एकापेक्षा एक.
स्थळ: मुंबै (आणी आश्चर्यकारकरित्या मराठी दुकानदार)
"एक ** साइझ ची अंडरवेयर द्या ह""
"कोणाला हवी आहे" - दुकानदार
"मलाच" - मी आश्चर्याने (ऐश्वर्या रायला हवी असेल तर मी कशाला येइन मरायला. हे मनात)
"** ची घ्या. ** होणार नाही तुम्हाला" - इति दुकानदार (दुकानातल्या इतर ३-४ गिर्हाइकांसमोर)
" ("भोसडिच्या" हे मनात) अंडरवेयर मी घालतो तर साइझ मला माहिती असणार ना?"
" लोक मुद्दाम कमी सांगतात. आणी मग बदलुन मागतात"
"तुम्ही वापरलेली अंडरवेयर बदलुन देता?"
" आमी नाहिच देत हो. पण कष्टमर येतात त्याला काय करायचे?"
"("ढेकण्या" हे परत मनात) मग तुमी द्या ना. मी बघेन माझे मी काय करायचे ते"
" घ्या मला काय करायचे आहे? फाटली तर बदलुन मिळणार नाही"
" तुम्ही सांगितल्याप्रमाणे ** ची घेतली आणि फाटली तर बदलुन मिळेल?"
(हा अनपेक्षित प्रश्न होता. पकडला रे पकडला. हे परत आपले मनातच)
दुकानदार देखील गोंधळला. पण वरकरणी चेहरा निर्विकार ठेवत " नाही फाटलेल्या चड्ड्या आम्ही बदलुन देत नाही"
"ठीके द्या रुपाची एक ** ची. मी बघेन माझे मी"
"रुपाची नाही आमच्याकडे"
इथे हा त्यापुढे आमच्याकडे वापरलेल्या मिळत नाहित असे म्हणेल असे जाणवल्याने मी फारसे ताणले नाही. आजुबाजुला माझ्या मित्रांपैकी काही करप्ट मित्र असले असते तर "रुपाची द्या" या शब्दावर फिदीफिदी हसले असते. त्यामुळे मग मी सावरुन लगेच व्हीआयपी मागितले. ते ही नव्हते. मग म्हटले जी असेल ती द्या.
"एकाच रंगाच्या आहेत" - दुकानदार
"द्या हो. काय फरक पडतो? कोण बघायला येतय रंग" मी वातावरण निवळवण्याच्या दृष्टीने एक क्षीण प्रयत्न केला
" ते आमाला काय माहित नाय. रंग बदलुन मिळणार नाही."
( "रत्ताळ्या तुझ्याकडे एकाच रंगाची एकाच कंपनीची अंडरवेयर असेल तर मरायला तु बदलुन देणार तरी कुठुन?" हे परत आपले मनात)
थोडा वेळ शोधुन झाल्यावर दुकानदार परत:
"** ची नाही आमच्याकडे ** ची च आहे. तीच घ्या. तुमाला नीट बसेल" (असे आहे होय? म्हणून ** ची घ्या म्हणत होतास होय रे ****) मी स्वतःच्या थोतरीत २ बडवुन घेतल्या (हे पण मनातच. च्यायला स्वतःकडे साइझ नाही म्हणुन जे आहे ते माझ्या गळ्यान मारु बघणार्या त्या फडतुस दुकानदारासाठी मी कशाला खरोखर स्वतःला २ लगावुन घेउ?)
अवांतरः तुमची साइझ काय आहे ते नाही सांगितलेत असला हलकट प्रश्न विचारणार्यांचा अपमान केला जाइल हे लक्षात घ्यावे ;)
*******************************************************************************
स्थळ: मालवण. एक नावाजलेली खाणावळ
साधारण दुपारी २ वाजता. मालवणच्या बाजारात शाकाहारी भोजनाची (मालवणात शाकाहारी भोजन शोधणारे म्हटल्यावरच निम्म्या लोकांच्या चेहर्यावर तुच्छ भाव येतील) वाट शोधणारे पुण्यातले ७ अभागी जीव. शाकाहारी भोजनाच्या सर्व वाटा एकाच खाणावळीत जाउन थांबतात असे कळल्याने वणवण हिंडत (मालवण कितीसे मोठे म्हणा असे)एकदाचे इच्छित स्थळी पोचले. छोट्याश्या खाणावळीत तुडुंब गर्दी भरलेली. मालकांनी दारातच स्वागत केले ( न जाणो चुकुन आत वगैरे घुसले म्हणजे जेवायला घालावे लागेल. खाणावळ चालवत असलो म्हणुन काय झाले असे कोणालाही आत येउ देउ का आम्ही? )
" ७ जणांसाठी जेवायला मिळेल का?"
"थांबायला लागेल. गर्दी आहे"
"साधारण किती वेळ"
"ते कसे सांगणार? बसलेले लोक उठले की देतो तुम्हाला"
"काय मेन्यु आहे?"
मेन्यु शब्द उच्चारल्यावर चेहर्यावर कमालीच खवट भाव आले. तो शब्द अस्थायी होता असे अगदी त्या भुकेल्या जीवांना देखील वाटले (मी त्या भुकेल्या जीवांपैकी एक होतो. खोटे कशाला बोला.)
" भेंडीची भाजी, ताकातला पालक, आमटी, पोळी, भात, कोशिंबीर, चटणी"
" उकडीचे मोदक मिळतील का?"
"उकडीचे मोदक काय असे कधीही मिळतात का हो?" (आम्ही उकडीचे मोदक मागुन प्रचंड मोठा प्रमाद केला आहे हे आम्हाला तत्क्षणी लक्षात आले. पेटा वाल्यांसमोर जाउन "बेबी क्रोकोडाइल" मिळेल का असे विचारल्यावर तो जेवढा मोठा प्रमाद होइल. तेवढाच मोठा)
" पीठ चाळावे लागते, मळावे लागते. भिजवावे लागते. बराच वेळ लागतो"
"आत्ता ऑर्डर दिली तर संध्याकाळी मिळतील का?" आम्ही भयानक भीत भीत अतीव आदराने विचारले.
"२ दिवस आधी ऑर्डर द्यायला लागते हो. लगेच मिळत नाहित"
"ओल्या काजुची उसळ मिळेल का?" "ऑर्डर दिली तर. संध्याकाळी" आम्ही घाईघाईने अॅडवले. कारण अजुन एकदा मालकांनी खेकसणे परवडणार नव्हते. खाण्यापिण्याचे आधीच वांधे होते.
" हा ओल्या काजुंचा सीझन नाही. या दिवसात ओल्या काजुची उसळ आमच्याकडे मिळत नाही"
"इतर कुठे मिळु शकेल का?"
"कोपर्यावर अजुन २-३ हॉटेल्स आहेत. तिथे बघा मिळतीय का. मी ग्यारंटी देत नाही. चांगली असेल की नाही. आमच्याशिवाय इतर कुठे चांगली मिळते का ते मला माहिती नाही"
"बर आत्ता तर बराच वेळ लागेल असे दिसते आहे. आम्ही निघतो. संध्याकाळी मिळेल ना जेवण"
"ते आत्ता कसे सांगु शकतो? संध्याकाळी या. वेळेत आला, शिल्लक असेल तर नक्की देतो"
केवळ पुणेकर असल्याच्या पुर्वपुण्याईवर इतका अपमान सोसुनही आम्ही न खचता तिथुन बाहेर पडलो.
*******************************************************************************
स्थळ: पुणे. मध्यवस्तीतले आता बंद पडलेले एक उडुपी उपाहार गृह
" १० चीज बर्गर द्या हो" ( मास्तरच्या पैशाने खायला मिळते आहे तर का सोडा या सदसदविवेकबुद्धीने पार्सल घ्यायाला आलेला एक यडचाप तरुण. एरवी गपगुमान हातगाडीवरचा वडापाव खाणार. पण फुकट मिळतय तर "आम्ही ब्वॉ रोज चीज बर्गरच खातो") (मीच तो. मीच तो. )
"थोडा रुको. अभी देता है"
१५ मिनिटांनतर "देताय ना. उशीर होतो आहे"
" बन ला रहा है. रुकिये ५ मिनिट सिर्फ" (उशिर होतो आहे म्हटल्यावर रुको च रुकिये झाले होते आता. थोड्यावेळाने तो "स्सार प्लीज वेट फोर ५ मिनिट्स स्सार." असेही म्हणाला)
हे बन ला रहा है प्रकरण मला काही झेपले नाही. इथे काय बर्गरची ऑर्डर मिळाल्यावर जवळच्या बेकरीतुन बन आणायला पळतात का?
अजुन १० मिनिटांनी " किती वेळ लागेल अजुन?"
"क्या स्सर?" (आता याला मराठी कळेनासे पण झाले. बोलता तर आधीपासुनच येत नव्हते)
"कितना टाइम लगेगा? अर्धे घंटेसे वाट बघ रहा हू मै. अभी क्या चीज लावोगे क्या?"
"स्सार प्लीज वेट फोर ५ मिनिट्स स्सार."
अजुन १० मिनिटानी मरो ते बर्गर म्हणुन उठु पाहणार्या माझ्या हातात १० बर्गर शेवटी एकदाचे कोंबले गेले.
मी धावत पळत ऑफिसला गेलो. एव्हाना मास्तरचे ४ फोन आले होते (हापिसात गेल्यावर काय रे गाय पकडुन तिचे दूध काढुन त्याचे चीज करुन घेउन आलास काय? असे ऐकायला लागले ते वेगळे)
बर्गरचे खोके उघडल्यावर अस्मादिकांच्या लक्षात आले की अरेच्चा यात तर कटलेटच नाही. फक्त चीजच आहे. (बनसुद्धा बनपावाचा बन होता हो).
चरफडत अखेर ते तसेच खाल्ले. परत जाउन घेउन येण्याइतकी भूक कोणाला धरवत नव्हती. बर्गर (सॉरी चीज बन) खाता खाता सगळे मला शिव्या घालत होते.
हा अपमान असह्य होउन मी एक बाणेदार पुणेकर तडक त्या मद्राश्याच्या हॉटेलात जाउन धडकलो.
"तुम्हारे बर्गर मै कटलेट नही था"
"ऐसा हो ही नही सकता"
"मग मी काय खोटे बोलतोय का?" रागवताना इनोदी हिंदी नको म्हणुन मी सुंबडीत मराठीवर आलो.
त्यावर २ मद्रासी एकमेकांशी अगम्य भाषेत यंडु गंडु पांडु नारु सारु असे काहिसे बोलले आणि मग तिसराच बाबा माझ्याकडे आला.
"क्या हुआ सर?"
एव्हाना रागावर नियंत्रण मिळवलेला मी त्याला सर्व डिटेलात सांगण्याच्या मुडात आलो होतो. सगळे ऐकुन त्याच्या चेहर्यावर "देयर यु आर" असे भाव आले:
"चीज बर्गर मे कटलेट नही होता है सर? व्हेज बर्गर मे होता है. आपने चीज बर्गर लिया था ना? तभी तो."
"चीज बर्गर मध्ये कटलेट नसते? काहितारी काय? सगळीकडे मिळते"
"नही सर इटली मे भी ऐसेहीच रहता है"
"इटलीत पिझ्झा मिळतो. बर्गर नाही"
" हा. पर हमारे यहा बर्गर ऐसेही मिल्ता है"
"अर्रे तुम कल बर्गर मे शेपुकी भाजी डाल के दोगे और बोलोगे हमारे यहा ऐसेहीच मिलता है. ऐसा थोडेही ना होता है?" (माझ्या चेहर्यावर क्षणभर गड सर केल्याचे भाव होते. क्षणभरच राहिले)
"हमारे यहा शेपुकी भाजे नही डालते बर्गर मे" म्यानेजर ने तेवढ्याच मख्खपणे सांगितले.
यानंतर त्या **** शी भांडण्याचे त्राण अंगात नसल्याने आणि असाही तो बर्गर फु़कटच असल्याने (माझ्यासाठी. दिडक्या मास्तरने मोजल्या होत्या ना), मी हताशपणे चालता झालो. जाताना "ऐसा करोगे तो हॉटेल बंद हो जायेगा जल्दी ही" असे म्हणायला विसरलो नाही. माझी शापवाणी खरी ठरली. थोड्याच वर्षात हॉटेलचा बाजार उठला. आता तिथे एक कॅफे दिमाखात उभा आहे. पण अजुनही त्या जागेत जायचे धैर्य होत नाही मला.
*********************************************************************************
काही नाही पुण्यातले मराठी दुकानदार सौजन्य महर्षी वाटतील असे दुकानदार जगात अस्तित्वात आहेत हे सांगण्यासाठी हा लेखनप्रपंच.
वर्गीकरण
प्रतिक्रिया
नग सर्वत्रच असतात तसे, पण
जबाराट !
फुडच्या लेकनास आमच्या जोर्दार
किस्से धमाल आहेत, पण...(तोच
सहमत.
तुम्ही जर मालवणातल्या गणेश
गणपाशी सहमत
ज्येष्ठ संपादक गणपाभौंशी शमत
किस्से भारी आहेत. आणि
धमाल किस्से
काजूची उसळ खरेच प्रत्येक
शमत आहे. पण कोकणात शेकडो
पण कोकणात शेकडो वेळा जाउन
आमच्यासमोर कोकण आणि पुण्यास
....सहमत..
इथे वर्णन केलेली दोन दिवसांची
तर तर. दोन्ही आमचेपण आहेच की.
कोकण आणि पुणे दोन्ही आमचे आहे
रेवती, तुझे आणि माझे. खुश?
मस्त लेख..
+१००-१
दया करा देवा. एका लग्नात वाट
-
छान
मस्त
YEKAPEKSHA EK mastach aahet
"sudya" सुड्या ???
मस्त!! आवडले किस्से.
किस्से आवडले.
जबराट !
> ऐश्वर्या रायला हवी असेल तर
मृत्युंजया, पहिला किस्सा लय
ही ही ही !
हाहाहा!
ज्योताय, असं नाय म्हणायचं गं!
बरं बरं
तसंही आता पुणंही तुमचंही आहेच
पुणं पैसाताईचं कस्काय ब्वॉ?
आहे आहे थोड्ड्सं!
तुमची साइझ काय आहे ते नाही
च्यामारी प्रत्यक्ष ओळखणार्
साईझ
सर्व प्रतिसादकर्त्यांचे
आवल्ड