✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

आपण पहिला घोट कधी घेतला ?

क
कुंदन यांनी
Sun, 07/01/2012 - 18:11  ·  लेख
लेख
"सत्यमेव जयते" मधली दारु बद्दल ची चर्चा वाचुन हा धागा काढण्याची प्रेरणा मिळाली. माझ्याबद्दल सांगायचे तर , आमच्या शेजारचे काका रोज प्यायचे , कधी कधी मला त्यांचा चखणा आणायला पिटाळायचे. एकदा त्यांचा ग्लास भरुन ठेवलेला होता अन ते जाग्यावर नव्हते तेंव्हा मी "पहिला घोट " घेतला होता. चव काही विशेष आवडली नाही, त्यामुळे मग कधी पुन्हा त्या वाटेला गेलो नाही. पुढे मग इंजिनियरींग करताना पहिल्यावर्षी चा निकाल लागण्यापुर्वी "निकालच" लागण्याच्या भीतीने २-३ दिवस झोप लागली नव्हती , त्यातुन सर्दी- खोकल्यामुळे जाम झालो होतो. निकाल लागल्यावर एटी केटी च्या कृपेने वरच्या वर्गात पोहोचलो होतो , मग मित्रांनी आणलेल्या ओल्ड मोंक ची २-३ झाकणे नुसती प्यालो अन काय कमाल दुसर्‍या दिवशी सर्दी-खोकला गायब. तर मंडळी ..."आपण पहिला घोट कधी घेतला ?" याबद्दल मिपा करांचे अनुभव वाचायला आवडेल
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
औषधोपचार
मुक्तक
समाज
जीवनमान
मौजमजा
लेखनप्रकार (Writing Type)
प्रकटन

प्रतिक्रिया द्या
11684 वाचन

💬 प्रतिसाद (67)

प्रतिक्रिया

पहिलाच घोट घातक...!

अत्रुप्त आत्मा
Sun, 07/01/2012 - 18:16 नवीन
Image removed. पहिलाच घोट घातक...!
  • Log in or register to post comments

+१ हेच बोल्तो...

मोदक
Sun, 07/01/2012 - 20:43 नवीन
+१ हेच बोल्तो... नक्की काय मजा मिळते दारू पिवून? ज्या वस्तूमुळे आपला स्वतःवरचा ताबा जातो / कमी होतो ती वस्तू कशी काय Enjoy करता येते???
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

जावे त्यांच्या देशा.....

पक पक पक
Sun, 07/01/2012 - 21:15 नवीन
जावे त्यांच्या देशा..... ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक

मैत्रिणींनी कार घेतल्याची

शुचि
Sun, 07/01/2012 - 21:56 नवीन
मैत्रिणींनी कार घेतल्याची पार्टी केली. त्या प्याल्या तेव्हा मी विचारलं प्याल्यावर काय मजा मिळते? ती म्हणाली - स्वप्नात कसं तरंगल्यासारखं वाटतं, हलकं हलकं वाटतं तसं वाटतं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पक पक पक

@नक्की काय मजा मिळते दारू

अत्रुप्त आत्मा
Sun, 07/01/2012 - 23:16 नवीन
@नक्की काय मजा मिळते दारू पिवून? >>> जो आनंद(रिलेक्सेशन) तुंम्हाला एखादा पदार्थ खाऊन/एखाद्या ठिकाणाला भेट देऊन/एखादी आनंद दायक कृती करुन मिळतो,तोच आनंद व्यसनी(अ‍ॅडिक्ट) लोकांना त्यांचं अवडत व्यसन करुन मिळतो,आणी ती कृती पुनःपुन्हा कराविशी वाटते. @ज्या वस्तूमुळे आपला स्वतःवरचा ताबा जातो / कमी होतो ती वस्तू कशी काय Enjoy करता येते???>>> तुमचं हे मत व्यसनी लोकांच्या दांभिक आचाराची परिणीती आहे. ताबा जायला सुरवात झाल्यानंतर,किंबहुना काहिशी त्याच्या अधीच ही एन्जॉय मुव्हमेंट संपलेली असते,आणी पुढे सुटता येत नाही,म्हणुन अडकलेपण शिल्लक राहिलेलं असतं.तरिही हे सत्य कबुल करायचं धाडस व्यसनी माणसात नसल्यामुळे/किंवा त्यानी ते नीटसं ओळखलेलं नसल्यामुळे,तो माणुस मी ''हे'' एंजॉयमेंट साठी करतोय,असं सांगत असतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक

दांभिकपणा...

प्रभाकर पेठकर
Mon, 07/02/2012 - 01:18 नवीन
त्यामुळे मग कधी पुन्हा त्या वाटेला गेलो नाही. मग मित्रांनी आणलेल्या ओल्ड मोंक ची २-३ झाकणे नुसती प्यालो ही पाठोपाठची दोन्ही वाक्ये एकाच माणसाची आहेत? कदाचित दोन वाक्यांमध्ये 'कॅडबरी ५ स्टार' खाल्ले असावे. (मास्टर, पिताजी की पँट एक बिलान कम कर दो|)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

त्यामुळे मग कधी पुन्हा त्या वाटेला गेलो नाही.

कुंदन
Mon, 07/02/2012 - 10:54 नवीन
>>त्यामुळे मग कधी पुन्हा त्या वाटेला गेलो नाही. म्हणजे पाणी टाकुन प्यायच्या ;-) , असे मला म्हणायचे होते. पेठकर काका , आय टी मध्ये शिरलात काय हल्ली हल्ली , नाय तुमचा छिद्रान्वेषी पणा फार वाढलाय हल्ली. ;-) (छिद्रान्वेषी व्यवस्थापकाचा मित्र ) -कुंदन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर

ज्या वस्तूमुळे आपला स्वतःवरचा

५० फक्त
Mon, 07/02/2012 - 09:54 नवीन
ज्या वस्तूमुळे आपला स्वतःवरचा ताबा जातो / कमी होतो ती वस्तू कशी काय Enjoy करता येते??? - वैश्विक सत्य, ही गोष्ट बायकोच्या बाबतीत सुद्धा लागु होते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक

ही गोष्ट बायकोच्या बाबतीत

गणपा
Mon, 07/02/2012 - 10:01 नवीन
ही गोष्ट बायकोच्या बाबतीत सुद्धा लागु होते.
अण्भव.. अण्भव बोलतो तो असा. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ५० फक्त

कसे लगेच पटले पहा गणपांना..

डावखुरा
Mon, 07/02/2012 - 10:49 नवीन
कसे लगेच पटले पहा गणपांना..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणपा

मजा इतरांना येते

रणजित चितळे
Wed, 07/04/2012 - 15:20 नवीन
दारू प्यालेल्यांच्या लिला बघता बघता मजा इतरांना येते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक

>>ओल्ड मोंक ची २-३ झाकणे

मराठमोळा
Sun, 07/01/2012 - 18:19 नवीन
>>ओल्ड मोंक ची २-३ झाकणे नुसती प्यालो अन काय कमाल दुसर्‍या दिवशी सर्दी-खोकला गायब. आनि त्यानंतर.. ;) असो, शतकवीर दंगेखोरांच्या प्रतिक्षेत :)
  • Log in or register to post comments

त्यांच्या फॅमिली डॉक्टरचा

पक पक पक
Sun, 07/01/2012 - 21:14 नवीन
त्यांच्या फॅमिली डॉक्टरचा धंदा तेव्हापासुनच बसला... :bigsmile:
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठमोळा

हा हा हा! अस? मग काय

स्पंदना
Mon, 07/02/2012 - 06:41 नवीन
हा हा हा! अस? मग काय बारवाल्याचा वाढला का काय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पक पक पक

>>>मग काय बारवाल्याचा वाढला

प्यारे१
Mon, 07/02/2012 - 09:46 नवीन
>>>मग काय बारवाल्याचा वाढला का काय? झमझम बारच्या मॅनेजरचा! ;) कुंद्या मारतंय आता!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पंदना

एकच प्याला.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Sun, 07/01/2012 - 18:25 नवीन
उत्सुकता, मित्र-मंडळींचा आग्रह, कार्यालयातील पार्टी, हाय-फाय सोसायटीतली स्ट्रारहॉटेलातील पार्टी, बीयर म्हणजे दारु नसते, आनंद-दु:ख, रिलॅक्स वाटावं म्हणुन किंवा सत्यमेव जयतेच्या चर्चेत म्हटल्याप्रमाणे अनुवांशिकतेत असतंच फक्त सुरुवात होण्यासाठी निमित्त लागतं, अशा कारणाने पहिला घोटाची सुरुवात होते आणि मग पॅकचं प्रमाण वाढत चालतं. काहींना कळतं कुठे थांबायचं. काहींना नाही. आणि आयुष्याच्या परवडीला सुरुवात होते. काहींना परत येता येतं. काहींना नाही. आपण पहिला घोट कधी घेतला ? अवघड प्रश्न विचारला. :) -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

-१

मन१
Sun, 07/01/2012 - 19:13 नवीन
प्रतिसाद मला समजला नाही की तुम्हाला तेच म्हणायचय? उत्सुकता, मित्र-मंडळींचा आग्रह, कार्यालयातील पार्टी, हाय-फाय सोसायटीतली स्ट्रारहॉटेलातील पार्टी, बीयर म्हणजे दारु नसते, हा मला भारतात चाललेला अपप्रचार वाटतो बियरवाल्यांकडून. प्यायला हरकत नाही हो, पण पिउन वर आम्ही "दारु" पीत नाही असं का म्हणायचं? आपले सोकाजी बघा...झोकात सांगतात, घेतो तर घेतो, रसिकतेनं घेतो,चवीचवीनं घेतो; आडवळणे नाहित. ह्यानं संवाद सोपा होतो. बीयर, व्हिस्की, रम,वाइन, वोडका,विविध कॉकटेले, फेणी,ताडी ह्यांना बोलीभाषेत दारुच म्हणतात की . कुणी गव्व्हापासून बनिवतेत तर कुणी तांदूळ, द्राक्षापासून. जर प्रत्येकानं सांगायला सुरुवात केली की आमचे पेय दारु नाही, तर कमाल आहे. ता क :- सत्यमेव जयते पाहिलेले नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

नशाही नशा है.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Sun, 07/01/2012 - 21:13 नवीन
मला असं म्हणायचं आहे, की कोणतंही पिणं काही प्रतिष्ठेचं नाही. आता ते प्रतिष्ठेचं होत चाललं आहे, तो भाग वेगळा. अल्कोहलचं प्रमाण कशात किती आहे, भाग वेगळा. पण, ड्रिंक्स (आपल्या सोकाजीच्या वाईनच्या गोष्टी सोडुन द्या) चवी-चवीनं घेणं ही नंतर सवय होते आणि अशा व्यसनापासून दूर होता येत नाही, असं मला म्हणायचं आहे. आणि असं हे पिणं कधी सुरु होतं. कधी मित्रमंडळी आग्रह करतात. कधी एखादी पार्टी असते, कधी स्वतःतच पिण्याची उत्सुकता निर्माण होते असं म्हणायचं आहे. सत्यमेव जयतेच्या कार्यक्रमात काही मुली म्हणत होत्या की एखादा पेग घेतला की डान्स करायला उत्साह संचारतो. कुछ कुछ हलका हलका लगता है म्हणुन पिणारे होते. आणि मग हे पिणं माणसाला कुठे घेऊन जातं त्या पहिल्या घोटाची कहाणी कुठुन सुरु होते त्याबद्दल मी बोलत होतो. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मन१

तुला लेकाला ऐशच करता येत नाही..

कानडाऊ योगेशु
Sun, 07/01/2012 - 18:58 नवीन
होस्टेलमध्ये काही दिवस एका मित्राच्या रूमवर पॅरासाईट म्हणुन राहत होतो. मी दारू सिगारेट त्याआधी कधी प्यायलो नव्हतो. मित्र रोज संध्याकाळी पिऊन यायचा आणि "साX चुX तुला लेकाला ऐशच करता येत नाही!" .असा उध्दार करायचा. हे रोजच चालायचे.एके दिवशी म्हटले दाखव मला तुझी ऐश.आणि तिथे सिगारेट दारूशी पहीली ओळख झाली. त्यादिवशी इतकी पिली कि मित्र घाबरुन रूममध्ये कोपर्यात गपचुप बसला होता.त्यानंतर मात्र त्याने कधी उध्दार केला नाही. दारुचे व्यसन असे काही लागले नाही.पण सिगारेट मात्र मानगुटीवर बसली.आणि ती सोडायल जाम प्रयत्न करावे लागले. एकदा तर वर्ष दिडवर्षाच्या गॅपनंतर पुन्हा ओढायला सुरवात केली होती. नंतर मात्र निग्रह करुन सोडली. पण माझ्या त्या मित्राची अजुन काही सुटली नाही. "यार सिगारेट घेतली नाही तर सकाळी प्रेशरही येत नाही" अशी त्याची समस्या होऊन बसली आहे. आज कधीतरी फोनाफोनी झाली वा प्रत्यक्ष भेट झाली तर मी त्याला म्हणतो "साX चुX तुला लेकाला ऐशच करता येत नाही!" आणि तो ही खरंय म्हणतो.
  • Log in or register to post comments

नरडीचा घोट

मन१
Sun, 07/01/2012 - 19:15 नवीन
आधी चर्चाप्रस्ताव वाचून आपण "कुनाच्या नरडीचा घोट प्रथम घेतलात" अशा अर्थाचा सवाल आहे का काय असे वाटले. अर्थातच ते(ही) कधी केलेले नाही.
  • Log in or register to post comments

फार

कुंदन
Sun, 07/01/2012 - 19:20 नवीन
फारच छिद्रान्वेषि झालेला दिसतोयस मनोबा हल्ली.... >>"कुनाच्या नरडीचा घोट प्रथम घेतलात" कधी गचांडी तरी पकडली आहेस का कोणाची? नाना पकडतो तशी? ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मन१

समाजसेवा

मन१
Sun, 07/01/2012 - 19:29 नवीन
निव्वळ समाजसेवा न केल्याबद्दल कुणीतरी येउन माझ्याच नरडीचा घोट घेइल असं वाटतय. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कुंदन

ब्रॅन्डी जर ......

चौकटराजा
Sun, 07/01/2012 - 19:20 नवीन
ब्रँडी जर लिकर मधे मोडत असेल तर २० व्या वर्षी एक चमचा घेतली. एक चमचा बरोबर एक घोट हे बरोबर असेल तर त्यावेळी एक घोट घेतली. त्यानंतर भुशी डॅम येथे गच्च भिजलो असताना पाव ग्लास व्हिस्की ( डायल्यूट न करता ) घेतली. दोन्ही वेळेस औषध या स्वरूपात फायदाच झाला. पण दारू पिण्यात काय आनंद असतो रे भाउ ? याचे उत्तर कोणी देइल काय? आयला, आपल्याला करंटा म्हणा हवंतर ! आपल्याला प्रतापगडावरचे ताकच आवडले जास्त !
  • Log in or register to post comments

फायदाच झाला. पण दारू पिण्यात

पक पक पक
Sun, 07/01/2012 - 21:21 नवीन
फायदाच झाला. पण दारू पिण्यात काय आनंद असतो रे भाउ ? आता फायदा काय झाला ते सांगा आजोबा ;) आनंदाच काय घेउन बसलात तो मानण्यावर असतो... :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौकटराजा

आमच्या कॉलेजात एक कंपनी टच

निनाद मुक्काम …
Sun, 07/01/2012 - 20:12 नवीन
आमच्या कॉलेजात एक कंपनी टच भाय होता. त्याचे संपूर्ण घराणे हे कंपनीमय होते. आणि आर्थर रोड मध्ये बहुसंख्य नातेवाईक. त्यांच्या वाढदिवसाला मला आमंत्रण मिळाले.आमचे वडील चेंबूर वॉर्डात मनपा चे अधिकारी आहेत ही बातमी त्याच्या कानावर आल्याने त्याने माझ्याशी ओळख व्हावी ह्या विशुद्ध हेतूने मला आमंत्रण दिले होते ( नाही जाऊन सांगणार कोणाला ) त्याने एकच प्याला माझ्या हातात दिला व म्हणाला पोटभर पी त्याचा आग्रह आणि निग्रह पाहून मी पहिला प्याला एका दमात रिता केला. .
  • Log in or register to post comments

पहिला घोट

नितिन थत्ते
Sun, 07/01/2012 - 21:26 नवीन
दारू पिणे वाईट असते. मी पहिला ग्लास इंजिनिअरिंगच्या दुसर्‍या वर्षाला असताना घेतला. (तेव्हा अमुक दारू वगैरे भेदभाव ठाऊक नव्हते. जी मिळाली ती - रम होती). आताही अधूनमधून घेतली जाते. तुम्हाला कोणा मित्राला भेटल्यावर त्याच्याबरोबर दारू प्यायलाच हवी असे वाटत असेल - तर ठीक नव्हे दारू पिण्याचे निमित्त म्हणून मित्राला भेटत असाल- तर ते त्याहूनही वाईट. तसे होत नाही तोवर काळजी नसावी.
  • Log in or register to post comments

कोणतंही व्यसन वाईटंच. दारु

शिल्पा ब
Mon, 07/02/2012 - 00:02 नवीन
कोणतंही व्यसन वाईटंच. दारु असो पत्ते असो का अजुन काही.
  • Log in or register to post comments

ओशो म्हणतात सवय वाईट मग दारू असो की जपमाळ...

मोदक
Mon, 07/02/2012 - 12:15 नवीन
ओशो म्हणतात सवय वाईट मग दारू असो की जपमाळ.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शिल्पा ब

'अति सर्वत्र वर्ज्ययेत' का काय ते!

प्यारे१
Mon, 07/02/2012 - 12:51 नवीन
तसं पाहिलं तर बरोबर आहे विधान पण मागे एका प्रतिसादात म्हटल्याप्रमाणं, चांगल्या व्यसनाला सवय तर वाईट सवयीला व्यसन म्हणावं लागतं...! व्यायामाच्या व्यसनाला (ठराविक वेळी नि केलीच पाहिजे , नाही केलं तर बेचैन होतं अशी सवय ) चांगलं म्हणावं की वाईट? वाचनाची, अभ्यासाची, फिरण्याची अशा अनेक सवयींना ह्या व्यसनांचीच 'संवादी ' रुपे म्हणता येईल. बाकी मिपावर बरीच चांगली वाईट 'व्यसने' आहेत म्हणा! ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक

-

चतुरंग
Mon, 07/02/2012 - 00:33 नवीन
-
  • Log in or register to post comments

अच्रत, बव्लत

३_१४ विक्षिप्त अदिती
Mon, 07/02/2012 - 00:40 नवीन
उद्या विचाराल व्हर्जिनिटी कधी गेली. तुझ्या जिभेला काही हाड?
  • Log in or register to post comments

पहिलाच घोट घातक...!

आनंदी गोपाळ
Mon, 07/02/2012 - 01:08 नवीन
प्रेषक अत्रुप्त आत्मा (यांचेकडून साभार) Image removed. पहिलाच घोट घातक...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

(No subject)

३_१४ विक्षिप्त अदिती
Mon, 07/02/2012 - 01:13 नवीन
:D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंदी गोपाळ

चर्चा चमचमीत असावी.

प्रभाकर पेठकर
Mon, 07/02/2012 - 11:07 नवीन
उद्या विचाराल व्हर्जिनिटी कधी गेली. फारच मिळमिळीत प्रश्न आहे. लोकं लग्नाची तारीख देऊन मोकळे होतील. प्रश्न, 'विवाहापूर्वी किती आधी व्हर्जिनिटी गेली/घालवली?' असा पाहिजे. म्हणजे चर्चा जरा चमचमीत होईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

लोकांच्या तारखा समजल्यामुळे

३_१४ विक्षिप्त अदिती
Mon, 07/02/2012 - 22:08 नवीन
लोकांच्या तारखा समजल्यामुळे चमचमीतपणा येत असेल तर ... अरेरे! असो. काका, तुम्ही (आणि मी सुद्धा) अशा प्रश्नांचा विचार करता म्हातार्‍या व्यक्ती आहोत. भारतात 'एज ऑफ कन्सेंट' १८ आणि २१ आहेत (यावरून थोडे घोळ आहेतच). तर ज्यांची वयं १८ + वर्गमूळ (१८), २१+ वर्गमूळ (२१) यापेक्षा अधिक आहेत ते लोकं वयस्क. त्यांची सध्याच्या ट्रेंड्सबद्दल असणारी माहिती परहस्ते आलेली समजावी. -- ९९_१०० बळचकर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर

हॅ. हॅ.. हॅ...

सोत्रि
Mon, 07/02/2012 - 23:48 नवीन
एका मित्राच्या लग्नात त्याच्या बायकोच्या 'तारखांचा' घोळ होउन त्याचे 'मनोरथ' लांबणीवर पडले होते त्याची आठवण झाली आणि तुमचा लग्नाच्या तारखेचा मुद्दा निकालात निघाला :) - (चमचमीत) सोकाजी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर

'गुरुजीं'ची चूक!

आनंदी गोपाळ
गुरुवार, 07/05/2012 - 21:30 नवीन
तारखा काढतांना पंचांग हातात घेतल्याबरोब्बर अडचण आहे का असे गुरुजी विचारतातच. काही तरी वेगळाच घोळ असणारे... किंवा गुरूजींची चूक (बरोबर) गोपाळ
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सोत्रि

व्यसन नाही.

प्रभाकर पेठकर
Mon, 07/02/2012 - 01:34 नवीन
'आपण पहिला घोट कधी घेतला?' ह्या शीर्षकात कसला घोट हे न दिल्याने सांगतो. पहिला घोट जन्मतःच (दुधाचा) घेतला. पण, पुढे विषय दारुकडे वळला. तेंव्हा तो घोटही, माझ्या तान्ह्या वयात मला जबरदस्त सर्दी झाली असता, वडीलांनी स्वहस्ते, गोकर्णाने ब्रँडीच्या स्वरूपात दिला. पिणं वर्ज्य नाही पण, मिपाखेरीज इतर कुठलेच व्यसन नाही.
  • Log in or register to post comments

कोणतंही व्यसन वाईटंच बरंका

शिल्पा ब
Mon, 07/02/2012 - 01:40 नवीन
कोणतंही व्यसन वाईटंच बरंका आजोबा! एक आपुलकीने सांगितलं इतकंच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर

धन्यवाद.

प्रभाकर पेठकर
Mon, 07/02/2012 - 01:47 नवीन
धन्यवाद बरं का आज्जीबाई. आयला, एवढं वय झालं पण इतक्या आपुलकीने कोणी सांगितलंच नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शिल्पा ब

कस्चं कस्चं! अहो आजोबा, नातंच

शिल्पा ब
Mon, 07/02/2012 - 10:11 नवीन
कस्चं कस्चं! अहो आजोबा, नातंच आपुलकीने सांगणार! ह्हो क्की नै?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर

खरं आहे.

प्रभाकर पेठकर
Mon, 07/02/2012 - 10:15 नवीन
खरंय ग आज्जे (की तू ही आजोबाच आहेस?). काय काय गोष्टी नव्याने शिकायला लागताहेत पाहा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शिल्पा ब

तुमचा अभ्यास कमी पडतोय दुसरं

शिल्पा ब
Mon, 07/02/2012 - 10:25 नवीन
तुमचा अभ्यास कमी पडतोय दुसरं कै नै!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर

आदर आहे.

प्रभाकर पेठकर
Mon, 07/02/2012 - 10:40 नवीन
शाळा-कॉलेजातही कमीच पडायचा. लहानपणापासून अभ्यासाचा भयंकर कंटाळा आहे. तुमच्या सारख्या (गरजेपेक्षा) जास्त अभ्यास करणार्‍यांचा आदर करतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शिल्पा ब

त्या आमीरखानच्या नानाची

आनंदी गोपाळ
Mon, 07/02/2012 - 01:56 नवीन
त्या आमीरखानच्या नानाची टांग! अहो, आषाढी पासून चातुर्मास लागला. लोक कांदे वांगे लसूणही खात नाहीत. दारवा बंद करतात अन हा भौ पारण्याच्या/करेच्या दिवशी दारूच्या नावाने भोभो करतोय ;) (आमीरच्या नावाने संध्याकाळीच दोन थेंब शिंपडून आनंदात 'आजारी' पडलेला) गोपाळ (Drinking is a disease....)
  • Log in or register to post comments

टांग

नितिन थत्ते
Mon, 07/02/2012 - 11:32 नवीन
आमीरखानच्या नानाची टांग म्हणताय म्हणून ठीक आहे. आमच्या नानाविषयी बोललात तर तुमचीच टांग मोडण्यात येईल. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंदी गोपाळ

मोडलेल्या टांगे साठी

आनंदी गोपाळ
Mon, 07/02/2012 - 12:19 नवीन
खात्रीचे औषध इथेच मिळते असे ऐकून आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते

आपण पहिला घोट कधी घेतला ?

चिंतामणी
Mon, 07/02/2012 - 11:34 नवीन
अविनाशकाका मार्गदर्शक आहेत का????????
  • Log in or register to post comments

मिपावरील मान्यवर महिलांच्या (स्वानुभवी) प्रतिसादाच्या प्रतिक्षेत

मोदक
Mon, 07/02/2012 - 12:20 नवीन
मिपावरील मान्यवर महिलांच्या (स्वानुभवी) प्रतिसादाच्या प्रतिक्षेत... ;-)
  • Log in or register to post comments

आम्ही आडनावभगिनीच्या

सूड
Mon, 07/02/2012 - 12:25 नवीन
प्रतिसादाच्या प्रतिक्षेत ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक
  • 1
  • 2
  • ›
  • »

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा