Skip to main content

ओले काजु आणि मॅन्गो मार्गारीटा

लेखक स्पा यांनी मंगळवार, 30/04/2013 09:20 या दिवशी प्रकाशित केले.
एकदा सहजच पराण्णांना भेटायला सौंदर्य फुफाट्यात गेलो होतो. बाहेरच्या खोलीत पराण्णा निवांतपणे बसले होते. पुढ्यात नेहमीप्रमाणे कि बोर्ड दाबत मिपावर कुणाची तरी खेचत होते .. "काय कसं काय, मुंबई काय म्हणते, केव्हा आला ठाकुर्लीहून.." असे जुजबी प्रश्न पराण्णा विचारत होते. जरा वेळाने तेथे सोत्री आले. सोकाजीराव त्रिलोकेकर. पूर्वीचे मुंबईकर . पुण्यातल्या मिपा कट्ट्या मध्ये पराण्णा आणि त्यांची ओळख झाली स्वतः सोत्री मद्याचे भोक्ते. अनेक उत्तमोत्तम कॉकटेल , किंवा मोक्टेलस त्यांनीच पराण्णांना दिल्या होत्या असं पराण्णा सांगत असत.. 'काय केव्हा आलात..' असं म्हणून सोत्रींनी हसून स्वागत केलं आणि माझ्या हातावर काही ओले काजू ठेवले. काजू अतिशय क्रिस्पी आणि सुरेख होते.. मी ते पटापट मटकावले परंतु मला प्रश्न असा पडला की त्याची सालं टाकायची कुठे? मग बाहेर जाताना ती सोबत न्यायची आणि टाकून द्यायची असं मी ठरवलं आणि तसाच बसून राहिलो.. माझी चुळबुळ सोत्रीच्या लक्षात आली.. 'माझ्याजवळ द्या ती सालं.. त्यापासून पण एक झकास गोवन कॉकटेल बनवतो मी ते इतक्या सहजतेने म्हणाले की मलाच ती सालं त्यांच्या हातात देतांना अवघडल्यासारखं वाटलं.. "यांना ते मॅन्गो मार्गारीटा पण दे.." पराण्णा म्हणाले.. "खास देवगडचा मॅन्गो मार्गारीटा आहे बर्र का.. " - पराण्णांचा चीरकलेला खर्ज.! सोत्रींनी लगेच तत्परतेने घरून जाऊन माझ्याकरता ते मॅन्गो मार्गारीटा आणलं..अगदी सुरेख, कॉकटेल होतं, त्यात आमरस म्हणजे माझा जीव कि प्राण मग निरोप घेतला.. पराण्णांनी विचारलं, "कसे जाणार?" पराण्णांना एकूणच रस्ते, गाड्या याचा विलक्षण तिटकारा "बाईक ने आलोय .. मस्त रमत गमत जाणार ." हां हां बरोबर.. उगाच रस्त्यांचे, डोंगरांचे फटू काढायचे असतील ..", आता घरी गेलात कि ते फटू टाकून प्रवास वर्णनाची जिलबी टाकू नका मिपावर म्हणजे मिळवली माझ्या जिलबी टाकण्यात पराण्णांनी एवढी उत्सुकता दाखवली की मला गंमतच वाटली..! असो.. कुणी म्हणेल या लेखाचं प्रयोजन काय? काय तर म्हणे ओले काजू खाल्ले..! नि कॉकटेल ढोसले खरं आहे.. आठवण तशी छोटीशी आणि साधीच आहे.. परंतु अशा अनेक लहानसहान आठवणीच कुठेतरी मर्मबंधातली ठेव होतात आणि तीनसांजा झाल्या की या खिडकीतनं, त्या खिडकीतनं घिरट्या घालायला लागतात, अस्वस्थ करतात..! आणि आता फक्त आठवणीच तर आहेत..पटकन एखादा फोन करून किंवा सौंदर्य फुफाट्यात जाऊन चार श्या द्यायला पराण्णा कुठे आहेत..?! ते गेले गुजरात ला

वाचने 18760
प्रतिक्रिया 90

प्रतिक्रिया

थोडी वेगळी; पण आहे भयकथाच :-)

मेले हसून! अजुन बऱ्याच जिलब्या येणे बाकी आहे!

In reply to by बॅटमॅन

घणसोली? ... नवी मुंबईतील एक भाग/उपनगर.... कुणी राहत असेल तर क्रुपया सांगा मला भेटायला आवडेल.. राहुल गारखेडकर

In reply to by सूड

अहो .ऐरोली घणसोली राबोडी तुर्भे वाशी खारघर मानसरोवर मानखुर्द पण आहेत...

In reply to by बॅटमॅन

घणसोली काय असतं हे विचारू नका. तिथे काय असते ते विचारा. एक निर्जन फलाट असतो.... एक फलाट, त्यावर बाकडे, मिपावर अकौंट आणि हातात कळफलक. साला आणखी काय पायजेल ???

एकुणात पराण्णा आणी सोकाजीराव त्रिलोकेकरांमधे "असं" किंवा "तसं" काही आहे असं म्हणायचं आहे वाट्टं !!!!!!

ते मर्मबंधतली ठेव वगैरे भाषा तोंडी यायला चाळीस तरी पावसाळे पहावे लागतात. आपल्याला ती लवकरच येऊ लागली आहे. एकूण द्रष्टेपणाचे लक्षण आहे !

या खिडकीतनं, त्या खिडकीतनं या पेक्षा या सायटीवरुन त्या सायटीवर अस लिही. पराला खिडकी रुचायची नाही. लिहिलय मात्र मस्त.

ओल्या आणि गोड, सुरेख वगैरे काजूची साले मस्त असतात, कोवळी असतात. खाऊन टाकली तरी त्रास होत नाही. कधीकधी मलाही काजू खाताना राहिलेली साले कचऱ्याच्या बादलीपर्यंत जाऊन टाकण्याचा कंटाळा येतो. पण तेव्हा मी ती गपचूप बाजुच्याच्या खिशात टाकतो. लंबकर्ण

In reply to by विश्वनाथ मेहेंदळे

अगदी कोवळ्या काजूगरांची साले जरा जाडच असतात.साले जाड आणि गर अगदी चिमुकला.बी जरा जून झाली की साले पातळ होऊ लागतात आणि खाता येतात.एकेक गर तोंडात जात असताना साले टाकण्यासाठी उठायचा कंटाळा येतो. विडंबन छानच आहे. मात्र, ओले काजू क्रिस्पी नसतात. कटकन तुकडा पडतो हे खरे, पण चर्वण केल्यावर ओलसर पिठूळ चव जिभेवर रेंगाळते. (काजू आनंदे)

अतिशय उत्तम, मस्त, खुमासदार विडंबन.. मज पामराच्या एका क्षुल्लक लेखाचे इतके छान विडंबन झाले याचा आनंद वाटतो.. जियो..! :)

परंतु अशा अनेक लहानसहान आठवणीच कुठेतरी मर्मबंधातली ठेव होतात आणि तीनसांजा झाल्या की या खिडकीतनं, त्या खिडकीतनं घिरट्या घालायला लागतात, अस्वस्थ करतात..!
"ते" आठवले :)

काय रे स्पांड्या वय वर्षे 55 झालय की रे अता तुझे मेल्या काजु खाताना कवळी संभाळ रे बाबा :)) ;) :-P :-D

सारखं आपलं परा, सोत्री, सौंदर्यफुफाटा, बाईक्स न फोटो. उगा त्यातून टाकलेल्या क्षणिक जिलब्या... बॉर झालो राव. *************************************** - ह्ल्क्या घेणे

In reply to by अभ्या..

बॉर झालो राव
आपल्या भावनेचा आदर करतो...परंतु माझ्याकडून या पुढेही असंच काहीसं लेखन होईल असंही नमूद करतो.. आणि यापुढे माझ्या लेखांकडे पूर्णत: दुर्लक्ष करण्याची आपल्याला सूचनावजा विनंती करतो.. smiley धन्यवाद.. -- किसोबा स्केचर

In reply to by स्पा

माझ्या विनंतीकडे पूर्णत: दुर्लक्ष करण्याची आपल्याला सूचनावजा धमकी देतो
आपल्याही तब्येतीचा आणि स्केचिंगचा आदर आहेच या पुढे जिमला जाण्याचे आणि सही देण्याचे कष्ट घेणार नाही ;) -- धन्यवाद *************************************** - कडू बेणे

In reply to by स्पा

इथे कुठे वेळ घालवताय स्पात्या 'वरलीचे एक बाजूला, बंधू मला बंगला बांध चांगला' या ठाकुर्लीत वाजणार्‍या आगरी कोळीगीताचं रसग्रहण वाचायचंय तुम्ही लिहीलेलं. -(भेदक)

In reply to by स्पा

कुणाचे किती किस घेतले . महेश भट ला भेटला काय??? कुणाची कसली व किती स्केचेस काढली... ऐला अ‍ॅणॉटॉमीचा लैच षौक दिसतोया ...!

छान केलयं विडंबन.. :))
'माझ्याजवळ द्या ती सालं.. त्यापासून पण एक झकास गोवन कॉकटेल बनवतो मी'
सोत्री, पाकृची वाट बघत आहे.. येउद्या..

'केतकी पिवळी पडली' कारां च्या धोतराला हात?

आठवण छानच. बाकी शेवटुन चौथी आणि तिसरी ओळ अगदीच दवणीय झाली आहे. ;)

In reply to by गणपा

आणि शेवटाच्या नंतरची पाचवी अन सुरुवातीच्या आधीची दुसरी म्हणजे तर कहर चघळणीय... !

In reply to by सस्नेह

=)) =)) =)) =)) घ्या आता. टवाळ लोक्स महिला असतील तर त्यांना काय म्हणावे बरे? ;)

In reply to by सस्नेह

मुसळ आणि कुठून आलं हो मध्येच? ही हिंसक संस्कृती आहे, तिचा निषेध असो. (अहिंसक बेनवधक) बॅटमॅन.

In reply to by सस्नेह

ते ज्या कडच्या पीशीत ३२०० पटीनी काय बी म्होटं करून पहाता येतया ! म्हून त्येला आसली वाईट खोड लागलीया !

In reply to by अभ्या..

टवाळ लोक्स महिला असतील तर त्यांना काय म्हणावे बरे?
खर्रं खर्रं सांग अभ्या ( वशाडमेल्या), इथे तुला 'टवळी' हे उत्तर अभिप्रेत आहे ना ?

In reply to by सस्नेह

नाही बाबा. तसलं काही नाही. मला एका फुलाचे नाव अभिप्रेत होते, पण म्हणलो असतो तर अभिचे प्रेत झाले असते. ;) म्हणून गप्प बसलो.

In reply to by अभ्या..

एखादा तमिळ/केरळी माणूस या दोन्ही उच्चारांत फरकच करू शकणार नाही अभ्या ;) आणि गोटीभास्कर पण भारीच :) पण त्यात जरा दादा कोंडके-इश दंग्याचे लै पोटेन्शिअल आहे =))

अतिशय उत्तम, मस्त, भेट वर्णन.. मज पामराच्या एका क्षुल्लक भेटीचे इतके छान वर्णन आले याचा आनंद वाटतो.. जियो..! ह्यावरुन आमची आणि सोत्री अण्णांची पहिली भेट आठवली. एका हवाईसंदर्भ दारूत्सवात भट्टी मागच्या एका खोलीत बिका आराम करत होते..मी बाहेर पायलट बनून हवेत उडत होतो..तेव्हा सोत्री अण्णा भेटायला आला होता.. तेव्हा काहीही ओळख नसताना माझ्या पोटावर गुद्दा मारून "दारू वाढव साल्या..रोज सकाळी उठून ढोसायला जात जा.." हे ज्या अधिकाराने सांगितल त्याच अधिकाराने आज मला नेहमी कॉकटेल पाजत असतो.

कौतुक करणा-या, टीका करणा-या, प्रोत्साहनपर, सकारात्मक, नकारात्मक, समिक्षणात्मक, अवांतर/विषयाला सोडून लिहिणा-या अशा सर्व प्रतिसादकर्त्यांचा मी आभारी आहे. --धागोबा (वर)खेचर

In reply to by स्पा

...अवांतर/विषयाला सोडून..
धाग्याचा विषय काय होता ते एकदा सांगाल का प्लीज ???? =========================== हम मौत को सपना बता कर उठ खड़े होंगे यहीं और होनी को ठेंगा दिखा कर खिल खिलाते जायेंगे ===========================

In reply to by स्पा

@--धागोबा (वर)खेचर >>> http://www.freesmileys.org/smileys/smiley-laughing001.gif अरे बास.......! अजुन किति मारशिल पाचर!!! =============================================== हल कत बेणे =))

कैच्या कैच भन्नाट आहे. लेखही, आनी प्रतिक्रियाही. "किसोबा स्केचरही " भन्नाट, स्नेहांकितांची "शेवटानंतरची पाचवी ओळ" हाइ क्लाआअस. मस्त. दिवस मजेत चाल्लाय आज.

स्पा कृपया राग मानून घेऊ नका. तुमचे इथले लेखन वाचले आहे आणि त्यातुनच वरील अपेक्षा लिहिली आहे. इथे दिलेली आठवण सुरेखच आहे पण एक स्वतंत्र लेख म्हणून तुम्ही सातत्याने अशी किरकोळ विडंबने लिहिणे आवडले नाही. एका चाहत्याला तुम्ही नाराज करणार नाही ह्या अपेक्षेने लहान तोंडी मोठा घास घेते आहे. कळावे लोभ असावा. -थंडा मामा

In reply to by आजानुकर्ण

घेतो* आहे असे वाचावे--- प्रतिसाद संपादित करण्याची सोय नसल्याने टंकन दोष निवारण करणे जमले नाही -- उगाच गैरसमज नकोत म्हणून हा खुलासा

चिटर ऐवजी टिचर असे वाचावे. निलकांता स्वसंपदनाची सोय कर रे बाबा.