Skip to main content

दुचाकी /चारचाकिंच्या काळजी /देखभाल संदर्भात चर्चेचा धागा

लेखक स्पा यांनी मंगळवार, 02/04/2013 15:28 या दिवशी प्रकाशित केले.
मिपावर याबाबतीत बराच उत्खनन करूनही हाती काही न लागल्याने ह्या नवीन चर्चेचा प्रपंच हल्ली दुचाकी / चारचाकी जीवनाचा अविभाज्य घटकच झालेला आहे. अशावेळी गाड्यांच्या बाबतीत बर्याचदा टेक्निकल माहिती नसल्याने , जराही काही खुट्ट झालं कि लागलीच म्याक्यानिक कडे धाव घ्यावी लागते. तो सांगेल ती पूर्व दिशा या न्यायाने मुकाट बिल भरावं लागतं. बर्याचदा प्रॉब्लेम साधाच असतो , घरीही आपण तो सोडवू शकतो, पण आपल्याला (म्हणजे निदान मला तरी ) गाडीतलं काहीच कळत नसल्याने, उगाच आपण हात लावला आणि गाडी अजूनच बिघडली तर असे वाटते. बाकी इतरही बरेच प्रश्न असतात उदाहरणार्थ मागे एकदा मुंबई -दापोली आणि इतर परिसर असा साधारण ६५० किमीचा २ दिवसांचा दौरा मी बाईक वरून केला, पण एरवी शहरात ४५ चा मायलेज देणाऱ्या आमच्या यामाने हायवेवर फक्त ३६ चा मायलेज दिला. बाकी गाडी व्यवस्थित होती, पण मग एवढा कमी मायलेज का ब्वा?मग यावर व्यनित चर्चा झडली,कि कारण काय असावे. ५० फक्त , वल्ली, मनराव ( हो तेच ते पुणे-लदाख वाले) यांनी व्यवस्थित चिकित्सा केली. 3/४ शक्यता निघाल्या. पहिली म्हणजे मी टायर मध्ये हवेचे प्रेशर कमी ठेवले होते ( जास्त प्रेशर ने तयार पंक्चर होऊ नये म्हणून) २. कोकणातले रस्ते घाटाचे असल्याने मायलेज पडले असावे ३. त्वरण कमी जास्त केल्याने मायलेज वर परिणाम होतो ४. एअर फिल्टर साफ न केल्याने इंजिन वर ताण आला असावा . एक ना अनेक . माझ्यासाठी हि सर्व माहिती नवीनच होती. पण आता माझा जो पुढचा प्लान असेल त्यावेळी मी या गोष्टींची नक्की काळजी घेईन . (तेंव्हाही ५० राव हि चर्चा ओफ्लैन न ठेवता बोर्डावर लिही असे म्हणाले होते, पण तेंव्हा राहून गेलं.) अजून एक मुद्दा म्हणजे समजा आपल्याला नवीन कार /दुचाकी घ्यायची असेल तर इथे त्यावर चर्चा होऊ शकेल. कुठल्या मिपाकरांकडे सदर मॉडेल असेल तर त्याचे फायदे /तोटे कळू शकतात . आंतरजालावर गाड्यांबद्दल खूप छान छान साईट उपलब्ध असतात, त्या इथे शेर करू शकता. नवीन launch होणार्या गाड्यांबद्दल टेक्निकल चर्चा होऊ शकते . गाड्यांच व्याकरण खूप कठीण असत (माझ्यासाठी तरी ) उदा. ग्राउंड क्लीअरंस. टोर्कू , इंजिन पावर, बी एच पी , कर्ब वेट ई ई. याबद्दलही माहिती मिळून जरा ज्ञान वाढेल . आता चर्चेला सुरुवात करताना माझाच पहिला प्रश्न (जिलबी ) टाकतो परत कोकण दौरा आखलेला आहे . ४/५ दिवसात १२०० किमी . मायलेज वाढावं म्हणून एका मित्राने सांगितलं इंजिन ट्यून कर आता हे इंजिन ट्यून कर म्हणजे नक्की काय करू हे काही त्याला सांगता आलं नाही , आणि मला तर अजिबातच काही माहिती नाही . पण त्याने म्हणे इंजिन च फ्युएल कंझंपशन कमी करता येतं. तर हे काय असत याबाबत माहिती हवी आहे . अजून एक दोन मोठ्या ब्यागा बाईक ला बांधायच्या आहेत, त्या कशा बांधायच्या हेही माहित नाही :D त्याबद्दलही माहिती दिल्यास बरे होईल . बाकी चर्चेत ५० राव, मनराव, वल्ली, मोदक, शैलेंद्र , गवी, छोटा डॉन भर घालतीलच धन्यवाद

