"दाखवणे" आणि फॉर्मल कपडे
बॅटमॅनचा हा धागा वाचला अन मनात काही प्रश्न निर्माण झाले. म्हंटल दुसरा धागाच उसवावा. असो.
तर आता आमच्या डोक्यात आलेल्या प्रश्नांबद्दलः
लग्नाचं वय झालं (वेगवेगळ्या आई-वडीलांच्या मते १६ पासुन पुढे ) कि दाखवण्याचे प्रकार सुरु होतात...म्हणजे मुलाला मुलगी दाखवणे वेग्रे. गैरसमज नको उगाच. तर अशा प्रसंगी मुलींना साधारणपणे साडी घालायचा आग्रह होतो. म्हणजे शाळा कालेजात असताना अन बाहेर हिंडताना भले पँट / जीन्स/ स्कर्ट / हाप्पँट / बर्मुडा / पंजाबी ड्रेस - त्यातही बरेच प्रकार आहेत, झालंच तर थ्री फोर्थ वेग्रे घालणार पण पसंतीच्या वेळेस मात्र साडीच असावी. का? तर भारतीय प्रथा आहे शिवाय आपले संस्कार दिसतात असं कारण. साडी घातल्याने संस्कार कसे दिसतात हा एक प्रश्न.
मुलं मात्र जीन्स - टी शर्ट झालंच तर बर्मुडा (आजकाल याला कै वेगळं नाव असेल तर माहीत नै) असं घालतात...म्हणजे जर घातलंच तर आक्षेप नसतो. फॉर्मल कपडे जसे की साधा शर्ट अन फॉर्मल पँट सुद्धा घालतात नै असं नै. आता मुलांना मुळातच कपड्यांच्या निवडी अतिशय कमी त्याला आमचा नाईलाज आहे अन म्हणुनच दोन - तीन उदा. दिलेत.
एकदा आम्हाला मुलगा पहायला मंबईतुन पुण्याला जायचं असल्याने हे सगळं कसं सांभाळायचं असा प्रश्न पडल्याने शेवटी जीन्स अन आखुड शर्ट घालुन जावं लागलं. एकच एक दाखवायच्या वेळेस उपयोगी म्हणुन आणलेला पंजाबी ड्रेस धुण्यात होता हे अजुन एक कारण. आधुनिक लोकं असल्याने .किंवा "अशा वेळेस कशी बै शर्ट पँट घातली? अशी मुलगी नकोच" म्हणुनही असेल पण कोणी (म्हणजे मुलगा अन त्याची आई)यांनी कै आक्षेप घेतला नै. असो.
तर मुद्द्या म्हणजे फक्त दाखवायचा / पसंतीचा प्रोग्रॅम असताना असे साडीच घालायचा आग्रह कितपत योग्य आहे? मिपाकरांनी आपापले अमुल्य मत द्यावे.
टीप : आमचं लग्न होउन बाळ सुद्धा शाळेत जातंय पण इतरांना उपयोग होईल या सामाजिक कारणाने हा काकु. उगाच भलत्या चौकशा करु नयेत.
वर्गीकरण
प्रतिक्रिया
मुलांच्या नावाने खडे फोडले की
एकाने चक्क मार्कलिस्ट पाहायला
थिअरेटीकली बरोबर आहे. पण ते
मस्त लेख...
साडी किंचित वर करून पाय दाखव
परंपरा
फॉर्मल नको नॉर्मल कपडे घालावेत.
साडी नेसण्याच आग्रह
तुम्ही डकवलेल्या बहुतेक
मी तर नवर्याला पहायला
पाहण्या-दाखवण्याच्या रोमांचक
असे विषय बरे असतात
नक्की काय होउन लग्न जमतं हा
हाहाहा!
पहिली गोष्ट म्हणजे इथे प्रकट
बलीवर्दनेत्रभञ्जक प्रतिसाद.
जे ब्बात !!
शक्यतो बनियनही नको असतो असं
न बघता अक्कड बक्क्ड बम्बे बो
लॉजिकल बोलतोस मृत्युंजया ???
गजरा
गजरा किंवा वेणी घेऊन द्यावे
यावरून एक शंका.
गजरा हा सुईने दोर्यात ओवून
माहितीकरिता धन्यवाद.
हा पहा अबोलीचा गजरा :-)
या लेखात फार क्वचित 'गजरा'
?
काटेकोरपणा
'मोगर्याचा गजरा' आणि
पण वेणीचे हे वर्णन जास्त
खरंतर आपण आपला-आपला सँपल सेट
अनुमोदन..
अपेक्षा मुलीकडून जास्त असतात,
"मुलाची चिकित्सा नकोच, उगीच
आई बरोबर जनगणना करत फिरत
"मुलाची चिकित्सा नकोच, उगीच
पंधरा वर्षं
सहमत.पंजाबी ड्रेस हा
साधारणपणे ३२ वर्षापुर्वी...
अपेक्षा कोणाकडून जास्त असतात
अपेक्षा कोणाकडून जास्त असतात
पुरुषांनीच बिले भरायची, फुकट
स्त्री पुरुष समानता असते, पण
+१००
चालायचंच. एकंदरच स्त्री-पुरुष
+१०^१००.
'भारतात खेड्यांमधल्या
'भारतात खेड्यांमधल्या स्त्रिया अतिशय कष्टाचे आयुष्य जगतात तर शहरी स्त्रिया फार शेफारुन गेल्या आहेत' असे विधान केले होते तर इथले स्त्री-मुक्तीवाले खवळून उठले होते.आप्पा - लिंक आहे का धाग्याची...?इतका
पडोसन ची भ्रष्ट नक्कल आहे तो