✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

"दाखवणे" आणि फॉर्मल कपडे

श
शिल्पा ब यांनी
Sat, 04/20/2013 - 09:39  ·  लेख
लेख
बॅटमॅनचा हा धागा वाचला अन मनात काही प्रश्न निर्माण झाले. म्हंटल दुसरा धागाच उसवावा. असो. तर आता आमच्या डोक्यात आलेल्या प्रश्नांबद्दलः लग्नाचं वय झालं (वेगवेगळ्या आई-वडीलांच्या मते १६ पासुन पुढे ) कि दाखवण्याचे प्रकार सुरु होतात...म्हणजे मुलाला मुलगी दाखवणे वेग्रे. गैरसमज नको उगाच. तर अशा प्रसंगी मुलींना साधारणपणे साडी घालायचा आग्रह होतो. म्हणजे शाळा कालेजात असताना अन बाहेर हिंडताना भले पँट / जीन्स/ स्कर्ट / हाप्पँट / बर्मुडा / पंजाबी ड्रेस - त्यातही बरेच प्रकार आहेत, झालंच तर थ्री फोर्थ वेग्रे घालणार पण पसंतीच्या वेळेस मात्र साडीच असावी. का? तर भारतीय प्रथा आहे शिवाय आपले संस्कार दिसतात असं कारण. साडी घातल्याने संस्कार कसे दिसतात हा एक प्रश्न. मुलं मात्र जीन्स - टी शर्ट झालंच तर बर्मुडा (आजकाल याला कै वेगळं नाव असेल तर माहीत नै) असं घालतात...म्हणजे जर घातलंच तर आक्षेप नसतो. फॉर्मल कपडे जसे की साधा शर्ट अन फॉर्मल पँट सुद्धा घालतात नै असं नै. आता मुलांना मुळातच कपड्यांच्या निवडी अतिशय कमी त्याला आमचा नाईलाज आहे अन म्हणुनच दोन - तीन उदा. दिलेत. एकदा आम्हाला मुलगा पहायला मंबईतुन पुण्याला जायचं असल्याने हे सगळं कसं सांभाळायचं असा प्रश्न पडल्याने शेवटी जीन्स अन आखुड शर्ट घालुन जावं लागलं. एकच एक दाखवायच्या वेळेस उपयोगी म्हणुन आणलेला पंजाबी ड्रेस धुण्यात होता हे अजुन एक कारण. आधुनिक लोकं असल्याने .किंवा "अशा वेळेस कशी बै शर्ट पँट घातली? अशी मुलगी नकोच" म्हणुनही असेल पण कोणी (म्हणजे मुलगा अन त्याची आई)यांनी कै आक्षेप घेतला नै. असो. तर मुद्द्या म्हणजे फक्त दाखवायचा / पसंतीचा प्रोग्रॅम असताना असे साडीच घालायचा आग्रह कितपत योग्य आहे? मिपाकरांनी आपापले अमुल्य मत द्यावे. टीप : आमचं लग्न होउन बाळ सुद्धा शाळेत जातंय पण इतरांना उपयोग होईल या सामाजिक कारणाने हा काकु. उगाच भलत्या चौकशा करु नयेत.
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
34463 वाचन

💬 प्रतिसाद (102)

प्रतिक्रिया

मुलांच्या नावाने खडे फोडले की

बॅटमॅन
Sat, 04/27/2013 - 21:28 नवीन
मुलांच्या नावाने खडे फोडले की विचारवंत म्हणुन कौतुक होतं.
प्रचंड सहमत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमोल खरे

एकाने चक्क मार्कलिस्ट पाहायला

चावटमेला
Wed, 04/24/2013 - 17:17 नवीन
एकाने चक्क मार्कलिस्ट पाहायला मागितली होती
च्यायला, ही तर हद्द च झाली. मग तुम्हीही त्याची पेस्लीप मागायची होती, जशास तसे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मस्त कलंदर

थिअरेटीकली बरोबर आहे. पण ते

३_१४ विक्षिप्त अदिती
गुरुवार, 04/25/2013 - 01:44 नवीन
थिअरेटीकली बरोबर आहे. पण ते लग्नाबद्दल सुरू होतं हो. आंजावरची चर्चा नव्हती! ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चावटमेला

मस्त लेख...

मुक्त विहारि
Sat, 04/20/2013 - 21:34 नवीन
आवडला..
  • Log in or register to post comments

साडी किंचित वर करून पाय दाखव

रेवती
Sat, 04/20/2013 - 21:41 नवीन
साडी किंचित वर करून पाय दाखव असंही फुल्या फुल्या त्याच्या नावाने. बरं अश्यावेळी नाही म्हणणारे आपण एकटेच असलो की जाम पंचाईत होते. लग्नात तर पाय धुण्याच्या कार्यक्रमाचा असाच संताप येतो. एका लग्नात मी सरळ नाही म्हणून सांगितले. माझ्या तिप्पट वयाची बाई माझे पाय धुणार हे काहीतरीच! ती लहान असती तरीही मी नकोच म्हणाले असते.
  • Log in or register to post comments

परंपरा

प्रकाश घाटपांडे
Sun, 04/21/2013 - 11:08 नवीन
<<लग्नात तर पाय धुण्याच्या कार्यक्रमाचा असाच संताप येतो. एका लग्नात मी सरळ नाही म्हणून सांगितले. माझ्या तिप्पट वयाची बाई माझे पाय धुणार हे काहीतरीच! ती लहान असती तरीही मी नकोच म्हणाले असते.>> मला ही पुर्वी हे आवडायच नाही. पण काही लोकांच्या मते यात उच्च नीचता, मान अवमान असा भाग नसून केवळ परंपरेच जतन करण्याचा 'शास्त्रा'पुरता भाग आहे. जो पाय धुणारा आहे तो पराजीत व धुउन घेणारा आहे तो जेता अशी भावना त्या दोन्ही पक्षाची नसते. परंपरागत पुरुष प्रधानते मुळे अनेक अनेक बाबी वरपक्षाकडे झुकणार्‍या आहेत. आपण अनेक निरर्थक व कालबाह्य गोष्टी परंपरा म्हणुन जपत असतो. काही लोक त्याचा आनंदही घेत असतात. पारंपारिक गाणी, नउवारी साडी नथ घालून मंगळागौर खेळणार्‍या बाया इतर वेळी आधुनिक असतात. अंधश्रद्धा सुद्धा एंजॉय करणारे लोक असतातच. त्यांना बळी कस म्हणाव असा प्रश्न पडतो कधी कधी मला. असो
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती

फॉर्मल नको नॉर्मल कपडे घालावेत.

मन१
Sun, 04/21/2013 - 12:33 नवीन
फॉर्मल नको नॉर्मल कपडे घालावेत.
  • Log in or register to post comments

साडी नेसण्याच आग्रह

चित्रगुप्त
Sun, 04/21/2013 - 20:25 नवीन
...फक्त दाखवायचा / पसंतीचा प्रोग्रॅम असताना साडीच घालायचा आग्रह... ... अजिबात योग्य नाही. हा बघा आदम आणि हव्वाचा दाखवण्याचा कार्यक्रम (तात्कालीन 'फॉर्मल' कपड्यात): चित्रकारः पीटर पॉल रुबेन्स (१५७७-१६४०) Image removed. (चित्र विकिपिडिया वरून)
  • Log in or register to post comments

तुम्ही डकवलेल्या बहुतेक

शिल्पा ब
Mon, 04/22/2013 - 12:02 नवीन
तुम्ही डकवलेल्या बहुतेक चित्रात लोकं / स्त्रिया नागव्याने का असतात? एक आपला प्रश्न पडला म्हणुन विचारावं म्हंटलं इतकच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चित्रगुप्त

मी तर नवर्‍याला पहायला

शुचि
Sun, 04/21/2013 - 20:40 नवीन
मी तर नवर्‍याला पहायला/दाखवायला स्कर्ट मध्ये गेलेले.
  • Log in or register to post comments

पाहण्या-दाखवण्याच्या रोमांचक

नगरीनिरंजन
Mon, 04/22/2013 - 12:34 नवीन
पाहण्या-दाखवण्याच्या रोमांचक अनुभवांना मुकलेलो असल्याने चर्चा वाचून वेगळाच आनंद आणि ज्ञानप्राप्ती होत आहे. येऊ द्या.
  • Log in or register to post comments

असे विषय बरे असतात

आशु जोग
Mon, 04/22/2013 - 13:27 नवीन
असे विषय बरे असतात त्यानिमित्ताने अनेक लोकांना आपले पुरोगामित्व प्रदर्शित करायची संधी मिळते बा द वे > > "दाखवायचा कार्यक्रम " म्हणल्यावर कपडे कशाला घालायचे असा एक भाबडा प्रश्न लहान पणापासुन आपल्या मनात डोकावतोय . इथे या धाग्याचा शेवट झाला आहे.
  • Log in or register to post comments

नक्की काय होउन लग्न जमतं हा

कवितानागेश
Tue, 04/23/2013 - 13:46 नवीन
नक्की काय होउन लग्न जमतं हा खरं तर मोठ्ठा प्रश्नच आहे. पण कुठले कपडे घातलेत यावर खरोखरच काही अवलंबून असेल असं वाटत नाही. एक मैत्रीण रोज सकाळी साधा घरातला कळकट गाउन घालून त्यांचा भयानक दिसनारा बॉक्सर कुत्रा बागेत फिरवायला न्यायची. तिला त्या बागेजवळ राहणार्‍या एका डॉक्टर मुलानी आईवडलांसकट घरी येउन मागणी घातली. व्यवस्थित लग्न झाले. अजून एक डॉक्टर मैत्रीण काही दिवस रोज हिरवा गाउन आणि हिरवा मास्क लावून एका सर्जनबरोबर काम करत होती. तिचेपण लग्न असेच मुलानी आईवडलांसकट घरी येउन मागणी घालून झाले. मी पहिल्या वेळेस नवर्‍याला भेटले तेंव्हा तर दिवसभर भटकून गेले होते, त्यामुळे तोंड पण धुतले नव्हते. ते माझ्या पांढर्‍या ओढणीला पुसले तर ओढणी काळी झाली. मग ओढणी वाईट दिसेल या भितीनी नेहमीप्रमाणे ड्रेसच्या बाहीला पुसलं. मग अबोली ड्रेसची बाहीपण काळी झाली! ;) तरीपण तो म्हणाला घरी ये आईबाबांना भेटायला! काही दिवसांनी त्याच्या घरी माझ्या आईला घेउन गेले आणि आधी मान खाली घालून गपचुप बसले. तेंव्हा अचानक लक्षात आले की मी जांभळ्या टॉपवर गुलाबी ओढ्णी घेतलिये आणि सलवार मात्र पांढरी-शुभ्र घातलिये! तरीपण लग्न ठरलं. :D ... कपड्यांवर काही अवलंबून नसतं ...
  • Log in or register to post comments

हाहाहा!

पैसा
Tue, 04/23/2013 - 13:49 नवीन
वेंधळी मुलगी बर्‍याच जणांना आवडते असे ऐकून आहे. मात्र बॉक्सर कुत्र्याला सांभाळणारी मुलगी काही करू शकेल असे वाटले असेल कदाचित!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कवितानागेश

पहिली गोष्ट म्हणजे इथे प्रकट

मृत्युन्जय
Tue, 04/23/2013 - 14:43 नवीन
पहिली गोष्ट म्हणजे इथे प्रकट होणारी सगळी स्त्रीशक्ती नेहमी "दाखवायच्या" कार्यक्रमाला तीव्र नापसंती व्यक्त करतात हे काही कळत नाही. २५ वर्षापुर्वी गोष्ट वेगळी होती. त्याकाळी मुलगी "बघायला" जायचे आणि मुली मान वर करुन फारश्या धीटपणे कदाच्त मुलांना बघायच्या नाहित. पण सध्याच्या बघायच्या कार्यक्रमात मुलीही मुलांना बघत नाहित यावर विश्वास बसत नाही. आणि मग दोघे एकमेकांना बघणार असतील तर नक्की प्रॉब्लेम काय असतो? न बघता अक्कड बक्क्ड बम्बे बो करुन जीवनाचा साथीदार निवडला जावा की काय? दुसरी गोष्ट म्हणजे मला दाखवायच्या बहुतेक कार्यक्रमात (बरोबरच लिहिले आहे. च्यायला मीच जास्त लाजायचो) मुलीच मला बघायला घरी आल्या. म्हणजे इथे दाखवायचा कर्यक्रम माझाच झाला असे म्हणायला हरकत नाही. त्यावेळेस प्रेझेंटेबल मलाही रहावे लागायचे. आम्ही मुळातच ध्यान असल्याने थोडे जास्त सजग असायला लागायचे. मी सुद्धा पायजम्यावर दात घासत घासत किंवा झओपेतुन उठल्यावर डोळ्यातली घाण काढत किंवा ओठांजवळची लाळ पुसत मुलींना सामोरे नाही गेलो. मग मुलीही थोड्याश्या बर्‍या अवतारात असल्या तर काय बिघडले. दाखवणे या कार्यक्रमाबद्दल आस्था फारशी कोणालाच नसते. पण गरज असते. आपण आपल्या जीवनाचा साथीदार पटवण्याच्याबाबतीत माठ आणि अडाणी असलो तर तो आपलाच दोष आहे. गपगुमान बघण्यादाखवण्याचे कार्यक्रम केलेच पाहिजेत. तर मग बघायला येणार्‍या लोकांना उगाच कशाला दोष द्यावा. तुम्ही स्वतःही तेच करत असता ना? बघायला जाताना बर्म्युडा घालुन जाणारे लोक असतील तर असोत बापडे. तुम्हालाही त्याच्यावरताण मिनीस्कर्ट घालुन जायचा असल्यास घाला की. तुम्हाला त्यापासुन परावृत्त करणारे तुमचे आईवडील असतात. वरपिता / वरमाता नव्हेत. आणि शेवटचे म्हणजे साडी ही आता फॉर्मल राहिली नसुन पंजाबी ड्रेस फॉर्मल झाला आहे. मी बघितलेल्यापैकी एकाही मुलीने बघण्याच्या कार्यक्रमात साडी नेसली नव्हती. आता पंजाबी ड्रेस घालण्याबद्दलही आक्षेप असेल तर गोष्ट वेगळी. तो बदलत्या सामाजिक आवडीनिवडींचा परिपाक आहे. शालीन वाटतीलसे कपडे घातल्याने समोरच्या पक्षाचे प्रतिकूल मत बनणे टाळता येउ शकते असा विचार करुन काही आईवडील आपल्या मुलींना समाजमान्य पेहराव करायला सांगतात असे वाटते. मुलीच्या भावी नवर्‍याच्या घरात मुलीला पंजाबी ड्रेस घालुन फिरायला आवडणार असेल तर पंजाबी ड्रेसच घालावा. जीन्स टी शर्ट हवा असेल तर तोच घालुन जावा (घरात गाउन घालुन फिरायला आवडते किंवा घरातच तर आहे ना मग कशाला हवे .... तर मी तेच घालुन जाणार असा जर विचार असेल तर हे लक्षात घ्या की कुठल्याही पुरुषाला घरी पायजमा किंवा ढगळ मळकट ट्रॅक पँट आणि बिन्बाह्यांचा बनियान घालुन बसायला आवडते. तोही तसाच आला तर आपल्याला आवडेल काय?)
  • Log in or register to post comments

बलीवर्दनेत्रभञ्जक प्रतिसाद.

बॅटमॅन
Tue, 04/23/2013 - 14:52 नवीन
बलीवर्दनेत्रभञ्जक प्रतिसाद. यावर काय प्रतिक्रिया येतील हे पाहणे आवडेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय

जे ब्बात !!

सूड
Tue, 04/23/2013 - 14:54 नवीन
>>कुठल्याही पुरुषाला घरी पायजमा किंवा ढगळ मळकट ट्रॅक पँट आणि बिन्बाह्यांचा बनियान घालुन बसायला आवडते. तोही तसाच आला तर आपल्याला आवडेल काय? असेच म्हणतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय

शक्यतो बनियनही नको असतो असं

गवि
Tue, 04/23/2013 - 15:09 नवीन
शक्यतो बनियनही नको असतो असं वैयक्तिक मत आहे. त्यामुळेच दारावरची बेल वाजली की अस्मादिकांच्या कपाळावर बर्‍याच आठ्या पडतात. म्हणजे आता झटकन उठून शर्टबिर्ट घालणे आले. बाकी पायजम्याविषयी, "मळकट" हा भाग सोडून सहमत. चटेरीपटेरी पायजमा मूळ कोंकणातील पिंडाशी जुळणारा सबब अत्यंत आवडता असूनही केवळ घटस्फोटाच्या भीतीने टाळावा लागतो. इतर कोणताही रंग चालतो पण मळकट नसावा. असो. व्यक्ती तितक्या प्रकृती..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

न बघता अक्कड बक्क्ड बम्बे बो

प्रकाश घाटपांडे
Tue, 04/23/2013 - 15:22 नवीन
न बघता अक्कड बक्क्ड बम्बे बो करुन जीवनाचा साथीदार निवडला जावा की काय?
अरे गडाबडा लोळण्याची स्मायली कुठे गेली रे!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय

लॉजिकल बोलतोस मृत्युंजया ???

विश्वनाथ मेहेंदळे
Wed, 04/24/2013 - 01:14 नवीन
लॉजिकल बोलतोस मृत्युंजया ??? ते पहा तुझ्या अशा वागण्याने अबोलींचा एक गजरा कोमेजून गेला !!!! अरे कुठे फेडशील ही पापे ??
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय

गजरा

पिशी अबोली
Sat, 04/27/2013 - 22:26 नवीन
काका, अबोलीचा 'गजरा' नसतो. अबोलीची 'वेणी' असते. पुरुषी लॉजिकल बोलता बोलता लेक्सिकल बारकावे राहूनच गेले की.. अहो, मुलींना टोचून बोलताना अशी चूक अपेक्षित नाही तुमच्याकडून..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विश्वनाथ मेहेंदळे

गजरा किंवा वेणी घेऊन द्यावे

विश्वनाथ मेहेंदळे
Sat, 04/27/2013 - 23:04 नवीन
गजरा किंवा वेणी घेऊन द्यावे असे कुणी कधी नव्हते आयुष्यात. मग अशा चुका होणारच ना ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिशी अबोली

यावरून एक शंका.

बॅटमॅन
Sat, 04/27/2013 - 23:13 नवीन
यावरून एक शंका. कुठल्या फुलांचे गजरे हे वेणी म्हणून संबोधले जातात?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिशी अबोली

गजरा हा सुईने दोर्‍यात ओवून

पिशी अबोली
Sat, 04/27/2013 - 23:31 नवीन
गजरा हा सुईने दोर्‍यात ओवून केला जातो. मोगर्‍यासारख्या फुलांचा गजरा असतो. वेणी धाग्यात गुंफून करतात. अबोली इतक्या नाजूक फुलांना सुईने ओवता येत नाही. 'मोगर्‍याचा गजरा' आणि 'अबोलीची वेणी' असं म्हणायची पद्धत आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

माहितीकरिता धन्यवाद.

बॅटमॅन
Sat, 04/27/2013 - 23:34 नवीन
माहितीकरिता धन्यवाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिशी अबोली

हा पहा अबोलीचा गजरा :-)

श्रीरंग_जोशी
Sat, 04/27/2013 - 23:14 नवीन
ज्येष्ठ मिपाकर जागूतै यांचा इतर संस्थळावरचा हा लेख बघा. http://www.maayboli.com/node/34998?page=1 त्यातील अबोलीच्या गजर्‍याचा हा फोटू तेथूनच आभार Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिशी अबोली

या लेखात फार क्वचित 'गजरा'

पिशी अबोली
Sat, 04/27/2013 - 23:43 नवीन
या लेखात फार क्वचित 'गजरा' असा उल्लेख आहे. नाहीतर 'वेणी' आणि 'कदंबा' असाच उल्लेख आहे. सर्वसाधारणपणे 'वेणी' आणि 'गजरा' यांच्यातला फरक नजरेआड केला जातो. पण मुलींच्या लॉजिकला सतत सुईसारखं टोचणार्‍यांना तो माहीत असावा असं वाटलं (मुलींवरच्या टीकेचे गजरे ओवत बसायला बरं). काटेकोरपणा दाखवायचाच असला तर तो लॉजिक आणि सिमेंटिक्स दोघांमधेही दाखवा की..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीरंग_जोशी

?

श्रीरंग_जोशी
Sun, 04/28/2013 - 03:44 नवीन
वर डकवलेल्या फोटो अगोदर जागूतैंनी खालील वाक्य लिहिले आहे.
हे बाजारातील गुंफलेले लाल अबोलीचे गजरे.
तसे म्हणणे योग्य की अयोग्य हे मी इथे ठरवत नाहीये.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिशी अबोली

काटेकोरपणा

राजेश घासकडवी
Sun, 04/28/2013 - 05:01 नवीन
काटेकोरपणा दाखवायचाच असला तर तो लॉजिक आणि सिमेंटिक्स दोघांमधेही दाखवा की..
काटेकोरपणाच करायचा झाला तर 'ओवलेला' तो गजरा 'बांधलेली' ती वेणी हे बरोबर नाही. गजरा ओवलेला असू शकतो किंवा बांधलेलाही असू शकतो. किंबहुना बाजारात गजरे जे मिळतात ते धाग्यांनी बांधलेलेच असतात. गजरेवाले गजरे धाग्यानेच गुंफताना दिसतात. वेणीला जास्त घट्ट वीण असते हे बरोबर आहे. ती थोडीशी पट्टीसारखी असते, फुलांची दिशा विशिष्ट असते. ही पट्टी अंबाड्याभोवती गुंडाळता येते. गजरा हा पट्टीसारखा नसून, फुलं सर्व बाजूने असल्यामुळे गोलसर बनतो. गजरा जास्त गुबगुबित असतो, वेणी जास्त दाट, घट्ट आणि फ्लॅट असते. त्यामुळे वरील चित्रातला हा गजराच आहे. जागूताईंनी बरोबर लिहिलेलं आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिशी अबोली

'मोगर्‍याचा गजरा' आणि

पिशी अबोली
Sun, 04/28/2013 - 11:07 नवीन
'मोगर्‍याचा गजरा' आणि 'अबोलीची वेणी' असं म्हणायची पद्धत आहे. असे मी वर म्हटले आहे. अबोलीची सर्वसाधारणपणे 'वेणी' बनवतात. वेणी ओवलेली नसते एवढं नक्की. गोल गुंफलेल्या फुलांना सरसकट गजरा म्हटले जात असले, तरी त्यांना 'सर' म्हणणे योग्य ठरेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेश घासकडवी

पण वेणीचे हे वर्णन जास्त

पिशी अबोली
Sun, 04/28/2013 - 11:09 नवीन
पण वेणीचे हे वर्णन जास्त चांगले आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेश घासकडवी

खरंतर आपण आपला-आपला सँपल सेट

मस्त कलंदर
Wed, 04/24/2013 - 16:34 नवीन
खरंतर आपण आपला-आपला सँपल सेट पाहतो आणि त्यावरून मत बनवतो. एकूणात व्यवहारातली लवचिकता ही कित्येकदा शहराच्या आकारावर आणि कित्येकदा जातींमधल्या रूढींवरतीही अवलंबून असते. जे मुंबईत होतं, तसंच कोल्हापुरात घडेल असं नाही, परंतु ते कदाचित अगदी खेड्यात राहणार्‍या ब्राह्मण कुटुंबात होऊ शकेल. मराठा आणि बहुजन समाज हा ब्राह्मण समाजापेक्षा अधिक ताठर आहे (हे मा वै म*) आणि कळालं तरी न वळवून ते तसंच व्हायला हवं हा त्यांचा अट्टहास असू शकतो. मी साडीच नव्हे, तर डोक्यावरूनही पदर घ्यायला हवा अशी उदाहरणं पाहिली आहेत. मुंबई-पुणे सारख्या शहरांत आणि मुख्यतः अशा ठिकाणी की जिथे मुली मुलांच्या घरी पाहायला जातात अशा वेळेस पंजाबी ड्रेस हा प्रवासाच्या दृष्टीने सुटसुटीत पर्याय ठरू शकतो. इतर शहरांत आणि ज्या मुलींच्या घरी मुलाच्या घरचे पाहायला जातात तेव्हा काय परिस्थिती असते हे इतरांनी इथं सांगावं, मी माझा सँपल सेट बाजूला ठेवते. यावरूम माझी मतं बदलतील अशी परिस्थिती असेल तर ते मला जास्त आवडेल. प्रक्रिया कुणाच्याही घरी पार पडली, तरी चिकित्सा कुणाची जास्त होते हा प्रश्न आहे. मुलींनी स्वयंपाक करू नये, घर सांभाळू नये अशा मताची मी नाही. परंतु आजच्या जमान्यात जिथे दोघेही एकाच प्रकारचे काम करतात तिथे ही फक्त एकाचीच जबाबदारी आहे असं मानणं चुकीचं आहे. पुन्हा एकदा, याबाबतीत विमे आणि मृत्युंजय यांची-त्यांच्या कुटुंबियांची मते वेगळी असू शकतात. पण सर्वसाधारण लग्नाळलेल्या मुलांची आणि त्यांच्या कुटुंबियांची मानसिकता तशी असेलच हे होत नाही. कित्येकदा नवरा समजून घेतो पण घरच्यांच्या पुढे काही चालत नाही. *हे माझं वैयक्तिक मत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय

अनुमोदन..

पिलीयन रायडर
Wed, 04/24/2013 - 16:45 नवीन
प्रक्रिया कुणाच्याही घरी पार पडली, तरी चिकित्सा कुणाची जास्त होते हा प्रश्न आहे
हे मात्र बरोबर आहे. मुली चिकित्सा करत नाहीत असं मुळीच नाही. पण जेव्हा दाखवायचा कार्यक्रम असतो तेव्हा मात्र मुलीची जास्त चिकित्सा होतेच. तिच्या कपड्यांवरुन मत बनवले जाते. आणि अजुनही अनेक ठिकाणी "चालुन दाखव, सुईत दोरा ओवुन दाखव, पाय दाखव" असे प्रकार होतातच..
कित्येकदा नवरा समजून घेतो पण घरच्यांच्या पुढे काही चालत नाही.
ह्या वाक्याला १०० वेळा अनुमोदन कारण हे तर अगदी स्वानुभवातुन समजले आहे...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मस्त कलंदर

अपेक्षा मुलीकडून जास्त असतात,

गवि
Wed, 04/24/2013 - 16:49 नवीन
अपेक्षा मुलीकडून जास्त असतात, त्यांची चिकित्सा जास्त होते हे खरंच आहे. पण त्याचं कारण म्हणजे मुलाची फॅमिली भलतीच जास्त चिकित्सक असते असं नसून मुलीची फॅमिली अतिशयच "अचिकित्सक" आणि मुलाकडून किमान अपेक्षाही नसलेली असते हे आहे. "मुलाची चिकित्सा नकोच, उगीच स्थळ हातचं जायचं" हे दुर्दैवी प्रेशर जेव्हा नाहीसं होईल तेव्हाच दोन्ही बाजू समतोल दिसतील.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मस्त कलंदर

"मुलाची चिकित्सा नकोच, उगीच

मस्त कलंदर
Wed, 04/24/2013 - 18:17 नवीन
"मुलाची चिकित्सा नकोच, उगीच स्थळ हातचं जायचं" हे दुर्दैवी प्रेशर जेव्हा नाहीसं होईल तेव्हाच दोन्ही बाजू समतोल दिसतील.
यू सेड इट. आमच्या शेजारच्या घरातली गोष्ट. नाममात्र एम ए झालेल्या एका कनिष्ठ क्लार्कचं लग्न एम. एस्सी. बी. एड. आणि तेही उत्तम मार्कांनी पास झालेल्या आमच्या शेजारच्या मुलीशी झालं. ती खरंच खूप हुशार आहे आणि तिची स्वत:ची विचारांची एक व्यवस्थित बैठक आहे. त्यामुळे बौद्धिक अंतर खूपच अधिक असल्याने तिला हे लग्न पसंत नव्हतं. पण झालं असं की ती तशी दिसायला यथातथाच असल्याने सगळ्या नातेवाईकांनी तिच्या आईबाबांना सतत " हिला कशी उजवणार रे बाबा तुम्ही?" असं हिणवलं होतं. तिकडून होकार आला, आणि मग हिचा कुणी विचारलाच नाही. सासरच्या लोकांनी माहेरच्यांकडून "आम्ही हिला नोकरी लावून देऊ" असं वदवूनही घेतलं. म्हणजे फक्त दिसण्यावरून तिचं सगळं शिक्षण-हुशारी मातीमोल ठरली आणि एक भविष्यातली एक बँक म्हणून तिच्याशी लग्न केलं गेलं. बरं तो मुलगाही काही मदनाचा पुतळा नव्हता, चांगला टकला होता आणि फक्त रंग जरासा उजळ असेल. या मुलीची लहान बहिण तेव्हा इंजिनिअरिंगला माझ्याच सोबत होती. लग्नानंतर तिला कळालं की नवर्‍याचे मित्र त्याला म्हणत होते की या मुलीशी लग्न करण्याऐवजी तिच्या बहिणीशीच का नाही केलंस? सुंदर आणि इंजिनिअर बायको तुला मिळाली असती. जणू काही पुरूष असणंच हे त्यांच्यालेखी एवढं मोठं क्वालिफिकेशन होतं की त्यापुढे एमएस्सी आणि इंजिनिअरिंग किस झाड की पत्ती!!! हे ऐकून त्या मुलीने डोक्यावर हात मारून घेतला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

आई बरोबर जनगणना करत फिरत

पिलीयन रायडर
Wed, 04/24/2013 - 18:33 नवीन
आई बरोबर जनगणना करत फिरत असताना मी एका ओळीत अशी १०० घरं पाहिली आहेत जिथे बायका पोस्ट ग्रॅड. आणि नवरे दहावी / बारावी... ह्या बायकांचे दाखवायचे कार्यक्रम कसे झाले असतिल बरे? तु ते सँपल सेट च बरोबर बोलली होतीस ग...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मस्त कलंदर

"मुलाची चिकित्सा नकोच, उगीच

रेवती
Wed, 04/24/2013 - 19:02 नवीन
"मुलाची चिकित्सा नकोच, उगीच स्थळ हातचं जायचं" अगदी बरोबर. आमच्या एका नातेवाईक मुलीचे लग्न गेल्या पंध्रा दिवसांखालीच मोडले. कारण हेच! मुलाकडच्यांची तक्रार होती की तुम्ही आमची चौकशी करायला नको होती. मुलीचे आईवडील म्हणाले की एकाच गावात मुलगा मुलगी रहात असताना गोष्ट वेगळी आणि परगावी मुलगी द्यायची, तिथे कोणी ओळखीचे नसताना आम्ही चौकशी करणारच. तुमचे सगळे बरे असेल तर भीती कशाची? अशा ठिकाणी आम्हालाच आता आमची मुलगी द्यावयाची नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

पंधरा वर्षं

राजेश घासकडवी
Wed, 04/24/2013 - 19:11 नवीन
"मुलाची चिकित्सा नकोच, उगीच स्थळ हातचं जायचं" हे दुर्दैवी प्रेशर जेव्हा नाहीसं होईल तेव्हाच दोन्ही बाजू समतोल दिसतील.
अजून पंधरा वर्षं वाट पहा गवि. गेल्या दहा पंधरा वर्षांत ज्या आईबापांनी स्त्रीभ्रूणहत्या करून घेतल्या आहेत त्यांच्यावर अशीच मुलीचं स्थळ गमवण्याच्या भीतीची पाळी येणार आहे. आठ मुलांमागे सात मुली - सगळ्याच गेल्या पिढीपेक्षा जास्त शिकलेल्या, स्वतःच्या पायावर उभ्या राहू शकणाऱ्या आणि अधिक मोकळ्या समाजात वावरणाऱ्या. मग दुसरं काय होणार?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

सहमत.पंजाबी ड्रेस हा

रेवती
Wed, 04/24/2013 - 19:23 नवीन
सहमत. पंजाबी ड्रेस हा प्रवासाच्या दृष्टीने सुटसुटीत पर्याय ठरू शकतो. अगदी हेच म्हणते. माझे लग्न हे अर्धा तासात ठरले तेंव्हा साडीबिडी कोण नेसत बसणार? हौसेनं तशीही नेसत असे पण अचानक ठरलेल्या लग्नात हे मलाच नको वाटले. त्यावेळी त्यातल्यात्यात बरा असलेला कपडा घातला. नवराही फार काही भारी कपडे घालून आला नव्हता. हे दीड दशकापूर्वी झालं आणि आत्ता माझ्या इतक्या आते, मामे, चुलत बहिणींची लग्ने झाली, मला दोन वहिन्या येऊन जुन्या झाल्या. हे सगळे पुणे, मुंबई, याबरोबरच औरंगाबाद, कोकण, कोल्हापूर, मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश अशा ठिकाणी असलेले आहेत पण सगळ्यांनी पंजाबी कपडे, जीन्स व लांब कुडते, (ऑफिसातून डायरेक्ट दाखवण्याच्या ठिकाणी गेल्याने) ऑफीसवेअर अशा कपड्यांमध्येच मुले बघितली/मुली बघितल्या, पसंत केले, लग्ने झाली, मुलेही झाली. ;) त्यामुळे अजूनही साडी प्रकरणाचे जरा आश्चर्य वाटले. माझ्या वहिनीला भावाने पसंत केले पण कधी नव्हे तो मला म्हणाला की तू भारतात चाललीयेस तर मला तुझे मत हवे आहे टाईप. त्यावेळे मुलीकडल्यांना "आम्ही येतो, तुम्ही ६ तास प्रवासात घालवू नका" (एकदा त्यांनी घालवले आहेत)पण त्यांनाच ते कसेतरी वाटले आणि नाही नाही आम्हीच येणार म्हणून आले पण माझी वहिनी पंजाबी कपडेच घालून आली होती. या एकमेव केसमध्ये मुलीला दोनदा बघण्याचा कार्यक्रम झाला, तोही आमच्याकडून पण मुलीकडून माझ्या भावाला ४ बघण्याचे कार्य्क्रम झाले. का? तर तुम्ही हुंडा घेत नाही म्हणजे मुलामध्ये काही कमीजास्त नाही ना हे बघण्यासाठी, शिवाय गोरा मुलगा सावळी मुलगी का म्हणून पसंत करेल? हे त्यांचे मत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मस्त कलंदर

साधारणपणे ३२ वर्षापुर्वी...

पिलीयन रायडर
Wed, 04/24/2013 - 19:30 नवीन
माझे आजोबा मोठ्या हुद्द्यावर होते. त्यांनी मामा साठी मुलगी पाहिली. तेव्हा दाखवायचा कर्य्क्रम एका बागेत भेटुन झाला (मामी ला मोकळे वाटावे म्हणुन..)साखरपुडा झाला तेव्हा आजोबांची आई वारली होती. दहाव्या दिवस होत.. पण मुलगी अपशकुनि नाही हे पटवायला त्यांनी साखरपुडा केला. लग्न हुंडा न घेता आणि अर्धा खर्च देऊन झाले. तिच्या आई-वडीलांनी १ ग्रॅमही सोने घातले नाही. आजोबांनी ५-१० तोळे घातले असावे... ..तर तेव्हा ही चर्चा होती की माझ्या मामात काहीतरी प्रॉब्लेम आहे...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती

अपेक्षा कोणाकडून जास्त असतात

अप्पा जोगळेकर
Sat, 04/27/2013 - 17:17 नवीन
अपेक्षा कोणाकडून जास्त असतात हा विवाद्य मुद्दा आहे. मला एका मुलीने सरळ सांगितले की १ बीएच्के म्हणजे फारच लहान घर झाले. त्यावर मी सांगितले की ,"मला यापेक्षा मोठे घर घेणे परवडण्यासारखे नाही. तुला शक्य असेल आणि तुला आवश्यक वाटत असेल तर तू आणखीन मोठे घर घे. तिथे राहण्यास मला काहीच अडचण नाही." हे बोलणे बहुधा तिला खटकले असावे. ती सरळ उठून निघून गेली. तिच्या कॉफीचे बिलसुद्धा मलाच भरावे लागले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मस्त कलंदर

अपेक्षा कोणाकडून जास्त असतात

बॅटमॅन
Sat, 04/27/2013 - 21:31 नवीन
अपेक्षा कोणाकडून जास्त असतात हा विवाद्य मुद्दा आहे.
विवाद्य नाहीये खरे तर, परंतु खरे काय ते सांगितलं की वाद होतात. म्हणून विवाद्य आहे असे दुर्दैवाने म्हणावे लागते.
तिच्या कॉफीचे बिलसुद्धा मलाच भरावे लागले.
पुरुषांनीच बिले भरायची, फुकट तसदी बाकी कोण कशाला घेणार म्हणा. बाकी रोखठोकपणा आवडला हेवेसांनल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अप्पा जोगळेकर

पुरुषांनीच बिले भरायची, फुकट

विश्वनाथ मेहेंदळे
Sat, 04/27/2013 - 22:57 नवीन
पुरुषांनीच बिले भरायची, फुकट तसदी बाकी कोण कशाला घेणार म्हणा.
स्त्री पुरुष समानता असते, पण बिले नेहमी पुरुषांनी भरायची असतात. एकदा एक मैत्रीण मुलाला भेटायला गेली होती. त्याने कॉफी बिल TTMM प्रकाराने भरायला लावले. तो निगेटिव्ह मुद्दा गणला गेला. तो पण कमालीचा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

स्त्री पुरुष समानता असते, पण

बॅटमॅन
Sat, 04/27/2013 - 23:14 नवीन
स्त्री पुरुष समानता असते, पण बिले नेहमी पुरुषांनी भरायची असतात. एकदा एक मैत्रीण मुलाला भेटायला गेली होती. त्याने कॉफी बिल TTMM प्रकाराने भरायला लावले. तो निगेटिव्ह मुद्दा गणला गेला. तो पण कमालीचा.
हा बेगडीपणा असतो, पण बोलायचे नाही. अबोलीचा गजरा आपलं वेणीसंहार होईल ना ;) =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विश्वनाथ मेहेंदळे

+१००

अमोल खरे
Sun, 04/28/2013 - 11:16 नवीन
मलापण हा रोखठोकपणा आवडला. आणि वर ती मुलगी सरळ उठुन गेली, म्हणजे तिचा उद्धटपणा बघा किती.. हेच जर एखादा मुलगा उठुन गेला असता आणि ती मुलगी मिपाची मेंबर असती तर पुरुष कसे वाईट्ट ह्यावर धागा आला असता.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

चालायचंच. एकंदरच स्त्री-पुरुष

अप्पा जोगळेकर
Sun, 04/28/2013 - 11:45 नवीन
चालायचंच. एकंदरच स्त्री-पुरुष समानतेच्या नावाने बोंबच आहे. हक्क बजावण्याला ओनरशिप घेण्याची वृत्ती चिकटलेली असेल तर ते शोभून दिसते. मागे एकदा मी 'भारतात खेड्यांमधल्या स्त्रिया अतिशय कष्टाचे आयुष्य जगतात तर शहरी स्त्रिया फार शेफारुन गेल्या आहेत' असे विधान केले होते तर इथले स्त्री-मुक्तीवाले खवळून उठले होते. अर्थात वस्तुस्थिती आजसुद्धा तशीच आहे म्हणा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

+१०^१००.

बॅटमॅन
Sun, 04/28/2013 - 11:47 नवीन
+१०^१००.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अप्पा जोगळेकर

'भारतात खेड्यांमधल्या

मोदक
Sun, 04/28/2013 - 23:31 नवीन
'भारतात खेड्यांमधल्या स्त्रिया अतिशय कष्टाचे आयुष्य जगतात तर शहरी स्त्रिया फार शेफारुन गेल्या आहेत' असे विधान केले होते तर इथले स्त्री-मुक्तीवाले खवळून उठले होते. आप्पा - लिंक आहे का धाग्याची...?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अप्पा जोगळेकर

इतका

इरसाल
Tue, 04/23/2013 - 15:09 नवीन
उहापोह झा ल्यावर मला ल क्ष्याचा, निळु फुले आणी वर्षा उसगांवकरचा एक पिच्चर आठवला. त्यात निळु फुले लक्ष्याला सांगतात जर तुला तिचे खरे सौंदर्य बघायचे असेल तर झोपेतुन उठवुन बघ. (शक्यतो झोपताना सामान्य स्त्री ही विना मेकप झोपते असा होरा) त्यामुळे रात्री गाडीचा हॉर्न वाजवुन तिची झोपमोड करुन तो तिला पहातो.
  • Log in or register to post comments

पडोसन ची भ्रष्ट नक्कल आहे तो

प्यारे१
Tue, 04/23/2013 - 18:14 नवीन
पडोसन ची भ्रष्ट नक्कल आहे तो सिनुमामा!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इरसाल
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा