Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by कुंदन on Sun, 07/01/2012 - 18:11
लेखनविषय (Tags)
औषधोपचार
मुक्तक
समाज
जीवनमान
मौजमजा
लेखनप्रकार (Writing Type)
प्रकटन
"सत्यमेव जयते" मधली दारु बद्दल ची चर्चा वाचुन हा धागा काढण्याची प्रेरणा मिळाली. माझ्याबद्दल सांगायचे तर , आमच्या शेजारचे काका रोज प्यायचे , कधी कधी मला त्यांचा चखणा आणायला पिटाळायचे. एकदा त्यांचा ग्लास भरुन ठेवलेला होता अन ते जाग्यावर नव्हते तेंव्हा मी "पहिला घोट " घेतला होता. चव काही विशेष आवडली नाही, त्यामुळे मग कधी पुन्हा त्या वाटेला गेलो नाही. पुढे मग इंजिनियरींग करताना पहिल्यावर्षी चा निकाल लागण्यापुर्वी "निकालच" लागण्याच्या भीतीने २-३ दिवस झोप लागली नव्हती , त्यातुन सर्दी- खोकल्यामुळे जाम झालो होतो. निकाल लागल्यावर एटी केटी च्या कृपेने वरच्या वर्गात पोहोचलो होतो , मग मित्रांनी आणलेल्या ओल्ड मोंक ची २-३ झाकणे नुसती प्यालो अन काय कमाल दुसर्‍या दिवशी सर्दी-खोकला गायब. तर मंडळी ..."आपण पहिला घोट कधी घेतला ?" याबद्दल मिपा करांचे अनुभव वाचायला आवडेल
  • Log in or register to post comments
  • 11684 views

प्रतिक्रिया

Submitted by मोदक on Mon, 07/02/2012 - 12:28

In reply to आम्ही आडनावभगिनीच्या by सूड

Permalink

कोण रे? कोण कोण???

कोण रे? कोण कोण??? (सज्जन, सालस, सभ्य, सोज्वळ आणि निरागस) मोदक.
  • Log in or register to post comments

Submitted by सूड on Mon, 07/02/2012 - 12:34

In reply to कोण रे? कोण कोण??? by मोदक

Permalink

अभ्यास वाढवा !!

अभ्यास वाढवा !! :D
  • Log in or register to post comments

Submitted by चिगो on Mon, 07/02/2012 - 14:29

Permalink

दिनांक ४ मे २००९...

नुस्ता घोटच नाहे, पेग रिचवले.. ते पण व्हिस्की, वोडका, बियर आणि मॉकटेल्स पण. माझी सिलेक्ट झाल्याची / नोकरी लागल्याची पार्टी होती.. घरी आई-वडीलांना सांगून ठेवलेलं होतं, की पाजण्याची ऐपत येईल तेव्हाच पिणार. त्यादिवशीही घरी सांगितलं होतं की आता पितोय.. ;-) बाकी दारुच्या दुष्परीणामांवर बोलत नाही. जोपर्यंत माझ्या दारु पिण्याने दुसर्‍या कोणालाही आर्थिक, मानसिक, शारीरीक, भावनिक त्रास होत नाही तोपर्यंत मी "दुष्परीणाम" होण्याइत्पत पितोय असं मला वाटत नाही. (कारण एवढं भान ठेवलं तर तुम्ही जास्त पिऊच शकत नाही.) ह्याबाबतीत आपण लिंकनसाहेब का कुणाचंतरी वाक्य शिरोधार्थ मानतो.. "Your right ends where your hand touches my nose.."
  • Log in or register to post comments

Submitted by तिमा on Mon, 07/02/2012 - 14:32

Permalink

त्याचे असे झाले

आमच्या लहानपणी वडील आम्हाला समुद्रावर पोहायला घेऊन जायचे. आम्ही किनार्‍यावरच लाटांत डुंबायचो, पण वडील पार क्षितिजापर्यंत पोहून यायचे. त्यानंतर त्यांच्या एका कोळी मित्राकडे जेवायला जायचो. तोही प्रेमाने आम्हाला भरपूर मासे, कोळंबी खाऊ घालायचा. तर असेच एकदा जेवायला बसलो असताना, मी डावरा असल्यामुळे पाणी प्यायला चुकून डावीकडचा ग्लास उचलला आणि तोंडाला लावला! अशा काही झिणझिण्या आल्या जिभेला! मी ओरडल्यावर सगळ्यांचे लक्ष गेले आणि एकच हास्यकल्लोळ झाला. माझ्या डावीकडे अर्थातच वडील बसले होते. तोच माझा पहिला घोट! (त्यावेळी वय वर्ष होते ५)
  • Log in or register to post comments

Submitted by गोंधळी on Mon, 07/02/2012 - 22:38

In reply to त्याचे असे झाले by तिमा

Permalink

अशा काही झिणझिण्या आल्या

अशा काही झिणझिण्या आल्या जिभेला! अहो ते सॉफ्ट ड्रिंक असेल. माझ्या मते मेंदुला झिणझिण्या येतात.असे पेय घेत्ल्यावर. माझा पहिल्या घोटेचा अनूभव ईईईईईईईईई....... असा होता.वास ही बेकार होता( खंड्यापक्शी). त्यापेक्षा आपली फ्रुट बीयर बरी.
  • Log in or register to post comments

Submitted by तिमा on Tue, 07/03/2012 - 13:11

In reply to अशा काही झिणझिण्या आल्या by गोंधळी

Permalink

सॉफ्ट ड्रिंक

तसे असते तर आम्हालाही दिले असते की. शिवाय त्यानंतर तातडीने तो ग्लास माझ्यापासून लांब ठेवला नसता.
  • Log in or register to post comments

Submitted by आनंदी गोपाळ on गुरुवार, 07/05/2012 - 21:35

In reply to सॉफ्ट ड्रिंक by तिमा

Permalink

आक्षेप!

तर असेच एकदा जेवायला बसलो असताना, मी डावरा असल्यामुळे पाणी प्यायला चुकून डावीकडचा ग्लास उचलला आणि तोंडाला लावला!
उजव्या हाताने जेवणारे लोक 'णार्मली' डाव्या हाताने पाणी पितात असा अनुभव आहे. तुम्ही डावरे असल्याने 'चुकून' कसाकाय ग्लास उचल्ला? :-w
  • Log in or register to post comments

Submitted by गणपा on Mon, 07/02/2012 - 22:14

Permalink

शाळेत असतानाचा पहिला? की

शाळेत असतानाचा पहिला? की कॉलेज मधला? की नोकरीला लागल्या नंतरचा? की हाता पायात बेड्या पडल्या नंतरचा पहिला? धागाकर्त्याला नक्की कुठला 'पहिला' घोट अपेक्षित आहे?
  • Log in or register to post comments

Submitted by कुंदन on Mon, 07/02/2012 - 22:36

In reply to शाळेत असतानाचा पहिला? की by गणपा

Permalink

अपेक्षित आहे?

मी सोदाहरण स्पष्टीकरण धाग्यात दिलेले आहे , गणपा सेठ. शेवटी ज्याची त्याची समज , जाण ... वगैरे ....वगैरे
  • Log in or register to post comments

Submitted by नर्मदेतला गोटा on Mon, 07/02/2012 - 22:29

Permalink

मी दारु सोडली घशाखाली

मी दारु सोडली घशाखाली
  • Log in or register to post comments
Profile picture for user सोत्रि

Submitted by सोत्रि on Mon, 07/02/2012 - 23:58

Permalink

पहिला घोट कधी घेतला ह्या

पहिला घोट कधी घेतला ह्या प्रश्नात तसा काही दम नाही. 'कुठलीही' गोष्ट 'पहिल्यांदा' करतना त्यात एक अवखळपणा असतो, अतिउत्साही घाई असते, नवलाई असते. त्यामुळे चुका होतात / होऊ शकतात. पण एकदा का सवय झाली आणि त्यातली गंमत कळाली की मग जी काही मजा येते ते अशा प्रश्नांची उत्तरे देऊन कळणे शक्यच नाही. :) - (रोजच, हा पहिला 'घोट' आहे समजणारा) सोकाजी
  • Log in or register to post comments

Submitted by प्रभाकर पेठकर on Tue, 07/03/2012 - 02:57

In reply to पहिला घोट कधी घेतला ह्या by सोत्रि

Permalink

हम्म्म्म्म!

(रोजच, हा पहिला 'घोट' आहे समजणारा) हम्म्म्म! म्हणजे रोजच अवखळपणा, अतिउत्साही घाई, नवलाई असते वाट्ट..! बSSSरं..! (ह. घ्या.)
  • Log in or register to post comments
Profile picture for user सोत्रि

Submitted by सोत्रि on Tue, 07/03/2012 - 13:44

In reply to हम्म्म्म्म! by प्रभाकर पेठकर

Permalink

हम्म्म्म! म्हणजे रोजच

हम्म्म्म! म्हणजे रोजच अवखळपणा, अतिउत्साही घाई, नवलाई असते वाट्ट
हो ना, त्याने होते काय की थरार वाढतो, रोज, पण अनुभवसिद्ध झाल्यामुळे चुका टाळल्या जातात :-D -(हलकेच घेतलेला) सोकाजी
  • Log in or register to post comments

Submitted by रुमानी on Tue, 07/03/2012 - 12:05

Permalink

आपण पहिला घोट कधी घेतला

आपण पहिला घोट कधी घेतला ? >>>>>अवघड प्रश्न विचारला. अशि पळवाट बरी नाही ? कधितरीच संधी मिळते माणसाला......!
  • Log in or register to post comments

Submitted by सर्जे on गुरुवार, 07/05/2012 - 13:57

Permalink

आपण पहिला घोट कधी घेतला ?

उत्तर खुप सोपं आहे. पहिल्यांदा ज्यावेळी हातात पगाराचे पैसे आले होते त्यवेळी. खुप विचार केला पण रहावल नही आणी घेतली. इथे मला पटलं (नवलाई असते त्यामुळे चुका होतात / होऊ शकतात) पण पैसे नसतात त्या त्या वेळी सोडायाची.
  • Log in or register to post comments

Submitted by परिकथेतील राजकुमार on गुरुवार, 07/05/2012 - 14:04

Permalink

आपण पहिला घोट कधी घेतला

आपण पहिला घोट कधी घेतला ?
दुसर्‍या घोटाच्या आधी.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रकाश घाटपांडे on गुरुवार, 07/05/2012 - 20:56

In reply to आपण पहिला घोट कधी घेतला by परिकथेतील राजकुमार

Permalink

दुसरा घोट

मंग दुसरा घोट कवा घेतला? पहिल्या घोटानंतर कि तिसर्‍या घोटाच्या आदुगर?
  • Log in or register to post comments

Pagination

  • First page « First
  • Previous page ‹ Previous
  • पान 1
  • पान 2

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com