Skip to main content

अमृताच्या धारा

लेखक क्रान्ति यांनी बुधवार, 24/06/2009 या दिवशी प्रकाशित केले.
झाली शांत तृप्त धरा अशा बरसल्या धारा सांगे गंधाचा निरोप तुझ्या अंगणीचा वारा गर्द सावळे आभाळ राशी रुप्याच्या सांडते सौदामिनी उजळते तुझा गगनगाभारा झेलताना तनूवर हिरेमोती आनंदाने लाख डोळ्यांनी फुलतो मनमोराचा पिसारा तुझ्या करुणेचा मेघ माझ्या दारी झरताना जागेपणी पापण्यांत स्वप्न येतसे आकारा माझ्या जन्माचे सार्थक तुझे ओसंडून देणे, माझी चातकाची तृषा तुझ्या अमृताच्या धारा
Taxonomy upgrade extras
लेखनविषय:

वाचने 4749
प्रतिक्रिया 27

प्रतिक्रिया

आहाहा.. सुरेख! माझ्या जन्माचे सार्थक तुझे ओसंडून देणे, माझी चातकाची तृषा तुझ्या अमृताच्या धारा क्लास!! -अनामिक

In reply to by अनामिक

वा वा अतिशय हृद्य कल्पना तुमच्या कवितातून वरचेवर दिसतात! जियो!! (रसिक)चतुरंग

In reply to by चतुरंग

सहमत, तृप्त जाहलो ! :-) सस्नेह विशाल ************************************************************* मज पिसे लागलेले सुखांचे गे हलकेच धुके ओसरते आहे...

कविता खूप आवडली .. सांगे गंधाचा निरोप तुझ्या अंगणीचा वारा ... माझ्या जन्माचे सार्थक तुझे ओसंडून देणे, माझी चातकाची तृषा तुझ्या अमृताच्या धारा सुरेखच ..

माझ्या जन्माचे सार्थक तुझे ओसंडून देणे, माझी चातकाची तृषा तुझ्या अमृताच्या धारा . . . हे कडवं फार आवडलं.

"माझी चातकाची तृषा तुझ्या अमृताच्या धारा" अवांतरः अहो पण पाऊस काहीच नाही हो. मुल आणि कविता होईपर्यंत खाजगी असते आणि एकदा "झाल्यानंतर" ते सार्वजनीक होते. - मराठी आणि बेळगाव, कारवार, अहवा, डांग, बर्‍हाणपूर, गोव्यासह संयुक्त महाराष्ट्र प्रेमी - पाषाणभेद उर्फ दगडफोड्या ( -राजेंनी बहाल केलेले नाव)

माझ्या जन्माचे सार्थक तुझे ओसंडून देणे, माझी चातकाची तृषा तुझ्या अमृताच्या धारा उत्तम.

शेवटचे कडवे क्लास! :) राघव ( आधीचे नाव - मुमुक्षु )

गर्द सावळे आभाळ राशी रुप्याच्या सांडते सौदामिनी उजळते तुझा गगनगाभारा अप्रतीम कविता...! आपला, (फ्यॅन) तात्या.

वा! मस्त कविता !! --अवलिया

वा वा वाह ! स्पेशल क्रांतीतै टच. मनापासुन आवडली कवीता. º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी... आमचे राज्य

आपल्या काव्याने पावसात न्हायल्याचा आनंद मिळाला ! शेवटच्या कडव्याने रचनेला वेगळीच उंची प्राप्त झाली आहे !! नेहमीप्रमाणेच सुंदर रचना !!

वाह!.. खूप छान कविता! आवडली ऋषिकेश ------------------ बुद्धीसाठी लोह वाढवणारी औषध घ्यायला लागल्यापासून "डोकं गंजलं तर!" ही भिती वाढली आहे

कविता अतिशय आवडली. कवितेचा शेवटही विशेष आवडला. सोनाली

माझ्या जन्माचे सार्थक तुझे ओसंडून देणे, माझी चातकाची तृषा तुझ्या अमृताच्या धारा क्लासच... :) मदनबाण..... Success is never permanent, and failure is never final. Mike Ditka

ख ल्ला स!!! दुसरा शब्द नाही. पावसात मनमुराद भिजल्याचा प्रत्यय आला. :) शब्द रचना अतिशय सुंदर. :) - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

...माझी चातकाची तृषा तुझ्या अमृताच्या धारा खूप छान.

वा ! छान कविता :) शेवटचे कडवे विशेष ! -- लिखाळ.

अतिशय सुंदर कविता. फ्रेंचमध्ये पॅपिलॉन म्हणजे फुलपाखरू. फुलांफुलांवर उडत बागडत जाऊन त्यांचा मकरंद चाखणारे फुलपाखरू. पण हातात धरू जाल, तर हाती न येणारे फुलपाखरू.

अप्रतीम असे शेवटचे कडवे! :)