झाली शांत तृप्त धरा
अशा बरसल्या धारा
सांगे गंधाचा निरोप
तुझ्या अंगणीचा वारा
गर्द सावळे आभाळ
राशी रुप्याच्या सांडते
सौदामिनी उजळते
तुझा गगनगाभारा
झेलताना तनूवर
हिरेमोती आनंदाने
लाख डोळ्यांनी फुलतो
मनमोराचा पिसारा
तुझ्या करुणेचा मेघ
माझ्या दारी झरताना
जागेपणी पापण्यांत
स्वप्न येतसे आकारा
माझ्या जन्माचे सार्थक
तुझे ओसंडून देणे,
माझी चातकाची तृषा
तुझ्या अमृताच्या धारा
| लेखनविषय: |
|---|
वाचने
4749
प्रतिक्रिया
27
मिसळपाव
प्रतिक्रिया
आहाहा..
+१ असेच म्हणतो!
In reply to आहाहा.. by अनामिक
सहमत,
In reply to +१ असेच म्हणतो! by चतुरंग
सुंदर ...
सुरेख कविता
छानच
वा...
सुरेख!
गर्द सावळे
वा! मस्त
वा वा वाह
अमृताच्या धारा
आवडली
सुरेख कविता
झकास कविता
वा
माझ्या
ख ल्ला
आवडली ...
वा ! छान
कविता आवडली
सुंदर !
सुंदर!!
वा! किती सुरेख!
अप्रतीम !!!
अप्रतीम !!!
अप्रतीम !!!