✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

दुचाकी /चारचाकिंच्या काळजी /देखभाल संदर्भात चर्चेचा धागा

स
स्पा यांनी
Tue, 04/02/2013 - 15:28  ·  लेख
लेख
मिपावर याबाबतीत बराच उत्खनन करूनही हाती काही न लागल्याने ह्या नवीन चर्चेचा प्रपंच हल्ली दुचाकी / चारचाकी जीवनाचा अविभाज्य घटकच झालेला आहे. अशावेळी गाड्यांच्या बाबतीत बर्याचदा टेक्निकल माहिती नसल्याने , जराही काही खुट्ट झालं कि लागलीच म्याक्यानिक कडे धाव घ्यावी लागते. तो सांगेल ती पूर्व दिशा या न्यायाने मुकाट बिल भरावं लागतं. बर्याचदा प्रॉब्लेम साधाच असतो , घरीही आपण तो सोडवू शकतो, पण आपल्याला (म्हणजे निदान मला तरी ) गाडीतलं काहीच कळत नसल्याने, उगाच आपण हात लावला आणि गाडी अजूनच बिघडली तर असे वाटते. बाकी इतरही बरेच प्रश्न असतात उदाहरणार्थ मागे एकदा मुंबई -दापोली आणि इतर परिसर असा साधारण ६५० किमीचा २ दिवसांचा दौरा मी बाईक वरून केला, पण एरवी शहरात ४५ चा मायलेज देणाऱ्या आमच्या यामाने हायवेवर फक्त ३६ चा मायलेज दिला. बाकी गाडी व्यवस्थित होती, पण मग एवढा कमी मायलेज का ब्वा?मग यावर व्यनित चर्चा झडली,कि कारण काय असावे. ५० फक्त , वल्ली, मनराव ( हो तेच ते पुणे-लदाख वाले) यांनी व्यवस्थित चिकित्सा केली. 3/४ शक्यता निघाल्या. पहिली म्हणजे मी टायर मध्ये हवेचे प्रेशर कमी ठेवले होते ( जास्त प्रेशर ने तयार पंक्चर होऊ नये म्हणून) २. कोकणातले रस्ते घाटाचे असल्याने मायलेज पडले असावे ३. त्वरण कमी जास्त केल्याने मायलेज वर परिणाम होतो ४. एअर फिल्टर साफ न केल्याने इंजिन वर ताण आला असावा . एक ना अनेक . माझ्यासाठी हि सर्व माहिती नवीनच होती. पण आता माझा जो पुढचा प्लान असेल त्यावेळी मी या गोष्टींची नक्की काळजी घेईन . (तेंव्हाही ५० राव हि चर्चा ओफ्लैन न ठेवता बोर्डावर लिही असे म्हणाले होते, पण तेंव्हा राहून गेलं.) अजून एक मुद्दा म्हणजे समजा आपल्याला नवीन कार /दुचाकी घ्यायची असेल तर इथे त्यावर चर्चा होऊ शकेल. कुठल्या मिपाकरांकडे सदर मॉडेल असेल तर त्याचे फायदे /तोटे कळू शकतात . आंतरजालावर गाड्यांबद्दल खूप छान छान साईट उपलब्ध असतात, त्या इथे शेर करू शकता. नवीन launch होणार्या गाड्यांबद्दल टेक्निकल चर्चा होऊ शकते . गाड्यांच व्याकरण खूप कठीण असत (माझ्यासाठी तरी ) उदा. ग्राउंड क्लीअरंस. टोर्कू , इंजिन पावर, बी एच पी , कर्ब वेट ई ई. याबद्दलही माहिती मिळून जरा ज्ञान वाढेल . आता चर्चेला सुरुवात करताना माझाच पहिला प्रश्न (जिलबी ) टाकतो परत कोकण दौरा आखलेला आहे . ४/५ दिवसात १२०० किमी . मायलेज वाढावं म्हणून एका मित्राने सांगितलं इंजिन ट्यून कर आता हे इंजिन ट्यून कर म्हणजे नक्की काय करू हे काही त्याला सांगता आलं नाही , आणि मला तर अजिबातच काही माहिती नाही . पण त्याने म्हणे इंजिन च फ्युएल कंझंपशन कमी करता येतं. तर हे काय असत याबाबत माहिती हवी आहे . अजून एक दोन मोठ्या ब्यागा बाईक ला बांधायच्या आहेत, त्या कशा बांधायच्या हेही माहित नाही :D त्याबद्दलही माहिती दिल्यास बरे होईल . बाकी चर्चेत ५० राव, मनराव, वल्ली, मोदक, शैलेंद्र , गवी, छोटा डॉन भर घालतीलच धन्यवाद
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
149495 वाचन

💬 प्रतिसाद (358)

प्रतिक्रिया

स्पा, नुकताच दिवाळीत

नानबा
Tue, 04/02/2013 - 15:54 नवीन
स्पा, नुकताच दिवाळीत महाराष्ट्र गोवा कर्नाटक केरळ असा ३००० किमीचा प्रवास बाईकवरून केला असल्यामुळे मला या धाग्यात टिचभर भर घालता येईल. तुम्हाला लागणार्‍या २ ब्यागा कोणत्या आकाराच्या आहेत? शक्यतो बॅगपॅक असल्या तर उत्तम. त्यात सुद्धा ५० लिटरच्या असल्या तर सगळ्यात छान, कारण या ब्यागा नीट बांधता येतात. तुमची बाईक कोणती आहे?
पण एरवी शहरात ४५ चा मायलेज देणाऱ्या आमच्या यामाने हायवेवर फक्त ३६ चा मायलेज दिला
या वाक्यावरून युनिकॉर्न, हंक, पल्सर १३५, जीएस १५० आर, शाईन, युवा, एसझी आर किंवा तत्सम बाईक असावी. या बाईक्सना मागे ब्याग बांधण्यासाठी बंजी रोप मिळते. ही अशी - Image removed. ही दोरी ताणली जाते आणि प्रचंड मजबूत असते. त्याला दोन्ही टोकांना हुकं असतात, त्यामुळे मागल्या सीटवर किंवा खालच्या बाजूस ब्यागा ठेऊन असल्या २ बंजी दोर्‍यांनी बांधल्या की झालं तुमचं काम. बंजी रोपप्रमाणेच बंजी नेटसुद्धा असते. ही अशी - Image removed. फक्त याने सीटवर ब्याग बांधता येतात. तुम्ही ठाकुर्लीला राहता ना? डोंबिवलीमध्ये मानपाडा रोडवर डॉमिनोज पिझ्झाच्या समोर सुनिल कार डेकोर म्हणून दुकान आहे, त्याच्या कडे या वस्तू मिळतील. किंवा कोणताही ऑटोमोबाईल स्पेअर पार्टवाला सुद्धा देऊ शकेल.
  • Log in or register to post comments

मी काय म्हन्ते,

कवितानागेश
Tue, 04/02/2013 - 15:57 नवीन
यष्टी जातीय की कोकणात. ब्यागा टाकायच्या डोक्यावर...
  • Log in or register to post comments

+१

सूड
Tue, 04/02/2013 - 17:08 नवीन
जेटमाउलीशी सहमत (सध्या ती संमं वर आहे म्हणून)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कवितानागेश

खिक

मैत्र
Tue, 04/02/2013 - 17:08 नवीन
धागा मस्त आहे पण माऊचा प्रतिसाद आवड्ला.. उगाच तकलिफ त्या हायवेवर शेकडो किलोमीटर आपली दुचाकी हाकायची.. आपला लाल डबा आहे की ..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कवितानागेश

म्हण्जी कसं.... ?

चौकटराजा
Tue, 04/02/2013 - 18:45 नवीन
आपल्या डॉस्क्याव ब्यागा घेऊन येस्टीत बासायाच का काय ????
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कवितानागेश

प्रथमा

स्पा
Tue, 04/02/2013 - 15:58 नवीन
प्रथमा भेट बाबा तू मला प्रात्यक्षिक दाखीव :) माझी यामाहा SZ १५० cc आहे
  • Log in or register to post comments

नक्की.

नानबा
Tue, 04/02/2013 - 15:59 नवीन
नक्की. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा

@माझी यामाहा SZ १५० cc आहे >>

अत्रुप्त आत्मा
Tue, 04/02/2013 - 17:12 नवीन
@माझी यामाहा SZ १५० cc आहे >>> इथेच हिशोब झाला की मग... मी १०० सिसीच्या गाडिवरुन पूर्ण कोकण पालथ घातलय.७० ते ९० च्या स्पिडला चालवुन साधारणपणे ६० च्या आसपास अ‍ॅव्हरेज मिळायचं.१५० सिसीच्या गाडिला इंजिन ट्यून करा नायतर करु नका ६० च्या वर चालवली तरी ४५ अ‍ॅव्हरेज मिळेल. आणी अजुन ताणली तर ३५ ते ४० मिळतं. आमचे बरेच (पुण्यात व्यवसायानिमित्त आलेले) कोकणवासी मित्र यापेक्षा वेगळा अनुभव सांगत नाहित.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा

सध्या बुवा पुण्यातल्या

मालोजीराव
Tue, 04/02/2013 - 18:14 नवीन
सध्या बुवा पुण्यातल्या रस्त्यांवरून विमान चालवतात असं ऐकून आहे :P
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

तेपण मांडी घालुन

जेनी...
Tue, 04/02/2013 - 19:16 नवीन
तेपण मांडी घालुन :P :D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मालोजीराव

अब्बा, रुख्साना को भी पता चल

प्यारे१
Tue, 04/02/2013 - 19:22 नवीन
अब्बा, रुख्साना को भी पता चल गया! -प्यारेस्माईलभाई ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेनी...

(No subject)

बॅटमॅन
Tue, 04/02/2013 - 20:14 नवीन
=)) =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१

बंदूक आत्मा..मालोजि/बालिका

अत्रुप्त आत्मा
Wed, 04/03/2013 - 08:49 नवीन
बंदूक आत्मा..मालोजि/बालिका खात्मा Image removed. @मालोजीराव Image removed.- Tue, 02/04/2013 - 18:44 सध्या बुवा पुण्यातल्या रस्त्यांवरून विमान चालवतात असं ऐकून आहे smiley>>> =)) @पूजा पवार. Image removed.- Tue, 02/04/2013 - 19:46 तेपण मांडी घालुन smileysmiley>>>=))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेनी...

चार चाकी

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Tue, 04/02/2013 - 16:05 नवीन
चारचाकी ला झाकण्यासाठी कव्हर कोणतं टाकावं. उघडी ठेवली की इतकी घाण बसते की विचारु नका. मला गाडी पुसायचं जीवावर येतं. फडकं मारल्याने चूलीला पोचारा दिल्यासारखी वाटते. (यु नो पोचारा) ती अजून घाण वाटते. पाणी मारुन शिळ्या दैनिकानं पुसुन काढायची म्हणजे अर्धा तास लागतो. यावर काही उपाय ? गाडीच्या काचा उघड्या ठेवतो तेव्हाही भरपूर धुळ गाडी येऊन बसते. गाडी धुणार्‍याकडे गाडी घेऊन घेल्यावर साडेतीनशे रुपये घेतो. आत हवा मारायची (धुळ झटकून काढायची) वेगळे पन्नास रुपये द्यावे लागतात. हजार पाचशेत असं हवा मारायचं इलेक्ट्रीकवर चालणारं काही यंत्रं बिंत्र मिळतं का ? -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

प्रा. डॉ.

परिकथेतील राजकुमार
Tue, 04/02/2013 - 16:17 नवीन
अहो, एखाद्या गरीबाला द्या की महिना शे-पाचशे-हजार-लाख रुपडे (तुमच्या आर्थीक कुवतीनुसार), आणि ठेवा गाडी धुवायला. तेवढेच एखाद्याला रोजी-रोटीला लावल्याचे पुण्य मिळेल. परवाच कुठल्याश्या सायंदैनिकात 'प्राध्यापक हे विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळणारे पापी आहेत' असे वाचनाता आले, म्हणून आपला हा सल्ला. बाकी, माझ्या ह्यालीक्राप्टरला ल्यांड करताना बर्‍याचदा त्याची डावी बाजू आधी टेकते. हे कशामुळे होत असावे ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

बाकी, माझ्या ह्यालीक्राप्टरला

धन्या
Tue, 04/02/2013 - 16:32 नवीन
बाकी, माझ्या ह्यालीक्राप्टरला ल्यांड करताना बर्‍याचदा त्याची डावी बाजू आधी टेकते. हे कशामुळे होत असावे ?
ह्यालीक्राप्टर ल्यांड करताना डाव्या बाजूला कुणी बसलेलं असतं का? तसं असेल तर त्यांना ह्यालीक्राप्टर ल्यांड करताना मध्यभागी बसवत जा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

कमाल

विनायक प्रभू
Tue, 04/02/2013 - 16:33 नवीन
कमाल आहे बॉ. अहो डागदर लाखाच्या गाडीला एवढे ओवर्।एड असाचेच. परा शि सहमत. @ परा. माझा म्याक्यॅनिक ला पाठ्वु का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

हम्म.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Tue, 04/02/2013 - 16:39 नवीन
>>> एखाद्या गरीबाला द्या की महिना शे-पाचशे-हजार-लाख रुपडे (तुमच्या आर्थीक कुवतीनुसार), आणि ठेवा गाडी धुवायला. एकतर मला तर ते शे-पाचशे-हजार. इ. देणं परवडणारं नाही. तेवढ्या पैशात डिझेल गाडीत भरणं होईल त्यामुळे तो विचार बाद. आणि गरीबाच्या भावनेशी सहमत असलो तरी एखाद्या गरजुला माझा मूड असला तर बिनकामाचे शे पाचशे हजार देईन. पण, ड्रायव्हर ठेवणे किंवा अन्य माणसामुळे आपल्या प्रायव्हसीला मर्यादा येतात. आपण बोलतो याचं गाडी चालवायचं सोडून लक्ष आपल्याकडे असतं. काही काही उत्साही आपल्या गप्पात सामील होतात. आपण काही खात असतो तेव्हा त्याला कंपलसरी विचारावं लागतं किंवा द्यावं लागत. माणूसकी म्हणून ठीक आहे, पण मला नै जमत राव. असो, गाडी चालवणारं रोबट बिबट येईन तेव्हा पाहीन. असो. विषयांतर होतंय. >>>परवाच कुठल्याश्या सायंदैनिकात 'प्राध्यापक हे विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळणारे पापी आहेत' वा वा वा. वाचून खूशाल इथे लिहित आहात. त्यांच्या संपादकाला पत्र लिहायचं होतं ना चड्डीत राहा ना भो म्हणून. >>>>माझ्या ह्यालीक्राप्टरला ल्यांड करताना बर्‍याचदा त्याची डावी बाजू आधी टेकते. हे कशामुळे होत असावे ? धागा दुचाकी चारचाकी या संबंधात आहे. ह्यालीकॉप्टरसाठी नवा धागा काढावा. पण, आता इथे विचारलं आहे तर सांगतो. उजव्या बाजूला एक सिमेंटची गोणी ठेवा त्यामुळे ब्यालेन्स व्यवस्थित राहून ह्यालीकॉप्टर ल्यांड व्यवस्थित होईल. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

प्रॉ.डॉ.

इरसाल
Tue, 04/02/2013 - 16:52 नवीन
एक घरगुति उपाय सांगतो. गाडी नाही झाकलीत तरी चालेल. शक्यतो जुना टर्किशचा टॉवेलचे दोन तुकडे (अर्धे अर्धे करुन) रात्री भिजवुन आणी पिळुन जास्त हवा न लागतील अशा टिकाणी रात्रभर एक्मेकांवर घडीघालुन ठेवायचे. सकाळी त्या तुकड्यांनी गाडी पुसायची. पोचारा होणार नाही किंवा पाण्याच्या थेंबांचे डाग दिसतात (कपडा जास्त ओला राहिल्यास) तेही दिसणार नाहीत कागद वापरायची गरज नाही.आणी पाण्याचिही बचत. रविवारी निवांतपणे शाम्पु किंवा तत्सम झाग बनविणार्‍या पदार्थाने गाडी धुवुन टाकावी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

...

परिकथेतील राजकुमार
Tue, 04/02/2013 - 18:05 नवीन
ह्यालीक्राप्टर ल्यांड करताना डाव्या बाजूला कुणी बसलेलं असतं का? तसं असेल तर त्यांना ह्यालीक्राप्टर ल्यांड करताना मध्यभागी बसवत जा.
मला देखील आधी तिच शंका आली होती. त्यामुळे एकदा फक्त पायलटला बसवून आणि एकदा ऑटो पायलट (रिमोट वापरुन) ह्यालिक्राप्टर ल्यांड करून पाहिले, पण दोन्ही वेळेला तोच फेस केला. त्यामुळे तोंडाला फेस आला.
@ परा. माझा म्याक्यॅनिक ला पाठ्वु का?
नको. तो अंमळ जास्तीच ट्यून करून जातो गाडी. बाकी, टैम मिळाला की जरा फोन करा. तुमच्या त्या इंन्स्टिट्यूटवाल्यानी डोक्याला शॉट लावलाय माझ्या.
एकतर मला तर ते शे-पाचशे-हजार. इ. देणं परवडणारं नाही. तेवढ्या पैशात डिझेल गाडीत भरणं होईल त्यामुळे तो विचार बाद. आणि गरीबाच्या भावनेशी सहमत असलो तरी एखाद्या गरजुला माझा मूड असला तर बिनकामाचे शे पाचशे हजार देईन. पण, ड्रायव्हर ठेवणे किंवा अन्य माणसामुळे आपल्या प्रायव्हसीला मर्यादा येतात. आपण बोलतो याचं गाडी चालवायचं सोडून लक्ष आपल्याकडे असतं. काही काही उत्साही आपल्या गप्पात सामील होतात. आपण काही खात असतो तेव्हा त्याला कंपलसरी विचारावं लागतं किंवा द्यावं लागत. माणूसकी म्हणून ठीक आहे, पण मला नै जमत राव. असो, गाडी चालवणारं रोबट बिबट येईन तेव्हा पाहीन. असो. विषयांतर होतंय.
हे प्राध्यापक लोक ना.. अहो प्रा. डॉ. मी फक्त गाडी धुण्यासाठी माणूस ठेवायला सांगतोय. हे म्हणजे कामाला बाई ठेवली की सगळ्याच कामाची अपेक्षा धरल्यासारखे करताय तुम्ही. येवढ्यात माने साहेबांचे कुठले पुस्तक वैग्रे वाचले होतेत का काय ?
वा वा वा. वाचून खूशाल इथे लिहित आहात. त्यांच्या संपादकाला पत्र लिहायचं होतं ना चड्डीत राहा ना भो म्हणून.
त्यांच्या वर्तमानपत्रालाच लंगोटी-पत्र म्हणले जाते. ;) आता ह्यावर मी त्यांना काय सुचवणार ?
धागा दुचाकी चारचाकी या संबंधात आहे. ह्यालीकॉप्टरसाठी नवा धागा काढावा. पण, आता इथे विचारलं आहे तर सांगतो. उजव्या बाजूला एक सिमेंटची गोणी ठेवा त्यामुळे ब्यालेन्स व्यवस्थित राहून ह्यालीकॉप्टर ल्यांड व्यवस्थित होईल.
सिमेंटचे वस्तुमान, ब्रँड, किंमत ह्याविषयी डिटेल्स मिळतील काय ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

हेलिक्याप्टर

इरसाल
Wed, 04/03/2013 - 09:41 नवीन
बजाजचे तर नाही नां ? याची खात्री करुन घ्या. (बजाज सकुटर आधी थोडी आडवी करुन चालु करायला लागायची म्हणुन आपल हे सजेशन)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

त्यांच हेलीकॉप्टर एका

श्री गावसेना प्रमुख
Wed, 04/03/2013 - 10:35 नवीन
त्यांच हेलीकॉप्टर एका डोळ्याने तिरप असाव म्हणुन असे होत असावे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इरसाल

मालक ,

चौकटराजा
Tue, 04/02/2013 - 18:50 नवीन
मालक तिरका असेल तर त्ये ह्येलीकापटर कसं सरळ टेकायचं जमीनीला ...?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

तुमच्या ह्यालीक्राप्टरला...

डॉ सुहास म्हात्रे
Tue, 04/02/2013 - 21:46 नवीन
बाकी, ह्यालीक्राप्टरला ल्यांड करताना बर्‍याचदा त्याची डावी बाजू आधी टेकते. हे कशामुळे होत असावे ?बाकी, माझ्या ह्यालीक्राप्टरला ल्यांड करताना बर्‍याचदा त्याची डावी बाजू आधी टेकते. हे कशामुळे होत असावे ? हा धागा "दुचाकी /चारचाकिंच्या काळजी /देखभाल संदर्भात चर्चेचा धागा" असा आहे, म्हणून तुमच्या ह्यालीक्राप्टरला दोन चाके आहेत की चार हे सांगीतल्याशिवाय उत्तर दिले जाणार नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

+१

ऋषिकेश
Wed, 04/03/2013 - 09:06 नवीन
+१ आम्ही अशाच एका विद्यार्थ्याला महिना रु.२०० + वर्षभर लागतील तशी अभ्यासाची पुस्तके, गाईड या डीलवर गाड्या (१ चारचाकी आणि दोन्ही दुचाक्या) पुसायचे काम दिले आहे. तोही आनंदाने करतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

हजार पाचशेत असं हवा मारायचं

धन्या
Tue, 04/02/2013 - 16:22 नवीन
हजार पाचशेत असं हवा मारायचं इलेक्ट्रीकवर चालणारं काही यंत्रं बिंत्र मिळतं का ?
हजार बाराशेच्या आसपास गाडीच्याच बारा व्होल्टच्या चार्जिंग पॉईंटवर चालणारे व्हॅक्यूम क्लिनर मिळतात. गुगलवर car vacuum cleaner असं शोधा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

असल्या १०००- १२०० च्या

५० फक्त
Tue, 04/02/2013 - 17:21 नवीन
असल्या १०००- १२०० च्या यंत्रांच्या नादाला लागु नका, त्यापेक्षा जोपासु चे कार क्लिंनिग किट घ्या, त्यात एक काळ्या रंगाची तंतुमय झटकणी मिळते, आख्खी व्हिस्टा आतुन बाहेरुन पुसायला ७-१० मिनिट पुरेसे होतात, त्याच किट मध्ये एक निळ्या रंगाचे ग्लास नॅपकिन असतो, ओल्या न करता काचा आणि हेडलाईटस लख्ख होतात एकदम, फक्त हा निळा कपडा सहा महिन्यात एकदाच धुवावा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धन्या

जोपासु चे कार क्लिंनिग किट

स्पा
Tue, 04/02/2013 - 17:24 नवीन
जोपासु चे कार क्लिंनिग किट
ते कितीला मिळत ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ५० फक्त

ते तुला काय करायचे आहे रे ??

विश्वनाथ मेहेंदळे
Wed, 04/03/2013 - 01:45 नवीन
ते तुला काय करायचे आहे रे ?? तुझ्याकडे कार आहे का मुद्द्लातली ?? :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा

विमे

स्पा
Wed, 04/03/2013 - 09:20 नवीन
ते तुला काय करायचे आहे रे ?? तुझ्याकडे कार आहे का मुद्द्लातली ??
विमे, हल्लीच ना हो तुम्ही इतरांची खिल्ली उडवू नये वगैरे लेख लिहिलात? ते तुम्हांला स्वतःला लागू होत नाही का? --स्पाशो
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विश्वनाथ मेहेंदळे

विमेबाबांनी मी तसे म्हटलेच

यशोधरा
गुरुवार, 04/04/2013 - 08:56 नवीन
विमेबाबांनी मी तसे म्हटलेच नाही असे म्हटले आहे. त्यांचे ते दुकान अहे म्हणे, पुराव्यानिशी साबित करु शकते :D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा

विमे आजोबा आहेत.

कवितानागेश
गुरुवार, 04/04/2013 - 14:37 नवीन
विमे आजोबा आहेत. खुलासा संपला. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा

विमे आजोबा आहेत.

स्पा
गुरुवार, 04/04/2013 - 15:31 नवीन
विमे आजोबा आहेत.
पण त्यांना वाद घालायची हौस ती किती इच्छा काही केल्या सुटत नाहीत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कवितानागेश

आजोबांनी वाद घालु नये, असं

५० फक्त
गुरुवार, 04/04/2013 - 16:17 नवीन
आजोबांनी वाद घालु नये, असं कुठल्या बुद्धसंहितेत लिहिलेलं आहे, जरा फेसबुकावर सर्च करुन सांगाल का श्री. मिस्पाजी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा

ब्वोर्र

स्पा
गुरुवार, 04/04/2013 - 16:20 नवीन
ब्वोर्र
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ५० फक्त

बुद्धसंहितेत की बुढ्ढासंहितेत

बॅटमॅन
गुरुवार, 04/04/2013 - 18:16 नवीन
बुद्धसंहितेत की बुढ्ढासंहितेत ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ५० फक्त

आता ते मला लेकी बोले असं

यशोधरा
गुरुवार, 04/04/2013 - 16:21 नवीन
आता ते मला लेकी बोले असं म्हणाले, म्हणजे बाबा नाय का झाले? च्यॅ! तू पण ना माऊ! :D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कवितानागेश

खवचट बोलूनिया 'बाबा' गेला

स्पा
गुरुवार, 04/04/2013 - 16:24 नवीन
खवचट बोलूनिया 'बाबा' गेला :D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा

हे मीटरमध्ये बसत नाही.

कवितानागेश
Fri, 04/05/2013 - 15:15 नवीन
हे मीटरमध्ये बसत नाही. 'खवचट लेकीसाठी बोलुनिया बाबा गेला' हे बसतय. :P
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा

कित्ती चान - लीस्पाऊजेट

स्पा
Fri, 04/05/2013 - 15:18 नवीन
कित्ती चान - लीस्पाऊजेट
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कवितानागेश

हे मीटरमध्ये बसत नाही.

सूड
Fri, 04/05/2013 - 15:23 नवीन
हे बसतंय 'कुच्कटसे कन्येलागीं बोलुनिया बाबा गेला' ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कवितानागेश

कुचकटसे कन्येलागी जे लागण्या

यशोधरा
Fri, 04/05/2013 - 15:49 नवीन
कुचकटसे कन्येलागी जे लागण्या सुनेलागी, बोलूनिया बाबा गेला! हे अधिक पर्फेक्ट आहे! :D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

वैयक्तिक प्रश्न....वैयक्तिक प्रश्न....

अमोल खरे
Fri, 04/05/2013 - 09:57 नवीन
वैयक्तिक प्रश्न विचारुन माननीय विमेंनी दुसरे माननीय श्री स्पा ह्यांच्या भावना दुखावलेल्या आहेत ह्याची सर्वांनी नोंद घ्यावी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विश्वनाथ मेहेंदळे

तो वैयक्तिक प्रश्न नव्हता.

विश्वनाथ मेहेंदळे
Sat, 04/06/2013 - 04:02 नवीन
तो वैयक्तिक प्रश्न नव्हता. "तुझा पगार किती?? तू बोलतोस किती???" हा वैयक्तिक प्रश्न असता ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमोल खरे

लै बुग्गं आहे एक

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Tue, 04/02/2013 - 19:26 नवीन
>>> हजार बाराशेच्या आसपास गाडीच्याच बारा व्होल्टच्या चार्जिंग पॉईंटवर चालणारे व्हॅक्यूम क्लिनर मिळतात. माझ्याकडे आहे पण ते काही कामाचं नाही. किरकोळ कारको़ळ काम करतं. पण,फर्र फर्र करत फूल हवा मारणारं यंत्र पाहिजे. एक अ‍ॅटोमोबाईल्सवाला तसं आहे म्हणत होता. काय आहे ते बघतो आणि इथे त्याबद्दल लिहितो. -दिलीप बिरुट
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धन्या

आहे ना Bosch कंपनीचे आहे.

llपुण्याचे पेशवेll
Fri, 04/05/2013 - 09:48 नवीन
आहे ना Bosch कंपनीचे आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

किती ते अवांतर!

कवितानागेश
Tue, 04/02/2013 - 17:50 नवीन
चारचाकी ला झाकण्यासाठी कव्हर कोणतं टाकावं. >> हा पूर्णपणे नवीन काथ्याकूटाचा विषय आहे! :P
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

माझा पूतन्या त्याच्या

जेनी...
Tue, 04/02/2013 - 19:48 नवीन
माझा पूतन्या त्याच्या चारचाक्या पॉलिथिनच्या पिशवित भरुन / टाकुन ठेवतो ... सुरक्षित राहतात म्हणे गाडीला वरुन बिरुन कव्हर घालाय्/टाकायची झंजट नसते .... घेतली कि कोंबली पिशवीत ... :D :P
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कवितानागेश

आईडिया एक नंबर, प्रा.डॉ.दि.

खबो जाप
Wed, 04/03/2013 - 10:22 नवीन
आईडिया एक नंबर, प्रा.डॉ.दि. बि. तुम्ही एक मोठी पॉलिथिनची पिशवी घ्याच आणि गाडी त्यात घालायला / टाकायला एक क्रेन पण घेवून टाका :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेनी...

माझा पूतन्या

आदूबाळ
Sat, 04/06/2013 - 14:39 नवीन
माझा पूतन्या
म्हणजे पूतनामावशीचा मुलगा का? ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेनी...
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा