✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

प्रिय नाना पाटेकर,

व
विसोबा खेचर यांनी
Mon, 04/29/2013 - 14:30  ·  लेख
लेख
अलीकडेच बदलापूरच्या एका कार्यक्रमात नाना पाटेकर बोलत होता.. नाना म्हणतो की मुंबै माझी नाही...मुंबैत मुखवटे घातलेली माणसं वावरतात..ती म्हणे वाचता येत नाहीत म्हणून नाना म्हणतो की खेड्यात रहाणं त्याला आवडतं.. हा नान्यासुद्धा लेकाचा शेफारलाय अलीकडे.. लेका ज्या मुंबैनं, ज्या मुंबैच्या बॉलीवुडनं तुला मोठा केला.. आता चार दमड्या खिशात आल्यावर मुंबै माझी नाही म्हणतोस..? मुंबैतली माणसं वाचता येत नाही म्हणतोस..? नान्या, खेड्यात कुठेसं फार्महाऊस बांधलंस..त्याकरता पैसा मुंबैतच कमावलास ना..???? नान्या, तू म्हणतोस त्याप्रमाणे नरीमन पॉइंट..कफ परेड.. जळ्ळं तुमचं ते बॉलिवुडवाल्यांचं जुहू..तिथे असतील एक वेळ मुखवटेवाली मंडळी..पण मुंबै फक्त एवढीच काय रे? तुम्ही बॉलीवुडवाले, पैशेवाले..गाड्या उडवता.. अरे जरा मोकळेपणे फिरा मुंबैच्या गल्लीबोळातनं.. बेस्टमधनं..लोकलच्या लगेजच्या डब्यातनं..दाणाबाजार..भातबजार..झालंच तर कुर्ला नेहरूनगर.. आमचा फोरासरोड, फॉकलंड रोड.. खूप खूप चेहरे वाचायला मिळतील रे तुला.. आणि ते तू वाचले आहेस..कारण वेळोवेळी ते तू तुझ्या उत्तम अभिनयातनं दाखवून दिलं आहेस.. nana मग आताच आमच्या मुंबैबद्दल नाराजी का..? नाना, 'मुंबै हे रहायचं ठिकाण नाही..' हे किती सहजपणे तू बोलून गेलास..! अरे लाखो लोकं इथं राहतात...२४ तास रहाटगाडगं सुरू असतं रे त्यांचं..तुझं एक ठीक आहे..आज तुझ्याकडे चार पैशे आले, छानसं फार्महाऊस बांधलंस.. पण आम्हा लाखो मुंबैकरांनी कुठे रहायच रे.. तूच सांग.. एका सवाईगंधर्व महोत्सवात मंडपातल्या एका खोलीत अण्णा आराम करत होते..मी बाहेर रखवालदार म्हणून उभा होतो..तेव्हा तू भेटायला आला होतास.. तेव्हा काहीही ओळख नसताना माझ्या पोटावर गुद्दा मारून "पोट कमी कर साल्या..रोज सकाळी उठून धावायला जात जा.." हे ज्या अधिकाराने सांगितलंस त्याच अधिकाराने आज तुला लिहितो आहे.. खूप चाहता आहे मी तुझा, खूप प्रेम करतो तुझ्यावर..पण नान्या..आमच्या मुंबैला काय नाय बोलायचं..सहन नाही होत ते..! तुझा, तात्या.
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
जीवनमान
लेखनप्रकार (Writing Type)
विचार
प्रतिक्रिया

प्रतिक्रिया द्या
30854 वाचन

💬 प्रतिसाद (65)

प्रतिक्रिया

....

सामान्य वाचक
Mon, 04/29/2013 - 22:27 नवीन
मोठ्या प्रसंगांची बीजे असतात उगाच लहान तोंडी मोठा घास घेऊ नका
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आजानुकर्ण

भापो

श्रीरंग_जोशी
Mon, 04/29/2013 - 22:09 नवीन
तात्या, भावना पोचल्या. एखाद्या प्रसिद्ध व्यक्तिने मनमोकळेपणाने काही म्हंटले तर लगेच तो कसा कृतघ्न आहे अशा आशयाचे विचार मांडणे मला पटत नाही. बाकी नानाचा पहिला मराठी चित्रपट कोणता? मी असे ऐकले होते की स्व. डॅडी देशमुखांनी सर्वप्रथम नानाला त्यांच्या चित्रपटात घेतले होते (थांब टकल्या भांग काढतो - या शीर्षकाचा). जालावर शोधले तर काहीच मिळाले नाही. कदाचित तो चित्रपट अपूर्ण राहिला असावा...
  • Log in or register to post comments

जोशी अभ्यंकर हत्याकांडावरील...

लाल टोपी
Mon, 04/29/2013 - 22:26 नवीन
माफीचा साक्षीदार पहिलमराठी चित्रपट असावा नानाचा.पण खात्री नाही..
  • Log in or register to post comments

.

आशु जोग
Mon, 04/29/2013 - 22:53 नवीन
वा वा वा आज म्हणजे काकांनी कौतुकच मांडलय 'नाना पाटेकर'चं आता काकांच्या शब्दांवर जाऊ नका. भाव पहा. ते आहे ओसंडून जाणारे कौतुक. त्यामुळेच छानसा फोटोबिटो टाकलाय नानाचा. तो काय तक्रार आहे म्हणून की काय. बाकी विसोबाच्या मेल्स आम्हाला नवीन नाहीत. किमान नऊ वर्षे झाली.
  • Log in or register to post comments

-

अमोल केळकर
Tue, 04/30/2013 - 10:22 नवीन
खल्लास. सुपर लाईक :) अमोल केळकर
  • Log in or register to post comments

कौतुक करणा-या, टीका करणा-या,

विसोबा खेचर
Tue, 04/30/2013 - 10:36 नवीन
कौतुक करणा-या, टीका करणा-या, प्रोत्साहनपर, सकारात्मक, नकारात्मक, समिक्षणात्मक, अवांतर/विषयाला सोडून लिहिणा-या अशा सर्व प्रतिसादकर्त्यांचा मी आभारी आहे.. :)
  • Log in or register to post comments

नानाचे मार्केटींग जोरातेय..

तुमचा अभिषेक
Tue, 04/30/2013 - 12:29 नवीन
नुकतेच संजय दत्तबद्दलचे विधान, आता हे मुंबईबद्दल विधान.. साधीच विधाने पण त्यांना देण्यात येणारी प्रसिद्धी.. नवीन शिनेमा येऊ घातलाय काय??
  • Log in or register to post comments

१०-१२ वर्षापुर्वी पुणे इथल्या

वेताळ
Tue, 04/30/2013 - 17:47 नवीन
सामना च्या ऑफिसमध्ये कामा निमित्त मित्रासोबत गेलो होतो.गॅलरीत उभा असताना मागच्या एका गल्लीत नाना कोणाला तरी भेटायला आला होता. माझा मित्र एकदम आरे नाना बघ असे म्हणाला. त्यावर नाना रागाने त्याला म्हणाला" इथे काय मला बघता तिकिट काढुन थेटरात बघा".व गाडीत जावुन बसला.त्यामुळे टिव्हीवर देखिल त्याला बघताना ति़कीट न काढल्याची मनाला चुट्पुट लागुन राहते.
  • Log in or register to post comments

आज संध्याकाळपर्यंत तो हे पत्र

मदनबाण
Tue, 04/30/2013 - 17:55 नवीन
आज संध्याकाळपर्यंत तो हे पत्र नक्की वाचेल..तशी व्यवस्था केली आहे.. काय म्हणाला नाना ? वाचले का पत्र ? काही फिडबॅक वगरै काय म्हणतात तो दिला का ? मी त्याला हॅलो म्हणालो आहे आणि या धाग्यावर त्याच्या बद्धल एक प्रतिसाद देखील दिला आहे असे जमल्यास कळव हो...
  • Log in or register to post comments

.

आशु जोग
Tue, 04/30/2013 - 22:43 नवीन
>चीनी आपल्या देशात १९ किमी आत येउन तंबु ठोकुन बसले आहेत,सरकार घोटाळे निस्तारण्यात व्यस्त आणि जनता IPL बघण्यात ! घोटाळे निस्तारण्यात ? ? ?
  • Log in or register to post comments

बोर्डावर कोणी दणादणा उड्या

शिल्पा ब
Fri, 05/03/2013 - 10:21 नवीन
बोर्डावर कोणी दणादणा उड्या मारायला लागलं की लोकं (उदा. परीकथेतील राजकुमार इ.)लग्गेच जिलेबीचे ताटं नैतर डायर्‍या भेट देतात. संस्थापक म्हणुन लगेच वेगळा न्याय का? शोभतं नै हो !! बाकी लेख म्हणजे मोठ्या लोकांच्या गोष्टी.
  • Log in or register to post comments

अम्रिकन

कुंदन
Fri, 05/03/2013 - 10:25 नवीन
अम्रिकन डायरी पाठवाल का तुम्ही?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शिल्पा ब

आमच्या हाम्रीकेत डायर्‍या

शिल्पा ब
Fri, 05/03/2013 - 10:32 नवीन
आमच्या हाम्रीकेत डायर्‍या नसतात ना भो!! सगळं क्यॅंपुटरवरच असतंय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कुंदन

सगळं क्यॅंपुटरवरच असतंय.

बॅटमॅन
Fri, 05/03/2013 - 12:58 नवीन
सगळं क्यॅंपुटरवरच असतंय.
क्यँपुटर शब्द काळजाला भिडला. एकदम मिरजेतल्या शाळेतील कँपुटर वर्गाची आठवण झाली.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शिल्पा ब

.

आशु जोग
Fri, 05/03/2013 - 13:20 नवीन
छान आहे आयडीया काहीच नाहीतर नाना पाटेकर इ. विषय घेऊन धागा टाकायचा ! टी आर पी पण बरा मिळतो
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा