"चिंता करतो मिपाची.."
(ढिस्क्लेमर : डोक्याचं भजं झाल्यावर आलेल्या विचार-कुंथनातून स्त्रवलेली ही कविता आहे. विचार-मंथन नाही.. हाणा.)
अध्यात्म दर्शन पुराण-बिराण
अतिंद्रीय अनुभवांचा सध्या पूर आहे.
ऊर्ध्वरेतन, डावा उजवा मेंदु जडबंबाळ शब्द प्रकट
मागे फक्त गांजाचा धूर आहे..
"हरवलेल्या" कविता सापडल्या
काय च्यामारी त्रास आहे.
आमंत्रण नव्हतं दिलं वाचायला
वर ह्यांचीच मिजास आहे..
देशाची किती चिंता मला, बघा
तुम्ही साले तत्त्व-संवेदनाविहीन,
खोदून खोदून विषय काढतो
पाडतो कविता त्यांवर निश-दिन..
डायर्या हरवल्या हो माझ्या
पण मिपावर लिहण्याची खाज आहे,
तपापुर्वी नाकारलेल्या कर्जावर
अजुनही चढत व्याज आहे..
माझी चर्चा तेवढी वस्तु-प्रश्ननिष्ठ
तुमची बकवास बात आहे,
अर्धउष्ट्या करपट वैचारीक ढेकरा
ह्यांचा आता आला वात आहे..
जाऊ दे ना भोकात सगळं, चिन्म्या
कशाला घासत बसलाय फुकाची,
बुड वर करुन झोप की साल्या
म्हणे "चिंता करतो मिपाची"...
मस्त !
छान च्छान्न कुंथला आहात...
हो की..
@बुड वर करुन झोप की
ओ बुवा सांगा हो त्याला...... चिता चिंता समानास्ती बिंदूमात्र....
हाहाहाहाहा!
सहीच....
लै भारी.
जमलिये झकास !!!
उत्तम असा आरसा दाखवणारं
मस्तच रे! लई आवडेश
हाहाहा... साला फुटलो की
=)) =)) =))
चिगो साहेब, मस्त, लय, भारी , भन्नाट ,एकदम सही.
आवडेश
धन्यवाद..
फंडु!!