✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

गणपतीला जानवे कोणी घातले ?

श
शरद यांनी
गुरुवार, 03/14/2013 - 13:28  ·  लेख
लेख
गणपतीला जानवे कोणी घातले ? आपण आज गणपतीच्या मूर्त्या वा चित्रे पाहिली तर आपणास असे आढळून येईल की त्याच्या गळात जानवे असते. माझा प्रश्न असा आहे की हे जानवे गणपतीच्या गळ्यांत कोणी, केंव्हा व कां घातले ? नाही, हा धागा पोरकट, थिल्लर व सनसनाटी नव्हे. मी बरा॒च प्रयत्न करून याची उत्तरे शोधावयाचा प्रयास केला आहे. मला उत्तर मिळाले नाही, येथील एखादा अभ्यासू काही सांगू शकेल या आशेने प्रश्न विचारला आहे. प्रथम हा प्रश्न उद्भवलाच कां ? ते पाहू. महाभारतातील गोष्ट आहे. एका राजा;ला वाटले की आपण यज्ञ करतो, इतरही करतात. मग आपले वैशिष्ट्य ते काय ? आपला यज्ञ इतरांहून वेगळा, एकमेवाद्वितीय, पाहिजे. त्याने शंकराची तपश्चर्या केली व तो प्रसन्न झाल्यावर त्याच्याकडे वर मागितला कीं "माझ्या यज्ञातील अध्वर्यु तू हो." शंकर म्हणाला " नाही बाबा, तो माझा अधिकारच नाही. ते जमणार नाही, पण माझा अंश असलेला दुर्वास ते काम करेल." लक्षात घ्या, शंकर सांगत आहेत, "देवांना हा अधिकारच नाही". मनुष्य, त्रैवर्णिक समाजच, मुंज, यज्ञ आदि करू शकतात. मुंजच नाही तर जानवे कुठले ? ही गोष्ट फार पुरातन झाली. इतर देवांकडे बघू. विष्णु, शंकर, विठ्ठल, तिरुपती ब्रह्मदेव, यांची चित्रे, मूर्ती पहा. जानवे नाही. मला सोळाव्या शतकांपूर्वीच्या कुठल्याही शिल्पांत, चित्रांत आढळले नाही. राम, कृष्ण हे देव, पण मानवी अवतार, त्यांना अधिकार आहे, पण तेथेही नन्नाच. अपवाद फक्त परशुरामाचा. व दत्ताचा. दोघेही ऋषीपुत्र. जानवे आढळते. तरीही कुणाला तीन-चारशे वर्षांपूर्वीची एकमुखी दत्ताची मुर्ती वा चित्र माहीत असेल तर त्यात जानवे आढळते का ते पाहून अवष्य कळवावे. मी पाहिलेल्या तीनशे वर्षांपूर्वीच्या गणपतीच्या, चित्रात, शिल्पात जानवे दिसत नाही. फार काय हल्लीच्या काळातील दक्षिणेकडील धातूशिल्पातही जानवे दिसत नाही. कोणी बन्गलुरु-चेन्नायीवासी जास्त माहिती देऊं शकेल काय? शरद .
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
71485 वाचन

💬 प्रतिसाद (146)

प्रतिक्रिया

गडबड

प्रसाद गोडबोले
गुरुवार, 03/14/2013 - 13:52 नवीन
जानवे अर्थात यज्ञोपवीत घालण्याचा अधिकार ब्राह्मण क्षत्रिय वैश्य तिघांनाही आहे ...मुंजही तिन्ही तिन्ही वर्णांकरीता आहे ( उपनयन हा १६ संस्कारांपैकी एक आहे बहुधा ) त्यामुळे रामाच्या गळ्यातही जानवे आहे कृश्णाच्याही अन अर्जुनाच्याही !! देव ह्या शब्दाच्या वापरातही गडबड आहे असे वाटते देव म्हणजे ३३ कोटि देव = ११ आदित्य + १२ रुद्र + ८ दिक्पाल + २ अश्विनीकुमार (कोटि म्हणजे प्रकार ह्या अर्थाने , तिरुपती , ब्रह्मदेव परशु राम वगैरे फार उशीरा आले आपल्या संस्कृतीत एव्हन गणपती हा उल्लेखही वेदात येत नाही असे ऐकुन आहे तिथे उल्लेख येतो ब्रह्मणस्पती असा !! शिवाय वेदांच्या सुरवातीला गणपतीचे सुक्त नसुन अग्निचे सुक्त आहे :) ) आता ही सगळीच वैदिक माणसे असल्याने जानवे घालत असणारच !! म्हणजे गणपतीच्या गळ्यात जानवे हे गणपतीनेच घातलेले असले पाहिजे मुंजीच्यावेळी ( अर्थात मला आमंत्रण आले नव्हते त्यामुळे मी प्रत्यक्ष पाहिले नाहीये , हा आपला अंदाज आहे )
  • Log in or register to post comments

>>>आता ही सगळीच वैदिक माणसे

नाना चेंगट
Fri, 03/15/2013 - 09:05 नवीन
>>>आता ही सगळीच वैदिक माणसे असल्याने जानवे घालत असणारच !! असहमत. बाकी चालू द्या
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले

आपले मत काय आहे

प्रसाद गोडबोले
Fri, 03/15/2013 - 12:56 नवीन
आपले मत काय आहे हे जाणुन घ्यायला आवडेल
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाना चेंगट

तुम्हाला काय कैपण आवडेल !

शिल्पा ब
Fri, 03/15/2013 - 13:23 नवीन
तुम्हाला काय कैपण आवडेल !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले

तुमच्या आवडीबद्दल आदर आहे.

नाना चेंगट
Fri, 03/15/2013 - 23:11 नवीन
तुमच्या आवडीबद्दल आदर आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले

मक्तेदारी

प्रकाश घाटपांडे
Fri, 03/15/2013 - 12:37 नवीन
जानवे अर्थात यज्ञोपवीत घालण्याचा अधिकार ब्राह्मण क्षत्रिय वैश्य तिघांनाही आहे
बर्‍याच लोकांचा असा समज आहे की ही मक्तेदारी सुरवातीपासून फक्त ब्राह्मणांचीच आहे. असो जानवी तोडा देश जोडा अभियान चालू राहू द्यात
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले

गणपतीच्या जुन्या कुठल्याही

प्रचेतस
गुरुवार, 03/14/2013 - 14:03 नवीन
गणपतीच्या जुन्या कुठल्याही शिल्पांमध्ये जानवे आढळत नाही हे खरेच. वेरूळच्या कैलास लेणीत सप्तमातृकांसह असलेल्या गणेशाच्या मूर्तीत जानव्याऐवजी गळ्यात चक्क नाग दाखवला आहे. माझ्या मते गणेशाला जानवे घालायची पद्धत त्याच्या पार्थिव मूर्तींपासून सुरु झाली असावी (बहुधा पेशवेकाळात). गणेश ही विद्येची देवता असल्याने आणि पेशव्यांचे मुख्य दैवत असल्याने साहजिकच त्याला ब्राह्मण मानणे सुरु झाले असावे.
  • Log in or register to post comments

हा धागा काढल्याबद्दल धन्यवाद.

किसन शिंदे
Fri, 03/15/2013 - 03:48 नवीन
हा धागा काढल्याबद्दल धन्यवाद. या विषयावरील माहिती जाणून घ्यायची खुप इच्छा होती ती या धाग्याच्या निमित्ताने पुर्ण होईलशी दिसतेय. माझ्याही काही प्रश्नांची इथे उत्तरे मिळतील अशी अपेक्षा आहे. महाराष्ट्रात प्रसिध्द असणारी अष्टविनायक देवस्थानं असं म्हणतात फार प्राचीन काळापासून आहेत. पुरातन म्हणजे नेमकी किती जुनी आहेत? कारण शिवकाल किंवा त्यापुर्वीच्या काळात यांपैकी एकाही देवस्थानाचा उल्लेख येत नाही. मग हि देवस्थानं नेमकी कधी अस्तित्वात आली असावीत?
  • Log in or register to post comments

बहुतेक सर्वच अष्टविनायक

प्रचेतस
Fri, 03/15/2013 - 08:40 नवीन
बहुतेक सर्वच अष्टविनायक मंदिरे ही पेशवेकाळात बांधली गेलेली आहेत. त्यापैकी काही मंदिरे पूर्वी अगदी लहानशा स्वरूपात अस्तित्वात असतीलही. शिवकालात अष्टविनायकांचा उल्लेख माझ्या माहितीत तरी आलेला नाही. चिंचवडच्या देवस्थानाचे मात्र उल्लेख आहेत. मोरगावचा पुसटसा उल्लेख वाचलेला आठवतोय पण नक्की नाही. अष्टविनायकांपैकी एक तर लेण्याद्रीचा बौद्ध विहारच होता. शिवकाळाच्या सुमारास तेथे असलेल्या उठावातल्या अर्धस्तूपाला गणेश समजणे सुरु झाले असावे. मोरगावचे मयुरेश्वर मंदिर तर पूर्वीचे शिवमंदिर असावे असे तिथे असलेल्या काही पुरातन अवशेषांवरून वाटते. मंदिराच्या पुढ्यातच भग्नावस्थेतील एक नंदी आहे. तर मंदिराच्या काही खांबांवर शिलाहार्/यादवकालीन नाग प्रतिमा कोरलेल्या आहेत. इस्लामी आक्रमणानंतर पूर्णतया भग झालेल्या शिवमंदिराचा नंतर जीर्णोद्धार करून ते गणेश मंदिरात रूपांतरीत झाले असावे असा माझा अंदाज.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: किसन शिंदे

शिवकालात अष्टविनायकांचा

मालोजीराव
Tue, 04/02/2013 - 12:26 नवीन
शिवकालात अष्टविनायकांचा उल्लेख माझ्या माहितीत तरी आलेला नाही. चिंचवडच्या देवस्थानाचे मात्र उल्लेख आहेत. मोरगावचा पुसटसा उल्लेख वाचलेला आठवतोय पण नक्की नाही.
बादशहा हुमायून,संत तुकाराम महाराज, छत्रपति शिवाजी महाराज ,संभाजी महाराज,महाराणी येसूबाई साहेब यांचा मोरगाव देवस्थानाशी थेट संबंध आला होता व त्यांनी या देवस्थानाला भेट दिल्याचे वाचनात आल्याचे आठवल्या गेले आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

बाकी ठीक पण हुमायून इतक्या

बॅटमॅन
Tue, 04/02/2013 - 12:32 नवीन
बाकी ठीक पण हुमायून इतक्या दक्षिणेत आला होता का कधी? साशंक आहे. विकीवर पाहिले असता तो गुजरातपर्यंत आल्याचे दिसते, त्याच्या दक्षिणेस आला असेल असे वाटत नै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मालोजीराव

विकीवर पाहिले असता

मालोजीराव
Tue, 04/02/2013 - 12:42 नवीन
विकीवर पाहिले असता
अरे वाल्गुदेया विकिला तुझ्यासारख्या प्रतिभावंत लेखकांची गरज आहे…वल्लीला मी या पूर्वी सातवाहन इतिहास विकीवर लिहिण्याची रिक्वेस्ट केलेली पण त्यांनी मिपाशिवाय दुसरीकडे लिहिणार नाही म्हणत ती फाट्यावर मारली. विकी मधल्या अर्धवट माहित्या आमच्यासारख्या आळशी लेखकांनी टाकल्यात…टंकायचा कंटाळा आला म्हणून आहे तसा लेख सेव्ह करतो मी :P
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

बास का मालोजीराव, लाजवता का

बॅटमॅन
Tue, 04/02/2013 - 12:44 नवीन
बास का मालोजीराव, लाजवता का :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मालोजीराव

(No subject)

प्रचेतस
Tue, 04/02/2013 - 12:47 नवीन
=))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

वल्लीला मी या पूर्वी सातवाहन

विश्वनाथ मेहेंदळे
Wed, 04/03/2013 - 01:35 नवीन
वल्लीला मी या पूर्वी सातवाहन इतिहास विकीवर लिहिण्याची रिक्वेस्ट केलेली पण त्यांनी मिपाशिवाय दुसरीकडे लिहिणार नाही म्हणत ती फाट्यावर मारली.
हे बघा, मिपा हे वल्लीचे पहिले प्रेम आहे. विकिवर लिहून व्यभिचार करणाऱ्यातला तो नाही. मिपावरच्या प्रेमात बाधा येऊ नये म्हणून तो लग्नही करणार नाही असे त्याने बुवांना सांगितल्याचे किसनने स्पाला सांगताना सूडने ऐकले आहे असे मोदक म्हणत होता.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मालोजीराव

बाधा?

अभ्या..
Wed, 04/03/2013 - 01:42 नवीन
=)) =)) =))
मिपावरच्या प्रेमात बाधा येऊ नये
का मिपावरच्यांच्या? ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विश्वनाथ मेहेंदळे

हे बघा, मिपा हे वल्लीचे पहिले

अत्रुप्त आत्मा
Wed, 04/03/2013 - 08:25 नवीन
हे बघा, मिपा हे वल्लीचे पहिले प्रेम आहे. विकिवर लिहून व्यभिचार करणाऱ्यातला तो नाही. मिपावरच्या प्रेमात बाधा येऊ नये म्हणून तो लग्नही करणार नाही असे त्याने बुवांना सांगितल्याचे किसनने स्पाला सांगताना सूडने ऐकले आहे असे मोदक म्हणत होता.>>> ___/\___ ___/\___ ___/\___ Image removed.Image removed.Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विश्वनाथ मेहेंदळे

माझ्याकडे या सुसंवादाचं

५० फक्त
Fri, 04/05/2013 - 08:24 नवीन
माझ्याकडे या सुसंवादाचं रेकॉर्डिंग आहे, कुणाला हवे असल्यास व्यनि करा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

णीषेढ !

डॉ सुहास म्हात्रे
गुरुवार, 04/04/2013 - 20:31 नवीन
मिपावरच्या प्रेमात बाधा येऊ नये म्हणून... मलाही तशी आकाशवाणी ऐकू आली आहे हे न सांगितल्याबद्दल टीव्र णीषेढ !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विश्वनाथ मेहेंदळे

बादशहा हुमायून,

प्रचेतस
Tue, 04/02/2013 - 12:36 नवीन
बादशहा हुमायून,
कसं शक्यय? त्याचं आयुष्य बरचसं पळ काढण्यातच गेलं आणि इकडे दक्षिणेत त्यावेळी बहमनी सत्ता होती. किंवा आदिलशाही/निजामशाहीचे सुरुवातीचे दिवस. मग हुमायूनचा संबंध कसा काय पोहोचतो? त्याचे आक्रमण इकडे झाल्याचे ऐकिवात नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मालोजीराव

हुमायून च्या सनदांवर आधारित

मालोजीराव
Tue, 04/02/2013 - 12:47 नवीन
हुमायून च्या सनदांवर आधारित एक कागदपत्रांचा संग्रह मार्टिन ने प्रकाशित केला होता,त्यात साहेब मोरया गोसावींना भेटल्याचे सांगितले आहे.भारत इतिहास संशोधक मंडळ येथे धुंडळावे, सध्या पुस्तिक हातात नाय त्यामुळ खात्री नाय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

बघायला पायजेल मग.

प्रचेतस
Tue, 04/02/2013 - 12:50 नवीन
बघायला पायजेल मग.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मालोजीराव

विंट्रेष्टिंग!!!! हे प्रकरण

बॅटमॅन
Tue, 04/02/2013 - 12:54 नवीन
विंट्रेष्टिंग!!!! हे प्रकरण पाहिले पाहिजे आता.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मालोजीराव

मालोजी राव एक सान्गा

लॉरी टांगटूंगकर
Tue, 04/02/2013 - 14:11 नवीन
१५३०- राज्यरोहण, १५३१- महमूद लोदिचा पराभव. १५३२- शेरखानाचे बंड १५३४- बहादूरशहा चं मॅट्रर -त्याच्या मागे हा मांडवगड ( मध्येप्रदेश) पर्यंत आलेला दिसतो.१५३४-३५ गुजरात स्वारी-साहेब गुजरात कडे गेल्यावर शेरखानने परत लोचे केले, अन् उत्तरेत सत्ता मिळवली. त्याचं अन् हुमायूनचे मॅटर 1540 पर्यंत वाजत राहिले ( मंजे तो उत्तरेतच होता). मग शेरशहा नंतर सलीमशहा सूरने अन् सिकंदर शहा सूर यांनी राज्य पहिले. थोडक्यात १५४० ते ५३ हुमायून भटकत होता. या काळात मदत मागायला तो कंदाहार अन् कबुल कडे गेलेला (१५४५ ते ५१ कडे तो तिकडे होता असे दिसतंय.) सुरी घराण्याचे लोचे सुरु झाल्यावर तो कबुल कडून बहराम खान अन् अकबर बरोबर भारतात आला १५५५ मध्ये दिल्ली परत मिळवली.१५५६ मध्ये गचकला. हे ढोबळ चित्र आहे, तो साधारण कधी आला हे सांगितलं तर हुमायूननाम्या मध्ये बघता येईल. आज रिक्कामा बसलोय म्हणून  :ड
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मालोजीराव

तो साधारण कधी आला हे सांगितलं

मालोजीराव
Tue, 04/02/2013 - 14:58 नवीन
तो साधारण कधी आला हे सांगितलं तर हुमायूननाम्या मध्ये बघता येईल
नाही सांगता येणार, वर वल्लीला दिलेल्या प्रतिसादातील रेफ़रन्स तपासा…माझ्याकडे ते पुस्तक नसल्याने तपासून सांगू शकत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: लॉरी टांगटूंगकर

असेच जेजुरीचा खंडोबा

lakhu risbud
Fri, 03/15/2013 - 18:32 नवीन
जेजुरीचा खंडोबा ची माहिती तेथील पुजार्यांना विचारली त्यांनी नक्की कालखंड माहित नाही पण श्रीकृष्णा ने त्याचे कुलोपचार जेजुरी येथे येउन केल्याचे सांगितले (म्हणजे अंदाजे साधारण इ. स. पूर्व ४ ते ५ हजार वर्षांपूर्वी ). मल्हारी मार्तंड म्हणजे शिवाचाच एक अवतार असून म्हाळसा म्हणजे पार्वती व बाणाई म्हणजे गंगा या रुपात शंकर कैलास पर्वतानंतर भारतात फक्त जेजुरी इथेच आहेत अशी माहिती सांगितली याच्या बद्दल अधिक माहिती कोणाकडे असल्यास जाणून घेण्यास आवडेल
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: किसन शिंदे

शिर्षक वाचल्या बरोअबर जोरात

स्पंदना
Fri, 03/15/2013 - 06:43 नवीन
शिर्षक वाचल्या बरोअबर जोरात मान हलवुन "मी न्हाय" " तुमी घातलं का?" अस फार विचारावस वाटलं. कित्ती वेळ टाळला मोह हा प्रतिसाद टाकायचा पण मग खरच रहावलं नाही.
  • Log in or register to post comments

"मी न्हाय" " तुमी घातलं का?"

किसन शिंदे
Fri, 03/15/2013 - 07:09 नवीन
"मी न्हाय" " तुमी घातलं का?" अस फार विचारावस वाटलं.
=)) वर वल्ल्या म्हणतो ना तसं ते शनवार वाड्यातल्या लोकांनीच घातलं असावं. :D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पंदना

काय घातलं असावं?

नाना चेंगट
Fri, 03/15/2013 - 09:01 नवीन
काय घातलं असावं?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: किसन शिंदे

सर...

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Fri, 03/15/2013 - 07:44 नवीन
सर, गणपती हा अगदी अलिकडचा म्हणजे हजार-बाराशेवर्षापूर्वीचा हे आपल्याला माहितीच असेल. तिस-या चौथ्या शतकापर्यंत गणपतीचं महती काही वाढलेली नव्हती, हे डॉ.भांडारकरांचं मत पाहिल्यावर आणि लेण्यात सापडलेल्या मूर्तीवरुन हजार-बाराशे वर्षापूर्वीच्या गणपतीला उपासनेनिमित्त, पूजे-अर्चेनिमित्त जितकं त्याला विधिवत करता येईल तितकं करण्याचा प्रयत्न झाला असावा, आता ते कोणी केलं हेही तुम्हाला ठाऊकच आहे. :) -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

>>>आता ते कोणी केलं हेही

नाना चेंगट
Fri, 03/15/2013 - 09:02 नवीन
>>>आता ते कोणी केलं हेही तुम्हाला ठाऊकच आहे सहमत आहे. महा बदमाश मंडळी हो ती... गणपती असतो का हो तुमच्या घरी? नाही ना ! सुटलात !! उगा कशाला गतकालाचे ओझे वागवायचे खांद्यावर नाही का ! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

षोडोषोपचार

प्रशु
Fri, 03/15/2013 - 07:55 नवीन
मुर्ती ला स्वत:चे जानवे नसते. षोडोषोपचार पुजेमधला एक संस्कार जानवे (मुर्तीला) धारण करणे असतो. त्यामुळे ते पुजाविधि करताना घालण्यात येते. आणि गणपतीचे म्हणाल तर त्याचे एक नाव आहे. नागयज्ञोपवित, म्हणजे नागालाच यज्ञोपवित म्हणुन धारण करणारा.
  • Log in or register to post comments

काय फरक पडतो काका? कोणी का

Dhananjay Borgaonkar
Fri, 03/15/2013 - 08:55 नवीन
काय फरक पडतो काका? कोणी का घातले असेना? आता गणपतीची मुंज झाली होती की नव्ह्ती? कोण कोण गेलं होतं? या प्रश्णाने असा किती मोठा फरक पडणारे? प्रशु म्हणतात तसं तो एक षोडोषोपचार पुजेमधला एक संस्कार/भाग असावा.
  • Log in or register to post comments

जेवणावळीचा मेन्यु काय होता

नाना चेंगट
Fri, 03/15/2013 - 09:03 नवीन
जेवणावळीचा मेन्यु काय होता आणि किती पान पंगत झाली हे प्रश्न राहिले ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Dhananjay Borgaonkar

पता करो दया इस कारस्थान के

Dhananjay Borgaonkar
Fri, 03/15/2013 - 09:07 नवीन
:D :D पता करो दया इस कारस्थान के पिछे किसका हाथ है.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाना चेंगट

अच्छा आता गणपतीच्या

नाना चेंगट
Fri, 03/15/2013 - 09:00 नवीन
अच्छा आता गणपतीच्या जानव्यावरुन भारतीय लोकांनी गणपतीची पूजा अजिबात करु नये असे ब्रिगेडी फर्मान निघणार तर लवकरच ! एकदाचे गणपतीचे जानवे बुडवून टाका बरं अरबी समुद्रात आणि ब्राह्मणांना हाकलून द्या देशाबाहेर. जानवे तोडा देश जोडा !
  • Log in or register to post comments

सहमत आहे.

परिकथेतील राजकुमार
Tue, 04/02/2013 - 14:49 नवीन
फालतुपणा आहे हा सगळा. उगाच असले काहीतरी प्रश्न विचारायचे, वाद उपस्थीत करायचे आणि बामणांचे गोडवे गाऊन घ्यायचे. जोवर हा देश नि:बामण होत नाही, तोवर ह्याला भाग्योदय नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाना चेंगट

+१

अर्धवटराव
Wed, 04/03/2013 - 01:41 नवीन
ह्याला म्हणजे कोणाला रे परा? नान्याला? अर्धवटराव
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

नको ती सव्य-अपसव्य

तर्री
Fri, 03/15/2013 - 10:43 नवीन
गणपतीला जानवे घालणे कायद्याने थांबवा. जानवे हे अहंकाराचे लक्षण आहे तेंव्हा हया साठी आंदोलन करायला हवे.
  • Log in or register to post comments

?

प्रसाद गोडबोले
Fri, 03/15/2013 - 12:59 नवीन
हे उपरोधिक लिहिलय का ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्री

छे हो! ईथे सगळे लोक अतिशय

शैलेन्द्र
Fri, 03/15/2013 - 14:48 नवीन
छे हो! ईथे सगळे लोक अतिशय गंभिर्पणे प्रतिसाद देतायेत..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले

अवांतर-इथे कोणी Chariots of

पिंपातला उंदीर
Fri, 03/15/2013 - 10:45 नवीन
अवांतर-इथे कोणी Chariots of gods हे पुस्तक वाचले आहे का? त्यात आपण ज्याना देव मानतो ते दुसर्या ग्रहावरून आलेले अंतराळवीर होते अशी भन्नाट थियरी अनेक पटणारी उदाहर्न देऊन मांडली आहेत. त्यामध्ये अनेक हिंदू देवता आणि गणपती चा उल्लेख पण उदाहर्न म्हणून दिला आहे.
  • Log in or register to post comments

मी वाचले आहे...शक्यता नाकारता

टवाळ कार्टा
Sat, 03/16/2013 - 00:04 नवीन
मी वाचले आहे...शक्यता नाकारता येत नाही
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिंपातला उंदीर

या पुस्तकाचं माहित नाही...

दादा कोंडके
Sat, 03/16/2013 - 00:50 नवीन
पण गणपती आणि डेस्कट्वाप संगणक यांच्यातली साम्यस्थळे दाखवणारे अनेक लेख वाचले होते. विद्येची देवता: संगणक कानः दोन स्पिकर्स मोठ्ठं डोकं: म्वानिटर हाईट म्हणजे सारखे पणात दोघांच्यासमोर उंदीर असतो म्हणे. दुर्दैवानी ट्याब वगैरे आल्यावर त्यांना कै सुचलं नाही. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिंपातला उंदीर

बरीच गंमत जंमत चालू आहे!

पैसा
Fri, 03/15/2013 - 11:30 नवीन
बरीच गंमत जंमत चालू आहे! पण मला वाटते की 'ब्रह्मणस्पति' या नावामुळे गणपती हा ब्राह्मण आहे असं मानलं गेलं असावं. अगदी खेड्यातले लोक अजून गणपती हा ब्राह्मण आहे आणि पार्थिव मूर्तीची पूजा ब्राह्मणाच्या हातूनच झाली पाहिजे असं मानतात. भटजी बिझी असल्यामुळे पूजा, नैवेद्य, घरातल्या लोकांची जेवणं संध्याकाळी उशीरा झाल्याचं अनेकवेळा पाहिलं आहे. अध्ययन अध्यापन हा ब्राह्मणांचा व्यवसाय मानला गेल्यामुळे विद्येचा देव गणेश ब्राह्मण मानला गेला असावा. गणपतीला जानवे कोणी घातले या प्रश्नाचे उत्तर शोधताना यज्ञोपवीत म्हणजे जानवे का धारण केले जाते याचे उत्तर शोधले तर जरा जास्त माहिती मिळेल.
  • Log in or register to post comments

गणानां त्वां गणपतिं हवामहे

धन्या
Fri, 03/15/2013 - 12:41 नवीन
गणानां त्वां गणपतिं हवामहे कवी कविनामुपश्रवस्तमम | ज्येष्ठराजं ब्रम्हणा ब्रम्हणस्पते आ नः शृण्वन्नूतिभि: सीद सादनम || (दोन्ही ओळींमधल्या शेवटच्या म चे पाय मोडलेले आहेत.) ऋग्वेदाच्या दुसर्‍या मंडलातील तेविसाव्या सुक्तातील पहिला मंत्र हा. गणेशपुजनात हा श्लोक आवर्जून वापरला जातो कारण त्यात "गणपतिं' शब्द आहे. हा श्लोक आपण पुजतो त्या गणपतीबद्दल नसून तो बृहस्पतीबद्दल आहे. संस्कृतचे जाणकार यावर उजेड पाडतीलच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

तेच ते

प्रसाद गोडबोले
Fri, 03/15/2013 - 13:03 नवीन
गणपति = ब्रह्मणस्पति !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धन्या

कुणीतरी गणपतीचा बाईट घ्या रे,

कवितानागेश
Fri, 03/15/2013 - 11:33 नवीन
कुणीतरी गणपतीचा बाईट घ्या रे, " कौन है वो जिसने आपको ये जानवा घाल्या? क्या लगता हय आपको इस जानवेके बारेमे?बताईये, ये कब हुवा और क्यूं?? क्या इअसके पिछे किसीकी चाल हय? आप अनार्य होकरभी आपको ये जानवा पहनाया है, क्या इसमे किसीका फायदा है? आपको किसीने डराया तो नहीं? क्या आपने जानवा पहननेकेलिये रिश्वत ली है?...." अवांतरः शिवाय वेदांच्या सुरवातीला गणपतीचे सुक्त नसुन अग्निचे सुक्त आहे> वेदांची सुरुवात लिहिणारा मनुष्य पारशी असावा का अशी एक शंका मनाला चाटून गेली! ;) अतिअवांतरः जानवें नक्की कशासाठी घालतात? नाग कशासाठी घालतात? फुले कशासाठी वाहतात?...... . . . . कुंकू कशासाठी लावतात?
  • Log in or register to post comments

बाईट म्हंजे

सूड
Fri, 03/15/2013 - 11:51 नवीन
चावा ना गं माऊ ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कवितानागेश

वेदांची सुरुवात लिहिणारा

आदूबाळ
Fri, 03/15/2013 - 11:56 नवीन
वेदांची सुरुवात लिहिणारा मनुष्य पारशी असावा का अशी एक शंका मनाला चाटून गेली!
वैदिक लोक पारशांचे शत्रू होते म्हणे. वेदांत असुर व्हिलन आहे आणि पारशांच्या देवाचं नाव "अहुरा" (असुर) आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कवितानागेश
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा