✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

वेदातील विज्ञान..........

म
मंदार कात्रे यांनी
Sun, 05/19/2013 - 20:06  ·  लेख
लेख
वेदातील विज्ञान समजून घेणे आणि आचरणात आणणे अगत्याचे आहे. अजूनही शोध न लागलेल्या कित्येक गोष्टींचे सांकेतिक उल्लेख वेदात असू शकतात . उदा. नुकतेच हाती आलेल्या वृत्तनुसार आता ,माऊस , voice यासोबत नुसत्या विचारानेही वेब सर्चिंग करता येईल ,असे संशोधन विकसित होत आहे. म्हणजे एक helmet डोक्यात घालायचे ज्यात electrodes बसवलेले असतील ,जे तुमच्या मेंदूतील विचारांचे electrical pulse किंवा brainwaves चे पृथक्करण /विश्लेषण करून तुम्हाला काय सर्च करायचे आहे,याचे प्रारूप बनवून त्यानुसार सर्च इंजिनला ते शोधायला सांगतील . हे तंत्र यापूर्वी computer games मध्ये वापरले गेलेले आहे . मला वाटते आपण आता कुठेतरी अध्यात्मातील telepathy किंवा तत्सम सिदधींच्या जवळपास पोहोचत आहोत . ज्यामध्ये फक्त विचारशक्तींचा वापर करून विविध कार्ये साध्य केली जातात. म्हणजे आध्यात्मने कित्येक हजारो वर्षापूर्वी जे सिद्ध केलेले आहे,तेच विज्ञान आता साध्य करू पहात आहे. प्रश्न हा आहे की आपण आध्यात्मिक ज्ञांनाची हेटाळणी थोतांड म्हणून करत राहणार की त्यातून काही बोध घेवून काही शोध लावणार ? http://en.wikipedia.org/wiki/Brain%E2%80%93computer_interface
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
31315 वाचन

💬 प्रतिसाद (126)

प्रतिक्रिया

होना. पण आपलं तंत्रज्ञान

राजेश घासकडवी
Sun, 05/19/2013 - 21:12 नवीन
होना. पण आपलं तंत्रज्ञान कितीतरी मागे आहे. अजूनही आपल्याल कादम ऋषींप्रमाणे हरिणाचं रूप घेऊन हरिणीशी कामक्रीडा करता येत नाहीत. किंवा इंद्राने कुठच्यातरी ऋषीचं रूप घेऊन त्याच्या बायकोबरोबर हवं ते करता येत नाही.
  • Log in or register to post comments

(No subject)

टवाळ कार्टा
Mon, 05/20/2013 - 21:20 नवीन
;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेश घासकडवी

(No subject)

बॅटमॅन
Sun, 05/19/2013 - 21:59 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments

(No subject)

बिपिन कार्यकर्ते
Mon, 05/20/2013 - 00:59 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

(No subject)

बॅटमॅन
Mon, 05/20/2013 - 02:36 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते

लै भारी.

प्रभाकर पेठकर
Mon, 05/20/2013 - 02:39 नवीन
हा: हा: कस्स्सल्ल्ल भारी आहे बंड्याचं छायाचित्र.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

आज चेहेय्रा वरिल किंवा वरिल

अत्रुप्त आत्मा
Mon, 05/20/2013 - 07:13 नवीन
आज चेहेय्रा वरिल किंवा वरिल चेहेय्राचे अव शेषं ;-) बघता सहि'तल्या वाक्या वाक्याची ओळख पटली. =)) =)) =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

हे असलं सं-शोधन मांडणार्

अत्रुप्त आत्मा
Sun, 05/19/2013 - 22:08 नवीन
हे असलं सं-शोधन मांडणार्‍यांच्या बाबतीत एक गोष्ट कायम बघण्यासारखी असते, ती ही... की, जेंव्हा आधुनिक विज्ञानात एखादा शोध लागतो,तेंव्हा त्याची संगती हे लोक प्रचीन ज्ञानात हुडकतात...पण त्याच आधुनिक शोधाचा पुढचा टप्पा या आधिच-तयार असलेल्या ज्ञानातुन शोधुन दाखवा म्हटलं..की यांची दातखिळ बसलीच!!!
  • Log in or register to post comments

कशाला त्रास करुन घेताय कात्रे

संग्राम कदम
Sun, 05/19/2013 - 22:18 नवीन
कशाला त्रास करुन घेताय कात्रे काक.पु ना ओक आणि प वी वर्तक यांची पुस्तके वाचल्यास आपल्याला अनेक महाचमत्कार त्यात सापडतील
  • Log in or register to post comments

+१ करेक्ट!

आदूबाळ
Mon, 05/20/2013 - 12:10 नवीन
+१ करेक्ट!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संग्राम कदम

सर्नला देवकण सापडल्यावर

आदूबाळ
Mon, 05/20/2013 - 12:24 नवीन
सर्नला देवकण सापडल्यावर सकाळमध्ये (बहुदा) बाला तांब्यांचा लेख आला होता. त्यात काहीतरी असेच तारे तोडले होते...
  • Log in or register to post comments

कोण तांबे ?

प्रसाद गोडबोले
Mon, 05/20/2013 - 20:39 नवीन
कोण तांबे ? पिचुफेम बालाजी तांबे का ? एक नंबरचे सेल्स्मन वाटतात ते ... देवकण देवाला विकुन येतील ...(अन आमच्या घरी त्यांना जणु धन्वंतरीचा अवतार मानतात )....डोक्याला शॉट नुसता. डोक्याला शॉट लागणे ह्या प्रकारावर काही आयुर्वेदिक/वैदिक version 2013 औषध आहे असे मी पत्र पाठवुन त्यांनाच विचारणार आहे !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदूबाळ

वेद श्रेष्ठ आहेतच. निर्विवाद

वेल्लाभट
Mon, 05/20/2013 - 12:43 नवीन
वेद श्रेष्ठ आहेतच. निर्विवाद ! पुराणात अनेक गोष्टींचे संदर्भ आढळतात ज्या आपण आत्ता बघतो. पण मानवाची जिज्ञासा, मानवाचं कुतुहल हे उत्तरोत्तर वाढतच गेलं आहे. आणि त्यामुळे आधुनिक विज्ञानाने वेध घेतलेल्या अनेक गोष्टींचा वेध वेदांनी घेतलेला नाही असंही चित्र आहे. त्यामुळे कुण्या एका पारड्याला जड म्हणता येणार नाही.
  • Log in or register to post comments

आवरा

प्रसाद गोडबोले
Mon, 05/20/2013 - 13:59 नवीन
आवरा ह्या प्सुडोसायन्सला ... ह्या असल्या लेखांमुळे चर्चांमुळे असली नसलेली श्रध्दाही सम्शयाच्या फेर्‍यात येते . मान्य करा की वैदिक लोक सामान्य माणसं होती तुमच्या आमच्या सारखी ...रादर आपल्यापेक्षा कमी प्रगत भौतिक जगात . पण त्यांनी लिहिलेले वेद , महाकव्य अप्रतिम साहित्य कृती आहेत , , उपनिषदे ,षडदर्शन क्लासिकल फिलॉसॉफी आहे !! येवडं पुरेसं नाही का ? उगाचच कशाचा संबंध कशाशीही लावण्यात काय मिळतं लोकांना देव जाणे !
  • Log in or register to post comments

पूर्वज प्रगत होते का नाही

सामान्य वाचक
Mon, 05/20/2013 - 14:31 नवीन
पूर्वज प्रगत होते का नाही, हा वादाचा मुद्दा का असावा? अजून हि बऱ्याच प्राचीन गोष्टीचे अर्थ व कारणमीमांसा करणे आपल्याला जमले नाही उदाहरणार्थ पिरामिड : बांधणी & आतली वातावरण निर्मिती. मायन संस्कृती च्या खगोल अभ्यासा बद्दल हि तेच. २-४ हजार वर्षां नंतर आपल्या बद्दल हि असेच वाद होतील कदचित. (त्यानाही रिकामा वेळ असेल तर :) )
  • Log in or register to post comments

मिसळपावचा ही उल्लेख वेदात आहे

प्रकाश घाटपांडे
Mon, 05/20/2013 - 16:32 नवीन
मिसळपावचा ही उल्लेख वेदात आहे. शोधा म्हणजे सापडेल.
  • Log in or register to post comments

नसेल तर

प्रसाद गोडबोले
Mon, 05/20/2013 - 17:35 नवीन
नसेल तर आपल्या बॅटम्यॅनरावांना सांगु एखादे मिसळसुक्त , मिसळयाग , पावांजली किंवा मिसळोपनिषद लिहायला ...मग आपण घुसडु ते वेदात ....हा.का.ना.का. =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रकाश घाटपांडे

अथातो ब्रह्म(मिसळ) जिज्ञासा,

अनिरुद्ध प
Mon, 05/20/2013 - 18:00 नवीन
धन्यवाद घाट्पान्डे साहेब,आपल्या वरिल वर्णनावरुन पु ल च्या,पानवाला या कथा कथनाची आठ्वण झाली,जसे आपण वेद कालात आहोत आणि आश्रमात (होटेलात) बसुन मिसळपाव चा आस्वाद घेत आहोत्,झोपुन उठलेले बट्ट मण्ण,मिसळ कधी मिळ्ते याची वाट पहात आहेत्,कार्यकर्ते साहेब मिसळ पावा ऐवजी भाकरी बरोबर अधिक चान्गली लागते अशी चर्चा करण्याचा विफल प्रयत्न करत आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रकाश घाटपांडे

@मिसळपावचा ही उल्लेख वेदात

अत्रुप्त आत्मा
Mon, 05/20/2013 - 18:37 नवीन
@मिसळपावचा ही उल्लेख वेदात आहे. शोधा म्हणजे सापडेल.>>> =)) अहो ,म्हणजे काय? आहेच! =)) मिसळ कशी करावी? याचा अख्खा सं स्कृतात विधि आहे... हरि: औम--- आचम्य...प्राणानायम्य... देश(भुक)कालौ संकिर्त्य ;) ..संकल्पः-मम आत्मनः आद्य खाद्य फलप्राप्त्यर्थं...उदरभरणार्थं तथा शीघ्रगत्या करंटप्राप्त्यर्थं... तर्रीसहित मिसळं करिष्ये। करिष्यमाण करंट-पाक-कृत्या>>>आदौ निर्विघ्नता सिध्यर्थं अर्धांगिनी स्मरणं ;) च करिष्ये॥ क्रमशः............. बाकिचा विधि रात्री देणेत येइल... हे असलं लेखन,मानवताधर्म वर्धक म्हणजेच धर्मशास्त्र-विरोधी आणी त्यामुळे पर्यायानी पा-खांडी... असल्यामुळे स्वाभाविकच त्याला लिहिण्याचा खरा करंट रात्री(च) येतो... :-p
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रकाश घाटपांडे

बाकिचा विधि रात्री देणेत येइल...त्याला लिहिण्याचा खरा करंट

संजय क्षीरसागर
Mon, 05/20/2013 - 22:57 नवीन
रात्री(च) येतो...
मस्त प्रतिसाद! झाली रात्र, आता पुढचे विधी लिहा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

आत्म्या, हसवून मारतोस काय रे

पाषाणभेद
गुरुवार, 05/23/2013 - 04:33 नवीन
आत्म्या, हसवून मारतोस काय रे बाबा!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

त्यातून काही बोध घेवून काही

निवांत पोपट
Mon, 05/20/2013 - 20:58 नवीन
त्यातून काही बोध घेवून काही शोध लावणार ?
बोध घेवून काही शोध लावला नसला तरी प्रेरणा घेऊन 'प्लॅनेट ऑफ द एप्स' काढलाय की! ;)
  • Log in or register to post comments

आगागागागा...

अत्रुप्त आत्मा
Mon, 05/20/2013 - 21:01 नवीन
आगागागागा... :D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निवांत पोपट

फेसबुकावर सापडलेला आणखी एक मोती

३_१४ विक्षिप्त अदिती
Mon, 05/20/2013 - 22:48 नवीन
Image removed. 400 ग्राम गोमूत्र की बैटरी से 3 वाट का बल्ब 400 घंटे तक जलाया जा सकता है। 12 बोल्ट की इस ‘गो- ज्योति बैटरी’ से मोबाइल भी चार्ज हो सकता है। इसे कानपुर (उत्तरप्रदेश) की गौशाला में बनाया गया है। इसे बिजली से चार्ज करने की जरूरत भी नहीं होती। कानपुर गोशाला के महामंत्री पुरूषोत्तम तोषनीवाल के प्रयासों से यह सब संभव हुआ है। तोषनीवाल के अनुसार यह बिजली का वैकल्पिक साधन बन सकती है। तोषनीवाल ने दावा किया है की बिजली से चार्ज होने वाली बैटरियां 5-6 घंटे तक ही काम करती हैं, जबकि गौ- ज्योति बैटरी 400 ग्राम गो-मूत्र से 400 घंटे तक चलती है। मध्यप्रदेश उर्जा विकास निगम ने इस बैटरी को परीक्षण के लिए भोपाल के राजीव गांधी विश्वविद्यालय में भेजा था। परीक्षण में 400 घंटे में मात्र 3 फीसदी वोल्ट कम हुआ। इससे 12 घंटे तक मोबाइल चार्ज करके भी देखा गया। तोषनीवाल के अनुसार इस गौ- ज्योति बैटरी की लागत 3500 रूपये आती है। उतराखंड सरकार ने अपने कई दफ्तरों में इसका उपयोग करना शुरु कर दिया है। छत्तीसगढ़ सरकार भी कार्यालयों में उपयोग के लिए बैटरी खरीदने वाली है... इथे सापडला.
  • Log in or register to post comments

आयला, भारीये.

मिसळलेला काव्यप्रेमी
Mon, 05/20/2013 - 23:05 नवीन
आयला, भारीये. आता रोज सकाळी लोटा घेऊन गोठ्यात जायला पाहिजे. एक १०-१२ दिवसात भरपुर जमा होईल. महिना-दोन महिना मोबाईल चार्ज करता येईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

खो खो खो...

डॉ सुहास म्हात्रे
Mon, 05/20/2013 - 23:14 नवीन
असल्या होक्सेस आंतरजालावर सतत भटकत असतात. कोण्या एका तोषनीवालचा बदला घेण्यासाठीसुद्धा हे कुणी केल्याची शक्यता आहे. किंवा बातमीला खरेपणाची झलक देण्यासाठीही कपोलकल्पीत तोषनीवाल निर्माण केल्याची शक्यता आहे. आजकाल आंतरजालावर हा उद्योग फार भरभराटीस आला आहे ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

करमणूक महत्त्वाची

३_१४ विक्षिप्त अदिती
Tue, 05/21/2013 - 01:36 नवीन
आपल्याला काय! करमणूक झाली की हसायचं, पुढचं पान. असाच आणखी एक फेकू गडी फेसबुकावरूनच सापडला होता, हा पहा: http://www.youtube.com/watch?v=I9aR_xfm-gE हा बावाजी आयायटीत गणित शिकलेला आहे. काही वेळा गणितातल्या संकल्पनाही उत्तमरित्या सांगतो; म्हणून त्याच्या थापा आणखीनच धोकादायक वाटतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे

तसे नसावे...

विकास
Tue, 05/21/2013 - 01:58 नवीन
होक्सेस नसावे असे टाईम्स मधील बातमी वाचल्यावर वाटले... University develops simple apparatus that generates energy from cow's urine V Senthil Kumaran, TNN May 16, 2013, 04.10AM IST Tags: Dr V Ramesh Saravana Kumar| cow's urine NAMAKKAL: With the entire state reeling under a severe power crisis, especially the rural areas, the department of livestock production and management at the Veterinary College and Research Institute in Namakkal has come up with a simple electricity generating apparatus whereby farmers will be able to generate energy from cow's urine. Talking to TOI, head of the department Dr V Ramesh Saravana Kumar said the apparatus is based on a simple scientific principle and will be able to generate 10 volts of electricity continuously for 120 hours (five days) from two litres of cow urine. "All we need is 10 to 12 plastic cups, each filled with 200ml of urine, thin copper plates as the positive poles and a thin zinc plates as negative poles. One needs to spend just Rs80 to setup the apparatus," he said. Describing the apparatus Ramesh said the positive and negative poles in the cups are connected by single core wires or hook-up wires that form two separate networks. The two output wires can be connected to any desired device. "When copper and zinc plates come in contact with uric acid movement of electrons begin, generating electricity. The output dips after five days, when the urine has to replaced," he added. With the help of the model, college students demonstrated that five wall clocks and a zero watts bulb can be operated simultaneously. "While electricity can also be generated from urine of other cattle, cow's urine is used as it is abundantly available. A cow can produces 16 to 20 litres of urine every day. Proper collection of urine from cows can help farmers generate more electricity," Ramesh said. Ramesh said the pungent urine smell can be avoided by keeping the apparatus outdoors and using a long wire to connect it to the output device. He said the apparatus was a boon for children residing in rural areas as connecting it with an LED bulb, like the ones used in powerful torches and positioning them properly can provide hours of light for study. A bigger model can be used to light up an entire house, including the cow shed. Farmers, who have already seen the model, have appealed to technical institutions to generate bigger and more efficient models with provisions to store electricity. बाकी मूळ चर्चा प्रस्तावासंदर्भात इतकेच म्हणेन की ज्यांना असे संशोधन करायचे असेल त्यांनी ते करावे. नुसतेच नंतर सद्यकालीन विज्ञानातील घडामोडींशी नवीन काही अस्तित्वात आल्यावर सांगड घालत बसू नये, जे चर्चा प्रस्तावात जाणवले. असो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे

यात नवीन काहीच नाहिये. हा या

मराठीप्रेमी
Tue, 05/21/2013 - 07:35 नवीन
यात नवीन काहीच नाहिये. हा या video मध्ये दाखवल्यासारखा प्रकार आहे. कोणतेही दोन वेगळे standard electrode potential असलेले धातू आणी electrically conductive solution वापरुन हे करता येते. zinc आणी copper वापरल्यावर zinc oxidize होतो आणी या oxidation प्रक्रियेतून मुक्त झालेली उर्जा electricity च्या रूपात मिळते (electrolyte आहे तसेच राहते). गंमत अशी आहे की zinc तयार करताना हीच प्रक्रीया याउलट वापरलेली असते, त्यामुळे प्रत्यक्षात काहीच फायदा होत नाही. आणी वरील बातमी ज्याने लिहीली आहे त्याला electeical ची जुजबी माहिती देखील नाही अस वाटतय. 10 volts of electricity हा काय प्रकार असतो?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास

मराठीप्रेमीसाहेब

अनिरुद्ध प
Tue, 05/21/2013 - 14:50 नवीन
आपल्याला electeical बद्दल खूपच माहिती आहे असे वाटते, तरी आपण 10 volts of electricity हा काय प्रकार असतो?, या बद्दल जरा महिती देवुन उपक्रुत करावे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठीप्रेमी

मी कुठे तसे म्हणले आहे?

विकास
Tue, 05/21/2013 - 17:08 नवीन
यात नवीन काहीच नाहिये. बहुतेक माझा प्रतिसाद नीट वाचला नसावात, कारण मी कुठे तसे म्हणले आहे? मी त्याचा वेदांशी अथवा कशाचीच संबंध लावलेला नाही. फक्त आधी ज्या पद्धतीने ती बातमी दिली गेली त्यावरून हे विज्ञान होते का अज्ञान हे पहाण्यासाठी म्हणून उत्सुकतेपोटी गुगलले तर टाईम्स मधील गेल्या २-४ दिवसातीलच बातमी मिळाली. आणी वरील बातमी ज्याने लिहीली आहे त्याला electeical ची जुजबी माहिती देखील नाही अस वाटतय. 10 volts of electricity हा काय प्रकार असतो? "10 volts of electricity" असे वाक्यात म्हणत नाहीत असे म्हणायचे आहे का? उत्तर कळल्यास अजून समजावून सांगेन. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठीप्रेमी

विकास

अनिरुद्ध प
Tue, 05/21/2013 - 17:37 नवीन
हा प्रश्ण मी मराठीप्रेमी यान्ना विचरला होता.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास

प्रतिसाद

विकास
Tue, 05/21/2013 - 19:02 नवीन
प्रतिसाद त्यांनाच दिला होता, तुम्हाला नाही. म्हणून तर तो तुमच्या प्रतिसादाखाली त्याच ठिकाणी आहे, अजून टॅब मिळून आत गेलेला नाही. (जसा हा प्रतिसाद आतल्या बाजूस दिसेल तसा). :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनिरुद्ध प

@ विकास : आपण याचा वेदांशी

मराठीप्रेमी
Tue, 05/21/2013 - 21:52 नवीन
@ विकास : आपण याचा वेदांशी संबंध लावत आहात असे मला म्हणायचे नव्हते. तसे ध्वनीत होत असेल तर ती माझी वाक्यरचनेतील चूक म्हणावी लागेल. आता थोडे सविस्तर लिहीतो. खाली लिहीलेले आपल्याला उद्देशून नाही, times मधील बातमी आणी आदितीने दिलेली fb link यावर भाष्य आहे. मूळ बातमीत म्हटल्याप्रमणे
the apparatus is based on a simple scientific principle and will be able to generate 10 volts of electricity continuously for 120 hours (five days) from two litres of cow urine. "All we need is 10 to 12 plastic cups, each filled with 200ml of urine, thin copper plates as the positive poles and a thin zinc plates as negative poles.
हे वर्णन आणी मी याआधी दिलेल्या विडियो मधील लिंबे वापरून electricity तयार करणे हे एकाच तत्वानुसार काम करतात. किंबहुना सगळे electrical cells याच तत्वानुसार काम करतात. स्वस्त 1.5V batteries zinc आणी manganese dioxide हे electrodes म्हणून आणी ammonium chloride किंवा zinc chloride electrolyte म्हणून वापरतात. alkaline 1.5V batteries सुद्धा zinc आणी manganese dioxide हे electrodes म्हणून आणी potassium hydroxide electrolyte म्हणून वापरतात. (potassium hydroxide is alkaline, hence the name). सर्व rechargble batteries (lithium-ion, lithium-polymer, lead-acid, nickel-metal hydride, nicket-cdmium etc.) सुद्धा हेच तत्व वापरतात. फरक इतकाच असतो की यात electrodes आणी electrolytes असे निवडलेले असतात की जी chemical rection electricity तयार करते ती reaction reversible असते. ही प्रक्रिया बहुतेक ४००० वर्षांपासुन माहीत आहे आणी कदाचीत electroplating साठी वापरली गेली असावी. (see : Baghdad Battery ) बातमी वाचून मलातरी अस वाटतय की त्यांचे काम एखाद्या ७-८ वी मधील मुलाने विज्ञान प्रदर्शनात केलेल्या प्रयोगाच्या दर्जाचे आहे.
With the help of the model, college students demonstrated that five wall clocks and a zero watts bulb can be operated simultaneously.
हे विज्ञान प्रदर्शनात ठीक आहे पण जर हे जास्त गांभिर्याने घ्यायचे असेल तर या controlled experiments ची गरज आहे. जर तसे controlled experiments केले असतील तर "college students demonstrated that five wall clocks and a zero watts bulb can be operated simultaneously" हे वाक्य बातमीत आलेच नसते. त्यांनी जे काही केले आहे ते वर्तमानपत्रात छापून आणणे म्हणजे अर्ध्या हळकुंडाने पिवळे होण्यातला प्रकार आहे. आणी यात गोमूत्र फक्त electrolyte म्हणून आहे. त्याऐवजी इतर कुठल्याही प्राण्याचे (not only cattle as the article says), माणसाचे पण, मूत्र वापरून हेच करता येइल. हा प्रयोग Veterinary College च्या लोकांनी केला आहे, त्यामुळे कदाचीत त्यांना यातील बर्‍याच तांत्रिक बाबी माहीत नसतील आणी त्यांनी जे काही केले आहे ते प्रामाणीक हेतूने केले असावे पण होत काय, यामुळे काही लोकांना propoganda साठी कच्चा माल मिळतो. वर आदितीने दिलेली facebook वरील post याचेच उदाहरण आहे. त्या post मध्ये म्हटल्याप्रमाणे
400 ग्राम गोमूत्र की बैटरी से 3 वाट का बल्ब 400 घंटे तक जलाया जा सकता है। 12 बोल्ट की इस ‘गो- ज्योति बैटरी’ से मोबाइल भी चार्ज हो सकता है।
थोडक्यात, त्या battery मधील stored energy 1200 W.Hr आहे असा दावा आहे. तुलनेसाठी laptop batteries 30-60 W.Hr च्या मध्ये असतात (laptop च्या आकारानुसार), car batteries पण याच range मध्ये असतात. माझा common sense मला सांगतो की 400 gram गोमूत्रातून एव्हढी उर्जा मिळवणे शक्य नाही पण बर्‍याच लोकांना हा fact check शक्य नसेल आणी ते या बातमीवर विसंबून राहू शकतात. तुम्हालाही हा hoax नसावा असे वाटले होते. असाच आणखी एक hoax video. now about "10 volts of electricity" 10 volts of electricity असे वाक्यात बहुतेक म्हणू शकतो, बर्‍याच ठिकाणी मी असे वापरलेले बघीतलेले आहे. I think it is little lousy to say as electricity comprises of many physical phenomena associated with the presence and flow of electric charge such as electric charge, electrical field, electric current, electric potential etc. मी स्वतः "batterie's voltage is 10" or "battery is at 10V" असे म्हणेन पण कदाचीत मी जास्त छिद्रान्वेशी बनतोय, 10 volts of electricity असे बोलणे सुद्धा बहुतेक ठीक ठरेल. माझा आक्षेप थोडा वेगळा होता. 10 volta of electricity ने काहीच उपयुक्त माहिती मिळत नाही. त्यासाठी त्या battery ची capacity द्यायला पाहिजे (W.Hr मध्ये किंवा mA.Hr@V). एक उदाहरण द्यायचे झाले तर हा cell आणी हा cell यांचे voltage सारखेच आहे पण दुसर्‍याची capacity पहिल्यापेक्षा २.५ पट जास्त आहे. थोडक्यात दुसरे cells जर कॅमेर्‍यामध्ये वापरले तर जवळपास २.५ पट फोटो काढता येतील. ही उपयुक्त माहीती आहे, दोन्ही cells चे voltage 1.2V आहे ही नाही. (यात आणखी काही parameters असतात, maximum rate of discharge, internl resistance etc., पण सध्या ते बाजुला ठेवू) "10 volts of electricity हा काय प्रकार असतो?" हे माझे वाक्य खरेतर "why are you giving me useless information?" या उद्वेगातून होते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास

२५०० mA.Hr च्या cell ची link

मराठीप्रेमी
Tue, 05/21/2013 - 21:56 नवीन
२५०० mA.Hr च्या cell ची link द्यायची विसरलो. (शेवटून दुसरा परिच्छेद). http://www.all-battery.com/aa2500mahhighcapacitynimhrechargeablebattery10320.aspx
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठीप्रेमी

सविस्तर प्रतिसादाबद्दल

विकास
Wed, 05/22/2013 - 01:28 नवीन
सविस्तर प्रतिसादाबद्दल धन्यवाद. तुमच्या तांत्रिक विश्लेषणाशी बहुतांशी सहमत पण तो मुद्दा नव्हताच. तुम्हालाही हा hoax नसावा असे वाटले होते. पण आधी जे काही संदर्भ-प्रतिसाद होते त्यात चारशे ग्रॅम गोमूत्र आहे का ४ लाख वोल्टेज आहे यावर तांत्रिक चर्चा चालू नव्हती आणि त्यांनी जर येथे स्पष्टीकरण दिले तर गोष्ट वेगळी आहे, पण नाहीतर केवळ गोमूत्र म्हणजे काय सनातनी, गोमाता करत फिदीफिदी हसण्याचाच मुद्दा इतकेच त्यात उर्धृत होत होते असे वाटण्यासारखी परीस्थिती आहे. आता जे काही लिहीत आहे ते गोमुत्राचा, वेदांचा अथवा गोमुत्रावर चाललेल्या बॅटरीच्या डिफेन्ससाठी नसून नक्की आपण हसत असताना सगळे बघात असतो का या संदर्भात आहे... गोमूत्राचा वापर संशोधनासाठी करण्यावरून आधी हसण्यावारी नेले गेले होते ज्यात तशा संशोधनासच होक्स म्हणले गेले होते. आता चर्विचर्वण करतच आहोत म्हणून व्याख्येपासून जाऊयात, Hoax means something that has been established or accepted by fraudulent means. पण मग एक प्रश्न पडला की, The National Council of Rural Institutes was established by the Government of India in 1995 पण हे संशोधन ग्राह्य का धरत असावेत का? Naturebased livelyhood development या त्यांच्या संस्थळावरील प्रेझेंटेशनमधे (पान ४-५) मधे २५० मिली गोमूत्र हे ४०० तास लाईट अथवा मोबाईल चार्जर साठी वापरता येते असे लिहीले आहे ते का लिहीले असावे. इतरत्र देखील या संदर्भात असेच म्हणलेले दिसले. यातील लाईट हा एल ई डी असतो हे काही ठिकाणि लिहीलेले आढळले...१२ व्होल्ट ऐवजी ३ व्होल्ट देखील वाचलेले आहे. तीन व्होल्टस चा संबंध हा दोन AA बॅटरींवर चालणार्‍या लहान एल इ डी बल्बशी आहे. त्यामुळे देखील मला त्याला अजून होक्स म्हणवत नाही.... आता तुम्ही जे काही लॅपटॉपच्या बॅटरीशी तुलना करून असे होणे शक्यच नाही असे म्हणत आहात ते काहीसे पटत नाही. कारण त्यात आय बी एम च्या थॉमस वॅट्सनने १९४० च्या दशकात जे काही संगणकांच्या आवशक्यतेवरून "I think there is a world market for about five computers." म्हणले होते तसेच काहीसे वाटते. असो. तरी देखील एक लक्षात घेतले पाहीजे की लॅपटॉप बॅटरी जशी काँपॅक्ट असते तशी ही गोमूत्र बॅटरी नाही... थोडक्यात अजून तरी (लॅपटॉप बॅटरीपुढे) मोठीच आहे.. टाईम्स मधे दिलेल्या बातमीच्या आणि त्यावरील तुमच्या विश्लेषणासंदर्भात काही उत्तरे बातमी वाचून मलातरी अस वाटतय की त्यांचे काम एखाद्या ७-८ वी मधील मुलाने विज्ञान प्रदर्शनात केलेल्या प्रयोगाच्या दर्जाचे आहे. आय विश... म्हणजे त्यांचे संशोधन फार मोठे आहे असे म्हणायचे नाही. त्या संदर्भात मी सहमत आहे. पण आपल्याकडे सातवी-आठवीतील मुलांना प्रयोगशाळेत किती हात लावून देतील याचा विचार आला. संशोधन लांबच राहूंदेत. त्याव्यतिरीक्त क्लासेस सोडून असे प्रयोग करण्यात किती मुले "वेळ वाया घालवतील" हा अजून एक मुद्दा आहेच. :( त्यामुळे कॉलेजातील विद्यार्थ्यांचे कौतूक होते. आणी यात गोमूत्र फक्त electrolyte म्हणून आहे. त्याऐवजी इतर कुठल्याही प्राण्याचे (not only cattle as the article says), माणसाचे पण, मूत्र वापरून हेच करता येइल. मला वाटते तसे त्या बातमीत देखील म्हणले आहेच... फक्त गोमुत्राची उपलब्धता ही खेड्यापाड्यात इतर प्राण्यांच्या मुत्राच्या उपलब्धतेपेक्षा कित्येक पटीने अधिक असल्याने त्यावर भर दिला जात आहे. म्हणूनच असे संशोधन करणारे उत्तर -दक्षिण सर्वत्र दिसून येतील. मी स्वतः "batterie's voltage is 10" or "battery is at 10V" असे म्हणेन पण कदाचीत मी जास्त छिद्रान्वेशी बनतोय, सहमत. :) जे वाक्य जगार इतरत्रही वापरले जाते त्यावर केवळ येथेच टिका करत चर्चा भरकटवण्याचे कारण काय? त्याव्यतिरीक्त काही सर्वसाधारण कॉमेंट्स... १. टाईम्सच काय एकंदरीतच ज्या पद्धतीने बातम्या दिल्या जातात ते बघून खिन्न होयला होते... २. आपल्याकडे पाश्चात्य पद्धतीने वैज्ञानिक प्रयोग करण्याची सवय अथवा माहिती ही तळागाळापर्यंत जाउंदेत सर्वसामान्यांपर्यंत पोचलेली आहे असे म्हणायची अवस्था नाही. त्याचे परीणाम सर्वत्रच दिसून येतात. त्यामुळे तुम्ही केलेल्या टिकेतील काही भाग या संदर्भात बरोबरच आहे पण त्यामुळे ते होक्स ठरत नाही असे मात्र वाटते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठीप्रेमी

तुमच्याशी बहुतांशी सहमत आहे.

मराठीप्रेमी
Wed, 05/22/2013 - 08:28 नवीन
तुमच्याशी बहुतांशी सहमत आहे. काही मुद्यांवर थोडे अजून स्पष्टीकरण देतो. ग्रामीण भागात जर जवळपास उपलब्ध असणार्‍या साधनसंपत्तीचा वापर करून काही inovative होत असेल तर त्याचे स्वागतच आहे, परंतु म्हणून काय वाट्टेल ते दावे करु नयेत. यात दोन प्रकार असू शकतात. एक म्हणजे समाजासाठी काहीतरी खरच करायची इच्छा, परंतू तांत्रिक माहितीच्या अभावे चूका किंवा अवास्तव दावे. हे क्षम्य आहे. या व्यक्ती जर प्रामाणिक असतील तर चुका लक्षात आल्यावर त्या सुधारतील. दुसर्‍या प्रकारातील धोकादायक व्यक्ती म्हणजे स्वतःच्या फायद्यासाठी मुद्दामून चुकीचे दावे करणे. Ramar Pillai यात येतो. fb ची post ज्याला तुम्ही पहिला प्रतिसाद दिलात तीपण याच प्रकारात मोडते. अशा प्रकारचे अवास्तव दावे केले की जे काही थोडेफार शक्य असते ते पण संशयाच्या घेर्‍यात सापडते आणी हळुहळु लांडगा आला रे आला प्रमाणे वर तुम्ही म्हटल्याप्रमाणे "पण नाहीतर केवळ गोमूत्र म्हणजे काय सनातनी, गोमाता करत फिदीफिदी हसण्याचाच मुद्दा इतकेच त्यात उर्धृत होत होते असे वाटण्यासारखी परीस्थिती आहे." अशी परिस्थिती निर्माण होते. Hoax : माझ्या मते खालीलप्रमाणे १) गोमुत्रापासून वीजनिर्मिती : शक्य (hoax नाही) २) त्या वीजेने एखादा दिवा लावणे : शक्य (hoax नाही) ३) त्या वीजेने mobile charge करणे : तांत्रिकदृष्ट्या शक्य, पण बहुतेक impracticle (but still not a hoax) ४) ४०० gram गोमुत्रापसून १२०० W.Hr उर्जा : definately hoax (स्पष्टीकरण खाली आहे) लॅपटॉपच्या बॅटरीशी तुलना : लॅपटॉपच्या बॅटरीशी तुलना करण्याचा उद्देश थोडा वेगळा होता. त्या fb post प्रमाणे गोमुत्र बॅटरी १२०० W.Hr उर्जा पुरवते. ४०० gram गोमुत्रापासुन हे शक्य नाही (unless it is stone soup type of thing). लॅपटॉपच्या बॅटरीची क्षमता देण्याचा उद्देश हा होता की ज्यांना १२०० W.Hr हे interpret करता येणार नाही त्यांना तुलनेसाठी सध्याची best technology काय करु शकते ते कळावे. गोमुत्र बॅटरी लॅपटॉपच्या बॅटरीइतकी लहान आणी compact नसेल, पण ४०० gram electrolyte असणारी बॅटरी असुन असुन किती मोठी असेल? ही बाजारात उपलब्ध असणारी ~११०० W.Hr ची बॅटरी, जवळपास १० किलो वजन आहे. या विशिष्ट बॅटरी ची link देण्याचा उद्देश हा आहे की ही battery technology हलकी आहे, याच क्षमतेची lead-acid बरीच जड असेल. so, unless proven otherwise ४०० gram गोमुत्रापसून १२०० W.Hr उर्जा is Hoax. पहिले दोन दावे मान्य आहेत. कदाचीत अजुन काही वर्षांनी ५०० gram वजनाची १२०० W.Hr बॅटरी येइलही, graphene मध्ये potential आहे, पण आजतरी ते शक्य नाही. तुम्ही दिलेले presentation वाचले. त्यात काहीच बारकावे नसल्यामुळे जास्त भाष्य करणे शक्य नाही. परंतु काही वाक्ये उदा. "Requires no engineering & mechanics", "No acid, distilled water etc are used", "Normal mobile charger is used" असे दर्शवतात की कदाचीत हे काम करणारी व्यक्ती मी वर म्हटल्याप्रमाणे पहिल्या प्रकारात येत असावी.
मी स्वतः "batterie's voltage is 10" or "battery is at 10V" असे म्हणेन पण कदाचीत मी जास्त छिद्रान्वेशी बनतोय, सहमत. smiley जे वाक्य जगार इतरत्रही वापरले जाते त्यावर केवळ येथेच टिका करत चर्चा भरकटवण्याचे कारण काय?
याविषयी थोडे स्पष्टीकरण देतो. ते वाक्य तुम्ही किंवा मिपा वर इतर कोणीही वापरले असते तर काहीच हरकत नव्हती, मी अजिबात आक्षेप घेतला नसता. आपण रोज बर्‍याच ठिकाणी असे करतो. समांतर उदाहरण द्यायचे झाले तर मला कोणी माझे वजन विचारले तर मी ६० किलोच सांगीन, ५८८ Newton असे सांगून विचारणार्‍याला वजन हवे का वस्तुमान असा प्रतिप्रश्न करणार नाही. किंवा कोणी जर पाककृती विभागात "काय छान गोल पराठा लाटला आहे" अशी प्रतिक्रिया दिली की त्याखाली "या आकाराला वर्तूळ म्हणतात, गोल नाही" अशी प्रतिक्रिया देणार नाही. पण मूळ बातमी ही एका शोधाबद्दल आहे. त्यात scientific rigor ची अपेक्षा ठेवणे चूक नाही. आणी मूळ आक्षेप हा 10 volts of electricity ने काहीच उपयुक्त माहिती मिळत नाही, आणी जो ती माहिती देतो आहे त्याला ते समजतच नाहिये, हा आहे. किंबहुना या अशा छोट्या छोट्या गोष्टी असतात ज्या तुम्ही जे बोलत आहात की नुसती पोपटपंची करत आहात ते दर्शवतात (and sometimes it can go terribly wrong). "10 volts of electricity" किंवा "five wall clocks and a zero watts bulb can be operated simultaneously" यासारखी lousy वाक्ये scientific community मध्ये विश्वासार्हता घालवतात आणी वर म्हटल्याप्रमाणे लांडगा आला रे आला होतं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास

उत्तम

३_१४ विक्षिप्त अदिती
Wed, 05/22/2013 - 10:43 नवीन
तुमचे दोन्ही प्रतिसाद विज्ञान आणि वैज्ञानिक पद्धत याबद्दल अतिशय उत्तम प्रकारे माहिती, विवेचन देणारे आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठीप्रेमी

धन्यवाद

मराठीप्रेमी
Wed, 05/22/2013 - 11:26 नवीन
धन्यवाद
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

मराठीप्रेमीसाहेब

अनिरुद्ध प
Wed, 05/22/2013 - 17:21 नवीन
लहान तोन्डी मोठा घास घेत आहे,पण माझ्या माहिती नुसार बाजारात मिळणार्या Battery ह्या watt/Hr या वर नाहित तर AH rating वर मिळ्तात जसे 12V 7AH etc.,तसेच त्यान्नी वरिल छायाचित्रात दाखव्लेला बल्ब हा 3 W LED Bulb,aahe तेव्हा तो बल्ब त्यान्नी सन्गित्ल्या प्रमाणे ४०० तास चालु शकतो कारण त्यात inbuilt inverter circuit असते, बाकी विकास यानी म्हट्ल्या प्रमाणे मी सहमत आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठीप्रेमी

watt hr आणि Ampere hr ही

नितिन थत्ते
Wed, 05/22/2013 - 17:36 नवीन
watt hr आणि Ampere hr ही कन्व्हर्टिबल युनिट्स आहेत. साठवलेल्या एकूण ऊर्जेचे माप.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनिरुद्ध प

थत्ते साहेब

अनिरुद्ध प
Wed, 05/22/2013 - 17:57 नवीन
watt hr आणि Ampere hr ही दोन्ही मापने मझ्या माहिती प्रमाणे वेगवेगळी आहेत्,जसे आपल्या घरात असलेली वीज मापके (electrical meters) ही माझ्या मते KW/Hr असतात,आणि Battery Capacity हि Ampere /Hr मध्ये असते,ईथे आपल्याला Watts calculate करावे लागते. तसेच मराठीप्रेमी यान्नी सुद्धा २५०० mA.Hr च्या cell ची link अशी दिली होति बाकी यात काही चुक असेल तर स्पस्तिकरण द्यावे म्हणजे आमच्या ज्ञानात भर पडेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते

Ampere-hr ला बॅटरीच्या

नितिन थत्ते
Wed, 05/22/2013 - 18:42 नवीन
Ampere-hr ला बॅटरीच्या व्होल्टेजने गुणले की watt-hr येतात. म्हणून कन्व्हर्टिबल युनिट आहेत असे म्हटले आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनिरुद्ध प

watt-hr हे अधिक योग्य युनिट

नितिन थत्ते
Wed, 05/22/2013 - 18:46 नवीन
watt-hr हे अधिक योग्य युनिट आहे. सेम अ‍ॅम्पिअर-अवरच्या दोन बॅटर्‍या वेगवेगळ्या व्होल्टेजच्या असतील तर अ‍ॅम्पिअर-अवर ची तुलना करता येत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते

watt-hr हे अधिक योग्य युनिट

अनिरुद्ध प
Wed, 05/22/2013 - 19:03 नवीन
आपले म्हणणे समजले नाही,आणि माझ्यामते AH rating हे ISO मानान्कित Battery मापक आहे,तसेच आपण दिलेल्या सुत्रानुसार सुद्धा तुलना लगेच होवु शकते P=V*I.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते

रोजच्या वापरातल्या बॅटरीज,

३_१४ विक्षिप्त अदिती
Wed, 05/22/2013 - 18:52 नवीन
रोजच्या वापरातल्या बॅटरीज, ज्यांना आपण पेन्सिल सेल म्हणतो, त्यातल्या रिचार्जेबल प्रकारच्या बॅटरीजवर mAh असं एकक दिसतं. एक उदाहरणः Image removed. छोटे कॅमेरे वापरणार्‍यांना अशा बॅटरीज निश्चितच माहित असतील. ठराविक बॅटरी पॅकमधून किती पावर तासाला मिळेल ते kW·h (किंवा W·h) मधे रूपांतरीत करतात नॉमिनल काही अवरोध (resistance) किंवा उपकरणाला लागणारं व्होल्टेज पकडून गणितं केली जातात. घरात वापरली जाणारी मापकं kW·h या एककात मापन करतात, kW/Hr नव्हे. SI एककांमधे हे एकक रूपांतरीत केल्यास 3600 Joule असं उत्तर येतं. एका तासाला वापरली जाणारी पावर म्हणजे kW·h. घरच्या वीजेच्या बिलात किती 'युनिट' वीज वापरली ते दिसतं, ते हेच एकक, kW·h (किलोचा k हा नेहेमी small case वापरण्याची पद्धत आहे.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनिरुद्ध प

धन्यवाद,

अनिरुद्ध प
Wed, 05/22/2013 - 19:11 नवीन
अदितीताई,आम्ही शिकलो तेव्हा KW/Hr असे आठ्व्ल्या सारखे जाणवते असो मुद्दा मान्य आहे तेव्हा हे बदल नक्किच स्विकारुन ल़क्षात ठेवण्याचा प्रयत्न करिन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

जौंद्या हो ही नॉनष्यांडर एककं

३_१४ विक्षिप्त अदिती
Wed, 05/22/2013 - 19:19 नवीन
जौंद्या हो ही नॉनष्यांडर एककं. चांगली, सोन्यासारखी SI एककं वापरायची सोडून ही कसली convoluted एककं काढतात कोण जाणे! ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनिरुद्ध प

KW/Hr असं काही नसतं बहुधा.

नितिन थत्ते
Wed, 05/22/2013 - 19:22 नवीन
KW/Hr असं काही नसतं बहुधा. (चूभूदेघे)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनिरुद्ध प

मान्य

अनिरुद्ध प
Wed, 05/22/2013 - 19:32 नवीन
तसेच W .h हे सुद्धा Battery मापना साठी नसत बहुधा. (चूभूदेघे)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा