Skip to main content

जया बच्चनचा तीव्र निषेध...!

लेखक विसोबा खेचर यांनी रविवार, 07/09/2008 08:58 या दिवशी प्रकाशित केले.
कालच कुठल्याश्या एका (माझ्या माहितीप्रमाणे 'द्रोण') चित्रपटाच्या कुठल्याश्या एका समारंभात प्रसिद्ध अभिनेत्री जया बच्चन हिने 'हंम यूपीके है, हम हिंदीमेही बात करेंगे. महाराष्ट्रके लोग हमे माफ कर दे!" असे मराठीजन, मराठीभाषा आणि महाराष्ट्र यांचा जाणूनबुजून अपमान करणारे, खिल्ली उडवणारे वक्तव्य केले. अनेक वाहिन्यांनी काल रात्री उशिराने हे दृष्य दाखवले. सदर वक्तव्य करतांना जयाच्या चेहेर्‍यावर खिल्ली उडवण्याचे, छद्मीपणाचे भाव स्पष्ट दिसत होते! मूळची बरेलीची असलेली प्रियांका चोप्रादेखील जयाच्या संगतीने हसत, थोबाड विचकत तेथेच उभी होती! मराठीची, महाराष्ट्राची खिल्ली उडवण्याबद्दल मी जया बच्चन यांच्याबद्दल अत्यंत तीव्र आणि कडवा निषेध व्यक्त करत आहे! ज्या महाराष्ट्राने आयुष्यभर दोन वेळची भाकरी दिली त्या महाराष्ट्राबद्दल आणि महाराष्ट्रीयांबद्दल इतकी हेटाळणी, टिंगलटवाळी करणे हे माझ्या मते अत्यंत कृतघ्नपणचे लक्षण आहे. ज्या थाळीत खायचे त्याच थाळीत हागायचे असला प्रकार आहे हा! असो, हे हागणे संबंधितंनाच लखलाभ! षंढ असलेले महाराष्ट्र शासन जयाच्या या मराठीची आणि महाराष्ट्राची जाहीरपणे खिल्ली उडवण्याच्या वर्तनाबद्दल आता तिच्यावर काय कारवाई करणार ते बघायचे! या सर्वामागे समाजवादी पक्ष येथे भाषिक व प्रांतिक राजकारण करू पाहात आहे हे गर्भित आहेच! तात्या.

वाचने 29441
प्रतिक्रिया 83

प्रतिक्रिया

आत्ताच आयबीएन-लोकमत वर बातमी पाहीली राज ठाकरे यांनी बच्चन कुटुंबियांचा एकही चित्रपट माफी मागेपर्यंत रिलिज होऊ न देण्याची घोषणा (वृत्त वाहिन्यांच्या भाषेत धमकी) केली आहे कुत्सितपणे हसून मराठी भाषेची खिल्ली उडविणार्‍या जया बच्चन यांनी यु.पी. मधे जाऊन रहावे एवढे यु.पी. प्रेम ओतू चालले असेल तर.. मुंबईने जे दिले ते यु.पी. देईन का ? आपण तर राज ठाकरेंबरोबर आहोत... असा दणका दिल्याशिवाय त्या यु.पी. वाल्यांना कळतच नाही... ऑनलाईन न्यूज बघायची असेन तर http://www.watchanytv.com/index.php?mid=12 येथे आणि http://khabar.josh18.com/ येथे हिंदी वाहिन्यांची कारागिरी बघायला मिळेल... जय महाराष्ट्र (मराठीप्रेमी) सागर

In reply to by सागर

नुकतेच एका वाहिनीवर वाचले की राज ठाकरेंच्या ह्या घोषणेनंतर मुंबईचे पोलिस कमिशनर ह्यांनी सांगितले आहे की 'राज ह्यांच्या भाषणाची टेप पाहून त्याची चाचणी करणार व योग्य ती कारर्वाई करणार.' तसेच चित्रपटगृहांनाही पुरेसे संरक्षण देण्याची घोषणा केली आहे. हा कोणता न्याय आहे? राज ठाकरे ह्यांनी योग्य तेच सांगितले आहे. जया बच्चन ह्यांच्या वक्तव्याच्या टेपची पाहणी नाही करणार का ते? का? महाराष्ट्राचेच सरकार हे ऐकून घेत असेल तर काय घ्या? काँग्रेस सरकार सपा ने पडण्यापासून सावरले म्हणून असल्या गोष्टीत महाराष्ट्र सरकारने त्यांना मदत करणे चुकीचे आहे. आणि तिकडे आय बी एन च्या संकेतस्थळावर राज ठाकरेंच्या कृतीला हिटलरशाही म्हटले आहे. त्यांचा राज द्वेष चालूच आहे. ह्या सर्व गोष्टींचाही मी निषेध करतो.

In reply to by देवदत्त

आजची सकाळ बातमी घेऊन आली की जया बच्चनने माफी मागितली आहे..... आता हे नेभळट सरकार 'राज ठाकरे' यांच्यावरील बंदी उठवायचे कष्ट घेणार का? माफी जया बच्चन यांनी मागितली आहे , तेव्हा त्यांची चूक त्यांना मान्य आहे. तेव्हा राज ठाकरे योग्य तेच बोलत होते हे सिद्ध झाले आहे. तेव्हा आता बघायचे आपले पोलिस कमिशनर महाशय काय करतात ते.... अर्थात असल्या पक्षपाती कारवायांना 'राज ठाकरे' गणतीत धरत नाही ते वेगेळे... मराठी माणूस पेटला की कोणालाही झुकवू शकतो हे मात्र यातून सिद्ध झाले... आता कालपर्यंत राज ठाकरे की हिटलरशाही म्हणून जोरात स्वतःची पोळी भाजणारे न्यूज चॅनेल्स आता दुसर्‍या बातम्यांकडे वळतील.... का तर एका हिंदी भाषिकाला माफी मागायला लागली ना.... असो...राज ठाकरे मात्र जयाने सार्वजनिक माफी मागेपर्यंत विरोध कायम ठेवायचे ठरवले आहे. येथे ही बातमी पाहू शकता http://khabar.josh18.com/news/3117/3 जय महाराष्ट्र सागर

फिल्म ईंस्टीट्युट मधे, नवरा मरायला टेकला तेव्हा दगडूशेठ गणपतीला नवस करायला आली होती. आणि आता हा माज?

हे वाचा. आणि शहाणे व्हा :) (शहाणा)बेसनलाडू

राज ठाकरेंचं एक वाक्य आपल्याला तर फार आवडलं - गुड्डी बुढ्ढी झाली तरी तिला अजुन अक्कल नाही आली. Finally I will be so matured that I will react to nothing. अनुदिनी: http://sucheltas.blogspot.com

अनुल्लेखाने मारणे चांगले... काही वेळा हा पब्लिसिटी स्टंट पण असू शकतो ... आपल्या सुपुत्राच्या चित्रपटांकडे कोणी लक्ष देत नाही ... म्हणुनही कदाचित जया ने हे वक्तव्य केलेले असेल . आपल्या मुलाचा चित्रपट चालावा म्हणुन अनेक समस्या असलेल्या समाजात आणखी समस्या निर्माण करणे म्हणजे स्वार्थीपणाच ... आणि स्वतःला सामजसेवक म्हणवना-या जया बच्चन सारख्या व्यक्तीने (राजकीय नेते हे जनतेचे सेवक असतात ना?) असे करणे म्हणजे बेजबाबदारपणाच आहे.

समस्त मिपा मंडळी, नमस्कार ... आपल्या सर्वांच्या "जयी" बद्दलच्या प्रतिक्रिया पाहुन अतिशय आनंद झाला व पटले कि मराठी अस्मिता अजुनही मराठी माणसात जिवंत आहे.बाकी राज्यात जसे तेथील प्रादेशिक भाषेत बोलण्याला प्राधान्य दिले जाते तसे महाराष्ट्रामधेही आपण मराठी बोलुनच या "टुकार" लोकांची बोलती बंद केली पाहीजे. मुळात त्यांनी हिंदी मध्ये संभाषण चालु केले कि आपण मराठी मधुन उत्तरे दिल्यास आपसुक हि वाह्यात मंडळी मराठी शिकण्यास प्रव्रुत्त होतील. मला माहीत आहे कि हे एवढे सोपे नाही, पण अशक्य ही नाही !!

या भय्ये बुच्चनांच्या तर.... आबू आझमी, गोविंदा यांच्या सारखे अमराठी नेते, महेश भट, शबाना सारखे नतद्रष्ट कलाकार आणी हे बच्चन, चोप्रा... सगळ्यांना बिहार/कोसीच्या पुरात नेऊन सोडाय पायजे साल्या पाजी लोकांना. आपला, (भडकलेला) भास्कर आम्ही येथे वसतो.

अभिताभ बच्चनने त्याच्या ब्लॉगवर माफी मागितली आहे, पण शेवटी आम्ही इतके पैसे दान केले हे केले आणि ते केले असे पालुपद आहेच. जया काही चुकिच काही नाही बोलली असेही लिहिले आहेच. आता आपण एक करु त्याच्या ब्लॉगवर जाउनच त्याचा निषेध करु ह दुवा http://blogs.bigadda.com/ab/2008/09/10/day-144/ - गणा मास्तर भोकरवाडी (बुद्रुक)

CNN-IBN च्या वेबसाईटवर मी दोन ठिकाणी प्रतिक्रिया नोंदवली. पण अजूनही ती प्रतिक्रिया तिथे दिसत नाहीये. बहुदा मराठी समर्थक प्रतिक्रिया तिथे दिसू देत नाहीत. राजदीप सरदेसाई मराठी माणूस आहे असे मला वाटते.

In reply to by गिरीराज

ह्म्म... मी तिथे प्रयत्न नाही केला. पण अमिताभ बच्चनच्या ब्लॉग वर माझी प्रतिक्रिया टाकली.

अमिताभच्या एका मुलाखतीत (ह्या वादंगा नंतरच्या) म्हंटले आहे की, 'जयाला मराठी समजते आणि बोलताही येते.' त्यामुळे जया बच्चान ह्यांना मराठी येत नाही हा मुद्दाच बाद होतो. अमिताभने स्वतः अमेरिकन सिटीझनशिप घेतली आहे असे वाचले होते. म्हणजे ज्याला भारताबद्दलच प्रेम नाही, त्याला महराष्ट्राबद्दल काय असणार? जया बच्चनच्या 'त्या' कार्यक्रमातील नुसते शब्दच नाही तर त्यासोबत जी 'ऍक्शन' (हावभाव) ती जास्त अपमानकारक आहे. हा 'माज' येतो कसा? पैसा, प्रसिद्धी, राजकारण्याचे आशिर्वाद आणि मेंदूवर चढविलेले तोकड्या बुद्धीचे आच्छादन. ठाकरे घराण्याशी निकटचे संबंध असणार्‍या बच्चन कुटुंबाची बहू असणार्‍या जया बच्चन ह्यांना 'कोण राज ठाकरे, आम्ही ओळखत नाही' म्हणण्याचे धैर्य येते कोठून? त्याच बरोबर 'राज ठाकरेंनी कोहिनूर मिलची जमिन मोफत आम्हाला द्यावी आंम्ही इथेही 'मुलींची शाळा काढू' असे निर्लज्यपणे म्हणण्यासही त्या कमी करीत नाहीत. ह्याला थोडीफार शिवसेनाही जबाबदार आहे. केंदातील सत्ता उपभोगण्यासाठी, महाराष्ट्राबाहेर पडून नॅशनल पार्टी होण्याच्या नादात मराठी मुद्दा सोडून हिन्दूत्वाचा व्यापक मुद्दा हाताशी घेणं, सत्तेच्या लोभात बिजेपीशी हात मिळवणी करणं ह्यातही आजच्या समस्येची बीजे आहेत. बिजेपीशी हात मिळवणी केल्यामुळेच उत्तरभारतियांना महाराष्ट्रात ते विरोध करू शकले नाहीत. उलट, उत्तरभारतियांचे लांगुलचालनच करावे लागले. राज ठाकरेंनी केलेल्या रेल्वे भरतीच्या वेळच्या आंदोलनाला शिवसेनेत आतुन विरोधच होता. राज ठाकरेंच्या मनसेकडे मराठी मने का वळू लागली? कारण ती आधीच शिवसेनेच्या बदलत्या भूमिकेमुळे त्या पक्षापासून लांब चालली होती. राज ठाकरेंनी पुन्हा मराठीमाणसाच्या अस्मितेचा मुद्दा उपस्थित करून ती आपल्याकडे वळविण्यात बर्‍यापैकी यश मिळविले. तेंव्हा शिवसेना 'जागी' झाली आणि मराठीचा 'मुद्दा आमचाच' असे ओरडून सांगू लागली. अशा शिवसेनेलाही हे बच्चन कुटुंबिय निकटचे वाटते. बाळासाहेब स्वतः 'बच्चन आणि ठाकरे कुटुंबात कुठलेही गैरसमज नाहीत. आम्ही आजही मनाने एकमेकांच्या जवळच आहोत' असे टीव्ही मुलाखतीत सांगतात. बच्चन कुटुंबाला 'मराठी द्वेष्टेपणा करू नका' असे खडसावून सांगू शकत नाहीत. जया बच्चन ह्यांचा मी तीव्र निषेध करतो. सर्व मराठी भाषकांनी बच्चन कुटुंबाच्या प्रत्येक सिनेमावर बहिष्कार घातला पाहिजे. कलाकाराच्या कलेचा आदर जरूर वाटतो पण तो पर्यंतच, जो पर्यंत तो कलाकार ताळतंत्र सोडून वागत नाही. 'भारतात कलावंतांचा तुटवडा आहे म्हणून बॉलीवूडला पाकिस्तानातून कलाकार आमंत्रित करावे लागतात' असे म्हणणार्‍या फते अली खानला आपल्या घरात पाहुणा म्हणून ठेवून घेणार्‍या आणि ह्या वक्तव्याचा त्याला जाब न विचारणार्‍या जावेद अख्तरचाही म्हणूनच राग येतो. 'कसल्या धर्माच्या गोष्टी करतात, ब्राह्मणांची जानवी बनविणारे कित्येक कारागीर मुसलमान आहेत' असे म्हणणार्‍या शबाना आझमीचाही मला राग येतो. स्मिता पाटीलशी लग्न करूनही, 'मुंबई तुमची पण भांडी घासा आमची' म्हणणार्‍या राज बब्बरचाही राग येतो. ह्या सर्वांचा माज कोणीतरी उतरविलाच पाहिजे. हिंसा, निरपधांना मारहाण मलाही आवडत नाही. पण कधी-कधी तोच मार्ग योग्य आहे असे वाटायला लागण्याच्या मनःस्थिती पर्यंत सुशिक्षित माणूस येण्यासाठीही शासनच जबाबदार आहे. महाराष्ट्र शासनाने ह्या बाबतीत पावले उचलली पाहिजेत. तरच परप्रांतियांना थोडीफार जरब बसेल. पंचविस वर्षे अरबस्थानात राहिल्यावर तिथली भाषा (मोडकी तोडकी का होईना), रिती-रिवाज शिकून घेतले. तिथले सणवार आणि स्थानिकांच्या हक्कांचा आदर नेहमीच केला. हे सुशिक्षित मनाचे लक्षण असले तरी तिथल्या राजकारणाचा, सरकारचा त्यात सिंहाचा वाटा असतो. भूमीपुत्रांच्या हक्कांचे संरक्षण तेथील सरकार आवर्जून करते. परप्रांतियांस तिथे हक्क असे फार थोडेच असतात. मराठी माणसानेच आधी मराठी भाषेचा आदर करण्यास शिकले पाहिजे. मराठीचा वापर सर्रास केला पाहिजे.