✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

दुचाकी /चारचाकिंच्या काळजी /देखभाल संदर्भात चर्चेचा धागा

स
स्पा यांनी
Tue, 04/02/2013 - 15:28  ·  लेख
लेख
मिपावर याबाबतीत बराच उत्खनन करूनही हाती काही न लागल्याने ह्या नवीन चर्चेचा प्रपंच हल्ली दुचाकी / चारचाकी जीवनाचा अविभाज्य घटकच झालेला आहे. अशावेळी गाड्यांच्या बाबतीत बर्याचदा टेक्निकल माहिती नसल्याने , जराही काही खुट्ट झालं कि लागलीच म्याक्यानिक कडे धाव घ्यावी लागते. तो सांगेल ती पूर्व दिशा या न्यायाने मुकाट बिल भरावं लागतं. बर्याचदा प्रॉब्लेम साधाच असतो , घरीही आपण तो सोडवू शकतो, पण आपल्याला (म्हणजे निदान मला तरी ) गाडीतलं काहीच कळत नसल्याने, उगाच आपण हात लावला आणि गाडी अजूनच बिघडली तर असे वाटते. बाकी इतरही बरेच प्रश्न असतात उदाहरणार्थ मागे एकदा मुंबई -दापोली आणि इतर परिसर असा साधारण ६५० किमीचा २ दिवसांचा दौरा मी बाईक वरून केला, पण एरवी शहरात ४५ चा मायलेज देणाऱ्या आमच्या यामाने हायवेवर फक्त ३६ चा मायलेज दिला. बाकी गाडी व्यवस्थित होती, पण मग एवढा कमी मायलेज का ब्वा?मग यावर व्यनित चर्चा झडली,कि कारण काय असावे. ५० फक्त , वल्ली, मनराव ( हो तेच ते पुणे-लदाख वाले) यांनी व्यवस्थित चिकित्सा केली. 3/४ शक्यता निघाल्या. पहिली म्हणजे मी टायर मध्ये हवेचे प्रेशर कमी ठेवले होते ( जास्त प्रेशर ने तयार पंक्चर होऊ नये म्हणून) २. कोकणातले रस्ते घाटाचे असल्याने मायलेज पडले असावे ३. त्वरण कमी जास्त केल्याने मायलेज वर परिणाम होतो ४. एअर फिल्टर साफ न केल्याने इंजिन वर ताण आला असावा . एक ना अनेक . माझ्यासाठी हि सर्व माहिती नवीनच होती. पण आता माझा जो पुढचा प्लान असेल त्यावेळी मी या गोष्टींची नक्की काळजी घेईन . (तेंव्हाही ५० राव हि चर्चा ओफ्लैन न ठेवता बोर्डावर लिही असे म्हणाले होते, पण तेंव्हा राहून गेलं.) अजून एक मुद्दा म्हणजे समजा आपल्याला नवीन कार /दुचाकी घ्यायची असेल तर इथे त्यावर चर्चा होऊ शकेल. कुठल्या मिपाकरांकडे सदर मॉडेल असेल तर त्याचे फायदे /तोटे कळू शकतात . आंतरजालावर गाड्यांबद्दल खूप छान छान साईट उपलब्ध असतात, त्या इथे शेर करू शकता. नवीन launch होणार्या गाड्यांबद्दल टेक्निकल चर्चा होऊ शकते . गाड्यांच व्याकरण खूप कठीण असत (माझ्यासाठी तरी ) उदा. ग्राउंड क्लीअरंस. टोर्कू , इंजिन पावर, बी एच पी , कर्ब वेट ई ई. याबद्दलही माहिती मिळून जरा ज्ञान वाढेल . आता चर्चेला सुरुवात करताना माझाच पहिला प्रश्न (जिलबी ) टाकतो परत कोकण दौरा आखलेला आहे . ४/५ दिवसात १२०० किमी . मायलेज वाढावं म्हणून एका मित्राने सांगितलं इंजिन ट्यून कर आता हे इंजिन ट्यून कर म्हणजे नक्की काय करू हे काही त्याला सांगता आलं नाही , आणि मला तर अजिबातच काही माहिती नाही . पण त्याने म्हणे इंजिन च फ्युएल कंझंपशन कमी करता येतं. तर हे काय असत याबाबत माहिती हवी आहे . अजून एक दोन मोठ्या ब्यागा बाईक ला बांधायच्या आहेत, त्या कशा बांधायच्या हेही माहित नाही :D त्याबद्दलही माहिती दिल्यास बरे होईल . बाकी चर्चेत ५० राव, मनराव, वल्ली, मोदक, शैलेंद्र , गवी, छोटा डॉन भर घालतीलच धन्यवाद
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
149495 वाचन

💬 प्रतिसाद (358)

प्रतिक्रिया

हम्म्म्म्म... मग बुलेट

नानबा
Sat, 04/06/2013 - 08:12 नवीन
हम्म्म्म्म... मग बुलेट झेपायला काही हरकत नाही.. :)) :)) :)) :))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

////////////बुलेटचा असा अहे

कैलासवासी सोन्याबापु
Sat, 09/27/2014 - 12:05 नवीन
////////////बुलेटचा असा अहे ना , झेपेल त्यानेच घ्यावी !! बाकीच्यांनी फक्त नाव///////////////// ब्येस्ट!!! मी पण एन्फिल्डर!! मला बी पक्ष प्रवेश द्या!! (क्लासिक ३५० आम्ची)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी

बुलेट दलींदर आहे असं म्हणा

अर्धवट
Sat, 04/06/2013 - 11:27 नवीन
बुलेट दलींदर आहे असं म्हणा हवं तर.. कित्येक जण म्हणतात.. चालवणार्‍यांना शष्प फरक पडत नाही. पण बुलेट आणि पल्सरची तुलना.. पुप्या भाड्या.. आपल्या मैत्रीत खो घालशील हां असलं काही बोलून... अवांतर - मे महिन्यात भूतानला येणार आहे का कुणी.. ८ + १ दिवसाचा ट्रॅक आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: llपुण्याचे पेशवेll

बुलेटचा आवाज खुप येतो.

अमोल खरे
Sat, 04/06/2013 - 18:44 नवीन
बुलेटचा आवाज खुप येतो. गेल्याच आठवड्यात एक बुलेटवाला माझ्या बाईकच्या मागे होता. इतका त्रास व्हायला लागला आवाजाचा की मी सरळ बाजुला होऊन त्याला पुढे जाऊन दिलं, वर मी स्वतः एकदम हळु बाईक चालवत होतो, तो माणुस दिसेनासा झाला तरी कितीतरी वेळ मला तो "फाटफाटफाटफाट" असा आवाज येत होता. नंतर ऑफिसात जाऊन एकाला (ज्याची बुलेट आहे) त्याला म्हणालो की काय आवाज येतो यार, तर तो म्हणतो की "तीच तर मजा आहे". मी चुपचाप डेस्कवर परत आलो. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अर्धवट

+१

दादा कोंडके
Sat, 04/06/2013 - 19:12 नवीन
त्यातही मी एकवेळ आवाज सहन करेन पण सिग्नलवर बुलेटच्या मागं फर्लांगभर जाणवणारे सायलेन्सर मधून येणार्‍या एक्झोस्ट ग्यासचे वायब्रेशन असह्य होतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमोल खरे

यु ट्युब ला एक विडो पाहिलेला,

कैलासवासी सोन्याबापु
Sat, 09/27/2014 - 12:09 नवीन
यु ट्युब ला एक विडो पाहिलेला, बुलेट वाला पठ्ठा बेसमेंट पार्किंग मधे बुलेट स्टार्ट करुन इंजिन रेस करतो फक्त अन आजुबाजुच्या आर १५ , मर्सिडीज अन तत्सम ललना घाबरुन आपापली सेंट्रल लॉकिंग रडगाणी गायला लागतात प्यां प्या करुन!!!! *lol*
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमोल खरे

"मे महिन्यात भूतानला येणार

टवाळ कार्टा
Mon, 12/16/2013 - 17:29 नवीन
"मे महिन्यात भूतानला येणार आहे का कुणी.. ८ + १ दिवसाचा ट्रॅक आहे"
तपशिल मिळेल का??
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अर्धवट

दर चारशे किमी ला ईंजिन ऑईल

मनराव
Tue, 04/02/2013 - 18:43 नवीन
दर चारशे किमी ला ईंजिन ऑईल बदलायचे परवडत नाय राव..... आम्हि तर ३००० किमी झाल्याशिवाय तेचा कडे डुंकुन पन बघत नाय... :) हे झालं रोजच्या वापरा बाबत..... लांब कुठे हिंडायला जायचं असल तर मग २००० किमी....नंतर आईलचेंज... (शाईन नंतर बुलेट चालवणारा) - मनराव.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुहास..

प्रतिसाद

कॅप्टन जॅक स्पॅरो
Tue, 04/02/2013 - 23:08 नवीन
दर चारशे किमी ला ईंजिन ऑईल बदलायचे, अर्थात बाईक टु बाईक वेगळे, मी तीन वर्षे जुनी युनिकॉर्न घेवुन गेलो की चारशे ला बदलतो, माझी जुनी १९९८ ची स्प्लेंडर नेली की मग ३०० लाच बदलतो.
मी स्वतः युनिकॉर्न वापरतोय ३ वर्ष. ४०० कि.मी. ला ऑईल बदलायची काहीच गरज नाही. साधं ऑईल (SAE 10W30 MA हे स्पेसिफिकेशन असलेलं)साधारण ३००० ते ३२०० कि.मी. पर्यंत बदला. दर ५०० ते ७०० कि.मी. नंतर ऑईल लेव्हल चेक करायची. कमी झालं असेल तर थोडसं टॉप अप करुन घ्यायच मिनी पाऊच मधुन. सिंथेटीक ऑईल असेल तर काही काही ऑईल ४५०० ते ५००० की.मी. पर्यंत बदलायची गरज नसते. पण माझा सल्ला असा आहे की साधचं ऑईल वापरा. जास्त सुट होतं युनिकॉर्न च्या ईंजिन ला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुहास..

+१००, आजकालच्या नविन

५० फक्त
Tue, 04/02/2013 - 23:38 नवीन
+१००, आजकालच्या नविन गाड्यांना ४००-५०० किमीला ऑईल बदलायची गरज नसते, कारण बहुतेक इंजिन्स अ‍ॅल्युनिमियमची असतात हे असावं, नक्की माहित नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो

+१

स्पा
Wed, 04/03/2013 - 09:06 नवीन
ह्येच बोल्तो
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ५० फक्त

होंडा चा पंखा

सुबोध खरे
Sat, 04/06/2013 - 12:52 नवीन
मी होंडा चा पंखा आहे. हिरो होंडा c d १०० (१९८८) दीड लाख (१,५०,०००) कि मी चालवून भावाच्या कारखान्यात कामगारांना चालवायला दिलेली आहेआजही ५०-५५किमी/लि देते . कायनेटिक होंडा ८०,००० (ऐंशी हजार) कि मी चालवून फुकून टाकली. आणि आता गेली साडेपाच वर्षे होंडा युनिकोर्न वापरीत आहे.४५ किमी मुंबई शहरात देते. ( आश्चर्य म्हणजे त्याची पहिली बैटरी अजून चालू आहे).आजतागायत देखभालीचा खर्च (एकूण साडेपाच वर्षातील) १५०० च्या वर नाही. माझ्या भावाने पण एक जपानी होंडा ९० cc, दोन हिरो होंडा आणि दोन होंडा ऐक्तिव्हा(activa) वापरल्या आहेत. होंडा ची इंजिने बेजोड आहेत.पण त्यांची सर्व्हिसिंग भिकार आहे.भारत भराचा अनुभव गाठीशी आहे (लष्करात असल्याने) पण मी त्या गाड्यानचे सर्विसिंग लोकल मेकानिक कडेच करतो फार तर वर्षात एकदा.fill it shut it and forget it.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो

प्रतिसाद

कॅप्टन जॅक स्पॅरो
Sat, 04/06/2013 - 13:55 नवीन
पण त्यांची सर्व्हिसिंग भिकार आहे.
सहमत. सर्विसिंगला ऑईल नं बदलणं, पेट्रोल काढुन घेणं ईत्यादी प्रकार अनुभवलेले आहेत. एकदा तर चक्क गाडीचा ईंडीकेटर तोडुन दिला होता. त्यांच्या डोक्यावर बसुन बदलुन घेतला होता. त्याच्यानंतर परत तिथे गाडी दिली नाही. मी सुद्धा बाहेरच्या गॅरेज मधेचं देतो युनिकॉर्न ला. माझी सुद्धा पहीलीच बॅटरी आहे अजुन. गाडीचं ईंजिन "मक्खन" आहे. सिटी मधे ४७~५० हायवे ला ५५~५८ पर्यंत आरामात मिळतं अ‍ॅव्हरेज. होंडाच्या गाड्या थोड्या महाग असतात, पण क्वालिटीवाईज पहायला गेला तर पैसे वसुल होतात. (होंडाचा पंखा, ए.सी., कुलर) अनिरुद्ध.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

+१

घाशीराम कोतवाल १.२
Mon, 04/08/2013 - 17:06 नवीन
+१ माझी पण हॉन्डा युनिकॉर्ण आहे मजा येते गाडी चालवायला
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो

आमची टि.वि.एस. अपाची आर टि आर

सौरभ उप्स
Tue, 04/02/2013 - 17:34 नवीन
आमची टि.वि.एस. अपाची आर टि आर आहे, मागच्या महिन्यात बाईक अचानक सुरूच होत नवती, सुरु झाली कि लगेच बंद पडायची, कार्बोरेटर गेलाय म्हणाला मेक्यानिक ३००० रुपडे खर्च येईल म्हणे.. म्हणून महिनाभर बंदच ठेवली, परवा असच वेळ मिळाला म्हणून दुसर्या मेक्यानिक ला दाखवली तर त्याने एक पोवर सर्किट चेंज केल आणि कार्बोरेटर ची सेट्टीइंग केली काहीतरी, पेट्रोल भेसळीच आहे बदलून बघ म्हणे १०० रुपयात काम झालं खर पण गाडीतलं ३लिटर पेट्रोल काढायला जीवावर आल हो.. आता गाडी सुरु तर झालीये पण अजूनही खात्री वाटत नाहीये...... कार्बोरेटर चेक करायला परत खर्च येईल म्हणे... नक्की कळत नाहीये कार्बोरेटर चेक घेऊ कि गाडी परत बंद पडायची वाट बघु.... कि अजून काही वेगळाच प्रोब्लेम आहे ?
  • Log in or register to post comments

कार्बोरेटर घरच्या घरी साफ

नानबा
Tue, 04/02/2013 - 20:29 नवीन
कार्बोरेटर घरच्या घरी साफ करून बघ ना एकदा. नाहीतर एखाद्या चांगल्या मेक्यानिकला दाखवून व्यवस्थित ट्यून करून घे. पण मेक्यानिक मात्र चांगला माहितगार बघा, कारण नाहीतर कार्बोरेटर ट्यून करायच्या नावावर काहीतरी भलतंच करतात आणि मायलेजची पार वाट लागते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सौरभ उप्स

धन्स प्रथम,

सौरभ उप्स
Wed, 04/03/2013 - 10:58 नवीन
धन्स प्रथम, पण कर्बोरेटर घरच्याघरी कस साफ करू? कारण त्यातल काही कळत नाही... सध्या एका मेक्यानिक ने ट्युन करून दिली आहे कर्बोरेटर ची सेटिंग, आता गाडी व्यवस्थित चालू आहे सध्यातरी (पण पिक अप कमी झाला आहे आधी पेक्षा) पण समजा लांब न्यायची झाली गाडी तर ती सेटिंग बिघडू शकते का ? परत काही बिघाड झाला तर याच टेन्शन आहे ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नानबा

घरच्या घरी कार्बोरेटर साफ कसा

नानबा
Wed, 04/03/2013 - 12:04 नवीन
घरच्या घरी कार्बोरेटर साफ कसा करावा हे http://www.instructables.com/id/Cleaning-a-Carburetor-in-8-Easy-Steps/ या लिंकवर वाचता येईल. अगदी फोटोंसह दिलं आहे, ते पाहून कर. कार्बोरेटर चा मुख्य प्रॉब्लेम काढताना आणि पुन्हा जोडताना होतो. एकदा निघाला की आतमध्ये नंतर जोडताना जमणार नाही इतकी गुंतागुंतीची रचना अजिबात नाही. फक्त काढताना कोणता स्क्रू कुठून काढला, आणि आतली रचना नीट लक्षात ठेव. (पहिल्यांदा मी इथेच घोळ घातला होता.) सोबत एका वाटीत थोडं पेट्रोल घे, आणि कार्ब उघडल्यावर आतला फ्लोट बाहेर काढून तो पेट्रोल मध्ये टाकून ठेव. एखाद्या जुन्या टूथब्रश किंवा कोणत्याही लहान ब्रश पेट्रोलमध्ये बुडवून या ब्रशने कार्बोरेटर नीट साफ कर. नंतर पुन्हा फ्लोट, स्प्रींग इ. अंतर्गत भाग नीट लावून पुन्हा कार्बोरेटर जुळव आणि लावून टाक. वर दिलेली लिंक वाचून हे सहज करता येईल. पहिल्यांदा करताना अर्धा तास लागेल. आणि हो, कार्बोरेटर लावून गाडी चालू करून त्याचा आयडल १००० आर.पी.एम. वर सेट कर. झाला कार्बोरेटर साफ आणि ट्यून. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सौरभ उप्स

एयर फिल्टर??

स्पा
Wed, 04/03/2013 - 12:11 नवीन
प्रथम , घरच्या घरी एयर फिल्टर साफ करता येतो का, बाईक मध्ये हा पार्ट नक्की कुठे असतो?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नानबा

हो, अगदी सहज करता येतो.

नानबा
Wed, 04/03/2013 - 12:46 नवीन
हो, अगदी सहज करता येतो. आपल्या बाईक्स मध्ये एयर फिल्टर रायडर सीटच्या खालच्या बाजूला असतो. एयर फिल्टर साफ करण्यासाठी लागणारी टूल्स आणि इतर सामान - १. ८ मिमि चा स्पॅनर. २. एयर ब्लोअर (नसला तरी हरकत नाही.) ३. रॉकेल ४. पेट्रोल ५. WD40 (एक प्रकारचं ऑईल आहे. कुठल्याही हार्डवेअर दुकानात सहज मिळतं. घेऊन ठेव, प्रचंड कामाची गोष्ट आहे.) एयर फिल्टर साफ करण्याची कृती (फोटो पल्सर चे आहेत, पण कृती सारखीच) - १. बाईक मेन स्टँडला लाव आणि सीटच्या खालचे दोन्ही पॅनल्स काढ. (तुझ्या बाईकला कोणत्या बाजूला फिल्टर आहे बघावा लागेल. बर्‍याच बाइक्समध्ये ज्या बाजूला बॅटरी आहे त्याच्या विरुद्ध बाजूला एयर फिल्टर असतो.) Image removed. २.खालच्या फोटोतल्यासारखा एक पार्ट दिसेल, त्याचे बोल्ट्स काढ आणि झाकण उघड. Image removed. ३. आतमध्ये असे स्पंज असतील. हा आपला एयर फिल्टर. ते स्पंज बाहेर काढ. Image removed. Image removed. Image removed. ४. पांढर्‍या आणि पिवळ्या स्पंजच्या मध्ये आधारासाठी प्लॅस्टिकची जाळी असते ती बाहेर काढ. Image removed. याशिवाय गाडीमध्ये इंजिनाच्या बाजूला एक बारीक जाळी असेल, तीसुद्धा बाहेर काढ. Image removed. ५. रॉकेल आणि पेट्रोल वापरून दोन्ही स्पंज स्वच्छ करून घे. Image removed. Image removed. भरपूर रॉकेल आणि पेट्रोल मार, किंवा सरळ त्यात बुडवून ठेव. आणि ते फाटणार नाहीत इतपत दाब देऊन नीट पिळून त्यातलं रॉकेल आणि पेट्रोल काढून घे. Image removed. Image removed. Image removed. ६. स्पंज व्यवस्थित साफ झाल्यानंतर स्पंजच्या मधली आणि इंजिनाकडची अशा दोन्ही जाळ्यासुद्धा साफ कर. Image removed. Image removed. ७. आता दोन्ही स्पंजवर इंजिन ऑईलचे काही थेंब टाकून ते नीट अख्ख्या स्पंजवर पसरून घे. तसं कोणतंही तेल चालतं, पण शक्यो इंजिन ऑईल उत्तम कारण एक तर त्याचा चिकटपणा जास्त असल्यामुळे धूळ चिकटण्यास मदत होते, आणि हे ऑईल जास्त तापमानावर जळत नाही. Image removed. Image removed. ८. आता दोन्ही जाळ्या आपापल्या जागी बसव, आणि असेंब्ली पुन्हा जुळव. Image removed. Image removed. झाला तुझा एयर फिल्टर साफ. जास्तीत जास्त १० मिनीटं लागतील. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा

चायला

स्पा
Wed, 04/03/2013 - 12:54 नवीन
फुल पाककृती सारखी डिटेल मध्ये कृती दिलीस कि :) ५० चा भाचा शोभतोस गुरुदेव या रविवारी नक्की भेटूया :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नानबा

@गुरुदेव या रविवारी नक्की

अत्रुप्त आत्मा
Wed, 04/03/2013 - 14:50 नवीन
@गुरुदेव या रविवारी नक्की भेटूया >>> Image removed.
सावधान<<<प्रथम फडणीस>>>सावधान
=)) .... =)) .... =)) फिल्टर साफ करायचा रेट डोक्यात ठेऊन जा हो फडणीस...आपलं प्रथम सांगितलेलं बरं ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा

डोंबिवलीकर मिपाकरांना फुकट

नानबा
Wed, 04/03/2013 - 14:54 नवीन
:)) :)) :)) डोंबिवलीकर मिपाकरांना फुकट काम करून मिळेल... :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

फडणीस साहेब, काम आम्ही करू

स्पा
Wed, 04/03/2013 - 15:00 नवीन
फडणीस साहेब, काम आम्ही करू तुम्ही फकस्त उभं राहून मार्गदर्शन करा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नानबा

आवं दोगं मिळून काम करून टाकू.

नानबा
Wed, 04/03/2013 - 15:03 नवीन
आवं दोगं मिळून काम करून टाकू. झटक्यात हुईल. कसं??
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा

@तुम्ही फकस्त उभं राहून

अत्रुप्त आत्मा
Wed, 04/03/2013 - 15:05 नवीन
@तुम्ही फकस्त उभं राहून मार्गदर्शन करा >>> =)) वाचलात हो वाचलात फडणीस,तरी तुंम्हाला द्यायला लागणार्‍या उभ्या फोडणीचे पैसे घ्याच...! =)) ज्ञान तर अजिबात फुकट देऊ नये,असे म्हणतात. :-p
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा

तरी तुंम्हाला द्यायला लागणार्

नानबा
Wed, 04/03/2013 - 15:17 नवीन
तरी तुंम्हाला द्यायला लागणार्‍या उभ्या फोडणीचे पैसे घ्याच...!
हे मात्र नक्की वसूल केलं जाईल. :))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

(No subject)

स्पा
Wed, 04/03/2013 - 15:26 नवीन
=))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नानबा

म्हणजे ठाकुर्लीला पैसे-पडणार.

अत्रुप्त आत्मा
Wed, 04/03/2013 - 15:01 नवीन
म्हणजे ठाकुर्लीला पैसे-पडणार... =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नानबा

अस्सं होय !!

सूड
Wed, 04/03/2013 - 15:02 नवीन
५० चा भाचा शोभतोस तुझ्यामुळे कळलं हो स्पा की हा ५० चा भाचा आहे. बाकी चालू द्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा

@ सुड, त्यांच्याचमुळं आम्हाला

५० फक्त
Wed, 04/03/2013 - 18:35 नवीन
@ सुड, त्यांच्याचमुळं आम्हाला तुमच्या नातेवाईकांबद्दल सुद्धा कळलं होतं, तसे फार मदतीचे आहेत मिस्पाजी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

काय सांगता?

सूड
गुरुवार, 04/04/2013 - 17:17 नवीन
>>सुड, त्यांच्याचमुळं आम्हाला तुमच्या नातेवाईकांबद्दल सुद्धा कळलं होतं, कोण नातेवाईक हो ते? आठवत नाहीय मला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ५० फक्त

कोण हो कोण

स्पा
गुरुवार, 04/04/2013 - 17:18 नवीन
मला पण आठवत नाहीये
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

तुमचे खुप पैसे वाचत असतील ना

श्री गावसेना प्रमुख
Wed, 04/03/2013 - 13:56 नवीन
तुमचे खुप पैसे वाचत असतील ना हो फडणीस साहेब
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नानबा

तुमचे खुप पैसे वाचत असतील ना

नानबा
Wed, 04/03/2013 - 14:01 नवीन
तुमचे खुप पैसे वाचत असतील ना हो फडणीस साहेब
:)) खरंय. गाडी आणि तिच्या कामात रस असल्यामुळे बर्‍याचशा गोष्टी घरीच करतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्री गावसेना प्रमुख

मग आमच पण एक काम करा की राव

श्री गावसेना प्रमुख
Wed, 04/03/2013 - 18:32 नवीन
मग आमच पण एक काम करा की राव,माझी होंडा ड्रिम युगा मायलेज द्यायच नाही म्हनते,काय करु सांगा ना. कंपनीच्या शोरुम मध्ये प्रॉब्लेम सांगीतला तर त्यांनी ८० च मायलेज काढल् आता बोला, कंपनीने ७२ च ड्रिम मायलेज सांगीतलय ह्यांनी तर त्यापुढे उडी मारलीये http://www.honda2wheelersindia.com/dreamyuga/about.html
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नानबा

नखे कापा!

यशोधरा
गुरुवार, 04/04/2013 - 08:57 नवीन
नखे कापा!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नानबा

तो फोटो त्यांचा स्वताचा

श्री गावसेना प्रमुख
गुरुवार, 04/04/2013 - 09:06 नवीन
तो फोटो त्यांचा स्वताचा नाहीये त्यांनी फक्त फोटो काढले आहेत,फोटोतली व्यक्ती दुसरी आहे. हो की नाही हो फडणीस साहेब
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा

दुसर्‍या व्यक्तीला नखे

यशोधरा
गुरुवार, 04/04/2013 - 09:07 नवीन
दुसर्‍या व्यक्तीला नखे कापायला सांगा अथवा दुसर्‍या व्यक्तीची नखे कापा :D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्री गावसेना प्रमुख

प्रथमा: मान गये बॉस... अतिशय

सौरभ उप्स
Wed, 04/03/2013 - 13:03 नवीन
प्रथमा: मान गये बॉस... अतिशय माहितीपूर्ण आहे हे सगळ, एअर फिल्टर साफ करायची कृती पण जबर्या.....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नानबा

शेलचे पेट्रोल वापरा

मैत्र
Wed, 04/03/2013 - 10:32 नवीन
भेसळीचा त्रास झाला असेल तर काही दिवस थोडी रपेट मारून शेलचा पंप शोधून तिथे पेट्रोल भरा. बाजारभावापेक्षा किंचित जास्त असते किंमत पण ती वसुल करून पैसे वाचतील आणि गाडीचा मेंटेनन्स कमी होईल इतके चांगले मायलेज आणि इंजिन परफॉर्मन्स मिळतो. चारचाकीला हा अनुभव आहे पण दुचाकीला कित्येक जणांनी हा दुजोरा दिलेला आहे. सध्या भेसळीचा त्रास झाला असेल तर एखाद वेळेला शेलचे प्रिमियम पेट्रोल जवळजवळ टाकी फुल होईल इतके टाकून थोडी गाडी पळवा. बरेचदा चांगले इंधन, नवे इंजिन व गियरबॉक्स ऑइल आणि मध्यम ५०-६५ स्पीडची थोडी रपेट यामुळे मशीन चांगले रूळते.. मग रेग्युलर वापरात गाडी चांगली चालते. पण शेलचे पेट्रोल नक्कि वापरून बघा..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सौरभ उप्स

धन्स मित्र, जून पेट्रोल काढून

सौरभ उप्स
Wed, 04/03/2013 - 11:06 नवीन
धन्स मित्र, जून पेट्रोल काढून टाकल आणि नेहमीच्या ठिकाणून भरतो तिथलं एच. पी. वाल्यांच पेट्रोल टाकलय सध्या थोडस, सध्यातरी गाडी व्यवस्थित चालतेय... आता तुम्ही म्हणता तस शेलच पेट्रोल टाकून बघतो नक्की..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मैत्र

सहमत. शेलच्या पेट्रोलमुळे

llपुण्याचे पेशवेll
Fri, 04/05/2013 - 09:59 नवीन
सहमत. शेलच्या पेट्रोलमुळे चारचाकीला देखील मायलेज मधे २ किमी वाढ आढळून आली आहे. परंतु शेलचे पंप सर्वत्र नसल्याने पुण्यातून टाकी फुल्ल करून निघतो आणि येताना मग भारत पेट्रोलियम चा पंप बघून तिथे भरतो. पुरते तितके पेट्रोल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मैत्र

चारचाकीच्या देखभालीच्या टिप्स

सस्नेह
Tue, 04/02/2013 - 17:57 नवीन
चारचाकीच्या देखभालीच्या टिप्स कोणी देईल काय ? म्हणजे किती दिवसातून एकदा सर्विसिंग, ऑईल लेवल, हवा, इंजिन देखभाल कोणती इ. ?
  • Log in or register to post comments

आमच्या घरी शीबीजी एक्स्ट्रीम

अभ्या..
Tue, 04/02/2013 - 18:25 नवीन
आमच्या घरी शीबीजी एक्स्ट्रीम(जुनी लाल शेपूटवाली), डिओ आणि जुनी एन्फील्ड असल्या मायलेज मास्टर गाड्याचे कलेक्शन आहे. आणि घरातील कोणीही कुठलीही नेतो, त्यामुळे प्लास्टीकच्या बाटल्याचे पण कलेक्शन आहे. मेंटेनन्सचे गुत्ते एका मेक्यानिकला कायमचे दिलेले आहे. (तो बिचारा वर्षाचे १००० च्या आसपास पैसे मागतो. स्पेअरपार्टचे वेगळे) कणकवली सावंतवाडी आणि गोवा मी २००३ च्या स्प्लेंडरवर केलेले आहे. ६५ ते ७० मायलेज मिळाले. :) माझा आता हिरो मायेस्ट्रो घ्यायचा इचार आहे. चांगली आहे का? नायतर वेस्पा. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सस्नेह

माझा आता हिरो मायेस्ट्रो

अद्द्या
Tue, 04/02/2013 - 18:33 नवीन
माझा आता हिरो मायेस्ट्रो घ्यायचा इचार आहे. चांगली आहे का? नायतर वेस्पा. >>>> नॉन गियर मध्ये सध्या फ़क्त. . सुजुकी एक्सेस ४० - ४५ मायलेज देते . आणि ८५ च्या स्पीड ला हि अतिशय आरामात असते . . मस्त गाडी आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

नॉन गियर मध्ये सध्या फ़क्त. .

सुहास..
Tue, 04/02/2013 - 19:16 नवीन
नॉन गियर मध्ये सध्या फ़क्त. . सुजुकी एक्सेस >>> नॉन गियर मध्ये माझी पसंती महिन्द्रा वेगो !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अद्द्या

वेगो टीवीएस ची.

अभ्या..
Tue, 04/02/2013 - 19:19 नवीन
वेगो टीवीएस ची. महिन्द्रा (जुनी कायनेटीक) ची ड्युरो, फ्लाईट आणि रोडीओ.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुहास..

अगदी बरोबर.....पळायला भारी

मिनेश
गुरुवार, 12/19/2013 - 09:31 नवीन
अगदी बरोबर.....पळायला भारी आहे अ‍ॅक्सेस. फक्त थोडी छोटी आहे. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अद्द्या

माझा आता हिरो मायेस्ट्रो

सुहास..
Tue, 04/02/2013 - 18:38 नवीन
माझा आता हिरो मायेस्ट्रो घ्यायचा इचार आहे. चांगली आहे का? नायतर वेस्पा. >>>> होन्डाच्या युनीकॉर्न च्या मॉडेल च मॅन्युयल पण बघुन घ्या मालक एकदा, बाईक हाय वे ला एकदम मस्का आहे. डिओ आणि जुनी एन्फील्ड असल्या मायलेज मास्टर >> ईन्फिल्ड आणि बुलेट या " बडबड्या " गर्लफ्रेन्ड ला घेवून फिरण्यासाठी परफेक्ट बाईक्स आहेत ;) असो ...बुलेट वरून आठवल . नगरला ऑक्शन मध्ये " डिझेल बुलेट " होती. १९८२ चा मेक, सौजन्य : नगरचा लष्करी तळ , १७,००० कोटेड किमंत ! , मी खिशात ( काही ही झाले तरी घ्यायचीच ) म्हणुन दुप्पट रक्कम घेवुन गेलो होतो...स्साला बाईक असली झक्कास मेन्टेन केलेली की आपण फुल्ल टु फिदा... (ती दोन्ही बाजुला असलेली डिक्की असलेली मिलीटरी ग्रीन कलरची बाईक ! अहाहा !! ) पण पहिल्या ऑक्शच्या फेरीत च बाद झालो ...बाईक दिड लाखाला उचलली एका जालन्याच्या माणसाने, स्साल ऑडीत आलत, जाताना त्या बाईक वर गेल .........
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा