✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

जया बच्चनचा तीव्र निषेध...!

व
विसोबा खेचर यांनी
Sun, 09/07/2008 - 08:58  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
29274 वाचन

💬 प्रतिसाद (83)

प्रतिक्रिया

छ
छोटा डॉन Mon, 09/08/2008 - 14:33 नवीन

मेघना , १०० % सहमत ...

जया बच्चनचं बेताल बोलणं आणि डॉन्या, मी किंवा ऍडी यांची तुलना कशी काय होऊ शकते?
अगदी शब्दशः सहमत. होऊच शकत नाही तुलना मुळी ... आम्ही काय आमचे "इमान" विकायला काढले नाही अजुन ... च्यायला ४ दमड्यांसाठी स्वतःचे स्वतःच्या मातीशी असलेले इमान विकणार्‍यांची स्वार्थी, अप्पलपोटी जात ही, त्यांची तुलना आमच्याशी कशाला ??? ज्या क्षणी " बच्चन कुटुंबियांनी" करबुडवेगिरीसाठी स्वतःला "अनिवासी भारतीय" घोषीत केले त्याक्षणापासुन आमचा व त्यांचा जो काही होता तो संबंध संपला ... आता त्यांनी कुठल्याही केलेल्या माकडचाळ्यांनी, अभिनयाने, कामाने आमचे मनोरंजन होत नाही, त्यांची लायकी आमच्यादेखी "कस्पटासमान" आहे व आम्ही अशा उडणार्‍या कस्पटांची पत्रास ठेवत नाही. राहता राहिला प्रश्न "निषेधाचा" , कसला निषेध हो ? काय फरक पडणार आहे त्याने ? त्यांचा काय केस वाकडा होणार आहे त्याने ? हे प्रश्न आता "सनदशिर निषेध" वगैरे मार्गांनी सुटण्यापलीकडे गेले आहेत, त्यांना आता "दंडुक्याचीच भाषा" समजेल ... आता राहता राहिला प्रश्न की जनतेच्या उत्स्फुर्त "रिऍक्शन" वर येणार्‍या प्रतिक्रीयांचा .... काही काळजी नसावी, ही सो कॉल्ड "मानवीहक्क,जनकल्याण वा इतर" काही नावाखाली "मुजोर चॅनेल्स" वर पोपटपंची करणारी जमात नुसती बोल्"बच्चन" असते. ह्यांना नुसते शब्दांचे मोठ्ठेच्या मोठ्ठे फुगे सोडणे जमेल, बाकी काही ह्यांच्याक्डुन अपेक्षीत नाही .... आपण पाहिलेच आहे की जेव्हा जेव्हा सामान्य जनतेच्या कल्याणासाठी व रक्षणासाठी रस्त्यावर उतरायची वेळ आली तेव्हा हे पोपट कुठे गेलते ते ? ते बसले होते त्यांच्या जुहुच्या अलिशान बंगल्यात आपल्या बायकापोरांना कवटाळुन आणि बाहेर ज्यांचे पोट हातावर आहे अशी जमात आपले रोजचे भुक भागवणारे काम सोडुन हातात सोटे घेऊन समाजकंटकांचे डोके सडकायला बाहेर पडली होती ते. सबब, याची काळजी नसावी ... तात्पर्य : बच्चन कुटुंबियांचा माज समजावुन सांगण्याच्या पलीकडे गेला आहे. आता काहीतरी भडक कृती आवश्यक ... अवांतर : मी ह्या वादात पडणारच नव्हतो कारण "बच्चन कुटुंबियांची " किंमत माझ्या लेखी "शुन्य" आहे. पण मनिषभाईंनी मुळच्या "खर्‍या डॉनला" उत्तर देताना डायरेक्ट "माझ्या, मेघना, ऍडी, यशो व अभिज्ञ" यांच्या आम्ही सध्या रहात असलेल्या बेंगलोर बद्दल असलेल्या "इमानाच्या" बाबत प्रश्नचिन्ह उभे केले. म्हनुन हा उत्तर देण्याचा खटाटोप. तुम्ही कुठलेही असा, पण सध्या रहात असलेल्या ठिकाणाशी "इमान" जरुर ठेवा, कमीत कमी ते नाही जमले तर "अपमान" तरी करु नये हे आम्हाला समजते कारण ते न समजायला आम्ही आमचे आडनाव "बच्चन" लावत नाही. असो. बरेच विषयांतर झाले ... अतिअवांतर : आता "दक्षिण सस्मितेचा व बेंगलोरचा" विषय आहे म्हनुन जाता जाता एक गोष्ट नमुद करावीशी वाटते. मागे झालेल्या "होगेनक्कल धरणाच्या वादात" मुळचा महाराष्ट्रीयन, उमेदीचा काळ बेंगलुरात घालवलेला पण सध्याचा तमिळ सुपरस्टार "रजनीकांत" ह्याने कर्नाटकच्या राजकारण्यांविषयी "ते असमंस आहेत" असे विधान केले होते. तो "कर्नाटकी भाषा, संस्कॄती वा इतर काही" बाबत अवाक्षर बोलला नाही हे लक्षात घ्यावे. ह्यावर प्रतिक्रीया म्हणुन कन्नडिगांनी चौफेर "रजनीकांत " बंदी आणली [ कुठलाही स्पष्ट राजकीय आदेश नसताना ] व त्याचे १०० % पालनही झाले. शेवटी त्याला शरण येऊन " मी जे काही बोललो ते असमंजसपणे बोललो, मला माफ करा" असा पवित्रा घ्यावा लागला ... आता लोकप्रियतेची तुलना करायची तर "बच्चन" हे "रजनी" च्या पासंगाला पुरणार नाहीत, व रजनीचे "जनकल्याणचे काम" ही नक्की दुर्लक्षीत करण्याजोगे नाही. तरीही "जन प्रतिक्रीयेची महती" लक्षात घेतल्यास बरेच काही शिकता येईल ह्यांच्याक्डुन ... छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मेघना भुस्कुटे
म
मनिष Mon, 09/08/2008 - 15:32 नवीन

माझा प्रतिसाद पुन्हा एकदा वाचा...

मी जया बच्चन यांचा निसंदिग्ध शब्दात निषेधच केला आहे, मी जे भाषेबाबत म्हटले ते डॉन च्या ह्या वाक्याला --
ह्या भडव्यांना धरून बडवायला पाहिजे. ह्या भिकारचोटांना मराठी येत नाही तर येतात कशाला इथ हगायला??हरामखोर साले..
ह्याच न्यायाने उद्या मला कोणी बँगलोर, हैद्राबाद मधे म्हटले तर की आम्ची भाषा येत नाही तर कशाला आलाय इथे? तो विचार करून पोटापाण्यासाठी इथे आलेल्या माणसांना समजून घ्यावे असे मला वाटते...शिवाय आपल्या भाषेचा अभिमान आपणच बाळगावा हे नक्की! माझा प्रतिसाद पुन्हा एकदा वाचून बघा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: छोटा डॉन
अ
अभिज्ञ Mon, 09/08/2008 - 15:41 नवीन

डॉन..

मनीषजी, आपली काहितरी गफलत होतेय. ह्या भडव्यांना धरून बडवायला पाहिजे. ह्या भिकारचोटांना मराठी येत नाही तर येतात कशाला इथ हगायला??हरामखोर साले.. हे विधान खरा डॉन ह्यांचे आहे. छोटा डॉन ह्यांचे नाहि. त्या अनुषंगाने आपण समस्त बेंगलोरकर मिपाकरांना ह्या वादात ओढले आहे असे वाटते. बाकि त्याबद्दल मेघना व छोटा डॉन ह्यांनी स्पष्टीकरण दिलेच आहे. अभिज्ञ.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मनिष
म
मनिष Mon, 09/08/2008 - 16:21 नवीन

गोंधळलो खरच...

हे विधान खरा डॉन ह्यांचे आहे. छोटा डॉन ह्यांचे नाहि. त्या अनुषंगाने आपण समस्त बेंगलोरकर मिपाकरांना ह्या वादात ओढले आहे असे वाटते.
गोंधळलो खरच ह्या खर्‍या/खोट्या छॉटा, मोठा च्या चक्करात. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभिज्ञ
म
मेघना भुस्कुटे Mon, 09/08/2008 - 22:12 नवीन

ठीक आहे

ठीक आहे यार, चलता है. :) अस्मिता - निष्ठा - सहिष्णुता... यांचा घोळ आहे खरा. जागा बदलली की काही गोष्टी डळमळतात, काही स्पष्ट होतात! माझी गळेकाढू समाजवादी सहिष्णुता गळून पडली आणि भाषा या एरवी चैनीच्या वाटणार्‍या गोष्टीची अत्यावश्यकता कळली. माझ्यापुरता बेंगळुरूनं शिकवलेला धडा!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मनिष
ध
धमाल मुलगा Mon, 09/08/2008 - 11:47 नवीन

अरेरे...

हे जे काही चाललंय ते काय चाललंय? खरं म्हणजे त्या कुटुंबानं ह्या मातीशी इमानदारी दाखवायला हवी हे ही खरंच, पण ह्याचा अर्थ असा नाही की आपण हातात कायदा घ्यावा, किंवा राडे करावे... चार समजुतीच्या गोष्टी सांगुन त्यांचं मन आपण वळवलं पाहिजे, त्यांचं मतपरिवर्तन केलं पाहिजे, मला विश्वास आहे ते नक्की सुधारतील. शेवटी स्वतंत्र भारताचे नागरीक म्हणुन त्यांना व्यक्तिस्वातंत्र्य आहेच...त्याचा आपण आदर करायला नको? -(सुधारलेला भावी नडगीफोड कॉर्पोरेटर) ध मा ल. --------------------- च्यायचा घो! माज माज म्हणजे किती करावा माणसानं? इतकी गुर्मी? बरं त्या चोप्रांच्या कार्टीनं असं केलं तर लहान आहे, अवखळ (???) आहे, म्हणुन खपुन जाऊ शकतं, पण अश्या मुरब्बी धुर्त राजकारणी बाईचं हे वागणं म्हणजे, 'बघा, तुम्ही कितीही डोकं फोडुन घ्या, आम्ही सुधारणारच नाही, आणि काय करता त्यावर पाहु' असं आहे. अर्थात त्यात त्यांची काहीच चुक नाहीये. काय बाबा, कुठुन आलास? गंगेच्या तीरावरुन, बरं ये ये. काय मराठी नाही येत? कुच काळजी मत करो. हम तुम्हारे लिये हिंदी बोलेंगे. काय बाबा, कुठुन आलास? कर्नाटक्/आंध्रा/तामिळनाडू? बरं ये ये. काय मराठी नाही येत? पर्वा इल्ले.येन आण्णा? येन माडति? काय जमतंय का आम्हाला तुमच्याशी बोलायला? हां..आता कसं? सगळेजण या आमच्या महाराष्ट्रात. आमच्या इथे कामं करा, आणी हो, इथं राहुन इथल्या लोकांना त्यांच्या मातृभाषेबद्दल खिजवा... अरे आम्ही आहोतच षंढ! आम्ही दाक्षिणात्य कट्टरता जवळ करायची म्हणलं तर आम्ही ठरतो गुन्हेगार! ते मात्र जाज्वल्य अभिमानी! असंच वागा रे परप्रांतियांनो... जवळपास अर्धा मराठी माणुस षंढ झालेला आहेच, तुम्ही काळजी करु नका, तुम्ही फक्त अशा अधुन्मधुन फुणग्या टाका... एखादा राज ठाकरे चवताळुन उठलाच तर हे उरलेले बोटचेपे सहिष्णु हिजडे, आपणहोऊन त्या अभिमानी वृत्तीला जाळुन पुरुन टाकतील.. तुम्ही इथं मराठी मातीच्या छाताडावर खुशाल नंगानाच करा!!!! शेवटी महाराष्ट्र, त्याची राजधानी मुंबई हे सगळं तुमच्याच बापाला इंग्रजांनी आंदण दिलंय ना?
  • Log in or register to post comments
म
मन Mon, 09/08/2008 - 15:59 नवीन

जब्बरदस्त रे......

एखादा राज ठाकरे चवताळुन उठलाच तर हे उरलेले बोटचेपे सहिष्णु हिजडे, आपणहोऊन त्या अभिमानी वृत्तीला जाळुन पुरुन टाकतील.. तुम्ही इथं मराठी मातीच्या छाताडावर खुशाल नंगानाच करा!!!! हो....... तस्सच होतय (दुर्दैवानं) असं वाटतय. ++१ आपलाच, मनोबा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा
ए
एक Mon, 09/08/2008 - 22:05 नवीन

च्यायचा घो!

पासून पुढे १००००% सहमत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा
र
रेवती Tue, 09/09/2008 - 19:27 नवीन

मस्त रे धमाल,

नडगीफोड प्रतिसाद आवडला. रेवती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा
व
विसुनाना Mon, 09/08/2008 - 12:31 नवीन

कृतघ्नतेची कमाल

जया भादुरी-बच्चन या एकेकाळच्या बर्‍या नावाजलेल्या अभिनेत्रीकडून केवळ दर्जाचे राजकारण करण्यासाठी असे हीन आणि कृतघ्न वर्तन अभिप्रेत नव्हते. पुण्याच्या एफ टी आय आय पासून तिची हिंदी कारकिर्द सुरू झाली. नाहीतर तिला प. बंगालबाहेर कोण विचारले असते? मराठी गायिकांनीही तिच्या पोटापाण्याच्या व्यवस्थेला हातभार लावला. लता मंगेशकर किंवा आशा भोसले जर असे म्हणाल्या असत्या की 'मी मराठी आहे, मी मराठीच गाणी गाणार' तर किती हिंदी नट्या यशस्वी झाल्या असत्या हा एक प्रश्नच आहे. तुम्ही हिंदी / बंगाली / तमिळ असा पण महाराष्ट्रात राहून मराठी येत नाही याचे वैषम्य वाटण्याऐवजी तुम्ही खिल्ली उडवत असाल तर ते गैर आहे. तुम्हाला येत नसेल तर तुमच्या पुढच्या पिढीला तरी ते आलेच पाहिजे. आणि 'हिंदी येणार्‍याला मराठी येऊ शकत नाही' ही निव्वळ लोणकढी आहे. एकच वर्ष महाराष्ट्रात राहिलेले अनेक कलेक्टर्स , व्यावसायिक अस्खलित मराठी बोलू शकतात. पर्याय नसेल तेव्हा कोणीही भोजपुरी, मारवाडी, गुजराती , कानडी इतकेच काय पण पंजाबी माणूसही मराठीत बोलू शकतो. मराठी बोलण्याचा प्रयत्न करणार्‍याच्या चुकांना मराठी माणूस हसत नाही. बाहेरच्या प्रांतात गेलेला मराठी माणूस 'मी महाराष्ट्रीय आहे म्हणून मराठीतच बोलणार' असे म्हणत नाही / म्हणू शकत नाही. त्यामुळे मराठी माणूस इतरत्र सहज स्विकार्य आहे. तेव्हा 'पर्याय नाही अशी अवस्था न आणू देणे' हे इतरभाषिकांचे कर्तव्य आहे. अन्यथा ही दुही वाढत जाऊन दंडुकेशाहीने मराठीची सक्ती होईल आणि उदारमतवाद्यांनाही त्याला नाइलाजाने मान्यता द्यावी लागेल.
  • Log in or register to post comments
न
नंदन Mon, 09/08/2008 - 14:11 नवीन

+१

तुम्ही हिंदी / बंगाली / तमिळ असा पण महाराष्ट्रात राहून मराठी येत नाही याचे वैषम्य वाटण्याऐवजी तुम्ही खिल्ली उडवत असाल तर ते गैर आहे. तुम्हाला येत नसेल तर तुमच्या पुढच्या पिढीला तरी ते आलेच पाहिजे. -- सहमत आहे.

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसुनाना
इ
इनोबा म्हणे Mon, 09/08/2008 - 14:54 नवीन

+१

तुम्ही हिंदी / बंगाली / तमिळ असा पण महाराष्ट्रात राहून मराठी येत नाही याचे वैषम्य वाटण्याऐवजी तुम्ही खिल्ली उडवत असाल तर ते गैर आहे. तुम्हाला येत नसेल तर तुमच्या पुढच्या पिढीला तरी ते आलेच पाहिजे. अगदी हेच म्हणतो. "जिसकी काठी, उसकी भैस" असल्या संस्कृतीतून उपजलेल्यांना सरळ भाषा कळत नाही. यांना सरळ करायचे तर 'बांबू'च हवा. कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं : कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये. -इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसुनाना
र
राघव Mon, 09/08/2008 - 16:24 नवीन

+१

अगदी सहमत आहे. तुम्ही हिंदी / बंगाली / तमिळ असा पण महाराष्ट्रात राहून मराठी येत नाही याचे वैषम्य वाटण्याऐवजी तुम्ही खिल्ली उडवत असाल तर ते गैर आहे. तुम्हाला येत नसेल तर तुमच्या पुढच्या पिढीला तरी ते आलेच पाहिजे. १००% योग्य. मुमुक्षू
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसुनाना
प
प्रकाश घाटपांडे Mon, 09/08/2008 - 17:03 नवीन

सहमत

तुम्ही हिंदी / बंगाली / तमिळ असा पण महाराष्ट्रात राहून मराठी येत नाही याचे वैषम्य वाटण्याऐवजी तुम्ही खिल्ली उडवत असाल तर ते गैर आहे. तुम्हाला येत नसेल तर तुमच्या पुढच्या पिढीला तरी ते आलेच पाहिजे.
सहमत आहे. प्रकाश घाटपांडे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसुनाना
स
सर्किट (verified= न पडताळणी केलेला) Mon, 09/08/2008 - 21:56 नवीन

+१०००

लता मंगेशकर किंवा आशा भोसले जर असे म्हणाल्या असत्या की 'मी मराठी आहे, मी मराठीच गाणी गाणार' तर किती हिंदी नट्या यशस्वी झाल्या असत्या हा एक प्रश्नच आहे. सहमत !! -- सर्किट
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसुनाना
आ
आजानुकर्ण Mon, 09/08/2008 - 22:36 नवीन

सहमत आहे

विसुनानांशी सहमत आहे. आपला, (सहमत) आजानुकर्ण
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसुनाना
व
वेताळ Mon, 09/08/2008 - 13:07 नवीन

मराठी बोलता येत नसेल तर ठीक आहे.

म्हणुन काय जाहिर समारंभात असा मराठीचा अपमान करावा काय? शिवाजी महाराजाचे भाउबंद आज ही कर्नाटका मध्ये आहेत. ते काय तिथे मराठी बोलतात काय? ते शुध्द कानडी भाषेत आपले सर्व व्यवहार करतात.माझी आज्जी धारवाडची होती, ती खुपच छान कन्नड बोलत होती.ज्या भागात आपण राहतो. भाकरी कमावतो,तिथली भाषा ,रितीरिवाज आपलेसे केले पाहिजेत. ही नटमोगरी जया हेच सर्व आसाम मध्ये जाउन बोलु शकते काय? ज्याना काही अक्कल नाही,कशाचे सोयरेसुतक नाही अशा दलालाच्या नादी हे बच्चन कुंटुबिय लागले पासुन ह्याची आर्थिक परिस्थिती सुधारली पण बौध्दीक दिवाळखोरी सुरु झाली आहे.नाहीतर बच्चन ने रामुच्या आग के शोले व नि:शब्द मध्ये हिडिस भुमिका केल्या नसत्या. वेताळ
  • Log in or register to post comments
व
विजुभाऊ Mon, 09/08/2008 - 17:10 नवीन

कशासाठी ? कशासाठी ? कशासाठी?

हे असले हिन्दी लादुन घेण्यापेक्षा महाराष्ट्राने हिन्दीच्या जोखडातुन कायमचे मुक्त व्हावे. देशाची तिजोरी भरायची महाराष्ट्राने आणि खर्च करायची हिन्दी बिमारु राज्यानी? वर हिन्दी भाषिकांची मुजोरी सहन करायची. कशासाठी ? कशासाठी ?कशासाठी? भाषेचा विषय आला की राष्ट्रभाषा असे म्हणायचे आणि स्थानीक भाषेला हिणवायचे. हा हिन्दी लोकांचा सरसकट स्वभाव आहे. मी माझ्याशी कोणी हिन्दीत बोलले तर सरळ सांगतो की मला हिन्दी येत नाही मराठीत नाहीतर इंग्रजी जर्मन अथवा मलेशियन भाषेत बोला. पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत
  • Log in or register to post comments
आ
आर्य Mon, 09/08/2008 - 18:14 नवीन

आपला मुद्दा सरळ आहे.

आपला मुद्दा सरळ आहे......... आपण ज्या प्रदेशात रहातो त्या प्रदेशातील भाषा/संस्कृती / विचार यांचा नक्की आदर करावा. (या गोष्टी आत्मसात जरी करता आल्या नाहीत तरी त्यांच अवमान करू नये) प्रत्येक राज्यात/प्रांतात काही प्रगत शहरं आहेत जी Cosmopolitan (बहू -संस्कॄतीक) बनली आहेत, या शहरांचा विकास फक्त त्या गावच्या / प्रदेशातल्याच लोकांनी केलेला नाही. बाहेच्या लोकांनी संधी साधून ती कर्म-भूमी बनवली आणि स्वतःचा आणि पर्यायानी त्या गावचा विकास घडवलाय. आजच पुणं किंवा मुंबई फक्त पुणेकरांनी / मुंबईकारांनी बनवलेली नाही. मोठया शहरांत हा बहू -संस्कॄतीक वादाचा प्रकर घडणारच आणि त्या मुळे ही असली वादळेही निश्चितच आहेत. पण जया बच्चना यांनी केलेल्या या विधानाचा मात्र निषेधच ! बेंगळूरू वासी (मराठी) आर्य
  • Log in or register to post comments
ज
ज्ञ Mon, 09/08/2008 - 18:32 नवीन

निषेध निषेध निषेध

तुम्ही हिंदी / बंगाली / तमिळ असा पण महाराष्ट्रात राहून मराठी येत नाही याचे वैषम्य वाटण्याऐवजी तुम्ही खिल्ली उडवत असाल तर ते गैर आहे. तुम्हाला येत नसेल तर तुमच्या पुढच्या पिढीला तरी ते आलेच पाहिजे. >>> ह्या वाक्याशी १०० सहमत.. भारता बाहेर जाणारे जे कोणी आहेत त्यांच्या पुढच्या पिढीची भाषा ही ते जिथे जातात तिच भाषा बहुतेक वेळा होते.. अर्थात ते तिथेच राहिले तर.. आणि भारतातून अमेरिका, इंग्लंड, जर्मनी, फ्रान्स ह्या देशांना जाताना झक मारत जशी त्या देशांची भाषा शिकली जाते तसेच आपण भारतातल्या एखाद्या राज्यातून दुसर्‍या राज्यात दिर्घ काळासाठी वास्तव्यास जाणार असू तर त्या प्रदेशाची भाषा शिकली पाहिजे.. पण फक्त महराष्ट्रात अशी गरज पडत नाही.. धमाल मुलग्यानी म्हटल्या प्रमाणे कुठल्याही राज्यातून आलेला माणूस महाराष्ट्रातल्या सामान्य माणसांशी संपर्क करु शकतो कारण मराठी माणूस समोरच्या माणसाला कष्ट होऊ नयेत असे बघतो.. आता हा त्याचा बोटचेपे पणा म्हणायचा की दुसर्‍याला मदत करायची प्रवॄत्ती हे ठरवणे अवघड आहे.. तसेच जर एखादा सामान्य माणूस जर एका प्रांतातून दुसर्‍या प्रांतात कामाच्या निमित्ताने कायम स्वरुपी स्थायीक झाला तर त्याची पुढची पिढी ही ता दुसर्‍या प्रांताची भाषाच जास्त व्यवस्थित बोलते.... अर्थात हे माझे मत झाले पण जया बच्चनने केलेल्या वक्तव्याचा निषेध आहेच..
  • Log in or register to post comments
स
सागर Mon, 09/08/2008 - 19:13 नवीन

राज ठाकरे यांची घोषणा (वृत्त वाहिन्यांच्या भाषेत धमकी)

आत्ताच आयबीएन-लोकमत वर बातमी पाहीली राज ठाकरे यांनी बच्चन कुटुंबियांचा एकही चित्रपट माफी मागेपर्यंत रिलिज होऊ न देण्याची घोषणा (वृत्त वाहिन्यांच्या भाषेत धमकी) केली आहे कुत्सितपणे हसून मराठी भाषेची खिल्ली उडविणार्‍या जया बच्चन यांनी यु.पी. मधे जाऊन रहावे एवढे यु.पी. प्रेम ओतू चालले असेल तर.. मुंबईने जे दिले ते यु.पी. देईन का ? आपण तर राज ठाकरेंबरोबर आहोत... असा दणका दिल्याशिवाय त्या यु.पी. वाल्यांना कळतच नाही... ऑनलाईन न्यूज बघायची असेन तर http://www.watchanytv.com/index.php?mid=12 येथे आणि http://khabar.josh18.com/ येथे हिंदी वाहिन्यांची कारागिरी बघायला मिळेल... जय महाराष्ट्र (मराठीप्रेमी) सागर
  • Log in or register to post comments
द
देवदत्त Mon, 09/08/2008 - 19:38 नवीन

नुकतेच एका

नुकतेच एका वाहिनीवर वाचले की राज ठाकरेंच्या ह्या घोषणेनंतर मुंबईचे पोलिस कमिशनर ह्यांनी सांगितले आहे की 'राज ह्यांच्या भाषणाची टेप पाहून त्याची चाचणी करणार व योग्य ती कारर्वाई करणार.' तसेच चित्रपटगृहांनाही पुरेसे संरक्षण देण्याची घोषणा केली आहे. हा कोणता न्याय आहे? राज ठाकरे ह्यांनी योग्य तेच सांगितले आहे. जया बच्चन ह्यांच्या वक्तव्याच्या टेपची पाहणी नाही करणार का ते? का? महाराष्ट्राचेच सरकार हे ऐकून घेत असेल तर काय घ्या? काँग्रेस सरकार सपा ने पडण्यापासून सावरले म्हणून असल्या गोष्टीत महाराष्ट्र सरकारने त्यांना मदत करणे चुकीचे आहे. आणि तिकडे आय बी एन च्या संकेतस्थळावर राज ठाकरेंच्या कृतीला हिटलरशाही म्हटले आहे. त्यांचा राज द्वेष चालूच आहे. ह्या सर्व गोष्टींचाही मी निषेध करतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सागर
स
सागर Tue, 09/09/2008 - 11:15 नवीन

जया बच्चनने माफी मागितली

आजची सकाळ बातमी घेऊन आली की जया बच्चनने माफी मागितली आहे..... आता हे नेभळट सरकार 'राज ठाकरे' यांच्यावरील बंदी उठवायचे कष्ट घेणार का? माफी जया बच्चन यांनी मागितली आहे , तेव्हा त्यांची चूक त्यांना मान्य आहे. तेव्हा राज ठाकरे योग्य तेच बोलत होते हे सिद्ध झाले आहे. तेव्हा आता बघायचे आपले पोलिस कमिशनर महाशय काय करतात ते.... अर्थात असल्या पक्षपाती कारवायांना 'राज ठाकरे' गणतीत धरत नाही ते वेगेळे... मराठी माणूस पेटला की कोणालाही झुकवू शकतो हे मात्र यातून सिद्ध झाले... आता कालपर्यंत राज ठाकरे की हिटलरशाही म्हणून जोरात स्वतःची पोळी भाजणारे न्यूज चॅनेल्स आता दुसर्‍या बातम्यांकडे वळतील.... का तर एका हिंदी भाषिकाला माफी मागायला लागली ना.... असो...राज ठाकरे मात्र जयाने सार्वजनिक माफी मागेपर्यंत विरोध कायम ठेवायचे ठरवले आहे. येथे ही बातमी पाहू शकता http://khabar.josh18.com/news/3117/3 जय महाराष्ट्र सागर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: देवदत्त
ए
एक Mon, 09/08/2008 - 22:14 नवीन

ही बाई पुण्यात शिकली

फिल्म ईंस्टीट्युट मधे, नवरा मरायला टेकला तेव्हा दगडूशेठ गणपतीला नवस करायला आली होती. आणि आता हा माज?
  • Log in or register to post comments
ब
बेसनलाडू Tue, 09/09/2008 - 04:00 नवीन

हे वाचा

हे वाचा. आणि शहाणे व्हा :) (शहाणा)बेसनलाडू
  • Log in or register to post comments
स
सुचेल तसं Tue, 09/09/2008 - 08:32 नवीन

राज

राज ठाकरेंचं एक वाक्य आपल्याला तर फार आवडलं - गुड्डी बुढ्ढी झाली तरी तिला अजुन अक्कल नाही आली. Finally I will be so matured that I will react to nothing. अनुदिनी: http://sucheltas.blogspot.com
  • Log in or register to post comments
म
मनीषा Tue, 09/09/2008 - 11:23 नवीन

अशा व्यकींना

अनुल्लेखाने मारणे चांगले... काही वेळा हा पब्लिसिटी स्टंट पण असू शकतो ... आपल्या सुपुत्राच्या चित्रपटांकडे कोणी लक्ष देत नाही ... म्हणुनही कदाचित जया ने हे वक्तव्य केलेले असेल . आपल्या मुलाचा चित्रपट चालावा म्हणुन अनेक समस्या असलेल्या समाजात आणखी समस्या निर्माण करणे म्हणजे स्वार्थीपणाच ... आणि स्वतःला सामजसेवक म्हणवना-या जया बच्चन सारख्या व्यक्तीने (राजकीय नेते हे जनतेचे सेवक असतात ना?) असे करणे म्हणजे बेजबाबदारपणाच आहे.
  • Log in or register to post comments
म
मिसंदीप Tue, 09/09/2008 - 20:21 नवीन

मराठीपण - एक अभिमान

समस्त मिपा मंडळी, नमस्कार ... आपल्या सर्वांच्या "जयी" बद्दलच्या प्रतिक्रिया पाहुन अतिशय आनंद झाला व पटले कि मराठी अस्मिता अजुनही मराठी माणसात जिवंत आहे.बाकी राज्यात जसे तेथील प्रादेशिक भाषेत बोलण्याला प्राधान्य दिले जाते तसे महाराष्ट्रामधेही आपण मराठी बोलुनच या "टुकार" लोकांची बोलती बंद केली पाहीजे. मुळात त्यांनी हिंदी मध्ये संभाषण चालु केले कि आपण मराठी मधुन उत्तरे दिल्यास आपसुक हि वाह्यात मंडळी मराठी शिकण्यास प्रव्रुत्त होतील. मला माहीत आहे कि हे एवढे सोपे नाही, पण अशक्य ही नाही !!
  • Log in or register to post comments
भ
भास्कर केन्डे Wed, 09/10/2008 - 20:51 नवीन

यांच्या तर **ला

या भय्ये बुच्चनांच्या तर.... आबू आझमी, गोविंदा यांच्या सारखे अमराठी नेते, महेश भट, शबाना सारखे नतद्रष्ट कलाकार आणी हे बच्चन, चोप्रा... सगळ्यांना बिहार/कोसीच्या पुरात नेऊन सोडाय पायजे साल्या पाजी लोकांना. आपला, (भडकलेला) भास्कर आम्ही येथे वसतो.
  • Log in or register to post comments
ग
गणा मास्तर गुरुवार, 09/11/2008 - 07:57 नवीन

निषेधाचा अप्रतिम मार्ग

अभिताभ बच्चनने त्याच्या ब्लॉगवर माफी मागितली आहे, पण शेवटी आम्ही इतके पैसे दान केले हे केले आणि ते केले असे पालुपद आहेच. जया काही चुकिच काही नाही बोलली असेही लिहिले आहेच. आता आपण एक करु त्याच्या ब्लॉगवर जाउनच त्याचा निषेध करु ह दुवा http://blogs.bigadda.com/ab/2008/09/10/day-144/ - गणा मास्तर भोकरवाडी (बुद्रुक)
  • Log in or register to post comments
ग
गिरीराज गुरुवार, 09/11/2008 - 17:39 नवीन

CNN-IBN....

CNN-IBN च्या वेबसाईटवर मी दोन ठिकाणी प्रतिक्रिया नोंदवली. पण अजूनही ती प्रतिक्रिया तिथे दिसत नाहीये. बहुदा मराठी समर्थक प्रतिक्रिया तिथे दिसू देत नाहीत. राजदीप सरदेसाई मराठी माणूस आहे असे मला वाटते.
  • Log in or register to post comments
द
देवदत्त Sat, 09/20/2008 - 21:09 नवीन

ह्म्म... मी

ह्म्म... मी तिथे प्रयत्न नाही केला. पण अमिताभ बच्चनच्या ब्लॉग वर माझी प्रतिक्रिया टाकली.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गिरीराज
प
प्रभाकर पेठकर Sat, 09/20/2008 - 22:39 नवीन

बच्चन कुटुंब...

अमिताभच्या एका मुलाखतीत (ह्या वादंगा नंतरच्या) म्हंटले आहे की, 'जयाला मराठी समजते आणि बोलताही येते.' त्यामुळे जया बच्चान ह्यांना मराठी येत नाही हा मुद्दाच बाद होतो. अमिताभने स्वतः अमेरिकन सिटीझनशिप घेतली आहे असे वाचले होते. म्हणजे ज्याला भारताबद्दलच प्रेम नाही, त्याला महराष्ट्राबद्दल काय असणार? जया बच्चनच्या 'त्या' कार्यक्रमातील नुसते शब्दच नाही तर त्यासोबत जी 'ऍक्शन' (हावभाव) ती जास्त अपमानकारक आहे. हा 'माज' येतो कसा? पैसा, प्रसिद्धी, राजकारण्याचे आशिर्वाद आणि मेंदूवर चढविलेले तोकड्या बुद्धीचे आच्छादन. ठाकरे घराण्याशी निकटचे संबंध असणार्‍या बच्चन कुटुंबाची बहू असणार्‍या जया बच्चन ह्यांना 'कोण राज ठाकरे, आम्ही ओळखत नाही' म्हणण्याचे धैर्य येते कोठून? त्याच बरोबर 'राज ठाकरेंनी कोहिनूर मिलची जमिन मोफत आम्हाला द्यावी आंम्ही इथेही 'मुलींची शाळा काढू' असे निर्लज्यपणे म्हणण्यासही त्या कमी करीत नाहीत. ह्याला थोडीफार शिवसेनाही जबाबदार आहे. केंदातील सत्ता उपभोगण्यासाठी, महाराष्ट्राबाहेर पडून नॅशनल पार्टी होण्याच्या नादात मराठी मुद्दा सोडून हिन्दूत्वाचा व्यापक मुद्दा हाताशी घेणं, सत्तेच्या लोभात बिजेपीशी हात मिळवणी करणं ह्यातही आजच्या समस्येची बीजे आहेत. बिजेपीशी हात मिळवणी केल्यामुळेच उत्तरभारतियांना महाराष्ट्रात ते विरोध करू शकले नाहीत. उलट, उत्तरभारतियांचे लांगुलचालनच करावे लागले. राज ठाकरेंनी केलेल्या रेल्वे भरतीच्या वेळच्या आंदोलनाला शिवसेनेत आतुन विरोधच होता. राज ठाकरेंच्या मनसेकडे मराठी मने का वळू लागली? कारण ती आधीच शिवसेनेच्या बदलत्या भूमिकेमुळे त्या पक्षापासून लांब चालली होती. राज ठाकरेंनी पुन्हा मराठीमाणसाच्या अस्मितेचा मुद्दा उपस्थित करून ती आपल्याकडे वळविण्यात बर्‍यापैकी यश मिळविले. तेंव्हा शिवसेना 'जागी' झाली आणि मराठीचा 'मुद्दा आमचाच' असे ओरडून सांगू लागली. अशा शिवसेनेलाही हे बच्चन कुटुंबिय निकटचे वाटते. बाळासाहेब स्वतः 'बच्चन आणि ठाकरे कुटुंबात कुठलेही गैरसमज नाहीत. आम्ही आजही मनाने एकमेकांच्या जवळच आहोत' असे टीव्ही मुलाखतीत सांगतात. बच्चन कुटुंबाला 'मराठी द्वेष्टेपणा करू नका' असे खडसावून सांगू शकत नाहीत. जया बच्चन ह्यांचा मी तीव्र निषेध करतो. सर्व मराठी भाषकांनी बच्चन कुटुंबाच्या प्रत्येक सिनेमावर बहिष्कार घातला पाहिजे. कलाकाराच्या कलेचा आदर जरूर वाटतो पण तो पर्यंतच, जो पर्यंत तो कलाकार ताळतंत्र सोडून वागत नाही. 'भारतात कलावंतांचा तुटवडा आहे म्हणून बॉलीवूडला पाकिस्तानातून कलाकार आमंत्रित करावे लागतात' असे म्हणणार्‍या फते अली खानला आपल्या घरात पाहुणा म्हणून ठेवून घेणार्‍या आणि ह्या वक्तव्याचा त्याला जाब न विचारणार्‍या जावेद अख्तरचाही म्हणूनच राग येतो. 'कसल्या धर्माच्या गोष्टी करतात, ब्राह्मणांची जानवी बनविणारे कित्येक कारागीर मुसलमान आहेत' असे म्हणणार्‍या शबाना आझमीचाही मला राग येतो. स्मिता पाटीलशी लग्न करूनही, 'मुंबई तुमची पण भांडी घासा आमची' म्हणणार्‍या राज बब्बरचाही राग येतो. ह्या सर्वांचा माज कोणीतरी उतरविलाच पाहिजे. हिंसा, निरपधांना मारहाण मलाही आवडत नाही. पण कधी-कधी तोच मार्ग योग्य आहे असे वाटायला लागण्याच्या मनःस्थिती पर्यंत सुशिक्षित माणूस येण्यासाठीही शासनच जबाबदार आहे. महाराष्ट्र शासनाने ह्या बाबतीत पावले उचलली पाहिजेत. तरच परप्रांतियांना थोडीफार जरब बसेल. पंचविस वर्षे अरबस्थानात राहिल्यावर तिथली भाषा (मोडकी तोडकी का होईना), रिती-रिवाज शिकून घेतले. तिथले सणवार आणि स्थानिकांच्या हक्कांचा आदर नेहमीच केला. हे सुशिक्षित मनाचे लक्षण असले तरी तिथल्या राजकारणाचा, सरकारचा त्यात सिंहाचा वाटा असतो. भूमीपुत्रांच्या हक्कांचे संरक्षण तेथील सरकार आवर्जून करते. परप्रांतियांस तिथे हक्क असे फार थोडेच असतात. मराठी माणसानेच आधी मराठी भाषेचा आदर करण्यास शिकले पाहिजे. मराठीचा वापर सर्रास केला पाहिजे.
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा