✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

(टुकार, बेक्कार आणि बकवास गाणी)

म
मोदक यांनी
गुरुवार, 06/21/2012 - 01:50  ·  लेख
लेख
(टुकार, बेक्कार आणि बकवास गाणी) सध्या काही धागे वाचण्याचा आणि ते वाचून कंटाळा येण्याचादेखील कंटाळा आला आहे. बरेच चित्रपट येतात जातात, बर्‍याचदा गाणी बकवास की चित्रपट अधिक बकवास हा प्रश्न पडतो. पिच्चरमध्ये चांगली सोन्ग्स असतात आणि बकवास, टुकार आणि टाकावू सोन्ग्स ही असतात आणि का असतात असे होते.. मला एक librari बनवायची आहे, असली गाणी चुकूनही पुन्हा ऐकणार नाही याची काळजी घेण्यासाठी. मिपाकर मदत करतील अशी अपेक्षा आहे माझ्याकडून कांही गाणी, १) मै तो रस्ते से जा रहा था.. २) मेरे बाप का बेटा मुझे भाई बोलता.. (सल्लूचे आहे कुठलेतरी) ३) फिझा मधले एक गाणे.. पंजाबी ड्रेसमधली करीश्मा एकदम चकाचक जीन्स मध्ये येते आणि गाण्यानंतर परत पंजाबी ड्रेस मध्ये जाते. (ज्याच्या कुणाच्या डोक्यातून ही कल्पना आली असेल तो लै भारी समजत असावा) ४) आँटी नं १ चे टायटल साँग. म्हटले तर विडंबन.. नाही तर फालतू आणि टाकावू गाण्यांचा डेटाबेस. :-p
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
कला
नृत्य
नाट्य
विडंबन
लेखनप्रकार (Writing Type)
सद्भावना
शुभेच्छा
मत
संदर्भ
सल्ला
प्रश्नोत्तरे
माहिती
प्रतिक्रिया
वाद
आस्वाद
प्रतिभा
विरंगुळा

प्रतिक्रिया द्या
16792 वाचन

💬 प्रतिसाद (59)

प्रतिक्रिया

बर्‍याच जणांचा रोष पत्करून...

मोदक
Fri, 06/22/2012 - 09:37 नवीन
बर्‍याच जणांचा रोष पत्करून... कुणी संदीप खरे आणि सलील कुलकर्णीचे सुरूवातीचे व्हिडीओज बघितले आहेत का? १) आयुष्यावर बोलू काही - सुझुकीवर फिरणारे आणि ताम्हणीसारख्या ठिकाणी हातवारे करत गाणारे दोघे.. २) नसतेस घरी तू जेंव्हा - बीयर पिवून"देवदास" झालेला सलील... :-D स्वप्नील बांदोडकरचा "राधा ही बावरी" चा व्हिडीओ, चेहर्‍यावरची माशी न हलतवता ड्यान्स करणारी ती तरूणी बघून स्वप्नीलचीच दया आली होती. ऋतू हिरवा की असेच एक सुंदर गाणे अशाच टुकार व्हिडीओचे बळी पडले आहे..
  • Log in or register to post comments

ते ' जंगल मे बोले कोयल कु कु

जेनी...
Fri, 06/22/2012 - 09:56 नवीन
ते ' जंगल मे बोले कोयल कु कु कु कु कु कु ..' भयानक प्रकारे कु कु कु करतात ....:(
  • Log in or register to post comments

ए गपे! कितीतरी बरं होतं ते

बॅटमॅन
Fri, 06/22/2012 - 14:08 नवीन
ए गपे! कितीतरी बरं होतं ते बाकी भयंकर प्रकारांच्या तुलनेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेनी...

आला रे पाऊस आला, अरे आला रे पाऊस आला...

श्रीरंग_जोशी
Fri, 06/22/2012 - 10:11 नवीन
आला रे पाऊस आला, अरे आला रे पाऊस आला... १९९९ च्या सफारी चित्रपटातील हे गीत आहे. गायलं आहेत अमित कुमार व अलका याज्ञिक यांनी. या गाण्यात जूही व माकडछाप संजय दत्त हे पावसात गाणं म्हणत आलटून पालटून योगासने, एरोबिक्स व कोळीनृत्य करतात...
  • Log in or register to post comments

खुपच उत्तम गाण्यांचा संग्रह तयार होणार आहे असे दिसते आहे.

ज्ञानोबाचे पैजार
Fri, 06/22/2012 - 15:57 नवीन
http://www.youtube.com/watch?v=NFdhjRl4nNw राजकपुरचे हे गाणे बघा ऐका, http://www.youtube.com/watch?v=NrghM5Xn8G8 आणि जितुचे हे नेहमीच नव्या गाण्यांवर आणि नविन संगीतकारांवर टीका होत असते म्हणुन वानगी दाखल ही गाणी दिली आहेत. असल्या अनेक जुन्या गाण्यांची यात भर घालता येईल. बाकी आमच्या गोविंदाच्या गाण्यांना बकवास म्हणणार्‍यांचा तीव्र निशेध. पण ह्या धाग्याचा सुर एकंदर विडंबनाचा दिसतो आहे त्या मुळे त्या कडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. पण उत्तमोत्तम गाण्यांच्या यादीत समीर यांचे नाव अग्रस्थानी असायला हवे. अधुनीक गालिब, समीर यांनी अनेक सुंदर गाणी बनवली आहेत. पण त्यातल्या काहीच गाण्यांचा वर उल्लेख झालेला आहे. जसे की.... सुटबुट वाले बाबु,- गजब तमाशा संडे की रात थी पहेली मुलाकात थी- राजाजी ईंडीयासे आया मै लाईफ बनाने - कहेता है दील बार बार चांदनी चौक की चांदनी है तु लाल किलेकी लाली - जंग नजरे मिली दिल धडका मेरी धडकन ने कहा लव यु राजा - राजा बाबा तेरी ये जवानी मेरा पिछा न छोडे - घात प्यार प्यार करते करते तुम पे मरते मरते दिल दे दिया हाँ दिल दे दिया - जुदाई दो प्यार करने वाले जंगल में खो गए - जंगल तू जब जब मुझको पुकारे मैं दौड़ी आऊं नदिया किनारे - कुर्बान खरतर सचिन ऐवजी समीर गालिब यांनाच भारत रत्न ने सन्मानीत करण्यात यावे इतके मोठे उपकार त्यांनी मानव जातीवर केले आहेत. त्यांच्या बरोबरीने आनंद मिलींद, अन्नु मलीक यांना पण छोट्या मोठ्या पुरस्काराने गौरवण्यात यावे आशी या मंचावरुन आम्ही जोरदार मागणी करत आहोत.
  • Log in or register to post comments

__/\__

अर्धवटराव
Fri, 06/22/2012 - 20:58 नवीन
--नजरे मिली दिल धडका मेरी धडकन ने कहा लव यु राजा - राजा याच्याच जोडीला "तुमने अगर प्यार से देखा नहि मुझको". माधुरीला स्क्रीन बाहेर खेचुन घरची धुणी भांडी करायला पाठवावे असाल वैताग आहे ते गाणे म्हणजे... अर्धवटराव
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ज्ञानोबाचे पैजार

काय हे?

श्रीरंग_जोशी
Sat, 06/23/2012 - 10:40 नवीन
>> नजरे मिली दिल धडका मेरी धडकन ने कहा लव यु राजा - राजा अहो हे गाणे म्हणजे सर्व मेंगळट तरुणांचा न्यूनगंड दूर करणारे होते कारण त्यांचा अनभिषिक्त प्रतिनिधी 'संजय कपूर' त्या काळातील आघाडीच्या अभिनेत्रीबरोबर नायक म्हणून काम करत होता. माधुरीचे चेहऱ्यावरील भावही जोरदार होते. फक्त गाण्याच्या सुरुवातीला काही विचित्र हावभाव करणारी मंडळी आहेत एवढंच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अर्धवटराव

जोशी सर, माधुरी दिक्षीत चा मी

ज्ञानोबाचे पैजार
Sat, 06/23/2012 - 13:19 नवीन
जोशी सर, माधुरी दिक्षीत चा मी पण पंखा आहे. पण म्हणुन काय असले गाणे सहन करायचे? नज़रें मिलीं दिल धड़का मेरी धड़कन ने कहा love you raja जादू कोई छाने लगा मुझको मज़ा आने लगा बस में नहीं है अरमां मुझे सीने से लगा kiss me aajaa माधुरी शिवाय या गाण्यात काहीही चांगले नव्हते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीरंग_जोशी

संदर्भ

श्रीरंग_जोशी
Sun, 06/24/2012 - 04:42 नवीन
पैजारबुवा - मी तसे उपहासाने म्हंटले आहे हो. संदर्भासाठी हि प्रतिक्रिया वाचा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ज्ञानोबाचे पैजार
  • «
  • ‹
  • 1
  • 2

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा