✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

जात जातच नाही ... काय करू??

द
दीपकशेठ यांनी
Mon, 02/04/2013 - 11:12  ·  लेख
लेख
खूप प्रयत्न केले आणि अजुनहि करतोय आणि करेल.... पण यश काही येताच नाही आहे... काय करू जात जाताच नाही आहे ना.... मी माळी आणि ती मराठा.. एकमेकांवर खऱ प्रेम.. हो अगदी खर.. खूप प्रयत्न केले, ६-८ महिने झाले ती तिच्या घरी सांगतेय तरी सुद्धा तिचे वडील तयार होत नाही आणि त्यामुळे बाकी कोणीही पाठींबा देत नाही.. तिचे वडील गावी असतात.. गावी सर्व जन त्यांना खूप मान देतात, एकत्र कुटुंब, आणि घरात पण सर्वच मान देतात..आणी माझी मुलगी असा करतेय?? बरेच जनांना हा अनुभव येतो तसा आम्हाला सुद्धा आला, तीला धमकी देण्यात आली.. आम्ही सगळे किव्वा तो.. आणि असा काही केला तर मी माझ्या ..... हेच तर आम्हाला नको आहे ना... विचार केला २-३ वेळा म्हणून बघू होतील तयार, पण नाही :( आता वडिलाने असा पवित्र्रा घेतल्यावर मुलगी तरी काय करणार? कुणाला वाटणार असा काही झाले म्हणून.. आणि हि धमकी खरी ठरली तर?? तरीही हिम्मत हरली नाही आहे.. लढतो आहे पण हे मात्र खरा आहे, वडील धाऱ्याना समाज महत्वाचा असतो... पण मुलांच्या ख़ुशी साठी कुठे तरी थोडी तरी तयारी दाखवली तर काय हरकत आहे? तुम्हीच सुचवा अश्या वेळी काय केले पाहिजे?
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
समाज
जीवनमान
लेखनप्रकार (Writing Type)
विचार
मत
सल्ला
मदत

प्रतिक्रिया द्या
24975 वाचन

💬 प्रतिसाद (160)

प्रतिक्रिया

तुम्हि कॉन्ट्रॅक्ट घेता/देता

मनराव
गुरुवार, 02/07/2013 - 18:19 नवीन
तुम्हि कॉन्ट्रॅक्ट घेता/देता का ग्यरंटीचे... ?? तसं असेल तर काही जणांना तुमचा णंबर देऊन टाकतो...... ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ५० फक्त

.

गवि
गुरुवार, 02/07/2013 - 18:30 नवीन
.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मनराव

हो हो आम्ही घेतो कॉन्ट्रेक्ट

५० फक्त
गुरुवार, 02/07/2013 - 22:24 नवीन
हो हो आम्ही घेतो कॉन्ट्रेक्ट ग्यारंटीचे, स्वप्न पडायच्या पण ती खरी करण्यासाठी अंथरुणातुन उठुन अंथरुणापेक्षा अंमळ लांब पाय पसरायची डेरिंग पाहिजे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

दादा

खटासि खट
Mon, 02/04/2013 - 18:47 नवीन
दादा समाज म्हणून तुम्हाला फायदे हवेत कि प्रेम ? शहरात जातसमाजातून बहिष्कृत केलं तरी फरक पडत नाही. लग्न आणि दु:खद प्रसंगात काय ते तेव्हढेच नातेवाईक एकत्र येणं इतकंच सामान्यांच्या बाबतीत नातेसंबंध आणि जातीचं महत्व आहे. राजकिय व्यक्तींना मात्र जातीचं महत्व आहेच आहे.
  • Log in or register to post comments

आणखी एक मार्ग आहे. पण खडतर

खटासि खट
Mon, 02/04/2013 - 18:50 नवीन
आणखी एक मार्ग आहे. पण खडतर आहे. सामाजिक सुधारणेचं व्रत हाती घ्या. जातीभेद संपवा आणि मग सुरजभाऊच्या शिनुमामातल्यासारखं सगळ्यांनी एकत्र क्लोज अप फोटु काढुन घेत लगीन करा. लग्नात नातवंडांना मांडीवर बसू द्या
  • Log in or register to post comments

दीपकशेठ,

आनन्दिता
Mon, 02/04/2013 - 20:22 नवीन
दीपकशेठ, ती मुलगी जर मराठा असेल अन तेही छोट्या खेड्यातील, तर खरंच १०० वेळा विचार करा पळून वगैरे जाण्याआधी... तिच्या घरच्यांच्या आयुष्य नरक होऊन जाईल.. पुढे कदाचित माफ करतील ही तुम्हाला पण त्यांच्या जखमा कधीही भरून येणार नाहीत...
  • Log in or register to post comments

असहमत

दादा कोंडके
Mon, 02/04/2013 - 20:40 नवीन
ती मुलगी जर मराठा असेल अन तेही छोट्या खेड्यातील, तर खरंच १०० वेळा विचार करा पळून वगैरे जाण्याआधी... तिच्या घरच्यांच्या आयुष्य नरक होऊन जाईल.
त्यपेक्षा तुम्ही लवकर स्वर्गात जाण्याची शक्यता जास्त आहे. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनन्दिता

हम्म.. याला मात्र मी ही सहमत!

आनन्दिता
Mon, 02/04/2013 - 20:45 नवीन
हम्म.. याला मात्र मी ही सहमत! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दादा कोंडके

हिंसा-अहिंसा धाग्याची

काळा पहाड
Mon, 02/04/2013 - 20:54 नवीन
हिंसा-अहिंसा धाग्याची प्रिंटआऊट काढून त्यांना वाचायला दिल्याने काही फरक पडण्याची शक्यता आहे का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनन्दिता

इथल्या भल्याभल्यांच्या भाषा

आनन्दिता
Mon, 02/04/2013 - 21:07 नवीन
इथल्या भल्याभल्यांच्या भाषा ऐकुन आमचे डोळे पांढरे व्हायची वेळ आलीय.. तर त्यांना प्रिंटा दाखवून काय करू!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: काळा पहाड

ह्म्म याला मात्र मीहि सहमत

जेनी...
Mon, 02/04/2013 - 21:20 नवीन
ह्म्म याला मात्र मीहि सहमत आहे ... अहो दिपक काका ... बेक्कार लोक असतात आमच्या ९६ कुळात ... :( आमच्याकडे तर गावी एका मुलीने तीच्याच मामाच्या गावातला मुलगा पण जराशीच खालच्या जातीतला होता ... तर त्याच्यासोबत पळुन जाऊन लग्न केलं मग तिच्या बाबांनी आणि चुलत्यांनी त्यांना शोधुन त्या मुलाला तिथेच मारुन टाकलं :( आणि मुलीला घरी आणुन विष पाजुन मारुन टाकलं :( आणि स्वताहा पोलिस स्टेशन ला जावुन सांगितलं आम्हि केलं हे सगळं गावच्या पोलिस पाटलाला हाताशी धरुन केस दाबुन टाकली .... हे सगळं आणि अश्या अनेक गोष्टी आई मला वरचेवर सांगत असते ..... :( :-/ घाबरायला होतं न मग मला :( ..... पण तिला नै न समजत ते :-/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनन्दिता

अहो दिपक काका ... बेक्कार लोक

काळा पहाड
Mon, 02/04/2013 - 22:32 नवीन
अहो दिपक काका ... बेक्कार लोक असतात आमच्या ९६ कुळात ... smiley
हे म्हणजे तुम्ही ९६ कुळी आहात याची जाहिरात ना?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेनी...

नाहियो काळा काका

जेनी...
Mon, 02/04/2013 - 22:37 नवीन
नाहियो काळा काका :( जाहिरात कसली डोम्बलाची त्यात :-/ मी आपला धोक्याचा इशारा दिला दिपक काकांना :-/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: काळा पहाड

हे सगळं आणि अश्या अनेक गोष्टी

अधिराज
Tue, 02/05/2013 - 00:08 नवीन
हे सगळं आणि अश्या अनेक गोष्टी आई मला वरचेवर सांगत असते .....
पुजाताई, बरोबरे, तुम्हाला सारखं सांगावं लागणारच. काय भरोसा नाही तुमचा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेनी...

ओ अधिकाका ....

जेनी...
Tue, 02/05/2013 - 00:17 नवीन
ओ अधिकाका .... आमच्याकडे नडला त्याला फोडला हे ब्रिदवाक्य असतय लोकांचं ... तुमी मला नडु नका हं ... सांगुन ठेवते :-/ माझ्या दादालाच नाव सांगिन :-/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अधिराज

आन् आमच्यात बी आला अंगावर तर

अधिराज
Tue, 02/05/2013 - 00:20 नवीन
आन् आमच्यात बी आला अंगावर तर घेतला शिंगावर हे धोरण आसतया.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेनी...

आँ ??

जेनी...
Tue, 02/05/2013 - 00:25 नवीन
आँ ?? मंजी तुमी माझ्या दादाला शिंगाव घेणार ??? मला आधीपासनच डावुट होता बगा .. कि तुमी शिंग असणारा प्राणि हाय म्हणुन =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अधिराज

मी कोणत्या पक्षाचा खास माणूस

अधिराज
Tue, 02/05/2013 - 00:30 नवीन
मी कोणत्या पक्षाचा खास माणूस हाये हे तुम्ही ओळखलं नाय अजुन,म्हणून आसली मजा सुचतीए. जौ दे काय बोलणार, शेवटी आपलेच दात आन् आपलेच होट.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेनी...

दादा कोंडके तुमची प्रतिक्रिया

अनन्या वर्तक
Tue, 02/05/2013 - 21:05 नवीन
दादा कोंडके तुमची प्रतिक्रिया वाचताना सहज एका वाक्याने लक्ष वेधून घेतले.....~तिच्या घरच्यांच्या आयुष्य नरक होऊन जाईल.. ~ म्हणजे नक्की काय होईल?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दादा कोंडके

+१

ईन्टरफेल
Mon, 02/04/2013 - 21:19 नवीन
नड्ला तर फोडला हिच आमचि संक्रुति आहे ! खेड्यतलि मग विचार करा !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनन्दिता

दिपकराव जरा पोरीच्या बापाचे आणी भावाचे बॅकग्राउण्ड सांगता काय ?

बाबा पाटील
Mon, 02/04/2013 - 22:54 नवीन
दिपकराव जरा पोरीच्या बापाचे आणी भावाचे बॅकग्राउण्ड सांगता काय ? शक्य ती मदत मिळवुन देउ,पन लक्षात ठेवा normally वाय झेड पब्लिक असत आमच्, खर्‍या खोट्या इभ्रतीसाठी मारायची आणी मरायची तयारी असते यांची त्यामुळे विचार करुन निर्णय घ्या.....
  • Log in or register to post comments

धन्यवाद...

दीपकशेठ
गुरुवार, 02/07/2013 - 13:49 नवीन
मुलीचा बाप शेती करतो, १-भाऊ एम टेक, १-व्यवसाय आणि एक शिक्षण घेतो.. खरा आहे तुमचा, त्यांनी मुलीला मारायची धमकी सुद्धा दिली होती आणि स्वतः पण मरण्याची तयारी होती. आणि आम्ही असा केला तर ते जीव देणार हेच उत्तर ४-५ वेळा भेटला.. त्यांच्या अश्या निर्णयामुळेच आम्ही तडजोड करत आहोत.. मुलीच्या वडिलांचा जीव बळी नाही पडू देऊ शकत आमच्या सुखासाठी...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बाबा पाटील

सहमत

अभ्या..
Mon, 02/04/2013 - 23:03 नवीन
पाटीलबाबा तुमची तयारी समजू शकतो हो पण तुम्ही म्हणता तसे
खर्‍या खोट्या इभ्रतीसाठी मारायची आणी मरायची तयारी असते यांची
हे गुण मुलीत पण असले म्हणजे? त्यामुळे तुमच्या इशार्‍याशी सहमत. दिपकराव विचार करून निर्णय घ्या
  • Log in or register to post comments

चालुद्या, सह्या करायच्या

शैलेन्द्र
Mon, 02/04/2013 - 23:09 नवीन
:) चालुद्या, सह्या करायच्या असतील तेंव्हा बोलवा.. पुण्याच काम आहे, आम्ही नाही म्हणत नाही,,..
  • Log in or register to post comments

मी नै बै येणार सहि करायला

जेनी...
Tue, 02/05/2013 - 00:04 नवीन
मी नै बै येणार सहि करायला सुद्धा :-/ आमची लोकं मलाच शोधुन मारतिल :(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शैलेन्द्र

छे.. कशा हो तुम्ही अन तुमची

शैलेन्द्र
Tue, 02/05/2013 - 09:22 नवीन
छे.. कशा हो तुम्ही अन तुमची लोक.. जाउद्या, तुम्ही खोटी सही करा.. शॉर्ट वाली..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेनी...

तुम्हीच ठरवा

सुकु
Tue, 02/05/2013 - 04:52 नवीन
तुम्हीच विचार करा. - तुम्ही कुठे रहाता? गावात की शहरात? तुमचे उत्पन्नाचे साधन काय? समजा तुमचे काही बरे-वाइट झाले तर भावी पत्नी एकटीने जगू शकेल काय? - दोघांना भाउ-बहीण आहेत काय? असतील तर त्यांची लग्ने झाली आहेत काय? बहीणींना जास्त त्रास होतो लग्न जुळवायला अशावेळी. - तुमचे प्रेम आहे म्हणजे काय आहे? - म्हणजे मैत्री मग प्रेम? बघता-क्षणीच प्रेम? - समाजामधे सगळी उदाहरणे दिसतील अशा प्रकरणामधील. - सुखांत (सगळे सरळ झाले), दु:खांत (खून, म्रुत्यु, घटस्फोट ... सगळे प्रकार होतात) त्यामुळे उदाहरणे शोधून उत्तर मिळणार नाही. तुमचे उत्तर तुम्हालाच ठरवावे लागेल. - तुम्हाला कधितरी सामाजिक प्रश्नांवषयी आवड होती? असेल तर तुम्हाला त्यातील त्रासाची कल्पना आहे. - तुम्ही पूर्वी कधी जे बरोबर वाटते त्यासाठी विरोध पत्करून वाटते ते केले आहे काय?
  • Log in or register to post comments

बापरे !!

जेनी...
Tue, 02/05/2013 - 05:13 नवीन
बापरे !! म्हणजे ह्या सगळ्यांचा विचार करुन प्रेम करायचं असतं ??? :( मग नक्कोच बै :-/ एवढा विचार करत बसण्यापेक्षा आईपप्पाणी बघुन दिलेल्याशीच लग्न सोयिस्करे ... तिथे आपलं डोकं लावाय लागत नाय :P :D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुकु

ईंट्रनेट्वर क्मी दिव्स

५० फक्त
Tue, 02/05/2013 - 07:49 नवीन
ईंट्रनेट्वर क्मी दिव्स राहिलेत म्हंजे फार्च अशुद्ध्लिव्हाए असे न्व्हे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेनी...

हो क्का???

जेनी...
Tue, 02/05/2013 - 09:58 नवीन
हो क्का??? इतका त्रास होत असेल तर वाचु नये अशुद्ध ... कुणी जबरदस्ती तुमचे डॉळे अशुद्ध लिहिलेल्या अक्षरावर फोकस करुन नाय धरलेले ... :-/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ५० फक्त

तेच्म्हंतो. उग्गिच आप्लं

बॅटमॅन
Tue, 02/05/2013 - 14:16 नवीन
तेच्म्हंतो. उग्गिच आप्लं डोळ्याला अन डॉस्क्याला शॉट्ट तेच्यामारी!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ५० फक्त

प्लिज अ‍ॅक्सेप्ट माय डिप काँडोलन्सेस टु योर मिसफॉर्च्युन!

अग्निकोल्हा
Tue, 02/05/2013 - 08:50 नवीन
मुलिचे वडिल ज्या व्यक्तिला मानतात/ शक्यतो अशी व्यक्ति जिच्यावर आर्थिक कमाइची गणितेही अवलंबुन असतात मान असतो, त्यांच्याकडुनच जर मध्यस्ति करता आलि तर तुमचं काम होउ शकतं कोणालाच त्रास न होता. अन्यथा...
  • Log in or register to post comments

ये इष्क नही आसां इतना

विलास अध्यापक
Tue, 02/05/2013 - 09:16 नवीन
ये इष्क नही आसां इतना इक आगका दरिया है और डूबके जाना है !
  • Log in or register to post comments

दिपकशेठ

आनन्दिता
Tue, 02/05/2013 - 09:37 नवीन
दिपकशेठ प्रश्न विचारुन गायबलात तुम्ही.. इतके सगळेजण इथे डोकी खाजवत बसलेत तुमच्यासाठी.. सांगा तरी तुम्हाला यातले उपाय पट्तायत की नाय ते....
  • Log in or register to post comments

दिपकशेठ बहूधा इथले नाना उपाय

मितभाषी
Tue, 02/05/2013 - 22:35 नवीन
दिपकशेठ बहूधा इथले नाना उपाय वाचून पळून गेले असतील.... हिमालयात. अवांतरः मी शिर्षक जाता जातच नाही असे वाचले :P
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनन्दिता

गायब नाही झालो...

दीपकशेठ
गुरुवार, 02/07/2013 - 13:52 नवीन
गायब कसा होणार, अडकलो होतो सर्वांची जमवा जमाव करण्यात आणि शेवटचा प्रयत्न करण्यात.. झाला निर्णय.. आम्ही तडजोड करत आहोत.. मुलीच्या वडिलांचा जीव बळी नाही पडू देऊ शकत आमच्या सुखासाठी...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनन्दिता

तु नही और सही और नही और सही

मृत्युन्जय
Tue, 02/05/2013 - 10:33 नवीन
तु नही और सही और नही और सही असा दृष्टीकोन ठेउन जगणे जमत असेल (तुम्हाला ही आणि तिलाही) तर विसरा तिला आणी पुढे जा. नपेक्षा तिच्याशीच संसार मांडणे उत्तम. तुम्ही तिलाच मनात ठेउन दुसृया कोणाशी लग्न केलेत तर तुमच्या २चे आणि तुमाच्य जोडीदारांचे अश्या ४ जणांचे आयुष्य बरबाद कराल. बाकी राहिला प्रश्न भावंडांचा आणि घरच्यांचा तर त्यला काही इलाज नाही. होइल हळु हळू सगळे ठीक. सगळ्यांचे भले होइल. लग्न नाही केलेत तर मात्र तुमचे नुकसान होइल.
  • Log in or register to post comments

सर्व मान्य आहे... पण पर्याय उरला नाही...

दीपकशेठ
गुरुवार, 02/07/2013 - 13:54 नवीन
आम्ही तडजोड करत आहोत.. मुलीच्या वडिलांचा जीव बळी नाही पडू देऊ शकत आमच्या सुखासाठी...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय

गुलाबी गँगला बो लावा बरोबर

श्री गावसेना प्रमुख
Tue, 02/05/2013 - 10:39 नवीन
गुलाबी गँगला बो लावा बरोबर ठिकाणावर येतील सगळे.
  • Log in or register to post comments

निर्णय...

दीपकशेठ
Wed, 02/06/2013 - 11:34 नवीन
आधी सर्वांचे आभार... चांगले सल्ले दिलेत म्हणून... शेवटी आम्ही वडिलांच्या आणि सर्वांच्या ख़ुशी साठी तडजोडीचा हा कडू प्याला पिण्यास तयार झालो... :( :'( ४-५ वेळा माघार घेऊन प्रत्येक वेळी खूप हिम्मतीने लढलो, पण शेवटी हेच... तिच्या वडिलांनी काही पर्याय नाही ठेवला म्हणून.. हरलो आम्ही... एक जीव वाचविण्यासाठी :( आमच्याच स्वप्न्नाना आम्ही स्वप्नाच ठेवणार... आमच्या वडिलांचे आणि घरच्यांचे खूप आभार, जे मला इतका पाठींबा दिला आणि माझ्या साठी तिच्या वडिलांबरोबर पुढे होऊन चर्चा केली म्हणून...
  • Log in or register to post comments

आता आणखी एक पथ्य पाळा..

योगप्रभू
Wed, 02/06/2013 - 12:15 नवीन
दीपकशेठ, फुलू पाहणारं तुमचं प्रेम गाडलंत ना, तसंच त्याच्या आठवणीही खोल गाडून त्यावर कायमचा मातीचा थर टाका. म्हणजे असं की, आता पुढच्या आयुष्यात नव्या जोडीदारावर प्रेमाचा पुरेपूर वर्षाव करा. जुन्या आठवणींनी काळजात कळ येऊन प्रेम पातळ करु नका. अन्यथा तुम्ही दोघेही आणखी दोन नव्या व्यक्तींवर अन्याय कराल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दीपकशेठ

+१

मन१
Wed, 02/06/2013 - 19:08 नवीन
+१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: योगप्रभू

मनाची तयारी करत आहोत...

दीपकशेठ
गुरुवार, 02/07/2013 - 13:57 नवीन
मनाची तयारी करत आहोत... लगेच लग्न कारण तर शक्य नाही... मनस्थीती निट झाली कि बघू पुढच...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: योगप्रभू

गुड वन

आजानुकर्ण
Wed, 02/06/2013 - 18:58 नवीन
चांगला आणि परिपक्व निर्णय. तुम्हाला याचा पश्चाताप होणार नाही. शुभेच्छा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दीपकशेठ

जाता जाता

अभ्या..
Wed, 02/06/2013 - 20:06 नवीन
असो मला मात्र पश्चाताप झालेला आहे. यापुढे प्रेमात काय करु, आंतरजातीयचे काय करु, वयाचे काय करु, पोळी करु की चपाती करु असे धागे उघडणार नाही, वाचणे आणि प्रतिसाद देणे तर दूरच. फक्त नंदनवनात जाता जाता दिपकशेठ एकच अगदी खरे खरे सांगून जा. त्या मुलीचे वडील काय म्हणाले? आणि तुमचे वडील काय म्हणाले घरी आल्यानंतर? त्यांच्या शब्दात सांगितले तर फार बरे होइल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आजानुकर्ण

काय म्हणणार...

दीपकशेठ
गुरुवार, 02/07/2013 - 14:01 नवीन
मुलीचे वडील: हे शक्य नाही, मला गाव वाळीत टाकणार, आणि मला जीव देण्याशिवाय पर्याय नाही.. मला समजून घ्या.. माझे वडील पुढे तरी काय बोलणार?? मला हेच त्यांनी सांगितल आणि बघ तुझा विचार काय वाटते ते.. त्यांचा तर हाच निर्णय आहे... तुमच्या मुळे एक जीव जाऊ शकतो, आणि हे ओझे तुम्हाला आयुष्यभर वाहावे लागणार..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

पोरांनो सुखी रहा....

बाबा पाटील
Wed, 02/06/2013 - 11:53 नवीन
पोरांनो सुखी रहा....
  • Log in or register to post comments

प्रतिसाद....

कॅप्टन जॅक स्पॅरो
Wed, 02/06/2013 - 17:45 नवीन
माझा एक ब्राम्हण मित्र आणि माळी मैत्रिणीचा असाचं प्रॉब्लेम झाला होता. दोघांच्या घरचे तयार नव्हते. शेवटी आम्ही मित्रांनी दोघांच्या घरच्यांना एकत्र बोलाऊन नीट समजावल तेव्हा कुठे तयार झालेत. दोघांचा साखरपुडा नुकताच पार पडला, आता लग्नाची तारीख ठरवायचं चालु आहे. नीट समजावलं घरच्यांना तर तेही समजावुन घ्यायला तयार असतात. तुम्ही दोघं एकमेकांशिवाय कशी राहु शकणार नाहीत ते सांगा. तुम्ही तिच्या आईवडीलांची आणि ती तुमच्या आई-वडीलांची सदैव काळजी घ्याल हे ही सांगा. आई-वडील ऐकतात योग्य पद्धतीनी सांगीतलं तर. आणि नाहीच ऐकल तर दोघही सज्ञान असल्यान लग्न करु शकताच. समाजाच काय आहे हो? चार दिवस बोंब मारतील नंतर विसरुन जातील. तुमचं मनापासुन प्रेम असेल एकमेकांवर तर एवढी रिस्क नक्कीच घ्यायला पाहीजे. आयुष्य तुम्हाला समाजातल्या सो कॉल्ड जात-पोलिसांबरोबर काढायचं आहे की तुमच्या प्रेमाबरोबर ते पण पहा. (प्रेम व्यक्त नं करता आल्यानं तिच्या लग्नाला जायला लागलेला) मन उधाण वार्‍याचे.
  • Log in or register to post comments

एक शंकाये मला :

जेनी...
Wed, 02/06/2013 - 20:13 नवीन
एक शंकाये मला : प्रेम केलं तर लग्न करणं कम्पल्सरीये का ?? :( नुसतं प्रेम नै का जमणार ?? :( लग्न केलच पाहिजे का ?? :-/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो

कम्पल्सरी

श्रीरंग_जोशी
Wed, 02/06/2013 - 20:45 नवीन
पोरी, जगात कम्पल्सरी असं काहीच नसतं...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेनी...
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा