✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

ओले काजु आणि मॅन्गो मार्गारीटा

स
स्पा यांनी
Tue, 04/30/2013 - 09:20  ·  लेख
लेख
एकदा सहजच पराण्णांना भेटायला सौंदर्य फुफाट्यात गेलो होतो. बाहेरच्या खोलीत पराण्णा निवांतपणे बसले होते. पुढ्यात नेहमीप्रमाणे कि बोर्ड दाबत मिपावर कुणाची तरी खेचत होते .. "काय कसं काय, मुंबई काय म्हणते, केव्हा आला ठाकुर्लीहून.." असे जुजबी प्रश्न पराण्णा विचारत होते. जरा वेळाने तेथे सोत्री आले. सोकाजीराव त्रिलोकेकर. पूर्वीचे मुंबईकर . पुण्यातल्या मिपा कट्ट्या मध्ये पराण्णा आणि त्यांची ओळख झाली स्वतः सोत्री मद्याचे भोक्ते. अनेक उत्तमोत्तम कॉकटेल , किंवा मोक्टेलस त्यांनीच पराण्णांना दिल्या होत्या असं पराण्णा सांगत असत.. 'काय केव्हा आलात..' असं म्हणून सोत्रींनी हसून स्वागत केलं आणि माझ्या हातावर काही ओले काजू ठेवले. काजू अतिशय क्रिस्पी आणि सुरेख होते.. मी ते पटापट मटकावले परंतु मला प्रश्न असा पडला की त्याची सालं टाकायची कुठे? मग बाहेर जाताना ती सोबत न्यायची आणि टाकून द्यायची असं मी ठरवलं आणि तसाच बसून राहिलो.. माझी चुळबुळ सोत्रीच्या लक्षात आली.. 'माझ्याजवळ द्या ती सालं.. त्यापासून पण एक झकास गोवन कॉकटेल बनवतो मी ते इतक्या सहजतेने म्हणाले की मलाच ती सालं त्यांच्या हातात देतांना अवघडल्यासारखं वाटलं.. "यांना ते मॅन्गो मार्गारीटा पण दे.." पराण्णा म्हणाले.. "खास देवगडचा मॅन्गो मार्गारीटा आहे बर्र का.. " - पराण्णांचा चीरकलेला खर्ज.! सोत्रींनी लगेच तत्परतेने घरून जाऊन माझ्याकरता ते मॅन्गो मार्गारीटा आणलं..अगदी सुरेख, कॉकटेल होतं, त्यात आमरस म्हणजे माझा जीव कि प्राण मग निरोप घेतला.. पराण्णांनी विचारलं, "कसे जाणार?" पराण्णांना एकूणच रस्ते, गाड्या याचा विलक्षण तिटकारा "बाईक ने आलोय .. मस्त रमत गमत जाणार ." हां हां बरोबर.. उगाच रस्त्यांचे, डोंगरांचे फटू काढायचे असतील ..", आता घरी गेलात कि ते फटू टाकून प्रवास वर्णनाची जिलबी टाकू नका मिपावर म्हणजे मिळवली माझ्या जिलबी टाकण्यात पराण्णांनी एवढी उत्सुकता दाखवली की मला गंमतच वाटली..! असो.. कुणी म्हणेल या लेखाचं प्रयोजन काय? काय तर म्हणे ओले काजू खाल्ले..! नि कॉकटेल ढोसले खरं आहे.. आठवण तशी छोटीशी आणि साधीच आहे.. परंतु अशा अनेक लहानसहान आठवणीच कुठेतरी मर्मबंधातली ठेव होतात आणि तीनसांजा झाल्या की या खिडकीतनं, त्या खिडकीतनं घिरट्या घालायला लागतात, अस्वस्थ करतात..! आणि आता फक्त आठवणीच तर आहेत..पटकन एखादा फोन करून किंवा सौंदर्य फुफाट्यात जाऊन चार श्या द्यायला पराण्णा कुठे आहेत..?! ते गेले गुजरात ला
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
नृत्य
संगीत
पाकक्रिया
वाङ्मय

प्रतिक्रिया द्या
18570 वाचन

💬 प्रतिसाद (90)

प्रतिक्रिया

_/\_ _/\_ _/\_

सुहास झेले
Tue, 04/30/2013 - 13:26 नवीन
=)) =)) =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

_/\_

सूड
Tue, 04/30/2013 - 13:41 नवीन
=)) कहर!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

__/\__

मिसळलेला काव्यप्रेमी
Tue, 04/30/2013 - 14:13 नवीन
ख ल्ला स !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

(No subject)

बिपिन कार्यकर्ते
Wed, 05/01/2013 - 01:08 नवीन
=)) =)) =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

ज ह ब ह री

उपास
Wed, 05/01/2013 - 02:31 नवीन
ज ह ब ह री :))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

धन्स

स्पा
Tue, 04/30/2013 - 13:43 नवीन
कौतुक करणा-या, टीका करणा-या, प्रोत्साहनपर, सकारात्मक, नकारात्मक, समिक्षणात्मक, अवांतर/विषयाला सोडून लिहिणा-या अशा सर्व प्रतिसादकर्त्यांचा मी आभारी आहे. --धागोबा (वर)खेचर
  • Log in or register to post comments

...अवांतर/विषयाला सोडून..

गणामास्तर
Tue, 04/30/2013 - 13:47 नवीन
...अवांतर/विषयाला सोडून..
धाग्याचा विषय काय होता ते एकदा सांगाल का प्लीज ???? =========================== हम मौत को सपना बता कर उठ खड़े होंगे यहीं और होनी को ठेंगा दिखा कर खिल खिलाते जायेंगे ===========================
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा

त्यासाठी

सूड
Tue, 04/30/2013 - 13:52 नवीन
वेगळी स्पर्धा आयोजित करण्यात येईल. -(असामान्य भोचक)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणामास्तर

@--धागोबा (वर)खेचर >>> अरे

अत्रुप्त आत्मा
Tue, 04/30/2013 - 21:06 नवीन
@--धागोबा (वर)खेचर >>> Image removed. अरे बास.......! अजुन किति मारशिल पाचर!!! =============================================== हल कत बेणे =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा

कै च्या कैच

मन१
Tue, 04/30/2013 - 14:06 नवीन
कैच्या कैच भन्नाट आहे. लेखही, आनी प्रतिक्रियाही. "किसोबा स्केचरही " भन्नाट, स्नेहांकितांची "शेवटानंतरची पाचवी ओळ" हाइ क्लाआअस. मस्त. दिवस मजेत चाल्लाय आज.
  • Log in or register to post comments

मनोबा आगदी माझ्या

jaypal
Tue, 04/30/2013 - 15:56 नवीन
मनातला प्रतीसाद. स्पा गुर्जी दंडवत स्विकारा __/\__
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मन१

ओले काजू मिळूनही त्यांची उसळ

प्रचेतस
Tue, 04/30/2013 - 14:09 नवीन
ओले काजू मिळूनही त्यांची उसळ न करता तसेच तोंडात टाकणार्‍या अल्पसंतुष्ट मनोवृत्तीचा निषेध.
  • Log in or register to post comments

वल्ली काका

स्पा
Tue, 04/30/2013 - 16:38 नवीन
अहो चार ओल्या काजूंची अशी कितीशी उसळ होणार हो .. नि मी एकटा .. मला कोण करून देणार ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

हा हा

आजानुकर्ण
Tue, 04/30/2013 - 16:33 नवीन
स्पा कृपया राग मानून घेऊ नका. तुमचे इथले लेखन वाचले आहे आणि त्यातुनच वरील अपेक्षा लिहिली आहे. इथे दिलेली आठवण सुरेखच आहे पण एक स्वतंत्र लेख म्हणून तुम्ही सातत्याने अशी किरकोळ विडंबने लिहिणे आवडले नाही. एका चाहत्याला तुम्ही नाराज करणार नाही ह्या अपेक्षेने लहान तोंडी मोठा घास घेते आहे. कळावे लोभ असावा. -थंडा मामा
  • Log in or register to post comments

घेतो* आहे असे वाचावे---

आजानुकर्ण
Tue, 04/30/2013 - 16:34 नवीन
घेतो* आहे असे वाचावे--- प्रतिसाद संपादित करण्याची सोय नसल्याने टंकन दोष निवारण करणे जमले नाही -- उगाच गैरसमज नकोत म्हणून हा खुलासा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आजानुकर्ण

सरळ सांगा ना

विकास
Sat, 05/04/2013 - 10:30 नवीन
घेतो* आहे असे वाचावे-
सरळ सांगा ना पेश्शल डब्यात जाण्याचा प्रयत्न केला म्हणून. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आजानुकर्ण

(No subject)

स्पा
Tue, 04/30/2013 - 16:36 नवीन
=)) =))
  • Log in or register to post comments

आरे मेल्यांनो पुरे करा की आता

jaypal
Tue, 04/30/2013 - 16:43 नवीन
किती किती हासवाल? अश्याने एक दिवस जीव जाईल की म्हाता-याचा फेकोबा चिटर
  • Log in or register to post comments

टिचर

jaypal
Tue, 04/30/2013 - 16:45 नवीन
चिटर ऐवजी टिचर असे वाचावे. निलकांता स्वसंपदनाची सोय कर रे बाबा.
  • Log in or register to post comments

होतं असं कधी कधी !!

सूड
Tue, 04/30/2013 - 17:20 नवीन
भावना पोचल्याशी मतलब. आम्ही टिचरच वाचू काळजी नसावी. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: jaypal

कसेही बरोबरच आहे,

विकास
Sat, 05/04/2013 - 10:32 नवीन
चिटर पण टीचर असतोच की. तो/ती आपल्याला शिकवून जातो/ते. फक्त उलटे सत्य असते अशातला भाग नसतो. :) असो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: jaypal

मस्त पाककृती आणि कॉकटेल.

प्यारे१
Tue, 04/30/2013 - 18:15 नवीन
मस्त पाककृती आणि कॉकटेल. ;)
  • Log in or register to post comments

अवांतर - स्पा धारपांच्या

ढालगज भवानी
Tue, 04/30/2013 - 18:26 नवीन
अवांतर - स्पा धारपांच्या एखाद्या कथेचे रसग्रहण करा ना प्लीज. कितीही वाचा मनच भरत नाही.
  • Log in or register to post comments

(No subject)

किसन शिंदे
Tue, 04/30/2013 - 22:02 नवीन
=)) =)) =))
  • Log in or register to post comments

कम्माल आहात सगळेच्या सगळे

जयवी
Tue, 04/30/2013 - 22:03 नवीन
:) कम्माल आहात सगळेच्या सगळे :)
  • Log in or register to post comments

हाहाहाहा अशक्य.

प्रीत-मोहर
Tue, 04/30/2013 - 22:17 नवीन
हाहाहाहा अशक्य. (सोत्रीच्या हातचे कॉकटेल प्यालेली )प्रीमो
  • Log in or register to post comments

मस्त..

मुक्त विहारि
Tue, 04/30/2013 - 22:21 नवीन
छान जमले आहे विडंबन... लगे रहो...
  • Log in or register to post comments

जहबहर्‍या! अशा रेशिप्या अजून

इनिगोय
Tue, 04/30/2013 - 22:27 नवीन
जहबहर्‍या! अशा रेशिप्या अजून यिऊंद्या :))
  • Log in or register to post comments

:)

नीलकांत
Wed, 05/01/2013 - 00:43 नवीन
जबरा :)
  • Log in or register to post comments

नवोदित लेखकांच्या उत्कृष्ट

शैलेन्द्र
Wed, 05/01/2013 - 00:57 नवीन
नवोदित लेखकांच्या उत्कृष्ट लेखांचे आंबवण वापरुन अशा जिलेब्या पाडणार्‍या प्रस्थापित कंपुबाजांचा निषेध. येवरे बोलुन मीनी माजे दोन शब्द संपवतो, जे भना बाला, फुगा खोल्लन का? भेट जे तु खंबाल्पार्‍यान.. जाबतो तुना.. बसोबा अगोचर..
  • Log in or register to post comments

मात्र, "माझ्या जिलबी टाकण्यात

बिपिन कार्यकर्ते
Wed, 05/01/2013 - 01:07 नवीन
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) मात्र, "माझ्या जिलबी टाकण्यात पराण्णांनी एवढी उत्सुकता दाखवली की मला गंमतच वाटली..!" हे वाक्य "जगभर जिलब्या टाकलेल्या पराण्णांनी...." असं हवं होतं ना? ;) ;) ;)
  • Log in or register to post comments

वा!

ब्रिटिश टिंग्या
Fri, 05/03/2013 - 12:30 नवीन
मिपावरच्या सर्वोत्कृष्ट विडंबनांपैकी एक! जियो! - टिंग्या
  • Log in or register to post comments

तेजाला

स्पा
Fri, 05/03/2013 - 12:59 नवीन
बाला .. लई हाभार रं.. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ब्रिटिश टिंग्या

झक्कास

३_१४ विक्षिप्त अदिती
Fri, 05/03/2013 - 22:18 नवीन
घाऊक लिखाणाचं दर्जेदार विडंबन कसं करावं याचं उत्तम उदाहरण. प्रतिसादकांनीही चार चांद लावलेले आहेत. पण लेखाचं शीर्षक वाचून माझ्या अपेक्षा वेगळ्याच प्रकारे चाळवल्या होत्या खर्‍या.
  • Log in or register to post comments

सवय नसल्याने

विकास
Sat, 05/04/2013 - 10:33 नवीन
लिहायला अंमळ जड जात आहे. पण वरील प्रतिसादाशी सहमत. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

एक प्रश्न पडला आहे..

इनिगोय
Fri, 05/03/2013 - 23:09 नवीन
एक प्रश्न पडला आहे.. ''ज्यांना जिलब्या खाता येत नसतील त्यांना यापुढे पुऱ्यांचे ताट द्यावे काय?''
  • Log in or register to post comments

हा हा हा...

सोत्रि
Fri, 05/03/2013 - 23:37 नवीन
ज ह ब र द स्त च ~ - (सालीच कुठलं कॉकटेल करावं ह्या विवंचनेत पडलेला) सोकाजी
  • Log in or register to post comments

लेख आवडला. पण तमाम

राजेश घासकडवी
Sun, 05/05/2013 - 05:41 नवीन
लेख आवडला. पण तमाम मिपाकरांतर्फे बोलतो स्पात्या, ते 'ढोसणी' चे भाग लिहून ठेवले आहेत, ते पूर्ण करा की. आम्ही किती वर्षं वाट पहायची?
  • Log in or register to post comments

सहमत

आजानुकर्ण
Sun, 05/05/2013 - 10:35 नवीन
सहमत. आणि त्यासोबत त्या 'मारल्या चापट'चेही भाग पूर्ण करा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेश घासकडवी

"ढोसणी" पण "मारल्या चापट"

विश्वनाथ मेहेंदळे
Sun, 05/05/2013 - 13:00 नवीन
"ढोसणी" पण "मारल्या चापट" च्या मार्गाने जाणार असली तर अपूर्णच बरी. इतकी वर्षे थांबून काहीतरी मंडेन वाचायला मिळणार असेल तर काय फायदा? त्यापेक्षा अपूर्णतेची हुरहूर परवडली.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आजानुकर्ण
  • «
  • ‹
  • 1
  • 2

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा