Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by कौन्तेय on Wed, 07/18/2012 - 18:05
लेखनविषय (Tags)
कला
संगीत
संस्कृती
कविता
वाङ्मय
इतिहास
समाज
लेखनप्रकार (Writing Type)
प्रकटन
संदर्भ
शिफारस
माहिती
आस्वाद
विरंगुळा
॥ शिवकल्याणराजा ॥ लहानपणापासून कॅसेटवर ऐकत असलेली ही गाणी. शिवचरित्राभोवतीचं सगळं भावविश्व चपखलपणे लघुरूपात उभं करणारी. समर्थ रामदास, वीर सावरकर, कुसुमाग्रज, शंकर वैद्य आदि दिग्गजांच्या रचना, हृदयनाथ मंगेशकरांचं संगीत, लताबाईंचा आवाज नि खुद्द बाबासाहेब पुरंद्ऱ्यांच्या आवाजात ओजस्वी निवेदन! आणखी काय पायजे? हे संकलन काही वर्षांपूर्वी सीडी स्वरूपात आल्यावर एक एक गाणं वेगवेगळं ऐकता येत नाही ही बोच बरेच दिवस मनात होती. काल रात्री बैठक मांडून हे काम फ़त्ते केलं. सगळी गाणी अन्य उपकरणांवर सहज ऐकता तर येतीलच, पण आयफ़ोन/पॅड/पॉड सिंकेबलही आहेत. खालच्या दुव्यावरून उतरवा नि इतरांनाही द्या - http://sdrv.ms/MH1wyb जय भवानी! मी 'बलसागर भारत होवो'च्या शोधात आहे. शाळेतली चाल, सुधीर फ़डक्यांची नाही. बऱ्यापैकी क्वालिटी असलेली फ़ीत काही सापडत नाहीए. कुणाकडे असल्यास कृपया कळवावे.
  • Log in or register to post comments
  • 3988 views

प्रतिक्रिया

Submitted by विटेकर on Wed, 07/18/2012 - 18:16

Permalink

धन्यवाद !

झकास !
  • Log in or register to post comments

Submitted by पैसा on Wed, 07/18/2012 - 18:28

Permalink

धन्यवाद कौंतेय!

गाण्यांसाठी धन्यवाद!
  • Log in or register to post comments

Submitted by परिकथेतील राजकुमार on Wed, 07/18/2012 - 18:47

Permalink

मालक,

संकल्पना उत्तम आहे. मात्र हे कॉपीराईट कायदा उल्लंघन प्रकरण नाही ना ? नाही तर तुम्ही आणि मिपा दोन्ही गोत्यात यायचे.
  • Log in or register to post comments

Submitted by कौन्तेय on Wed, 07/18/2012 - 18:57

Permalink

जो पाइंट काढतो तो सुद्धा -

आक्सिडेन झाला की पोलिससमोर साक्षीदारी करायला सरसावलेला एखादा बघ्या गोत्यात यावा तसे तुम्हीसुद्धा! डोण्ट वरी - :-)
  • Log in or register to post comments

Submitted by परिकथेतील राजकुमार on Wed, 07/18/2012 - 19:39

In reply to जो पाइंट काढतो तो सुद्धा - by कौन्तेय

Permalink

हा हा हा

आम्हाला शाट फरक पडत नाही हो. मायक्रोसॉफ्ट पासून सगळ्यांना टांगून हिंडतो आम्ही. आम्हाला काळजी मिपाची.
  • Log in or register to post comments

Submitted by कौन्तेय on Wed, 07/18/2012 - 20:43

Permalink

मम!

मंडळात या (जॉइन द क्लब) - म्हंजे आपण सर्व त्यातलेच! मिपाची डिस्क्लेमर ती वेळ (आलीच तर) मारून नेईल. त्यामुळे काळजी नसावी. आपण ही देवघेव निव्वळ निरुपद्रवी छंदिष्टपणाने नि काही अंशी शिव-देशभक्तीने करत असल्याने फ़ार शंकाही नसावी. भावना पोहोचल्या. आमची आधीची पोष्ट जरूरीपेक्षा जास्त कडवी झाली म्हणून क्षमस्व. चरैवेति।
  • Log in or register to post comments

Submitted by sanjivanik१ on Wed, 07/18/2012 - 22:12

Permalink

खूप खूप धन्यवाद हा अमूल्य

खूप खूप धन्यवाद हा अमूल्य ठेवा उपलब्ध करून दिल्या बद्दल
  • Log in or register to post comments

Submitted by किसन शिंदे on Fri, 07/20/2012 - 08:50

Permalink

अनेक धन्यवाद मित्रा!!

अनेक धन्यवाद मित्रा!!
  • Log in or register to post comments

Submitted by कौन्तेय on Sat, 07/21/2012 - 13:36

Permalink

धन्यवादांचे आभार व आणखी पुन्य-प्राप्तीचा फार्म्युला

या गाण्यांची पुढे आणखी सहदेवघेव केली असालच. आणखी एक कलाकृती म्हणजे 'जाणता राजा' महानाट्याच्या तीन ऐकायच्या क्यासेट्स. पूर्वी मिळत असत. आता माझ्या माहितीप्रमाणे बन्द झाल्यात. कुणाकडे असतील तर एक करू शकता. कुणाही संगीत क्यासेट / सीडीज विकणार्‍या बर्‍यापैकी दुकानांत काही किंमत भरून त्याच्या एम्पी थ्री वा सीड्या करून भेटतील. त्या करा. नि वरीलप्रमाणेच हॉटमेलच्या फुकट भेटणार्‍या स्कायड्राइव्हवर पब्लिक शेअर करा. हे सर्व शिस्तीत करनारास वा करनारीस अपार पुन्यप्राप्ती होऊन सर्व शुभविच्छा फळतील याची ग्यारंटी आहे. बलसागर भारताच्या प्रतीक्षेतच आहे -
  • Log in or register to post comments

Submitted by मनोज श्रीनिवास जोशी on Sun, 07/22/2012 - 16:31

Permalink

अती आभार !

मस्तच !
  • Log in or register to post comments

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com