✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

लैंगिक शिक्षणाचे व्यावहारीक महत्त्व

श
शुचि यांनी
Tue, 01/22/2013 - 19:33  ·  लेख
लेख
एक मुद्दा मांडायचा प्रयत्न करते - आम्हाला जेव्हा शाळेत लैंगिक शिक्षण मिळालं तेव्हा फक्त "मासिक धर्म" या विषयावर सांगीतले गेले. अजूनही भारतात तीच स्थिती आहे की आता गुप्तरोग/ एडस आदि रोगांची माहीतीदेखील सांगीतली जाते? कारण चित्रपट, कादंबर्‍या आदिंमधून सहजीवनाअची एक इमेज निर्माण केली जाते जी अतिशय रोझी असते, खरं तर वास्तवापासून दूर असते. सततच्या भूलभुलैय्याच्या भडीमारामुळे , हार्मोनल बदलांमुळेदेखील मुलामुलींचे मन भरकटू शकते. शाळा/ विद्यालयांमधून वास्तवाची जाण करुन देण्याचे किती प्रयत्न होतात? वास्तव म्हणजे 'सेफ सेक्स" काय, "लो रिस्क बिहेव्हिअर" कशाला म्हणतात. शारीरीक संपर्काशिवाय किंवा अगदी अचूक सांगायचे झाले तर "बॉडी फ्लुईड एक्स्चेंज" शिवाय आनंद कसा मिळवायचा आदिची माहीती देणे आदि "लैगिक शिक्षणांतर्गत" अंतर्भूत नाही काय? शिक्षक-पालक साधारण कधी ही माहीती देतात? आणि देत नसतील तर हे आवश्यक नाही का? "एकच सहचारी (पार्ट्नर)" हे एक मूल्य यापेक्षा व्यावहारीक स्तरावर किती महत्त्वाचे आहे याचा कशी उहापोह झालेला माझ्या माहीतीत नाही. नैतिक मूल्य-मूल्य म्हणून ती डोक्यावर घेतलेली गोष्ट आहे पण त्याच गोष्टीला जबरदस्त व्यावहारीक मूल्य आहेच हे कधी हायलाईट होत नाही ते. मुलांशी मनमोकळेपणाने बोलणे हे नैतिकतेइतकेच किंबहुना जास्त व्यावहारीक (प्रॅक्टिकल) पातळीवरुन व्हायला पाहीजे. असो. या विषयावर गंभीर आणि संयत प्रतिसादांची अपेक्षा मिपाकरांकडून ठेवली तर वावगे ठरेल का? आशा करते लेखामागची भूमिका जाणवून मग प्रतिसाद येतील. नुसता कळफलक बडवला असे होणार नाही. नाना स्तरांतून, नाना वयाच्या, प्रगल्भतेच्या, व्यवसायीक स्तरांमधून आलेल्या व्यक्ती मिपावर वावरतात तेव्हा ही अपेक्षा अवाजवी ठरु नये.
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
समाज
जीवनमान
लेखनप्रकार (Writing Type)
चौकशी

प्रतिक्रिया द्या
52031 वाचन

💬 प्रतिसाद (151)

प्रतिक्रिया

कौतुक आणि आश्चर्य

मन१
Tue, 01/22/2013 - 19:44 नवीन
इतकं थेट, स्पष्ट अशा गोष्टीबद्दल ह्या व्यासपीठावर कुठेही वाह्यात वाटू न देता लिहिलेलं पाहून कौतुक आणी आश्चर्य वाटतय. . वास्तव म्हणजे 'सेफ सेक्स" काय, "लो रिस्क बिहेव्हिअर" कशाला म्हणतात. शारीरीक संपर्काशिवाय किंवा अगदी अचूक सांगायचे झाले तर "बॉडी फ्लुईड एक्स्चेंज" शिवाय आनंद कसा मिळवायचा आदिची माहीती देणे आदि "लैगिक शिक्षणांतर्गत" अंतर्भूत नाही काय? हे थेट बोलल्याबद्दल सर्वाधिक आश्चर्य. . "एकच सहचारी (पार्ट्नर)" हे एक मूल्य यापेक्षा व्यावहारीक स्तरावर किती महत्त्वाचे आहे curt statement . माझ्या पाहण्यात तरी ज्या दोन्-चार मराठी सायटी नि त्यावरचे धागे आहेत, त्यामध्ये असा धागा पाहण्यात आलेला नाही. . अवांतरः- सहजीवनाअची एक इमेज निर्माण केली जाते जी अतिशय रोझी असते, खरं तर वास्तवापासून दूर असते. ह्याबद्दल थोडसं बोलायला आवडएल. पण ते अवांतराकडं जाइल. शिवाय नेमकं शब्दांत पकडता येत नाहिये सध्या.
  • Log in or register to post comments

आजपासून पुढे महिना दीड महिना

रेवती
Tue, 01/22/2013 - 20:00 नवीन
आजपासून पुढे महिना दीड महिना आमच्या मुलाच्या शाळेत त्याच्या इयत्तेला यावर तासीका असणार आहे. यावर्षी मुलामुलींना एकत्र बसून ऐकता येईल असे ज्ञानदान होईल ;), तर पुढील वर्षी मुली व मुलांचे स्वतंत्र गट करून माहिती करून देण्यात येईल. आमच्या फक्त मुलींच्या शाळेत फक्त मासिक धर्म यापेक्षा जास्त (वैद्यकीय)माहिती मिळाली होती शुचीतै. मन१, याविषयावर स्वाती२ ताईंचा एक धागा बराच पूर्वी येऊन गेला होता.
  • Log in or register to post comments

http://misalpav.com/node

शुचि
Tue, 01/22/2013 - 20:12 नवीन
http://misalpav.com/node/20247 - टीन एजर्स आणी एस टी डी
मन१, याविषयावर स्वाती२ ताईंचा एक धागा बराच पूर्वी येऊन गेला होता.
हा धागा असावा. पण तांत्रिक कारणांमुळे त्यातील मजकूर हरवला आहे.
आजपासून पुढे महिना दीड महिना आमच्या मुलाच्या शाळेत त्याच्या इयत्तेला यावर तासीका असणार आहे. यावर्षी मुलामुलींना एकत्र बसून ऐकता येईल असे ज्ञानदान होईल , तर पुढील वर्षी मुली व मुलांचे स्वतंत्र गट करून माहिती करून देण्यात येईल.
माझ्या मुलीशी यावेळेला "बोलायचे" आहे. आतापर्यंत अनोळखी लोकांपासून, धोक्यापासून स्वतःला कसे दूर ठेवायचे त्याबद्दल सांगून झाले. आता पुढची पायरी. शाळेतूनही ज्ञानवर्धन होतेच आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती

आणखीही एक धागा आला होता

रेवती
Tue, 01/22/2013 - 20:27 नवीन
आणखीही एक धागा आला होता स्वाती२ताईंचा. थोडी गंमत गोष्ट लिहिल्यासारखा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शुचि

"एकच सहचारी (पार्ट्नर)" हे एक मूल्य -

संजय क्षीरसागर
Tue, 01/22/2013 - 20:06 नवीन
यापेक्षा व्यावहारीक स्तरावर किती महत्त्वाचे आहे याचा कशी उहापोह झालेला माझ्या माहीतीत नाही. नैतिक मूल्य-मूल्य म्हणून ती डोक्यावर घेतलेली गोष्ट आहे पण त्याच गोष्टीला जबरदस्त व्यावहारीक मूल्य आहेच हे कधी हायलाईट होत नाही .
हेच तर विवाहाच सर्वोच्य रहस्य आहे. `सहजीवनाचं व्यावहारिक मह्त्त्व' असं शीर्षक द्यायला हवं होतं. ते यथार्थ झालं असतं. पोस्ट द्विशतकी होणार याबद्दल संशय नाही!
  • Log in or register to post comments

here's my 2 cents!

अग्निकोल्हा
Tue, 01/22/2013 - 20:17 नवीन
Well! You know ? I believe in holistic education system. थोडक्यात क्रियेविणे वाच्या व्यर्थ आहे. प्रॅक्टीकल शिवाय शिक्षण मरतं आहे... असे म्हणतो.
  • Log in or register to post comments

आमच्या संपादक मित्राच्या

अन्या दातार
Tue, 01/22/2013 - 20:18 नवीन
आमच्या संपादक मित्राच्या प्रतिक्रियेच्या प्रतिक्षेत!
  • Log in or register to post comments

नक्की कोण?

पैसा
Tue, 01/22/2013 - 20:22 नवीन
चिंचवडवाले की मुंबैकर?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अन्या दातार

दोन्ही !! संपादकीय चर्चेचा

सूड
Wed, 01/23/2013 - 00:13 नवीन
दोन्ही !! संपादकीय चर्चेचा फार्स वाचायला मिळेल. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

+१

स्पा
Wed, 01/23/2013 - 12:09 नवीन
+१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

कोणताही संपादक मुंबईकर नाही

गवि
Wed, 01/23/2013 - 12:17 नवीन
कोणताही संपादक मुंबईकर नाही अशी माझी माहिती आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा

+१

स्पा
Wed, 01/23/2013 - 12:18 नवीन
+१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

बरं

पैसा
Wed, 01/23/2013 - 14:11 नवीन
ठाणे आणि नवी मुंबई पण घ्या त्यात. आमची मुंबै सर्वांना आपलं म्हणते! :D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा

हे चुकिचे आहे .

जेनी...
Wed, 01/23/2013 - 21:26 नवीन
हे चुकिचे आहे . एकतरि संपादक आमच्या मुंबईचा हवाच ... मुंबईकरांवरचा अन्याय कदापि सहन केला जाणार नाय :-/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

गवि............... काय बोलताय

विश्वनाथ मेहेंदळे
गुरुवार, 01/24/2013 - 01:02 नवीन
गवि............... काय बोलताय काय ?? अहो मुंबईच्या मध्यवर्ती भागातून चांगले ४-५ संपादक असताना तुम्ही असे म्हणता. मुंबईचा भूगोल नीट वाचा..... काही अडले तर सांगा, पुढील संदर्भ देतो. आणि शिकवणीसाठी शिक्षकांची नावे पण सांगतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

म्हणजे ?? मीनाक्षीला संपादक

सूड
गुरुवार, 01/24/2013 - 01:32 नवीन
म्हणजे ?? मीनाक्षीला संपादक केलेनीत का काय? दादरला राहते म्हणून ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विश्वनाथ मेहेंदळे

दादर नाही रे बाबा, मुंबईचा

विश्वनाथ मेहेंदळे
गुरुवार, 01/24/2013 - 02:17 नवीन
दादर नाही रे बाबा, मुंबईचा मध्यवर्ती भाग म्हणालो. कुणी सांगितले तुला दादर मध्यवर्ती आहे म्हणून ?? तुला ना काही म्हणजे काही माहित नाही. पुण्यात गेल्याने तुझे मुंबईबद्दलचे ज्ञान outdated झाले आहे. सध्या इतकेच अवांतर पुरे या धाग्यावर. बरा चालला आहे धागा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

सततच्या भूलभुलैय्याच्या

मदनबाण
Tue, 01/22/2013 - 20:43 नवीन
सततच्या भूलभुलैय्याच्या भडीमारामुळे , हार्मोनल बदलांमुळेदेखील मुलामुलींचे मन भरकटू शकते. शाळा/ विद्यालयांमधून वास्तवाची जाण करुन देण्याचे किती प्रयत्न होतात? महत्वाचा प्रश्न ! आपण जे पाहतो त्यावर विचार करतो,तसेच आपल्या मनावर त्याचा परिणाम होत असतो,मग कामोत्तेजन वाढवणार्‍या गोष्टी किती गोष्टी आपल्या पाहण्यात सध्या येतात ? जाहिराती पासुन ते चित्रपटां पर्यंत, तर इंटरनेट हा अगदी मुक्त पर्याय आहे.मग मनावर नियंत्रण कसे ठेवावे ( विशेषतः त्या वयात) हे शिकवणे गरजेचे वाटते का ? बरं हा छुपा भडिमार कसा होतो याचे उत्तम उदा. म्हणजे subliminal messages चा वापर ! अनेक जाहिरातदार याचा शाब्दिक किंवा दॄष्य स्वरुपात वापर करत असतात. अगदी उदा. द्यायचे झाले तर सध्या हिंदुस्थानात डियो विकणार्‍या कंपन्यांच्या जाहिराती पाहिल्यात तर अमुक एक स्प्रे वापरल्या तर स्त्रीया येउन बिलगतील किंवा उत्तेजित होतील असा काहीसा आशय साधला जातो...म्हणजे सेस्क्युअल भावनेला हात घालुन उत्पादन विकणे...यात तुमच्या मनावर नक्की कोणता परिणाम होत असावा ? एक चित्र इथे उदा. म्हणुन देत आहे. Image removed. (चित्र जालावरुन घेण्यात आले आहे.) यात सेक्स हा शब्द दिसला ? (जालावर अशा अनेक जाहिराती आहेत ज्यात याचा वापर कसा केला जातो ते तुम्हाला पाहता येईल.) अश्या मेसेजेस वापर करुन जाहिरात टिव्हीवर दाखवण्यास युके मधे बंदी आहे. अश्या आणि अनेक स्वरुपात तुमच्या मनावर कामुक भावनांचा भडिमार होत असेल तर नियंत्रण कसे ठेवायला हवे हे सुद्धा लैगिक शिक्षणात आले पाहिजे. बरं सेक्स एज्युकेशन आणि सेफ सेक्स ही संकल्पना परदेशात बरीच प्रगल्भ असताना तिथे परिस्थीती काय आहे ? तर अमेरिकेतल्या Philadelphia मधील २२ शाळांमधे काँडम व्हेंडिग मशिन्स बसवण्यात आलेली आहेत ! कारण तिथे STD ( sexually transmitted diseases) चा रेट जास्त आहे. लैंगिकता हा मानवी जिवनाचा अविभाज्य भाग आहे,परंतु त्याच्या आहारी जाणे योग्य नाही असा संदेश लैंगिक शिक्षणात दिला जाईल का ? काही संदर्भः- Condom vending machines installed in 22 public high schools in Philadelphia Philadelphia Tries Out Condom Vending Machines To Combat ‘Epidemic’ STD Rates Should High Schools Install Condom Vending Machines? Subliminal advertising leaves its mark on the brain Subliminal advertising really does work, claim scientists
  • Log in or register to post comments

तुमच्या मनावर कामुक भावनांचा

शुचि
Tue, 01/22/2013 - 20:51 नवीन
तुमच्या मनावर कामुक भावनांचा भडिमार होत असेल तर नियंत्रण कसे ठेवायला हवे हे सुद्धा लैगिक शिक्षणात आले पाहिजे. लैंगिकता हा मानवी जिवनाचा अविभाज्य भाग आहे,परंतु त्याच्या आहारी जाणे योग्य नाही असा संदेश लैंगिक शिक्षणात दिला जाईल का ?
उत्तम पैलू मदनबाण.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण

असा संदेश लैंगिक शिक्षणात

शुचि
Tue, 01/22/2013 - 21:03 नवीन
असा संदेश लैंगिक शिक्षणात दिला जाईल का ?
हा संदेश पालक या नात्याने आपण मुलांना नक्की देऊ शकतो. वर म्हटल्याप्रमाणे उत्तमच पैलू आहे. पण , जर काही कारणाने जर लैंगिकतेबद्दल "ऑबसेसिव्ह" विचार येऊ लागले तर ते कसे हाताळायचे, याचं भान मुलांना देणे हेदेखील तितकेच महत्त्वाचे आहे. फक्त "दमन" हा त्यावरचा उपाय होऊ शकत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण

ब-याच गोष्टी शाळेतल्या लैंगिक

सांजसंध्या
गुरुवार, 01/24/2013 - 20:41 नवीन
ब-याच गोष्टी शाळेतल्या लैंगिक शिक्षणात मिळणार नाहीत असं वाटतं. पालक म्हणून काही टक्के पालक थेट संवाद साधूही शकतील. माझ्या मते वयात आलेल्या मुलांना लैंगिक समुपदेशनाची नक्कीच गरज आहे. कच्च्या विषयांसाठी शिकवणी लावणे, आजार पडल्यावर डॉक्टरकडे जाणे हे जितकं सहज होतं तितकंच वयात येणा-या पिढीसाठी समुपदेशनाचे चांगले कोर्सेस उपलब्ध असणे गरजेचे आहे. आनंदी लैंगिक आयुष्य ही सुखी वैवाहिक जीवनाची गुरुकिल्ली आहे. दुर्दैवाने पुरुषाला आनंद घेणे इतकंच माहीत असतं. देणे हा ही महत्वाचा भाग आहे हे त्याच्या गावीही नसतं. या साठी तरी नक्कीच गरज आहे. हेमाशेपो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शुचि

दुर्दैवाने पुरुषाला आनंद घेणे

शुचि
गुरुवार, 01/24/2013 - 20:51 नवीन
दुर्दैवाने पुरुषाला आनंद घेणे इतकंच माहीत असतं. देणे हा ही महत्वाचा भाग आहे हे त्याच्या गावीही नसतं.
जनरलाइज्ड स्टेटमेंट आहे. अजून एक मुद्दा मांडावासा वाटतो तो हा की - स्त्रीला उत्तेजित करणं ही सर्वस्वाने पुरषाची जबाबदारी आहे हा गैरसमज आहे. स्वतःच्या शरीराची ओळख नीट असल्याने स्त्रीनेदेखील टेक्निकस वापरुन स्वतःचे स्वतःला संभोगासाठी उद्दीपीत करणे महत्त्वाचे असते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सांजसंध्या

स्वतःच्या शरीराची ओळख नीट

तर्री
गुरुवार, 01/24/2013 - 22:05 नवीन
स्वतःच्या शरीराची ओळख नीट असल्याने स्त्रीनेदेखील टेक्निकस वापरुन स्वतःचे स्वतःला संभोगासाठी उद्दीपीत करणे महत्त्वाचे असते. १०० % सहमत आणि ९० % दुर्लक्षित मुद्दा. स्री आणि पुरुष मिळून माणसाला जेवढे अवयव आहेत त्यामध्ये मदन ध्वज तथा क्लियटोरीस हा एकच अवयव असा आहे की जो केवळ "आनंद निर्मिती " साठी ( गेवाने / निसर्गाने ) बनवला आहे. बाकी इतर सर्व अवयवांना लैगिक सुखाबरोबर पुनरुत्पादनाची कामेही विधात्याने दिली आहेत. हया नितांत सुन्दर योजनेला समजून न घेता , स्त्री - पुरुषांकडून सर्वसाधारण पणे "तिकडे " अत्यंत "अरसिकतेने पाहण्यात येते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शुचि

वाचतेय ....

जेनी...
Tue, 01/22/2013 - 21:05 नवीन
वाचतेय .... मला पैसा ( आमच्या सासुबै ) , गवि , पिंडा काका , आणि आत्ताच्या पिढितले सदस्य बॅटमॅन ( माझा भौराअब्या ) , किसन शिंदे , नैनी( म्रुगनैनी ) पियुशा , ह्यांच्या सविस्तर प्रतिक्रिया अपेक्षित आहेत ... वाचतेय बर्का .. एक अवांतर : वास्तव म्हणजे सेफ सेक्स काय?? -------------------------------------------- अगं शुचि वास्तव म्हणजे संजय दतचा पिच्चर नै का येउन गेला ??? तु पण ना :-/
  • Log in or register to post comments

श्री. ज . जोशी आणि कामजीवन .

तर्री
Tue, 01/22/2013 - 23:01 नवीन
पुण्याचे प्रशिध्द लेखक श्री.ज.जोशी यांचा "पुणेरी (?) हया पुस्तकात , आमच्या पिढीचे कामजीवन हा एक लेख वाचला होता. त्यावेळी मी दहावीत होतो. "मराठीमध्ये" असे काही लिहिलेले असेल याची कल्पना मला नव्हती. तो पर्यन्त काही पिवळी पुस्तके वाचून झाली होती. जोशी बुवांचा तो लेख वाचून "सेक्स " हा विषय पंचांगा इतका पवित्र,शुद्ध असु शकतो हे जाणवले. पिवळी पुस्तके वाचून बीघडलेला माझा हया विषयाकडे पाहण्याचा कल बदलला. हया विषयातले अनेक पैलू आहेत. शरीररचना , प्रजोत्पादन , संतती नियमन , समाज , प्रेम भावना , गुप्त रोग , लिंग आणि योनी ची स्वच्छता, मुलींना , स्रियांना सार्वजनिक ठिकाणी स्पर्शाचे संकेत , सम्भोग , गरज , भावना व आनंद, लैगिक व्यक्तिमत्व व स्वातंत्र्य अश्या अनेक संदर्भातून चर्चा होऊ शकते आणि ती तशी करणे आवश्यक असते. काय सांगतो हया बरोबर कसे सांगतो ह्यावर "फोकस " असावा. साधारण ३/४ टप्पे करून चर्चा पुढे नेता येईल. फुले , फळे. प्राणी यांचे संदर्भ असतील तर मुलांना हे शिक्षण जास्त नैसर्गिक वाटते. माझे काही मुद्दे : १.पुस्तके वाचायला देवून हे काम अधिक सोपे करता येईल. २.कोड वर्ड असल्यास बोलणे सोपे जाते . उदा. एफ. आर. एस. म्हणजे फिमेल रेप्रोड्क्टीव सिस्टीम व एम.आर. एस. म्हणजे मेल रेप्रोड्क्टीव सिस्टीम. ३.अनेक आई वडील , मुलांना "कटवून , फुटवून " संभोग करतात.(जागे आभावी तसे करावेही लागते म्हणा.) अश्या वागणुकीने संभोग हे "चोरून" करण्याची गोष्ट आहे हे मुलांच्या मनावर बिंबते.तरीही १८ वर्षे वयाच्या (समजूतदार)मुला मुलींना "आम्हाला प्रायवसी हवी आहे " असे स्पष्ट सांगून पहावे. ४.लग्न , हनिमून , गरोदरपणा , गर्भपात , मासिक पाळी ह्यां विषयावर बोलताना मुलांनी प्रश्न केल्यास त्याचे स्वागत करा , संधी चालून आली आहे असे समजा. टाळाटाळ ण करता थेट व स्पष्ट बोल अवांतर : मुलांना शिक्षण देण्या आधी महिलांनी हया विषयात निदान आपल्या नवऱ्याशी / पार्टनरशी मोकळेपणी बोलायला काय हरकत आहे ? बहुतांश महिला आपल्या कामाजीवानातील आवडी निवडी नवऱ्याशी / पार्टनरशी बोलत नाहीत , कारण बायकांचे असे बोलणे समजून घेणारे नवरे / पार्टनर फारच विरळा.
  • Log in or register to post comments

प्रतिसाद आवडला.

शुचि
Tue, 01/22/2013 - 23:18 नवीन
आपण मांडलेले पैलू योग्यच वाटतात.
काय सांगतो हया बरोबर कसे सांगतो ह्यावर "फोकस " असावा. साधारण ३/४ टप्पे करून चर्चा पुढे नेता येईल.
हा अ‍ॅप्रोच बरोबर वाटला.
.पुस्तके वाचायला देवून हे काम अधिक सोपे करता येईल.
सोपे करता येईल या मुद्द्यास सहमती मात्र नंतर थेट संवादातून अधिक चांगल्या रीतीने पार पडेल यावर भर. "वयात येताना" हे पुस्तक पौगंडावस्थेत वाचले होते. शतायुषी आदि मासिकांतील लेखांचादेखील उपयोग झाला.
अनेक आई वडील , मुलांना "कटवून , फुटवून " संभोग करतात.(जागे आभावी तसे करावेही लागते म्हणा.) अश्या वागणुकीने संभोग हे "चोरून" करण्याची गोष्ट आहे हे मुलांच्या मनावर बिंबते.
शक्य आहे. नव्हे तसेच असावे. उपाय स्वीकारार्ह वाटतो.
लग्न , हनिमून , गरोदरपणा , गर्भपात , मासिक पाळी ह्यां विषयावर बोलताना मुलांनी प्रश्न केल्यास त्याचे स्वागत करा , संधी चालून आली आहे असे समजा. टाळाटाळ ण करता थेट व स्पष्ट बोल
थेट व स्पष्ट संवाद उत्तमच. माझ्या आठवणीत लहानपणी (५ वी ६ वी) मध्ये मी शतायुषीतील लेख वाचून "अंगावर पांढरे जाणे, लाल जाणे" आदि वाक्यांचा अर्थ विचारला होता. अर्थात उत्तर मिळाले नाही. पण माझ्यापुढे जर असे आव्हान आले, तर मी निराळ्या रीतीने हाताळेन हे नक्की. एकंदर मो़कळेपणा, थेटपणा व योग्य ज्ञान यावर भर योग्यच वाटतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्री

एक वाचलेली कविता

मुक्तसुनीत
Tue, 01/22/2013 - 23:32 नवीन
"उत्पल" नावाचे आमचे एक मित्र आहेत त्यांची कविता या संदर्भात मला आठवली. मूळ कवितेची लिंक देता आली असती तर आवडले असते. परंतु ते शक्य दिसत नाही. म्हणून कविताच देतो. ------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------ जगन रेप कर. असं जगनला कुणी सांगत नाही. जगन आपणहूनच रेप करतो. शाळेत गेलेला, न गेलेला, एमबीए केलेला, न केलेला, फेसबुकवर असलेला, नसलेला जगन असे जगनचे प्रकार आहेत. त्यातले सगळेच रेप करू शकतात. जगन इतरवेळी कदाचित चांगलाही असेल. पण तरी तो कमलवर पाळत ठेवून मोका मिळताच तिच्यावर झडप घालतो. आणि नंतर तिला अमानुषपणे मारूनही टाकतो. जगन वाईट आहे. भयानक वाईट. पण वाईट जगनपैकी एकाची एक केस आहे. या केसमधल्या जगनला इतर जगनसारखंच पंधरा-सोळाव्या वर्षी इरेक्शन आलं. कमलला न्हाण आलं त्याच्या एक-दोन वर्षांनंतर. इरेक्शन आल्यावर काय करायचं हे त्याला आई-बाबांनी सांगितलं नाही. कारण त्यांना त्याचा संकोच वाटायचा. कमलला पाळी आली की आई तिला काय करायचं ते सांगते. पण जगनला इरेक्शन आलं की काय करायचं हे बाबा त्याला सांगत नाही. कारण बाबालाही ते कुणी सांगितलं नव्हतं. बाबाच्या बाबाने त्याला एकदा नग्न बायकांची चित्रं असलेलं पुस्तक वाचताना पकडलं होतं आणि मारलं होतं. पण इरेक्शनचं काय करायचं हे सांगितलं नव्हतं. बाबाने तीसएक वर्षांपूर्वी हेलनला नाचताना बघून हस्तमैथुन केलं होतं. आता तर नाचाची खूप प्रगती झालीय. जगनपुढे आता खूप बायका नाचतात. मल्लिका, मुन्नी, शीला वगैरे सगळया. शिवाय कॅमेरा त्यांच्या शरीरावर फिरतो. कारण कॅमेऱ्याला हे माहीत आहे की जगनला ते आवडेल. आणि कॅमेऱ्याच्या मागच्या माणसांना खूप पैसे मिळतील. असे खूप जगन तयार करणं हे कॅमेऱ्याचं ध्येय आहे. पण ते असो. चूक जगनची आहे. जगनही मग हस्तमैथुन करतो. ते करताना एकदा आईने पाहिलं तर तिने भंजाळून जाऊन बाबाला सांगितलं. बाबाने मार खाल्ला होता, म्हणून त्याने जगनला पण मार दिला. पण मार खाऊन इरेक्शन थांबत नाही. म्हणून मग जगन पुन्हा नाच बघतो, संभोगचित्रांची पुस्तकं वाचतो, ब्ल्यू-फिल्म बघतो. आणि हस्तमैथुन करतो. आपली परंपरा फार थोर आहे. तिचा विजय असो. आपल्या परंपरेनं शिकवलं आहे की लग्नाआधी संभोग वाईट. त्यामुळे लग्नापर्यंत थांबून नंतर सगळी कसर भरून काढली तरी चालेल. म्हणजे पहिल्या रात्री बायकोला त्रास झाला तर चालेल. पण लग्नापर्यंत स्त्रीचं कौमार्य अबाधित राहिलं पाहिजे. त्यामुळे जगन नग्न बाईचे फोटो बघत थांबतो. शिवाय अशा नग्न बायकांना वाईट समजलं जातं. कारण त्या जगनला बिघडवतात. पण जगनला त्या आवडतात. कारण ज्याच्यामुळे इरेक्शनपासून सुटका मिळते ते जगनला चांगलं वाटतं. पण इरेक्शन कायमचं कधीच संपत नाही. जगनला आता 'बाई' हवीच असते. तो कमलकडे आता बाई म्हणूनच बघू लागतो. आणि एके दिवशी तिच्यावर झडप घालतो. जगनचं जनावर होतं. दुर्दैवाने जगन पुरूष आहे. संस्कृती प्रगत झाली तरी संस्कृतीकडे अजूनही इरेक्शनला उत्तर नाही. शिवाय इरेक्शनबरोबरच जगनला अजून एक महत्त्वाचं शिक्षण मिळतं. पुरूषसत्ताकतेचं. म्हणजे बाबा कुटुंबप्रमुख. आई त्यानंतर. जगन, तू मुलगा आहेस. मुलींसारखा रडतोस काय? जगन, तू मुलांच्यात बस बघू. मुलींबरोबर कसला बसतोस? जगन, मुली फक्त क्रिकेटमध्ये नाचण्यासाठी असतात. क्रिकेट खेळायचा असतो मुलांनी. जगन, स्वयंपाक तू नाही करायचास. पण तुला प्लंबिंग आलं तर चांगलं आहे. जगन, बायकांना डोकं जरा कमीच असतं. त्यामुळे त्यांनी शक्यतो घरीच बसावं. जगन, तू मर्द आहेस. बाईला जिंकणं यात मर्दानगी असते. वगैरे. आधीच इरेक्शन आणि त्यात पुरूषसत्ताकतेचं इंजेक्शन. जगन पार बिघडून गेलाय. त्याच्यातला हिंस्त्रपणा जनारांनी लाजावं इतका वाढलाय. कमलच्या मृत्यूनंतर तिच्या मैत्रिणी, आई-बाबा आणि परंपरा सगळ्यांनाच जगनचा प्रचंड राग येतो. त्याला फाशी द्यावी असं वाटतं. जगनला फाशी जरूरच द्यावी. त्याने जगन नक्की मरेल. पण नर उरेल. कारण नर आणि मादी कधीच कायम मेलेले नाहीत. अजूनही मरत नाहीत. नर पुन्हा हस्तमैथुन करत वाढेल आणि पुरूषसत्ताकतेचं इंजेक्शन त्याला दिलं जाईल. आणि मादी पुन्हा अनंतकाळ पहात असलेली वाट पहात राहील. शुभंकर संभोगाची. - उत्पल
  • Log in or register to post comments

मुक्तसुनीत - अप्रतिम प्रतिसाद!

संजय क्षीरसागर
Wed, 01/23/2013 - 00:25 नवीन
उत्पलना अशीच एक कविता कमलच्या बाजूनं करायला सांगा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्तसुनीत

धन्यवाद

मुक्तसुनीत
Wed, 01/23/2013 - 00:26 नवीन
धन्यवाद. मला तुमच्या सुचवणीमागे काय म्हणायचं ते नीटसं समजलेलं नाही. थोडं उलगडून सांगाल का ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

कविता जगनच्या मानसिकतेच वर्णन आहे

संजय क्षीरसागर
Wed, 01/23/2013 - 00:33 नवीन
कमलच्या मानसिकतेचं असंच काही असेल
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्तसुनीत

शक्य आहे.

मुक्तसुनीत
Wed, 01/23/2013 - 00:36 नवीन
>>>कमलच्या मानसिकतेचं असंच काही असेल <<< शक्य आहे. १. उत्पल यांनी पुरुषाच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने ही कविता लिहिलेली आहे. २. कविता बलात्काराच्या संदर्भात होती. लैंगिकतेसंदर्भातली पुरुषांची जडणघडण , त्याची प्रक्रिया किती विविध प्रकारच्या विसंगतींनी युक्त आहे ते कविता उत्तम रीतीने मांडते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

सॅड बट ट्रू

बॅटमॅन
Wed, 01/23/2013 - 00:46 नवीन
सॅड बट ट्रू :(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्तसुनीत

कविता इथे दिल्याबद्दल धन्यवाद

शुचि
Wed, 01/23/2013 - 00:53 नवीन
दाहक सत्य मांडले आहे कवितेत. कविता विचारास खरच प्रवृत्त करते.
शिवाय इरेक्शनबरोबरच जगनला अजून एक महत्त्वाचं शिक्षण मिळतं. पुरूषसत्ताकतेचं.
पुरुषसत्ताकता, योनीशुचिता हे तर पैलू आहेतच पण मधुराभक्ती, शिवलिंग (लिंग व योनीचे एकत्र प्रतिक) आदि काही गोष्टींनी सेक्सकडे पहाण्याचा दृष्टीकोन जो बदलतो त्याचे काय हा देखील प्रश्न आहेच. इतकं पवित्र, पवित्र जे या गोष्टीला (जी की खरं तर नैसर्गिक प्रेरणा व क्रिया) मानले गेले आहे ते देखील तद्दन चूकीचे वाटते. जसा मिळेल त्या नराने मिळेल त्या मादीबरोबर संग करणे (व व्हाईसे व्हर्सा) हे एक टोक झाले तसेच शुभंकर संभोग हे दुसरे टोक झाले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्तसुनीत

>>>शुभंकर संभोग हे दुसरे टोक

मुक्तसुनीत
Wed, 01/23/2013 - 00:57 नवीन
>>>शुभंकर संभोग हे दुसरे टोक झाले. <<< "शुभंकर संभोग" हे मलाही काय नीटसं समजलेलं नव्हतं. पण ते तुमच्या प्रतिसादात आलेल्या गोष्टींइतकं क्लिष्ट किंवा महाभयंकर पवित्र वगैरे असेल असं काय वाटलं नव्हतं. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शुचि

अश्या प्रश्नांना उत्तरे

कवितानागेश
Wed, 01/23/2013 - 00:04 नवीन
अश्या प्रश्नांना उत्तरे देण्यासाठी आपला स्वतःचा अभ्यास चांगला असणं आवश्यक आहे. नाहीतर काहितरी सांगताना आपलाच चेहरा गांगारला, तर मुले अजून गोंधळतात. आणि शाळेवर किंवा पुस्तकांवर अवलंबून रहाण्यापेक्षा स्वतः माहिती दिलेली चांगली. त्यामुळे पालक आणि मुलांमधे विश्वास वाढतो.
  • Log in or register to post comments

डॉ विठ्ठल प्रभू

सुनील
Wed, 01/23/2013 - 00:18 नवीन
डॉ विठ्ठल प्रभू यांचे ह्या विषयावर एक पुस्तक आहे. आता नाव विसरलो.
  • Log in or register to post comments

निरामय कामजीवन..

दादा कोंडके
Wed, 01/23/2013 - 01:09 नवीन
हे पुस्तक आम्ही अकरावित असताना हॉस्टेलवर पोस्टानी मागवलं होतं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुनील

निरामाय कामजीवन

तर्री
Wed, 01/23/2013 - 09:13 नवीन
निरामाय कामजीवन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुनील

पहिली पायरी

चित्रगुप्त
Wed, 01/23/2013 - 00:40 नवीन
या विषयावर तांत्रिक दृष्ट्या प्रगत असलेल्या संस्कृतींपेक्षा आदिम, अदिवासी संस्कृतीतून शिकण्यासारखे बरेच काही आहे. त्याबद्दल कुणाचा अभ्यास असल्यास अवश्य लिहावे. मनुष्येतर प्राण्यात बलात्कार होत नसावेत. आदिवासींमधे (शहरीकरणापासून दूर असलेल्या) होतात किंवा कसे, ठाऊक नाही. लैंगिक शिक्षणाची पहिली पायरी नग्नतेकडे सहजतेने बघायला शिकणे/शिकवणे हे होऊ शकते. खजुराहो वगैरेच्या काळची संस्कृती आजच्यापेक्षा जास्त निकोप, प्रगल्भ होती असे म्हणता येईल. खिस्ती शिकवणीपासून (आदम आणि ईव्हचे आदिम पाप वगैरे) नग्नता/कामप्रेरणा धिक्कारली जाऊ लागली, असे वाचनात आले आहे. याविषयी नेमके काय घडले, हे कुणी सांगेल का?
  • Log in or register to post comments

संस्कृती

अभ्या..
Wed, 01/23/2013 - 01:39 नवीन
या विषयावर तांत्रिक दृष्ट्या प्रगत असलेल्या संस्कृतींपेक्षा आदिम, अदिवासी संस्कृतीतून शिकण्यासारखे बरेच काही आहे.
म्हणजे परत बॅक टू बेसिक्स का? मग घोटूल वगैरें? आधी खुलेपणा मग बंदिस्त मग त्याचापण जाच होऊन परत मर्यादित खुलेपणाचा आग्रह. पुढे काय? आणि हिच जर संस्कृती असेल तर त्यात विकृती कशी शिरली? याची कारणे शोधायला हवी खरेतर. तीच या प्रश्नांची उत्तरे असतील.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चित्रगुप्त

मुळात समाजाशी निगडित प्रत्येक

बॅटमॅन
Wed, 01/23/2013 - 02:18 नवीन
मुळात समाजाशी निगडित प्रत्येक गोष्ट सायक्लिक असते, एकच एक असा प्रवास शक्यतो असत नाही. आणि हे बदलेल असे मला वाटत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

हम्मम्म

मी_आहे_ना
Sun, 01/27/2013 - 06:58 नवीन
सध्या कामानिमित्त सिडनीला आहे, आणि बाजुलाच एका प्रसिद्ध वृत्तवाहिनीचे कार्यालय आहे, गेल्या आठवड्यात तिथे त्यांच्या प्रसिद्ध वार्ताकाराने 'स्तनपान तितकेसे खुलेपणाने चारचौघात (नक्की शब्द सुचत नाहिये) करण्याची गोष्ट नाही' असे म्हणले आणि दुसर्‍या दिवशीच सकाळ पासून निषेधासाठी शेकडो माता जमल्या... ऑस्ट्रेलियामधे एकूणच बायकांचा प्रभाव सर्व क्षेत्रांत आहे, पण शेवटी त्यांनीही ही लढाई सोडायचे ठरवले आहे. (प्रतिसाद अवांतर वाटला तरी संदर्भ नग्नतेकडे निकोपतेने पाहण्याचा आहे.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

निषेध होणारच....

प्रभाकर पेठकर
Sun, 01/27/2013 - 10:01 नवीन
'स्तनपान तितकेसे खुलेपणाने चारचौघात (नक्की शब्द सुचत नाहिये) करण्याची गोष्ट नाही'
निषेध होणारच. त्यांनी 'अर्भकास स्तनपान .....' असे लिहीणे जास्त सयुक्तिक ठरले असते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मी_आहे_ना

हा हा..

दादा कोंडके
Sun, 01/27/2013 - 13:22 नवीन
:)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर

कहर !

परिकथेतील राजकुमार
गुरुवार, 02/14/2013 - 16:29 नवीन
पेठकर काका __/\__
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर

मनुष्येतर प्राण्यात बलात्कार

मदनबाण
Wed, 01/23/2013 - 17:24 नवीन
मनुष्येतर प्राण्यात बलात्कार होत नसावेत. बहुतेक Orangutan आणि chimpanzees बलात्कार करतात.(जालावर या बद्धल जास्त माहिती मिळणे कठीण जाते आहे.) संदर्भः- http://alturl.com/hhhji आदिवासींमधे (शहरीकरणापासून दूर असलेल्या) होतात किंवा कसे, ठाऊक नाही. आदिवासींमध्ये बलात्कार होत नाहीत: डॉ. राणी बंग
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चित्रगुप्त

तरी चालेल

अभ्या..
Wed, 01/23/2013 - 21:14 नवीन
आदिवासींमधे (शहरीकरणापासून दूर असलेल्या) होतात किंवा कसे, ठाऊक नाही.
हे विषयसूत्र परत योनीशुचिता येथेच जाते. गरज आहे ती जीवनमूल्यांबद्दल मानसिकता बदलायची. लैंगिक शिक्षणच पुरेसे नाही त्याला. आणि हे काही ठराविक सिलॅबसने साध्य होईल असे वाटत नाही. संस्कारी पालक हाच बेस्ट पर्याय. अर्थात ही पण खूप लांब चालणारी प्रक्रीया असेल. सुरुवात अशी होत असेल तरी चालेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण

खिस्ती शिकवणीपासून (आदम आणि

शुचि
गुरुवार, 01/24/2013 - 19:36 नवीन
खिस्ती शिकवणीपासून (आदम आणि ईव्हचे आदिम पाप वगैरे) नग्नता/कामप्रेरणा धिक्कारली जाऊ लागली, असे वाचनात आले आहे. याविषयी नेमके काय घडले, हे कुणी सांगेल का?
खाली एका लेखाचा दुवा दिलेला आहे त्यातील हा पॅरा - Only religions still take sex seriously, in the sense of properly respecting its power to turn us away from our priorities. Only religions see it as something potentially dangerous and needing to be guarded against. Perhaps only after killing many hours online at youporn.com can we appreciate that on this one point religions have got it right: Sex and sexual images can overwhelm our higher rational faculties with depressing ease. Religions are often mocked for being prudish, but they wouldn't judge sex to be quite so bad if they didn't also understand that it could be rather wonderful. हा लेख जरुर वाचा - http://www.psychologytoday.com/articles/201212/12-rude-revelations-about-sex
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चित्रगुप्त

या वयात लैंगीकता व फँटसि या

अग्निकोल्हा
Wed, 01/23/2013 - 00:59 नवीन
या वयात लैंगीकता व फँटसि या दुधात पाणी असावं इतक्या एकजीव स्वरुपात असतात. माणसाला बोलायला लाज लैगिकतेची न्हवे तर त्यासोबतच्या फँटसिजची असतें. त्याची सावलीही चर्चे मधे उघड होउ नये इतपत ती नकोशी असते. सभ्यपणाचा बुरखा फँटसिवर असतो. अश्लिलता ही फँटसिला धरुन असते आणि लैगीक शिक्षण म्हणजे फँटसि वगळुन लैंगिक माहितीचे केलेले हस्तांतरण होय. पण लैंगीकता व फँटसि मुळातच एका नाण्याच्याच दोन बाजु आहेत... अनं दर वेळी फक्त एकच बाजु उलगडवणे नक्किच जिकरीचे काम आहे.
  • Log in or register to post comments

या फँटसीज (उघड) करावयास,

शुचि
Wed, 01/23/2013 - 01:13 नवीन
या फँटसीज (उघड) करावयास, बोलावयास जीवाभावाची/चा मित्र-मैत्रिण का शोधू नये? किंबहुना असे कोणी शोधले अन मिळाले तर अन्य कोणाचे (समाजाचे) पोट का दुखावे हा एक प्रश्न आहेच. सामाजिक पैलू झाला. माझ्याकडेदेखील सर्व प्रश्नांची उत्तरे नाहीतच, पण प्रश्न मात्र आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अग्निकोल्हा
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा