✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

हौतात्म्याची शताब्दी आणि अजरामर हौतात्म्यगीत

स
सर्वसाक्षी यांनी
Mon, 08/11/2008 - 00:21  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
12322 वाचन

💬 प्रतिसाद (31)

प्रतिक्रिया

फारच सुरेख

मदनबाण
Mon, 08/11/2008 - 00:55 नवीन
फारच सुरेख लेख.. या क्रांतीसूर्यास माझे अभिवादन.. मदनबाण..... "First, believe in the world-that there is meaning behind everything." -- Swami Vivekananda
  • Log in or register to post comments

असेच म्हणतो

बेसनलाडू
Mon, 08/11/2008 - 01:55 नवीन
(नतमस्तक)बेसनलाडू
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण

+१

विद्याधर३१
Mon, 08/11/2008 - 07:16 नवीन
त्या क्रन्तिसूर्याला माझे लक्ष लक्ष प्रणाम. विद्याधर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बेसनलाडू

अतिशय

चिन्या१९८५
Tue, 08/12/2008 - 18:54 नवीन
अतिशय सुंदर लेख्!!!!!!!!!ही माहीती पुरवल्याबद्दल शतशः धन्यवाद!!!!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विद्याधर३१

सर्वसाक्ष

बिपिन कार्यकर्ते
Mon, 08/11/2008 - 01:28 नवीन
सर्वसाक्षी, तुम्ही अत्यंत हृदयस्पर्शी लिहिले आहे. खुदिराम बोस यांच्या स्मृतिला लक्ष लक्ष अभिवादन. वयाच्या केवळ १८व्या वर्षी असे जीवन आणि त्याहून दिव्य असा मृत्यू. तुम्ही लिहिलेही छान आहे. व्यक्त इतकेच करू शकतो आहे. बाकीच्या भावना व्यक्त करण्याच्या पलिकडच्या आहेत. या लेखाच्या अनुषंगाने असा विचार मनात आला की शाळेत असताना याच खुदिरामांबद्दल धडा होता पण तो इतका नीरस पद्धतीने लिहिला आणि शिकवला गेला की मला प्रश्न पडला की हे तेच खुदिराम बोस का? जर शाळेत इतिहास असा लिहिला आणि शिकवला गेला तर? विद्यार्थ्यांना आवडेलच पण एक राष्ट्रिय भावनाही तयार होईल. नाही तर खुदिराम बोस फक्त बंगाल पुरतेच राहतात आणि वासुदेव बळवंत फडक्यांना वाली फक्त महाराष्ट्र. http://en.wikipedia.org/wiki/Khudiram_Bose बिपिन.
  • Log in or register to post comments

अतिशय सुरेख...

विसोबा खेचर
Mon, 08/11/2008 - 09:37 नवीन
मिपाला श्रीमंत करणारा अतिशय सुरेख लेख.... काव्यपंक्तिही सुरेख, गाणं ही हृदयाला हात घालणारं! अखेरची ओळ ही चटका लावणारी आहे. ’तॉखन जदि ना चिनते पारिश...’ कोट्यावधी लोकसंख्येच्या या देशात रोज हजारो-लाखो मुले जन्माला येतात; अग आई, त्यात तू मला नेमका कसा काय ओळखणार? तर मी सांगतो ती खूण लक्षात ठेव - ’देखबे गोलाय फाशी’....अगदी सोप आहे, ज्या बाळाच्या गळ्यावर फाशीच्या खुणा ताज्या दिसतील तोच मी! नि:शब्द! (नतमस्तक) तात्या.
  • Log in or register to post comments

वंदन

३_१४ विक्षिप्त अदिती
Mon, 08/11/2008 - 19:47 नवीन
अखेरची ओळ ही चटका लावणारी आहे. ’तॉखन जदि ना चिनते पारिश...’ कोट्यावधी लोकसंख्येच्या या देशात रोज हजारो-लाखो मुले जन्माला येतात; अग आई, त्यात तू मला नेमका कसा काय ओळखणार? तर मी सांगतो ती खूण लक्षात ठेव - ’देखबे गोलाय फाशी’....अगदी सोप आहे, ज्या बाळाच्या गळ्यावर फाशीच्या खुणा ताज्या दिसतील तोच मी! खरंच चटका लावून गेली ही ओळ! केवढं हे देशप्रेम आणि किती उदात्त त्याग केला या सर्व वीरांनी, म्हणून आज आपण स्वतंत्र देशात रहातो. त्या सर्वांना माझा विनम्र प्रणाम!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर

साक्षीजी..

स्वाती दिनेश
Mon, 08/11/2008 - 12:18 नवीन
हुतात्मा खुदिराम आणि असंख्य क्रांतीकारकांच्या भावना व्यक्त करणारा अतिशय हृदयस्पर्शी लेख. स्वत:च्या अवघ्या अस्तित्वाचीच स्वातंत्र्यासाठी होळी करणार्‍या क्रांतिसूर्याला नम्र अभिवादन, स्वाती
  • Log in or register to post comments

वा

आनंदयात्री
Mon, 08/11/2008 - 12:26 नवीन
वा सर्वसाक्षी, किती तरी दिसांनी तुमचा लेख वाचायला मिळाला. सुंदर लेख, गाण्याचा भावार्थ आवडला. शतशः धन्यवाद.
  • Log in or register to post comments

असेच म्हणतो

सहज
Mon, 08/11/2008 - 12:48 नवीन
Image removed. खुदिराम बोस यांच्या हौतात्माची बातमी "अमृत बाझार " पत्रीका (5-9-1908) स्थळ मुझफ्फरपुर कारागृह व त्या समोरील खुदिराम बोस यांचा पुतळा पहायला इथे टिचकी द्या नतमस्तक.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंदयात्री

दुवा दिसत

बिपिन कार्यकर्ते
Mon, 08/11/2008 - 14:04 नवीन
दुवा दिसत नाही. 'नॉट फाऊंड' एरर येतेय. बिपिन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सहज

अंगावर काटा आला...

मनिष
Mon, 08/11/2008 - 13:04 नवीन
वाचून अंगावर काटा आला...खूप भावस्पर्शी लेख आहे. "त्या" लोंकाना जागा दाखवली पाहिजे, इ. इ. लिहिणार्‍यांनी जरा कविचे नाव काळजीपुर्व़ वाचावे.
या लेखाच्या अनुषंगाने असा विचार मनात आला की शाळेत असताना याच खुदिरामांबद्दल धडा होता पण तो इतका नीरस पद्धतीने लिहिला आणि शिकवला गेला की मला प्रश्न पडला की हे तेच खुदिराम बोस का? जर शाळेत इतिहास असा लिहिला आणि शिकवला गेला तर? विद्यार्थ्यांना आवडेलच पण एक राष्ट्रिय भावनाही तयार होईल. नाही तर खुदिराम बोस फक्त बंगाल पुरतेच राहतात आणि वासुदेव बळवंत फडक्यांना वाली फक्त महाराष्ट्र.
हेच म्हणतो! :)
  • Log in or register to post comments

अशाच एका विषयावर मी लेख लिहिणार होतो.एका ठिपक्याची रांगोळी

रामदास
Mon, 08/11/2008 - 13:47 नवीन
पंधरा ऑगस्टच्या निमीत्ताने अशाच एका विषयावर मी लेख लिहिणार होतो.आता त्याची आवश्यकता वाटत नाही.ह्या सुंदर लेखातून तुम्ही ते काम पूर्ण केले आहे. आता ह्या पोवाड्यात मी फक्त जी जी रं जी म्हणणार आहे. आत्मस्तुतीचा धोका पत्करून काही ओळी इथे देत आहे. कितीही छोटा माणूस असू दे, आयुष्य ओवाळून टाकावी अशी एक तरी कविता तो लिहीत असतो,कधी बाळाच्या कानात कुर्र करून तर कधी आपडी-थापडी खेळून.आपल्या आयुष्याची कथा एका क्षणात सांगावी असा मोका प्रत्येकाला मिळतो.त्याची नोंद कुणि ठेवतं कुणि नाही ठेवत.इतिहास त्यांना लक्षात ठेवतो की नाही याची पर्वा नसते त्याच्या मनाला. आपल्याला प्रत्येकाला एका छोट्या ठिपक्याएव्हढं आयुष्य मिळतं.आपण कधीच बाहेर येऊ शकत नाही त्या ठिपक्याच्या.पण ही माणसं विलक्षण असतात.ते त्या ठिपक्याच्या परीघावर येतात. त्या सिमारेषेला आव्हान देतात. त्या सिमांच्या रिंगणातून आयुष्याला बाहेर काढतात.त्या परिघाची रेघ बनवतात,नागमोडी वळणं बनवतात, बघता बघता कॅनव्हास पण मोठा होत जातो. रेषांची गती वाढते,आणि एका ठिपक्यातून सुंदर रांगोळी तयार होते यांच्या आयुष्यात येणार्‍या प्रत्येक माणसाच्या स्वागतासाठी. स्वातंत्र्य दिनाच्या जवळपास हा लेख लिहून साधलेले औचीत्य कौतुकास्पद आहे.
  • Log in or register to post comments

पोवाडा तर

बिपिन कार्यकर्ते
Mon, 08/11/2008 - 14:02 नवीन
पोवाडा तर चांगलाच होता. पण, 'जी जी रं' सुद्धा ग्रेट. कितीही छोटा माणूस असू दे, आयुष्य ओवाळून टाकावी अशी एक तरी कविता तो लिहीत असतो,कधी बाळाच्या कानात कुर्र करून तर कधी आपडी-थापडी खेळून.आपल्या आयुष्याची कथा एका क्षणात सांगावी असा मोका प्रत्येकाला मिळतो.त्याची नोंद कुणि ठेवतं कुणि नाही ठेवत.इतिहास त्यांना लक्षात ठेवतो की नाही याची पर्वा नसते त्याच्या मनाला. आपल्याला प्रत्येकाला एका छोट्या ठिपक्याएव्हढं आयुष्य मिळतं.आपण कधीच बाहेर येऊ शकत नाही त्या ठिपक्याच्या.पण ही माणसं विलक्षण असतात.ते त्या ठिपक्याच्या परीघावर येतात. त्या सिमारेषेला आव्हान देतात. त्या सिमांच्या रिंगणातून आयुष्याला बाहेर काढतात.त्या परिघाची रेघ बनवतात,नागमोडी वळणं बनवतात, बघता बघता कॅनव्हास पण मोठा होत जातो. रेषांची गती वाढते,आणि एका ठिपक्यातून सुंदर रांगोळी तयार होते यांच्या आयुष्यात येणार्‍या प्रत्येक माणसाच्या स्वागतासाठी. क्या बात है.. बिपिन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रामदास

वा रामदासजी वा!

चतुरंग
Mon, 08/11/2008 - 21:09 नवीन
ते त्या ठिपक्याच्या परीघावर येतात. त्या सिमारेषेला आव्हान देतात. त्या सिमांच्या रिंगणातून आयुष्याला बाहेर काढतात.त्या परिघाची रेघ बनवतात,नागमोडी वळणं बनवतात, बघता बघता कॅनव्हास पण मोठा होत जातो. रेषांची गती वाढते,आणि एका ठिपक्यातून सुंदर रांगोळी तयार होते यांच्या आयुष्यात येणार्‍या प्रत्येक माणसाच्या स्वागतासाठी. फारच सुंदर! क्या बात है!! चतुरंग
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रामदास

सर्वसाक्श

अन्जलि
Mon, 08/11/2008 - 15:07 नवीन
सर्वसाक्शिजि तुमचा लेख वाचुन थरारल्यासारखे झाले. खुप सुन्दर. अशा गोश्टी जर मुलाना सान्गित्ल्या तर नक्किच फायदा होइल. १५/८ अणि २६/१ ह्या दिव्साचे महत्व त्याना खरया अर्थाने कळेल असे वाटते. तसेच रामदास ह्यानि दिलेला प्रतिसाद पण मनाला भावला. अतिशय सुन्दर.
  • Log in or register to post comments

सर्वसाक्षी,

चतुरंग
Mon, 08/11/2008 - 21:08 नवीन
केवढा त्याग! केवढे देशप्रेम! काय हे हौतात्म्य! सारंच थक्क करुन टाकणारं, डोळे दिपवून टाकणारं! शेवटची ओळ तर अक्षरशः काळजावरुन सुरा फिरवून गेली!! निशःब्द आणि नतमस्तक!! चतुरंग
  • Log in or register to post comments

सुंदर लेख !!!

सर्किट (verified= न पडताळणी केलेला)
Mon, 08/11/2008 - 22:18 नवीन
नझरूल इस्लाम ह्यांच्या गीताने अक्षरशः अंगावर काटा उभा राहिला. सर्वसाक्षी, धन्यवाद ! - सर्किट
  • Log in or register to post comments

ऍक बार

विसोबा खेचर
Mon, 08/11/2008 - 22:18 नवीन
ऍक बार बिदाय दे माऽ, घुरे आशी! आमि हाशी हाशी पोरबो फाशी देखबे भारतबाशी मध्यमातली एक सुंदर विराणी! 'मा' या अक्षरावरची स्वरवेल अशी बंधली आहे की खरंच कुणा मुलाने आपल्या आईला हाक मारावी, मतृत्वाच्या कुशीत शिरावं, त्या पदराखाली मुसमुसत दडावं, अगदी शेवटचंच! आईच्या कुशीत शिरून ते मुसमुसणं महत्वाचं कारण मग जगासमोर हासत हासत फाशी जायला त्यामुळेच बळ येतं! आमि हाशी हाशी पोरबो फाशी देखबे भारतबाशी 'आमि हाशी हाशी' म्हणतांना दिदीने खास बंगाली ढंग आणि लयीचं वजन किती सुरेख सांभाळलं आहे! 'पोरबो फाशी' च्या स्वरावलीतली इन्टेन्सिटी जीव कासावीस करते. 'आई, बघ गं..' या हाकेतली जी आर्तता आहे ना, अगदी तीच आर्तता दिदीने 'देखबे' ह शब्द उच्चारताना दाखवली आहे! केवळ जबरदस्त! आज दिवसभरात हे गाणं खूप वेळा ऐकलं, पुन्हा पुन्हा ऐकलं. छ्या! खूप अस्वस्थ करून टाकणारं गाणं! म्हणून आत्ता हे चार शब्द खरडून थोडीशी अस्वस्थता इथे उतरवायचा प्रयत्न केला आहे! (पुन्हा एकदा नि:शब्द!) तात्या.
  • Log in or register to post comments

तात्याशी

बिपिन कार्यकर्ते
Wed, 08/13/2008 - 13:19 नवीन
तात्याशी सहमत. खाली मनिषचा प्रतिसाद पाहून यूट्यूब वर ते गाणे ऐकायला गेलो, पण पूर्ण ऐकू नाही शकलो म्हणजे ऐकवलं नाही गेलं माझ्याच्याने. साक्षीजींचा लेख आणि त्या गाण्याची पूर्वपिठिका माहित झाल्याने, आणि लताबाईंनी इतके सुंदर गायल्याने, जो काही एकत्रित इफेक्ट आला तो फारच अस्वस्थ करणारा होता. बिपिन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर

Sakshi

इत्यादि
Tue, 08/12/2008 - 04:55 नवीन
Tumcha lekh vaachun attyant anand zala. Hrudaysparshi ani marmasparshi bhashantar kele aahet aapan. Tatya ni link dilemule ha albhya laabh milala. Asech lihit rahave. Aaple Bangali bhasha ani manase hyanchyabaddal cha sanmaan baghun kautuk vatate. Ityaadi
  • Log in or register to post comments

इत्यादी

चतुरंग
Tue, 08/12/2008 - 06:01 नवीन
आपल्या भावना समजल्या आणि मी त्यांच्याशी सहमत आहे. (एक विनंती - कृपया मराठीतून प्रतिसाद द्यायचा प्रयत्न करावा. मराठी टंकन अतिशय सोपे आहे. इथे मदत आहे.) चतुरंग
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इत्यादि

वा..

प्राजु
Tue, 08/12/2008 - 06:32 नवीन
सर्वसाक्षी.. इतका सुंदर लेख १५ ऑगस्टच्या निमित्ताने वाचायला मिळावा यासारखं सुदैव कोणतं!!! केवढा तो त्याग, केवढी ती दुर्दम्य इच्छाशक्ती, केवढी ती मनाची तयारी... आणि केवढसं ते वय!!! आपला लेख वाचून अंगावर शहारे आले. अत्यंत हृदय स्पर्शी कथा आणि लेखसुद्धा. गाण्याची शेवटची ओळ तर सुन्न करून गेली. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments

हेच म्हणते

मनस्वी
Tue, 08/12/2008 - 12:49 नवीन
केवढा तो त्याग, केवढी ती दुर्दम्य इच्छाशक्ती, केवढी ती मनाची तयारी... आणि केवढसं ते वय!!! आपला लेख वाचून अंगावर शहारे आले. अत्यंत हृदय स्पर्शी कथा आणि लेखसुद्धा. मनस्वी * केस वाढवून देवआनंद होण्यापेक्षा विचार वाढवून विवेकानंद व्हा. *
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्राजु

प्रत्येक

उपटसुंभ
Tue, 08/12/2008 - 09:59 नवीन
प्रत्येक ओळीवर असंख्य कविता ओवाळून टाकाव्यात..! शेवटच्या ओळीसाठी प्रतिक्रिया न देणं उत्तम..! देशाभिमानाने ओतप्रोत भरलेला लेख..! सर्वसाक्षी तुमचे अनंत ऋणी आहोत..!
  • Log in or register to post comments

काय लिहू ??

श्रीयुत संतोष जोशी
Tue, 08/12/2008 - 11:38 नवीन
नमस्कार, मिपाला श्रीमंत करणारा अतिशय सुरेख लेख.... अगदी बरोबर आणि आम्हा सर्व वाचकांना सुद्धा. हे राज्यं व्हावे ये तो श्रींची इच्छा.
  • Log in or register to post comments

यू ट्युब

मनिष
Tue, 08/12/2008 - 12:33 नवीन
यू ट्युबवर हे गाणे इथे बघता येईल!
  • Log in or register to post comments

धन्यवाद,

बिपिन कार्यकर्ते
Wed, 08/13/2008 - 13:23 नवीन
धन्यवाद, मनिष. तू एक खूप छान दुवा शेअर केला आहेस. बिपिन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मनिष

अतिशय

यशोधरा
Tue, 08/12/2008 - 22:51 नवीन
अतिशय सुरेख लेख आणि काव्यपंक्ति. अर्थ विशद करुन सांगितल्याबद्दल आणि लतादीदींच्या आवाजात गाणे ऐकण्यासाठी गाण्याचा दुवा दिल्याबद्दल खूप धन्यवाद.
  • Log in or register to post comments

परवा..

पद्मश्री चित्रे
Wed, 08/13/2008 - 14:05 नवीन
लोकसत्तेत भारत सरकार तर्फे वाहण्यात आलेली श्रध्दंजली व त्या वरील या ओळी वाचुन पुर्ण गाणं समजुन घेण्यची इच्छा होती , ते अचानक पुर्ण झाली.. धन्यवाद. याच वाटेवरची - मनी धीर धरी, शोक आवरी जननी भेटेन नऊ महिन्यांनी.... अशी एक सुरेख कविता आहे..
  • Log in or register to post comments

निशब्द

II राजे II (verified= न पडताळणी केलेला)
Wed, 08/13/2008 - 14:11 नवीन
निशब्द होतो मी जेव्हा जेव्हा क्रांतीवीरांची जिवनी वाचतो मी ! त्याच्या स्वप्नातील भारत शोधता शोधता तीळ तीळ मरतो मी ! असेल नसेल तेस्वाहा करुन देशासाठी प्राण देणा-याच्या समोर नतमस्तक मी ! डोळ्यात पाणी भरुन पुन्हा क्रांतीची वाट पहाणारा सामान्य नागरीक मी !! नेहमीच तुमचे लेखन अस्वस्थ करुन जाते... धन्यवाद... काही ना काही कारणामुळे .. तुम्ही क्रांतीविरांची माहीती प्रकाशीत करता व त्या क्रांतीकारांचे विचार व जिवन नव्या पिढीला त्यांच्याच सामान्य भाषेत भेटत राहतात.. ! अनेकानेक धन्यवाद. राज जैन शुभ कर्मन ते कबहूं न डरो....!
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा