✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

"दाखवणे" आणि फॉर्मल कपडे

श
शिल्पा ब यांनी
Sat, 04/20/2013 - 09:39  ·  लेख
लेख
बॅटमॅनचा हा धागा वाचला अन मनात काही प्रश्न निर्माण झाले. म्हंटल दुसरा धागाच उसवावा. असो. तर आता आमच्या डोक्यात आलेल्या प्रश्नांबद्दलः लग्नाचं वय झालं (वेगवेगळ्या आई-वडीलांच्या मते १६ पासुन पुढे ) कि दाखवण्याचे प्रकार सुरु होतात...म्हणजे मुलाला मुलगी दाखवणे वेग्रे. गैरसमज नको उगाच. तर अशा प्रसंगी मुलींना साधारणपणे साडी घालायचा आग्रह होतो. म्हणजे शाळा कालेजात असताना अन बाहेर हिंडताना भले पँट / जीन्स/ स्कर्ट / हाप्पँट / बर्मुडा / पंजाबी ड्रेस - त्यातही बरेच प्रकार आहेत, झालंच तर थ्री फोर्थ वेग्रे घालणार पण पसंतीच्या वेळेस मात्र साडीच असावी. का? तर भारतीय प्रथा आहे शिवाय आपले संस्कार दिसतात असं कारण. साडी घातल्याने संस्कार कसे दिसतात हा एक प्रश्न. मुलं मात्र जीन्स - टी शर्ट झालंच तर बर्मुडा (आजकाल याला कै वेगळं नाव असेल तर माहीत नै) असं घालतात...म्हणजे जर घातलंच तर आक्षेप नसतो. फॉर्मल कपडे जसे की साधा शर्ट अन फॉर्मल पँट सुद्धा घालतात नै असं नै. आता मुलांना मुळातच कपड्यांच्या निवडी अतिशय कमी त्याला आमचा नाईलाज आहे अन म्हणुनच दोन - तीन उदा. दिलेत. एकदा आम्हाला मुलगा पहायला मंबईतुन पुण्याला जायचं असल्याने हे सगळं कसं सांभाळायचं असा प्रश्न पडल्याने शेवटी जीन्स अन आखुड शर्ट घालुन जावं लागलं. एकच एक दाखवायच्या वेळेस उपयोगी म्हणुन आणलेला पंजाबी ड्रेस धुण्यात होता हे अजुन एक कारण. आधुनिक लोकं असल्याने .किंवा "अशा वेळेस कशी बै शर्ट पँट घातली? अशी मुलगी नकोच" म्हणुनही असेल पण कोणी (म्हणजे मुलगा अन त्याची आई)यांनी कै आक्षेप घेतला नै. असो. तर मुद्द्या म्हणजे फक्त दाखवायचा / पसंतीचा प्रोग्रॅम असताना असे साडीच घालायचा आग्रह कितपत योग्य आहे? मिपाकरांनी आपापले अमुल्य मत द्यावे. टीप : आमचं लग्न होउन बाळ सुद्धा शाळेत जातंय पण इतरांना उपयोग होईल या सामाजिक कारणाने हा काकु. उगाच भलत्या चौकशा करु नयेत.
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
34468 वाचन

💬 प्रतिसाद (102)

प्रतिक्रिया

उत्तम चर्चा प्रस्ताव

पैसा
Sat, 04/20/2013 - 10:05 नवीन
विषयात वाद शब्द पाहिल्याने माघार घेत आहे. शिल्पाला नेहमीप्रमाणेच आमचा संपूर्ण पाठिंबा आहेच. स्त्रीमुक्तीवादी आणि विचारवंताच्या प्रतिसादांच्या खास प्रतीक्षेत. महिला विभाग पुरस्कर्ते आणि विरोधक यांची पुन्हा एकदा जुगलबंदी पहायला मिळेल हीच माफक अपेक्षा. मत विचारले आहेच तर कुणी कोणते कपडे केव्हा घालावेत हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. निव्वळ कपड्यांवरून मुलीची निवड कोणी करत असेल तर अशा माणसाबरोबर लग्न न झालेलेच चांगले.
  • Log in or register to post comments

पॉपकॉर्न

कपिलमुनी
Sat, 04/20/2013 - 14:58 नवीन
पॉपकॉर्न घेउन बसलेय हे पैसा तै नी किती संसदीय भाषेत संगितला
स्त्रीमुक्तीवादी आणि विचारवंताच्या प्रतिसादांच्या खास प्रतीक्षेत. महिला विभाग पुरस्कर्ते आणि विरोधक यांची पुन्हा एकदा जुगलबंदी पहायला मिळेल हीच माफक अपेक्षा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

टीप : आमचं लग्न होउन बाळ

टवाळ कार्टा
Sat, 04/20/2013 - 10:39 नवीन
टीप : आमचं लग्न होउन बाळ सुद्धा शाळेत जातंय पण इतरांना उपयोग होईल या सामाजिक कारणाने हा काकु. उगाच भलत्या चौकशा करु नयेत.
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))
  • Log in or register to post comments

आमचं लग्न होउन बाळ सुद्धा

पक पक पक
Mon, 04/22/2013 - 13:14 नवीन
आमचं लग्न होउन बाळ सुद्धा शाळेत जातंय पण इतरांना उपयोग होईल या सामाजिक कारणाने हा काकु. अच्छा म्हणुन तुम्हाला काकु म्हण्तात का..? ;) साधारण याच स्टेज नंतर घराघरात वेगवेगळ्या विषयांवर बायका काकु(काथ्या कुट ) करायला लागतात.. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

शिर्षक फसवे आहे.

परिकथेतील राजकुमार
Sat, 04/20/2013 - 10:41 नवीन
शिर्षक फसवे आहे. (इथे खाली 'मचा क' अशी सही करण्याचे फार्फार मनात आले होते, पण शिल्पाकाकू डोक्यात दगड घालतील म्हणून कीबोर्ड आखडता घेतला.)
  • Log in or register to post comments

पराशी १०० % सहमत !

मदनबाण
Sat, 04/20/2013 - 10:53 नवीन
पराशी १०० % सहमत ! ;) स्त्री साडी मधे जितकी सुंदर दिसते तितकी ती इतर कुठल्याही पोशाखास दिसत नाही असं माझं वैयक्तिक मत आहे. बाकी पाहण्याचे आणि पाहुन घ्यायचे अनेक भन्नाट अनुभव माझ्या गाठीशी आहेत ! ते इथे लिहीत बसत नाही... ;) अर्थात कपड्यांपेक्षा एकमेकांच्या स्वभावाचा,आवडी-निवडीचा जास्त विचार केलेला अधिक उत्तम ! तेव्हा लग्नाळु मंडळींनी याकडेच जास्त लक्ष द्यावे. टीप :-आमचं लग्न होउन सध्या बाळ रांगतय,तेव्हा इतरांना उपयोग म्हणुन हा प्रतिसाद टंकण्याचे कष्ट घेतले आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

+१११११११११

मालोजीराव
Mon, 04/22/2013 - 14:16 नवीन
स्त्री साडी मधे जितकी सुंदर दिसते तितकी ती इतर कुठल्याही पोशाखास दिसत नाही असं माझं वैयक्तिक मत आहे
आपलंपण हेच मत
बाकी पाहण्याचे आणि पाहुन घ्यायचे अनेक भन्नाट अनुभव माझ्या गाठीशी आहेत ! ते इथे लिहीत बसत नाही... अर्थात कपड्यांपेक्षा एकमेकांच्या स्वभावाचा,आवडी-निवडीचा जास्त विचार केलेला अधिक उत्तम ! तेव्हा लग्नाळु मंडळींनी याकडेच जास्त लक्ष द्यावे. टीप :-आमचं लग्न होउन सध्या बाळ रांगतय,तेव्हा इतरांना उपयोग म्हणुन हा प्रतिसाद टंकण्याचे कष्ट घेतले आहेत.
याचा आमच्यासारख्या होतकरू ब्याच्लरांना उपेग होणार ना मालक
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण

मस्त विषय...

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Sat, 04/20/2013 - 10:52 नवीन
>>> फक्त दाखवायचा / पसंतीचा प्रोग्रॅम असताना असे साडीच घालायचा आग्रह कितपत योग्य आहे ? साडीत मुली संदुर दिसतात इतरही ड्रेस मधे सुंदरही दिसत असतील पण एक भारदारपणा, गंभीरपणा, आणि मंगलमय असं एक वातावरण अस या दाखवण्याच्या कार्यक्रमात येतो, असे वाटते. आमच्या वेळेस सालं असं नव्हतं. तेव्हाचे आई वडील म्हणायचे मुकाट उभे राहा आणि तेव्हाचे पोरं मुकाट लग्नाला उभे राह्यचे. बाकी, दाखविण्याच्या विविध प्रकाराचे तपशील येऊ द्या राव. मूलगी पाण्याचा तांब्याभरुन पाणी घेऊन, खाली मान घालून बसण्यासाठी पाटाच्या दिशेने चालली आहे. बैठकीतील मंडळी ओझरतं तिच्याकडे पाहताहेत. मामानं विचारपुसासाठी मनातल्या मनात प्रश्नांचे अनुक्रम ठरवले आहेत. बै तुझं नाव काय, कितवी शिकली आहे, तुझ्या मामाचं गाव कोणतं. च्यायला, काय भन्नाट परंपरा होत्या राव. -दिलीप बिरुटे (आज्ञाधारक)
  • Log in or register to post comments

साडीचा आग्रह नको हे (हृदयावर

बॅटमॅन
Sat, 04/20/2013 - 14:43 नवीन
साडीचा आग्रह नको हे (हृदयावर दगड वगैरे ठेवून) मान्य, पण मुळात अलीकडे साडीवर इतका भर दिला जातो का???
  • Log in or register to post comments

नाही रे. आउटडेटेड लेख आहे हा.

विश्वनाथ मेहेंदळे
Sat, 04/20/2013 - 15:17 नवीन
नाही रे. आउटडेटेड लेख आहे हा. पण आता कुणाचे दाखवण्याचे कार्यक्रम सत्तरच्या दशकात झाले असतील तर तेव्हा मिपा नव्हते यात कुणाचा काय दोष ?? मग तेव्हाचा धागा आत्ता काढला असेल ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

विरोधाभास

प्रसाद गोडबोले
Sat, 04/20/2013 - 15:51 नवीन
"दाखवायचा कार्यक्रम " म्हणल्यावर कपडे कशाला घालायचे असा एक भाबडा प्रश्न लहान पणापासुन आपल्या मनात डोकावतोय ...आणि घालचेच असतील तर साडी इज्ज बेष्ठ मुलींसाठी ! पण आमच्यात म्हणे मुलीला दाखवायचा कार्यक्रम नसतो ...मुलीच मुलाच्या घरी येतात म्हणे बघायला...
  • Log in or register to post comments

आमच्यात म्हणे मुलीला दाखवायचा

गणपा
Sat, 04/20/2013 - 16:16 नवीन
आमच्यात म्हणे मुलीला दाखवायचा कार्यक्रम नसतो ...मुलीच मुलाच्या घरी येतात म्हणे बघायला...
माझ्या बाबतीत तरी हेच घडलं. असल्या नगाला घेउन परक्यांच्या घरी अब्रुचे धिंडवडे नको असा सुज्ञ विचार आई बाबांनी केला असण्याची शक्यता नाकारता येत नाही. ;) आणि हो आमच्या होणार्‍या सौ. मस्त पंजाबी ड्रेस घालून आल्या होत्या. (नशिबाने पहिल्या कार्यक्रमातच निकाल लागला आणि मुलगा उजवण्यासाठी बाबांना पादत्राणं झिजवावी लागली नाही.) बाकी बायकांच सौंदर्य नीट नेसलेल्या साडीत खुलुन दिसतं यात दुमत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले

सल्या नगाला घेउन परक्यांच्या

मदनबाण
Sat, 04/20/2013 - 18:03 नवीन
सल्या नगाला घेउन परक्यांच्या घरी अब्रुचे धिंडवडे नको असा सुज्ञ विचार आई बाबांनी केला असण्याची शक्यता नाकारता येत नाही. आणि हो आमच्या होणार्‍या सौ. मस्त पंजाबी ड्रेस घालून आल्या होत्या. हॅहॅहॅ... शेम टु शेम. ;) नशिबाने पहिल्या कार्यक्रमातच निकाल लागला इथे मात्र आमची इष्टोरी येगळी हाय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणपा

आई गं !!

परिकथेतील राजकुमार
Sat, 04/20/2013 - 16:27 नवीन
"दाखवायचा कार्यक्रम " म्हणल्यावर कपडे कशाला घालायचे असा एक भाबडा प्रश्न
बेक्कार फुटलोय! =)) =)) =)) =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले

+११११११११११११११११११११११.

बॅटमॅन
Sat, 04/20/2013 - 20:43 नवीन
+११११११११११११११११११११११. वाईट्ट वाईट्ट फुटलोय!!!!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

आतातरी आयडी नेम बदला.

प्यारे१
Sat, 04/20/2013 - 17:16 नवीन
आतातरी आयडी नेम बदला. कृपा करा. अशक्य हसतोय.....! गणपा, एवढं गोड गोड नाही बोलत आहेत गोडबोले! ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले

नाही माझा तसा काही समजही नाही

गणपा
Sat, 04/20/2013 - 17:41 नवीन
नाही माझा तसा काही समजही नाही झाला. ;) त्यांनी उपहासाने लिहिलं असेलही. पण माझ्या बाबतीत ते खरं होतं म्हणुन तेवढंच वाक्य कोट केलं. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१

सत्तरच्या दशकातला धागा आहे

अप्पा जोगळेकर
Sat, 04/20/2013 - 16:01 नवीन
सत्तरच्या दशकातला धागा आहे याला अनुमोदन. मुलाला भेटायला जाताना शक्य तितके उत्तान कपडे वापरण्याकडे मुलींचा कल असतो हे अनुभवावरुन सांगू शकतो.
  • Log in or register to post comments

हा हा...

दादा कोंडके
Sat, 04/20/2013 - 16:15 नवीन
मुलाला भेटायला जाताना शक्य तितके उत्तान कपडे वापरण्याकडे मुलींचा कल असतो हे अनुभवावरुन सांगू शकतो.
अनुभव वैग्रे नाही पण, "अगदीच तोकडे कपडे नको पण 'अ‍ॅसेट्स' दिसतील असे कपडे घाल" असं क्यांटीनमध्ये असा एक मुलीने दुसर्‍या मुलीला दिलेला सल्ला या कानाने ऐकला आहे. बाकी धागा दोन-चार दशकामागचा आहे याच्याशी देखील सहमत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अप्पा जोगळेकर

अगागागा.....अ‍ॅसेट्स......अ‍ॅसेट्स

इरसाल
Sat, 04/20/2013 - 16:32 नवीन
अनुभव वैग्रे नाही पण, "अगदीच तोकडे कपडे नको पण 'अ‍ॅसेट्स' दिसतील असे कपडे घाल"
भयानक आहे हे. अश्याने इनकम वाले धाडी घालतील ना ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दादा कोंडके

भारतात सत्तर टक्के जनता

प्रियाकूल
Sat, 04/20/2013 - 16:25 नवीन
भारतात सत्तर टक्के जनता खेड्यात राहते. त्यांची मुलं शिकलेली असतात.त्यांना चालतील मुली ड्रेस किंवा जीन्स मधे पण आई,वडील,आजी,आत्या,मामा लोक आले कि त्यांना मुलगी साडीतच पहायची असते,कारण अजूनही फक्त मुलालाच मुलगी पसंत असून भागत नाही. मुलाच्या घरचेही परत मुलीला पाहायला येतातच. त्यामुळे मुलीला साडी घालणे हे आलेच.
  • Log in or register to post comments

मी भारत ज्यावेळी सोडला त्याच

निनाद मुक्काम …
Sat, 04/20/2013 - 17:08 नवीन
मी भारत ज्यावेळी सोडला त्याच स्थितीत तो नेहमीच आहे , जग बदलले पण भारत मात्र माझ्या आठवणीतला आहे किंवा तो तसा असावा असा गोड गैरसमज एक अनिवासी ह्या नात्याने मी कधीच करून घेतला नाही. काही वर्षांच्या पूर्वी ही जाहिरात पहिली होती.
  • Log in or register to post comments

काही हरकत नाही..

मैत्र
Sat, 04/20/2013 - 17:41 नवीन
लग्नही जीन्स अन आखुड शर्ट असा मुलीचा पोशाख आणि टिशर्ट व बर्म्युडा किंवा ट्रॅक पँट असा मुलाचा पोशाख असं व्हावं.. काहीच हरकत नाही. सर्व फॉर्मल समारंभही आपल्याला हव्या त्या पोशाखात व्हावेत. आता आहेत कोणी इंद्रा नुयी, कोच्चर, किंवा किडवाई तर त्यांच काम आणि बुद्धिमत्ता हेच महत्त्वाचं ना.. पोशाखामुळे काय अडतंय.. उद्दिष्ट महत्त्वाचं .. बाह्य पोशाख कसा का असेना. विरोध महत्त्वाचा...
  • Log in or register to post comments

काही हरकत नाही..

मैत्र
Sat, 04/20/2013 - 17:43 नवीन
लग्नही जीन्स अन आखुड शर्ट असा मुलीचा पोशाख आणि टिशर्ट व बर्म्युडा किंवा ट्रॅक पँट असा मुलाचा पोशाख असं व्हावं.. काहीच हरकत नाही. सर्व फॉर्मल समारंभही आपल्याला हव्या त्या पोशाखात व्हावेत. आता आहेत कोणी इंद्रा नुयी, कोच्चर, किरण मुजुमदार किंवा किडवाई तर त्यांच काम आणि बुद्धिमत्ता हेच महत्त्वाचं ना.. पोशाखामुळे काय अडतंय.. त्यांनीही उद्दिष्ट महत्त्वाचं .. बाह्य पोशाख कसा का असेना. त्यांनीही बिनधास्त आखुड शर्ट, टँक टॉप्स, केप्रि यात मुलाखती द्याव्यात, कॉन्फरन्सेस ला जावं, सीआयआय आणि दावोस मध्ये बोलावं. मुख्य काम काय तर बिझनेस.. उगाच पोशाखाचं प्रदर्शन कशाला.. (विरोधासाठी) विरोध महत्त्वाचा...
  • Log in or register to post comments

जातीच्या सुंदरा काहीही शोभते।

प्रकाश घाटपांडे
Sat, 04/20/2013 - 18:05 नवीन
जातीच्या सुंदरा काहीही शोभते। र्यापर कंच बी असल तरी आतला माल मात्र चांगला पाहिजे! पारखी लोकांना रत्नाची पारख असते.
  • Log in or register to post comments

हा हा....

दादा कोंडके
Sat, 04/20/2013 - 20:32 नवीन
खरंय. एका उमेद्वार मित्राला दुसर्‍या अनुभवी मित्राने सल्ला दिला की, बगायच्या येळी कंच्या बी पोरी म्येकप थापून सुंदर दिसत्यात. तू त्वांड बगू नको तर पाय बग. पाय लोन्यावानी असले पायजे बग. ह्यो गडी दुसर्‍या दिवशी पोरीचं त्वांड बगायचं सोडून वाकू वाकू खाली बगायला. शेवटी म्हातार्‍यानं, 'काय पडलयं का खाली?' विचारल्यावर गडी भानावर आला. :))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रकाश घाटपांडे

काय म्हणतीयेस काय शिल्पा?

रेवती
Sat, 04/20/2013 - 18:08 नवीन
काय म्हणतीयेस काय शिल्पा? आजकालही साडी नेसून मुलाला मुलगी अथवा मुलीला मुलगा दाखवण्याचे कार्यक्रम होतात? हैला!
  • Log in or register to post comments

आजकालही साडी नेसून मुलाला

राजेश घासकडवी
Sat, 04/20/2013 - 18:27 नवीन
आजकालही साडी नेसून मुलाला मुलगी अथवा मुलीला मुलगा दाखवण्याचे कार्यक्रम होतात?
तुमच्या इंडियात नसतील होत, पण भारतात होतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती

हेच म्हणायला आले होते.

शिल्पा ब
Sat, 04/20/2013 - 23:35 नवीन
हेच म्हणायला आले होते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेश घासकडवी

होतात.. मानपानाच्या भोंगळ

मस्त कलंदर
Sat, 04/20/2013 - 20:43 नवीन
होतात.. मानपानाच्या भोंगळ कल्पना जिथे असतात तिकडे तर नक्कीच होतात. कुणीतरी नातेवाईकाने सुचवलेलं पण पसंत नसलेलं स्थळ, त्याला मुलगी दाखवली नाही तर तो नातेवाईक नाराज होईल म्हणून कार्यक्रम करावाच लागेल असं म्हटल्यावर '(किमान) आधीच पसंत नसलेल्या मुलाला बघायच्या कार्यक्रमात साडी नेसणार नाही' असं म्हटल्यावरचे सारे गदारोळ आठवताहेत अजून मला. इतकंच काय, 'दुबईत नोकरी करतो' या एकाच क्वालिटीवर पाहायला आलेल्या आणि मूग गिळून बसलेल्या मुलाच्या बापाने साडी किंचित वर करून पाय दाखव असंही म्हटलं होतं, आणि यावर मी सोडून बाकी कुणाचा आक्षेपही नव्हता. त्यांना म्हणे पांढर्‍या पायाची, पालथ्या पायाची सून नको होती. इथं मला तो असला मुलगा आख्खाच नको होता त्याचं मात्र त्यांना काही नाही. सबब, मुंबई-पुणे तत्सम शहरे(इथेही काही घरांतून साडी नेसलीच पाहिजे अशी अट असू शकते) किंवा शिकून खरेच 'सुसंस्कृत' असलेली काही कुटुंबे म्हणजे पूर्ण समाज नाही. आपले श्रामो म्हणतात ना, तशी समाज ही खूपच गुंतागुंतीची गोष्ट आहे.
  • Log in or register to post comments

स्वसंपादनाच्या नानाची टांग!!!

मस्त कलंदर
Sat, 04/20/2013 - 20:45 नवीन
या निमित्ताने पांढरे आणि पालथे पाय कसे दिसतात यावर जाणकारांनी प्रकाश टाकावा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मस्त कलंदर

एक ऐकले होते

श्रीरंग_जोशी
Sat, 04/20/2013 - 20:49 नवीन
काही सिनियर मित्रांच्या तोंडून ऐकले होते ज्यांचे कित्येत राउंड होवूनही काही जमत नव्हते. तर मुद्दा असा की जर बघायला गेलेल्या मुलीच्या पायाच्या अंगठ्या शेजारचे बोट अंगठ्यापेक्षा जराही लांब असेल तर ती मुलगी आयुष्यभर नवर्‍यावर वर्चस्व गाजवेल, फार हसू आले होते बुवा तेव्हा ;-). मला प्रत्यक्ष हा अनुभव नसल्याने अधिका काही सांगण्यासारखे नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मस्त कलंदर

माझ्या नवर्‍याला विचारू शकता..

मस्त कलंदर
Sat, 04/20/2013 - 21:11 नवीन
माझ्या घरात माझी आईच्या आणि माझ्यासकट दोन्ही बहिणींची अंगठ्याशेजारची बोटे अगदी सहज जाणवण्याइतपत अंगठ्याहून लांब आहेत. माझे, मधले बोटही अंगठ्याहून थोडे जास्त लांब असेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीरंग_जोशी

आयला

लॉरी टांगटूंगकर
Sat, 04/20/2013 - 23:48 नवीन
मला कोणी तरी हे हुशारीचं लक्षण असतंय असं सांगितलेलं. मंजे अंगठा लहान असला अन् दुसरं बोट मोठ तर ती व्यक्ती बक्कळ डोकंवाली असते असं
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीरंग_जोशी

तेच हो !! बायको नवर्‍यापेक्षा

शिल्पा ब
Sat, 04/20/2013 - 23:59 नवीन
तेच हो !! बायको नवर्‍यापेक्षा हुशार नको. फटकळ असली तर चालतै ! तिला भांडखोर म्हणता येतं
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: लॉरी टांगटूंगकर

कठीण आहे.

पैसा
Sat, 04/20/2013 - 21:17 नवीन
म्हणजे एखादी वस्तू घेताना सगळ्या बाजूंनी पारखून घेऊन विकत घेतात तसला प्रकार. नशीब, चालून दाखव, नाहीतर बोलून दाखव असले काही सांगितले नाही. एरवी पांढर्‍या पायाची म्हणजे काय याबद्दल मलाही कुतुहल आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मस्त कलंदर

>>>पांढर्‍या पायाची

प्यारे१
Sun, 04/21/2013 - 00:07 नवीन
>>>पांढर्‍या पायाची बहुतेक कोड असणार्‍या व्यक्तीला पांढर्‍या पायाची असं म्हणतात. अवांतर : एका मठात एकदा उंदीर खूप झालेले असतात. समयांच्या तेलात बुडवलेल्या वाती तेलासाठी पळवून नेत रात्री बेरात्री. मठाधिपतींनी बर्‍याच उपायानंतर शेवटचा उपाय म्हणून मोठ्या परातीत पाणी घेऊन (उंदरांना उडी मारुन पोचता येऊ नये एवढी मोठी परात) त्यात मध्यभागी समया ठेवल्या. काळ सरला. मठाधिपती गेले, उंदीर औषध खाऊन मेले. आजही मठात समया परातीत मध्यभागी पाण्यात ठेवतात. असो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

सपाट पाय

सूड
Sun, 04/21/2013 - 12:28 नवीन
पाय बघण्याचा संबंध पांढर्‍या पायाशी नसून सपाट पायाशी असतो असं कोणीतरी सांगितल्याचं आठवतंय. माझ्या एका रुममेटचे पाय सपाट होते. चपला घ्यायला दुकानात गेलो तेव्हा दुकानदाराने त्याला बूटात एक Arch बसवून घ्यायचं सुचवलं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मस्त कलंदर

सपाट पायाचा इथे संबंध नसावा

विश्वनाथ मेहेंदळे
Sun, 04/21/2013 - 13:53 नवीन
सपाट पायाचा इथे संबंध नसावा रे. तशी १००० वैगुण्ये असू शकतात शरीरात. काय काय चेक करणार? सपाट पायाने त्रास होतो तो धावताना किंवा कुठलेही खेळ खेळताना. ते पण खूप जास्त काळ केले तर. बायको निवडताना हे निकष असतील असे वाटत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

नै रे

पैसा
Sun, 04/21/2013 - 14:02 नवीन
सपाट पायाची माणसं अपशकुनी असतात असा समज खेडेगावातून होता पूर्वी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विश्वनाथ मेहेंदळे

आयला असे आहे होय !!! आता कळले

विश्वनाथ मेहेंदळे
Sun, 04/21/2013 - 15:23 नवीन
आयला असे आहे होय !!! आता कळले मी नेहमी वाद का ओढवून घेतो ते... (सपाट पायाचा) विमे :-(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

चालतं रे !!

सूड
Mon, 04/22/2013 - 11:50 नवीन
सपाट पायाची मुलगी सून म्हणून घरात आली तर सगळं घर सपाट करते (थोडक्यात ती येण्यापूर्वी त्या घराचा जो मान, वैभव असतं ते सगळं ती आल्यानंतर लयाला जातं) असा जुन्या जाणत्या (?) लोकांचा समज होता. जावई सपाट पायाचा असला तर काही फरक पडत नाही. ;) सूचना: वरील वाक्य उपहासाने लिहीलंय, लगेच सगळ्या पाशवी शक्तींना जाग यायची गरज नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विश्वनाथ मेहेंदळे

सपाट पायाची

इरसाल
Mon, 04/22/2013 - 12:23 नवीन
मुलगी असली तर तिच्या पतीकडे पैसा टिकत नाही अशी मान्यता आहे. पांढर्‍या पायाची म्हण्जे जिचे पाय वाजवीपेक्षा रंगाने सफेद अशी ही अपशकुनी मानली जाते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

कांही तथ्य असावे....

प्रभाकर पेठकर
Mon, 04/22/2013 - 21:09 नवीन
तळपायाला नैसर्गिकरित्या असणारी कमान शरीराचा भार तोलण्यासाठी आवश्यक असते असे म्हणतात. तशी ती नसेल तर अशी माणसे जास्त काळ शारीरीक काम करू शकत नाहीत लवकर थकतात असे ऐकले आहे. म्हणून चुकुन सपाट पायाची मुलगी घरात सुन म्हणून आली तर ती घरकाम जास्त करू शकणार नाही आणि गृहकृत्यात कमी पडेल असा त्या काळी समज होता. खरा की खोटा हे एखादा डॉक्टरच सांगू शकेल. एअर फोर्सच्या शारीरीक तपासणीत तळपायांची ही कमान आणि दोन्ही पाय जुळवून उभे असताना गुडघे एकमेकांना चिकटतात की वेगळे राहतात हे पाहिले जाते. ह्या शारीरीक तपासणीतून मी स्वतः गेलो आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

म्हणे बर्का, रावणाचे पाय

मस्त कलंदर
Sun, 04/21/2013 - 15:28 नवीन
म्हणे बर्का, रावणाचे पाय पालथे होते, आणि मग त्याने मदांध होऊन नवग्रह पालथे घातले आणि त्यावरून चालत गेला. त्या मध्ये आपले शनिबाबा पण होते. ते कोपल्यामुळे रावणाला पुढची सगळी दुर्बुद्धी झाली. आता या सगळ्या दंतकथा जरी असतील, तरी त्या वरच्या समई आणि परातीसारख्या वडाची साल पिंपळाला लावून लोक समज- खरे तर गैरसमज बाळगून असतात. कधी कधी असा नसता कर्मठपणा दाखवल्यामुळे आजूबाजूचे काही लोक दबून असतात, त्यामुळे थोडासा अहंकार सुखावतो म्हणूनही हे असले समज बाळगणं होत असेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विश्वनाथ मेहेंदळे

मके स्पष्ट बोलतो राग नको

मृत्युन्जय
Tue, 04/23/2013 - 14:14 नवीन
मके स्पष्ट बोलतो राग नको मानुन घेउस. पण चूक त्या लोकांची नव्हती तर तुझ्या घरच्यांचीच होती. आलेली लोकं माठच होती. पण त्यांनी साडी वर करुन पाय दाखव म्हटल्यावर तुझ्या घरच्यांनीच या गोष्टीला आक्षेप घ्यायला हवा होता. नपेक्षा मुलानेही पँट वर करुन दाखवावी असे सुचवायला हवे होते. लोक काय वाट्टेल त्या अपेक्षा करतील. अवांतरः पाय दाखव म्हणण्याऐवजी तुला कोड नाहित याचे डॉक्टरी स्पष्टीकरण दे असे सांगितले असते तर तुला चालले असते का? हाच प्रश्न तुझ्या नवर्‍याने (देवाच्या दयेने तो हुषार आहे. माठ नाही. असले काही विचारणार नाही. तरी.._ ) विचारले असते तर तुझी तितपतच चिडचिड झाली असती का?)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मस्त कलंदर

पारंपरिक पद्धतीमधे असे प्रश्न

३_१४ विक्षिप्त अदिती
Tue, 04/23/2013 - 21:26 नवीन
पारंपरिक पद्धतीमधे असे प्रश्न फक्त मुलीलाच विचारले जातात; मुलगा फक्त क्रोमोझोम्सची एक जोडी XY आहे (XX नाही; किंवा फ्रॉयडीयन स्पष्टीकरण बघावे) या सबबीस्तव वैगुण्यरहित असतो असं मानलं जातं. अलिकडे शहरांमधे मुलीही मुलाला judge करताना दिसतात, तिथे त्या बाबतीत समानता आहे. मकीचे अनुभव पहाता तिला या बाबतीत समानतेचा अनुभव नाही. समानता ही ट्रॅफिकमधल्या 'राईट ऑफ वे' सारखी असते. ती मागून मिळत नाही, आणि बळकावूनही नाही. ती द्यावी लागते.
इथं मला तो असला मुलगा आख्खाच नको होता त्याचं मात्र त्यांना काही नाही.
या वाक्यातून, माझ्या मते, (ती मुलगी असल्यामुळे) तिच्या मताला थोडाही मान न देणार्‍या, तिचा तिथे उपस्थित सगळ्या लोकांवर असणारा वैताग दिसतो आहे. फक्त मुलावर किंवा त्याच्या घरच्यांवर नाही; आणि त्यापेक्षाही एकंदर परंपरेच्या (उरल्यासुरल्या) अवशेषांवर टीका.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय

तुझा आधीचा प्रतिसाद आहे की

मस्त कलंदर
Wed, 04/24/2013 - 01:35 नवीन
तुझा आधीचा प्रतिसाद आहे की मुलींना आक्षेप का असतो या कार्यक्रमावर. उत्तर आहे कार्यक्रम ज्या पद्धतीने पार पडतो त्यावर आक्षेप असतो. बरेचदा मुलगा बिझी असतो, मग आईबाबा बघतात, त्यांना पसंत तर बाकीचं लटांबर घेऊन येतात. यात मुलीला पण दोनदोनदा दाखवून घ्यायला वेळ नसू शकतो. लग्न दोघांनाही करायचं असतं, दोन्ही बाजूंकडून ते तसंच घेतलं जात नाही असा स्वानुभव आहे.. माझ्या त्राग्यावर घरच्यांचे उद्गार होते, "त्यात काय, परवाच आपल्या नात्यातल्या तिलापण असंच सांगितलं होतं". इथं माझी लढाई सगळ्यांच बाजूंनी होती. चुकीच्या परंपरा, ज्यांना लग्न करायचंय तो तोंड उघडून एक शब्द बोलत नाहीत मग असल्या मुलांशी मला लग्न का करायचं नाहीय हे पुन्हापुन्हा पटवून देत राहाणं , माहित असलेलेच प्रश्न विचारणं(एकाने चक्क मार्कलिस्ट पाहायला मागितली होती) आणि इथून तिथून विचारणार काय, की नोकरी करणार तर घरचा स्वयंपाक कोण करणार वगैरे वगैरे. मला खरंतर शास्त्रीय आधार असलेलं काहीही विचारलं तर काहीच प्रॉब्लेम नसेल, मग तो मेडिकल रिपोर्ट का असेना. पण माझा मागायचा आणि स्वतः चेक-अप करायचं नाही असा दांभिकपणा नको..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय

हे असेच उलटे माझ्याबाबत पण

मृत्युन्जय
Wed, 04/24/2013 - 11:50 नवीन
हे असेच उलटे माझ्याबाबत पण झाले आहे. एक दोन मुलींचे आईवडील आधी येउन मल घराला बघुन गेले आणि मग मुलीला घेउन आले. हे असे सगळीकडे सगळ्यांच्या बाबतीत होते ग. किमान मला तरी तसे अनुभव आले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मस्त कलंदर

मलापण मलापण. दोन वेळेस असे

अमोल खरे
Sat, 04/27/2013 - 17:17 नवीन
मलापण मलापण. दोन वेळेस असे अनुभव आले आहेत. मुलीचे आई वडिल आधी येऊन आमचे घर आणि मला पाहुन गेले होते. नंतर मुलीला घेऊन आले. पण काय आहे ना, की मुलांच्या नावाने खडे फोडले की विचारवंत म्हणुन कौतुक होतं. टीप- हा प्रतिसाद मकीला उद्देशुन नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा