बोरिस पलेवोय या सोविएत लेखकाच एक सुंदर पुस्तक "स्टोरी ऑफ रीयल मॅन"नुकतच वाचण्यात आल्,एका अस्सल देशभक्ताची ही कहाणी आहे,हि कादंबरी एका खर्या व्यक्तीरेखेवर बेतलेली आहे.तो व्यक्ती म्हणजे अलेस्केइ मेस्सेरेव्ह जन्म २० मे १९१६,रशियातील एका सामान्य कुटुंबातला. काम्यशिन हे त्याच गाव कादंबरीत त्याच्या बालपणाबद्दल ही विस्तारानं लिहलेलं आहे,पण मला मुख्य मुद्द्या कडे यायच असल्याने तसेच विस्तार भयामुळे ते मी टाळतो.
तर हा अलेस्केइ,बाल पणा पासुनच विमानांबद्दल एक आकर्षण मनात घेउन मोठा झाला,साहजीकच मिलीटरी स्कुल मधुन शिक्षण घेउन पायलट बनला,विमानातुन उंच भरार्या मारण्याच त्याच स्व्प्न अशा रितीन साकार झाल,आता प्रत्यक्ष युध्दावर जाउन पराक्रम गाजवण्याची आस त्याला लागली होती ,तीही त्याला लवकरच मिळाली,१९४१ ला दुसरे महायुध्द सुरु झाल पोलंड वरच्या आक्रमणाची जबाबदारी त्याच्या तुकडीला मिळाली,अर्थात एका बाजुन जर्मनी व दुसर्या बाजुन रशिया अशा पोलादी पकडीत सापडलेल्या पोलंड सारख्या चिमुकल्या राष्ट्राकडुन प्रतिकार तो काय होणार म्हणा,त्यामुळे अलेस्केइला आपल्या कौशल्याचा कस लागल्यासारख वाटलच नाही.
रशियाचा खरा कस लागला तो जर्मनांच्या विरोधात. लुफ्तवाफ हे जर्मनांच विमानदल अत्यंत कसलेल व आक्रमक होत ,साहजीकच अलेस्केइ सारख्या शेकडो पायलटसचा आता खरा कस लागणार होता.
जर्मनीच आक्रमण रशियाला थोपवुन धरण अवघड होत,तरीही रशियन विमानदल पोलंडच्या प्रदेशात घुसुन हल्ले करत होत,मार्च १९४२ पर्यंत अलेस्केइनेही ४ जर्मन विमाने पाडली होती.
४ जुलॅ १९४२ अलेस्केइ नेहमी प्रमाणे आपल्या "पोलीकरपोव्ह-आय-१६"या आवडत्या विमानात बसुन आपल्या तुकडी सह निघाला. "सत्रय रुसा " या त्याच्याच मायभुमीतील एका भागात ठाण मांडून बसलेल्या गनिमाला मागे रेटण्याची जबाबदारी त्याच्या तुकडी वर होती. तुल्यबळ अशा जर्मन वॅमानिकांशी संघर्ष त्याला नेहमीच आवडत असे,मात्र आजचा दिवस त्याचा नव्हता,त्याचे विमान शत्रुने पाडले,आणी शत्रुने व्याप्त केलेल्या प्रदेशात त्याचे विमान अपघात ग्रस्त झाले.त्याचे नशीब बलवत्तर म्हणून तो वाचला मात्र त्याच्या पायांना जबरदस्त दुखापत झाली होती,त्यात विमान पडले ते ही बर्फाळ जंगलांमधे,आसपास मनुष्यप्राणी नाही आणी असलाच तर तो शत्रु असण्याची शक्यता आधीक. अपघातामुळे एका पायाच हाड सरकलेलं तर दुसर्या पायाला मोठी जखम झालेली, अशा परीस्थितीत जखमी पायांनी शत्रुला न दिसता जवळच एखाद रशियन गाव गाठण्याच प्रयत्न करणे हे एक आव्हान होते.
पण या पठ्ठ्याने ते आव्हान स्विकारले ,सरकलेल हाड प्रचंड वेदना सहन करत त्याने शक्य तितक बसवण्याचा प्रयत्न त्याने केला. त्यावर काठ्या वेलींच्या साह्याने बांधुन एक काठी कुबडी सारखी बनवुन बरोबर घेतली,आणी त्याचा प्रवास सुरु झाला,जवळ पाणी नव्हत फक्त हवाबंद मांसाचा एक डबा त्याच्या कडे होता,तो ही लवकरच संपला आणी मग सुरु झाला एक संघर्ष अन्न मिळवण आणी शत्रुला चुकवण याचा. या प्रवासात त्याला प्रचंड यातना सहन कराव्या लागल्या दोन-दोन दिवस खायला काही न मिळाल्यान त्यान साळींदराची शिकार कशी केली व ते कच्चेच अधाशी पणे त्याने खाल्ले . याच जबरदस्त वर्णन या पुस्तकात आहे.या प्रवासात जिवंत राहण्या साठी मुंग्या, किडे,कंद्,झाडाची पाने त्याने खाल्ली.
पायाच्या जखमा व बर्फ यामुळे शेवटी शेवटी तर चालणेही त्याला जमेना म्हणुन शेवटी सरपटत त्याला काही अंतर काटावे लागले,तब्बल १८ दिवस त्याने जंगलामधुन बर्फामधुन त्याने प्रवास केला, व अखेर शत्रुला चुकवुन एका रशीयन गावातअर्धमेल्या अवस्थेत तो पोहचला.गावकर्यांनी ८ दिवस कुणालाही न कळू देता त्याची सेवा केली,या ८ दिवसात रशीयन लष्करा लाही त्याच्याबद्दल कळवण्यात आले.व त्याला लष्कराने तातडीने मॉस्को च्या लष्करी अस्पताळा मधे दाखल करण्यात आले.तो पर्यंत पायाच्या जखमा विकोपाला गेल्या होत्या,त्याला प्रचंड धक्का बसणारी बाब म्हणजे त्याचे दोन्ही पाय गुडघ्या पासुन कापावे लागले.
२६ वर्षीय अलेस्केइ ६ महीन्यानंतर व्हिलचेअरवर अस्पताळातुन बाहेर पडला,त्याच्या जागी कुणीही सामान्य माणुस असता तर परीस्थीती पुढे झुकुन पेन्शन घेउन उर्वरीत आयुष्य शांतपणे आठवणींमधे जगला असता,पण...पण .. इथेच अलेस्केइ च वेगळेपण उठून दिसत,तो तिथुन बाहेर पडला तोच एक नवे स्वप्न घेउन,आणी ते अश्क्यप्राय स्वप्न होते ....पुन्हा विमान चालवण्याच.
लवकरच त्याला सरकारतर्फे लाकडी पाय मिळाले दोन्ही गुड्घ्यांवर ते पाय चामडी पट्ट्यांच्या साह्याने चढवुन उभे राहण तो हळूहळू शिकला,अतिशय वेदना सहन करत तासंतास तो लाकडी पायांवर तो उभा राही केवळ त्याचा सराव व्हावा म्हणून,कारण विमान उडवताना पायाचे कंट्रोल फार महत्वाचे होते,त्याचे लाकडी पाय त्याच्या इच्छेबरहुकुम हलावेत म्हणुन त्याने नॄत्य प्रशिक्षण वर्ग लावला,हळूहळु तो नॄत्य हि शिकला.
त्याच्या सहकार्यांनी या काळात त्याला साथ दिली. आता त्याच्या समोर मोठे आव्हान होते ते म्हणजे विमान चालवण्याची परवानगी मिळवण्याचे त्याने प्रयत्न सुरु केले.आणी सर्वच ठिकाणी त्याला नकार मिळाला,लष्करी नियमानुसार शारिरीक सक्षमता हिच महत्वाची असते. कित्येक ठिकाणी तर त्याला वेड्यात काढण्यात आले,पण शारिरीक न्युनतेवर आपल्या प्रचंड चिकाटीने मात करणारा अलेस्केइ हार न मानता तितक्याच चिकाटीने प्रयत्नांची शर्थ करु लागला,अखेर त्याच्या प्रयत्नांना यश मिळाल्,त्याला प्रशिक्षित पायलट बरोबर विमान उड्डानाची संधी मिळाली,व त्यात यश मिळाल्यानंतर त्याने स्वतंत्र उड्डान केले.
विमान उडवण्याचा त्याचा आत्मविश्वास आणी देशासाठी त्यागाची भावना लक्षात घेउन(अर्थात त्यावेळी रशियाला प्रशिक्षित पायलट्सची अत्यंत गरज होती)त्याला युध्दाअघाडीवर पाठवण्यात आले.या युध्दात पहील्याच उड्डानात त्याने जर्मनांची तीन एफ डब्लु-१९० फाइटर विमाने पाडली.तर संपुर्ण संघर्षात त्याने ११ शत्रुची विमाने पाडली.
युध्दानंतर त्याच्या या पराक्रमाची दखल रशियन सरकारने घेतली.२४ ऑगस्ट १९४३ ला त्याला "हिरो ऑफ सोव्हिएत युनियन "हा किताब देण्यात आला.हा त्यावेळचा सोविएत रशियातील सर्वोच्य लष्करी व नागरी पुरस्कार होता.
युध्दानंतर त्याने आपले पदवी चे शिक्षण पुर्ण केले.शिवाय इतिहास या विषयात पी.एच.डी. मिळवली.आणी सोविएत पक्षसंघटनेत कार्य करण्यास सुरुवात केली.१९ मे २००१ ला वयाच्या ८५ व्या वर्षी त्याचे निधन झाले.
बोरीस पलेवोय या कादंबर्री काराने त्याच्या जीवनावर ही कादंबरी लिहली,त्यावर आधारलेला "स्टोरी ऑफ रीअल मॅन "हा चित्रपट निघाला.खरोखरीच एखाद्या चित्रपटासारखी त्याची जिवन कथा होती.
वाचने
6438
प्रतिक्रिया
19
मिसळपाव
प्रतिक्रिया
फोटो टाकण्याचा प्रयत्न केला
फोटो दिसतोय का आता?
In reply to फोटो टाकण्याचा प्रयत्न केला by प्राध्यापक
धन्यवाद , बिका
In reply to फोटो दिसतोय का आता? by बिपिन कार्यकर्ते
ते पानिपताचं काय झालं हो?
लवकरच टाकीन पुढचा
In reply to ते पानिपताचं काय झालं हो? by प्रचेतस
छान
सुंदर परीचय
जबरदस्त
सुधा चंद्रन..
+१
In reply to सुधा चंद्रन.. by प्रभाकर पेठकर
अशा लोकांचं खुप कौतुक वाटतं.
'एका अस्सल माणसाची/रशियन
'एका अस्सल माणसाची/रशियन
In reply to 'एका अस्सल माणसाची/रशियन by मस्त कलंदर
सुंदर परिचय करून दिलाय या
अजुन दोन
छान!
-
एका अस्सल माणसाची कहाणी
एका सुंदर पुस्तकाची आणि