Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by चित्रगुप्त on Wed, 05/15/2013 - 13:45
लेखनविषय (Tags)
संस्कृती
कला
वाङ्मय
जीवनमान
राहणी
लेखनप्रकार (Writing Type)
प्रकटन
अनुभव
शिफारस
सल्ला
माझ्या ' मारा डंख मारा डंख मारा बिछुवा' या धाग्याच्या एका प्रतिसादात 'ढालगज भवानी' यांनी " कसं सुचतं हे सगळं ? असा प्रश्न केला होता, त्याचं उत्तर " अहो, ब्रह्म मुहूर्तावर जाग येण्यातून" असं आहे. कसं, ते सांगतो. 'ब्रम्ह मुहूर्त' ज्याला म्हणतात, त्याची नेमकी अशी काही वेळ (पंचांगातील सूर्योदयाच्या नियत वेळेसारखी) असेल, असे वाटत नाही (असल्यास सांगावे). साधारणत: पहाटे तीनच्या सुमाराची वेळ म्हणजे 'ब्रम्ह मुहूर्त' असे म्हटले जाते. पण मुळात त्या वेळेला 'ब्रम्हमुहूर्त' असे का म्हणायचे ? ब्रम्हदेव हा सृष्टीचा निर्माता. सृजनाचा देव. तेंव्हा 'ब्रम्हमुहूर्त' म्हणजे सृजनशीलतेची वेळ. चित्र, लेखन, किंवा अन्य कश्याहीसाठी नवीन कल्पना केंव्हाही, कुठेही सुचून जात असल्या तरी त्यांचं प्रमाण या ब्रह्म मुहूर्तावर मात्र सर्वात जास्त असतं, असा माझा दीर्घ अनुभव आहे. पण म्हणून आपण गजर वगैरे लावून पहाटे तीनला जांभया देत, आळसवटलेले उठलो, तरी काही सृजनशील कल्पना सुचतीलच, ही शक्यता फारच कमी आहे. पहाटे तीनच्या सुमारास उठून 'ब्रम्हमुहूर्ता' चा लाभ घ्यायचा, तर खालील अटी पूर्ण झालेल्या असल्या पाहिजेत: १. झोप पूर्ण झालेली असली पाहिजे, आणि तात्काळ उठून अंथरुणाच्या बाहेर येण्याचा उत्साह वाटत असला पाहिजे. गजराशिवाय आपोआप झोप उघडलेली असली पाहिजे. २. पोटातले अन्न पूर्ण पचलेले असले पाहिजे, आणि उठल्यावर लगेच शौच्याची भावना/निकड झाली पाहिजे. या दोन गोष्टी साधायच्या, तर खालील दोन गोष्टींची सवय लावून घेतली पाहिजे: १. आदल्या रात्री नऊ -साडेनऊच्या सुमारास झोपणे, आणि २. आदल्या दिवशीचे संध्याकाळचे जेवण (तेही हलके, सुपाच्य) सूर्यास्ताच्या सुमारास झालेले असणे. असे थोडे दिवस केले, की झोप आपोआपच लवकर उघडू लागेल. ज्यांना शक्य असेल त्यांनी दिवसा केंव्हाही, विशेषत: दुपारच्या जेवणानंतर थोडावेळ अवश्य झोप घ्यावी. मग काय मंडळी, घेणार ना 'ब्रह्ममुहूर्ता' चा लाभ?
  • Log in or register to post comments
  • 20747 views

प्रतिक्रिया

Submitted by सौंदाळा on Wed, 05/15/2013 - 13:49

Permalink

लेख छान.

लेख छान.
मग काय मंडळी, घेणार ना 'ब्रह्ममुहूर्ता' चा लाभ?
इच्छा असूनही सध्या अवघडच दिसतंय
  • Log in or register to post comments

Submitted by आतिवास on Wed, 05/15/2013 - 13:57

Permalink

ब्रह्ममुहुर्त आणि सृजन यांच

ब्रह्ममुहुर्त आणि सृजन यांच एकास एक नातं असतं तर! बरेच पेपरवाले,रिक्षावाले, आयटीवाले, सुरक्षा रक्षक, फूलवाले, पुजारी ..... कलाकार झाले असते.* निद्रानाश असणारे असंख्य लोकही कलाकार झाले असते ... (बहुसंख्य कलाकारी पाहून ही शंका येतेच म्हणा ) :-) बाकी मला यापेक्षा 'जीवशास्त्रीय घड्याळ' ही संकल्पना जास्त सोयीची वाटते :-) * इथं नोंदवलेले व्यवसाय करणा-या लोकांचा अपमान करण्याचा हेतू नाही, हे आणि इतर कोणतेही व्यवसाय मी तुच्छ मानत नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by सौंदाळा on Wed, 05/15/2013 - 14:16

In reply to ब्रह्ममुहुर्त आणि सृजन यांच by आतिवास

Permalink

बरेच पेपरवाले,रिक्षावाले,

बरेच पेपरवाले,रिक्षावाले, आयटीवाले, सुरक्षा रक्षक, फूलवाले, पुजारी.... वरील लेखातील अटी पूर्ण करत नसावेत असे वाटते.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रकाश घाटपांडे on Sat, 05/18/2013 - 10:58

In reply to ब्रह्ममुहुर्त आणि सृजन यांच by आतिवास

Permalink

बाकी मला यापेक्षा

बाकी मला यापेक्षा 'जीवशास्त्रीय
घड्याळ' ही संकल्पना जास्त सोयीची वाटते
सहमत!
  • Log in or register to post comments

Submitted by ऋषिकेश on Wed, 05/15/2013 - 14:12

Permalink

खिक्

खिक् :D
  • Log in or register to post comments

Submitted by पाषाणभेद on Wed, 05/15/2013 - 14:48

Permalink

माफ करा चित्रगुप्तजी हा लेख

माफ करा चित्रगुप्तजी हा लेख काही पचनी पडला नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by चित्रगुप्त on Wed, 05/15/2013 - 17:08

In reply to माफ करा चित्रगुप्तजी हा लेख by पाषाणभेद

Permalink

....हा लेख काही पचनी पडला

....हा लेख काही पचनी पडला नाही ... जरा आणखी स्पष्टीकरण देता का? म्हणजे लेखातील आशयाशी असहमत, की मांडणीशी, की आणखी काही? अश्या स्पष्टीकरणातूनच शिकायला मिळते, म्हणून विचारले.
  • Log in or register to post comments

Submitted by प्यारे१ on Wed, 05/15/2013 - 18:03

In reply to ....हा लेख काही पचनी पडला by चित्रगुप्त

Permalink

त्यांची बहुधा नाईट शिफ्ट सुरु

त्यांची बहुधा नाईट शिफ्ट सुरु असेल. नथिंग एल्स. ;) पा भे ह घ्या. :)
  • Log in or register to post comments

Submitted by पाषाणभेद on Wed, 05/15/2013 - 18:22

In reply to त्यांची बहुधा नाईट शिफ्ट सुरु by प्यारे१

Permalink

काही मनाला लावून घेवू नका हो.

काही मनाला लावून घेवू नका हो. आपली जी लेखांची मालिका चालू आहे त्यामुळे मला हा देखील लेख तसाच आहे काय असे वाटले. तसलेच लेख येवू द्या.
  • Log in or register to post comments

Submitted by पाषाणभेद on Wed, 05/15/2013 - 18:26

In reply to काही मनाला लावून घेवू नका हो. by पाषाणभेद

Permalink

अन ब्रह्ममुहूर्तावर जाग

अन ब्रह्ममुहूर्तावर जाग येण्यासाठी प्यारे१ म्हणतात तसे नाईट शिप्टवाल्यांना काय कौतूक नाही हो. आमचा ब्रह्ममुहूर्त कधी येतो अन जातो तेच समजत नाही.:-)
  • Log in or register to post comments

Submitted by सूड on Wed, 05/15/2013 - 14:52

Permalink

इच्छा असली तरी...

शक्य नाही असं दिसतंय.
  • Log in or register to post comments

Submitted by मालोजीराव on गुरुवार, 05/16/2013 - 15:25

In reply to इच्छा असली तरी... by सूड

Permalink

+१

आदल्या रात्री नऊ -साडेनऊच्या सुमारास झोपणे
activities रातच्यालाच जास्त असतात...
  • Log in or register to post comments

Submitted by बॅटमॅन on Wed, 05/15/2013 - 14:57

Permalink

म्हंजे ब्राह्ममुहूर्ताच्या

म्हंजे ब्राह्ममुहूर्ताच्या वेळेस जागे असले की झाले, बरोबर? ;) मग झोपून उठा नैतर जागे र्‍हा.
  • Log in or register to post comments

Submitted by ऋषिकेश on Wed, 05/15/2013 - 15:08

In reply to म्हंजे ब्राह्ममुहूर्ताच्या by बॅटमॅन

Permalink

नव्हे नव्हे माझ्यामते दुसरी

नव्हे नव्हे माझ्यामते दुसरी अट अधिक महत्त्वाची आहे:
पोटातले अन्न पूर्ण पचलेले असले पाहिजे, आणि उठल्यावर लगेच शौच्याची भावना/निकड झाली पाहिजे
त्या शांत-प्रशांत वेळी 'तिथे' अनेकांना अनेक कल्पना सुचतात असे म्हणतात ;)
  • Log in or register to post comments

Submitted by बॅटमॅन on Wed, 05/15/2013 - 15:18

In reply to नव्हे नव्हे माझ्यामते दुसरी by ऋषिकेश

Permalink

ते बाकी खरंच! नेचर अ‍ॅभॉर्स

ते बाकी खरंच! नेचर अ‍ॅभॉर्स व्हॅक्यूम असे वाचले होते त्याचाच पडताळा म्हटला पाहिजे हा , दुसरे काय ;) एकीकडे काहितरी रिकामे झाले की दुसरीकडे काहीतरी भरले पाहिजेच ;)
  • Log in or register to post comments

Submitted by आदूबाळ on गुरुवार, 05/16/2013 - 11:05

In reply to ते बाकी खरंच! नेचर अ‍ॅभॉर्स by बॅटमॅन

Permalink

Matter can neither be created

:)) Matter can neither be created nor destroyed. It can only be transformed from one form to another. ऐसे फिजिक्सचे बोलां... :))
  • Log in or register to post comments

Submitted by बॅटमॅन on गुरुवार, 05/16/2013 - 12:27

In reply to Matter can neither be created by आदूबाळ

Permalink

हीहीही

हीहीही =)) =))
  • Log in or register to post comments

Submitted by स्पा on Wed, 05/15/2013 - 15:06

Permalink

या रविवारी सकाळी ४ पासून

या रविवारी सकाळी ४ पासून कोकणवारीला सुरुवात करणार असल्याने , अपोआप ब्राह्मी मुहूर्तावर उठणे आलेच. बाकी लेख उगाच वाटला
  • Log in or register to post comments

Submitted by प्यारे१ on Mon, 05/20/2013 - 00:17

In reply to या रविवारी सकाळी ४ पासून by स्पा

Permalink

Kokan calling.. .... by by

Kokan calling.. .... by by mumbai - FB Wall. ;)
  • Log in or register to post comments

Submitted by स्पंदना on Wed, 05/15/2013 - 17:54

Permalink

ब्राह्म मुहुर्तावर उठण्याचे

ब्राह्म मुहुर्तावर उठण्याचे यम नियम.
  • Log in or register to post comments

Submitted by ढालगज भवानी on Wed, 05/15/2013 - 17:58

Permalink

मस्त!!!

मस्त!!!
  • Log in or register to post comments

Submitted by ५० फक्त on Wed, 05/15/2013 - 18:23

Permalink

असा अनुभव आहे खरा, पण ब-याचदा

असा अनुभव आहे खरा, पण ब-याचदा असं होतं की माझे लिखाणातली पात्रं पहाटेच काय पण भर रात्री सुद्धा झोप उडवतात आणि मग उठुन बसावं लागतं कळफलक बडवत.
  • Log in or register to post comments

Submitted by आदिजोशी on Wed, 05/15/2013 - 18:26

Permalink

लोकं काहीही विचारतात

इतकं सिरियसली घ्यायची नसते प्रत्येक कॉमेंट.
  • Log in or register to post comments

Submitted by चित्रगुप्त on Wed, 05/15/2013 - 18:54

Permalink

हा लेख सुद्धा

....इतकं सिरियसली घ्यायची नसते प्रत्येक कॉमेंट.... अहो, हा लेख सुद्धा ब्रह्ममुहुर्तालाच सुचला. करणार काय? आदतसे मजबूर. खरंतर या विषयावर आणखीही लिहिण्यासारखं आहे, म्हणजे त्यावेळेला पिंगळा येऊन बोलून जातो, सत्व-रज-तम इ. चे आठ-आठ तासांचे चक्र असते, त्यापैकी पहाटे सत्वगुणाचे प्राबल्य असते, वगैरे वगैरे. पण हे बहुधा पचनी पडणार नाही, म्हणून लिहिले नाही. पण ज्यांना शक्य असेल, कळकळ असेल त्यांनी अवश्य अनुभव घ्यावा, एवढेच सांगू शकतो. मला आर्ट्स्कुलात असतानापासून भल्या पहाटे उठून निसर्गचित्रणासाठी जायच्या ओढीतून जी सवय लागली, ती कायम राहिली, आणि त्यातून खूपच चांगले घडत गेले.
  • Log in or register to post comments

Submitted by सुबोध खरे on Wed, 05/15/2013 - 18:59

Permalink

कठीण आहे

आम्ही कितीही वाजता झोपलो तरीही पहाटे तीन वाजता उठणे अशक्य आहे. बरं झालं आम्ही कलाकार नाही. नाहीतर उपाशी मेलो असतो. पहाटे तीन पर्यंत जागणे सहज शक्य आहे.एखादी गप्पांची किंवा गाण्याची मैफिल असेल तर पहाटे सहा पर्यंत सुद्धा जागणे शक्य आहे पण पहाटे तीनच काय सात वाजता सुद्धा जाग येत नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by भटक्य आणि उनाड on Sat, 05/18/2013 - 10:07

In reply to कठीण आहे by सुबोध खरे

Permalink

१०० % खरे !!!

सह्मत तुमच्याशी !!!
  • Log in or register to post comments

Submitted by प्रसाद गोडबोले on Wed, 05/15/2013 - 19:03

Permalink

पटले

पण अवघड आहे .
  • Log in or register to post comments

Submitted by पिवळा डांबिस on Wed, 05/15/2013 - 22:39

Permalink

इंप्रॅक्टिकल!!

कल्पना सुचण्यासाठी पहाटे तीन वाजता उठायचं.. म्हणजे रात्री नवाला झोपायचं... सूर्यास्ताला म्हणजे सहा-साडेसहाला जेवायचं.... मग काय चार वाजताच मैफिल सुरू करायची? भले! कामावरून हाकलून देतील ना आम्हाला!!!! :) त्यापेक्षा तुमच्या (आणि शुचिच्या) कल्पनांचा नुसता आस्वाद घेणंच काय वाईट? बाकी या शुचिच्या प्रतिक्रियांपासून सांभाळा हो! अभिप्राय देऊन देऊन चांगल्या लेखकांना उत्सवमूर्ती बनवून त्यांचं पोटेंशियल घालवण्यात अगदी हातखंडा आहे तिचा!!!!! ;) नाही, एक आपलं निरिक्षण नोंदवलं!!!! :)
  • Log in or register to post comments

Submitted by ढालगज भवानी on Wed, 05/15/2013 - 22:55

In reply to इंप्रॅक्टिकल!! by पिवळा डांबिस

Permalink

काय हो पिडां काडी टाकता???

काय हो पिडां काडी टाकता??? =))
  • Log in or register to post comments

Submitted by मराठे on Wed, 05/15/2013 - 22:45

Permalink

तीन वाजता उठण्याचं मी स्वप्न

तीन वाजता उठण्याचं मी स्वप्न सुद्धा पाहू शकत नाही. खरंतर तीन वाजता झोपलेलंच बरं कारण स्वप्नात चिक्क्कार कल्पना सुचतात. शिवाय पहाटे पडलेली स्वप्न खरीही होतात म्हणे! मी तर असं ऐकलंय की हे विश्व म्हणजे ब्रह्मदेवाला पाहाटेच्या वेळी पडलेलं स्वप्नच आहे!
  • Log in or register to post comments

Submitted by पिवळा डांबिस on गुरुवार, 05/16/2013 - 01:56

In reply to तीन वाजता उठण्याचं मी स्वप्न by मराठे

Permalink

सही तर्क

मी तर असं ऐकलंय की हे विश्व म्हणजे ब्रह्मदेवाला पाहाटेच्या वेळी पडलेलं स्वप्नच आहे!
शौचाची भावना/ निकड लागल्यावर पडलं असलं पाहिजे त्याला हे स्वप्न! ..नायतर हे असलं प्रसरण पावणारं विश्व बनवलं नसतं त्याने!!!! :)
  • Log in or register to post comments

Submitted by अस्वस्थामा on गुरुवार, 05/16/2013 - 04:30

In reply to सही तर्क by पिवळा डांबिस

Permalink

ढण्ण्ण् ...!!

ढण्ण्ण् ...!!
  • Log in or register to post comments
Profile picture for user अभ्या..

Submitted by अभ्या.. on गुरुवार, 05/16/2013 - 02:10

Permalink

ब्रह्मदेवाला पाहाटेच्या वेळी

ब्रह्मदेवाला पाहाटेच्या वेळी पडलेलं स्वप्नच आहे
का? ब्रम्हदेवसाहेब उठत नव्हते का ब्रम्ह मुहूर्तावर? का त्याच दिवशी लेट झाला होता? ;) . एनी वे मी एकही चित्र असे ब्रह्म मुहूर्ताच्या सगळ्या अटी पाळून काढलेले नाही. पुढेही जमणार नाही. :)
  • Log in or register to post comments

Submitted by प्रभाकर पेठकर on गुरुवार, 05/16/2013 - 12:15

In reply to ब्रह्मदेवाला पाहाटेच्या वेळी by अभ्या..

Permalink

ब्रह्ममुहूर्त आणि सृजनशिलता.

मी एकही चित्र असे ब्रह्म मुहूर्ताच्या सगळ्या अटी पाळून काढलेले नाही.
ब्रह्म मुहूर्तावर चित्रच काढले पाहिजे असे नाही. सृजनशिलतेचा, विश्वनिर्मीतीचा कुठलाही अविष्कार स्वागतार्ह आहे..... असे आपले मला वाटते.
  • Log in or register to post comments

Submitted by विसोबा खेचर on गुरुवार, 05/16/2013 - 15:02

Permalink

छान..!

छान..! :)
  • Log in or register to post comments

Submitted by मूकवाचक on Fri, 05/17/2013 - 09:20

In reply to छान..! by विसोबा खेचर

Permalink

+१

Early to bed and early to rise, makes a man healthy and wise, but his girlfriend dates other guys असे कुठेतरी वाचलेले आठवले.
  • Log in or register to post comments

Submitted by बॅटमॅन on Fri, 05/17/2013 - 14:12

In reply to +१ by मूकवाचक

Permalink

Early to bed and early to

Early to bed and early to rise, makes a man healthy and wise, but his girlfriend dates other guys
=)) =)) =))
  • Log in or register to post comments
Profile picture for user अभ्या..

Submitted by अभ्या.. on Fri, 05/17/2013 - 14:43

In reply to +१ by मूकवाचक

Permalink

वॉव. लैच भारी

Early to bed and early to rise, makes a man healthy and wise, but his girlfriend dates other guys
वॉव. मुव्वा एक मोट्ठी प्रिंट काढून लावतोच आता ऑफीसात. :) @बटूशास्त्री जरा सुगम मराठीत श्लोकबध्द वगैरे करायला जमेल काय? ;)
  • Log in or register to post comments

Submitted by चित्रगुप्त on Fri, 05/17/2013 - 15:08

In reply to वॉव. लैच भारी by अभ्या..

Permalink

हे घ्या मराठीत

झोपतो आणि उठतो जो लवकरी आरोग्य-बुद्धि लाभे त्यास झडकरी मैत्रिण तयाचि घाली, गोमातेस खजुर सत्वरी.
  • Log in or register to post comments

Submitted by बॅटमॅन on Fri, 05/17/2013 - 15:28

In reply to वॉव. लैच भारी by अभ्या..

Permalink

अभ्याशेठ तुमच्यासाठी कायपण

अभ्याशेठ तुमच्यासाठी कायपण ;) हा घ्या श्लोक. वृत्तः पृथ्वी. निजे लवकरी उठे चटशिरी, तयाला खरी | मिळेल धनबुद्धिसंपद बहू, टनाने जरी | नुरे निजसखी तयाजवळि हो, करी दे तुरी | पळोनि इतरांस डेटित बसे, बला ही खरी ||
  • Log in or register to post comments

Submitted by प्रचेतस on Fri, 05/17/2013 - 15:32

In reply to अभ्याशेठ तुमच्यासाठी कायपण by बॅटमॅन

Permalink

काय रे हे. भारीच.

=)) =)) =)) काय रे हे. भारीच.
  • Log in or register to post comments
Profile picture for user अभ्या..

Submitted by अभ्या.. on Fri, 05/17/2013 - 15:35

In reply to अभ्याशेठ तुमच्यासाठी कायपण by बॅटमॅन

Permalink

धन्यवाद!

धन्यवाद! धन्यवाद!! धन्यवाद!!! तुला पण आणि चित्रगुप्तांना पण. @ बॅट्या जरा त्या शेवटच्या ओळीत, पळोनि इतरांस डेटित बसे, बला ही खरी || ऐवजी पळोनि इतरांस डेटित बसे, जणू नर्गिस फखरी || चालेल काय? यमकात बसतेय पण वृत्तात नाही. :(
  • Log in or register to post comments

Submitted by बॅटमॅन on Fri, 05/17/2013 - 15:40

In reply to धन्यवाद! by अभ्या..

Permalink

हम्म हे जरा पाहिले पाहिजे

हम्म हे जरा पाहिले पाहिजे :)
  • Log in or register to post comments

Submitted by चित्रगुप्त on Fri, 05/17/2013 - 16:46

In reply to धन्यवाद! by अभ्या..

Permalink

नरघिस फकरी

नरघिस फकरी म्हणजे काय, याचा जालावर शोध घेता हे मिळाले: Image removed.
  • Log in or register to post comments

Submitted by चित्रगुप्त on Fri, 05/17/2013 - 16:42

In reply to अभ्याशेठ तुमच्यासाठी कायपण by बॅटमॅन

Permalink

वाहवा वाहवा.

'टनाने जरि', 'करी दे तुरी', 'इतरांस डेटित बसे, बला ही खरी' (अबला x बला) अप्रतिम. आमचा त्रिवार कुर्निसात धोपट्फलकपुरुषा.
  • Log in or register to post comments

Submitted by चौकटराजा on Fri, 05/17/2013 - 17:12

In reply to अभ्याशेठ तुमच्यासाठी कायपण by बॅटमॅन

Permalink

आता सांगा ...

आता सांगा ही सरस्वती तुमच्या बोटात ब्राह्मवेळेस आली काय ? तसे नसेल तर चित्रकार भाऊंचे म्हणणे काय आहे यावर ? आँ ? ब्याट्रॉव , काय काय आहे तुमच्या टकुर्‍यात राव ! मस्त !
  • Log in or register to post comments

Submitted by उपास on Fri, 05/17/2013 - 19:25

In reply to अभ्याशेठ तुमच्यासाठी कायपण by बॅटमॅन

Permalink

मस्तच..

डेटितच्या ऐवजी भेटित घातले तर नुसतेच थिल्लर न वाटता त्याला (साहित्यिक) वजन येईल अजून असे वाटते ;)
  • Log in or register to post comments

Submitted by बॅटमॅन on Fri, 05/17/2013 - 19:32

In reply to मस्तच.. by उपास

Permalink

वा! हा पाठ अधिक योग्य आहे.

वा! हा पाठ अधिक योग्य आहे. सूचनेकरिता धन्यवाद :)
  • Log in or register to post comments

Submitted by चित्रगुप्त on Sat, 05/18/2013 - 06:50

In reply to वा! हा पाठ अधिक योग्य आहे. by बॅटमॅन

Permalink

'डेटित' आणि 'भेटित'

...हा पाठ अधिक योग्य... नाही हो, 'डेटित' मधे जी खुमारी आहे, ती 'भेटित' मधे कुठून येणार? पंतप्रधान म. सिंग आणि नवाज शरीफ यांच्या 'भेटित' ...वगैरे साठी ते ठीक आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by बॅटमॅन on Sat, 05/18/2013 - 15:24

In reply to 'डेटित' आणि 'भेटित' by चित्रगुप्त

Permalink

वृत्ताच्या आणि भाषेच्या

वृत्ताच्या आणि भाषेच्या चौकटीत बसवायचे तर भेटित ठीके, पण डेटित चा अर्थ वेगळा आहे तो बसत नाही हेही खरेच म्हणा.
  • Log in or register to post comments

Pagination

  • पान 1
  • पान 2
  • Next page Next ›
  • Last page Last »

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com