✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

गणपतीला जानवे कोणी घातले ?

श
शरद यांनी
गुरुवार, 03/14/2013 - 13:28  ·  लेख
लेख
गणपतीला जानवे कोणी घातले ? आपण आज गणपतीच्या मूर्त्या वा चित्रे पाहिली तर आपणास असे आढळून येईल की त्याच्या गळात जानवे असते. माझा प्रश्न असा आहे की हे जानवे गणपतीच्या गळ्यांत कोणी, केंव्हा व कां घातले ? नाही, हा धागा पोरकट, थिल्लर व सनसनाटी नव्हे. मी बरा॒च प्रयत्न करून याची उत्तरे शोधावयाचा प्रयास केला आहे. मला उत्तर मिळाले नाही, येथील एखादा अभ्यासू काही सांगू शकेल या आशेने प्रश्न विचारला आहे. प्रथम हा प्रश्न उद्भवलाच कां ? ते पाहू. महाभारतातील गोष्ट आहे. एका राजा;ला वाटले की आपण यज्ञ करतो, इतरही करतात. मग आपले वैशिष्ट्य ते काय ? आपला यज्ञ इतरांहून वेगळा, एकमेवाद्वितीय, पाहिजे. त्याने शंकराची तपश्चर्या केली व तो प्रसन्न झाल्यावर त्याच्याकडे वर मागितला कीं "माझ्या यज्ञातील अध्वर्यु तू हो." शंकर म्हणाला " नाही बाबा, तो माझा अधिकारच नाही. ते जमणार नाही, पण माझा अंश असलेला दुर्वास ते काम करेल." लक्षात घ्या, शंकर सांगत आहेत, "देवांना हा अधिकारच नाही". मनुष्य, त्रैवर्णिक समाजच, मुंज, यज्ञ आदि करू शकतात. मुंजच नाही तर जानवे कुठले ? ही गोष्ट फार पुरातन झाली. इतर देवांकडे बघू. विष्णु, शंकर, विठ्ठल, तिरुपती ब्रह्मदेव, यांची चित्रे, मूर्ती पहा. जानवे नाही. मला सोळाव्या शतकांपूर्वीच्या कुठल्याही शिल्पांत, चित्रांत आढळले नाही. राम, कृष्ण हे देव, पण मानवी अवतार, त्यांना अधिकार आहे, पण तेथेही नन्नाच. अपवाद फक्त परशुरामाचा. व दत्ताचा. दोघेही ऋषीपुत्र. जानवे आढळते. तरीही कुणाला तीन-चारशे वर्षांपूर्वीची एकमुखी दत्ताची मुर्ती वा चित्र माहीत असेल तर त्यात जानवे आढळते का ते पाहून अवष्य कळवावे. मी पाहिलेल्या तीनशे वर्षांपूर्वीच्या गणपतीच्या, चित्रात, शिल्पात जानवे दिसत नाही. फार काय हल्लीच्या काळातील दक्षिणेकडील धातूशिल्पातही जानवे दिसत नाही. कोणी बन्गलुरु-चेन्नायीवासी जास्त माहिती देऊं शकेल काय? शरद .
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
71485 वाचन

💬 प्रतिसाद (146)

प्रतिक्रिया

वेदांमध्ये व्हिलन्स?

कवितानागेश
Fri, 03/15/2013 - 13:02 नवीन
वेदांमध्ये व्हिलन्स? :D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदूबाळ

असेल पण...

गब्रिएल
Fri, 03/15/2013 - 13:19 नवीन
मला तर वाटायचं जरासे पलिकडचे प्राचीन सिरियन लोक असुर असावे... सद्द्या त्या देशाचे अरबीमध्ये नाव "अस्सुरीया" असे आहे :). आणि आता तिथे काय चाललय यावरून तर पूर्ण विश्वास बसत चालला होता.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदूबाळ

आयला अहूरा म्हणजे मला स्टार

मराठे
Fri, 03/15/2013 - 23:30 नवीन
आयला अहूरा म्हणजे मला स्टार ट्रेक मध्ये कानाला कडबोळं लाऊन बसलेली कृष्णवर्णी बाई एवढंच माहित होतं!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदूबाळ

शक्य आहे !!

प्रसाद गोडबोले
Fri, 03/15/2013 - 12:54 नवीन
अवांतरः शिवाय वेदांच्या सुरवातीला गणपतीचे सुक्त नसुन अग्निचे सुक्त आहे> वेदांची सुरुवात लिहिणारा मनुष्य पारशी असावा का अशी एक शंका मनाला चाटून गेली! >> ऋगवेदाचे झेंद अवेस्ताशी बरेचसे सार्धर्म्य आहे. वैदिक लोक सगळेच काही भारतात आले नसणार ...काही जण मधेच स्थिरावले असणार . पारशी लोकांमध्येही अग्निची उपासना होते ...शिवाय त्यांच्या बर्‍याचश्या मंत्रांचे संस्कृतशी सार्धर्म्य आहे ... (उदा. "उश्ता ते " तुझा उधार होवो तुला आनंद मिळो" ह्या अर्थाने . आता ह्याचे मला उषतः(क्रियापद) ते ( षष्ठी ) अशी विभक्ती दिसत आहे ....तात्पर्य बरेच सार्धर्म आहे !!)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कवितानागेश

माताय,

सूड
Fri, 03/15/2013 - 13:42 नवीन
>>" तुझा उधार होवो तुला आनंद मिळो" उधार मिळालं म्हणून आनंद होण्यात कसलं आलंय सुख, गिर्जाकाकूंचं आपलं काहीतरीच!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले

ख्याख्या!

पैसा
Fri, 03/15/2013 - 14:13 नवीन
मी पण त्यावर २ मिनिटे विचार केला. आणि गोंधळले. मग ते "उद्धार" आहे असं लक्षात आलं. - पैसाकाकू
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

इइइइइइइ माऊच्या मनाला कायपण

जेनी...
Fri, 03/15/2013 - 23:40 नवीन
इइइइइइइ माऊच्या मनाला कायपण चाटुन जातं बै :-/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कवितानागेश

हो ना... काय करु गं?

कवितानागेश
Fri, 03/15/2013 - 23:45 नवीन
हो ना... काय करु गं? मन चिकट झालं अगदी. गणपतीला साकडं घालू का जानव्याबरोबर? :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेनी...

गणपतीचा शोध

प्रकाश घाटपांडे
Fri, 03/15/2013 - 12:30 नवीन
इथल्या मंडळींनी ऐसी अक्षरे वरील तर्कतीर्थांचा गणपतीचा शोध हा धागा वाचलेला दिसत नाही. ब्राह्मण मंडळींपैकी किती लोक कायमस्वरुपी जानवे घालतात? किती लोक 'शास्त्रापुरते' जानवे घालतात हा शोध घेणे रोचक ठरावे. असो......
  • Log in or register to post comments

"राम, कृष्ण हे देव, पण मानवी

श्रीगुरुजी
Fri, 03/15/2013 - 12:34 नवीन
"राम, कृष्ण हे देव, पण मानवी अवतार, त्यांना अधिकार आहे, पण तेथेही नन्नाच." माझ्या घरी एका तसबिरीत श्रीराम, लक्ष्मण व जानकी उभे असून त्याच्या पुढ्यात श्रीहनुमान एका गुडघ्यावर बसलेले आहेत. हे खूप प्रसिद्ध चित्र आहे व ते अनेक मंदीरातून, घराघरातून दिसते. या चित्रात श्रीराम व लक्ष्मण यांच्या गळ्यात जानवे आहे.
  • Log in or register to post comments

ते चित्र बहुधा राजा

प्रचेतस
Fri, 03/15/2013 - 12:41 नवीन
ते चित्र बहुधा राजा रविवर्म्याने काढलेले असावे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

दिवेआगरच्या चोरीच्या बाबतीत

धन्या
Fri, 03/15/2013 - 12:55 नवीन
दिवेआगरच्या चोरीच्या बाबतीत गणपतीने काय केलं हे कुणी सांगेल का?
  • Log in or register to post comments

त्या चोरांना पकडून दिलं की

प्रचेतस
Fri, 03/15/2013 - 12:57 नवीन
त्या चोरांना पकडून दिलं की राव गणपतीबाप्पानेच. असं काय करता?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धन्या

ते तर पोलिसांनी सापळा लावून

धन्या
Fri, 03/15/2013 - 13:06 नवीन
ते तर पोलिसांनी सापळा लावून पकडले की राव. माझा प्रश्न असा आहे की, चोरांनी दिवेआगरच्या मंदिरात जावून तिथला गणपतीचा सोन्याचा मुखवटा पळवून आणला. हे करताना त्यांची दोन म्हातार्‍या सुरक्षारक्षकांशी झटापटी झाली. एका सुरक्षारक्षकाला त्या झटापटीत आपले प्राण गमवावे लागले. चोरांनी तो सोन्याचा मुखवटा अहमदनगरला आणून चक्क वितळवला. हे सगळं होईपर्यंत गणपती बाप्पा काय करत होते? चोरांना पकडून देण्यापेक्षा बुद्धीदात्या गणरायाने चोरांनाच चोरी न करण्याची सद्बुद्धी का दिली नाही? ना त्या सुरक्षारक्षकाला आपला जीव गमवावा लागला असता, ना स्वतःला वितळवून घ्यावे लागले असते, ना दिवेआगरकरांचा तेजीत चाललेला पर्यटनाचा व्यवसाय बुडाला असता.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

सापळा लावायची बुद्धी

प्रचेतस
Fri, 03/15/2013 - 13:16 नवीन
सापळा लावायची बुद्धी बाप्पानेच दिली की राव. ;) असो, जोक्स अपार्ट, तो मुखवटा लै सुंदर होता. सोन्याच्या मूल्यापेक्षाही तो ऐतिहासिकदृष्ट्या अमूल्य होता. कुठल्यातरी शिलाहार राजाने तो बनवून घेतला होता. साधारण १० व्या/११ व्या शतकात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धन्या

मुखवटा सुंदर होता यात वादच

धन्या
Fri, 03/15/2013 - 13:26 नवीन
मुखवटा सुंदर होता यात वादच नाही. त्या सोन्याची झळाली चित्तवेधक होती.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

गणपती बाप्पा काय करत होते?

प्रसाद गोडबोले
Fri, 03/15/2013 - 13:16 नवीन
बाप्पा काहीच करत नसतो हो ... तो ह्या सगळ्या भौतिक विश्वाच्या परे आहे ... मुखवटा सोन्याचा की मेणाचा की शेणाचा ....वितळवला की जाळला ....त्याला कसला फरक पडतोय ? तो सर्वातुन अलिप्त आहे ... मनाचे श्लोक पहा ना पहिल्याच श्लोकात बाप्पाला " मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा " असं म्हणलय .... आता जिथुन निर्गुण आरंभते तिथे कसले आलेत हे भौतिक प्रसंग ... ह्या मुर्ती बिर्ती ज्या आहेत त्या आपण आपल्या अंडर्स्टॅन्डिंग साठी बनवलेली साधने आहेत ... नातुडे मुख्य परमात्मा | म्हणोनि करावी लागे प्रतिमा || || मोरया ||
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धन्या

थोडा वेळ मुखवटयाचं वितळवणं

धन्या
Fri, 03/15/2013 - 13:22 नवीन
थोडा वेळ मुखवटयाचं वितळवणं आपण बाजूला ठेवूया. चोरांशी झटापट करताना एका सुरक्षारक्षकाचा मृत्यू झाला आणि दुसरा सुरक्षारक्षक जायबंदी झाला. त्याबद्दल आपलं काय म्हणणं आहे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले

वाईट आहे म्हणुन चांगुलपणाला

शिल्पा ब
Fri, 03/15/2013 - 13:30 नवीन
वाईट आहे म्हणुन चांगुलपणाला किंमत आहे असं काहीसं कुठेसं ऐकलं होतं बॉ !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धन्या

अरे बापरे...

धन्या
Fri, 03/15/2013 - 13:34 नवीन
म्हणजे आपल्याला दिवसाची किंमत कळावी म्हणून बारा तासांनी तात्र होते तर. ;) असो. पण मला गिरिजाकाकूंकडून उत्तर हवंय.
बाप्पा काहीच करत नसतो हो ... तो ह्या सगळ्या भौतिक विश्वाच्या परे आहे ... मुखवटा सोन्याचा की मेणाचा की शेणाचा ....वितळवला की जाळला ....त्याला कसला फरक पडतोय ? तो सर्वातुन अलिप्त आहे ...
हे सगळं मुखवटयाच्या बाबतीत ठीक आहे. त्या जीव गमावलेल्या आणि दुसर्‍या जायबंदी झालेल्या सुरक्षारक्षकांचं काय? देवबाप्पा त्याच्याही परे असतो का? कुणी का ना मरे, मी तर या सगळ्याहून परे असं काही असतं का बाप्पाचं?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शिल्पा ब

तात्र हा शब्द रात्र असा

धन्या
Fri, 03/15/2013 - 13:36 नवीन
तात्र हा शब्द रात्र असा वाचावा. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धन्या

येक्झॅक्टली

प्रसाद गोडबोले
Fri, 03/15/2013 - 14:08 नवीन
कुणी का ना मरे, मी तर या सगळ्याहून परे असं काही असतं का बाप्पाचं? >>> हो . (खालील स्वाक्षरी पहा )
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धन्या

रात्र ही वाईट असते असं कोणी

शिल्पा ब
Fri, 03/15/2013 - 23:39 नवीन
रात्र ही वाईट असते असं कोणी सांगितलं तुम्हाला? जो कोणी असेल त्याला टळटळीत उन्हात बांधुन ठेवा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धन्या

(No subject)

जेनी...
Fri, 03/15/2013 - 23:44 नवीन
=)) =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शिल्पा ब

कुणाला गणपतीच्या जानव्याचं तर

धन्या
Sat, 03/16/2013 - 13:17 नवीन
कुणाला गणपतीच्या जानव्याचं तर कुणाला रात्रीच्या वणव्याचं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेनी...

सही रे सही

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Fri, 03/15/2013 - 13:29 नवीन
ुर्ती बिर्ती ज्या आहेत त्या आपण आपल्या अंडर्स्टॅन्डिंग साठी बनवलेली साधने आहेत ... सही रे सही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले

खास तुमच्या साठी

प्रसाद गोडबोले
Mon, 04/01/2013 - 20:43 नवीन
बिरुटे सर , आत्ता दासबोध ऐकता ऐकता एक रेफरन्स सापडला हा खास तुमच्या साठी धातु पाषाण मृत्तिका | चित्रलेप काष्ठदेखा | तेथे देव कैचा मुर्खा | भ्रान्ति पडली || श्रीराम || हे आपुली कल्पना | प्राप्ता ऐसी फळे जाणा | परी त्या देवाचिय्र खुणा | वेगळ्याचि || श्रीराम || - समर्थ रामदास दासबोध दशक सहावा देवशोधन समास सहावा सृष्टीकथन ||
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

ते सगळे ठीक आहे, पण अहो ठोसर

विश्वनाथ मेहेंदळे
Wed, 04/03/2013 - 01:38 नवीन
ते सगळे ठीक आहे, पण अहो ठोसर म्हणजे शेवटी ब्राह्मणच ना..... ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले

तुकाराम वाणी चालेल?

प्यारे१
Wed, 04/03/2013 - 18:36 नवीन
तुकाराम वाणी चालेल? ;) 'केला मातीचा पशुपती' नावाचा अभंग आहे तुकाराम गाथ्या मध्ये. त्यात माती मातीत, सोने सोन्यात, दगड दगडात मिसळते/तो नि पूजा देवापाशी पोचते असे चरण आहेत. म्हणा तुकाराम महाराज की जय! अभंग वाचणं सोडणार नाही, जयजयकार करणं सोडणार नाही , सांगितलं तसं चुक्कून वागणार नाही . ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विश्वनाथ मेहेंदळे

नाही चालायचा !!

सूड
Wed, 04/03/2013 - 18:57 नवीन
तुकाराम वाणी चालेल? वाण्यांच्यात पण मुंज होते म्हणे आणि तसंही जानवं घालणारे कोणीही जानवं न घालणार्‍यांच्या दृष्टीने बामणांत मोडतात. त्यामुळे वाणी चालायचा नाही. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१

बरं मग हे पहा

प्रसाद गोडबोले
Wed, 04/03/2013 - 19:16 नवीन
देहबुद्धीवेगळें जें आकारलें । निर्गुण तें सगुणपणें उभें केलें ॥१॥ देव पहा तुम्हीं देव पहा तुम्हीं । देव पहा तुम्हीं आपुले देहीं ॥२॥ उघडाचि देवो जगीं प्रकाशला । नागव्या भक्तानें देव ग्रासिला ॥३॥ चोखा म्हणे नागवें उघडें झालें एक । सहज मीपण देख मावळलें ॥४॥ दगडामातीत देव नाही ....ती केवळ आपली भावना आहे हे प्रत्येक साधु संताने म्हणुन ठेवले आहे .. (अवांतर : ह्यालाही हरकत असेल तर शेख महंमद किंव्वा कबीर ह्यांचे साहित्य धुंडाळायला घेतो ....कसें ! =)) )
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

वेळ असेल तर ....

सूड
गुरुवार, 04/04/2013 - 19:22 नवीन
शोधा हो गिर्जाकाकूं !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले

काका आहेत ते!

प्यारे१
गुरुवार, 04/04/2013 - 19:24 नवीन
काका आहेत ते! ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

आंवयंस !!

सूड
गुरुवार, 04/04/2013 - 21:21 नवीन
आडनावभगिनीची आठवण झाली. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१

हे पहा

प्रसाद गोडबोले
Wed, 04/03/2013 - 19:04 नवीन
केला मातीचा पशुपती । परि मातीसी काय महंती । शिवपूजा शिवासी पावे । माती मातीमाजी सामावे ।।१।। तैसे पूजती आम्हा संत । पूजा घेतो भगवंत । आम्ही किंकर संतांचे दास । संतपदवी नको आम्हांस ।।२।। केला पाषाणाचा विष्णू । परी पाषाण नव्हे विष्णू । विष्णुपूजा विष्णूसी अर्पे । पाषाण राहे पाषाणरूपे ।।३।। केली कांशाची जगदंबा । परी कासें नव्हे अंबा । पूजा अंबेची अंबेला घेणे । कांसे राहे कांसेपणे ।।४।। ब्रह्मानंद पूर्णामाजी । तुका म्हणे केले कांजी । ज्याची पूजा तेणेची घेणे । आम्हा पाषाणरूप राहणे ।।५।। असो . साधु दिसती वेगळाले । परी ते स्वस्वरूपीं मिळाले । अवघे मिळोनि एकचि झाले । देहातीत वस्तु ॥ ||श्रीराम ||
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१

बाली मधील हिंदू मंदिरांत...

डॉ सुहास म्हात्रे
Fri, 03/15/2013 - 13:44 नवीन
बाली मधील हिंदू मंदिरांत (जी मुख्यतः शिवमंदिरे आहेत) गणपतीचे स्थान मंदिराबाहेरील द्वारपालाचे आहे. त्याला मंदिरात स्थान नाही... Image removed...........Image removed.
  • Log in or register to post comments

बाली भटकंतीच्या लेखमालेची वाट

प्रचेतस
Fri, 03/15/2013 - 13:47 नवीन
बाली भटकंतीच्या लेखमालेची वाट बघतोय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे

+1

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Fri, 03/15/2013 - 13:50 नवीन
+1
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

विचार आहे...

डॉ सुहास म्हात्रे
Fri, 03/15/2013 - 14:13 नवीन
बाली सहल माझ्या संस्मरणीय सहलींपैकी एक आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

.

मालोजीराव
Tue, 04/02/2013 - 12:20 नवीन
मग लवकर धागा सुरु करा कि राव !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे

सध्या जरा...

डॉ सुहास म्हात्रे
गुरुवार, 04/04/2013 - 20:37 नवीन
सध्या जरा... "रात्र थोडी, सोंगं फार" चालू आहे. पण बालीचा धागा नक्की टाकणार.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मालोजीराव

हो

पैसा
Fri, 03/15/2013 - 14:16 नवीन
तसे आपल्याकडेही मुख्य प्रवेशद्वारावर गणेशपट्टी अगदी जुन्या देवळांतूनही असते की!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे

फरक असा की...

डॉ सुहास म्हात्रे
Fri, 03/15/2013 - 14:38 नवीन
मुख्य फरक असा की बालीतील गणपतिच्या मूर्ती मंदिराच्या द्वारपालाच्या जागी दरवाज्याच्या दोन्ही बाजूला अथवा एका बाजूला गणपती व दुसर्‍या बाजूला राक्षसासारखी तामसी मुद्रा असलेली मुर्ती असते. दोघांच्याही हातात साधारण गदेसारखा सोटा असतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

अगदी जुन्या नाही.

प्रचेतस
Fri, 03/15/2013 - 15:11 नवीन
अगदी जुन्या नाही. यादवकाळापासून गणेशपट्टी कोरायला सुरुवात झाली. राष्ट्रकूट/शिलाहार/चालुक्य काळात देवी, शिवपिंड किंवा नुकतीच नक्षी प्रवेशद्वारावर कोरलेली दिसते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

तेच.

किसन शिंदे
Fri, 03/15/2013 - 14:18 नवीन
ह्याचप्रमाणे वेरूळला हिंदू लेण्यांमध्ये शंकर पार्वती सारीपाट खेळतानाचा प्रसंग जवळ जवळ ५-६ ठिकाणी कोरलेला आहे, पण त्यापैकी एकाही शिल्पात गणपती दिसत नाही पण त्याचबरोबर कार्तिकेय मात्र दिसतो! कदाचित बाप्पा त्यावेळी पाहूणचार झोडायला महाराष्ट्रात आला असावा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे

कदाचित बाप्पा त्यावेळी

धन्या
Fri, 03/15/2013 - 14:27 नवीन
कदाचित बाप्पा त्यावेळी पाहूणचार झोडायला महाराष्ट्रात आला असावा.
गणपती होता की सप्तमातृकांच्या रांगेत. बहुधा ही लेणी खोदेपर्यंत गणपती शंकराचा मुलगा झाला नसावा. शिवपरीवारात त्याला मागाहून समाविष्ट केले असावे, त्याचं महत्व वाढल्यानंतर.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: किसन शिंदे

कुंकू कशासाठी लावतात?

नेहरिन
Fri, 03/15/2013 - 14:20 नवीन
हिंदू टिळा / कुंकू का लावतात...?? उत्तर - हिंदु अध्यात्म ची खरी ओळख टिळा(तिलक) ने होते. टिळा लावल्याने समाजामध्ये मान-सन्मान ने पाहतात. हिंदु धर्मात प्रत्येक शुभ कार्यात टिळा लावणे हि प्रथा आहे. टिळा अनेक वस्तू आणि पदार्थाचे असतो. उदा. हळदी,कुंकू,केशर,भस्म आणि चंदन हे प्रमुख आहे. पण तुम्हाला माहित आहे टिळा लावण्या मागे काय भावना असते...?? पुराणामध्ये असे लिहिलेले आहे कि,संगमाच्या किनार्यावर "गंगा स्नान" केल्यानंतर साधू\पंडित द्वारे टिळा लावल्यास मोक्ष प्राप्ती होते.कपाळावर टिळा लावण्यामागे आध्यात्मिक महत्व आहे.आपल्या शरीरात सात (७) सुश्मउर्जा केंद्र आहे.जे अपार शक्ती चे भांडार आहे. यांना "चक्र" असे म्हणतात.कपाळाच्या मध्ये जिथे आपण टिळा लावतो,तिथे आज्ञाचक्र असतो. हा चक्र आपल्या शरीराचा सगळ्यात महत्वपूर्ण स्थान आहे.इथे आपल्या शरीराच्या प्रमुख तीन नाड्या १) इडा २)पिंगला आणि ३)सुष्मना येउन मिळतात म्हणून याला "त्रिवेणी" किवा "संगम" पण म्हणतात. हे गुरु स्थान आहे.इथूनच पूर्ण शरीर संचालन होते.हे आपल्या चेतनाचे मुख्य स्थान पण आहे.याला मनाचे घर पण म्हणतात.यामुळे हे स्थान पूर्ण शरीरात सगळ्यात जास्त पूजनीय आहे. योग मध्ये ध्यान करता वेळी याच ठिकाणी मन एकाग्र केले जाते.टिळा लावल्याने स्वभावात चांगले बदल घडून येतात व पाहणार्याचे सात्विक प्रभाव आपल्यावर पडतो.टिळा काही खास प्रयोजना साठी पण लावतात. जसे मोक्षप्राप्ती करायची असेल तर टिळा अंगठ्याने..शत्रू चा नाश करायचा असेल तर तर्जनी ने,धनप्राप्ती हेतू मध्यमा नी आणि शांती प्राप्ती साठी अनामिका नि टिळा लावला जातो. साधारणत : टिळा अनामिका द्वारे लावला जातो. आणि त्याच्यात पण चंदनाचे लावला जातो. तिळ्यासह तांदूळ लावल्यास आई लक्ष्मी आकर्षित होते व थंडक व सात्विकता प्रदान करण्याचा निमित्त लपलेले असते.म्हणून प्रत्येक हिंदूने टिळा जरूर लावावा.हिंदु प्रथेप्रमाणे टिळा न लावणे अशुभ आहे. टिळा हिंदु संस्कृती ची ओळख आहे.टिळा लावणे हे फक्त धार्मिक नव्हे तर वैज्ञानिक कारण पण आहे.
  • Log in or register to post comments

अहो हे मिपा आहे. सनातनच्या

बॅटमॅन
Fri, 03/15/2013 - 14:29 नवीन
अहो हे मिपा आहे. सनातनच्या वेबसाईटवरचे चोप्यपस्ते कशाला उगीच इथे आँ? आणि तसेही उपक्रमवर हा बाष्कळ धागा कोणीतरी आधीच टाकलेला आहे. हा पहा. http://mr.upakram.org/node/3936 विना रेफ्रन्स चोप्यपस्तेची लाज नै आणि चिकित्सेची इच्छा नै. त्यामुळे तुमच्यासारखे लोक उगीच फालतू मजकूर का पेष्टतात? असा एक नवीन काकू सुरू करावा म्हणतोय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नेहरिन

टिळा लावणे हे फक्त धार्मिक

धन्या
Fri, 03/15/2013 - 14:29 नवीन
टिळा लावणे हे फक्त धार्मिक नव्हे तर वैज्ञानिक कारण पण आहे.
या प्रयोगांबद्दल वाचायला आवडेल. कुणी केले होते हे प्रयोग? कधी केले होते? काय निष्कर्ष निघाले?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नेहरिन

@ कुणी केले होते हे प्रयोग?

अत्रुप्त आत्मा
Fri, 03/15/2013 - 14:44 नवीन
@ कुणी केले होते हे प्रयोग? कधी केले होते? काय निष्कर्ष निघाले?>>>हरं..हरं काय हा अ धर्म...! धर्माच्या मागे लागता काय रे चोरांन्नो??? इतर सर्व क्षेत्रात प्रत्येक गोष्ट अशीच प्रयोग करून वापरात आलेली आहे,हे तु मला दाखवून देण्यासाठी त्य त्या प्रॉडक्टच्या फ्याकट्रीत ... ने ... मगच मी तुझ्यापुढे ... हरिन Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धन्या
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा