अघळपघळ, इकडचं तिकडचं - १
पाकचे प्रधानमंत्री झरदारींनी आपल्या आदरणीय सरदारजींना, देश के बडे वीरजी - मनमोहन सिंगांना आता पाकिस्तानात यायचे आग्रहाचे निमंत्रण दिले आहे..
हम्म.. म्हणजे मनमोहनपंतांनी तेथे जाऊन त्यांच्या मस्तपैकी गोष्त-बिर्यानीचा खाना कुबुल केल्यानंतर आणि पाकड्यांशी नव्याने दोस्ताना केल्यानंतर थोड्याच अवधीत पुन्हा भारताने पाक-पुरस्कृत काही अतिरेकी कारवायांना सज्ज राहण्यास हरकत नाही..!
---------------------------------------------------------------------------------
याला म्हणतात इमान - याला म्हणतात भक्ती.. - याला म्हणतात लाळ गाळणे..!
नुकतेच काँग्रेसचे आमदार संजय दत्त यांनी आमदारकीची शपथ घेताना "जय सोनिया.. " असा नारा दिला.. काय म्हणावे या स्वामिभक्तीला.. वा! आमचा तर ऊर अगदी भरून आला आहे..!
आमदार संजय दत्त यांचा इटालियन बाणा आणि लाळगाळूपणा पाहिल्यानंतर च्यामारी आमचे विनायक राऊत थोडेच मागे राहतील?? त्यांनीही शपथ घेताना "जय बाळासाहेब.. " असा खणखणीत नारा देऊन उपस्थितांना हादरवून सोडले..!
-----------------------------------------------------------------------------------------
राष्ट्रवादीच्या आमदार विद्याताई चव्हाणांकडून साक्षात मादकतेचा धडधडीत अपमान..!
विद्याताईंच्या लिखित तक्रारीची दखल घेऊन मुंबईचे महापौर सुनील प्रभू यांनी मुंबईतील उद्याच प्रदर्शित होऊ घातलेल्या जिस्म -२ ची सर्व पोस्टर्स काढून टाकण्याचा आदेश दिला आहे. काय हे? अहो पोर्नस्टारदेवी साक्षात सनी लीऑनची किती भव्यदिव्य, सुरेख आणि मादक पोस्टर्स होती ती..! हंत हंत..!
आम्ही तर असे ऐकले आहे की कर्दनकाळ ढोबळेसाहेबांच्या जीपच्या मागेही लोखंडवाल्यातल्या काही उच्चभ्रू कार्ट्यांनी सनीचे पोस्टर लावले होते..!; )
----------------------------------------------------------------------------------
आजचे बाजारभाव -
सोने - १० ग्रॅम - रुपये २९५३०
चांदी १ किल्लो - रुपये ५३०००
/
/
/
/
/
/
/
/
कोथिंबीर - एक जुडी - रुपये १६० ते २००..!
------------------------------------------------------------------------------------
आजचे अघळपघळ संपले. धन्यवाद...!
आपलाच,
-- कॉमॅ.
प्रतिक्रिया
एका वेळेस इतकं वात आल्यासारखं
चेंगटराव, आपण कळकळीने
>>>>चेंगटरावांचा प्रतिसाद
ए नान्या
जिलेबी
अगदी योग्य केले....
इंट्या अरे आवर स्वताला किति
कॉमन मॅन हा इन्ट्या
इंट्या अरे आवर स्वताला किति
स्पाला बरे सगळे डु आयडी माहित
बरोबर
नान्या तुम्झ्याशी सहमत आहे
पण त्यांच्या मानवी हक्कांची
हा आमचा मानवी हक्क नसून एक
अय्य्या इंटरनेट स्नेही
आमचेही जरा अघळ-पघळ.
चांगले सदर चालू केले आहे. भाग
आज रामदेवाच्या मंचावर एन डी ए
बास झालं आता.. उचला या बाबा
इथे प्रश्न आमच्या सहीचा आणि