✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

प्रिय नाना पाटेकर,

व
विसोबा खेचर यांनी
Mon, 04/29/2013 - 14:30  ·  लेख
लेख
अलीकडेच बदलापूरच्या एका कार्यक्रमात नाना पाटेकर बोलत होता.. नाना म्हणतो की मुंबै माझी नाही...मुंबैत मुखवटे घातलेली माणसं वावरतात..ती म्हणे वाचता येत नाहीत म्हणून नाना म्हणतो की खेड्यात रहाणं त्याला आवडतं.. हा नान्यासुद्धा लेकाचा शेफारलाय अलीकडे.. लेका ज्या मुंबैनं, ज्या मुंबैच्या बॉलीवुडनं तुला मोठा केला.. आता चार दमड्या खिशात आल्यावर मुंबै माझी नाही म्हणतोस..? मुंबैतली माणसं वाचता येत नाही म्हणतोस..? नान्या, खेड्यात कुठेसं फार्महाऊस बांधलंस..त्याकरता पैसा मुंबैतच कमावलास ना..???? नान्या, तू म्हणतोस त्याप्रमाणे नरीमन पॉइंट..कफ परेड.. जळ्ळं तुमचं ते बॉलिवुडवाल्यांचं जुहू..तिथे असतील एक वेळ मुखवटेवाली मंडळी..पण मुंबै फक्त एवढीच काय रे? तुम्ही बॉलीवुडवाले, पैशेवाले..गाड्या उडवता.. अरे जरा मोकळेपणे फिरा मुंबैच्या गल्लीबोळातनं.. बेस्टमधनं..लोकलच्या लगेजच्या डब्यातनं..दाणाबाजार..भातबजार..झालंच तर कुर्ला नेहरूनगर.. आमचा फोरासरोड, फॉकलंड रोड.. खूप खूप चेहरे वाचायला मिळतील रे तुला.. आणि ते तू वाचले आहेस..कारण वेळोवेळी ते तू तुझ्या उत्तम अभिनयातनं दाखवून दिलं आहेस.. nana मग आताच आमच्या मुंबैबद्दल नाराजी का..? नाना, 'मुंबै हे रहायचं ठिकाण नाही..' हे किती सहजपणे तू बोलून गेलास..! अरे लाखो लोकं इथं राहतात...२४ तास रहाटगाडगं सुरू असतं रे त्यांचं..तुझं एक ठीक आहे..आज तुझ्याकडे चार पैशे आले, छानसं फार्महाऊस बांधलंस.. पण आम्हा लाखो मुंबैकरांनी कुठे रहायच रे.. तूच सांग.. एका सवाईगंधर्व महोत्सवात मंडपातल्या एका खोलीत अण्णा आराम करत होते..मी बाहेर रखवालदार म्हणून उभा होतो..तेव्हा तू भेटायला आला होतास.. तेव्हा काहीही ओळख नसताना माझ्या पोटावर गुद्दा मारून "पोट कमी कर साल्या..रोज सकाळी उठून धावायला जात जा.." हे ज्या अधिकाराने सांगितलंस त्याच अधिकाराने आज तुला लिहितो आहे.. खूप चाहता आहे मी तुझा, खूप प्रेम करतो तुझ्यावर..पण नान्या..आमच्या मुंबैला काय नाय बोलायचं..सहन नाही होत ते..! तुझा, तात्या.
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
जीवनमान
लेखनप्रकार (Writing Type)
विचार
प्रतिक्रिया

प्रतिक्रिया द्या
30850 वाचन

💬 प्रतिसाद (65)

प्रतिक्रिया

तात्या यू आर राइट्ट....

मन१
Mon, 04/29/2013 - 14:33 नवीन
आता विरोधी बाजूनं कोण दंगा घालायला येतं ते पहायला उत्सुक.
  • Log in or register to post comments

विषयाला धरून असेल तर

विसोबा खेचर
Mon, 04/29/2013 - 14:35 नवीन
विषयाला धरून असेल तर विरोधीबाजूचं स्वागतच आहे.. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मन१

माझ्या

मिसळलेला काव्यप्रेमी
Mon, 04/29/2013 - 14:36 नवीन
माझ्या माहितीप्रमाणे नाना असं म्हणतो कि, 'सध्याची' मुंबई त्याला आवडत नाही. त्याचे लहानपण जिथे गेले त्या मुंबईशी तो रिलेट करु शकत नाही, म्हणून तो म्हणतो कि 'हि' मुंबई माझी नाही.
  • Log in or register to post comments

माझ्या माहितीप्रमाणे नाना असं

विसोबा खेचर
Mon, 04/29/2013 - 14:41 नवीन
माझ्या माहितीप्रमाणे नाना असं म्हणतो कि, 'सध्याची' मुंबई त्याला आवडत नाही. मिकाप्रेमी साहेब, असं नानाने म्हटलेलं नाहीये.त्यानं मुंबैचा सरसकट उल्लेख केला आहे.. आणि मुळात मुंबै ....मुंबै आहे.. तिची आपली एक शान आहे, आपली एक चाल आहे.. सध्याची..पूर्वीची असे फरक मला तरी पटत नाहीत.. तात्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मिसळलेला काव्यप्रेमी

तात्या

मिसळलेला काव्यप्रेमी
Mon, 04/29/2013 - 14:48 नवीन
तात्या, तूनळीवर नानाच्या अनेक मुलाखती आहेत, त्यातील बर्‍याचश्या मुलाखतींमध्ये तो हेच म्हणाला आहे. बदलापूरचे त्याचे वक्तव्य मी ऐकले नाहिये. तो तुम्ही म्हणत आहात तसे म्हणाला असेल तर नक्कीच निषेधार्य आहे. पण काही वर्षांपूर्वीची मुंबई आणि आताची मुंबई यात फरक तर नक्कीच आहे, कारण एक पूर्ण पिढी बदलली आहे. आता त्याला ज्या गोष्टींमध्ये शान दिसते त्या कदाचित आपल्या संकल्पनेपेक्षा वेगळ्या असू शकतात. असो. मला मुंबई, तुम्ही आणि नाना, तिघांबद्दल प्रेम आणि आदर आहे, हे नम्रपणे नमुद करतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर

मस्त रे विसोबा.

गणपा
Mon, 04/29/2013 - 14:40 नवीन
मस्त रे विसोबा. हे पत्र तू धाडच नानाला. :)
  • Log in or register to post comments

आज संध्याकाळपर्यंत तो हे पत्र

विसोबा खेचर
Mon, 04/29/2013 - 14:45 नवीन
आज संध्याकाळपर्यंत तो हे पत्र नक्की वाचेल..तशी व्यवस्था केली आहे.. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणपा

आता रात्र झाली..नानाने पत्र

बंडा मामा
Mon, 04/29/2013 - 22:01 नवीन
आता रात्र झाली..नानाने पत्र वाचले का? उत्तर आले का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर

(No subject)

आजानुकर्ण
Mon, 04/29/2013 - 22:02 नवीन
:):)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बंडा मामा

नाना ला पण कुणी तरी

jaypal
Mon, 04/29/2013 - 14:43 नवीन
मुंबईकराने चांगलाच गंडा घातला असणार त्या शिवाय अस बोलायचा नाही तो. वरळी शुटिंग रेंज वर एकदा दोनदा भेट झाली होती. माणुस मोकळा ढाकळा वाटला. "खायचे दात वेगळे आणि दाखवायचे वेगळे,कामा पुरता मामा ताका पुरती मावशी किंवा ताकाला जाऊन भांड लपवणारा अजीबात वाटला नाही." अवांतर= "पोट कमी कर साल्या..रोज सकाळी उठून धावायला जात जा.." ....अजिबात दुर्लक्ष करू नका नक्की मनावर घ्या.
  • Log in or register to post comments

जयपाल सेठ केम छो ?

मदनबाण
Mon, 04/29/2013 - 21:38 नवीन
जयपाल सेठ केम छो ? ;) बाकी तातुडी च्या धाग्यांवर तुला मुक्त हस्ताने टंकन करताना बघुन लयं आनंद झाला ! ;) तुलाही बराच वेळ मिळतो सध्या ? ;)बाकी लगे रहो... मी वाचतोच आहे बरं... ;) नाना अगदी सरळ आणि स्पष्ट बोलणार अभिनेता आणि व्यक्ती आहे...नाना कोठेही अवचित पोहचतो,मग ते कारगिल असो वा त्याच आवडीचं शुंटिंग रेंज्.बाकी बाळासाहेबांना देखील नानानी सल्ला दिला होता तेव्हा मच्छराचं म्हणणं मी ऐकतं नाही अशी ठाकरी भाषा गरजली होती...थोडक्यात जे नानाच्या मनात तेच ओठात असल्याने त्याच्या विधानाचा कुठला गैर अर्थ काढण्यात काही हाशिल नाही... असो... वाचकांसाठी खालील दुवा देत आहे,इच्छुकांनी आस्वाद घ्यावा. नाना रूपांतील नाना
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: jaypal

आमचा फोरासरोड ???

चौकटराजा
Mon, 04/29/2013 - 14:48 नवीन
तात्या, आमचा फोरासरोड ही काय भान्गड आहे ??
  • Log in or register to post comments

काही वर्षांपूर्वी तिथल्या एका

विसोबा खेचर
Mon, 04/29/2013 - 14:50 नवीन
काही वर्षांपूर्वी तिथल्या एका देशीदारूच्या बारमध्ये कामाला होतो साहेब..भानगड काही नाही.. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौकटराजा

बाप रे !

परिकथेतील राजकुमार
Mon, 04/29/2013 - 14:55 नवीन
देशद्रोही आहे हा नाना. ह्यापुढे ह्या नाना बरोबर काम करणे बंद.
  • Log in or register to post comments

छ्या

मिसळलेला काव्यप्रेमी
Mon, 04/29/2013 - 14:59 नवीन
छ्या, गुजरातेत जाऊन राहणार्‍यांना काय माहित, मुबै काय आहे आणि नाना कोण आहे? उगीच आपली उचलली xxxxx आणि लावली xxxxx..... ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

हम्म्म

परिकथेतील राजकुमार
Mon, 04/29/2013 - 15:01 नवीन
म्हणजे मी आता फोरास रोडला जावे असे तुम्हाला सुचवायचे आहे का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मिसळलेला काव्यप्रेमी

तुम्ही

मिसळलेला काव्यप्रेमी
Mon, 04/29/2013 - 15:03 नवीन
कोणी काही सुचवले त्याप्रमाणे वागता? अरे अरे, त्या गुजरातला पण लाज आणणार तुम्ही.. ;) असो, आता बाकी खरडवहीतून, उगा तात्यांच्या शिव्या बसतील.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

आता तीथे दिखील

jaypal
Mon, 04/29/2013 - 15:04 नवीन
तुझ्या मदती साठी काहीच उरल नसणार. :-) त्या मुळे आहेस तिथेच बरा आहेस.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

सहमत

विनायक प्रभू
Tue, 04/30/2013 - 16:54 नवीन
पराशी सहमत माझ्या पुढल्या पिच्चर मधला रोल परा ला. नानाचा सायनिंग अमाउंट फुकट गेला तरी बेहत्तर.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

एकदम पटला.

राही
Mon, 04/29/2013 - 15:01 नवीन
लेख एकदम पटला, पण उतारवयात वानप्रस्थाची ओढ लागणे हेही साहजिकच आहे म्हणा. (मुंबईप्रेमी)राही
  • Log in or register to post comments

तात्या म्हणतात त्या मुद्द्यात

गवि
Mon, 04/29/2013 - 15:05 नवीन
तात्या म्हणतात त्या मुद्द्यात तथ्य आहे. इथे राहणं आवडत नसलं तर न राहण्याचा पर्याय उपलब्ध आहे. फार्महाऊसमधे राहण्याची कल्पना सर्वांनाच आवडते, पण खात्रीने असं म्हणता येईल की (जुन्या वा नव्या) मुंबईला कितीही नावं ठेवली तरी महिनोन महिने वर्षानुवर्षं फार्महाऊसवरच राहणं हे मुंबईपुण्याच्या माणसाला शक्यच नाही. ते चारपाच दिवसांत कंटाळून परत येतात. खेड्यापाड्यात निसर्गात मस्त जागाबिगा घेऊन ठेवलेली असते. उत्तम प्राप्ती असेल तर तिथे खानसामा, माळी वगैरे ठेवून घर / बंगला जागताही ठेवला जातो. कार्यरत काळात तर नाहीच नाही पण अगदी निवृत्तीनंतरही दीर्घकाळ तिथे जाऊन वसणं फार म्हणजे फार थोड्या लोकांना जमत असावं. पाहण्यात उदाहरण एकही नाही. तेव्हा मुंबई न आवडण्याचा हा तात्कालिक झटका अनेक मुंबईकरांना अधूनमधून येत असतो. त्यातलाच हाही एक असावा. मलाही येतो. अशावेळी मी गोखले उपाहारगृहात जाऊन मिसळ किंवा पॉप टेट्समधे जाऊन आफ्रिकानो फिश चापून येतो. मग परत मुंबई आवडायला लागते. :)
  • Log in or register to post comments

जो पर्यत नाना

सुज्ञ माणुस
Mon, 04/29/2013 - 16:34 नवीन
जो पर्यत नाना तुमच्या आरोपांची शिक्षा भोगून येणार नाही ( वा खंडन करणार नाही ) तोपर्यत मी त्याच्याबरोबर काम करणार नाही :)
  • Log in or register to post comments

तेव्हा मुंबई न आवडण्याचा

सावत्या
Mon, 04/29/2013 - 16:43 नवीन
तेव्हा मुंबई न आवडण्याचा हा तात्कालिक झटका अनेक मुंबईकरांना अधूनमधून येत असतो. त्यातलाच हाही एक असावा. मलाही येतो. १००% सहमत मुंबईची खरी किंमत मुंबई बाहेर पडल्यावरच कळते.(जशी मला कळली) माज्या ओळखीतले एक काका होते त्यांच्यासमोर कोणी मुंबईला नाव ठेवली तर ते म..भ.. ची बाराखडी सुनवत आणि टिकेट कडून देतो आता आपल्या गावाला जा म्हणून सांगत. तर खरा मुद्दा असा की माज्यासारख्या गिरनगावात बालपण आणि तरूणपण गेलेल्या माणसाला कोणी मुंबईला नाव ठेवलेल आवडत नाही. चरितर्थ चालवण्यासाठी मुंबईला यायच, ईथे कारकीर्द घडवायची आणि नंतर मुंबईला शिव्या द्याच्या म्हणजे आपसूक प्रसिधी पण मिळते. त्यामुळे बरेच जण असले उध्योग करतात. वाईट वाटत ते की नाना ने अशी टीका करायला नको होती. अमराठी माणसंच त्यामुळे आपसूक फावत.
  • Log in or register to post comments

सेलीब्रेटी नाना.

प्रभाकर पेठकर
Mon, 04/29/2013 - 16:45 नवीन
लेका ज्या मुंबैनं, ज्या मुंबैच्या बॉलीवुडनं तुला मोठा केला.. आता चार दमड्या खिशात आल्यावर मुंबै माझी नाही म्हणतोस..?
१००% सहमत. एकदा तुम्ही सेलीब्रेटी झालात की तुमच्या प्रत्येक विधानाला काहीतरी वजन प्राप्त होतं. नाना सेलीब्रेटी झाला आहे.पूर्वीची मुंबई राहिली नाही तसेच पूर्वीचा ('पुरूष' नाटकातला)नाना राहिला नाही. जगापेक्षा वेगळे वागणे, बोलणे हा नानाचा स्वभाव आहे. त्यामुळेच तो कधी आवडतो तर कधी आढ्यताखोर वाटतो. नानाने बोलताना विचार करावा. कितीही त्याच्या मनातलं असलं तरी त्याच्या चाहत्यांना दुखावण्याचं पाप त्याने करू नये. लतादीदींनीही ते अनेकदा केले आहे आणि चाहत्यांनी त्या विरुद्ध ओरड केली आहे.असो. सेलिब्रेटींचं जगच वेगळं. सामान्यांनी त्यांना 'मोठं' करावं, त्यांच्यावर हक्क सांगू नये.
  • Log in or register to post comments

+१००

राही
Mon, 04/29/2013 - 17:19 नवीन
सामान्यांनी त्यांना मोठं करावं, त्यांच्यावर हक्क सांगू नये अगदी अगदी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर

हॅ हॅ हॅ

आदिजोशी
Mon, 04/29/2013 - 17:36 नवीन
मुंबईला कुणी एक भिकार म्हटलं तर आपण सात भिकार असं सांगून मोकळं व्हावं. - पु.ल.
  • Log in or register to post comments

मुंबईच्या गर्दी गोंगाटाला

प्रकाश घाटपांडे
Mon, 04/29/2013 - 17:58 नवीन
मुंबईच्या गर्दी गोंगाटाला कंटाळून नाना म्हणाला आहे. गवि म्हणतात तस हा न आवडण्याचा झटका येत असतो. पुणेकरांना पुण्याच्या बाबतीत येतो. त्यात एवढ काय विशेष? फार राजकारण करता ब्वॉ! बघा बघा कशा प्रांतिक, भाषिक ,जातीय अस्मिता काम करतात ते! नाना पहिल्यांदा माणुस आहे ते अभिनेता वगैरे सगळे नंतर! अहो हित मानूस सोताला बी कंटाळतोय
  • Log in or register to post comments

खरं सांगायचं तर ज्याचं

जेनी...
Mon, 04/29/2013 - 18:32 नवीन
खरं सांगायचं तर ज्याचं मुंबैवर जास्त प्रेम असतं तोच सदानकदा " हॅ .. मुंबैला रहायला आवडत नै , मुंबै र्हायचं ठिकाणच नै " असं म्हणत असतो .. पण जेव्हा त्याच मुंबैवर कोणतहि संकट येत तेव्हा हीच माणसं जास्त हळहळताना पाहिली आहेत .. हे माझ्याच पप्पांचं उदाहरण आहे ... ६८ साली पप्पा मुंबैत आले ..४५ वर्ष मुंबैत काढली तरीहि नानासारखच म्हणतात .. अन गावाला जातात ... मुंबैतलं धावपळीचं , ओळखीचं , भिनलेलं आयुष्य जगायची सवय झालेले ते तिथं उगाच झाडाझुडपात , शेतात मन रमवत बसतात .. शेवटी करमेनासं होतं .. मग येतात मुंबैत , फ्रेश व्हायला त्यांना जमत नाहि मुंबैपासुन जास्त काळ दूर रहाणं .... पण तरीहि म्हणतात .. " ह्या मुंबैत रहायला अजिबात आवडत नाहि , आपलं गावच बरं ! " ह्यावरुन तरी असं वाटतं कि नानालाहि उतारवयाच्या झळया लागल्यात .
  • Log in or register to post comments

धु धु धुणार !!!

सुधीर मुतालीक
Mon, 04/29/2013 - 18:36 नवीन
तुमच्या लिखाणाशी संपूर्ण सहमत आहे. तुमच्या ढेरी बद्दल नानाने काही बोलणे हा तुमचा विनयभंग आहे. नानाला तुम्ही माफ केलं हा तुमचा मोठेपणा आहे. नाना जेवढा माणुसकीचा आणि देशभक्तीचा आव आणतो तेवढा तो पाक नाही हे त्याच्या बोलण्या वागण्यातून त्याने दाखवून दिलंय. प्रश्न असा आहे की हे नानान्धळ्याना कोण समजावणार ? इथे सुद्धा आनन्दिता आणि बाबा पवार प्रभृतींनी हे तुमचे लिखाण वाचल्यावर ते तुम्हाला आता धुणार !!! धु धु धुणार !!!
  • Log in or register to post comments

आवो सुधिर काका त्यांच्याधी

जेनी...
Mon, 04/29/2013 - 18:40 नवीन
=)) आवो सुधिर काका त्यांच्याधी तुमीच केवढं धुतलय =)) मजा आला ! :D :P
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुधीर मुतालीक

मुतालीक साहेब,

विसोबा खेचर
Mon, 04/29/2013 - 18:55 नवीन
मुतालीक साहेब, >>इथे सुद्धा आनन्दिता आणि बाबा पवार प्रभृतींनी हे तुमचे लिखाण वाचल्यावर आनन्दिता आणि बाबा पवार ही मंडळी कोण आहेत?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुधीर मुतालीक

नाना जेवढा माणुसकीचा आणि

रेवती
Mon, 04/29/2013 - 19:11 नवीन
नाना जेवढा माणुसकीचा आणि देशभक्तीचा आव आणतो तेवढा तो पाक नाही याचा किस्सा एका मैत्रिणीनं सांगितलाय. आधी माझा विश्वास बसला नाही पण नंतर "सगळ्यांचे पाय मातीचेच!" असे तिने म्हटल्यावर ओक्के वाटले. तसे असेल तर ठीक!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुधीर मुतालीक

नानाच तो..

उपास
Mon, 04/29/2013 - 19:24 नवीन
मुंबईला वैतागलोय असं आपण सुद्धा दहावेळा म्हणतो.. गर्दी, प्रदूषण, अस्वच्छता ह्या संदर्भातच असतं ते. माझी लहानपणची मुंबई राहिली नाही ही हळहळ प्रत्येकालाच जाणवेल. पण तात्या, नानाच्या ह्या विधानाचा 'नानाने मुंबई विरुद्ध गरळ ओकली' असा सरळसरळ चुकीचा अर्थ लावणार्‍या पीतपत्रिकारीतेचा निषेध करावा तितका कमीच. आता नानासारख्या माणसाने रस्त्यावर फिरावे म्हणजे ह्याच गर्दीचा ससेमिरा त्याच्यामागे लागेल अशी तुझी अपेक्षा असेल तर कमालच, अरे बाबा नानाचे पाय मातीचेच आहेत पण तो मनात आलेलं सरळ बोलणारा आहे, रोखठोक आहे. उगाच गोग्गोड बोलणारा नाही. लोंढ्या पुढे दबलेल्या हतबल मुंबई बद्दलची दुखरी नस नानाने व्यवस्थित पकडलेय एवढचं म्हणेन. त्या भाषणाचा संदर्भ तोडून विश्लेषण करायचं म्हटलं तर कुठलाही अर्थ काढता येईल. तूर्तास नाना कळण्यासाठी अभ्यास वाढवा इतकचं म्हणेन. *नानंधळेपणा काय नाय पण बिनधास्तपणा असावा तर नानाकडेच. बॉलीवूडमधल्या मराठी कलाकाराने माज केला तर माफ करायला आपण तयार आहे आणि नानासारखा सामाजिकतेचं भान असलेला असेल तर नक्कीच! अवांतर - परवा करण जोहर म्हणाला की बॉलीवूड मधली समव्यावसायिक पूर्वीच्या समव्यावसायिंकासारखे मिळून मिसळून राहात नाहीत, त्याबद्दलही धागा काढणार का आता? :)
  • Log in or register to post comments

प्रतिसाद पटला नाही..परंतु

विसोबा खेचर
Mon, 04/29/2013 - 19:28 नवीन
प्रतिसाद पटला नाही..परंतु आवडला.. धन्यवाद.. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: उपास

अवांतर - तात्या फैय्याज

ढालगज भवानी
Mon, 04/29/2013 - 19:36 नवीन
अवांतर - तात्या फैय्याज यांच्या "चार होत्या पक्षीणी त्या" या गाण्याचे रसग्रहण करा ना प्लीज. कोणत्या रागात आहे हो ते गाणे? कितीही ऐका मनच भरत नाही.
  • Log in or register to post comments

ओ तात्या

आदिजोशी
Mon, 04/29/2013 - 19:44 नवीन
तूर्तास आम्हाला नाना पेक्षा रोशनी मधे जास्त इंटरेस्ट आहे. सद्ध्या ज्या वेगाने तुमचे लेख येत आहेत त्यावरून तुम्हाला वेळ आहे असा अंदाज येऊ शकतो. त्यामुळे, बाकीचं सोडा, रोशनीला धरा :)
  • Log in or register to post comments

अगदी अगदी.... बोर्डावर अव्वल

सुहास झेले
Mon, 04/29/2013 - 20:16 नवीन
अगदी अगदी.... बोर्डावर अव्वल नंबर हाये गेले काही दिवस ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदिजोशी

+११११

मी-सौरभ
Mon, 04/29/2013 - 20:17 नवीन
पूर्णपणे सहमत आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदिजोशी

अॅड्या, सुझे, सौर्या या

किसन शिंदे
Mon, 04/29/2013 - 20:25 नवीन
अॅड्या, सुझे, सौर्या या तिघांशीही १०० वेळा सहमत! रोशनी तर टाकाच पण टकल्या बापटही पूर्ण करा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदिजोशी

रोशनीच्या वाटेला गेले नाही पण

ढालगज भवानी
Mon, 04/29/2013 - 20:35 नवीन
रोशनीच्या वाटेला गेले नाही पण टकल्या बापट मालीका फार आवडलेली.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: किसन शिंदे

हो मीच आधीची "शुचि."

बंडा मामा
Mon, 04/29/2013 - 21:58 नवीन
हो मीच आधीची "शुचि." एक अवांतर शंका : हे नाव कसे काय बदललेत?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ढालगज भवानी

डु आय डी घेतला

ढालगज भवानी
Mon, 04/29/2013 - 23:14 नवीन
डु आय डी घेतला
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बंडा मामा

त्या आधी "गुंडा" येउदे

टवाळ कार्टा
Mon, 04/29/2013 - 20:38 नवीन
त्या आधी "गुंडा" येउदे ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदिजोशी

च्यायला...

आदिजोशी
Tue, 04/30/2013 - 16:21 नवीन
गुंडावर अवतरलाय एक लेख आधीच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

हो पण तो "पाचवी खोली"च्या

टवाळ कार्टा
Wed, 05/01/2013 - 17:12 नवीन
हो पण तो "पाचवी खोली"च्या उंचीवर नाही पोचला :(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदिजोशी

जौ द्या तात्या. नानाजी को

प्यारे१
Mon, 04/29/2013 - 20:27 नवीन
जौ द्या तात्या. नानाजी को बक्ष दिजिए. झमझम बार, रोशनी चे किस्से येऊ दे आणखी.
  • Log in or register to post comments

ये है (बं/मुं)बई मेरी जान :)

अर्धवटराव
Mon, 04/29/2013 - 21:01 नवीन
मुंबईला कावलेल्या मुंबैप्रेमी नान्याला सलाम, त्याच्या रोकठोक जबानीला सलाम. नान्याच्या जबानीला कावलेल्या मुंबैप्रेमी तात्याला सलाम, त्याच्या रोकठोक लेखणीला सलाम. तात्याच्या अपूर्ण रोशनीला कावलेल्या मिपाकरांना सलाम, त्यांच्या जीवंत मराठी प्रेमाला सलाम. "पुर्वीची" न राहिलेल्या मराठी मुंबईला सलाम, त्या मुंबईला कावलेल्या मुंबैप्रेमी नान्याला सलाम. हुश्श... झाले वर्तुळ पूर्ण. अर्धवटराव
  • Log in or register to post comments

नाना, तात्या आणि मुंबई

पिवळा डांबिस
Mon, 04/29/2013 - 21:47 नवीन
आम्हाला नाना आवडतो, एक निराळा अभिनय करणारा मराठी कलावंत म्हणून! आम्हाला तात्या आवडतो, मनात आलं की तिच्यायला रोखठोख लिहून टाकणारा म्हणून!! आम्हाला मुंबईही आवडते, जरी सध्या तिथे रहात नसलो तरी माय मुंबादेवी म्हणून!!! आता नाना म्हणे बदलला, पूर्वीसारखा साधा नाही राहिला.. तात्याही म्हणे बदलला, पूर्वीसारखं लिहिनासा झाला.. आणि मुंबईही म्हणे बदलली, गर्दी आणि घाण वाढली... गुजर गया जमाना, बस अब बाकी रहा ही क्या है? :(
  • Log in or register to post comments

एका सवाईगंधर्व महोत्सवात

बंडा मामा
Mon, 04/29/2013 - 22:00 नवीन
एका सवाईगंधर्व महोत्सवात मंडपातल्या एका खोलीत अण्णा आराम करत होते..मी बाहेर रखवालदार म्हणून उभा होतो..तेव्हा तू भेटायला आला होतास.. तेव्हा काहीही ओळख नसताना माझ्या पोटावर गुद्दा मारून "पोट कमी कर साल्या..रोज सकाळी उठून धावायला जात जा.." हे ज्या अधिकाराने सांगितलंस त्याच अधिकाराने आज तुला लिहितो आहे..
ह्यावर एक स्वतंत्र लेख न लिहिल्याबद्दल आभारी आहे.
  • Log in or register to post comments

ऍक्चुअली

आजानुकर्ण
Mon, 04/29/2013 - 22:13 नवीन
वरील लेख हा सदर परिच्छेदासंदर्भातच आहे असे मानण्यास जागा आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बंडा मामा
  • 1
  • 2
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा