Skip to main content

अघळपघळ, इकडचं तिकडचं - १

लेखक कॉमन मॅन यांनी गुरुवार, 02/08/2012 13:51 या दिवशी प्रकाशित केले.
पाकचे प्रधानमंत्री झरदारींनी आपल्या आदरणीय सरदारजींना, देश के बडे वीरजी - मनमोहन सिंगांना आता पाकिस्तानात यायचे आग्रहाचे निमंत्रण दिले आहे.. हम्म.. म्हणजे मनमोहनपंतांनी तेथे जाऊन त्यांच्या मस्तपैकी गोष्त-बिर्यानीचा खाना कुबुल केल्यानंतर आणि पाकड्यांशी नव्याने दोस्ताना केल्यानंतर थोड्याच अवधीत पुन्हा भारताने पाक-पुरस्कृत काही अतिरेकी कारवायांना सज्ज राहण्यास हरकत नाही..! --------------------------------------------------------------------------------- याला म्हणतात इमान - याला म्हणतात भक्ती.. - याला म्हणतात लाळ गाळणे..! नुकतेच काँग्रेसचे आमदार संजय दत्त यांनी आमदारकीची शपथ घेताना "जय सोनिया.. " असा नारा दिला.. काय म्हणावे या स्वामिभक्तीला.. वा! आमचा तर ऊर अगदी भरून आला आहे..! आमदार संजय दत्त यांचा इटालियन बाणा आणि लाळगाळूपणा पाहिल्यानंतर च्यामारी आमचे विनायक राऊत थोडेच मागे राहतील?? त्यांनीही शपथ घेताना "जय बाळासाहेब.. " असा खणखणीत नारा देऊन उपस्थितांना हादरवून सोडले..! ----------------------------------------------------------------------------------------- राष्ट्रवादीच्या आमदार विद्याताई चव्हाणांकडून साक्षात मादकतेचा धडधडीत अपमान..! विद्याताईंच्या लिखित तक्रारीची दखल घेऊन मुंबईचे महापौर सुनील प्रभू यांनी मुंबईतील उद्याच प्रदर्शित होऊ घातलेल्या जिस्म -२ ची सर्व पोस्टर्स काढून टाकण्याचा आदेश दिला आहे. काय हे? अहो पोर्नस्टारदेवी साक्षात सनी लीऑनची किती भव्यदिव्य, सुरेख आणि मादक पोस्टर्स होती ती..! हंत हंत..! आम्ही तर असे ऐकले आहे की कर्दनकाळ ढोबळेसाहेबांच्या जीपच्या मागेही लोखंडवाल्यातल्या काही उच्चभ्रू कार्ट्यांनी सनीचे पोस्टर लावले होते..!; ) ---------------------------------------------------------------------------------- आजचे बाजारभाव - सोने - १० ग्रॅम - रुपये २९५३० चांदी १ किल्लो - रुपये ५३००० / / / / / / / / कोथिंबीर - एक जुडी - रुपये १६० ते २००..! ------------------------------------------------------------------------------------ आजचे अघळपघळ संपले. धन्यवाद...! आपलाच, -- कॉमॅ.

वाचने 3847
प्रतिक्रिया 20

प्रतिक्रिया

एका वेळेस इतकं वात आल्यासारखं लिहू नका हो. बोर्डावर इतर लोकांना पण संधी द्या. अर्थात हा प्रतिसाद तुम्हाला आवडणार नाही पण स्वतःवर काहीतरी बंधन घाला ! दिवसाला जास्तीत जास्त एक लेख असे काही करा. बघा तुम्हीच. लिहायला हरकत नाही. पण मग लोक दुर्लक्ष करतील तर तुमचीच चीडचीड होईल. हे मिपा आहे याचे फेसबूक ऑरकूट करु नका. संपादकांनी माझा प्रतिसाद पाहून मिपाचा उकिरडा झाला वा कुठल्या धोरणाची पायमल्ली झाली असे वाटल्यास उडवला तरी हरकत नाही.

In reply to by नाना चेंगट

चेंगटराव, आपण कळकळीने केलेल्या सर्व सूचनांबद्दल आभारी आहे. आम्ही त्यावर अवश्य विचार करू..
दिवसाला जास्तीत जास्त एक लेख असे काही करा.
ही सूचना तर विशेष आवडली.. :)
संपादकांनी माझा प्रतिसाद पाहून मिपाचा उकिरडा झाला वा कुठल्या धोरणाची पायमल्ली झाली असे वाटल्यास उडवला तरी हरकत नाही.
चेंगटरावांचा प्रतिसाद उडवू नये अशी संपादकांना विनंती. आम्ही या प्रतिसादाचे मनापासून स्वागत करतो. 'निंदकाचे घर असावे शेजारी..' या उक्तीवर आमची श्रद्धा आहे! :)

In reply to by कॉमन मॅन

>>>>चेंगटरावांचा प्रतिसाद उडवू नये अशी संपादकांना विनंती. आम्ही या प्रतिसादाचे मनापासून स्वागत करतो. 'निंदकाचे घर असावे शेजारी..' या उक्तीवर आमची श्रद्धा आहे! Smile तुमची लाख असेल, संपादकांची पण हवी ना ! त्यांनी टिक२० फवारले म्हणजे ? ऑ !! सांगा तुम्ही !!

In reply to by नाना चेंगट

काय उकिरडा लावलाय रे मिपाचा ? तुला काय धोरणं वैग्रे कळतात का नाही ? अवांतर प्रतिसाद स्वतःच्या खवत लिहित जा बरे. उगाच तुझ्या अवांतराने कोमल हृदयाच्या आणि मिसळपाव साठी आयुष्य वाहिलेल्या सदस्यांना त्रास व्हायला नको.

In reply to by स्पा

कॉमन मॅन हा इन्ट्या आहे????????? (अरे कुणीतरी सतारीचे ते टिपीकल सूर लावा.... आनंद पोटात आमच्या मावेना रे मावेना! अब वो दिन फिर आयेंगे जब हम स्टॅमिना का कस देखने वाला ट्रेक करेंगे| : ) : ) )

In reply to by प्यारे१

इंट्या अरे आवर स्वताला किति जिलब्या पाडतोस. आधि कॊल फोडायचास आता जिलब्या कॉमन मॅन हा इन्ट्या आहे????????? (अरे कुणीतरी सतारीचे ते टिपीकल सूर लावा.... आनंद पोटात आमच्या मावेना रे मावेना! अब वो दिन फिर आयेंगे जब हम स्टॅमिना का कस देखने वाला ट्रेक करेंगे| : ) : ) )
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) इन्ट्या!!..... तुझी किती रुपं रे!!!! ;)

हा "खरा" डुआयडी.

नान्या तुम्झ्याशी सहमत आहे रे.... पण त्यांच्या मानवी हक्कांची पायमल्ली होत असेल तर त्यांचा ही नायलाज असेल

In reply to by विजुभाऊ

पण त्यांच्या मानवी हक्कांची पायमल्ली होत असेल तर त्यांचा ही नायलाज असेल
हा आमचा मानवी हक्क नसून एक सभासद या नात्याने मिपावर लिहिण्याचा हक्क आहे. अर्थात, चेंगटरावांच्या सूचनांचाही आम्ही आदर करतो आणि त्यावर विचार करू, असेही आम्ही चेंगटरावांना सांगितले आहे..

In reply to by कॉमन मॅन

हा आमचा मानवी हक्क नसून एक सभासद या नात्याने मिपावर लिहिण्याचा हक्क आहे मिपावर लिहीणारे बहुतेक सभासद मानव आहेत. सभासदांच्या म्हणजे पर्यायाने "मानवी हक्कांची ";असेच होते ना? त

आज इकडचे ('इकडचे' म्हणजे 'इथले'. पूर्वीच्या बायका म्हणायच्या ''इकडून' येणे झाले' पैकी नाही) तापमान ४५ डि. से.

आज रामदेवाच्या मंचावर एन डी ए चे नितीन गडकरी, शरद यादव इत्यादी प्रभुती हजर झाल्या होत्या.. याचा अर्थ हे आंदोलन केवळ काँग्रेसविरुद्ध आहे.. काळा पैसा, भ्रष्टाचार वगैरे सगळा मुखवटा आहे.. रामदेवाचा राजकीय अजेंडा आहे हे खरं.. रामदेवाने म्हणे संसदेला घेराव करण्याकरता मोर्चा काढला आहे.. बास झालं आता.. उचला या बाबा रामदेवाला.. :)

In reply to by गणामास्तर

इथे प्रश्न आमच्या सहीचा आणि विचार जुळण्याचा नाही.. रामदेवबाबांना आंदोलन करायचा हक्क निश्चितच आहे. तो ना सरकारने नाकारला आहे, ना आम्ही.. परंतु आंदोलनाच्या नावाखाली ते जो काही तमाशा करत आहेत, लोकशाही आहे म्हणून दिल्लीच्या रस्त्यावर पाच पाच तास वाहतुक कोंडी करायची, बसवर चढून भाषणं द्यायची, सतत काहीही करून मी कसा थोर, माझं आंदोलन कसं थोर, मीच काय तो या देशाचा कैवारी, सारी भारतीय जनता माझ्या पाठीशी आहे..अशी सतत दर्पोक्ती करायची याला काय म्हणावे?? काँग्रेस भ्रष्टाचारी नाही असा आमचा मुळीच दावा नाही. परंतु बेहेन सुश्री मायावतींचे काय? येडीयुरप्पांचा कर्नाटकातील भ्रष्टाचार? सपाचा उत्तरप्रदेशातील भ्रष्टाचार? आणि आता अशा मंडळींचे समर्थन घेऊन रामदेवबाबा त्यांना आपल्या रंगमंचावर थारा देतात..? या ढोंगाला काय म्हणावे?? काँग्रेस भ्रष्टाचारी आहे, तिला जाब विचारलाच पाहिजे, परंतु एकेकाळी स्वत:जवळ एकही पैसा नसणार्‍या रामदेवबाबांकडे अवघ्या १०-१२ वर्षात ११०० कोटींची संपत्ती आली कुठून हे विचारायचं नाही??