वाचने 150712
प्रतिक्रिया 358

प्रतिक्रिया

स्पा, नुकताच दिवाळीत महाराष्ट्र गोवा कर्नाटक केरळ असा ३००० किमीचा प्रवास बाईकवरून केला असल्यामुळे मला या धाग्यात टिचभर भर घालता येईल. तुम्हाला लागणार्‍या २ ब्यागा कोणत्या आकाराच्या आहेत? शक्यतो बॅगपॅक असल्या तर उत्तम. त्यात सुद्धा ५० लिटरच्या असल्या तर सगळ्यात छान, कारण या ब्यागा नीट बांधता येतात. तुमची बाईक कोणती आहे?
पण एरवी शहरात ४५ चा मायलेज देणाऱ्या आमच्या यामाने हायवेवर फक्त ३६ चा मायलेज दिला
या वाक्यावरून युनिकॉर्न, हंक, पल्सर १३५, जीएस १५० आर, शाईन, युवा, एसझी आर किंवा तत्सम बाईक असावी. या बाईक्सना मागे ब्याग बांधण्यासाठी बंजी रोप मिळते. ही अशी - s ही दोरी ताणली जाते आणि प्रचंड मजबूत असते. त्याला दोन्ही टोकांना हुकं असतात, त्यामुळे मागल्या सीटवर किंवा खालच्या बाजूस ब्यागा ठेऊन असल्या २ बंजी दोर्‍यांनी बांधल्या की झालं तुमचं काम. बंजी रोपप्रमाणेच बंजी नेटसुद्धा असते. ही अशी - a फक्त याने सीटवर ब्याग बांधता येतात. तुम्ही ठाकुर्लीला राहता ना? डोंबिवलीमध्ये मानपाडा रोडवर डॉमिनोज पिझ्झाच्या समोर सुनिल कार डेकोर म्हणून दुकान आहे, त्याच्या कडे या वस्तू मिळतील. किंवा कोणताही ऑटोमोबाईल स्पेअर पार्टवाला सुद्धा देऊ शकेल.

यष्टी जातीय की कोकणात. ब्यागा टाकायच्या डोक्यावर...

In reply to by कवितानागेश

जेटमाउलीशी सहमत (सध्या ती संमं वर आहे म्हणून)

In reply to by कवितानागेश

धागा मस्त आहे पण माऊचा प्रतिसाद आवड्ला.. उगाच तकलिफ त्या हायवेवर शेकडो किलोमीटर आपली दुचाकी हाकायची.. आपला लाल डबा आहे की ..

प्रथमा भेट बाबा तू मला प्रात्यक्षिक दाखीव :) माझी यामाहा SZ १५० cc आहे

In reply to by स्पा

@माझी यामाहा SZ १५० cc आहे >>> इथेच हिशोब झाला की मग... मी १०० सिसीच्या गाडिवरुन पूर्ण कोकण पालथ घातलय.७० ते ९० च्या स्पिडला चालवुन साधारणपणे ६० च्या आसपास अ‍ॅव्हरेज मिळायचं.१५० सिसीच्या गाडिला इंजिन ट्यून करा नायतर करु नका ६० च्या वर चालवली तरी ४५ अ‍ॅव्हरेज मिळेल. आणी अजुन ताणली तर ३५ ते ४० मिळतं. आमचे बरेच (पुण्यात व्यवसायानिमित्त आलेले) कोकणवासी मित्र यापेक्षा वेगळा अनुभव सांगत नाहित.

In reply to by जेनी...

बंदूक आत्मा..मालोजि/बालिका खात्मा http://www.freesmileys.org/smileys/smiley-stargate006.gif @मालोजीराव http://www.freesmileys.org/smileys/smiley-violent018.gif- Tue, 02/04/2013 - 18:44 सध्या बुवा पुण्यातल्या रस्त्यांवरून विमान चालवतात असं ऐकून आहे smiley>>> =)) @पूजा पवार. http://www.freesmileys.org/smileys/smiley-stargate014.gif- Tue, 02/04/2013 - 19:46 तेपण मांडी घालुन smileysmiley>>>=))

चारचाकी ला झाकण्यासाठी कव्हर कोणतं टाकावं. उघडी ठेवली की इतकी घाण बसते की विचारु नका. मला गाडी पुसायचं जीवावर येतं. फडकं मारल्याने चूलीला पोचारा दिल्यासारखी वाटते. (यु नो पोचारा) ती अजून घाण वाटते. पाणी मारुन शिळ्या दैनिकानं पुसुन काढायची म्हणजे अर्धा तास लागतो. यावर काही उपाय ? गाडीच्या काचा उघड्या ठेवतो तेव्हाही भरपूर धुळ गाडी येऊन बसते. गाडी धुणार्‍याकडे गाडी घेऊन घेल्यावर साडेतीनशे रुपये घेतो. आत हवा मारायची (धुळ झटकून काढायची) वेगळे पन्नास रुपये द्यावे लागतात. हजार पाचशेत असं हवा मारायचं इलेक्ट्रीकवर चालणारं काही यंत्रं बिंत्र मिळतं का ? -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

अहो, एखाद्या गरीबाला द्या की महिना शे-पाचशे-हजार-लाख रुपडे (तुमच्या आर्थीक कुवतीनुसार), आणि ठेवा गाडी धुवायला. तेवढेच एखाद्याला रोजी-रोटीला लावल्याचे पुण्य मिळेल. परवाच कुठल्याश्या सायंदैनिकात 'प्राध्यापक हे विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळणारे पापी आहेत' असे वाचनाता आले, म्हणून आपला हा सल्ला. बाकी, माझ्या ह्यालीक्राप्टरला ल्यांड करताना बर्‍याचदा त्याची डावी बाजू आधी टेकते. हे कशामुळे होत असावे ?

In reply to by परिकथेतील राजकुमार

बाकी, माझ्या ह्यालीक्राप्टरला ल्यांड करताना बर्‍याचदा त्याची डावी बाजू आधी टेकते. हे कशामुळे होत असावे ?
ह्यालीक्राप्टर ल्यांड करताना डाव्या बाजूला कुणी बसलेलं असतं का? तसं असेल तर त्यांना ह्यालीक्राप्टर ल्यांड करताना मध्यभागी बसवत जा.

In reply to by परिकथेतील राजकुमार

कमाल आहे बॉ. अहो डागदर लाखाच्या गाडीला एवढे ओवर्।एड असाचेच. परा शि सहमत. @ परा. माझा म्याक्यॅनिक ला पाठ्वु का?

In reply to by परिकथेतील राजकुमार

>>> एखाद्या गरीबाला द्या की महिना शे-पाचशे-हजार-लाख रुपडे (तुमच्या आर्थीक कुवतीनुसार), आणि ठेवा गाडी धुवायला. एकतर मला तर ते शे-पाचशे-हजार. इ. देणं परवडणारं नाही. तेवढ्या पैशात डिझेल गाडीत भरणं होईल त्यामुळे तो विचार बाद. आणि गरीबाच्या भावनेशी सहमत असलो तरी एखाद्या गरजुला माझा मूड असला तर बिनकामाचे शे पाचशे हजार देईन. पण, ड्रायव्हर ठेवणे किंवा अन्य माणसामुळे आपल्या प्रायव्हसीला मर्यादा येतात. आपण बोलतो याचं गाडी चालवायचं सोडून लक्ष आपल्याकडे असतं. काही काही उत्साही आपल्या गप्पात सामील होतात. आपण काही खात असतो तेव्हा त्याला कंपलसरी विचारावं लागतं किंवा द्यावं लागत. माणूसकी म्हणून ठीक आहे, पण मला नै जमत राव. असो, गाडी चालवणारं रोबट बिबट येईन तेव्हा पाहीन. असो. विषयांतर होतंय. >>>परवाच कुठल्याश्या सायंदैनिकात 'प्राध्यापक हे विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळणारे पापी आहेत' वा वा वा. वाचून खूशाल इथे लिहित आहात. त्यांच्या संपादकाला पत्र लिहायचं होतं ना चड्डीत राहा ना भो म्हणून. >>>>माझ्या ह्यालीक्राप्टरला ल्यांड करताना बर्‍याचदा त्याची डावी बाजू आधी टेकते. हे कशामुळे होत असावे ? धागा दुचाकी चारचाकी या संबंधात आहे. ह्यालीकॉप्टरसाठी नवा धागा काढावा. पण, आता इथे विचारलं आहे तर सांगतो. उजव्या बाजूला एक सिमेंटची गोणी ठेवा त्यामुळे ब्यालेन्स व्यवस्थित राहून ह्यालीकॉप्टर ल्यांड व्यवस्थित होईल. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

एक घरगुति उपाय सांगतो. गाडी नाही झाकलीत तरी चालेल. शक्यतो जुना टर्किशचा टॉवेलचे दोन तुकडे (अर्धे अर्धे करुन) रात्री भिजवुन आणी पिळुन जास्त हवा न लागतील अशा टिकाणी रात्रभर एक्मेकांवर घडीघालुन ठेवायचे. सकाळी त्या तुकड्यांनी गाडी पुसायची. पोचारा होणार नाही किंवा पाण्याच्या थेंबांचे डाग दिसतात (कपडा जास्त ओला राहिल्यास) तेही दिसणार नाहीत कागद वापरायची गरज नाही.आणी पाण्याचिही बचत. रविवारी निवांतपणे शाम्पु किंवा तत्सम झाग बनविणार्‍या पदार्थाने गाडी धुवुन टाकावी.

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

ह्यालीक्राप्टर ल्यांड करताना डाव्या बाजूला कुणी बसलेलं असतं का? तसं असेल तर त्यांना ह्यालीक्राप्टर ल्यांड करताना मध्यभागी बसवत जा.
मला देखील आधी तिच शंका आली होती. त्यामुळे एकदा फक्त पायलटला बसवून आणि एकदा ऑटो पायलट (रिमोट वापरुन) ह्यालिक्राप्टर ल्यांड करून पाहिले, पण दोन्ही वेळेला तोच फेस केला. त्यामुळे तोंडाला फेस आला.
@ परा. माझा म्याक्यॅनिक ला पाठ्वु का?
नको. तो अंमळ जास्तीच ट्यून करून जातो गाडी. बाकी, टैम मिळाला की जरा फोन करा. तुमच्या त्या इंन्स्टिट्यूटवाल्यानी डोक्याला शॉट लावलाय माझ्या.
एकतर मला तर ते शे-पाचशे-हजार. इ. देणं परवडणारं नाही. तेवढ्या पैशात डिझेल गाडीत भरणं होईल त्यामुळे तो विचार बाद. आणि गरीबाच्या भावनेशी सहमत असलो तरी एखाद्या गरजुला माझा मूड असला तर बिनकामाचे शे पाचशे हजार देईन. पण, ड्रायव्हर ठेवणे किंवा अन्य माणसामुळे आपल्या प्रायव्हसीला मर्यादा येतात. आपण बोलतो याचं गाडी चालवायचं सोडून लक्ष आपल्याकडे असतं. काही काही उत्साही आपल्या गप्पात सामील होतात. आपण काही खात असतो तेव्हा त्याला कंपलसरी विचारावं लागतं किंवा द्यावं लागत. माणूसकी म्हणून ठीक आहे, पण मला नै जमत राव. असो, गाडी चालवणारं रोबट बिबट येईन तेव्हा पाहीन. असो. विषयांतर होतंय.
हे प्राध्यापक लोक ना.. अहो प्रा. डॉ. मी फक्त गाडी धुण्यासाठी माणूस ठेवायला सांगतोय. हे म्हणजे कामाला बाई ठेवली की सगळ्याच कामाची अपेक्षा धरल्यासारखे करताय तुम्ही. येवढ्यात माने साहेबांचे कुठले पुस्तक वैग्रे वाचले होतेत का काय ?
वा वा वा. वाचून खूशाल इथे लिहित आहात. त्यांच्या संपादकाला पत्र लिहायचं होतं ना चड्डीत राहा ना भो म्हणून.
त्यांच्या वर्तमानपत्रालाच लंगोटी-पत्र म्हणले जाते. ;) आता ह्यावर मी त्यांना काय सुचवणार ?
धागा दुचाकी चारचाकी या संबंधात आहे. ह्यालीकॉप्टरसाठी नवा धागा काढावा. पण, आता इथे विचारलं आहे तर सांगतो. उजव्या बाजूला एक सिमेंटची गोणी ठेवा त्यामुळे ब्यालेन्स व्यवस्थित राहून ह्यालीकॉप्टर ल्यांड व्यवस्थित होईल.
सिमेंटचे वस्तुमान, ब्रँड, किंमत ह्याविषयी डिटेल्स मिळतील काय ?

In reply to by परिकथेतील राजकुमार

बजाजचे तर नाही नां ? याची खात्री करुन घ्या. (बजाज सकुटर आधी थोडी आडवी करुन चालु करायला लागायची म्हणुन आपल हे सजेशन)

In reply to by परिकथेतील राजकुमार

मालक तिरका असेल तर त्ये ह्येलीकापटर कसं सरळ टेकायचं जमीनीला ...?

In reply to by परिकथेतील राजकुमार

बाकी, ह्यालीक्राप्टरला ल्यांड करताना बर्‍याचदा त्याची डावी बाजू आधी टेकते. हे कशामुळे होत असावे ?बाकी, माझ्या ह्यालीक्राप्टरला ल्यांड करताना बर्‍याचदा त्याची डावी बाजू आधी टेकते. हे कशामुळे होत असावे ? हा धागा "दुचाकी /चारचाकिंच्या काळजी /देखभाल संदर्भात चर्चेचा धागा" असा आहे, म्हणून तुमच्या ह्यालीक्राप्टरला दोन चाके आहेत की चार हे सांगीतल्याशिवाय उत्तर दिले जाणार नाही.

In reply to by परिकथेतील राजकुमार

+१ आम्ही अशाच एका विद्यार्थ्याला महिना रु.२०० + वर्षभर लागतील तशी अभ्यासाची पुस्तके, गाईड या डीलवर गाड्या (१ चारचाकी आणि दोन्ही दुचाक्या) पुसायचे काम दिले आहे. तोही आनंदाने करतो.

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

हजार पाचशेत असं हवा मारायचं इलेक्ट्रीकवर चालणारं काही यंत्रं बिंत्र मिळतं का ?
हजार बाराशेच्या आसपास गाडीच्याच बारा व्होल्टच्या चार्जिंग पॉईंटवर चालणारे व्हॅक्यूम क्लिनर मिळतात. गुगलवर car vacuum cleaner असं शोधा.

In reply to by धन्या

असल्या १०००- १२०० च्या यंत्रांच्या नादाला लागु नका, त्यापेक्षा जोपासु चे कार क्लिंनिग किट घ्या, त्यात एक काळ्या रंगाची तंतुमय झटकणी मिळते, आख्खी व्हिस्टा आतुन बाहेरुन पुसायला ७-१० मिनिट पुरेसे होतात, त्याच किट मध्ये एक निळ्या रंगाचे ग्लास नॅपकिन असतो, ओल्या न करता काचा आणि हेडलाईटस लख्ख होतात एकदम, फक्त हा निळा कपडा सहा महिन्यात एकदाच धुवावा.

In reply to by विश्वनाथ मेहेंदळे

ते तुला काय करायचे आहे रे ?? तुझ्याकडे कार आहे का मुद्द्लातली ??
विमे, हल्लीच ना हो तुम्ही इतरांची खिल्ली उडवू नये वगैरे लेख लिहिलात? ते तुम्हांला स्वतःला लागू होत नाही का? --स्पाशो

In reply to by स्पा

आजोबांनी वाद घालु नये, असं कुठल्या बुद्धसंहितेत लिहिलेलं आहे, जरा फेसबुकावर सर्च करुन सांगाल का श्री. मिस्पाजी.

In reply to by विश्वनाथ मेहेंदळे

वैयक्तिक प्रश्न विचारुन माननीय विमेंनी दुसरे माननीय श्री स्पा ह्यांच्या भावना दुखावलेल्या आहेत ह्याची सर्वांनी नोंद घ्यावी.

In reply to by अमोल खरे

तो वैयक्तिक प्रश्न नव्हता. "तुझा पगार किती?? तू बोलतोस किती???" हा वैयक्तिक प्रश्न असता ;-)

In reply to by धन्या

>>> हजार बाराशेच्या आसपास गाडीच्याच बारा व्होल्टच्या चार्जिंग पॉईंटवर चालणारे व्हॅक्यूम क्लिनर मिळतात. माझ्याकडे आहे पण ते काही कामाचं नाही. किरकोळ कारको़ळ काम करतं. पण,फर्र फर्र करत फूल हवा मारणारं यंत्र पाहिजे. एक अ‍ॅटोमोबाईल्सवाला तसं आहे म्हणत होता. काय आहे ते बघतो आणि इथे त्याबद्दल लिहितो. -दिलीप बिरुट

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

चारचाकी ला झाकण्यासाठी कव्हर कोणतं टाकावं. >> हा पूर्णपणे नवीन काथ्याकूटाचा विषय आहे! :P

In reply to by कवितानागेश

माझा पूतन्या त्याच्या चारचाक्या पॉलिथिनच्या पिशवित भरुन / टाकुन ठेवतो ... सुरक्षित राहतात म्हणे गाडीला वरुन बिरुन कव्हर घालाय्/टाकायची झंजट नसते .... घेतली कि कोंबली पिशवीत ... :D :P

In reply to by जेनी...

आईडिया एक नंबर, प्रा.डॉ.दि. बि. तुम्ही एक मोठी पॉलिथिनची पिशवी घ्याच आणि गाडी त्यात घालायला / टाकायला एक क्रेन पण घेवून टाका :-)

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

दुचाकी - चारचाकी (कोणतीही रंग लावलेली पत्र्याची वस्तू-उदा फ्रीज, वॉशिंग मशीन ) झाकून ठेवल्यास लवकर गंजते असा आणभव आहे. उघडीच ठेवावी. पराने सांगितल्याप्रमाणे साफ करून घ्यावी

माहिती नाहीये काही पण प्रश्न आहेत डिस्कवर टी घ्यायच्या प्ल्यान मध्ये आहे . नेट वर वाचलं बरच . पण तरी . अजून काही माहिती मिळाली तर चांगलं आयुष्यातली पहिलीच बाइक आहे . सो त्यातली माहिती जवळपास शून्य .

In reply to by अद्द्या

अस ऐकलेलं आहे बजाज ची स्कूटर सोडली तर इतर या नवीन बाईक एखाद वर्षात भरपूर मेंटेनंस देतात असे बर्याच ठिकाणी वाचलेले आहे. होंडा , यामाहा , तिवीएस चांगले पर्याय आहेत

In reply to by स्पा

ऐकलंय तर खरं . पण मित्राने घेतलीये . ७ ० च्या आसपास मायलेज देते म्हणतो . आणि जुनी डिस्कवर ४ - ५ वर्षे काही प्रोब्लेम नसताना चालवणारे पण लोक आहेतच आणि त्या किमतीत आणि १०० सीसी च्या रेंज मध्ये मस्त गाडी वाटते ती

In reply to by अद्द्या

माझ्या नवर्‍याची अगदी सुरुवातीच्या मॉडेलची डिस्कव्हर आहे. ७-८ वर्षे झाली. उत्तम मायलेज आहे आणि १० रुपयांची पण दुरुस्ती नाही.

In reply to by पैसा

घ्या बिनधास्त डिस्कवर १२५, मस्त गाडी आहे, इंजिन पल्सार १५० च्या इंजिन जवळपास जाणारं आहे, वॉरंटी संपल्यावर रिट्युन करुन घ्या, ५००००/- रुपयात ८००००/- ची पावर नक्की. पण हे बजाज सर्विसवाले करुन देत नाहीत, बाहेरुन करुन घ्यावे लागेल. आणि बजाज सुरुवातीच्या काळात असेल थोडी खराब वगैरे पण हल्ली होंडानं वेगळा घरोबा केल्यापासुन हिरोला पळती भुई थोडी केलेली आहे.

In reply to by ५० फक्त

डिस्कवर "टी " १०० सीसी आहे हो हा . . फक्त फ्री सर्विसिंग बजाज कडून . नंतर बाहेरच . . . साठ हजार ऑन रोड मिळतीया . . प्याशन , शाइन आणि स्प्लेंडर चा पर्याय होता . .आय मीन आहे ते एक कन्फ्युजन आहेच अजुनी

In reply to by ५० फक्त

आयला, डिस्कवर दुचाकी मिळते हे वाचून भारतीय आयटी उद्योगाबद्दल आदर अतोनात वाढला होता!!! पण ते 'डिस्कव्हर' आहे असं कळल्यावर आमचा भ्रमाचा फुगा फुटला!!! :) बाकी ते तुमचं गाड्यांचं मेंटेनंस चालू द्या, आपल्याला काही कळत नाही त्यात!!!

In reply to by पिवळा डांबिस

बाकी ते तुमचं गाड्यांचं मेंटेनंस चालू द्या, आपल्याला काही कळत नाही त्यात!!!
बोल्लो अस्तो, पण जौ दे :-)

In reply to by अद्द्या

डिस्कवर घेताय? बजाजच्या बाईक्स घेताना फार विचार करायचा नाह. भारतात सगळ्यात चांगल्या (सर्व बाबतीत) दुचाकी आहेत बजाजच्या. एक तर किंमत कमी. त्यात स्पेअर पार्ट तर कुठल्याही गल्लीबोळातल्या मेक्यानिककडे पण मिळतात. आणि लहानशा गावतसुद्धा एखादं बजाज सर्व्हिस सेंटर असतं त्यामुळे गाडी घेऊन कुठे बाहेर गेलात काही लफडा झालाच तर दुरूस्तीचा पण फार त्रास नाही. बाईक घेण्या अगोदर www.xbhp.com ही साईट पहा. थोडी किचकट आहे, पण होमपेज वर Talkies टॅबवर क्लिकून आत जा, आणि What Bike? या भागातले ब्लॉग्स वाचा. वेळखाऊ काम आहे, पण या साईटवर प्रचंड बाईकसॅव्ही पब्लिक आहे त्यामुळे त्यांच्या लिखाणावर बिंधास भरवसा ठेवा.