✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

गणपतीला जानवे कोणी घातले ?

श
शरद यांनी
गुरुवार, 03/14/2013 - 13:28  ·  लेख
लेख
गणपतीला जानवे कोणी घातले ? आपण आज गणपतीच्या मूर्त्या वा चित्रे पाहिली तर आपणास असे आढळून येईल की त्याच्या गळात जानवे असते. माझा प्रश्न असा आहे की हे जानवे गणपतीच्या गळ्यांत कोणी, केंव्हा व कां घातले ? नाही, हा धागा पोरकट, थिल्लर व सनसनाटी नव्हे. मी बरा॒च प्रयत्न करून याची उत्तरे शोधावयाचा प्रयास केला आहे. मला उत्तर मिळाले नाही, येथील एखादा अभ्यासू काही सांगू शकेल या आशेने प्रश्न विचारला आहे. प्रथम हा प्रश्न उद्भवलाच कां ? ते पाहू. महाभारतातील गोष्ट आहे. एका राजा;ला वाटले की आपण यज्ञ करतो, इतरही करतात. मग आपले वैशिष्ट्य ते काय ? आपला यज्ञ इतरांहून वेगळा, एकमेवाद्वितीय, पाहिजे. त्याने शंकराची तपश्चर्या केली व तो प्रसन्न झाल्यावर त्याच्याकडे वर मागितला कीं "माझ्या यज्ञातील अध्वर्यु तू हो." शंकर म्हणाला " नाही बाबा, तो माझा अधिकारच नाही. ते जमणार नाही, पण माझा अंश असलेला दुर्वास ते काम करेल." लक्षात घ्या, शंकर सांगत आहेत, "देवांना हा अधिकारच नाही". मनुष्य, त्रैवर्णिक समाजच, मुंज, यज्ञ आदि करू शकतात. मुंजच नाही तर जानवे कुठले ? ही गोष्ट फार पुरातन झाली. इतर देवांकडे बघू. विष्णु, शंकर, विठ्ठल, तिरुपती ब्रह्मदेव, यांची चित्रे, मूर्ती पहा. जानवे नाही. मला सोळाव्या शतकांपूर्वीच्या कुठल्याही शिल्पांत, चित्रांत आढळले नाही. राम, कृष्ण हे देव, पण मानवी अवतार, त्यांना अधिकार आहे, पण तेथेही नन्नाच. अपवाद फक्त परशुरामाचा. व दत्ताचा. दोघेही ऋषीपुत्र. जानवे आढळते. तरीही कुणाला तीन-चारशे वर्षांपूर्वीची एकमुखी दत्ताची मुर्ती वा चित्र माहीत असेल तर त्यात जानवे आढळते का ते पाहून अवष्य कळवावे. मी पाहिलेल्या तीनशे वर्षांपूर्वीच्या गणपतीच्या, चित्रात, शिल्पात जानवे दिसत नाही. फार काय हल्लीच्या काळातील दक्षिणेकडील धातूशिल्पातही जानवे दिसत नाही. कोणी बन्गलुरु-चेन्नायीवासी जास्त माहिती देऊं शकेल काय? शरद .
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
71485 वाचन

💬 प्रतिसाद (146)

प्रतिक्रिया

मगच मी तुझ्यापुढे ... हरिन

डॉ सुहास म्हात्रे
Fri, 03/15/2013 - 14:50 नवीन
मगच मी तुझ्यापुढे ... हरिन नाहीतर तोपर्यंत काय ? वाघोबा ??? :))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

बोला कुठल्या प्रोडक्टच्या

धन्या
Fri, 03/15/2013 - 14:53 नवीन
बोला कुठल्या प्रोडक्टच्या फॅक्टरीत जायचे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

@गणपतीला जानवे कोणी घातले ?>>

अत्रुप्त आत्मा
Fri, 03/15/2013 - 14:30 नवीन
@गणपतीला जानवे कोणी घातले ?>>> त्यात काय? आंम्ही(च) दरवर्षी घालतो ;)
  • Log in or register to post comments

हे बाकी जबरं काम केलंत बगा

बॅटमॅन
Fri, 03/15/2013 - 14:55 नवीन
हे बाकी जबरं काम केलंत बगा आत्मूस. त्वांडच बंद केलं. काय लोकहो, मिळाले का उत्तर आता? काकू बंद करून दुसरा उघडा बघू पटापट?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

त्यात काय? आंम्ही(च) दरवर्षी

तर्री
Fri, 03/15/2013 - 14:51 नवीन
त्यात काय? आंम्ही(च) दरवर्षी घालतो जबरी
  • Log in or register to post comments

गणपतीला स्वेटर कुणी घातला? ते

गणपा
Fri, 03/15/2013 - 17:02 नवीन
गणपतीला स्वेटर कुणी घातला? ते आधी सांगा मग तुमच्या प्रश्नांचा विचार करू. :)
  • Log in or register to post comments

मार्च आला गणपा....उकडायलंय.

प्यारे१
Fri, 03/15/2013 - 18:04 नवीन
मार्च आला गणपा....उकडायलंय. अजून स्वेटर घालून ठिवलाय काय? बाकी अपर्णा तै सारखंच... आईच्यान म्या नाय घाटलं गनपतीला जानवं! 'त्वं देहत्रयातितः, काल त्रयातित:,अवस्थात्रयातित:' म्हणजे काय कुणास ठाऊक! जो देहांच्या, काळाच्या, अवस्थाच्या पलिकडला तो कुणाच्या कुळात जन्मला, त्याची जात कुठली, धर्म कुठला याबद्दल कुणाला माहिती आहे काय? @धन्या, कोण नाय सापडत म्हणून देवाला वेठीला धरा आता! हे भारीये. भगवान ह्या शब्दाचा अर्थ ज्याच्या कडे यश, श्री, किर्ती, औदार्य, ऐश्वर्य असं सगळं (भग) अपरिमित प्रमाणात आहे तो. हे सगळे ऐश्वर्य त्याचंच आहे. सोनं आलं कुठून? जमीन, पृथ्वी मधून. सोनं आपल्यासाठी मौल्यवान. त्याच्यासाठी काय? त्यानं काय पिक्चर मध्ये दाखवतात तसं चोरांना डांबायला पाहिजे होतं का? डिस्क्लेमरः इथून पुढे लिहीलेलं कैच्याकै वाटणार आहे पण बेस्ट ऑप्शन हे असं आहे हे मानणं हाच आहे. ह्यालाच श्रद्धा म्हणतात. दुसर्‍या कुणालाही त्रास न होऊ देता जे झालं जसं झालं ते स्वीकारण्याशिवाय पर्याय नाही अन्यथा चोरानं एकाला मारलं म्हणून चोराच्या घरच्यांना मारणं असं सूडचक्र सुरु होईल. जन्माला येतो तो मरतो हे खरं ना? ज्याचं त्याचं आयुष्य किती असावं हे त्याच्या त्याच्या प्रारब्धानुसार (त्यानं केलेल्या कर्माच्या आता मिळणार्‍या फळानुसार) ठरतं. उदाहरणार्थ : एखादा कैदी किती दिवस कैदेत राहावा ह्यासाठी त्यानं काय गुन्हा केलाय, त्याची तीव्रता किती हे माहिती असणं आवश्यक असतं. त्याची कैद संपली की तो मोकळा. एखादा कैद्याला कैद संपण्यापूर्वी पळून जायला मदत करतो, मुद्दाम हून बाहेर काढतो तेव्हा दोघांनाही आणखी शिक्षा ही होतेच. हे सगळं 'गणित' आपल्याला माहिती न होता होत असल्यानं आपल्याला अतर्क्य वाटतं. इथे असा अर्थ नाही की खून करणार्‍याचं काही नाही करायचं का? मोकळं सोडायचं का तर नाही. आज ज्या देशात आपण आहोत त्या देशाच्या न्यायव्यवस्थेवर विश्वास ठेवून न्यायाची वाट पहायची. हसायला आलं ना? हे कायद्याच्या अंमलबजावणी करणार्‍या लोकांचं अपयश आहे. ते यशापयश लोकांनी ठरवावं. चोरी करणार्‍या लोकांनी देवाच्या प्रॉपर्टीत त्यालाच पळवून नेला म्हणून आक्षेप आहे असं असेल तर देव म्हणजे नेमकं काय हे नीट माहिती करुन घ्यावं लागेल! सर्वांभूत परमेश्वर ही संकल्पना लक्षात घेतली गेली पाहिजे. (चोराच्या आत देखील देव आहेच.) त्यानं चोरांना मारुन लगेच न्याय करावा अशी अपेक्षा आहे का? मूर्ती मध्ये देव आहे पण फक्त मूर्ती म्हणजे देव नव्हे आणि देव रखवालदार नाही रे बाबांनो! बाकी सुरक्षारक्षक काय करत होते? त्यांच्याकडे बंदूक नव्हती का? त्यांना स्वतःची सुरक्षा करता आली नाही का? असे प्रश्न गेलेल्या व्यक्तीबाबत संपूर्ण सहानुभूति नि आदर ठेवून विचारावेसे वाटतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणपा

प्रारब्धवाद हा भारतीयांनी

धन्या
Fri, 03/15/2013 - 19:07 नवीन
प्रारब्धवाद हा भारतीयांनी लावलेला एक अफलातून शोध आहे. एकदा तो स्विकारला की ब्रम्हदेवाच्या बापालाही वाद घालण्यासाठी एखादी फट त्यात शोधता येणार नाही. बाकी चालू द्या. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१

प्रारब्धवाद म्हणजे काय ?

प्रसाद गोडबोले
Sat, 03/16/2013 - 01:27 नवीन
प्रारब्धवाद म्हणजे काय ? हे जाणुन घ्यायला आवडेल ... माझ्या मते भारतीयांनी माणसाच्या एकुणच अनुभवाचे मॉडेल असे बनवेले आहे आयुष्य = ब० + ब१ * प्रारब्ध कर्म +ब२ * संचित कर्म + ब३ * क्रियामाण कर्म ( error =० ) =)) ब्रम्हदेवाच्या बापालाही >>>> ब्रह्मदेवाचे बाप कोण हे ही सांगा ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धन्या

मुळात जानवे घालण्याची प्रथा

राही
Fri, 03/15/2013 - 19:05 नवीन
मुळात जानवे घालण्याची प्रथा का निर्माण झालेली असावी असा प्रश्न मनात येतो. एका विचारसरणीनुसार मध्य आशियातले लोक खोरासान,ईरान वगैरे भागात स्थिर झाले. हे अग्निपूजक होते आणि त्यांच्यात झरतुस्त्र हा पुरुष निर्माण झाला. त्याने सांगितलेला धर्म आचरणार्‍या लोकांना सद्रा आणि कश्ती (कोश्ती) परिधान करणे आवश्यक होते. ही कश्ती म्हणजे बहात्तर धागे असलेला एक दोरा असतो आणि तो कमरेभोवती विशिष्ट पद्धतीने बांधायचा असतो .हे लिहायचे कारण म्हणजे वैदिक संस्कृती आणि ही प्राचीन पारसी संस्कृती यात काही समान संकल्पना तज्ञांना आढळल्या आणि हे दोन्ही संस्कृतिगट विलग होण्यापूर्वीच्या काळातल्या एका अतिप्राचीन समान (कॉमन्)संस्कृतीत त्यांची बीजे असावीत असे मत या तज्ञांनी मांडले,जे तज्ञांमधले बहुमत आहे. म्हणजे शरीरावर दोरा धारण करण्याची पद्धत इतकी प्राचीन आहे. बौद्धांमध्ये ही प्रथा आहे तशीच ती अ‍ॅपाचे इंडियन्स मध्येही होती. आपण लहान मुलांच्या कमरेस कडदोरा बांधतो. आणखी एक स्वनिरीक्षण आहे की दुर्गम भागातले आदिवासी लोक कमरेला एक जाडजूड रस्सी बांधत. तीत कोयता,घुंगूर आणि आणखी एखादी वस्तू अडकवण्यासाठी लूप विणलेले असत.याला(ठाणे जिल्ह्यात जाखवण म्हणत) आदिम समाज रानावनात हिंडत असताना ही शस्त्रे उपयोगी पडत. काथ्याऐवजी वेलींचे दोरही पाहिलेले आहेत.(आजही मुंजीमध्ये गवताचा दोरा बांधला जातो) आणि आदिवासीच नव्हेत तर पूर्वास्पृश्य (महार इ.) लोकांनाही फक्त ही रस्सी आणि लंगोटी (कधी कधी तीही नसे) घालून वावरताना पाहिले आहे. म्हणजे जेव्हा वस्त्रे नव्हती तेव्हा कुठल्याही स्वरूपातला दोरखंड, रज्जू, पट्टा ही सतत जवळ बाळगण्याची एक आवश्यक गोष्ट होती, आजच्या सेलफोनसारखी. ती हातात धरण्यापेक्षा अंगावर घातली की हात मोकळे रहातात. जसजशी संस्कृती विकसन पावली तसतशी या आदिम गॅजेटची गरज राहिली नाही आणि केवल प्रतीकरूपाने ती उरली असावी. जसे खगोलशास्त्रामध्ये अतिप्राचीन विश्वासंबंधी ज्ञान मिळवण्यासाठी अतिदूरच्या तार्‍यांचा वेध घेतला जातो कारण त्या योगे तितक्या प्रकाशवर्षांपूर्वीचे विश्व आपण अंदाजू शकतो, तसेच आदिवासींचे निरीक्षण करताना आपल्याला खूप जुन्या संस्कृतीच्या-जी संस्कृती निर्भेळपणे फक्त या आदिवासींमध्येच टिकून राहिली आहे-खाणाखुणा पटतात.
  • Log in or register to post comments

माहितीपूर्ण आणि लॉजिकल

बॅटमॅन
Fri, 03/15/2013 - 19:15 नवीन
माहितीपूर्ण आणि लॉजिकल प्रतिसाद! एकदम पटेश.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राही

"मुळात जानवे घालण्याची प्रथा

श्रीगुरुजी
Fri, 03/15/2013 - 19:17 नवीन
"मुळात जानवे घालण्याची प्रथा का निर्माण झालेली असावी असा प्रश्न मनात येतो." जेव्हा तिजोरीला कुलुप लावायला सुरूवात झाली, तेव्हापासून जानवे घालण्याची प्रथा सुरू झाली असावी (किल्ली अडकविण्याकरिता). जेव्हा माणसे धनसंचय करू लागली तेव्हा ते तिजोरीत ठेवू लागली व ते चोरांपासून वाचविण्यासाठी तिजोरीला कुलुप लावायला सुरूवात झाली. माणसे जेव्हा रोजचे देण्याघेण्याचे व्यवहार बार्टर पद्धतीऐवजी धन, मुद्रा, सोने इ. देऊन्/घेऊन करू लागली, तेव्हा माणसे धनसंचय करू लागली. . . . ही यादी बरीच वाढविता येईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राही

हम्म...

दादा कोंडके
Fri, 03/15/2013 - 20:08 नवीन
जेव्हा तिजोरीला कुलुप लावायला सुरूवात झाली, तेव्हापासून जानवे घालण्याची प्रथा सुरू झाली असावी (किल्ली अडकविण्याकरिता).
मग किल्ली भिजूनये म्हणून जानवं कानाला अडकव(ता)त का? :))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

जानवं आणि गर्ता

श्रीनिवास टिळक
Fri, 03/15/2013 - 20:18 नवीन
शीख पुरुष त्यांचे किर्पण एका कापडी पट्ट्यामध्ये बाळगतात (गर्ता) जो खांद्यावरून जानव्यासारखा लटकत असतो. मला वाटतं हे जानव्याचच क्षत्रिय रुपांतर असावं.
  • Log in or register to post comments

राही यांनी काही चांगले मुद्दे

इन्दुसुता
Fri, 03/15/2013 - 20:36 नवीन
राही यांनी काही चांगले मुद्दे मांडलेले आहेत. त्यातल्या दोरखंड/ रज्जू / पट्टा या मुद्द्याशी सहमत. अँन्थ्रॉपॉलॉजी च्या काही पुस्तकात असे निरिक्षण व त्यावर भाष्य आहे असेही कुठेसे वाचल्याचे स्मरते. त्यामुळे ह्या मुद्द्याशी काहीशी सहमत. मात्र 'आपण लहान मुलांच्या कमरेस करदोडा बांधतो' ह्या वाक्याबद्दल ( मला जो अर्थ लागला ) काहीशी साशंक. अवांतर : शरद यांच्या मूळ प्रश्नाचे उत्तर; जानवे कुणी घातले माहित नाही, पण आता गणपतीला मंगळसूत्र घालावे म्हणते लवकरच :D
  • Log in or register to post comments

का हो? काय मिळतं हो असं बोलून?

दादा कोंडके
Fri, 03/15/2013 - 22:47 नवीन
पण आता गणपतीला मंगळसूत्र घालावे म्हणते लवकरच :D
आमच्या भावना दुखावल्याबद्दल निषेध!
  • Log in or register to post comments

तेच ना! अच्रत बव्लत!

बॅटमॅन
Fri, 03/15/2013 - 22:50 नवीन
तेच ना! अच्रत बव्लत!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दादा कोंडके

अरेरे !

जेनी...
Fri, 03/15/2013 - 23:50 नवीन
अरेरे ! कोंडु काकांची भावना काकु दुखावली :( वाईट झालं .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दादा कोंडके

गणपतीला मंगळसूत्र घालावे

अत्रुप्त आत्मा
Sat, 03/16/2013 - 09:22 नवीन
गणपतीला मंगळसूत्र घालावे म्हणते लवकरच >>> शीssssssssssss कैच्यकै विसंगत अचरट इनोद :-/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेनी...

काय ठरलं मग?

नाना चेंगट
Sat, 03/16/2013 - 09:17 नवीन
काय ठरलं मग?
  • Log in or register to post comments

आत्मागुर्जींनी दिली की कबूली.

कवितानागेश
Sat, 03/16/2013 - 11:21 नवीन
आत्मागुर्जींनी दिली की कबूली. आता काही चिन्ता नाही! ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाना चेंगट

जुने जानवे

रमेश आठवले
Sun, 03/17/2013 - 09:21 नवीन
गणपतीला जानवे कोणी घातले या विषयावरचा लेख वाचला. नेहमी प्रमाणे शरद यांचा लेख छान आहे आणि बुद्धीला चालना देणारा आहे.प्रतिसादही भारीभक्कम म्हणजे आत्तापर्यंत ९2 आहेत . लेखात सुचवल्या प्रमाणे मी गुगल वर- ancient गणेश idols - यासाठी शोध केला असता बरेच धागे समोर आले.त्यापैकी एक धागा तपासला. त्यात बर्याच गणेश मूर्तींची चित्रे आहेत. तो धागा खाली देत आहे. त्या धाग्यामधील पहिल्या दोन मुर्तींविषयी माहिती आधी पाहिली. प्रत्येक मूर्तीचा फोटो मोठा करून पाहिला असता मूर्तीच्या उजव्या हाताला पानाला भेट द्या असा संदेश येतो. तो पहिला असता या दोन्ही मूर्ती आंध्र प्रदेशच्या मेहबूबनगर जिल्ह्यातील आहेत व १००० आणि ११४० वर्षाच्या जुन्या आहेत असे लिहिले आहे. दोन्ही मूर्तींच्या गळ्यात जानवे दिसते. इतर मूर्तींच्या फोटोंचा शोध घेतल्यास आणखी उदाहरणे सापडतील असे वाटते. .https://www.google.co.in/search?q=ancient+ganesh+idols&hl=en&tbm=isch&tbo=u&source=univ&sa=X&ei=mfpDUenqGMirrAeEooGgBQ&ved=0CDMQsAQ&biw=1366&bih=624
  • Log in or register to post comments

मनुवादि लोकन्चा प्लन असेल ह

वैभवजोशि
Mon, 03/18/2013 - 11:18 नवीन
मनुवादि लोकन्चा प्लन असेल ह
  • Log in or register to post comments

देव-देवतांच्या मुर्तीवर यज्ञोपवीत/जान पहता येते, पण.....

आर्य
Wed, 04/03/2013 - 01:03 नवीन
यज्ञोपवीत/जानवे हे बहुतांश देव-देवतांच्या मुर्तीवर पहता येते. पण काही योगी/ तपस्वी /ऋषींनीही धारण न केल्याचे अढळते. काही शिल्पांत देवींनाही (स्त्रि देवतांना) जानवे दखवले आहे. (उदा: महिषासुर मर्दीनी महाबलीपुरम) यावरुन हे सिद्घ होते की पुरुषांबरोबर स्त्रियांनाही जानवे घालता येत होते, याच प्रमाणे विष्णुच्या पशू रुपास जानवे नाही (मत्स्य-कुर्म) पण वराह, नरसिंह आणि वामनावतार पुढे जानवे दिसते, सगळीकडे रावणानेही जानवे घातलेले दिसेल. तंजावुर - ब्रहदिश्वर मंदिर (इ.स.१०००)गणपतीच्या काही शिल्पांत/चित्रात काहीत गणपतीला जानवे नाही तर काहीत आहे. पण यात शंकराला जानवे नक्की आहे. हम्पीलाही एकाच्या गळ्यात आहे तर दुसर्‍या गणपतीच्या नाही. इतरदेवांविषयी - १) हळीबेड-बेल्लूर - (११०० ते १२०० शतक) मंदिर समुह -ब्रह्मा-विष्णू-महेश-सुर्य-इंद्र इत्यादी देव-देवतांच्या तसेच धर्मपाल / न्यायपाल (जज्ज) मुर्तीवर जानवे स्पष्ट पणे कोरलेली आहेत. २) मदुरै - गोपुरांवरच्या लोकांनी जानवे घातल्याचेही देसते (इ,पु ३५०) ३) महाबलीपुरम (६०० ते ७०० शतक) - अर्जुनाची तपश्चर्या (गंगावतरण शिल्प राजा-हरीश्चचंद्र) या शिल्पातल्या अनेक देवांनी /लोकांनीही जानवे घातले आहे. ४) सुब्रमण्यम स्वामी (सु-ब्राह्मण्यम) अर्थात कार्तिकेयाच्य मुर्तीवरही जानवे आहे. अन्य मंदिर गोपुरे - तिरुपती - बालाजीच्या मुर्तीवर्ही जानवे आहे. ५) तिरुपती बालाजीही जानवे घालतो. आर्य (बेंगळूरु / मुंबई)
  • Log in or register to post comments

@काही शिल्पांत देवींनाही

अत्रुप्त आत्मा
Wed, 04/03/2013 - 08:39 नवीन
@काही शिल्पांत देवींनाही (स्त्रि देवतांना) जानवे दखवले आहे. (उदा: महिषासुर मर्दीनी महाबलीपुरम) यावरुन हे सिद्घ होते की पुरुषांबरोबर स्त्रियांनाही जानवे घालता येत होते, >Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आर्य

धन्यवाद

शरद
गुरुवार, 04/04/2013 - 06:36 नवीन
श्री. आठवले, आर्य व अतृप्त आत्मा यांना मनापासून धन्यवाद. आजपर्यंत इतकी शिल्पे पाहूनही या एका दृष्टीतून कधी शोधले नव्हते. गणपतीच्या अनेक मूर्तीत जानवे आढळत नाही हे खरेच पण आता काही मूर्तीत ते आढळते हेही मान्य. स्त्रियांच्या मूर्तीत जानवे दिसले किंवा तसा दागिना आढळतो हे पाहिल्यावर गंमत म्हणजे बुद्धाच्या मूर्तीतेत तो दिसला. शरद
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

यावरुन हे सिद्घ होते की

इन्दुसुता
Fri, 04/05/2013 - 08:05 नवीन
यावरुन हे सिद्घ होते की पुरुषांबरोबर स्त्रियांनाही जानवे घालता येत होते
अगदी बरोबर.. मग याच प्रमाणे गणपती बाप्पाला ( आणि इतर पुरुषांना ) मंगळसूत्र का घालता येऊ नये? बायका किंवा पुरुषांनी ( ज्याला जे ) हवे असेल ते घालावे.. जानवे / मंगळसूत्र :) :) --ओरिजिनल मुद्दा न सोडणारी --सुता अवांतर : उग्गाच काहीतरी 'अचरट विनोद' वगैरे म्हणत बसतात झालं...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

गोव्यातील महालसा (म्हाळसा

यशोधरा
गुरुवार, 04/04/2013 - 07:32 नवीन
गोव्यातील महालसा (म्हाळसा नव्हे) देवीनेही यद्नोपवीत धारण केलेले आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आर्य

UxCo/s571/IMG_0081.JPG" alt=

मृत्युन्जय
गुरुवार, 04/04/2013 - 14:55 नवीन
Mahishasur Mardini Arjun 1 Arjun 2
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आर्य

मस्त

प्रचेतस
गुरुवार, 04/04/2013 - 15:05 नवीन
महिषासुरमर्दिनी. फोटो कुठले आहेत रे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय

नुकतेच महाबलिपुरमला जाउन आलो

मृत्युन्जय
गुरुवार, 04/04/2013 - 15:10 नवीन
नुकतेच महाबलिपुरमला जाउन आलो आहे. तिथली ही ३ छायाचित्रे पण चित्रात जानवे कुठे दिसत नाही. Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय

जानवे कुठेच नाही पण

प्रचेतस
गुरुवार, 04/04/2013 - 15:17 नवीन
जानवे कुठेच नाही पण महिषासुरमर्दिनी, महिष आणि दोघांमध्ये खालच्या बाजूस असलेली चामुंडा अप्रतिम कोरलीय रे. धागा टाक की.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय

टाकायचाय रे. इतर काहितरी

मृत्युन्जय
गुरुवार, 04/04/2013 - 15:28 नवीन
टाकायचाय रे. इतर काहितरी मध्येच येते. प्रभुंच्या धाग्यामुळे याला थोडा वेळ लागला :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

दोघांमध्ये खालच्या बाजूस

यशोधरा
गुरुवार, 04/04/2013 - 18:24 नवीन
दोघांमध्ये खालच्या बाजूस असलेली चामुंडा
वल्ली, बाळबोध प्रश्न विचारते की ते चामुंडेचे शिल्प आहे हे तुम्ही कसे ठरवले? उलगडून सांगा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

चामुंडा म्हणजे स्त्रीरूपी

प्रचेतस
गुरुवार, 04/04/2013 - 19:50 नवीन
चामुंडा म्हणजे स्त्रीरूपी अस्थीपंजर. गळ्यांत किंवा पोटात विंचू कोरलेला, काही वेळा चेहरा कवटीसदृश तर काहीवेळा स्त्रीरूपी. शस्त्र खङग. इथे पोटातल्या बरगड्या स्पष्ट दिसताहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा

अच्छा! सह्ही आहे हे. धन्यवाद.

यशोधरा
गुरुवार, 04/04/2013 - 20:23 नवीन
अच्छा! सह्ही आहे हे. धन्यवाद. असं काही उलगडून दाखवणारं लिहा एकेक शिल्प घेऊन ही विनंती.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

__/\__

डॉ सुहास म्हात्रे
गुरुवार, 04/04/2013 - 20:49 नवीन
वाल्लीशेठ, हे असलं सगळं ज्ञान पुस्तक रुपाने संग्रहित करून ठेवा. हे सहसा कुठे सापडत नाही आणि दुर्लक्षीत होऊन नष्ट होऊ राहिलंय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

धन्यवाद यशोधरा आणि इस्पिकचा

प्रचेतस
गुरुवार, 04/04/2013 - 21:27 नवीन
धन्यवाद यशोधरा आणि इस्पिकचा एक्का तसंही लेखांमध्ये शिल्पांच्या अनुषंगाने लिहित असतोच पण त्यावर एखादा स्वतंत्र लेख कधीतरी लिहिनच. तोवर ही पहा चामुंडेची वेगवेगळी रूपे पिंपरी दुमाला Image removed. भुलेश्वर Image removed. खिद्रापूर Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे

तो भुलेश्वराचा फोटो आहे

यशोधरा
Sun, 04/07/2013 - 17:27 नवीन
तो भुलेश्वराचा फोटो आहे माझ्यापाशी :) खिद्रापूर बघायचे राहिले आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

बेहेती गंगा मे हाथ धो लो :)

अर्धवटराव
Fri, 04/05/2013 - 00:21 नवीन
वल्ली शेठ, आता या अस्थीपंजर स्त्रीरुपावर, पोटावरच्या विंचवावर पण थोडा प्रकाश टाका कि :) नेमकं काय इंडीकेट करायचं आहे शिल्पकाराला? काहि स्टोरी आहे का त्या मागे? कुठली तत्कालीन सामजीक प्रथा वगैरे?? अर्धवटराव
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

सुरेख

अभ्या..
Fri, 04/05/2013 - 01:08 नवीन
वल्लीदादा एकेका स्वतंत्र शिल्पाकॄतीचे रसग्रहणाची सुरुवात महाबलीपुरमच्या या "गंगावतरणा" नेच कर. इतक्या आकृती आहेत त्यात आणि प्रत्येक आकृती अभ्यासाचा विषय आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अर्धवटराव

+१११११

अर्धवटराव
Fri, 04/05/2013 - 03:27 नवीन
आता या लेखमालेची वाट बघणं आलं. अर्धवटराव
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

चामुंडा ही सप्तमातृकांमधली एक

प्रचेतस
Fri, 04/05/2013 - 08:38 नवीन
चामुंडा ही सप्तमातृकांमधली एक देवता. या देवतांचे आर्यीकरण होतांना यातल्या वाराही, ऐंद्री, वामनी(ब्राह्मणी), नारसिंही इत्यादी देवता मूळच्या वैदिक अंशाच्या राहिल्या तर माहेश्वरी, कौमारी आणि चामुंडा या पूर्णपणे त्यांच्या अनार्य रूपांतच स्थापिल्या गेल्या. अस्थीपंजर, गळ्यातला विंचू, नरमुंडमाला, आणि प्रेतावर उभी असलेली चामुंडा ही सगळी पूर्वीची अनार्य प्रतिके. चामुंडेचेच अधिक सोज्ज्वळ प्रतिक म्हणाजे काली असे मला वाटते. चामुंडा सप्तमातृकांबरोबरच शाक्तउपासनेत पण उचलली गेली ती तिच्या भयप्रद स्वरूपामुळेच बहुधा. त्यामुळेच चामुंडेची शिल्पे सप्तमातृकापटाव्यतिरिक्त इतर ठिकाणीही स्वतंत्रपणे कोरलेली आढळतात (मुख्यतः प्राचीन शिवमंदिरांत तर हमखास दिसतातच)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अर्धवटराव

इ तो खाली ट्रेलर भया

अर्धवटराव
Fri, 04/05/2013 - 08:44 नवीन
पुरा पिच्चर दिखाएबिगर हम बिन्ती करना छोडुंगा नहि :) अर्धवटराव
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

दिखायेंगे. जरूर दिखायेंगे.

प्रचेतस
Fri, 04/05/2013 - 09:01 नवीन
दिखायेंगे. जरूर दिखायेंगे. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अर्धवटराव

"आक्रमण!!!!!!!!!!!" स्टाईलचे

बॅटमॅन
गुरुवार, 04/04/2013 - 18:20 नवीन
"आक्रमण!!!!!!!!!!!" स्टाईलचे शिल्प लै आवडले. एकच नंबर!!!!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा