✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

जया बच्चनचा तीव्र निषेध...!

व
विसोबा खेचर यांनी
Sun, 09/07/2008 - 08:58  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
29274 वाचन

💬 प्रतिसाद (83)

प्रतिक्रिया

ह
हेरंब Sun, 09/07/2008 - 09:31 नवीन

बहिष्कार

तात्या, आपल्याशी सहमत. अशा कलाकारांच्या सिनेमांवर सर्व महाराष्ट्रप्रेमींनी बहिष्कार घातला पाहिजे. हा माजोरीपणा आपल्या सध्याच्या बोटचेप्या सरकारमुळे च वाढला आहे.
  • Log in or register to post comments
स
सखाराम_गटणे™ Sun, 09/07/2008 - 10:46 नवीन

समाजवादी

समाजवादी पक्षात असल्याच लोकांना प्रवेश असतो. जया बच्चन आणि अमिताभ बच्चन यांचा ऐक कलाकार म्हणुन थोडा आदर वाटतो. इतर आयुष्य तर असेच बरबटलेले आहे. त्या बातमीचा दुवा http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/3454574.cms
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Sun, 09/07/2008 - 10:55 नवीन

धन्यवाद,

बातमीच्या दुव्याबदल आभार...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सखाराम_गटणे™
म
मदनबाण Sun, 09/07/2008 - 09:34 नवीन

'हंम

'हंम यूपीके है, हम हिंदीमेही बात करेंगे. महाराष्ट्रके लोग हमे माफ कर दे!" महाराष्ट्राच्या लोकांनी इतके दिवस यांना माफच केल आहे ही त्याचीच फळे आहेत.. जया बच्चनचा तीव्र निषेध!!!!! मदनबाण..... "Hinduism Is Not a Religion,It Is a Way Of Life." -- Swami Vivekananda
  • Log in or register to post comments
स
सखाराम_गटणे™ Sun, 09/07/2008 - 09:37 नवीन

+१

+१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Sun, 09/07/2008 - 09:40 नवीन

मराठी येत नसल्यावर

मराठी येत नसल्यावर ते हिंदीच बोलणार. त्यांना मराठीत बोलण्याचा आग्रह कसे धरणार. शेवटी भाषा स्वातंत्र आहेच, तेव्हा आपण एका कलाकाराकडे अशा नजरेने पाहु नये असे वाटते. मराठीजन, मराठीभाषा आणि महाराष्ट्र यांचा जाणूनबुजून अपमान करणारे, खिल्ली उडवणारे वक्तव्य केले. अनेक वाहिन्यांनी काल रात्री उशिराने हे दृष्य दाखवले. सदर वक्तव्य करतांना जयाच्या चेहेर्‍यावर खिल्ली उडवण्याचे, छद्मीपणाचे भाव स्पष्ट दिसत होते! वाहिन्यांना सनसनाटी काही तरी पाहिजे असते तेव्हा अशा गोष्टींकडे आपण दुर्लक्ष केले पाहिजे असे वाटते. तात्या, जयाचा या गाण्यातला भाव पाहा :)
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Sun, 09/07/2008 - 09:47 नवीन

मराठी येत

मराठी येत नसल्यावर ते हिंदीच बोलणार. त्यांना मराठीत बोलण्याचा आग्रह कसे धरणार. अरे मग बोला ना हिंदीत! हिंदीतच काय, अन्य कुठल्याही भाषेत बरळा! पण चेहेर्‍यावर मराठीची अन् मराठी भाषिकांची खिल्ली उडवणारे भाव का? ते काय आम्हाला समजत नाहीत? वाहिन्यांना सनसनाटी काही तरी पाहिजे असते तेव्हा अशा गोष्टींकडे आपण दुर्लक्ष केले पाहिजे असे वाटते. वाहिन्यांना सनसनाटी काहीतरी पाहिजे असते हे कबूल आहे परंतु कालची घटना माझ्या मते दुर्लक्ष करण्याजोगी नाही! सबब, मी आपल्या वरील विधानाशी असहमत आहे! तात्या, जयाचा या गाण्यातला भाव पाहा एक गुणी अभिनेत्री म्हणून तिला जितके मानायचे तितके मीही मानतो! परंतु या चर्चेत तिच्या अभिनयाचा मुद्दा नाही. मुद्दा आहे तिच्या महाराष्ट्र-द्वेष्टेपणाचा! असो.... तात्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
र
राघव Mon, 09/08/2008 - 16:27 नवीन

तात्यांशी सहमत आहे.

निषेध तर झालाच पाहिजे. जसे जयाबाई बोलल्या तसे त्या यु. पी. मधे जाऊन मराठी माणसाने म्हटले तर त्यांना चालणार आहे काय? सगळा सहिष्णुतेचा भार आम्ही मराठी माणसांनीच वहायचा ठेका घेतलाय काय? जेथे राहता तेथील सभ्यता तुम्हास शिकावीच लागेल म्हणावं. नसेल जमत तर परत जाऊन यु.पी.मधे एखाद्या खेड्यात जाऊन शेती करत दिवस काढा म्हणा उरलेले. तेथे हिंदीच काय काही न बोलले तरी चालेल त्यांचे. संतापलेला मुमुक्षू
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर
अ
अवलिया Sun, 09/07/2008 - 09:48 नवीन

मराठी येत

मराठी येत नसल्यावर ते हिंदीच बोलणार. त्यांना मराठीत बोलण्याचा आग्रह कसे धरणार. माफ करा सर पण याला आम्ही विचारवंतांची गांडुगिरी म्हणतो जया बच्चनचा तीव्र निषेध नाना (संपादक - गांडुगिरी हा शब्द चालत नसेल तर पुर्ण प्रतिसाद उडवावा. * टाकलेले निदान या प्रतिसादात चालणार नाही. नाना)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
व
विसोबा खेचर Sun, 09/07/2008 - 09:49 नवीन

(संपादक -

(संपादक - गांडुगिरी हा शब्द चालत नसेल तर पुर्ण प्रतिसाद उडवावा. * टाकलेले निदान या प्रतिसादात चालणार नाही. नाना) गांडूगिरी हा शब्द फारसा शिवराळ नाही असे माझे मत आहे. माझ्या मते तो इथेच राहिल्यास हरकत नाही! तात्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया
व
विसोबा खेचर Sun, 09/07/2008 - 10:01 नवीन

आणि,

आणि बिरुटेसर स्वत:च संपादक पदावर आहेत त्यामुळे त्यांचा अधिकार अबाधित आहेच! :) परंतु सरांचा प्रतिसाद माझ्याकरता देखील अंमळ धक्कादायक होता. मी पुन्हा एकदा त्यांच्या प्रतिसादाशी विनम्रपणे परंतु अत्यंत कडवी असहमती दर्शवतो...! तात्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Sun, 09/07/2008 - 10:22 नवीन

असहमती असू दे !!!

मराठी कलाकारांसाठी मराठी चित्रपटात पती-पत्नी दोघांनीही पाहुणे कलाकार म्हणुन एक पैसाही न घेता काम केल्याची पुसटशी नोंद आठवते. मराठी मेकअपमनला चित्रपट निर्मितीसाठी सर्वोतपरे मदत केलेली आहे. अनेकांना लाखोच्या देणग्या दिलेल्या आहेत. खरे म्हणजे सदरील चर्चेत येणारे निषेधाचे प्रतिसाद सामाजिक तणावाचे लक्षण आहे. उत्तर प्रदेश, बिहारींच्या लोढ्यांमुळे आपण असुरक्षीत वाटायला लागलो.त्याच्यातच बच्चन कुटुंबियांनी युपीत सुनेच्या नावाने शाळा सुरु केल्याची बातमी वाचायला मिळते. मग आमच्या महाराष्ट्रात राहुन आमच्याच बळावर आमच्या महाराष्ट्रासाठी काही केलं पाहिजे या भावनिक मताशी अनेकांची सहमती असू शकते. परंतू बच्चन फॅमीलीच्या पडत्या काळात त्याला साथ देणा-यांच्या बाजूने आता ते न राहतील तर नवलच वाटावे. मुळात राजकारणात प्रत्येकच सोयीचा विचार करत असतांना प्रत्येकच सुरक्षीत जागा शोधत असतो जया बच्चन यांचे वरील विधान त्याचे द्योतक असावे. धर्म, प्रांत,भाषा यावर तर सतत आपण भावनिक राहिलो आहोत त्यामुळे 'गांडुगिरीचे' तर आम्हाला मुळीच वाईट वाटले नाही. प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर
व
विसोबा खेचर Sun, 09/07/2008 - 10:38 नवीन

अनेकांना

अनेकांना लाखोच्या देणग्या दिलेल्या आहेत. ?? काही तपशील मिळेल का? परंतू बच्चन फॅमीलीच्या पडत्या काळात त्याला साथ देणा-यांच्या बाजूने आता ते न राहतील तर नवलच वाटावे. अरे राहा ना! नाही कोण म्हणतंय? परंतु म्हणजे त्यांना जाहीरपणे मराठीची, महाराष्ट्रीयनांची खिल्ली उडवण्याचा अधिकार प्राप्त झाला का? हे खाल्ल्या थाळीत शिटणे आहे असे आपल्याला वाटत नाही का? मुळात राजकारणात प्रत्येकच सोयीचा विचार करत असतांना प्रत्येकच सुरक्षीत जागा शोधत असतो जया बच्चन यांचे वरील विधान त्याचे द्योतक असावे. सुरक्षित जागा?? मग जा ना तिकडे यूपीतच राहायला! इथे महाराष्ट्रातच का दोन टाईम तुकडे मोडत बसला आहात? व्यक्तिशः मलाही एक भाषा म्हणून हिंदी भाषेबद्दल अतिशय प्रेम आहे, गुजराथी, मारवाडी बोलीभाषाही मला अत्यंत आवडतात. परंतु याचा अर्थ मी इतर कुठल्या भाषेची - खास करून मराठीची खिल्ली उडवावी, हेटाळणी करावी असा होत नाही! आणि काल जयाने नेमके हेच केले! असो, बिरुटेसाहेब, एकंदरीत आपले या बाबतीत विचार जुळतील असे वाटत नाही. सबब, मी आता येथेच थांबणे पसंत करेन.. तात्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Sun, 09/07/2008 - 11:04 नवीन

आम्ही थांबलो आहोत. :)

काही तपशील मिळेल का? तपशील शोधावा लागेल, मिळाला की नक्कीच टाकेन. बिरुटेसाहेब, एकंदरीत आपले या बाबतीत विचार जुळतील असे वाटत नाही. सबब, मी आता येथेच थांबणे पसंत करेन.. हम्म, आम्हीही ब्रेक घेतो. :) सध्या आम्ही ' बाणा : अभिमान की अहंगंड' हा लेख वाचत आहोत. सर्वांनीच वाचावा असा लेख आहे. -दिलीप बिरुटे (मराठी भाषा अभिमानी )
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर
इ
इनोबा म्हणे Sun, 09/07/2008 - 11:08 नवीन

मराठी

मराठी कलाकारांसाठी मराठी चित्रपटात पती-पत्नी दोघांनीही पाहुणे कलाकार म्हणुन एक पैसाही न घेता काम केल्याची पुसटशी नोंद आठवते. मराठी मेकअपमनला चित्रपट निर्मितीसाठी सर्वोतपरे मदत केलेली आहे. मराठी माणसासाठी नव्हे, त्यांच्या मेकअपमनसाठी अनेकांना लाखोच्या देणग्या दिलेल्या आहेत. जो माणुस नुसता सिद्धीविनायकाच्या दर्शनाला गेला तरी ती मोठी बातमी होते, त्याच्या या लाखोच्या देणग्यांची(महाराष्ट्रासाठी) बातमी कधी ऐकली नाही. टॅक्स चूकवण्याकरिता तिरुपती बालाजीला नऊ कोटींची देणगी दिलेली तेवढी माहीत आहे. कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं : कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये. -इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
घ
घाटावरचे भट Sun, 09/07/2008 - 11:08 नवीन

>>मराठी

>>मराठी कलाकारांसाठी मराठी चित्रपटात पती-पत्नी दोघांनीही पाहुणे कलाकार म्हणुन एक पैसाही न घेता काम केल्याची पुसटशी नोंद आठवते. मराठी मेकअपमनला चित्रपट निर्मितीसाठी सर्वोतपरे मदत केलेली आहे. अनेकांना लाखोच्या देणग्या दिलेल्या आहेत. बच्चन पती-पत्नींनी काम केलेला सदर 'अक्का' चित्रपट मी पाहिलेला आहे. अमिताभ आहे म्हणून उत्सुकतेने मी तो चित्रपट पाहिला, पण फक्त पहिल्या दृश्यात हे दोघे जण मंदिरात पूजा करतात एवढाच त्यांचा त्यातला सहभाग. त्यांनी त्या मेकअपमनला काय मदत केली ते मला ठाऊक नाही. शिवाय सदर गृहस्थाला त्यांनी मदत केली कारण तो त्यांचा मेकअपमन होता. त्याच्या ऐवजी दुसरा एखादा नवखा मराठी चित्रपट निर्माता जर त्यांच्याकडे गेला असता तर त्यांनी त्याला अशीच मदत केली असती काय? >>मग आमच्या महाराष्ट्रात राहुन आमच्याच बळावर आमच्या महाराष्ट्रासाठी काही केलं पाहिजे या भावनिक मताशी अनेकांची सहमती असू शकते. परंतू बच्चन फॅमीलीच्या पडत्या काळात त्याला साथ देणा-यांच्या बाजूने आता ते न राहतील तर नवलच वाटावे. कलाकार म्हणून बच्चन लोक निर्विवादपणे मोठे आहेतच. परंतु बच्चन कुटुंबाचा तथाकथित पडता काळ ही सार्वजनिक समस्या नव्हे, ज्याच्यासाठी सामान्य मराठी माणसाची अस्मिता डावलली जावी. जर आपल्या विधानांना लगेच प्रसिद्धी मिळते हे त्यांना ठाऊक आहे, तर त्यांनी असल्या संवेदनशील मुद्द्यांवर जबाबदारीने तोंडं चालवावीत. >>मुळात राजकारणात प्रत्येकच सोयीचा विचार करत असतांना प्रत्येकच सुरक्षीत जागा शोधत असतो जया बच्चन यांचे वरील विधान त्याचे द्योतक असावे. धर्म, प्रांत,भाषा यावर तर सतत आपण भावनिक राहिलो आहोत त्यामुळे 'गांडुगिरीचे' तर आम्हाला मुळीच वाईट वाटले नाही. माफ करा बिरुटे सर, पण मुद्दा हा आहे, की एवढं सगळं होउन आणि शिव्या खाऊनही जर जया बच्चनच्या आणि एकूणच उत्तर प्रदेश-बिहारमधल्या लोकांच्या अंगातला खोडसाळपणा जात नसेल, तर नवनिर्माण सेनेचा रस्त्यावर उतरून त्यांची थोबाडं फोडण्याचाच मार्ग योग्य होता असे खेदाने म्हणावेसे वाटते. --आपलेच (आणि घाटावरचे) भट... उत्तिष्ठत, जाग्रत, प्राप्य वरान्निबोधत ~ स्वामी विवेकानंद
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
L
llपुण्याचे पेशवेll Sun, 09/07/2008 - 13:36 नवीन

बिरूटेसर सोडून बाकी सर्व प्रतिसादांसाठी +१

मूळातच जिथे ह्या बाईने अशा प्रकारचे वक्तव्य केले तिथे ते अनावश्यक होते. जया बच्चनने औचित्यभंगच नव्हे तर शुध्द खोडसाळपणा केला आहे. इतकी वर्षे महाराष्ट्रात राहून मराठी येत नाही यात तिचा दोष नाही(म्हणजे दोष नाही असे नाही पण खरे) तर दोष आहे बोथट मराठी अस्मितेचा आणि तथाकथित भाषा प्रवाही ठेवण्यासाठी स्वतःच्या भाषेतले चांगले शब्द टाकून इतर भाषेतले शब्द हेतूपुरस्सर मराठीत ढकलणार्‍यां लॉबीचा. हीच लॉबी महाराष्ट्रात मराठीच्या र्‍हासास कारणीभूत आहे. मराठी माणसाने राष्ट्रीय ऐक्याचा विचार करून हिंदी भाषेला राष्ट्रभाषा म्हणून पाठींबा दिला आणि प्राणपणाने विरोध केला नाही याचा फायदा घेऊन हे सर्व भैय्ये आणि त्यांच्या कलेचे तथाकथित चाहते मुजोर झाले आहेत असे वाटते. शेवटी अशी मुजोर माणसे आणि लाचार सामाजिक परिस्थितीच घाशीराम कोतवाल आणि/किंवा हीटलर सारखी टोकाच्या विचारसरणीची माणसे तयार करत असतात. या सर्व गोष्टी असह्य होऊन राज किंवा त्याची विचारप्रणाली मानणार्‍या लोकानी काही अविचारी गोष्टी केल्या तर त्यात पहीला दोष वरच्या परिच्छेदात उल्लेख केलेल्या लोकांचाच आहे. कारण पंचतंत्रातील गोष्टीप्रमाणे जेव्हा माकडीणीच्या नाकातोंडाशी पाणी आले तेव्हा तिने डोक्यावर घेतलेल्या मुलाला पायाखाली घालून स्वतः वरती कसे जाता येईल हेच पाहीले. आहे ही परिस्थिती नाही सुधारली तर आसामाप्रमाणे महाराष्ट्रातही हिंदीभाषिकांची हत्या झाल्याशिवाय राहणार नाही असे वाटते. पुण्याचे पेशवे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: घाटावरचे भट
द
देवदत्त Sun, 09/07/2008 - 10:33 नवीन

का दुर्लक्ष करायचे?

तुमचे म्हणणे एका अंगाने बरोबर असेल. हे त्यांनी चित्रपटात म्हटले असते तर चालवून घेतले असते. पण प्रत्यक्षात कोणी आपल्या भाषेचा आग्रह करत असताना, ज्या गोष्टीचे बहुतेक जण राजकारण करत आहेत, त्या प्रकारात असे वाक्य (ते ही एका खासदाराकडून) कसे ऐकून घ्यायचे? वाहिन्यांचे म्हणाल तर राज ठाकरेने म्हटलेले एक एक वाक्य अतिरंजित करून बहुतेक सर्व वाहिन्या दिवसभर दाखवत असतात. कारण त्यात त्यांना अमराठी लोकांचा अपमान केल्यासारखा वाटतो. मग आता ह्या वाक्याची जास्त दखल का घेत नाहीत ते? तेही एकांगी वागत असतील तर चुकीचेच आहे. मी ही जया बच्चनचा त्यांच्या ह्या वाक्याबद्दल निषेध करतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
द
देवदत्त Sun, 09/07/2008 - 10:53 नवीन

वाहिन्यां

वाहिन्यांबद्दलचे वाक्य लिहिण्याचे कारण की, आता मी पाहिल्याप्रमाणे एकाही वाहिनीवर त्याची झलकही दिसली नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: देवदत्त
इ
इनोबा म्हणे Sun, 09/07/2008 - 09:46 नवीन

थूऽ त्या बच्चन खानदानाच्या राजकारणावर

ही बाई कमालीची राजकारणी आहे. काही दिवसांपूर्वी जेव्हा राज यांनी अमिताभवर टिका केली होती तेव्हा आपण महाराष्ट्राचे आहोत, असे ठासून सांगत होते दोघेही. पण आता निवडणूका जवळ आल्यानंतर आणि मुंबईतील परप्रांतीयांची एक गठ्ठा मते मिळणार म्हटल्यावर यांना युपी प्रेम आठवले आहे. २६ जुलैला मुंबईत पूर आला तेव्हा "यांना मुंबई सांभाळता येत नाही तेव्हा ती केंद्रशासीत करावी" असा सूर लावणारी ही बाई तेव्हाच डोक्यात बसली. मुंबईमुळे महाराष्ट्राची झालेली प्रगती या हरामखोरांना पाहवत नाही. मुंबई तोडण्याच्या दिशेने टाकलेले हे पहीले पाऊल आहे. आणि आपले उद्धव,विलासराव, शरदचंद्रजी साहेब मतांचे दळभद्री राजकारण करत बसले आहेत. अमिताभ ना राष्ट्राचा आहे ना महाराष्ट्राचा तो हरामखोर फक्त युपीचाच आहे. राज यांच्यावर टिका करणार्‍यांनी आतातरी त्यांच्या ठोकशाहीची महाराष्ट्राला किती गरज आहे हे लक्षात घ्यावे. कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं : कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये. -इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Sun, 09/07/2008 - 09:50 नवीन

इनोबाशी

इनोबाशी १००% सहमत आहे.... तात्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इनोबा म्हणे
म
मन Sun, 09/07/2008 - 11:46 नवीन

विसोबा,

इनोबा ह्याच्यांशी १०००% सहमत. आत्यंतिक रागानं डोकं तापलय. अधिक शब्दही सुचत नाहियेत. बच्चन फ्यामिलीतील हरेक सदस्याचा कुठला ना कुठला पिक्च आवडतोच मला. पण म्हणुन त्यांनी माझ्या कुटुंबियांवर,माझ्या माय मराठीवर थुंकलेलं चालणार नाही. आम्ही मनसेचे आणि राज चे फ्यान(सध्यातरी) नाही आहोत. तरीही या आणि अशा मुद्द्यांवर त्याला १०००% पाठिंबा. आपलाच, क्रुद्ध मनोबा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर
ड
डॉ.प्रसाद दाढे Tue, 09/09/2008 - 19:03 नवीन

कानशिल॑ र॑गविली पाहिजेत!

मी आत्ताच जया बच्चनची 'ती' क्लीप पाहीली. खरोखर॑च पित्त खवळत॑! च्यायला, या॑च॑ आजपर्य॑त इतक॑ कवतिक केल॑.. ल॑ब्याच्या शोले, डॉन, दीवारची व जयाच्या कोशिश, अभिमान, परिचयची पारायण॑ केली.. जीव ओवाळून टाकला तरी हर्रामखोर अस॑ म्हणू धजावतात? जया इतकी बिनडोक असेल अस॑ कधीच वाटल॑ नव्हत॑. इतकी खाज? आता जर द॑गली पेटल्या तर सरळ सरळ बच्चन कुटु॑बिया॑नाच जबाबदार धरल॑ पाहीजे. पहिल॑ झूट त्या अबू आझमीला बडवल॑ पाहिजे आणि अभिषेकच्याही त॑गड्या गळ्यात बा॑धल्या पाहिजेत (मी दात तोडायलाही मदत करेन :) कन्नडिगा॑नी रजनीच्या पिक्चरचे जे हाल केले तेच ह्या॑चेही केले पाहिजेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर
श
शितल Mon, 09/08/2008 - 01:23 नवीन

इनोबाच्या प्रतिक्रीया अगदी योग्य

इनोबाची प्रतिक्रीया अत्यंत बोलकी आहे. त्याच्या मताशी पुर्णपणे सहमत. >>>>अमिताभ ना राष्ट्राचा आहे ना महाराष्ट्राचा तो हरामखोर फक्त युपीचाच आहे. ह्या वाक्यावर तर टाळ्या.... :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इनोबा म्हणे
र
रम्या Wed, 09/10/2008 - 16:19 नवीन

ईनोबांशी सहमत!

अगदी सहमत!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इनोबा म्हणे
य
येडा खवीस Sun, 09/07/2008 - 10:06 नवीन

जया बच्चनच्या तुपकट आणि ओशाळवाण्या

चेहर्याचा मला तरी फार पुर्वीपासुन तिटकारा आहे....पण गेले बरेच दिवस ही बाई डोक्यानेही मठ्ठ आहे याचा प्रत्यय येत होता...आज भर कार्यक्रमात आपण किती "रेम्याडोक्या"आहोत हे तिने आणि तिच्याबरोबर हो ला हो करुन त्या प्रियांका चोप्राने सांगितले आहे. मनसे च्या महिला आघाडीने दोघींना चांगलाच "प्रसाद" द्यायला हवा -ये.ख. http://sachinparanjpe.wordpress.com
  • Log in or register to post comments
म
मराठी_माणूस Sun, 09/07/2008 - 11:51 नवीन

वेळच्या वेळि

कदाचित कोणाला ह्या बोलण्याचि गंभिर दखल घ्यावी वाटलि नसेल , पण जर हे वेळच्या वेळि ठेचले नाहि तर त्याचे परिणाम आपण पाह्तोच आहोत . आपल्या बोटचेप्या धोराणा मुळेंच ह्यांचि हि हिम्मत होते. सध्या मुंबईत मोबाइल फोन ची सेवा देणार्‍या एका कं. चि जाहिरात झळकत आहे . काय तर म्हणे 'मि अमुक तमुक ठिकाण चा पण माझ्या कडे कार्ड मुंबचे मग मि पण मुंबईचा ' , अरे तुम्हाला धंदा करायचा आहे ना मग नीट करा ना , नाहि त्या गोष्टित कशाला नाक खुपसत आहात.
  • Log in or register to post comments
र
रेवती Sun, 09/07/2008 - 16:34 नवीन

तात्यांशी सहमत.

अगदी असाच राग येतो जेंव्हा आपल्या शहरात (राज्यात) बाहेरचे लोक येतात, पैसा कमावतात (आपापल्या क्षेत्रात, ह्यात फक्त अभिनयच असे म्हणायचे नाही तर कोणतेही क्षेत्र) मग तिथल्या लोकांना, असलेल्या असुविधांना (त्या कुठे नसतात? प्रमाण कमीजास्त असते व ते तेथील लोकसंख्या, हवामान, खासकरून तिथल्या रूढी, परंपरा व अश्या अनेक गोष्टींवर अवलंबून असतात.) नावं ठेवतात. आज महाराष्ट्राच्या भाषेला नावं ठेवली, आला आपल्याला राग! नंतर मुंबईच्या पूरपरीस्थीतीत असच काहीतरी झालं, आला अपल्याला राग आणि मला तरी राग येणं साहजिक आहे असंच वाटतं. पण मग आपणच कळत नकळत तर कधी खिल्ली उडवण्याच्या उद्देशाने दुसर्‍याच्या शहराला (जसं पुणे, नागपूर, अशी अनेक शहरे) किंवा राज्याला नावं ठेवतो ते कटाक्षाने टाळले पाहीजे. रेवती
  • Log in or register to post comments
अ
अनिल हटेला Sun, 09/07/2008 - 17:37 नवीन

तात्या

तात्या ,इनोबा आणी मंडळी !!! अगदी सहमत !!! निव्वळ निषेध करण्यात च आपण वेळ घालवतोये !!!
  1. मनसे च्या महिला आघाडीने दोघींना चांगलाच "प्रसाद" द्यायला हवा
बैलोबा चायनीजकर !!! माणसात आणी गाढवात फरक काय ? माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
  • Log in or register to post comments
प
प्रकाश घाटपांडे Sun, 09/07/2008 - 18:33 नवीन

तर?

ग्लॅमर असले की लोक डोक्यावर घेउन नाचतात. तेच ग्लॅमर संपले कि पायदळी तुडवतात. मराठी लोकांची मन जिंकायची असली की दोन तीन वाक्ये मराठीत बोलुन मराठी लोकांची सहानुभुती मिळवण्याचा प्रयत्न अनेक प्रथितयश अमराठी लोक करतात. समजा तसे जया बच्चनने केले असते तर? प्रकाश घाटपांडे
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Mon, 09/08/2008 - 14:20 नवीन

अभिनंदनाचा प्रस्ताव आला असता !!!

मराठी लोकांची मन जिंकायची असली की दोन तीन वाक्ये मराठीत बोलुन मराठी लोकांची सहानुभुती मिळवण्याचा प्रयत्न अनेक प्रथितयश अमराठी लोक करतात. समजा तसे जया बच्चनने केले असते तर? चांगला प्रश्न विचारला ! जया बच्चन या मराठीत बोलल्या असत्या तर इथेच अभिनंदनाचा प्रस्ताव आणि त्यांना डोक्यावर मिरवायचं बाकी राहिलं असतं आणि त्यावरुन मराठी भाषा सर्वांची झाली आहे असे तात्पर्य काढायला आम्ही मोकळे झाले असतो. :) जया बच्चन यांनी मराठी भाषेला नाक मुरडून बोलून मराठी भाषेची प्रचंड हानी केली आहे, असेही आम्हाला वाटू लागले आहे. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रकाश घाटपांडे
ट
टारझन Sun, 09/07/2008 - 18:38 नवीन

यांचे विमे काढायला हवेत हो....

इनोबा, तात्यांशी १०००००००००००% सहमत. साले कमवतात इथे. युपीचे गुणगाण करण्यास हरकत नाही. पण जे खिल्लीवजा विधान मराठ्यांसाठी केले त्याचा निषेध . कसे काय आपण लोक हे सहन करतोय.बिरूटे सरांचा एकही मुद्दा पटलेला नाहीये. कोणीतरी एक जोक सांगितलेला, कौन बनेगा करोडपती मधे आभिकेश बचपन ला आजिबात बुच्चन एक प्रश्न विचारतो प्रश्न : आबिकेश .. आपके पिताजी इनमे से कोन है ? १. अमर सिंह २. अजिबात बुच्चन ३. युपी ४. बिहार बावळट आबिशेक यावेळी पण नेहमी प्रमाणे कंफ्युज असतो .. आणि आईला फोन करतो... आई : " देखो आभी ... ऑप्शन २ तो मेरे खयाल से कम चान्स है ... १,३ और ४ मे मै भी कंफ्युज हू ..." (वरच्या प्रकाराच्या सत्यतेची आपल्याला कल्पना नाही... ऍज अ जोक ऐकला आहे :) .. पण जया बुच्चन च्या प्रेमाचा ओढा पहाता काहीही शक्य आहे असे वाटते ) 'राज'कारणी -- ( टारझन ऊर्फ खवीस ) आम्ही खाण्यासाठी जगतो, जगण्यासाठी तर सगळेच खातात
  • Log in or register to post comments
द
देवदत्त Sun, 09/07/2008 - 18:46 नवीन

निषेधाच्य

निषेधाच्या ओघात एखाद्यावर असल्या प्रकारचे वैयक्तिक विनोद करणे चुकीचे वाटते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन
ट
टारझन Sun, 09/07/2008 - 21:53 नवीन

हा काही पहिलाच वैयक्तिक जोक नाही

देवदत्त साहेब .. आपल्या इथे सरदार, लालू-रबडी, वाजपेयी, मनोहर-सोनिया,मायावती,...(अगणित लिस्ट आहे) यांच्यावर भरपूर प्रमाणात वैयक्तिक विनोद होतात. वरील विनोद हा विनोदच आहे. तो विनोदाच्या अंगानेच घ्या .. म्हंजे चुकीचे नाही वाटनार. आपल्याला माननिय,आदरणीय जयाजी आणि युपी-बिहारचा पुळका आहे काय ? -- ( टारझन ऊर्फ खवीस ) आम्ही खाण्यासाठी जगतो, जगण्यासाठी तर सगळेच खातात
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: देवदत्त
द
देवदत्त Sun, 09/07/2008 - 22:10 नवीन

युपी

युपी बिहार/ जया बच्चन ह्याचा पुळका असता तर माझी आधीची प्रतिक्रिया दिलीच नसती. वाचून सोडून देणे एक पर्याय होता, पण नाही झाले. असो. आता सोडून देतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन
व
वेताळ Sun, 09/07/2008 - 18:47 नवीन

आजच ही बातमी टिव्ही वर पाहिली.

धक्कादायक.........द्रोण सिनेमाचे संगीत आणि मराठी बोलणे ह्याचा काहिच संबध नव्ह्ता.द्रोण हा हिंदी सिनेमा होता. कार्यक्रमाला सगळी बॉलीवुड्ची मंडळी होती.मग जया मध्ये तिथे कोणता किडा वळवळला?मराठी बद्द्ल बरळायची काही गरज होती का? फक्त राज ठाकरे म्हणजे महाराष्ट्र नव्हे.राज ठाकरेना विरोध म्हणुन कोण मराठीला विरोध करणार असेल तर त्याचे थोबाड सर्वांनीच रंगवायला हवे.बिरुटे सराच्या मताला आपण सहमत नाही आहोत. सर मला माफ करा. मराठी येत नसल्यावर ते हिंदीच बोलणार. त्यांना मराठीत बोलण्याचा आग्रह कसे धरणार. म्हणुन बोलताना मराठीचा अपमान करण्याची काही गरज होती का? "द्रोण" सिनेमावर महाराष्ट्रामध्ये बहिष्कार घातला पाहिजे. मग ह्याना अक्कल येइल.
  • Log in or register to post comments
र
रेवती Sun, 09/07/2008 - 19:42 नवीन

बहिष्कार

घातला तर ठीकच, पण या सगळ्यात (त्यात पुन्हा गणेशोत्सव) जर छोट्या दंग्याचे रूपांतर मोठ्या दंग्यात झाले तर त्रास सर्वसामन्य लोकांना होणार आहे. सगळे कलाकार आपापल्या बंगल्यात सुरक्षारक्षकांच्या गराड्यात निवांत. ठाकरेंना जर जयाबाईंना धडा शिकवायचा असेल तर त्यांनी तो अश्या पद्ध्तीने शिकवावा की साप मेला व काठी ही तुटली नाही. जया बच्चन यांनी जपून विधाने करावीत. सामन्य जनतेचा विचार त्या करत नाहीत मग जनतेनेही ही बाब मनात ठेवावी त्यांना धडा शिकवायची संधी येइल तेंव्हा सोडू नये. रेवती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वेताळ
स
सर्वसाक्षी Sun, 09/07/2008 - 22:35 नवीन

आपणच जबाबदार!

मराठी माणसाची परधार्जिणी वृती याला जबाबदार आहे. क्या भय्या, कैसा है? असे हौसेने आपणच विचारतो. नपेक्षा इथे पोटपाणी चालवायला आलेले भैय्ये निमूट मराठी शिकले असते. पण आपल्याला हौस दांडगी ना. कै. वसंतराव नाईक हे स्वतःच्या बुद्धिने महाराष्ट्राचे राज्य चालविणारे शेवटचे काँग्रेसी मुख्यमंत्री. त्यानंतर सगळी लाचारांची फैय्यर. अजिजीने दिल्लीश्वरांपुढे वाकुन मुजरे घालण्यात आपल्या राज्यकर्त्यांची हयात गेली. कुणी त्यांचे जोडे उचलले तर कुणी डोक्यावर छत्र धरले. सामान्य मराठी माणूसही असाच. एरवी एव्हढ्या तेव्हढ्या वरून मान- अपमान काढणारा मराठी माणूस परप्रांतिय - विषेशत: उत्तरभारतियांच्या बाबतीत एकदम उदार असतो. जिथे मराठी माणुसच मराठी माणसाच्या हिंदी बोलण्याची खिल्ली उडवतो तिथे इतरांनी का सोडावे? तामिळ माणसाचे हिंदी वा मल्लूचे तेलगु बोलणे किंवा पंजाब्याचे बांगाली हा टिंगलीचा विषय नसतो मात्र मराठी माणसाचे हिंदी या विषयावर मराठी माणसानेच सातत्याने मराठी माणसाच्या हिंदीची टर उडवणार्‍या कथा प्रसिद्ध केल्या आहेत. अगदी काही दिवसांपूर्वीच या स्थळावरच एका मराठी व्यक्तिने असेच लिहिले होते व त्याला अनेक मराठी लोकांनी प्रतिसादही दिले होते. जन्मभर इथे राहुन मोजके मराठी बोलणारे गुज्जु वा धेडगुजरी मराठी बोलणारे भैय्ये यांच्यावर कधी आपण असे लिहित नाही! आपलाच दाम खोटा तर परक्याशी झगडा काय करणार? असे लोक ज्या भूमित आहेत तिथे जया बच्चन असे बोलणारच. आणि त्यांच्या प्रांतातले असेच मुजोरपणे वागणार व उत्तरप्रदेशी संस्कृतिचा प्रसार इथे टिच्चून करणार. मात्र या पार्श्वभूमिवर मला मारवाडी समाजाचे या बाबतित कौतुक करावेसे वाटते. मारवाडी जेथे जातात तिथली भाषा व चलन वलन अंगिकारतात. ते आपली संस्कृति वा सणवार अवश्य सांभाळतात पण तरीही ते जिथे जातात तिथे एकरुप होतात. महाराष्ट्रात कसलीही सक्ती नसताना व लोक स्वखुषीने इतर भाषीयांची भाषा बोलायला तयार असल्यावरसुद्धा महाराष्ट्रात पिढ्यानपिढ्या राहत आलेले मारवाडी लोक उत्तम मराठी बोलतात - अगदी त्यांना मराठी समजले जाण्याईतके.
  • Log in or register to post comments
र
रेवती Mon, 09/08/2008 - 04:28 नवीन

साक्षीजी आपले म्हणणे

बरोबर आहे. माझ्या पहिल्या प्रतिसादात हेच म्हणायचा प्रयत्न केला आहे. आपणच मुंबईकर, पुणेकर की नागपूरकर म्हणून चर्चेचे नवे धागे चालू करतो व पानंच्या पानं खरडतो (म्हणजे सर्वजणांबद्दलच बोलतीये मी). आपलाच दाम खोटा दुसर्‍यांना काय बोलणार? रेवती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सर्वसाक्षी
३
३_१४ विक्षिप्त अदिती Mon, 09/08/2008 - 11:58 नवीन

आपण सर्व एकशेपाच!

बरोबर आहे. माझ्या पहिल्या प्रतिसादात हेच म्हणायचा प्रयत्न केला आहे. आपणच मुंबईकर, पुणेकर की नागपूरकर म्हणून चर्चेचे नवे धागे चालू करतो व पानंच्या पानं खरडतो (म्हणजे सर्वजणांबद्दलच बोलतीये मी). आपलाच दाम खोटा दुसर्‍यांना काय बोलणार? आपसात आपण कितीही भांडलो, वाद घातला, एकमेकांवर हसलो तरीही आज मराठीच्या अभिमानाचा विषय निघाला आणि एक झालो. रेवतीताई, जेव्हा आपल्या मातेवर हल्ला होतो तेव्हा आपण सर्व एकशेपाच होतो, आहोत, आणि भविष्यातही असूच! बघा, इथे टारझन, ऍडीजोशी, पुण्याचे पेशवे, तात्या, मी, आम्ही सगळे पुण्या-मुंबई-विदर्भ-मराठवाडा-महाराष्ट्र असे वाद घालत होतो; आज जया बच्चनने मूर्ख आणि आगाऊपणाचं विधान केल्यावर हेच सगळे मुंबई-पुणे-नागपूरकर एकत्र झालेच ना? आपला दाम खोटा नाही, आपलाही बंदा, खणखणीत रुपया आहे. अदिती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती
ज
जैनाचं कार्ट (verified= न पडताळणी केलेला) Mon, 09/08/2008 - 09:41 नवीन

+१

साक्षीसाहेब, १००% सहमत आपल्या विचारांशी ! राज जैन शुभ कर्मन ते कबहूं न डरो....!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सर्वसाक्षी
ल
लंबूटांग Sun, 09/07/2008 - 22:37 नवीन

खाजवून

खाजवून खरूज काढणे म्हणतात ना ते ह्यालाच. काही गरजच नव्ह्ती असे बोलण्याची जेव्हा सगळे शांतपणे सुरू आहे. नये बच्चे भले इंग्लिशमें बात करते हो, मगर यह फिल्म हिंदी है। हे ठीक आहे. तिच्या स्वतःच्या मुलाला हिंदी आणि हिला इंग्लिश येत नसावे बहुधा ह्याचा सल बाहेर पडला असावा बहुधा. हम तो यूपी है, हिंदीमेंही बोलेंगे। महाराष्ट्र के लोग हमे माफ कर दें। ह्या वाक्याची काहीच गरज नव्हती. ह्यांच्याच भाषणांवर बंदी आणली पाहिजे. आता ह्यावरून जर राडा केला मनसे किंवा कोणीही तर मग जया बच्चन यांनाच जबाबदार धरले पाहिजे. "द्रोण" सिनेमावर महाराष्ट्रामध्ये बहिष्कार घातला पाहिजे. मग ह्याना अक्कल येइल. अगदी सहमत.
  • Log in or register to post comments
स
संदीप चित्रे Mon, 09/08/2008 - 04:39 नवीन

जाहीर निषेध !

जया बच्चनबद्दल एक अभिनेत्री म्हणून पूर्ण आदर ठेवून तिच्या ह्या वक्तव्यासाठी जाहीर निषेध. हिंमत असेल तर दक्षिणेला जाऊन हेच तुणतुणं वाजवून दाखवावं
  • Log in or register to post comments
म
मीनल Mon, 09/08/2008 - 07:06 नवीन

युपी!

मग जाना युपीत.रहा हिंदीत बोलत! महाराष्ट्रात काशाला तडमडताहात? शिवसेना त्यांना त्यांच्या भूमीत पाठवण्याचा स्तुत्य उपक्रम करीत आहे. जय हिंद जय महाराष्ट्र! मीनल.
  • Log in or register to post comments
श
श्रीकृष्ण सामंत Mon, 09/08/2008 - 07:16 नवीन

कधी शिकणार?

कुणीसं म्हटलंय, "सूर्याकडून एक शिकावं संध्याकाळ झाली की आपलं अस्ताला जावं www.shrikrishnasamant.wordpress.com श्रीकृष्ण सामंत "कृष्ण उवाच" shrikrishnas@gmail.com
  • Log in or register to post comments
र
रेवती Mon, 09/08/2008 - 07:36 नवीन

छान सामंतकाका!

एकदम छान बोललात! आता जयाआज्जी व अमित आजोबांचे वय नातवंडांना खेळवण्याचे आहे. बोबडे बोल (हिंदीत) ऐका व स्वस्थ रहा म्हणावं. सून डोक्यावर मीरे वाटेल तेंव्हा कळेलच. रेवती
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Mon, 09/08/2008 - 07:46 नवीन

बोबडे बोल

बोबडे बोल (हिंदीत) ऐका व स्वस्थ रहा म्हणावं. सून डोक्यावर मीरे वाटेल तेंव्हा कळेलच. रेवतीचा प्रतिसाद जहबहर्‍याहा! :) आपला, (मिरपूडप्रेमी) तात्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती
ख
खरा डॉन Mon, 09/08/2008 - 09:08 नवीन

ह्या

ह्या भडव्यांना धरून बडवायला पाहिजे. ह्या भिकारचोटांना मराठी येत नाही तर येतात कशाला इथ हगायला??हरामखोर साले.. खरा डॉन [बाकी सगळे क्लोन....]
  • Log in or register to post comments
म
मनिष Mon, 09/08/2008 - 11:49 नवीन

डॉन भाऊ,

डॉन भाऊ, मेघना, अँडी -- तुम्ही आता बंगलोरात कानडीतच बोलत असाल नाही? ;) आपण परप्रांतियांना मराठीत बोलायला उत्तेजन द्यावे हे पटते (त्यासाठी आपन आधी आवर्जून मराठीत बोलले पहिजे), धम्या म्हणाला होता तसे अधूनमधून खेळकर चिमटा घ्यावा हे पण पटते; पण मराठी बोललेच पाहिजे ही सक्ती, त्यासाठीचा तो हिंसाचार हा मला पटत नाही. बंगलोरातल्या मराठी लोकंनो - उद्या जर हैद्राबादला किंवा चेन्नई ला बदली झाली तर लगेच ८ दिवसात तिथली भाषा बोलता येईल कारे तुम्हाला? आपण मुळात मराठी, कुठेही गेलो तरी मराठीत बोलायला मिळाले, वाचायला मिळाले की आनंद होणारच ना? मग तसेच इतर भाशिकांचेही नाही का? पण तरीही जया भादूरी-बच्चन चा १००% निषेध, कारण हि मंडळी इतकी वर्षे मुंबईत राहिली, तरिही इथ्ली भाषा नाही शिकली ह्याचे दु:ख होते, पण सरसकट पोटापाण्यासाठी नुकतेच इथे आलेल्या परप्रांतीयांवर त्याचा राग निघावा असे वाटत नाही. पण एखाद्या वर्षात त्या प्रांताची भाषा जुजबी तरी शिकावी असे वाटते, आणि ते करण्यासाठी आधी आपण मराठीला आपल्या महाराष्ट्रात इज्जत मिळवून द्यावी, अगदी बरिस्ता पासून ५-७ स्टार मधे आवर्जून मराठी बोलावे. अवांतर - जया भादूरी-बच्चन बंगाली आहे, तर यु.पी कुठुन आले? जर सासर यु.पी म्हणून म्हणत असेल तर मग कर्मभुमी महाराष्ट्राचे काय? त्याचे काही देणे लागतो की नाही? आणि ते सिनेमात काम वगैरे राहू दे, त्याचे अर्थकारण फार वेगळे आहे. तोच काय पण आपल्या (??) मराठि माधुरी दिक्षितने मराठीत काय केले? त्यामानाने नंदिता दास (बंगाली) हिने माती-माय साठी केलेली मेहनत लक्षत घ्या...ती वर्‍हाडी ग्रामीण बोली स्वतः शिकली आणि सिनेमात तिचे बंगालीपण जाणवथी नाही!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खरा डॉन
म
मेघना भुस्कुटे Mon, 09/08/2008 - 12:18 नवीन

मनिष, मी

मनिष, मी कानडीत बोलत नाही. पण - मी इथली लोकप्रिय अभिनेत्री नाही. मी आजी / माजी खासदार नाही. मी काहीही बोलले तरी त्याकडे काळं कुत्रं लक्ष देत नाही. शिवाय - मी नित्योपयोगी कानडी शब्द शिकून ते वाक्याच्या अधेमधे पेरण्याचे कष्ट घेते. कानडी गाणी ऐकते. आणि असं मानते, की एखाद्या ठिकाणी राहिल्यावर तिथली भाषा-संस्कृती-खाणं-पिणं यांच्याशी निदान परिचय करून घ्यावा. मग जमल्यास तुलना करावी आणि नंतर हिंमत झाल्यास शिव्या घालाव्यात. 'मी महाराष्ट्रातून आले आहे, मी कानडी बोलणार नाही,' असं आचरट वक्तव्य मी आजतागायत केलेलं नाही. कानडी लोक राष्ट्रभाषेला डावलण्याचा उर्मटपणा करत असतानाही. असं असताना जया बच्चनचं बेताल बोलणं आणि डॉन्या, मी किंवा ऍडी यांची तुलना कशी काय होऊ शकते?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मनिष
  • 1
  • 2
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा