✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

शिवराजाभिषेकाला विरोध, एक थोतांड

स
सृष्टीलावण्या यांनी
गुरुवार, 01/31/2013 - 08:25  ·  लेख
लेख
परवा रायगडावर प्रसिद्ध इतिहास संकलक श्री. अप्पा परब ह्यांच्यासोबत सर्वांच्या बऱ्याच गप्पा झाल्या. त्यात अप्पांनी निःसंदिग्ध पणे काही बाबी सांगितल्या. त्यातील एक महत्त्वाची बाब म्हणजे महाराष्ट्रातील ब्राह्मणांनी कधीही शिवराजाभिषेकाला विरोध केला नव्हता. गागाभट्टांचे सहाय घेण्याचे कारण म्हणजे महाराष्ट्रातील ब्राह्मणांना राजाभिषेकाचा विधी माहित नव्हता. अर्थात् ते सहाजिकच आहे, शिवाजी राजांच्या उदयापूर्वी भारत शतकानुशतके परतंत्राच्या अंधःकारात होता, त्यामुळे महाराष्ट्रातील ब्राह्मणांच्या अनेकानेक पिढ्यांमध्ये कोणीही राजाभिषेक केलेला नव्हता. ज्या प्रावीण्याचा उपयोग नसतो ती प्रावीण्ये एका पिढीकडून पुढच्या पिढीकडे पोहोचत नाहीत. कालौघात ते ज्ञान नष्ट होत जाते. उदा. मराठेशाहीत आपल्या सर्वांच्या पूर्वजांनी तलवारी गाजवल्या पण आपल्या पिढीला तलवारीचे दोन हात सुद्धा करता येणार नाहीत. त्यासाठी ती परंपरा जपणाऱ्या काही तज्ज्ञांनाच बोलवून आणावे लागेल. असो. सांगायची गोष्ट इतकीच की शिवराजांच्या अभिषेकाला महाराष्ट्रातील ब्राह्मणांनी विरोध केला हा प्रचार खोडसाळ आहे. कारण असा काही विरोध ब्राह्मण, मराठी क्षत्रिय (मराठा) वा अन्य कोणाकडूनही झाला असता तरी महाराजांनी तो सपशेल मोडून काढला असता. ब्राह्मण म्हणूनही कोणाची तमा बाळगण्याचा तर प्रश्नच उद्भवत नाही. कारण शिवाजी राजांच्या मनात जातीभेदाला स्थान नव्हते. उदा. दि. १८ जानेवारी १६७५ ला एका पत्रात शिवाजी राजे प्रभावळीचे सुभेदार जिवाजी विनायक ह्यांना कामात कसूर केली म्हणून एक ताकीद पत्र लिहितात. त्यात ते लिहितात - 'ब्राह्मण म्हणून कोण मुलाहिजा करूं पाहतो? आरमार घेऊन पद्मदुर्गाचे मदतीस राहात ते करणे याउपरी बोभाट आलियाउपरी तुमचा मुलाहिजा करणार नाही. गनिमाचे चाकर गनिम जालेस, ऐसे जाणोन बरा नतीजा तुम्हास पावेल. ताकीद असे, रवाना.' खरी गोष्ट अशी आहे की तमाम रयतेला शिवरायांच्या विषयी अत्यंत आपुलकी होती. स्वराज्याची स्थापना सर्वांना आनंददायी गोष्ट होती. असे असताना जातीयवादी बी' ग्रेडींच्या पिवळ्या पुस्तकांवर किती विश्वास ठेवावा हे ज्याने त्याने स्वतःचे स्वतः ठरवावे. -------------------------------------------------------------------------- (राजाभिषेक प्रसंगी वेदशास्त्रसंपन्न गागाभट्ट ह्यांच्या मार्गदर्शनाविषयी पुन्हा कधीतरी सविस्तर लिहिनच. तो विषय इथे लिहायला घेतला तर लेखाची लांबी प्रचंड वाढेल.) संदर्भग्रंथ - वेध महामानवाचा - ले. डॉ. श्रीनिवास सामंत.
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
इतिहास
लेखनप्रकार (Writing Type)
प्रकटन
विचार
आस्वाद
अनुभव
मत

प्रतिक्रिया द्या
42648 वाचन

💬 प्रतिसाद (146)

प्रतिक्रिया

आता चौथ्यांदा झाले..

परिकथेतील राजकुमार
Sun, 02/03/2013 - 19:11 नवीन
वाक्य, शब्द, पुन्हा पुन्हा पाहावे लागते.
हे मिपावर कधीपासून सुरु झाले? :P
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

इस्लामिक अत्याचार सर्वत्रच

बॅटमॅन
Sun, 02/03/2013 - 19:40 नवीन
इस्लामिक अत्याचार सर्वत्रच होते परंतु अत्याचारामुळे पळाले असे म्हणतो त्याचे कारण असे की हिंदु राजांच्या दप्तरी विद्वान ब्राह्मणांना स्थान होते परंतु मुस्लीम राजांच्या राजदरबारी विद्वान ब्राह्मणांना कोणतेही स्थान नव्हते त्याचे कारण असे की त्यांचा राजदरबार हा फारशी आणि उर्दू भाषेत चालणारा होता, तिथे संस्कृतचे काहीच काम नव्हते, म्हणून त्यांना काशी, प्रयाग, विजयनगर गाठावे लागले. एकतर मुसलमान राजवटीचा प्रचंड त्रास आणि पोटाचे कोणतेच साधन उपलब्द्ध नव्हते तेव्हा महाराष्ट्र सोडून जाण्याशिवाय कोणताही पर्याय उरला नव्हता.
नेमके हेच चित्र अलीकडच्या काही संशोधनातून जरा च्यालेंज केलेले आहे. तुम्ही म्हणता त्याप्रमाणे अस्मानी- सुलतानीमुळे महाराष्ट्रच का, बाकीचा भारतही गांजून गेला होता बर्‍यापैकी हे सत्य आहे. पण विषय हा तत्कालीन एलीट ब्राह्मण घराण्यांचा स्थलांतराचा आहे. त्या जगाची डायनॅमिक्स ही सर्वसामान्य लोकांसारखी नव्हती. किंबहुना साहित्यिक, विद्वान , इ. चा आढळ आणि त्यांची पॉप्युलॅरिटी आणि विरुद्ध राज्यसत्ता असे अगदी बायनरी इक्वेशन कधीच नव्हते. अरबी-फारसी शिकून मग आधी कारकुनी मग दिवाणी करत करत ब्राह्मणांनी लै मुलकी कामांत चंचुप्रवेश केलेला होता. (अवांतरः दक्षिणेस अशी कामे करणारे बहुतेक ब्राह्मण, तर उत्तरेत कायस्थ होते.) पण एक मुद्दा रोचक ठरावा. निव्वळ अत्याचार हे कारण नसले तरी पैठणचा र्‍हास या स्थलांतरामागे असेल काय? त्याचा कसकसा परिणाम तिथे झाला? मुळात काशी हे महाराष्ट्रच नव्हे, तर सर्व भारतातील ब्राह्मणांसाठी "द प्लेस टु बी" होते, त्यामुळेच मराठी, बंगाली आणि तेलुगु या प्रदेशांतील ब्राह्मणांचा तरी पक्का एविडन्स दिसतो तिथे. म्हणून म्हणतो, की अन्य प्रदेशांतील उदाहरणे पाहता हे सिंपल लॉजिक लागू ठरावे का तिथे? बंगालमध्ये मिथिला हे महत्वाचे सेंटर असूनही तेथील ब्राह्मण काशीत येतजात. त्यामुळे, कदाचित काही अंशी स्थानिक संस्कृत केंद्रांचा र्‍हास, काही अंशी विद्वत्सभेचे आणि तदनुषंगिक अभ्युदयाचे आकर्षण हे काशीतल्या स्थलांतरामागे फॅक्टर्स असावेत. काशीतील फेमस ब्राह्मण घराण्यांत शेष हे एक घराणे या बाबतीत युनिक केस ठरावे. आदिलशाही दरबारात काही वर्षे घालवून मग या घराण्याचा मूळपुरुष नरसिंह शेष काशीत गेला. नीलकंठ चतुर्धर नामक समग्र महाभारतावर टीक लिहिलेला एकमेव दबंग पंडित तर चक्क शिवशाहीच्या वेळेस कोपरगावहून काशीला गेला. काशीकडे स्थलांतरामागचे हे फॅक्टर्स संमिश्र आहेत , इतकेच मला सांगायचे होते. असो. :) वरच्या विधानांना संदर्भ म्हंजे रोझालिंड ओ हॅनलॉन बाईंचा हा पेपर होय. http://journals.cambridge.org/action/displayAbstract?fromPage=online&aid=7179796 बाकीचा पेपर रिलेटेड असला तरी स्थलांतरामागची कारणे स्पष्टपणे डिस्कस करत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

चांगली माहिती

सृष्टीलावण्या
Fri, 05/31/2013 - 13:26 नवीन
गागाभट्टांविषयी अजून माहिती उपलब्ध होणे इतिहासाच्या अभ्यासकांसाठी उपयुक्त ठरेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मालोजीराव

पयले ह्ये सांगा की परब कोन?

मृत्युन्जय
गुरुवार, 01/31/2013 - 14:55 नवीन
पयले ह्ये सांगा की परब कोन? ब्राह्मण की मरठा की अजुन कोन? ब्राह्मण असतील तर त्यांचे मत बाद. इतर कोणी असतील तरी बाद कारण ते ब्राह्मणाच्या बाजुने बोलताहेत. या ब्राह्मणांनी मस्तानीपाई पेशवाई बुडिवली हो. त्यांचे कसले लाड करताय.
  • Log in or register to post comments

मस्तानीपाई पेशवाई बुडिवली हो

गवि
गुरुवार, 01/31/2013 - 15:15 नवीन
मस्तानीपाई पेशवाई बुडिवली हो
तरीही नफेखोर ज्यूस सेंटर्स आणि हॉटेलांच्या फायद्यासाठी आजही पुण्यात ठिकठिकाणी ही मस्तानी विकली जाते आणि भारताचे भविष्य असणारी तरुणाई ग्लासच्या ग्लास रिचवताना दिसते..सरकार कधी थांबवेल हा दुटप्पीपणा..?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय

खतर्नाक प्रतिसाद!

आनन्दिता
गुरुवार, 01/31/2013 - 22:20 नवीन
=)) खतर्नाक प्रतिसाद!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

सावधान

सृष्टीलावण्या
Fri, 02/01/2013 - 10:04 नवीन
मस्तानी नावावर बंदी आणली गेलीच पाहिजे नाहीतर आम्ही मस्तानी पेयाची अवस्था वाघ्या कुत्र्याच्या पुतळ्यासारखी करू - भाजी बीग्रेड. :) :) :) :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनन्दिता

नाव काय ठेवायचं म्हणे मग ?

सूड
Fri, 02/01/2013 - 11:24 नवीन
नाव काय ठेवायचं म्हणे मग ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सृष्टीलावण्या

हम्म्म

मी-सौरभ
Fri, 02/01/2013 - 19:46 नवीन
मिनाक्षी नाव चालेल का हो ???
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

गप्प

सूड
Fri, 02/01/2013 - 23:56 नवीन
राहायचे ठरविले आहे. 'मी' तेवढा दीर्घ कर !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मी-सौरभ

मुळात अटकेपार भारतावर अंमल

ऋषिकेश
गुरुवार, 01/31/2013 - 15:02 नवीन
मुळात अटकेपार भारतावर अंमल गाजवणार्‍या मराठा साम्राज्यात गागाभट्ट् हे बाहेरील कसे? आणि तत्कालिन भूगोल धरायचा तर औरंगाबादेतील ब्राह्मणही 'परकीय'च झाला नाही का?
  • Log in or register to post comments

गागाभट्ट् हेही ब्राम्हणच होते ना.

विलासिनि
गुरुवार, 01/31/2013 - 15:33 नवीन
गागाभट्ट् हेही ब्राम्हणच होते त्यांनी शिवराजाभिषेकाला विरोध कसा नाही केला तसेच महाराष्ट्रातील ब्राह्मणांनी गागाभट्ट् यांना कसा काय विरोध नाही केला? <या ब्राह्मणांनी मस्तानीपाई पेशवाई बुडिवली हो. त्यांचे कसले लाड करताय.> शिवाजीमहाराजांसाठी प्राणांची पर्वा न करणारे बाजीप्रभु देशपांडे हे ब्राम्हणच होते. शिवाजीमहाराजांची गादी का चालवता आली नाही त्यांच्या पुढच्या पिढ्यांना. शिवाजीमहाराजांबद्द्ल नितांत आदर आहे. जातिवाचक विधानांचा निषेध आहे.
  • Log in or register to post comments

ऐतिहासिक अज्ञानाचा कळस

मालोजीराव
गुरुवार, 01/31/2013 - 15:51 नवीन
शिवाजीमहाराजांची गादी का चालवता आली नाही त्यांच्या पुढच्या पिढ्यांना.
ऐतिहासिक अज्ञानाचा कळस...छत्रपती संभाजी,छत्रपति राजाराम,छत्रपती ताराराणी ,छत्रपती शाहू (थोरले) ...यांची चरित्रे वाचा ! आधुनिक काळातील राजर्षी शाहू महाराज, सरफोजीराजे ,प्रतापसिंहराजे, राजमाता सुमित्राराजे यांचीही माहिती घ्या
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विलासिनि

आता तुम्हीच जात काढली हाये

अधिराज
गुरुवार, 01/31/2013 - 16:12 नवीन
आता तुम्हीच जात काढली हाये म्हनून एक शंका इचारतो, बाजीप्रभु देशपांडे हे सी. के. पी. होते ना वो?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विलासिनि

व्हय व्हय. ते बाजीप्रभू

llपुण्याचे पेशवेll
Fri, 02/01/2013 - 15:30 नवीन
व्हय व्हय. ते बाजीप्रभू देशपांडे नसून बाजी परभूदेशपांडे होते. परभू किंवा प्रभू हे कायस्थच. उदा. पाठारे-प्रभू
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अधिराज

पेशवे साहेब तुमच्या बोलन्याचा

अधिराज
Sun, 02/03/2013 - 00:07 नवीन
पेशवे साहेब तुमच्या बोलन्याचा हेतु काय आपल्या ध्यानात येत नैये. दोनच गोष्टी बोलतो आता. पहिलि म्हणजे नावात परभू किंवा प्रभू म्हणून सी.के.पी. हे लॉजिक काय पटत नाही आपल्याला. नुस्त्या देशपांडे आडनावाची लोकंबी सी. के. पी असत्यात. दुसरी महत्वाची गोष्ट म्हन्जे बाजिप्रभु कुठल्याही जातीचे असले तरिबि आमाला काय फरक पडत नाही. त्याना स्वराज्यासाठी वीरमरण पत्करणारा मावळा म्हणूनच आम्ही त्याना ओळखणार. पण वरती विलासिणी बाईंनी बाजीप्रभूंचीसुद्धा जात काढायचा जो खोडसाळपणा केलाय त्याला आम्ही ते उत्तर दिल होतं. (स्वगतः जिल्ब्या पाडायचा लाई सोस, पण चांगला इशय बी सुचत न्हाय मग काय करणार, शोधा अजुन असले इशय)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: llपुण्याचे पेशवेll

बघा तिसरा पॅरग्रॅफ पहिली ओळ,

अधिराज
गुरुवार, 01/31/2013 - 16:17 नवीन
बघा तिसरा पॅरग्रॅफ पहिली ओळ, शिवराजांच्या अभिषेकाला ह्याचा अर्थ काय वॉ?
  • Log in or register to post comments

शंका निरसन

सृष्टीलावण्या
Fri, 02/01/2013 - 09:37 नवीन
शिवराजांच्या अभिषेकाला
राज्याभिषेक हा शब्द चुकीचा आहे कारण राज्याला अभिषेक होत नसतो तर राजाला होत असतो. अनेक पवित्र नद्यांचे पाणी आणून त्याचा अभिषेक राजाच्या मस्तकावर करतात. शिवराजांच्या अभिषेकाला म्हणजे शिवराजांवरच्या अभिषेकाला. व्याकरण दृष्ट्या मलाही राजाभिषेक हाच शब्द योग्य वाटतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अधिराज

राज्याभिषेक हा शब्द चुकीचा

अधिराज
Sun, 02/03/2013 - 00:18 नवीन
राज्याभिषेक हा शब्द चुकीचा आहे
ह्याला काहि आधार (आसल तर) द्या कि प्लिज.
अनेक पवित्र नद्यांचे पाणी आणून त्याचा अभिषेक राजाच्या मस्तकावर करतात.
म्हन्जे अभिषेक आनि राज्याभिषेक यात फरक नस्तो म्हनायचं का? पण तुमीच तर लेखात म्हणलय राज्याभिषेकाची प्रोसेस आवघड होती, कुणाला ठावक न्हवती म्हणून.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सृष्टीलावण्या

राज्याभिषेक म्हणजे राज्यासाठी

बॅटमॅन
Sun, 02/03/2013 - 02:15 नवीन
राज्याभिषेक म्हणजे राज्यासाठी म्हणून केलेला अभिषेक, कुणाला अभिषेक तर राजाला म्हणून राजाभिषेक असा समासविग्रह नाहीये. राज्याभिषेक हाच शब्द बरोबर आहे. मी म्हणतोय त्याला संदर्भ? राजाभिषेक म्हणजे कुठलातरी एक पवित्र अभिषेक असा अर्थ दिलाय इथे या दुव्यावर. राज्याभिषेक म्हणजे करोनेशन असा अर्थ दिलाय याच दुव्यावर. तस्मात, राज्याभिषेक: = राज्यार्थे अभिषेकः | हाच अर्थ बरोबर आहे. पण त्यामुळे राजाभिषेक हा शब्द चूक कसा ठरतो? तर राजाला केलेला कुठलाही अभिषेक म्हणजे राजाभिषेक. मग तो पुत्रप्राप्तीसाठी असो नाहीतर राज्यासाठी असो. असे अनेक अभिषेक राजाला केले जातात, त्या सर्वांना एकत्रितपणे राजाभिषेक म्हणता येईल. या सर्व खंडीभर राजाभिषेकांमधील नेमका कुठला अभिषेक राज्यासाठीचा-म्हणजे सिंहासनारोहणासाठीचा आहे हे कळावे म्हणून त्या अभिषेकाला राज्याभिषेक असे नाव आहे. थोडक्यात, राजाभिषेक= म्हणजे राजाला केल्या जाणार्‍या अनेक अभिषेकांच्या जनरल कॅटॅगरीचे नाव. तर राज्याभिषेक = राजाला राज्यासाठी केलेला एक स्पेसिफिक अभिषेक. त्यामुळे, इथे या संदर्भात राज्याभिषेक हाच शब्द सर्वार्थाने योग्य आहे. कारण तो अधिक नेमका आणि अचूक आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सृष्टीलावण्या

च्यायला लिंका गंडल्या वाटतं.

बॅटमॅन
Sun, 02/03/2013 - 02:16 नवीन
च्यायला लिंका गंडल्या वाटतं. राजाभिषेक राज्याभिषेक
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

च्यायला लिंका गंडल्या वाटतं.

बॅटमॅन
Sun, 02/03/2013 - 02:17 नवीन
च्यायला लिंका गंडल्या वाटतं. राजाभिषेक राज्याभिषेक
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

संमंला विनंती, दुवे प्लीज

बॅटमॅन
Sun, 02/03/2013 - 02:19 नवीन
संमंला विनंती, दुवे प्लीज दुरुस्त करा. http://spokensanskrit.de/ या वेबसाईटवर जाऊन राजाभिषेक आणि राज्याभिषेक हे दोन्ही शब्द सर्चवले की अर्थ दिसतील.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

खूप आभारी हाये बॅटमॅन सर

अधिराज
Sun, 02/03/2013 - 11:54 नवीन
खूप आभारी हाये बॅटमॅन सर माहितिबद्दल. तुम्ही दिलल्या दुव्यात "राज्याभिषेक" म्हंजे "कॉरनेशन" किंवा "इनोगरेशन ऑफ किंग्डम" असे जे अर्थ आहेत तेच सर्वमान्य हायेत. आता तरी लेखिका महोदयांनी लेखातले शब्द दुरुस्त करून घ्यावे ही नम्र इनंती. उगा कायत्री लिहायची खुंखुमी म्हनून महाराजांच्या राज्याभिषेका सारखा लोकांच्या जिव्हाळ्याचा आन् आस्मितेचा इशय निवडायचा, निवडला तर निवडला , पण त्यात बी "बी" ग्रेड(श्रेणी) छाप लिखाण करायचं, वर्कढी म्हंजे त्यात "राज्याभिषेक" हा शब्दच चुकीचा (चुकुन का मुद्दाम कोण जाणे) लिहायचा आन् प्रतिक्रियेत तेच बरोबर आसं ठोकून द्यायचं. अवघडे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

बाजीप्रभु ब्राह्मण नव्हते ,ते

ग्रेटथिन्कर
गुरुवार, 01/31/2013 - 16:55 नवीन
बाजीप्रभु ब्राह्मण नव्हते ,ते सीकेपी होते.पेशवाईत सीकेपींनाही भरपूर त्रास सहन करावा लागला. संशोधकसाहेब हे नक्कीच पुरंधरेंचे अनुयायी असणार.
  • Log in or register to post comments

उकरून काढणे

मैत्र
गुरुवार, 01/31/2013 - 18:23 नवीन
बाजीप्रभू सीकेपी होते हे खरं. मग मोरोपंत कोण होते, कृष्णाजी भास्करच्या कथा रंगवल्या जातात.. तर मग पंताजी गोपीनाथ कोण होते. शोधायचे तर शोधता अनेक ब्राम्हण आणि इतर जातीय शोधता येतील. महाराज कर्तृत्व आणि निष्ठेवर माणसं पारखत होते त्यामुळे सर्व जातींचे लोक त्यांच्या बरोबर असणं स्वाभाविक आहे. असं असताना त्यांची जन्माने जी जात होती त्यांनी त्यांच्यावर हक्क दाखवणं केवळ मूर्खपणा आहे. प्रत्येक जातीमध्ये चांगले आणि वाईट लोक होते / असतात - संभाजीराजांना साथ देणारे हंबीरराव आणि दगा करणारे गणोजी शिर्के एकाच जातीचे होते. महाराजांनी नेमलेले सेनापती हंबीरराव, प्रतापराव, नेताजी, आणि इतर मोठे लढवय्ये कान्होजी जेधे, तानाजी हे कित्येकजण आणि जावळीचे मोरे, मोहितेमामा, घोरपडे असे स्वतःच्या फायद्यासाठी रयतेला नाडणारे आणि महाराजांशी वैर धरणारे एकाच जातीचे होते. असंख्य वेळा या चर्चा होतात. कावीळ झालेल्याला सगळं पिवळं दिसतं त्यामुळे सारासार विचार करता येत नाही. साडे तीनशे वर्षांपूर्वी कोणी एक व्यक्ती किंवा समूह एका पद्धतीने वागला म्हणून त्या कारणासाठी आज त्याच धर्तीने विचार करून वागणं याला नक्कीच मूर्खपणा म्हणावा लागेल किंवा राजकारण.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ग्रेटथिन्कर

शमत आहे !

परिकथेतील राजकुमार
गुरुवार, 01/31/2013 - 19:14 नवीन
अजून सदर लेखनाच्या लेखीकीची, त्यांना सहमती दर्शवणार्‍यांची, असहमती दर्शवणार्‍यांची जात कशी काय कोणी विचारलेली नाही?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मैत्र

मनोरंजक धागा !!

सूड
गुरुवार, 01/31/2013 - 17:28 नवीन
मनोरंजक धागा !! (गुडघ्यापत्तोर कान)
  • Log in or register to post comments

नाही तर काय...

धन्या
गुरुवार, 01/31/2013 - 20:48 नवीन
लोकांना रान पेटवता येत नसेल म्हणून मग मिपा पेटवायला बघतात. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

भारीच मेलो

पुष्कर जोशी
Sat, 06/01/2013 - 02:59 नवीन
भारीच मेलो
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धन्या

युगपुरुषांना जातीपातीमध्ये बांधणे चुकीचे

लाल टोपी
गुरुवार, 01/31/2013 - 20:35 नवीन
शिवाजी महाराजांसारख्या युगपुरुषांना जातीपातीच्या बंधनात बध्द करणे चुकीचे आहे शेकडो वर्षांपासून पूजनीय महाराजांना असे जातीय करुन त्यांचे कार्य मर्यादीत करु नये असे प्रामाणिकपणे वाटते. आपल्या दैवतांचा आदर आपणच नाही करणार तर कोण करणार?
  • Log in or register to post comments

लयी टंकावं लागेल....जावूदे

इष्टुर फाकडा
गुरुवार, 01/31/2013 - 21:01 नवीन
लयी टंकावं लागेल....जावूदे तिच्यायला या दुव्यातली भाषणे ऐका, अर्थात जरुरी वाटत असेल तर !
  • Log in or register to post comments

ब्रिगेडने अनेक मुद्दे

श्रिया
गुरुवार, 01/31/2013 - 23:32 नवीन
ब्रिगेडने अनेक मुद्दे मांडलेले आहेत, जर त्यांच्या प्रत्येक मुद्द्याला असे महत्व देऊन एक एक धागा काढायचा ठरवला तर, शेकडो धागे मिपावर येतील. अशा निष्फळ चर्चा इथे करण्यात काय हशील?
  • Log in or register to post comments

सहमत आहे

रामपुरी
Fri, 02/01/2013 - 04:22 नवीन
त्यापेक्षा "ब्रिगेडींच्या मेंदूला वळ्या कमी आहेत" एवढं एकच वाक्य पुरेसं होईल काय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रिया

च्यायला !

परिकथेतील राजकुमार
Fri, 02/01/2013 - 11:27 नवीन
महाराजांविषयी येवढी चर्चा बहूदा बादशाहाच्या दरबारात देखील कधी झाली नसेल.
  • Log in or register to post comments

खरंच आहे. आता उद्या

बॅटमॅन
Fri, 02/01/2013 - 11:35 नवीन
खरंच आहे. आता उद्या महाराजांच्या अंगरख्याचा कलर केशरी की हिरवा की पांढरा यावरही लोक चर्चा करतील. पण इतकी चर्चा झाली ग्रँट डफपासून आत्तापर्यंत, म्हणून पुराव्यांचा कीस पाडल्या गेला तरी...नैतर इंग्रजी अधिकार्‍यांनी लिहिलेल्या इतिहासावर गुजराण करावे लागलेले प्रांतही आहेत, उदा. राजपुताना.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

सहमत.. १००० %

बन्या बापु
Fri, 02/01/2013 - 12:22 नवीन
सहमत.. १००० %
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

परीकथेतील राजकुमारच्या मताशी सहमत.. १००० %

बन्या बापु
Fri, 02/01/2013 - 12:23 नवीन
परीकथेतील राजकुमारच्या मताशी सहमत.. १००० %
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बन्या बापु

आहो

मी-सौरभ
Fri, 02/01/2013 - 19:50 नवीन
असं आक्ख नाव नाय लिहाच्च... परा आहेत ते फार तर स. परा म्हणा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बन्या बापु

>>महाराजांविषयी येवढी चर्चा

अधिराज
Fri, 02/01/2013 - 13:56 नवीन
>>महाराजांविषयी येवढी चर्चा बहूदा बादशाहाच्या दरबारात देखील कधी झाली नसेल. उगाच कायत्री इनोद, आव इथं महाराजांवर, त्यांच्या कार्यावर चर्चा कमी, आन् एकमेकांवर कुरघोड्याच जास्त चालल्यात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

सापेक्षतावादाचा सिद्धांत - एक

खटासि खट
Fri, 02/01/2013 - 14:19 नवीन
सापेक्षतावादाचा सिद्धांत - एक थोतांड हा बाप्पा जरब यांनी टंकलिखित केलेला ग्रंथ विक्रीस सिद्ध झाल्याचे समजते. काय असावें बरे या ग्रंथात ?
  • Log in or register to post comments

निखळ सत्य

अवतार
Fri, 02/01/2013 - 16:07 नवीन
काही व्यक्तिमत्वे इतकी अजस्त्र असतात की पिढ्यानपिढ्या प्रयत्न करूनही त्यांना जातींच्या / धर्मांच्या बंधनात अडकवणे कोणालाच शक्य होत नाही. अशा व्यक्तीमत्वांचा वापर एखाद्या जातीच्या किंवा धर्माच्या द्वेषासाठी करणाऱ्यांचे हेतू काय असावेत हे समजण्यासाठी फार विद्वान असण्याची आवश्यकता नाही. शिवाजी महाराज हे एकटेच नाहीत. या देशात होऊन गेलेल्या जवळपास प्रत्येकच महान व्यक्तीविषयी असेच वाद होत आले आहेत. जिथे प्रत्येक जात आणि धर्म असुरक्षिततेच्या गंडाने पछाडले गेले आहेत तिथे असले वाद होणे हे साहजिकच आहे. ऐतिहासिक गोष्टींवरून वाद घालण्यात एक मोठा फायदा हा असतो की सगळ्या चुकांचे खापर इतिहासावर फोडून सर्वच जाती-धर्मांना वर्तमानात नामानिराळे राहण्याची सोय असते. उद्या जर खरोखरच ऐतिहासिक वाद संपुष्टात आले तर एक देश / समाज म्हणून एकत्र राहायचे तरी कसे असा गहन प्रश्न सर्वांसमोर उभा ठाकेल. सर्वांना एकाच ताटात जेवायचे असेल तर निदान थोडा वाटा तरी इतरांसाठी राखून ठेवणे आवश्यक आहे ही जाणीवच अजून जिथे नाही तिथे इतरांचा वाट्यावरचा हक्क हिरावून घेण्यासाठी इतिहासाचे दाखले परस्परांना देत बसणे हे कृत्य समर्थनीय नसले तरी समजून घेण्यासारखे आहे. इतिहास हा वर्तमानाला आधार देण्यापुरताच असावा. जेव्हा इतिहासाची छाया वर्तमानावर पडते तेव्हा वर्तमानाची वाढ खुरटते आणि अशा वर्तमानातून उज्वल भविष्य सोडून बाकी सारे काही निर्माण होऊ शकते. हे "बाकी सारे काही" निर्माण करण्याची जबाबदारी स्वत:च्या खांद्यांवर घ्यायला साहजिकच कोणीही उत्सुक नसतात. तेव्हा भविष्यातील पिढ्यांनी एकमेकांना दूषणे देण्यासाठी आपला वापर करू नये अशी वर्तमान पिढ्यांची इच्छा असेल तर त्यांनी सर्वप्रथम वर्तमानात जगणे आत्मसात करणे गरजेचे आहे. खाच-खळग्यांनी भरलेल्या रस्त्यावरून जातांना मागे नजर ठेवून पुढे जाणाऱ्यांचे काय होऊ शकते ह्याचे भान असणे आवश्यक आहे.
  • Log in or register to post comments

च्यामारी मी तरी का मागे राहू???

नाना चेंगट
Fri, 02/01/2013 - 23:22 नवीन
>>>परवा रायगडावर प्रसिद्ध इतिहास संकलक श्री. अप्पा परब ह्यांच्यासोबत सर्वांच्या बऱ्याच गप्पा झाल्या. वा ! वा ! गप्पा टप्पा व्हायलाच हव्या. विचारांची देवाण घेवाण होते त्यामधूनच. :) >>>त्यात अप्पांनी निःसंदिग्ध पणे काही बाबी सांगितल्या. आमचेही काही मित्र आम्हाला नि:संदिग्धपणे काही बाबी सांगत असतात ब्वा ! :) >>>त्यातील एक महत्त्वाची बाब म्हणजे महाराष्ट्रातील ब्राह्मणांनी कधीही शिवराजाभिषेकाला विरोध केला नव्हता. असेल ब्वा ! आता काय आहे की कुणीही आज हयात असलेला तेव्हा जन्मला नव्हता. आणि इतिहासाचे एक असते प्रत्येकाला आपले मत मांडता येते. तेव्हा हे सुद्धा एक मत आहे असे आपण मानायला हरकत काही दिसत नाही. >>गागाभट्टांचे सहाय घेण्याचे कारण म्हणजे महाराष्ट्रातील ब्राह्मणांना राजाभिषेकाचा विधी माहित नव्हता. काय सांगता? आम्ही तर असेही ऐकले आहे की गागाभट्टांना सुद्धा राजाभिषेकाचा विधी माहित नव्हता. त्यांनी केले होते ते राज्याभिषेक. जेव्हा त्यांनी महाराष्ट्रात आल्यावर शिवाजीची भेट घेतली तेव्हा शिवाजी राजा नव्हता. शिवाजीचे राज्य नव्हते. जेव्हा राज्य असते तेव्हा राज्यावर कुणी आला तर राज्याभिषेक होतो. राज्य अस्तित्वात असते त्यावर राजा येतो. पण इथे राज्यच अस्तित्वात नाही. म्हणून मग राजा बनवला गेला. राजा बनल्यावर त्याने त्याचे राज्य अस्तित्वात आल्याचे जाहिर केले. तेव्हा ते राज्य अस्तित्वात आले. ही गागाभट्टांनी मांडलेली भुमिका त्यांनीच लिहिलेल्या राजाभिषेकविधी या पुस्तकात आहे. संस्कृतात आहे बर का ते. आणि त्यासाठी त्यांनी पूर्वापारचे जे काही राज्यारोहणासंदर्भातील विधी आहेत त्यांचा अभ्यास करुन मग राजाभिषेक विधी तयार केला होता. संपूर्ण भारताच्या ज्ञात इतिहासात हे केवळ एकमेव उदाहरण जिथे राज्य अस्तित्वात आले. बाकी सर्व राज्याभिषेक हे एकतर वंशपरंपरागत किंवा मु़ंडकी कापून :) हो हिंदू राजे पण एकमेकांची मुंडकी कापत अगदी अवरंगजेबाप्रमाणेच ;) आता ही सगळी आमची माहिती सांगोवागी ऐकलेली बरका ! आमचे ज्ञान समज तुटपुंजी हे बरीक खरे हो. >>>अर्थात् ते सहाजिकच आहे, शिवाजी राजांच्या उदयापूर्वी भारत शतकानुशतके परतंत्राच्या अंधःकारात होता, त्यामुळे महाराष्ट्रातील ब्राह्मणांच्या अनेकानेक पिढ्यांमध्ये कोणीही राजाभिषेक केलेला नव्हता. ज्या प्रावीण्याचा उपयोग नसतो ती प्रावीण्ये एका पिढीकडून पुढच्या पिढीकडे पोहोचत नाहीत. कालौघात ते ज्ञान नष्ट होत जाते. उदा. मराठेशाहीत आपल्या सर्वांच्या पूर्वजांनी तलवारी गाजवल्या पण आपल्या पिढीला तलवारीचे दोन हात सुद्धा करता येणार नाहीत. त्यासाठी ती परंपरा जपणाऱ्या काही तज्ज्ञांनाच बोलवून आणावे लागेल. तुमचा हा मुद्दा आमच्या दॄष्टीने बाद. >>>असो. सांगायची गोष्ट इतकीच की शिवराजांच्या अभिषेकाला महाराष्ट्रातील ब्राह्मणांनी विरोध केला हा प्रचार खोडसाळ आहे. कारण असा काही विरोध ब्राह्मण, मराठी क्षत्रिय (मराठा) वा अन्य कोणाकडूनही झाला असता तरी महाराजांनी तो सपशेल मोडून काढला असता. अता आम्ही वरच्या मुद्याला आमच्या पध्दतीने मांडल्याने तुमचा हा दावा चुकीचा ठरतो. त्यामुळे काही ब्राह्मणांचा विरोध असण्याची शक्यता नाकारता येत नाही. असू शकतो किंवा नसु शकतो. इतिहास त्यावर प्रकाश टाकेल. जरी टाकला नाही आणि विरोध असला तरी तो नाकारण्यात आणि बळेच तो विरोध नव्हताच वगैरे भलती तर्कटे रचण्यात काही प्वाईंट नाही असे आमचे प्रामाणिक मत आहे. आमचा प्रश्न एवढाच आहे की हो जर होता तर आज तुम्ही केवळ त्यावरुन मला गोळ्या घालणार का? कारण मी पण ब्राह्मण आहे. या प्रश्नाचे उत्तर नाही असेल तर ऐतिहासिक सत्य असे त्या घटनेचे वर्णन करुन शिवाजीचे चांगले गुण आत्मसात करु आणि जर हो असेल तर जे गेली हजारो वर्षे या देशात चालू होते ते अजून काहीशे वर्ष चालेल असे समजू या :) >>ब्राह्मण म्हणूनही कोणाची तमा बाळगण्याचा तर प्रश्नच उद्भवत नाही. कारण शिवाजी राजांच्या मनात जातीभेदाला स्थान नव्हते. उदा. दि. १८ जानेवारी १६७५ ला एका पत्रात शिवाजी राजे प्रभावळीचे सुभेदार जिवाजी विनायक ह्यांना कामात कसूर केली म्हणून एक ताकीद पत्र लिहितात. त्यात ते लिहितात - 'ब्राह्मण म्हणून कोण मुलाहिजा करूं पाहतो? आरमार घेऊन पद्मदुर्गाचे मदतीस राहात ते करणे याउपरी बोभाट आलियाउपरी तुमचा मुलाहिजा करणार नाही. गनिमाचे चाकर गनिम जालेस, ऐसे जाणोन बरा नतीजा तुम्हास पावेल. ताकीद असे, रवाना.' :) >>खरी गोष्ट अशी आहे की तमाम रयतेला शिवरायांच्या विषयी अत्यंत आपुलकी होती. स्वराज्याची स्थापना सर्वांना आनंददायी गोष्ट होती. ही आपुलकी का आणि कशासाठी होती याचे नरहर कुरुंदकरांनी अप्रतिम विश्लेषण केले आहे. त्यामधे ब्राह्मण प्रतिपालन नव्हते की मुस्लिम विरोध नव्हता. होता तो व्यवस्थेला कल्याणकारी बनवण्याचा प्रयत्न. आमचे ज्ञान जास्त नाही त्यामुळे जास्त लिहता येत नाही. >>असे असताना जातीयवादी बी' ग्रेडींच्या पिवळ्या पुस्तकांवर किती विश्वास ठेवावा हे ज्याने त्याने स्वतःचे स्वतः ठरवावे. कुठल्याही पुस्तकात असे म्हटले आहे यावर विश्वास ठेऊ नका. केवळ मी सांगितले आहे म्हणून विश्वास ठेऊ नका. तुमच्या बुद्धीला पटेल आणि मान्य होईल त्यावरच विश्वास ठेवा. - गोतम बुध्द. धन्यवाद.
  • Log in or register to post comments

सुंदर

इरसाल
Sat, 02/02/2013 - 10:58 नवीन
प्रत्येक कंपुचा असा एक काळ असतो. नवा कंपु आल्यावर त्यांना कोणी विचारत नाही.
  • Log in or register to post comments

आज्ञापत्रामागील प्रेरणा पंचतंत्राची?

श्रीनिवास टिळक
Sat, 02/02/2013 - 20:51 नवीन
शिवाजीमहाराजांचे अमात्य रामचंद्रपंत [बावडेकर] यांनी लिहिलेल्या आज्ञापत्र या पुस्तीकेमागील प्रेरणा १४व्या शतकात लिहिल्या गेलेल्या आणि पंचतंत्रावर आधारित एका नीतीशास्त्रीय ग्रंथात सापडते असं एक विधान मी अंतर्जालावर कुठे तरी वाचलं होतं पण आता ते उपलब्ध दिसत नाही. कोणास या विषयावर अधिक माहिती असेल तर कृपया ती द्यावी ही विनंती.
  • Log in or register to post comments

खूपच सुंदर व माहितीपूर्ण धागा

श्रीगुरुजी
Wed, 03/19/2025 - 15:31 नवीन
खूपच सुंदर व माहितीपूर्ण धागा! अनेकांचे प्रतिसाद अभ्यासपूर्ण व माहितीपूर्ण आहेत. सद्यस्थितीत हा धागा वर येणे खूपच आवश्यक आहे.
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा