टीपः माझा विडंबनाशिवाय काहीही लिहीण्याचा हा पहिलाच प्रयत्न आहे. सुधारणा अवश्य सुचवा.
२००३ च्या शेवटी शेवटी असाच एक दिवस. स्टीव्ह पर्लमन -एक हुशार, यशस्वी अभियंता आणि भांडवल पुरवठा/ गुंतवणूकदार - याचा दूरध्वनी खणखणला, पलीकडे होता जुना मित्र आणि सहकारी अॅन्डी रुबीन जो तिथून जवळच्याच एका भाड्याच्या जागेत आपली कंपनी चालवत होता.
अॅन्डी: मी कफल्लक झालोय, पैशाची गरज आहे.
स्टीव्ह: कधी पाहिजेत?
अॅन्डी: आत्ताच्या आत्ता!
स्टीव्हने जवळच्याच बँकेत जाऊन १०० डॉलरच्या १०० नोटा काढल्या. ते १०,००० डॉलर एका साध्या पाकिटात घालून तो अॅन्डीच्या ऑफिसात गेला आणि त्याच्या टेबलावर ते पाकीट ठेवले. ही तर फक्त सुरुवात होती. पुढील काही दिवसात स्टीव्हने अॅन्डीला उधार दिलेल्या रकमेची बेरीज झाली होती ह्याच्या दसपट, तब्बल एक लाख डॉलर. (ज्याची परतफेड नंतर अॅन्डीने १८ महिने स्टीव्हच्या ऑफिसचे भाडे भरून केली). हे एक लाख डॉलर अमूल्य होते कारण हे पैसे वापरूनच अॅन्डीला त्याच्या नवीन कंपनीच्या धंद्याची रूपरेषा बनवणे शक्य झाले. जिच्याशिवाय कोणताही उद्योजक अॅन्ड्रोईड कडे ढूंकुनही बघायला तयार नव्हता.
अॅन्डी रुबीन हा काही महिन्यांपूर्वीपर्यंत Danger Inc. चा सीईओ म्हणून काम करत होता. ह्या कंपनीने २००२ मध्ये SideKick हा बहुधा पहिला इंटरनेट फोन बनवला होता. ह्याच फोनने पहिल्यांदा app store ही संकल्पना मांडली. ह्या फोनने तरुणाई आणि सेलेब्रिटीजचे लक्ष वेधून घेतले. पण काही महिन्यांतच कंपनीच्या संस्थापकांपैकी एक असलेला अॅन्डी बोर्डाबरोबर झालेल्या चर्चेनंतर ह्या पदावरून पायउतार झाला. त्याने खुल्या दिलाने कंपनीला नवीन सीईओ शोधण्यास मदतही केली.पण नवीन सीईओ सापडताच त्याने नोकरीचा राजीनामा दिला आणि Cayman Islands ह्या त्याच्या आवडत्या सुट्टी घालवायच्या ठिकाणी निघून गेला.
जात्याच अतिशय हुशार आणि सतत नवीन काहीतरी करण्याचा ध्यास असलेल्या अॅन्डीच्या डोक्यात एक स्मार्ट कॅमेरा बनवायची कल्पना आली. त्याचे सॉफ्टवेअर लिहिण्यास त्याने सुरुवातही केली. पण एक तर ह्या कल्पनेला मूर्त स्वरूप देण्यास त्याला कोणतीही कंपनी मदत करायला तयार नव्हती आणि लवकरच त्याच्या लक्षात आले की तसेही वर्षाला उणेपुरे ३ कोटी कॅमेरा विकले जातात. त्याला करायचे होते काहीतरी भव्य. त्याच्या लक्षात आले की आपण आधी बनवलेल्या फोनप्रमाणेच, सेलफोन्ससाठी open source प्रणाली बनवली तर तिची मागणी कैकपटीने अधिक असेल.
त्याला त्याच्या जुन्या नोकरीत त्याच्या रोबोट्सवरील प्रेमामुळे आणि Andy Rubin शी साधर्म्य असल्याने Android हे टोपणनाव मिळाले होते. ते नाव वापरून त्याने android.com हे संस्थळ आरक्षितही करून ठेवले होते. तेच संस्थळ आणि आपल्या काही जुन्या सहकाऱ्यांना गोळा करून त्याने ऑक्टोबर २००३ मधे android ही नवी कंपनी सुरू केली. ध्येय होते एक असा प्लॅटफोर्म जो कोणत्याही software इंजिनीअर ला मुक्तपणे त्याला हवा तसा वापरता येईल.
कंपनी सुरू तर केली पण अजूनही कोणती कंपनी/ गुंतवणूकदार नुसता open source प्लॅटफोर्म ह्या कल्पनेवर पैसे लावायला तयार नव्हता. स्वत:चे जमवलेले पैसे वापरून अॅन्डीने काही काळ तग धरली पण सरतेशेवटी ऑफिस ची जागा खाली करायची वेळ आल्यावर मात्र त्याने पर्लमन ला फोन केला.
वर लिहिल्याप्रमाणे एक लाख डॉलर संपेपर्यंत २००५ चा मध्य उलटून गेला होता पण android ची रूपरेषा बऱ्यापैकी तयार झाली होती आणि . ती बघितल्यानंतर मात्र गुंतवणूकदाराचे लक्ष वेधले गेले. ह्या पैकीच एक होता Craig McCaw जो आज Clearwire ह्या mobile operator कंपनीचा chairman आहे. त्याने ही कंपनी विकत घेण्याची तयारी दर्शवली. त्याच्याशी बोलणी सुरू असतानाच अॅन्डीने google च्या २ संस्थापकांपैकी एक लॅरी पेज ह्याला ह्या वाटाघाटींबद्दल इ मेल पाठवली. लॅरी पेज आणि सर्गे ब्रिन ह्या google च्या संस्थापकांना अॅन्डी आधी एकदा एका conference मध्ये भेटला होता. ते दोघे बराच काळ SideKick हा फोनही वापरत होते. काही आठवड्यातच १७ ऑगस्ट, २००५ रोजी एका गुप्त रकमेला google ने android विकत घेतली होती.
हा लेख संपवण्याआधी अॅन्डीच्या दूरदृष्टीची दाद द्यावी लागेल कारण गेल्या वर्षीच्या जून महिन्यात त्याने twitter वरून घोषित केले की एका दिवसात १.१७ दशलक्ष android उपकरणे activate केली गेली आणि त्या दिवसापर्यंत ४० कोटींहून अधिक android उपकरणे विकल्या गेली होती.
Android च्या ह्या थक्क करणाऱ्या प्रगतीबद्दल पुढील लेखात.
संदर्भः
http://en.wikipedia.org/wiki/Android_(operating_system)
http://en.wikipedia.org/wiki/Andy_Rubin
http://www.nytimes.com/2007/11/04/technology/04google.html?_r=3&hp=&pag…
http://online.wsj.com/article/SB100014240531119042532045765127202143510…
http://news.cnet.com/8301-1023_3-10245994-93.html?tag=mncol
http://www.bubblews.com/news/340798-know-quotandy-rubinquot-brain-of-th…
http://www.eetimes.com/electronics-news/4402119/Andy-Rubin--After-rough…
वाचने
8695
प्रतिक्रिया
47
मिसळपाव
प्रतिक्रिया
चांगली सुरुवात
संपादन करता येत नाहीये त्यामुळे इथेच देतो
धन्यवाद
In reply to संपादन करता येत नाहीये त्यामुळे इथेच देतो by लंबूटांग
यात अजून थोडी भर घालतो.
In reply to धन्यवाद by श्रीरंग_जोशी
लोगो म्हणणे थोडे चुकीचे वाटते मला व्यक्तिशः
In reply to यात अजून थोडी भर घालतो. by नानबा
माहिती आवडली.
मस्तच...
छान सुरुवात पण लेख खूपच
अँड्रॉईड वापरतो आणि त्यात
लेख आवडला.
+१
In reply to लेख आवडला. by तर्री
झकास .माझ्या अगोदरच्या
छान लेख
+१
In reply to छान लेख by प्रसाद गोडबोले
धन्यवाद
In reply to छान लेख by प्रसाद गोडबोले
आमाला गरिबाला कळेल असं लिवा
In reply to धन्यवाद by लंबूटांग
dev environment set up :
In reply to आमाला गरिबाला कळेल असं लिवा by नानबा
पहाटे चारला लिहिल्यामुळे
छान लेख. पण फार त्रोटक. कृपया
वाचल्यावर एकदम ज्ञानी
In reply to छान लेख. पण फार त्रोटक. कृपया by llपुण्याचे पेशवेll
छानच! पुभाप्र!
मस्त... पुढे वाचण्यास उत्सुक
मस्त
अय मस्त रे...
+१
In reply to अय मस्त रे... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
मस्त !
झक मारली
In reply to मस्त ! by परिकथेतील राजकुमार
मस्त!!!!! वाचनोत्सुक. -प्रीमो
फारसं समजलं नाही तरी आवडलं.
ओपन सोर्स काय भानगड असते?
In reply to फारसं समजलं नाही तरी आवडलं. by शिल्पा ब
समजा एखाद्याने त्यात काही सुधारणा केली तर ते सगळ्यांनाच उपयोगी पडतं का आपलं आपलं वापरायचं असतं?सर्वसाधारणपणे प्रत्येक ओपन सोर्स प्रोजेक्ट चा एक चमू असतो ज्याला मुख्य कोड मधे बदल करायचे अधिकार असतात. बाकी जनतेला तो फक्त जालावरून उतरवून घेता येतो. अर्थात तुम्ही ह्या ग्रूपला तुमचे बदल मेल करू शकता आणि ते त्यांना पटले तर ते मुख्य कोड मधे सामावूनही घेतले जाऊ शकतात. तोपर्यंत तरी आपलं आपणंच वापरायचं. अँड्रॉईड ही एक ऑपरेटिंग सिस्टम आहे. जशी आपल्या संगणकावर विन्डोज असते तशी. विंडोज मात्र क्लोज्ड सोर्स/ प्रोप्रायटरी सॉफ्ट्वेअर ह्या प्रकारात मोडते. जिचा सोर्स कोड उपलब्ध नसतो आणि जिचे reverse engineeringकरून सोर्स कोड मिळवणे आणि त्यात कोणत्याही प्रकारे बदल करणे, अथवा ती वितरीत करणे कायद्याने गुन्हा समजला जातो. iPhoneमधे iOS ही ऑपरेटिंग सिस्टम वापरली जाते व ती सुद्धा क्लोज्ड सोर्स प्रकारात मोडते.मस्त
हा अॅण्डी रुबीन पहिला
होय. तो एक योगयोगच होता.
In reply to हा अॅण्डी रुबीन पहिला by घाशीराम कोतवाल १.२
रोचक माहिती
In reply to होय. तो एक योगयोगच होता. by लंबूटांग
जर मॅजिक गॅप त्यावेळी
In reply to होय. तो एक योगयोगच होता. by लंबूटांग
माझ्या माहितीत तरी नाही.
In reply to जर मॅजिक गॅप त्यावेळी by शिल्पा ब
मस्त माहिती..अजूनपर्यंत
छान सुरुवात
अँड्रॉईडचे लेटेस्ट व्हर्जन
अँड्रॉईडचे लेटेस्ट व्हर्जन
धन्यवाद घा को १.२.
In reply to अँड्रॉईडचे लेटेस्ट व्हर्जन by घाशीराम कोतवाल १.२
छान माहिती.
मस्त...
मस्त आहे
मस्त!!
अँडी रुबिन गूगल सोडून चालला
छान माहिती...
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Pentagon report a manifestation of Pakistan's support to terrorism: India ANNUAL REPORT TO CONGRESS Military and Security Developments Involving the People’s Republic of China 2014 {2014_DoD_China_Report PDF} Robert Vadra's Sky Light Realty inventory zooms tenfold over three years