प्रिय नाना पाटेकर,
अलीकडेच बदलापूरच्या एका कार्यक्रमात नाना पाटेकर बोलत होता..
नाना म्हणतो की मुंबै माझी नाही...मुंबैत मुखवटे घातलेली माणसं वावरतात..ती म्हणे वाचता येत नाहीत म्हणून नाना म्हणतो की खेड्यात रहाणं त्याला आवडतं..
हा नान्यासुद्धा लेकाचा शेफारलाय अलीकडे.. लेका ज्या मुंबैनं, ज्या मुंबैच्या बॉलीवुडनं तुला मोठा केला.. आता चार दमड्या खिशात आल्यावर मुंबै माझी नाही म्हणतोस..? मुंबैतली माणसं वाचता येत नाही म्हणतोस..?
नान्या, खेड्यात कुठेसं फार्महाऊस बांधलंस..त्याकरता पैसा मुंबैतच कमावलास ना..????
नान्या, तू म्हणतोस त्याप्रमाणे नरीमन पॉइंट..कफ परेड.. जळ्ळं तुमचं ते बॉलिवुडवाल्यांचं जुहू..तिथे असतील एक वेळ मुखवटेवाली मंडळी..पण मुंबै फक्त एवढीच काय रे? तुम्ही बॉलीवुडवाले, पैशेवाले..गाड्या उडवता.. अरे जरा मोकळेपणे फिरा मुंबैच्या गल्लीबोळातनं.. बेस्टमधनं..लोकलच्या लगेजच्या डब्यातनं..दाणाबाजार..भातबजार..झालंच तर कुर्ला नेहरूनगर.. आमचा फोरासरोड, फॉकलंड रोड.. खूप खूप चेहरे वाचायला मिळतील रे तुला.. आणि ते तू वाचले आहेस..कारण वेळोवेळी ते तू तुझ्या उत्तम अभिनयातनं दाखवून दिलं आहेस..
मग आताच आमच्या मुंबैबद्दल नाराजी का..?
नाना, 'मुंबै हे रहायचं ठिकाण नाही..' हे किती सहजपणे तू बोलून गेलास..!
अरे लाखो लोकं इथं राहतात...२४ तास रहाटगाडगं सुरू असतं रे त्यांचं..तुझं एक ठीक आहे..आज तुझ्याकडे चार पैशे आले, छानसं फार्महाऊस बांधलंस.. पण आम्हा लाखो मुंबैकरांनी कुठे रहायच रे.. तूच सांग..
एका सवाईगंधर्व महोत्सवात मंडपातल्या एका खोलीत अण्णा आराम करत होते..मी बाहेर रखवालदार म्हणून उभा होतो..तेव्हा तू भेटायला आला होतास.. तेव्हा काहीही ओळख नसताना माझ्या पोटावर गुद्दा मारून "पोट कमी कर साल्या..रोज सकाळी उठून धावायला जात जा.." हे ज्या अधिकाराने सांगितलंस त्याच अधिकाराने आज तुला लिहितो आहे..
खूप चाहता आहे मी तुझा, खूप प्रेम करतो तुझ्यावर..पण नान्या..आमच्या मुंबैला काय नाय बोलायचं..सहन नाही होत ते..!
तुझा,
तात्या.
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
लेखनप्रकार (Writing Type)
प्रतिक्रिया
तात्या यू आर राइट्ट....
विषयाला धरून असेल तर
माझ्या
माझ्या माहितीप्रमाणे नाना असं
तात्या
मस्त रे विसोबा.
आज संध्याकाळपर्यंत तो हे पत्र
आता रात्र झाली..नानाने पत्र
(No subject)
नाना ला पण कुणी तरी
जयपाल सेठ केम छो ?
आमचा फोरासरोड ???
काही वर्षांपूर्वी तिथल्या एका
बाप रे !
छ्या
हम्म्म
तुम्ही
आता तीथे दिखील
सहमत
एकदम पटला.
तात्या म्हणतात त्या मुद्द्यात
जो पर्यत नाना
तेव्हा मुंबई न आवडण्याचा
१००% सहमत मुंबईची खरी किंमत मुंबई बाहेर पडल्यावरच कळते.(जशी मला कळली) माज्या ओळखीतले एक काका होते त्यांच्यासमोर कोणी मुंबईला नाव ठेवली तर ते म..भ.. ची बाराखडी सुनवत आणि टिकेट कडून देतो आता आपल्या गावाला जा म्हणून सांगत. तर खरा मुद्दा असा की माज्यासारख्या गिरनगावात बालपण आणि तरूणपण गेलेल्या माणसाला कोणी मुंबईला नाव ठेवलेल आवडत नाही. चरितर्थ चालवण्यासाठी मुंबईला यायच, ईथे कारकीर्द घडवायची आणि नंतर मुंबईला शिव्या द्याच्या म्हणजे आपसूक प्रसिधी पण मिळते. त्यामुळे बरेच जण असले उध्योग करतात. वाईट वाटत ते की नाना ने अशी टीका करायला नको होती. अमराठी माणसंच त्यामुळे आपसूक फावत.सेलीब्रेटी नाना.
+१००
हॅ हॅ हॅ
मुंबईच्या गर्दी गोंगाटाला
खरं सांगायचं तर ज्याचं
धु धु धुणार !!!
आवो सुधिर काका त्यांच्याधी
मुतालीक साहेब,
नाना जेवढा माणुसकीचा आणि
नानाच तो..
प्रतिसाद पटला नाही..परंतु
अवांतर - तात्या फैय्याज
ओ तात्या
अगदी अगदी.... बोर्डावर अव्वल
+११११
अॅड्या, सुझे, सौर्या या
रोशनीच्या वाटेला गेले नाही पण
हो मीच आधीची "शुचि."
डु आय डी घेतला
त्या आधी "गुंडा" येउदे
च्यायला...
हो पण तो "पाचवी खोली"च्या
जौ द्या तात्या. नानाजी को
ये है (बं/मुं)बई मेरी जान :)
नाना, तात्या आणि मुंबई
एका सवाईगंधर्व महोत्सवात
ऍक्चुअली