Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by चित्रगुप्त on Wed, 05/15/2013 - 13:45
लेखनविषय (Tags)
संस्कृती
कला
वाङ्मय
जीवनमान
राहणी
लेखनप्रकार (Writing Type)
प्रकटन
अनुभव
शिफारस
सल्ला
माझ्या ' मारा डंख मारा डंख मारा बिछुवा' या धाग्याच्या एका प्रतिसादात 'ढालगज भवानी' यांनी " कसं सुचतं हे सगळं ? असा प्रश्न केला होता, त्याचं उत्तर " अहो, ब्रह्म मुहूर्तावर जाग येण्यातून" असं आहे. कसं, ते सांगतो. 'ब्रम्ह मुहूर्त' ज्याला म्हणतात, त्याची नेमकी अशी काही वेळ (पंचांगातील सूर्योदयाच्या नियत वेळेसारखी) असेल, असे वाटत नाही (असल्यास सांगावे). साधारणत: पहाटे तीनच्या सुमाराची वेळ म्हणजे 'ब्रम्ह मुहूर्त' असे म्हटले जाते. पण मुळात त्या वेळेला 'ब्रम्हमुहूर्त' असे का म्हणायचे ? ब्रम्हदेव हा सृष्टीचा निर्माता. सृजनाचा देव. तेंव्हा 'ब्रम्हमुहूर्त' म्हणजे सृजनशीलतेची वेळ. चित्र, लेखन, किंवा अन्य कश्याहीसाठी नवीन कल्पना केंव्हाही, कुठेही सुचून जात असल्या तरी त्यांचं प्रमाण या ब्रह्म मुहूर्तावर मात्र सर्वात जास्त असतं, असा माझा दीर्घ अनुभव आहे. पण म्हणून आपण गजर वगैरे लावून पहाटे तीनला जांभया देत, आळसवटलेले उठलो, तरी काही सृजनशील कल्पना सुचतीलच, ही शक्यता फारच कमी आहे. पहाटे तीनच्या सुमारास उठून 'ब्रम्हमुहूर्ता' चा लाभ घ्यायचा, तर खालील अटी पूर्ण झालेल्या असल्या पाहिजेत: १. झोप पूर्ण झालेली असली पाहिजे, आणि तात्काळ उठून अंथरुणाच्या बाहेर येण्याचा उत्साह वाटत असला पाहिजे. गजराशिवाय आपोआप झोप उघडलेली असली पाहिजे. २. पोटातले अन्न पूर्ण पचलेले असले पाहिजे, आणि उठल्यावर लगेच शौच्याची भावना/निकड झाली पाहिजे. या दोन गोष्टी साधायच्या, तर खालील दोन गोष्टींची सवय लावून घेतली पाहिजे: १. आदल्या रात्री नऊ -साडेनऊच्या सुमारास झोपणे, आणि २. आदल्या दिवशीचे संध्याकाळचे जेवण (तेही हलके, सुपाच्य) सूर्यास्ताच्या सुमारास झालेले असणे. असे थोडे दिवस केले, की झोप आपोआपच लवकर उघडू लागेल. ज्यांना शक्य असेल त्यांनी दिवसा केंव्हाही, विशेषत: दुपारच्या जेवणानंतर थोडावेळ अवश्य झोप घ्यावी. मग काय मंडळी, घेणार ना 'ब्रह्ममुहूर्ता' चा लाभ?
  • Log in or register to post comments
  • 20747 views

प्रतिक्रिया

Submitted by डॉ सुहास म्हात्रे on Fri, 05/17/2013 - 20:57

In reply to अभ्याशेठ तुमच्यासाठी कायपण by बॅटमॅन

Permalink

लई भारी, वाघूळशेठ !

लई भारी, वाघूळशेठ ! +P
  • Log in or register to post comments

Submitted by चित्रगुप्त on Fri, 05/17/2013 - 14:57

In reply to +१ by मूकवाचक

Permalink

व्वा. किती सात्विक असतील त्या बाला.

Early to bed and early to rise, makes a man healthy and wise, but his girlfriend dates other guys... ... व्वा. किती सात्विक असतील त्या बाला. पहाटे ब्रह्ममुहुर्तावर उठून सडासंमार्जनादि करून 'गायी'ना 'डेट्स' म्हणजे सात्विक खजूर खाउ घालणे, वाहवा. अश्या बाला ज्या पुण्यभूमित आहेत, त्या भारत भूस अभिवादन. गर्वाने म्हणा...
  • Log in or register to post comments
Profile picture for user अभ्या..

Submitted by अभ्या.. on Fri, 05/17/2013 - 15:07

In reply to व्वा. किती सात्विक असतील त्या बाला. by चित्रगुप्त

Permalink

हीहीही

=)) =)) =)) =)) =)) =)) गर्वाने म्हणा... असल्या गायीच्या बैलाला..........................
  • Log in or register to post comments

Submitted by बॅटमॅन on Fri, 05/17/2013 - 15:42

In reply to व्वा. किती सात्विक असतील त्या बाला. by चित्रगुप्त

Permalink

(No subject)

=)) =)) =))
  • Log in or register to post comments

Submitted by चित्रगुप्त on Sun, 05/19/2013 - 04:47

In reply to +१ by मूकवाचक

Permalink

प्राचीन पोथ्यांतील उल्लेख

आत्ता, पहाटे चार वाजता, आम्हाला अचानक स्मरण झाले की आमच्या 'नेपोलियन'..इ. च्या लेखात उल्लेखिलेल्या श्रीमंत तुकोजीराव होळकर यांचे संग्रहातील पोथ्यांमधे खालील कवने पण होती: प्रातःकाळी उठावे दिशेकडे दुरी जावे रात्रौ लवकरचि झोपावे म्हणिजे बरे ... अश्या सवयी ज्या नरा लाभे आरोग्य दिसे बरा बुद्धि-वैभव आणि हुन्नरा पाविजेल की... परि तयाचि मित्र-ललना देई डेट अन्य जना बापुडा झोपे, सखि निर्वसना रमे-गमे मित्रांसवे... ----- आणि शार्दुलविक्रिडितातील हे कवनः झोपे आणि उठे झणीं पुरुष जो - पावेल आयुर्मती गाठी नित्य सखी तयाचि सुभगा - अन्यांस देण्या रती "Early to bed and early to rise, makes a man healthy and wise, but his girlfriend dates other guys" ...याचे मूळ या प्राचीन कवनांमधे आहे, हे तो उघडचि आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रभाकर पेठकर on Sun, 05/19/2013 - 10:23

In reply to प्राचीन पोथ्यांतील उल्लेख by चित्रगुप्त

Permalink

वरिजनल.

हा: हा: अगदी वरिजिनल पुरावा.
  • Log in or register to post comments

Submitted by बॅटमॅन on Sun, 05/19/2013 - 12:42

In reply to प्राचीन पोथ्यांतील उल्लेख by चित्रगुप्त

Permalink

जब्री पुरावा.

जब्री पुरावा. शार्दूलविक्रीडितातले कवन लैच आवडले.
  • Log in or register to post comments
Profile picture for user अभ्या..

Submitted by अभ्या.. on Sun, 05/19/2013 - 14:09

In reply to जब्री पुरावा. by बॅटमॅन

Permalink

मस्त

हीहीहीही. भारीच उत्खनन हाय. लै आवडले. :) पण चित्रगुप्तजी तुम्ही, आमचा बॅट्या, असले हे वृत्तात वगैरे कसे काय लिव्हता बुवा. आम्हाला त्यांची नावे लक्षात ठेवायची मारामार, लक्षणे अन मात्रा तर दूरच. :(.
  • Log in or register to post comments

Submitted by चित्रगुप्त on Sun, 05/19/2013 - 15:17

In reply to मस्त by अभ्या..

Permalink

ब्रह्ममुहुर्ताचा महिमा.

...असले हे वृत्तात वगैरे कसे काय लिव्हता बुवा... घ्या...यालाच म्हणतात रामाची सीता कोण. अहो, हाच तर आहे ब्रह्ममुहुर्ताचा महिमा.
  • Log in or register to post comments

Submitted by संजय क्षीरसागर on Sun, 05/19/2013 - 23:59

In reply to ब्रह्ममुहुर्ताचा महिमा. by चित्रगुप्त

Permalink

अपरात्री कसं सुचतं ते पाहा

परि तयाचि मित्र-ललना देई डेट अन्य जना बापुडा झोपे, सखि निर्वसना रमे-गमे मित्रांसवे...
ब्राह्ममुहुर्ती उठूनी जागा, वेळ मला ती येई न कामा म्हणे कामिनी केवळ घरकामा, बरा असे हा दत्तूमामा अनंगरंग जो उधळून रात्री, दमूनी पहुडला ब्राह्ममुहुर्ती तयावरी ही उधळून प्रिती, कामा लावीन दत्तूमामा
  • Log in or register to post comments

Submitted by रामचंद्र on Tue, 01/30/2024 - 21:41

In reply to अपरात्री कसं सुचतं ते पाहा by संजय क्षीरसागर

Permalink

झकास! 'बदनाम पर तू मस्त मस्त'

झकास! 'बदनाम पर तू मस्त मस्त' या दिव्यवाणीला अनुसरून.
  • Log in or register to post comments

Submitted by चित्रगुप्त on गुरुवार, 05/16/2013 - 16:21

Permalink

सृजनशीलतेचा मक्ता

सृजनशीलतेचा मक्ता फक्त कलावंतांनाच नसतो. जगातील प्रत्येक व्यक्ती कमी-अधिक प्रमाणात सृजनशील असतेच. कल्पकता ही कोणत्याही बाबतीत उपयोगी पडू शकते. जसे गजबललेल्या काँक्रीटच्या जंगलापेक्षा नैसर्गिक वातावरण असलेले जंगल, उद्यान, उपवन इ. जास्त रमणीय, स्फूर्तीदायक, आरोग्यदायक, तशीच संपूर्ण दिवसभरात पहाटेपासून सूर्योदयापर्यंतची वेळ ही उत्तम. हिचा लाभ ज्याने त्याने आपापल्या गरजेप्रमाणे, आवडीप्रमाणे घ्यावा.
  • Log in or register to post comments

Submitted by विनायक प्रभू on गुरुवार, 05/16/2013 - 17:25

Permalink

फायदे

ब्रम्ह मुहुर्तावर उठण्याचे खुप फायदे असतात.
  • Log in or register to post comments

Submitted by प्यारे१ on Fri, 05/17/2013 - 23:04

In reply to फायदे by विनायक प्रभू

Permalink

कृ शि सा न वि वि गुरुवर्य

कृ शि सा न वि वि गुरुवर्य हा हा हा! अवघड आहे ब्वा!
  • Log in or register to post comments

Submitted by मिसळलेला काव्यप्रेमी on Fri, 05/17/2013 - 17:19

Permalink

हम्म

आमचे एक accountancy चे मास्तर होते, त्यांना म्हणे accountancy मध्ये विशिष्ट प्रश्न सोडवायला एक नविन formula सापडला, त्याला त्यांनी formula no. 12 असे नाव दिले. कां तर जेव्हा त्यांना हा फॉरमुला सुचला तेव्हा ते एका चाळीत रहायचे आणि ते असेच ब्राम्हमुहुर्तावर १२ नंबरच्या शौचकुपात....... तर असं आहे या ब्राह्ममुहुर्ताचे :D :D
  • Log in or register to post comments

Submitted by मंदार कात्रे on Wed, 01/22/2014 - 11:46

Permalink

'जीवशास्त्रीय घड्याळ'

'जीवशास्त्रीय घड्याळ' हीच संकल्पना यासंदर्भात लागू पडते . त्याचप्रमाणॅ पहाटे ३ च्या वेळी झोप आर ई एम अवस्थेतली झोप म्हणजेच साखरझोप असते... यावेळेला अनेक क्रिएटीव्ह / सुखद भावना जाग्रुत करणारे हार्मोन स्रवतात ,असे मागे वाचलेले होते.
  • Log in or register to post comments

Pagination

  • First page « First
  • Previous page ‹ Previous
  • पान 1
  • पान 2

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com