium is possible! telepathy मध्ये हेच तंत्र संगितले आहे ना? 19 व्या शतकात मॅडम ब्लोव्होत्स्की , एनि बेजंट , सी डब्ल्यू लेडबीटर यासारख्या theosophist नी या सर्व भारतीय आध्यात्मिक सिद्धीचा अनुभव घेवून अनेक ग्रंथ लिहून ठेवलेत .ते वाचायचे कष्ट कोण घेणार ? उगाच थट्टा करायची म्हणून काहीही लिहायचे असेल तर मग विवेकानंद/योगानंद यासारख्या महान भारतीय हिंदू तत्त्वज्ञ/योगी पुरुषांचीही थट्टा उडवणार का ? इकडे थट्टा करणारे अडचणीत सापडल्यावर मग कशाला सिद्धीविनायकाच्या मंदिरात रांगा लावतात काय माहीत?
नुकतेच हाती आलेल्या वृत्तनुसार आता ,माऊस , voice यासोबत नुसत्या विचारानेही वेब सर्चिंग करता येईल ,असे संशोधन विकसित होत आहे. म्हणजे एक helmet डोक्यात घालायचे ज्यात electrodes बसवलेले असतील ,जे तुमच्या मेंदूतील विचारांचे electrical pulse किंवा brainwaves चे पृथक्करण /विश्लेषण करून तुम्हाला काय सर्च करायचे आहे,याचे प्रारूप बनवून त्यानुसार सर्च इंजिनला ते शोधायला सांगतील . हे तंत्र यापूर्वी computer games मध्ये वापरले गेलेले आहे .
याचा अर्थ thoughts transfer from brain to other medium is possible! telepathy मध्ये हेच तंत्र संगितले आहे ना? 19 व्या शतकात मॅडम ब्लोव्होत्स्की , एनि बेजंट , सी डब्ल्यू लेडबीटर यासारख्या theosophist नी या सर्व भारतीय आध्यात्मिक सिद्धीचा अनुभव घेवून अनेक ग्रंथ लिहून ठेवलेत .ते वाचायचे कष्ट कोण घेणार ? उगाच थट्टा करायची म्हणून काहीही लिहायचे असेल तर मग विवेकानंद/योगानंद यासारख्या महान भारतीय हिंदू तत्त्वज्ञ/योगी पुरुषांचीही थट्टा उडवणार का ? इकडे थट्टा करणारे अडचणीत सापडल्यावर मग कशाला सिद्धीविनायकाच्या मंदिरात रांगा लावतात काय माहीत? ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मंदार कात्रे

चुकीच्या आय.डी. ने प्रतिसाद

आबा
Tue, 05/21/2013 - 09:05 नवीन
चुकीच्या आय.डी. ने प्रतिसाद दिलात काय कात्रे साहेब ? ! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मंदार कात्रे

२०१० मध्ये एकदा संजया अस नाव

स्पंदना
Tue, 05/21/2013 - 05:28 नवीन
२०१० मध्ये एकदा संजया अस नाव असलेली टेक्नॉलॉजी दोन इंडीयन तरुणांनी अमेरिकेत डेव्हलप केली होती. त्याचा व्हिडीओ मला आता सापडत नाही आहे.त्या टेक्नॉलॉजीनुसार कंप्युटरच्या मॉनीटर, सीपीयु अन किबोर्डची गरज नव्हती. पण हातात अन डोक्याला दोन हेडफोन साईझची गॅजेटस होती. कल्पना अशी होती की बाहेर फिरताना आपण जेंव्हा कंप्युटर्वरुन ही माहीती मिळाली असती तर अस मिस करतो, जास्त करुन लांबच्या प्रवासात, तेंव्हा तेथील ऑलरेडी इन्स्टॉल्ड माहीतीचा उपयोग करुन कोणत्याही सरफेसवर प्रोजेक्ट करुन बोटांना असलेल्या गॅजेटच्या थ्रु ऑपरेट करायच अस काहीस होत. अर्थात याला वेदांचा काही बेस नाही पण हे नाव ठेवताना त्या दोघांना महाभारतातल्या संजयची आठवन आली अस ते म्हणाले होते. माझी माहिती बरीच विस्कळीत आहे माफ करा, पण कोणाला ही माहीते असेल तर इथे शेअर होउ शकेल.
  • Log in or register to post comments

http://www.youtube.com/watch

खबो जाप
Tue, 05/21/2013 - 19:14 नवीन
http://www.youtube.com/watch?v=YrtANPtnhyg
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पंदना

ही घ्या... hee भारी आहे

टवाळ कार्टा
Tue, 05/21/2013 - 19:21 नवीन
ही घ्या... hee भारी आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पंदना

कित्ती सोपे गणित?

आनंद घारे
Tue, 05/21/2013 - 10:01 नवीन
१ अ = क २. ब = क म्हणून अ = ब याच प्रकारे १.नॅनोटेक्नॉलॉजी म्हणजे काय ते मला माहीत नाही. २. वेदात काय काय लिहिले आहे हे मला माहीत नाही. याचाच अर्थ वेदात नॅनोटेक्नॉलॉजी लिहिलेली आहे असले तारे तोडायचा लोकांना कंटाळा कसा येत नाही ते सुद्धा बहुतेक वेदांमध्येच लिहिलेले असावे.
  • Log in or register to post comments

वेद

नितिन थत्ते
Tue, 05/21/2013 - 10:24 नवीन
वेड लागले आहे असा शब्दप्रयोग बदलून "वेद लागले आहे" असा शब्दप्रयोग रूढ करावा का?
  • Log in or register to post comments

+१

सहज
Tue, 05/21/2013 - 12:22 नवीन
२०१४ ला भ्रष्टाचारी असुर राज संपून वैदिक अनुष्ठान स्थिर झाले तर अणुउर्जा ह्या बेसिक उर्जेने सुरवात होउन आपले सर्व महान गुह्य ज्ञान टपटपलेच समजा. मग बघा जगाला वेद लागेल वेद!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते

सहजरावान्चे महान भविष्य कथन

अनिरुद्ध प
Tue, 05/21/2013 - 14:58 नवीन
२०१४ ला भ्रष्टाचारी असुर राज संपून वैदिक अनुष्ठान स्थिर झाले तर अणुउर्जा ह्या बेसिक उर्जेने सुरवात होउन आपले सर्व महान गुह्य ज्ञान टपटपलेच समजा. मग बघा जगाला वेद लागेल वेद!' सहजरावान्चे हे महान भविष्य कथन ऐकुन खूपच मनोरन्जन झाले,ही ही ही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सहज

कामसशात्राचे विद्यान हे

अविनाशकुलकर्णी
Tue, 05/21/2013 - 16:23 नवीन
कामसशात्राचे विद्यान हे उपयोगी असे शास्त्र आहे... व सर्व जगात त्याचा उपयोग होतो.. योग शास्त्र प्राणायाम पण जगाने स्विकारले आहे. शुन्याचा शोध जगाला उपयुक्त असा आहे. भाजणे तळणे शेकणे ह्या स्वयंपाकाच्या क्रिया पण जगाने मान्य केल्या आहेत. ता.ना.पि.हि.नि.पा.जा व सारेगमपधनिसा..हे शोध पण जग्न्मान्य आहेत जे भारतिय आहेत. भारतिय खद्य पदार्थानी जगास वेड लावले आहे.
  • Log in or register to post comments

हे इतके सगळे असताना

टवाळ कार्टा
Tue, 05/21/2013 - 19:24 नवीन
हे इतके सगळे असताना निवडणुकीच्यावेळी साली आपली अक्कल कुठे ***त जाते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अविनाशकुलकर्णी

हा धागा पाहून वैदिक ऋषी

बॅटमॅन
Tue, 05/21/2013 - 16:27 नवीन
हा धागा पाहून वैदिक ऋषी चिडले आणि त्यांनी अस्मादिकांना खालील मिथ्याशास्त्रप्रचारखंडनसूक्त लिहावयास फर्मावले. अध्ययनविहीना: ये भ्रमन्ति पण्डिता इव | अज्ञजनान् वञ्चयन्ति शठा: मूढा: भयङ्करा: || सर्वमाधुनिकं ज्ञानं वेदेष्विति ब्रुवन्ति ये | न च ते वैदिका: सर्वे न च वैज्ञानिका: स्मृता:|| न जानन्ति घनपाठः न शास्त्रं आभियान्त्रिकम् | न जानन्ति श्रौतं ते न च सङ्गणकं खलु || गूगलमपि तैर्नैव हि खलु उपयुज्यते | निजतर्कप्रयोगो हि तेषां तु प्रतिबन्धितः || अस्मदीयेषु सर्वेषु धर्मग्रन्थेषु सर्वतः | अनेकवारं हि कथितं महात्म्यं ऋतसत्ययो:|| पठित्वा काव्यमध्यात्मं सुन्दरं चापि नैतिकम् | तेन सर्वे जना: कुर्यु: सुन्दरं निजजीवनं || पठित्वा चतुरो वेदा: ज्ञातो पूर्वेतिहास सः | उपनिषत्सु सर्वेषु तत्वज्ञानं महत्तरम् || युद्धस्य या हि कथा: रम्या: प्राप्ता रामायणे जये | पुराण-भागवतेषु विभिन्नाश्च कथा: खलु || योगस्तु योगवासिष्ठे योगसूत्रेषु चापि सः | तथा गीतोपनिषत्सु पठितव्यो हि सर्वतः || यद् यत्र पठितव्यं तत् तत्रैव पठयेत् खलु | तन्मुञ्च्य किमप्यज्ञानं ये सर्वे पाठयन्ति वै || हरिणाक्षीत्युपमया योषित् वा यदि वर्णिता | शृङ्गे कुत्रेति पृष्टं तै: मूर्खैश्च मुञ्च्य योषितम्|| मुखाच्च वाल्गुदेयस्य वदन्ति पूर्वसूरिणः | पापीयान् स भवेदेकः असत्यं योऽपि पाठयेत् || पठित्वा अर्धसत्यानि सत्यानीव वदन्ति ये | असत्यभाषणात्सर्वे नरकं यान्ति सत्वरम् ||
  • Log in or register to post comments

मिपा मराठी

मैत्र
Tue, 05/21/2013 - 16:55 नवीन
मिपा मराठी संस्थळ आहे असे कुठेतरी वाचले होते...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

बरं मग??? मिपाला संस्कृतची

बॅटमॅन
Tue, 05/21/2013 - 17:00 नवीन
बरं मग??? मिपाला संस्कृतची किंवा फॉर द्याट म्याटर अन्य भाषांची अ‍ॅलर्जी असल्याचे वाचलेले कुठे आढळत नाही. एकाच भाषेबद्दल इतके आग्रही असणे हे नॉर्थ इंडियनांना शोभते, मराठी लोकांना नाही. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मैत्र

बॅमॅ

मैत्र
Tue, 05/21/2013 - 21:53 नवीन
मिपाला अन्य भाषांची अ‍ॅलर्जी आहे असं कुठे वाचलं नाही. नॉर्थ इंडियन वगैरे फालतू कॉमेंट्सची अ‍ॅलर्जी नाहि तर मग कशाचीच नसावी. आणि एकाच भाषेबद्दल आग्रही दक्षिण भारतीयही आहेत बरं का.. यापूर्वी हिंदी / इतर भाषातले प्रतिसाद / इंग्रजी यावर कचकून टिका, चर्चा प्रतिसाद आणि प्रतिवाद झाले आहेत. बॅमॅ तात्यांइतकाच जुना असल्याने तुम्हाला सर्वच माहीत असेलच. आपल्याला अनेक भाषा येत असतील. आदर आहेच. पण त्यातून काय साध्य होते आहे माहीत नाही. मला काही दक्षिण भारतीय भाषा येत असतील तर मी त्यात प्रतिसाद लिहायला लागू काय? वाचणार्‍याला काय फरक पडत नसेल तर नसू दे .. मी मुद्दामून लिहिणारच मग सरळ संस्कृत मध्येही धागा काढा..किंवा इंग्रजी / हिंदी / कानडी / तमीळ मध्ये.. कारण इतर भाषांची अ‍ॅलर्जी नाही.. आणि इथे कोणी नॉर्थ इंडियन नाही.. आनंद आहे..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

हो बरोबर

प्रसाद गोडबोले
Tue, 05/21/2013 - 22:04 नवीन
इथे कोणी नॉर्थ इंडियन नाही....आनंद आहे..
अगदी बरोबर , आनंद साऊथ इंडीयन आहे , तमिळनाडुचा आहे तो . पण तो इथे आहे ? मिपावर ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मैत्र

आणि एकाच भाषेबद्दल आग्रही

बॅटमॅन
Tue, 05/21/2013 - 22:07 नवीन
आणि एकाच भाषेबद्दल आग्रही दक्षिण भारतीयही आहेत बरं का..
हिंदीचा आग्रह धरणारे उत्तर भारतीय हे जास्त डोक्यात जातात म्हणून तसे म्हणालो. बाकी सहमत आहेच.
यापूर्वी हिंदी / इतर भाषातले प्रतिसाद / इंग्रजी यावर कचकून टिका, चर्चा प्रतिसाद आणि प्रतिवाद झाले आहेत. बॅमॅ तात्यांइतकाच जुना असल्याने तुम्हाला सर्वच माहीत असेलच. आपल्याला अनेक भाषा येत असतील. आदर आहेच. पण त्यातून काय साध्य होते आहे माहीत नाही.
मजा आहे. सर्रास इतर भाषांतील प्रतिसाद येत असतील तर ठीके, पण माझ्याकडून असे किती प्रतिसाद टंकले गेले? त्यामुळे काय झाले? याचा टंकण्याआधी सारासार विचार करावा आणि मग लिहावे. आणि सर्वांत डोक्यात गेलेला प्रश्न म्हंजे यातून साध्य काय होते??? तर हा प्रश्न उपस्थित करणारे तुम्ही कोण? हा एग्झिबिशनिझमचा प्रकार तुम्हाला वाटत असेल तर मिपावरचा प्रत्येक धागाच कमीअधिक फरकाने लोकांनी चान चान म्हणावे म्हणून काढला जातो असे म्हणायला हरकत नसावी. असा प्रश्न विचारून काय साध्य होते? राहता राहिला तुम्ही अजून तमिळ किंवा चिनी भाषेत काही लिहिले तर...पब्लिक घेईल काय तो निर्णय. चान चान म्हणेल किंवा फाट्यावर मारेल, इतकी काळजी करण्याचे काही कारण नाही. आणि जेव्हा जेव्हा आम्ही संस्कृतमधून बरळलोय तेव्हा पब्लिकला प्राब्ळम असल्याचे दिसले नाही. तुम्हाला जर इतका प्राब्ळम असेल तर तुम्ही आमचे बरळणे फाट्यावर मारा. फाट्यावर मारण्याची अ‍ॅलर्जी तर मिपाला मुळीच नसावी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मैत्र

फा.मा.आ.आ.

मैत्र
Wed, 05/22/2013 - 17:34 नवीन
सारासार विचार -- तुमच्याकडून असे अनेक प्रतिसाद आल्यावरच हे टंकायला हवे होते असा अर्थ होतो.. नोंद घेतली आहे. उपस्थित करणारे तुम्ही कोण? -- मी कोणी विशिष्ट उदा. संपादक किंवा कोणी महत्त्वाची व्यक्ती असेल तरच काही प्रश्न उपस्थित करावा का? हो पण मिपावरचा प्रत्येक धागाच कमीअधिक फरकाने लोकांनी चान चान म्हणावे म्हणून काढला जातो असे म्हणायला हरकत नसावी. -- या गोष्टीशी सहमत आहे. तुम्ही बरळता असं काही म्हणणं नाही.. मुद्दा भलतीकडे नेण्याचा प्रयत्न कशाला.. काळजी करण्याचे खरं तर कारण नाही.. असं मनात आलं होतं.. इथे काही आयडी अतिशय उद्धटपणे लिहितात. काही कायमस्वरुपी एकच बाजू घेऊन लिहितात किंवा काही विनाकारण शब्दबंबाळ.. काही काळानंतर मीच काय एकूण मिपाकरांनी त्यांच्याशी यावर वाद घालणे अनुभवांती सोडून फाट्यावर मारायला सुरुवात केली आहे.. बॅमॅ आयडीचा आजवर असला अनुभव नव्हता म्हणून लिहिलं.. असो.. तुमचा प्रतिसाद सल्ला आहेच त्याप्रमाणे फा. मा. आ. आ.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

मी कोणी विशिष्ट उदा. संपादक

बॅटमॅन
Wed, 05/22/2013 - 17:51 नवीन
मी कोणी विशिष्ट उदा. संपादक किंवा कोणी महत्त्वाची व्यक्ती असेल तरच काही प्रश्न उपस्थित करावा का?
नाह! तुम्ही सोडून अजून कोणीच असे बोलताना दिसले नाही म्हणून विचारले.
तुमचा प्रतिसाद सल्ला आहेच त्याप्रमाणे फा. मा. आ. आ.
वोक्के.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मैत्र

किमान

विकास
Tue, 05/21/2013 - 17:10 नवीन
तुमची संस्कृत प्रतिभा जागृत होऊन आम्हाला वाचण्यास मिळण्यासाठी तरी असले धागे अधनंमधनं(च) यावेत असे वाटते! :) मस्तच!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

धन्यवाद

बॅटमॅन
Tue, 05/21/2013 - 19:14 नवीन
धन्यवाद :) कधीकधी पिन लागते मग होतं असं काहीतरी ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास

कधीकधी पिन लागते मग होतं असं

मदनबाण
Tue, 05/21/2013 - 19:48 नवीन
कधीकधी पिन लागते मग होतं असं काहीतरी हॅहॅहॅ... वटवाघुळ मानवा खरं खरं सांग तुला संस्कॄतोमेनिया झाला आहे ना ? ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

काश असं काही असतं मज्जा आली

बॅटमॅन
Tue, 05/21/2013 - 19:59 नवीन
काश असं काही असतं ;) मज्जा आली असती ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण

याचा अर्थ ?

अनिरुद्ध प
Tue, 05/21/2013 - 17:33 नवीन
हे अर्थासहीत लिहीले असते तर आमच्यासार्ख्या पामरन्ना तरि कळले असते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

सारांश सांगतो.

बॅटमॅन
Tue, 05/21/2013 - 17:43 नवीन
सारांश सांगतो. "कसलेही अध्ययन न करता पंडित असल्याच्या थाटात भोळ्या लोकांना गंडवणारे हे मूर्ख लोक भयंकर असतात. वेदांमधले आणि विज्ञानामधले अशा दोहोंतीलही त्यांना काही कळत नाही. घनपाठ कळत नाही तसे इंजिनिअरिंगही कळत नाही. श्रौत कळत नाही तसे कंप्यूटरही कळत नाही. ते गूगलही वापरत नाहीत आणि स्वतःची बुद्धी वापरणे त्यांच्यासाठी जणू बॅन असते. आपल्या सर्व धर्मग्रंथात सत्य बोलण्याचे महत्व वर्णिलेले आहे. अनेकविध मूल्ये वर्णिली आहेत. त्यांच्या सहाय्याने स्वतःचे जीवन सुंदर केले पाहिजे. वेद वाचून जुना इतिहास कळतो, उपनिषदांत तत्वज्ञान मांडले आहे. रामायण-महाभारतात युद्धादिंची वर्णने, तर पुराणे-भागवत येथे अनेक प्रकारच्या कथा आहेत. योगवासिष्ठ, भगवद्गीता, योगसूत्रे यांसारख्या ग्रंथांत योगशास्त्राचे वर्णन आहे. जिथे जे वाचणे योग्य आहे तेच वाचले पाहिजे. ते सोडून भलतेच काहीतरी घुसडणे असे प्रकार हे अज्ञानी लोक करतात. म्हणजे मग कुणा स्त्रीचे वर्णन हरिणाक्षी असे केले तर बाकीचं सोडून शिंगे कुठे आहेत असे विचारण्यापैकी प्रकार झाला. "वाल्गुदेयाच्या मुखाने पूर्वीचे ऋषी/कवीच जणू बोलत आहेत, की खोट्यानाट्या गोष्टींचा प्रचार करणारे लोक पापाचे धनी होतात.अर्धवट सत्य गोष्टी पूर्ण खर्‍या म्हणून दडपणारे लोक असत्य भाषणाच्या योगे नरकास जातात."
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनिरुद्ध प

हा! हा! मस्त आहे ..

निवांत पोपट
Tue, 05/21/2013 - 18:39 नवीन
हा! हा! मस्त आहे .. पण हे सुदध्दा आम्ही वेदात वाचलं आहेच की !;) ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

हीहीही

बॅटमॅन
Tue, 05/21/2013 - 19:03 नवीन
हीहीही ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निवांत पोपट

बोला

विकास
Tue, 05/21/2013 - 19:04 नवीन
बॅटमॅन महाराज की जय! :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा