कालच कुठल्याश्या एका (माझ्या माहितीप्रमाणे 'द्रोण') चित्रपटाच्या कुठल्याश्या एका समारंभात प्रसिद्ध अभिनेत्री जया बच्चन हिने
'हंम यूपीके है, हम हिंदीमेही बात करेंगे. महाराष्ट्रके लोग हमे माफ कर दे!"
असे मराठीजन, मराठीभाषा आणि महाराष्ट्र यांचा जाणूनबुजून अपमान करणारे, खिल्ली उडवणारे वक्तव्य केले. अनेक वाहिन्यांनी काल रात्री उशिराने हे दृष्य दाखवले. सदर वक्तव्य करतांना जयाच्या चेहेर्यावर खिल्ली उडवण्याचे, छद्मीपणाचे भाव स्पष्ट दिसत होते! मूळची बरेलीची असलेली प्रियांका चोप्रादेखील जयाच्या संगतीने हसत, थोबाड विचकत तेथेच उभी होती!
मराठीची, महाराष्ट्राची खिल्ली उडवण्याबद्दल मी जया बच्चन यांच्याबद्दल अत्यंत तीव्र आणि कडवा निषेध व्यक्त करत आहे! ज्या महाराष्ट्राने आयुष्यभर दोन वेळची भाकरी दिली त्या महाराष्ट्राबद्दल आणि महाराष्ट्रीयांबद्दल इतकी हेटाळणी, टिंगलटवाळी करणे हे माझ्या मते अत्यंत कृतघ्नपणचे लक्षण आहे. ज्या थाळीत खायचे त्याच थाळीत हागायचे असला प्रकार आहे हा!
असो, हे हागणे संबंधितंनाच लखलाभ!
षंढ असलेले महाराष्ट्र शासन जयाच्या या मराठीची आणि महाराष्ट्राची जाहीरपणे खिल्ली उडवण्याच्या वर्तनाबद्दल आता तिच्यावर काय कारवाई करणार ते बघायचे!
या सर्वामागे समाजवादी पक्ष येथे भाषिक व प्रांतिक राजकारण करू पाहात आहे हे गर्भित आहेच!
तात्या.
वाचने
29441
प्रतिक्रिया
83
मिसळपाव
प्रतिक्रिया
राज ठाकरे यांची घोषणा (वृत्त वाहिन्यांच्या भाषेत धमकी)
नुकतेच एका
In reply to राज ठाकरे यांची घोषणा (वृत्त वाहिन्यांच्या भाषेत धमकी) by सागर
जया बच्चनने माफी मागितली
In reply to नुकतेच एका by देवदत्त
ही बाई पुण्यात शिकली
हे वाचा
राज
अशा व्यकींना
मराठीपण - एक अभिमान
यांच्या तर **ला
निषेधाचा अप्रतिम मार्ग
CNN-IBN....
ह्म्म... मी
In reply to CNN-IBN.... by गिरीराज
बच्चन कुटुंब...