✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

प्रभू मास्तरांचे अभिनंदन

स
सरपंच यांनी
Fri, 06/22/2012 - 15:25  ·  लेख
लेख
मिसळपाव सुरू झालं आणि इथे अनेक लोक येऊ लागले. त्यातले काही अगदी शांतपणे इथे राहू लागले तर काहींनी अल्पावधीत स्वतःचे असे एक स्थान निर्माण केले. आमचे प्रभू मास्तर ऊर्फ विनायक प्रभू हे त्यातलेच एक भन्नाट व्यक्तिमत्व. (http://www.misalpav.com/user/1235/guestbook) इथे आल्यावर त्यांच्या क्रिप्टिक बोलण्यामुळे चक्रावला नाही असा एकही सदस्य नसेल. पण आज प्रभू मास्तर हे स्वतःच एक इन्स्टिट्युशन होऊन बसले आहेत. अनेक क्षेत्रांची जाण असलेला पण मन खर्‍या अर्थाने शिक्षण क्षेत्रात रमणारा हा कलंदर माणूस. झोपेतही कोणासाठी काहीतरी (आणि ते ही निरपेक्ष वृत्तीने) करण्याची स्वप्नं बघणारे आणि जागेपणी ती स्वप्नं प्रत्यक्षात आणणारे प्रभू मास्तर. मिसळपावसारख्या माध्यमाचाही त्यांनी केवळ याच दृष्टीने उपयोग केला. गुणवंत पण गरजवंत असलेल्या विद्यार्थ्यांना खूप आधीच शोधून काढून त्यांना हरप्रकारे मदत ते करतात. या मदतीत काय नसतं? या मुलांना दहावीमधे उत्तम गुण कसे मिळवायचे, बारावी / सीइटीसाठी मार्गदर्शन करणे, शिष्यवृत्ती मिळवून देणे इतकंच नाही तर त्यांच्या पालकांनाही गरजेप्रमाणे रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे असं कोणत्याही प्रकारे प्रभू मास्तर त्यांचं काम करत असतात. सांगण्यास आनंद होतो की या वर्षीप्रभू मास्तरांच्या मार्गदर्शनाखालील १५ पैकी १२ विद्यार्थ्यांनी मेडिकल व इंजिनियरिंग सीइटीमधे शासकिय महाविद्यालयांमधे प्रवेश मिळवण्याइतके गुण मिळवले आहेत. या सगळ्या मुलांना गेल्या दोन तीन वर्षांपासून प्रभू मास्तरांची साथ लाभलेली आहे. इतकंच नव्हे तर या मुलांचा पुढच्या सगळ्या शिक्षणाच्या खर्चाचीही (सुमारे रु. २,५०,०००/-) सोय प्रभू मास्तरांनी केली आहे. या घवघवीत यशाबद्दल मास्तरांचे अभिनंदन आणि ते एक मिपाकर आहेत याचा आम्हाला अभिमान वाटतो हे आम्ही कृतज्ञापूर्वक नमूद करतो. या सीइटी परिक्षांमधे १७२ किंवा अधिक गुण मिळवणारे आणि ज्यांचे वार्षिक कौटुंबिक उत्पन्न रु. २,५०,०००/- किंवा त्याहून कमी आहे, अशा विद्यार्थ्यांसाठी त्यांच्याकडे अजूनही मदतीचे मार्ग उपलब्ध आहेत. इच्छुकांनी त्यांच्याशी संपर्क साधावा आणि इतरांनी ही बातमी गरजूंपर्यंत पोचवावी.
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
संस्कृती
समाज
लेखनप्रकार (Writing Type)
प्रकटन
सद्भावना
शुभेच्छा
अभिनंदन
बातमी
शिफारस
सल्ला
मदत
माहिती

प्रतिक्रिया द्या
12023 वाचन

💬 प्रतिसाद (72)

प्रतिक्रिया

मनःपूर्वक अभिनंदन

धनंजय
Fri, 06/22/2012 - 21:25 नवीन
मनःपूर्वक अभिनंदन
  • Log in or register to post comments

हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा!

स्वाती२
Fri, 06/22/2012 - 21:49 नवीन
हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा!
  • Log in or register to post comments

आम्हि तुमचे काय अभिनंदन करणार मास्तर...

अर्धवटराव
Fri, 06/22/2012 - 22:26 नवीन
कर जोडुन मनःपुर्वक धन्यवाद देतो फक्त. तुमच्या विद्यार्थ्यांचे मात्र अभिनंदन... केवळ चांगले मार्क्स आणि अ‍ॅडमीशन मिळाली म्हणुन नव्हे तर योग्य वेळी योग्य हाताने त्यांना साथ दिली आणि डोळ्यापुढे आदर्शही. __/\__ अर्धवटराव
  • Log in or register to post comments

अभिनंदन मास्तुरे!!

चतुरंग
Fri, 06/22/2012 - 22:36 नवीन
ज्या माणसांशी ओळख आहे असे सांगताना आपल्याला अभिमान वाटावा अशा फार थोड्या व्यक्ती असतात. मास्तर त्यापैकी एक आहेत! (प्रभूसखा) रंगा
  • Log in or register to post comments

शंभर टक्के सहमत, रंगाशेठ!

बिपिन कार्यकर्ते
Fri, 06/22/2012 - 22:45 नवीन
शंभर टक्के सहमत, रंगाशेठ!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग

खुद के साथ बातां : चला!

बिपिन कार्यकर्ते
Fri, 06/22/2012 - 22:44 नवीन
खुद के साथ बातां : चला! मास्तरचं कौतुक तर झालं... आता मास्तरला मदत कोण कोण करणार?
  • Log in or register to post comments

अहो मास्तरांचे सुहृद !!

अर्धवटराव
Fri, 06/22/2012 - 22:55 नवीन
हेच स्वगत धाग्याच्या रुपाने मांडा. सविस्तर चर्चा करुया. मास्तरांच्या कार्याला हातभार लावायला मिपकर मिसळेची प्लेट खाली ठेऊन सहभागी होतील अशी खात्री आहे. अर्धवटराव
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते

+१

बहुगुणी
Sat, 06/23/2012 - 01:32 नवीन
प्रभू सरांचं आणि त्यांच्या विद्यार्थ्यांचं हार्दिक अभिनंदन! हे चांगलं काम वृद्धिंगत व्हावं म्हणून अनेक जण स्वेच्छेने हातभार लावायला तयार असतील याची खात्री आहे. बिका आणि सरपंचः धागा टाकण्याचा नक्की विचार करा. जाता जाता: सौ. प्रभूंचाही सहभाग खासच महत्वाचा, तेंव्हा त्यांचेही आभार आणि अभिनंदन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अर्धवटराव

@अर्धवटराव आणि बहुगुणी :

बिपिन कार्यकर्ते
Sat, 06/23/2012 - 12:39 नवीन
@अर्धवटराव आणि बहुगुणी : भापो. पण.... मास्तर इथे नवीन होते तेव्हा या मंचाचा त्यांच्या कामाकरता कसा आणि काय उपयोग करून घ्यावा यावरून सुरूवातीला त्यांच्याशी बोलणेही झाले होते. त्यानुसार, साधारण तीन वर्षांपूर्वी, त्यांनी दहावीला ज्यांना खूप चांगले गुण मिळायची अपेक्षा होती त्यांच्या गुणात कमीतकमी ५% वाढ होईल असा एक कार्यक्रम आखला होता. हा कार्यक्रम वर्षभर चालणार होता आणि यात शाळांचा सहभाग अपेक्षित होता. अर्थात, यासाठी काही विशिष्ट आर्थिक खर्चही अंदाजित होता. त्यावेळी (मला वाटतं मीच) मिपावर एक धागा टाकला होता. (नक्की आठवत नाहीये, पण मिपावर याबद्दल नक्कीच माहिती आली होती.) काही लोकांनी मदत केली. मात्र ज्या प्रमाणात लोकांनी कौतुक केले त्या प्रमाणात मदत मिळाली नाही हे मात्र खरे. (इतकेच नाही तर त्यावेळी मास्तरांची व्यक्तिशः आणि त्यांच्या कार्याची इथे टिंगल झाली होती. तेव्हाही मास्तर त्यांना हसले होते आणि चूपचाप आपलं काम करत राहिले होते.) आणि म्हणूनच मी माझी ही प्रतिक्रिया दिली. हा झाला एक मुद्दा. अजून एक मुद्दा म्हणजे, तेव्हाही आणि आत्ताही, मास्तरांना आर्थिक मदत अपेक्षित नाही. इतकी वर्षे त्यांनी अक्षरशः स्वतःच्या कमाईतले पैसे वापरूनही मुलांना मदत केली आहे. आता तर ते काही सामाजिक संस्था / चॅरिटेबल ट्रस्ट यांच्याशी खूप जबळून निगडित आहेत आणि आर्थिक मदत करू शकतात. पण एखाद एकाम उभे रहायचे म्हणजे नुसते पैसे असून उपयोग नसतो. किंबहुना पैसे कमी असले तरी चालतील पण माणसं पाहिजे असतात ते काम पुढे न्यायला. आपल्यापैकी किती लोक मास्तरांना म्हणतील, "चला! आलो आम्ही. बोला काय करू?" ... अनुभव फारसा उत्साहवर्धक नाहीये. अर्थात, असे काम करणारे लोक, विशेषतः मास्तरासारखे, फारश्या उत्तुंग अपेक्षा ठेवून नसतात, त्यामुळे निराशही होत नाहीत. एकांड्या शिलेदाराच्या चिवटपणाने मास्तर शक्तीबाहेर काम करत राहतो. मास्तर ही प्रवृत्ती आहे. व्यक्ती नाही. आजही मास्तरांना गरज आहे ती हे काम करण्यात त्यांना मदत करणार्‍यांची. एखाद्याने यावं आणि म्हणावं "मास्तर, हे काम मी आमच्या गावात पोचवण्यासाठी तुम्हाला काही मदत करू शकतो का? काय आणि कसं? माझ्या गावात अमुक एवढी मुलं गरजू आहेत, तुमच्या क्रायटेरियामधे बसणारी आहेत. त्यांना पाठवू का?" हे एवढं झालं तरी मास्तर त्या दिवशी आनंदाने रडेल!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बहुगुणी

मास्तरांना आम्ही तीन

रेवती
Sat, 06/23/2012 - 04:47 नवीन
मास्तरांना आम्ही तीन वर्षापूर्वीच काय ते सांगून ठेवलय. त्यांनी फोन केला की काम होईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अर्धवटराव

अभिनंदन गुरुजी..

कौशी
Fri, 06/22/2012 - 23:11 नवीन
अभिनंदन गुरुजी..
  • Log in or register to post comments

अभिनंदन!

खेडूत
Sat, 06/23/2012 - 00:36 नवीन
अभिनंदन! आणि शुभेच्छा. पुढे ती मुले पण इतरांच्या मदतीला धावतील..
  • Log in or register to post comments

मास्तरांचे व मुलांचे अभिनंदन

इन्दुसुता
Sat, 06/23/2012 - 03:18 नवीन
मास्तरांचे व मुलांचे अभिनंदन व मास्तरांना पुढील कार्यासाठी अनेक शुभेच्छा
  • Log in or register to post comments

अभिनंदन

राजेश घासकडवी
Sat, 06/23/2012 - 06:55 नवीन
मनःपूर्वक अभिनंदन.
  • Log in or register to post comments

---^--- अभिनंदन अभिनंदन अभिनंदन ---^---

लीलाधर
Sat, 06/23/2012 - 08:11 नवीन
अभिनंदन! आणि शुभेच्छा
  • Log in or register to post comments

।ॠणनिर्देश

विनायक प्रभू
Sat, 06/23/2012 - 10:29 नवीन
पिवळा डांबिस यशोधरा स्वाती बिका गणामास्तर ३ वर्षापुर्वी कार्यक्रम सुरु झाला तेंव्हा सक्रिय सहभाग घेतल्याबद्दल. तेंव्हा रोपटे होते आज वटवृक्ष झाला. आणि हो रामदासांना कसा विसरेन बरे.
  • Log in or register to post comments

मास्तरसहीत वरील सर्वांचे

नाना चेंगट
Sat, 06/23/2012 - 11:11 नवीन
मास्तरसहीत वरील सर्वांचे अभिनंदन :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विनायक प्रभू

मास्तर

श्रीयुत संतोष जोशी
Sat, 06/23/2012 - 10:37 नवीन
मनापासून अभिनंदन , माझी तुमच्याशी प्रत्यक्ष ओळख आहे हे माझं भाग्य.
  • Log in or register to post comments

आणखी एक

विनायक प्रभू
Sat, 06/23/2012 - 11:13 नवीन
प्रसन्न केसकर आणि परा यांचे सुद्धा धन्यवाद. हा कार्यक्रम पुण्यात पोचवणे त्यांच्या सहभागाशिवाय शक्य नव्हते.
  • Log in or register to post comments

का लाजवता मास्तर?

प्रसन्न केसकर
Sat, 06/23/2012 - 14:08 नवीन
का लाजवता मास्तर? तुम्ही कार्याचा डोंगर रचताय त्यातच आमची एखादी चिमुट. तसेही पत्रकारांचे आणि वृत्तपत्रांचे कामच आहे अशा कार्याला प्रसिद्धी देणे. अंकिताची मदत मिळाल्यानंतरची मुलाखत http://www.dnaindia.com/pune/report_pune-medical-students-dream-comes-true_1703005 येथे वाचता येईल. डीएनए वृत्तपत्राने काल पुण्यात परिक्षेत अपेक्षेप्रमाणे यश न मिळालेल्या मुलांसाठी आणि त्यांच्या पालकांसाठी कार्यशाळा आयोजित केली होती. तीमध्ये मास्तर कार्यबाहुल्यामुळे सहभागी होऊ शकले नाहीत. मुले त्यांच्या मार्गदर्शनाला मुकली याचा खेद वाटतो. या कार्यशाळेची बातमी http://epaper.dnaindia.com/story.aspx?id=20547&boxid=13868&ed_date=2012-6-23&ed_code=820040&ed_page=3 येथे वाचता येईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विनायक प्रभू

हाबिणंदण गुर्जी.

घाशीराम कोतवाल १.२
Sat, 06/23/2012 - 12:14 नवीन
हाबिणंदण गुर्जी.
  • Log in or register to post comments

धन्यवाद मास्तर!

समंजस
Sat, 06/23/2012 - 21:12 नवीन
अभिनंदन असं म्हणणार नाही कारण तुम्ही त्याच्या पलिकडे आहात. फक्त धन्यवाद! तुमच्या सारखी काही वेडी माणसे समाजात असणे आवश्यक आहे त्यामुळे समाज थोडाफार का होईना चैतन्यशील आहे अन्यथा "झोम्बीज" च्या पलिकडे जास्त नाही.
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा