Skip to main content

"दाखवणे" आणि फॉर्मल कपडे

लेखक शिल्पा ब यांनी शनिवार, 20/04/2013 09:39 या दिवशी प्रकाशित केले.
बॅटमॅनचा हा धागा वाचला अन मनात काही प्रश्न निर्माण झाले. म्हंटल दुसरा धागाच उसवावा. असो. तर आता आमच्या डोक्यात आलेल्या प्रश्नांबद्दलः लग्नाचं वय झालं (वेगवेगळ्या आई-वडीलांच्या मते १६ पासुन पुढे ) कि दाखवण्याचे प्रकार सुरु होतात...म्हणजे मुलाला मुलगी दाखवणे वेग्रे. गैरसमज नको उगाच. तर अशा प्रसंगी मुलींना साधारणपणे साडी घालायचा आग्रह होतो. म्हणजे शाळा कालेजात असताना अन बाहेर हिंडताना भले पँट / जीन्स/ स्कर्ट / हाप्पँट / बर्मुडा / पंजाबी ड्रेस - त्यातही बरेच प्रकार आहेत, झालंच तर थ्री फोर्थ वेग्रे घालणार पण पसंतीच्या वेळेस मात्र साडीच असावी. का? तर भारतीय प्रथा आहे शिवाय आपले संस्कार दिसतात असं कारण. साडी घातल्याने संस्कार कसे दिसतात हा एक प्रश्न. मुलं मात्र जीन्स - टी शर्ट झालंच तर बर्मुडा (आजकाल याला कै वेगळं नाव असेल तर माहीत नै) असं घालतात...म्हणजे जर घातलंच तर आक्षेप नसतो. फॉर्मल कपडे जसे की साधा शर्ट अन फॉर्मल पँट सुद्धा घालतात नै असं नै. आता मुलांना मुळातच कपड्यांच्या निवडी अतिशय कमी त्याला आमचा नाईलाज आहे अन म्हणुनच दोन - तीन उदा. दिलेत. एकदा आम्हाला मुलगा पहायला मंबईतुन पुण्याला जायचं असल्याने हे सगळं कसं सांभाळायचं असा प्रश्न पडल्याने शेवटी जीन्स अन आखुड शर्ट घालुन जावं लागलं. एकच एक दाखवायच्या वेळेस उपयोगी म्हणुन आणलेला पंजाबी ड्रेस धुण्यात होता हे अजुन एक कारण. आधुनिक लोकं असल्याने .किंवा "अशा वेळेस कशी बै शर्ट पँट घातली? अशी मुलगी नकोच" म्हणुनही असेल पण कोणी (म्हणजे मुलगा अन त्याची आई)यांनी कै आक्षेप घेतला नै. असो. तर मुद्द्या म्हणजे फक्त दाखवायचा / पसंतीचा प्रोग्रॅम असताना असे साडीच घालायचा आग्रह कितपत योग्य आहे? मिपाकरांनी आपापले अमुल्य मत द्यावे. टीप : आमचं लग्न होउन बाळ सुद्धा शाळेत जातंय पण इतरांना उपयोग होईल या सामाजिक कारणाने हा काकु. उगाच भलत्या चौकशा करु नयेत.

वाचने 34880
प्रतिक्रिया 102

प्रतिक्रिया

In reply to by विश्वनाथ मेहेंदळे

काका, अबोलीचा 'गजरा' नसतो. अबोलीची 'वेणी' असते. पुरुषी लॉजिकल बोलता बोलता लेक्सिकल बारकावे राहूनच गेले की.. अहो, मुलींना टोचून बोलताना अशी चूक अपेक्षित नाही तुमच्याकडून..

In reply to by पिशी अबोली

यावरून एक शंका. कुठल्या फुलांचे गजरे हे वेणी म्हणून संबोधले जातात?

In reply to by बॅटमॅन

गजरा हा सुईने दोर्‍यात ओवून केला जातो. मोगर्‍यासारख्या फुलांचा गजरा असतो. वेणी धाग्यात गुंफून करतात. अबोली इतक्या नाजूक फुलांना सुईने ओवता येत नाही. 'मोगर्‍याचा गजरा' आणि 'अबोलीची वेणी' असं म्हणायची पद्धत आहे.

In reply to by पिशी अबोली

ज्येष्ठ मिपाकर जागूतै यांचा इतर संस्थळावरचा हा लेख बघा. http://www.maayboli.com/node/34998?page=1 त्यातील अबोलीच्या गजर्‍याचा हा फोटू तेथूनच आभार अबोलीचा गजरा

In reply to by श्रीरंग_जोशी

या लेखात फार क्वचित 'गजरा' असा उल्लेख आहे. नाहीतर 'वेणी' आणि 'कदंबा' असाच उल्लेख आहे. सर्वसाधारणपणे 'वेणी' आणि 'गजरा' यांच्यातला फरक नजरेआड केला जातो. पण मुलींच्या लॉजिकला सतत सुईसारखं टोचणार्‍यांना तो माहीत असावा असं वाटलं (मुलींवरच्या टीकेचे गजरे ओवत बसायला बरं). काटेकोरपणा दाखवायचाच असला तर तो लॉजिक आणि सिमेंटिक्स दोघांमधेही दाखवा की..

In reply to by पिशी अबोली

वर डकवलेल्या फोटो अगोदर जागूतैंनी खालील वाक्य लिहिले आहे.
हे बाजारातील गुंफलेले लाल अबोलीचे गजरे.
तसे म्हणणे योग्य की अयोग्य हे मी इथे ठरवत नाहीये.

In reply to by पिशी अबोली

काटेकोरपणा दाखवायचाच असला तर तो लॉजिक आणि सिमेंटिक्स दोघांमधेही दाखवा की..
काटेकोरपणाच करायचा झाला तर 'ओवलेला' तो गजरा 'बांधलेली' ती वेणी हे बरोबर नाही. गजरा ओवलेला असू शकतो किंवा बांधलेलाही असू शकतो. किंबहुना बाजारात गजरे जे मिळतात ते धाग्यांनी बांधलेलेच असतात. गजरेवाले गजरे धाग्यानेच गुंफताना दिसतात. वेणीला जास्त घट्ट वीण असते हे बरोबर आहे. ती थोडीशी पट्टीसारखी असते, फुलांची दिशा विशिष्ट असते. ही पट्टी अंबाड्याभोवती गुंडाळता येते. गजरा हा पट्टीसारखा नसून, फुलं सर्व बाजूने असल्यामुळे गोलसर बनतो. गजरा जास्त गुबगुबित असतो, वेणी जास्त दाट, घट्ट आणि फ्लॅट असते. त्यामुळे वरील चित्रातला हा गजराच आहे. जागूताईंनी बरोबर लिहिलेलं आहे.

In reply to by राजेश घासकडवी

'मोगर्‍याचा गजरा' आणि 'अबोलीची वेणी' असं म्हणायची पद्धत आहे. असे मी वर म्हटले आहे. अबोलीची सर्वसाधारणपणे 'वेणी' बनवतात. वेणी ओवलेली नसते एवढं नक्की. गोल गुंफलेल्या फुलांना सरसकट गजरा म्हटले जात असले, तरी त्यांना 'सर' म्हणणे योग्य ठरेल.

In reply to by मृत्युन्जय

खरंतर आपण आपला-आपला सँपल सेट पाहतो आणि त्यावरून मत बनवतो. एकूणात व्यवहारातली लवचिकता ही कित्येकदा शहराच्या आकारावर आणि कित्येकदा जातींमधल्या रूढींवरतीही अवलंबून असते. जे मुंबईत होतं, तसंच कोल्हापुरात घडेल असं नाही, परंतु ते कदाचित अगदी खेड्यात राहणार्‍या ब्राह्मण कुटुंबात होऊ शकेल. मराठा आणि बहुजन समाज हा ब्राह्मण समाजापेक्षा अधिक ताठर आहे (हे मा वै म*) आणि कळालं तरी न वळवून ते तसंच व्हायला हवं हा त्यांचा अट्टहास असू शकतो. मी साडीच नव्हे, तर डोक्यावरूनही पदर घ्यायला हवा अशी उदाहरणं पाहिली आहेत. मुंबई-पुणे सारख्या शहरांत आणि मुख्यतः अशा ठिकाणी की जिथे मुली मुलांच्या घरी पाहायला जातात अशा वेळेस पंजाबी ड्रेस हा प्रवासाच्या दृष्टीने सुटसुटीत पर्याय ठरू शकतो. इतर शहरांत आणि ज्या मुलींच्या घरी मुलाच्या घरचे पाहायला जातात तेव्हा काय परिस्थिती असते हे इतरांनी इथं सांगावं, मी माझा सँपल सेट बाजूला ठेवते. यावरूम माझी मतं बदलतील अशी परिस्थिती असेल तर ते मला जास्त आवडेल. प्रक्रिया कुणाच्याही घरी पार पडली, तरी चिकित्सा कुणाची जास्त होते हा प्रश्न आहे. मुलींनी स्वयंपाक करू नये, घर सांभाळू नये अशा मताची मी नाही. परंतु आजच्या जमान्यात जिथे दोघेही एकाच प्रकारचे काम करतात तिथे ही फक्त एकाचीच जबाबदारी आहे असं मानणं चुकीचं आहे. पुन्हा एकदा, याबाबतीत विमे आणि मृत्युंजय यांची-त्यांच्या कुटुंबियांची मते वेगळी असू शकतात. पण सर्वसाधारण लग्नाळलेल्या मुलांची आणि त्यांच्या कुटुंबियांची मानसिकता तशी असेलच हे होत नाही. कित्येकदा नवरा समजून घेतो पण घरच्यांच्या पुढे काही चालत नाही. *हे माझं वैयक्तिक मत.

In reply to by मस्त कलंदर

प्रक्रिया कुणाच्याही घरी पार पडली, तरी चिकित्सा कुणाची जास्त होते हा प्रश्न आहे
हे मात्र बरोबर आहे. मुली चिकित्सा करत नाहीत असं मुळीच नाही. पण जेव्हा दाखवायचा कार्यक्रम असतो तेव्हा मात्र मुलीची जास्त चिकित्सा होतेच. तिच्या कपड्यांवरुन मत बनवले जाते. आणि अजुनही अनेक ठिकाणी "चालुन दाखव, सुईत दोरा ओवुन दाखव, पाय दाखव" असे प्रकार होतातच..
कित्येकदा नवरा समजून घेतो पण घरच्यांच्या पुढे काही चालत नाही.
ह्या वाक्याला १०० वेळा अनुमोदन कारण हे तर अगदी स्वानुभवातुन समजले आहे...

In reply to by मस्त कलंदर

अपेक्षा मुलीकडून जास्त असतात, त्यांची चिकित्सा जास्त होते हे खरंच आहे. पण त्याचं कारण म्हणजे मुलाची फॅमिली भलतीच जास्त चिकित्सक असते असं नसून मुलीची फॅमिली अतिशयच "अचिकित्सक" आणि मुलाकडून किमान अपेक्षाही नसलेली असते हे आहे. "मुलाची चिकित्सा नकोच, उगीच स्थळ हातचं जायचं" हे दुर्दैवी प्रेशर जेव्हा नाहीसं होईल तेव्हाच दोन्ही बाजू समतोल दिसतील.

In reply to by गवि

"मुलाची चिकित्सा नकोच, उगीच स्थळ हातचं जायचं" हे दुर्दैवी प्रेशर जेव्हा नाहीसं होईल तेव्हाच दोन्ही बाजू समतोल दिसतील.
यू सेड इट. आमच्या शेजारच्या घरातली गोष्ट. नाममात्र एम ए झालेल्या एका कनिष्ठ क्लार्कचं लग्न एम. एस्सी. बी. एड. आणि तेही उत्तम मार्कांनी पास झालेल्या आमच्या शेजारच्या मुलीशी झालं. ती खरंच खूप हुशार आहे आणि तिची स्वत:ची विचारांची एक व्यवस्थित बैठक आहे. त्यामुळे बौद्धिक अंतर खूपच अधिक असल्याने तिला हे लग्न पसंत नव्हतं. पण झालं असं की ती तशी दिसायला यथातथाच असल्याने सगळ्या नातेवाईकांनी तिच्या आईबाबांना सतत " हिला कशी उजवणार रे बाबा तुम्ही?" असं हिणवलं होतं. तिकडून होकार आला, आणि मग हिचा कुणी विचारलाच नाही. सासरच्या लोकांनी माहेरच्यांकडून "आम्ही हिला नोकरी लावून देऊ" असं वदवूनही घेतलं. म्हणजे फक्त दिसण्यावरून तिचं सगळं शिक्षण-हुशारी मातीमोल ठरली आणि एक भविष्यातली एक बँक म्हणून तिच्याशी लग्न केलं गेलं. बरं तो मुलगाही काही मदनाचा पुतळा नव्हता, चांगला टकला होता आणि फक्त रंग जरासा उजळ असेल. या मुलीची लहान बहिण तेव्हा इंजिनिअरिंगला माझ्याच सोबत होती. लग्नानंतर तिला कळालं की नवर्‍याचे मित्र त्याला म्हणत होते की या मुलीशी लग्न करण्याऐवजी तिच्या बहिणीशीच का नाही केलंस? सुंदर आणि इंजिनिअर बायको तुला मिळाली असती. जणू काही पुरूष असणंच हे त्यांच्यालेखी एवढं मोठं क्वालिफिकेशन होतं की त्यापुढे एमएस्सी आणि इंजिनिअरिंग किस झाड की पत्ती!!! हे ऐकून त्या मुलीने डोक्यावर हात मारून घेतला.

In reply to by मस्त कलंदर

आई बरोबर जनगणना करत फिरत असताना मी एका ओळीत अशी १०० घरं पाहिली आहेत जिथे बायका पोस्ट ग्रॅड. आणि नवरे दहावी / बारावी... ह्या बायकांचे दाखवायचे कार्यक्रम कसे झाले असतिल बरे? तु ते सँपल सेट च बरोबर बोलली होतीस ग...

In reply to by गवि

"मुलाची चिकित्सा नकोच, उगीच स्थळ हातचं जायचं" अगदी बरोबर. आमच्या एका नातेवाईक मुलीचे लग्न गेल्या पंध्रा दिवसांखालीच मोडले. कारण हेच! मुलाकडच्यांची तक्रार होती की तुम्ही आमची चौकशी करायला नको होती. मुलीचे आईवडील म्हणाले की एकाच गावात मुलगा मुलगी रहात असताना गोष्ट वेगळी आणि परगावी मुलगी द्यायची, तिथे कोणी ओळखीचे नसताना आम्ही चौकशी करणारच. तुमचे सगळे बरे असेल तर भीती कशाची? अशा ठिकाणी आम्हालाच आता आमची मुलगी द्यावयाची नाही.

In reply to by गवि

"मुलाची चिकित्सा नकोच, उगीच स्थळ हातचं जायचं" हे दुर्दैवी प्रेशर जेव्हा नाहीसं होईल तेव्हाच दोन्ही बाजू समतोल दिसतील.
अजून पंधरा वर्षं वाट पहा गवि. गेल्या दहा पंधरा वर्षांत ज्या आईबापांनी स्त्रीभ्रूणहत्या करून घेतल्या आहेत त्यांच्यावर अशीच मुलीचं स्थळ गमवण्याच्या भीतीची पाळी येणार आहे. आठ मुलांमागे सात मुली - सगळ्याच गेल्या पिढीपेक्षा जास्त शिकलेल्या, स्वतःच्या पायावर उभ्या राहू शकणाऱ्या आणि अधिक मोकळ्या समाजात वावरणाऱ्या. मग दुसरं काय होणार?

In reply to by मस्त कलंदर

सहमत. पंजाबी ड्रेस हा प्रवासाच्या दृष्टीने सुटसुटीत पर्याय ठरू शकतो. अगदी हेच म्हणते. माझे लग्न हे अर्धा तासात ठरले तेंव्हा साडीबिडी कोण नेसत बसणार? हौसेनं तशीही नेसत असे पण अचानक ठरलेल्या लग्नात हे मलाच नको वाटले. त्यावेळी त्यातल्यात्यात बरा असलेला कपडा घातला. नवराही फार काही भारी कपडे घालून आला नव्हता. हे दीड दशकापूर्वी झालं आणि आत्ता माझ्या इतक्या आते, मामे, चुलत बहिणींची लग्ने झाली, मला दोन वहिन्या येऊन जुन्या झाल्या. हे सगळे पुणे, मुंबई, याबरोबरच औरंगाबाद, कोकण, कोल्हापूर, मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश अशा ठिकाणी असलेले आहेत पण सगळ्यांनी पंजाबी कपडे, जीन्स व लांब कुडते, (ऑफिसातून डायरेक्ट दाखवण्याच्या ठिकाणी गेल्याने) ऑफीसवेअर अशा कपड्यांमध्येच मुले बघितली/मुली बघितल्या, पसंत केले, लग्ने झाली, मुलेही झाली. ;) त्यामुळे अजूनही साडी प्रकरणाचे जरा आश्चर्य वाटले. माझ्या वहिनीला भावाने पसंत केले पण कधी नव्हे तो मला म्हणाला की तू भारतात चाललीयेस तर मला तुझे मत हवे आहे टाईप. त्यावेळे मुलीकडल्यांना "आम्ही येतो, तुम्ही ६ तास प्रवासात घालवू नका" (एकदा त्यांनी घालवले आहेत)पण त्यांनाच ते कसेतरी वाटले आणि नाही नाही आम्हीच येणार म्हणून आले पण माझी वहिनी पंजाबी कपडेच घालून आली होती. या एकमेव केसमध्ये मुलीला दोनदा बघण्याचा कार्यक्रम झाला, तोही आमच्याकडून पण मुलीकडून माझ्या भावाला ४ बघण्याचे कार्य्क्रम झाले. का? तर तुम्ही हुंडा घेत नाही म्हणजे मुलामध्ये काही कमीजास्त नाही ना हे बघण्यासाठी, शिवाय गोरा मुलगा सावळी मुलगी का म्हणून पसंत करेल? हे त्यांचे मत.

In reply to by रेवती

माझे आजोबा मोठ्या हुद्द्यावर होते. त्यांनी मामा साठी मुलगी पाहिली. तेव्हा दाखवायचा कर्य्क्रम एका बागेत भेटुन झाला (मामी ला मोकळे वाटावे म्हणुन..)साखरपुडा झाला तेव्हा आजोबांची आई वारली होती. दहाव्या दिवस होत.. पण मुलगी अपशकुनि नाही हे पटवायला त्यांनी साखरपुडा केला. लग्न हुंडा न घेता आणि अर्धा खर्च देऊन झाले. तिच्या आई-वडीलांनी १ ग्रॅमही सोने घातले नाही. आजोबांनी ५-१० तोळे घातले असावे... ..तर तेव्हा ही चर्चा होती की माझ्या मामात काहीतरी प्रॉब्लेम आहे...

In reply to by मस्त कलंदर

अपेक्षा कोणाकडून जास्त असतात हा विवाद्य मुद्दा आहे. मला एका मुलीने सरळ सांगितले की १ बीएच्के म्हणजे फारच लहान घर झाले. त्यावर मी सांगितले की ,"मला यापेक्षा मोठे घर घेणे परवडण्यासारखे नाही. तुला शक्य असेल आणि तुला आवश्यक वाटत असेल तर तू आणखीन मोठे घर घे. तिथे राहण्यास मला काहीच अडचण नाही." हे बोलणे बहुधा तिला खटकले असावे. ती सरळ उठून निघून गेली. तिच्या कॉफीचे बिलसुद्धा मलाच भरावे लागले.

In reply to by अप्पा जोगळेकर

अपेक्षा कोणाकडून जास्त असतात हा विवाद्य मुद्दा आहे.
विवाद्य नाहीये खरे तर, परंतु खरे काय ते सांगितलं की वाद होतात. म्हणून विवाद्य आहे असे दुर्दैवाने म्हणावे लागते.
तिच्या कॉफीचे बिलसुद्धा मलाच भरावे लागले.
पुरुषांनीच बिले भरायची, फुकट तसदी बाकी कोण कशाला घेणार म्हणा. बाकी रोखठोकपणा आवडला हेवेसांनल.

In reply to by बॅटमॅन

पुरुषांनीच बिले भरायची, फुकट तसदी बाकी कोण कशाला घेणार म्हणा.
स्त्री पुरुष समानता असते, पण बिले नेहमी पुरुषांनी भरायची असतात. एकदा एक मैत्रीण मुलाला भेटायला गेली होती. त्याने कॉफी बिल TTMM प्रकाराने भरायला लावले. तो निगेटिव्ह मुद्दा गणला गेला. तो पण कमालीचा.

In reply to by विश्वनाथ मेहेंदळे

स्त्री पुरुष समानता असते, पण बिले नेहमी पुरुषांनी भरायची असतात. एकदा एक मैत्रीण मुलाला भेटायला गेली होती. त्याने कॉफी बिल TTMM प्रकाराने भरायला लावले. तो निगेटिव्ह मुद्दा गणला गेला. तो पण कमालीचा.
हा बेगडीपणा असतो, पण बोलायचे नाही. अबोलीचा गजरा आपलं वेणीसंहार होईल ना ;) =))

In reply to by बॅटमॅन

मलापण हा रोखठोकपणा आवडला. आणि वर ती मुलगी सरळ उठुन गेली, म्हणजे तिचा उद्धटपणा बघा किती.. हेच जर एखादा मुलगा उठुन गेला असता आणि ती मुलगी मिपाची मेंबर असती तर पुरुष कसे वाईट्ट ह्यावर धागा आला असता.

In reply to by बॅटमॅन

चालायचंच. एकंदरच स्त्री-पुरुष समानतेच्या नावाने बोंबच आहे. हक्क बजावण्याला ओनरशिप घेण्याची वृत्ती चिकटलेली असेल तर ते शोभून दिसते. मागे एकदा मी 'भारतात खेड्यांमधल्या स्त्रिया अतिशय कष्टाचे आयुष्य जगतात तर शहरी स्त्रिया फार शेफारुन गेल्या आहेत' असे विधान केले होते तर इथले स्त्री-मुक्तीवाले खवळून उठले होते. अर्थात वस्तुस्थिती आजसुद्धा तशीच आहे म्हणा.

In reply to by अप्पा जोगळेकर

'भारतात खेड्यांमधल्या स्त्रिया अतिशय कष्टाचे आयुष्य जगतात तर शहरी स्त्रिया फार शेफारुन गेल्या आहेत' असे विधान केले होते तर इथले स्त्री-मुक्तीवाले खवळून उठले होते. आप्पा - लिंक आहे का धाग्याची...?

उहापोह झा ल्यावर मला ल क्ष्याचा, निळु फुले आणी वर्षा उसगांवकरचा एक पिच्चर आठवला. त्यात निळु फुले लक्ष्याला सांगतात जर तुला तिचे खरे सौंदर्य बघायचे असेल तर झोपेतुन उठवुन बघ. (शक्यतो झोपताना सामान्य स्त्री ही विना मेकप झोपते असा होरा) त्यामुळे रात्री गाडीचा हॉर्न वाजवुन तिची झोपमोड करुन तो तिला पहातो.