Skip to main content

सामना जगज्जेतेपदाचा - आनंद वि. बोरिस - भाग ५

लेखक चतुरंग यांनी सोमवार, 28/05/2012 16:16 या दिवशी प्रकाशित केले.
विश्वविजेतेपदासंबंधी लिहिलेल्या आधीच्या चारही भागाचे दुवे http://www.misalpav.com/node/21605 http://www.misalpav.com/node/21686 http://www.misalpav.com/node/21734 http://misalpav.com/node/21765 http://www.chessdom.com/news-2011/world-chess-championship-2012 या संकेतस्थळावर पट आणि चालींचे विश्लेषण दिसते. http://moscow2012.fide.com/en/ या ठिकाणी डावाचेच थेट प्रक्षेपण होत असल्याने डाव आणि खेळाडू बघता येतात. परंतु मध्येच प्रायोजकांचे काही कार्यक्रम सुरु होऊन रसभंग होतो. पण खेळाडू बघता येणे ही मौज काही वेगळीच असल्याने हे संस्थळही जरुर बघावे. आज शेवटचा बारावा डाव. अजून कोंडी फुटलेली नाही. दोघेही साडेपाच-साडेपाच गुण घेऊन बरोबरीत आहेत. आनंद डाव जिंकून चौथ्यांदा विजेतेपद राखेल का मिळालेल्या पहिल्यावहिल्या (आणि कदाचित शेवटल्या) संधीचा पुरेपुर फायदा उठवण्याच्या जिगरीने बोरिस काही अफलातून चमत्कार करुन आनंदला धूळ चारेल आणि विजेतेपदाचा मुकुट त्याच्याकडून काढून घेईल? का पुन्हा एकदा बरोबरी होऊन सामना टायब्रेकर मध्ये ढकलला जाऊन प्रेक्षकांची उत्सुकता आणखी ताणली जाईल? या प्रश्नांची उत्तरे मिळवण्यासाठी चला बघूयात डाव बारावा! -चतुरंग
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 27069
प्रतिक्रिया 115

प्रतिक्रिया

In reply to by कवटी

घड्याळ खिशातच घालून खेळतय बग !! ..लास्ट च्या टायमाची चुक पुन्हा नाय करायच त्ये

आणि पुढल्या डावात तो पांढरा आहे. परंतु ज्या प्रकारे बोरिस खेळतो आहे त्यावरुन अजूनही स्थिती सोपी नाही.

त्रासदायक ठरणार! लवकर काहीतरी करायला हवे. आता बी स्तंभात बोरिसची हत्तीची जोडी बसली तर अवघड होणार आहे. आनंदला तो जागेची टंचाई निर्माण करुन चोक करतोय.

काफी शातीर चालो से आनंद को कर रहे है परेशान !! कैसे बच पायेंगे आनंद बोरीस से ?? हार कि आग मे जलते बोरीस का करारा हमला ...आयिये देखते है :P

आनंदने वजीरावजीरीचा प्रस्ताव देऊन किंचित वरचढ होण्याचा प्रयत्न केला आहे. बोरिसचे हत्ती नि उंट पाऽर दूर असल्याने आनंदने एक प्यादे देऊन राजाला एकटा पाडला आहे. वजीरावजीरी झाली तर बोरिसची स्थिती नाजूक होते.

In reply to by रमताराम

साला पण त्याच्या नर्व्ज मानायला हव्यात राव. आधीचा डाव हरुन सुद्धा पठ्ठ्या जोमाने लढतोय! हॅट्स ऑफ!!

In reply to by रमताराम

एवढ्या वेळ आनंदच्या राजावर डूख धरून बसलेला हत्ती अखेर माघारी आला बोरिसचा. जियो आनंद. वजीरावजीरी झालीच. आता बोरिसला सगळी पोजिशन अनवाईंड करावी लागती आहे. आणि पुन्हा जेमतेम एक मिनिट उरले आहे आनंदच्या पंधरा मिनिटासमोर.

नवा धागा प्लिज! गेल्या म्याचला लय धमाल आली. हाफिसातल्यांनाही ही लिंक दिल्याने आता अख्ख्या फोअरवर हेच ह्चालु आहे ;)

मधली तीन प्यादी अशी मस्त बसली आहेत की मोहर्‍यांची देवाणघेवाण झाली की आनंदचे पहिल्या प्याद्याचा वजीर होणे टळत नाही. बोरिस काय उपाय काढतो पाहू या.

In reply to by रमताराम

कर्णात बसली आहेत. आणि आनंदचा घोडा सुद्धा मस्त पोझीशन पकडून आहे उंटा कुठूनही हत्तीवर हल्ला करता येत नाही! :)

In reply to by ऋषिकेश

खाल्लं रे खाल्लं.. आता कसं समसमान प्यादी झाली (आम्हाला इतकंच कळतं ;) )

In reply to by ऋषिकेश

थोडा सायकॉलॉजिकल मामला असतो. अगदी ऑब्विअस मूव्जला सुद्धा वेळ लावला की समोरचा अस्वस्थ होतो!

प्यादं ई३ मधे सरकवायची खेळी अजिबात कळली नाही? ते अमिष होतं? फक्त १ चेक देण्यासाठी? काहि कळेना झालंय

काहीतरी झालं, दोघंही उठुन गेले, बहुधा बरोबरी झाली असावी. मला सुद्धा फार कळत नाही, पण शेवटी आनंद राजा आणि एक हत्ती घेउन जे खेळत होता, ते पहायला जाम भारी होतं.

छ्या! इथे स्क्रीन अजूनही ङंडलीये. असो. आता शेवटच्या टायब्रेकरसाठी तरी नवा धागा काढा हो .. नंतर आनंदचे अभिनंदनही तिथेच करूयात :)